अग्नी(इंद्र)धनु्ष्य

अग्नी(इंद्र)धनूष्य हा एक फार दुर्मिळ अद्भूत असा नैसर्गिक चमत्कार आहे. हा घडायला आकाशात तंतूमय ढग असावे लागतात व त्यांची उंची वीस हजार फुटाहून अधिक असावी लागते. एवढेच नाही तर या ढगात भरपूर बर्फाचे कणही असावे लागतात.

सुर्याचे किरण या ढगांवर बरोबर अठ्ठावन्न अंशाचा कोन करून पडावे लागतात. असे झाले तर हे इंद्रधनुष्य़ आग आकाशाला आग लागल्यासारखे दिसू लागते.

या चमत्काराचे शास्त्रीय नाव आहे “सरकमहॉरीझाँटल आर्क”.

हे नेहमी दिसणारे इंद्रधनुष्य नाही. जेव्हा प्रकाश उंचीवर असलेल्या तंतूमय ढगातून जातात तेव्हा हे चमत्कार दिसतात. यातील बर्फाचे षटकोनी स्फटीक हे जाड थाळ्यांच्या आकाराचे लागतात व ते जमिनीला समांतर असावे लागतात.

प्रकाश या स्फटीकाच्या बाजूने आत शिरतात व खालच्या बाजूने बाहेर पडतात. हे होताना या किरणांचे अपवर्तन होऊन त्यातून रंग बाहेर पडतात. एवढे होऊन चालत नाही तर या बर्फाच्या स्फटीकांची एकामेकांशी एका विशिष्ठ प्रकारे रचना व्हावी लागते. हे सगळे जर झाले व आपण तेथे असलो तर नशिबवान माणसाला हा चमत्कार दिसतो.

आपल्याही हे केव्हातरी दिसेल. फारच भारी दिसतो हा प्रकार…………..!

जयंत कुलकर्णी.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in लेख. Bookmark the permalink.

3 Responses to अग्नी(इंद्र)धनु्ष्य

  1. वाह, हि माहिती नवीनच आहे. काल परवा आकाशात असे विखुरलेले रंग दिसले होते, संध्याकाळी ७-७-३० च्या सुमारास. पण ते नक्की काय होते कुणास ठाऊक?

  2. ShabdMarathi says:

    खुप छान माहिती

  3. नावीन्यपूर्ण , उपयुक्त माहिती माहिती ,

Leave a comment