नवीन पुस्तक – फ्रेंच राज्यक्रांती

नमस्कार! वाचक मित्र आणि मैत्रिणींनो,

सांगण्यास आनंद वाटतोय, की फ्रेंच राज्यक्रांती हे पुस्तक छापून हाती आले आहे. एकूण पाने ५३३ झाली आहेत. किंमत आहे. रु. ६३०.०० याबरोबर माझे २५० रुपये किंमतीचे एक पुस्तक ‘‘ गुलामीची १२ वर्षे ’’ हे सप्रेम भेट देण्याचे ठरवले आहे.

उत्कृष्ट प्रतीचा कागद वापरला आहे.

फ्रेंच राज्यक्रांती, हे पुस्तक वाचल्यावर तुम्हाला भारतातील राजकारणाबद्दल वाचतोय की काय असा कदाचित भास होईल. यातील कित्येक परिच्छेद आपण उदाहरणे म्हणून वापरू शकतो. खाली या पुस्तकातील मनोगताचा काही भाग टाकला आहे..

मनोगत..

फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल जे साहित्य लिहिले गेले आहे किंवा उपलब्ध आहे त्या साहित्याचा प्रवास टप्प्याटप्प्याने झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. सुरुवातीच्या लेखकांनी त्यांच्या लिखाणाला आणि निष्कर्षासाठी आधार घेतला, तो लिहून ठेवलेल्या आठवणी, पत्रके (त्या काळात या पत्रकांमध्ये जनमत हलवण्याची ताकद होती), वर्तमानपत्रे, ऐकीव कहाण्या आणि सामाजिक आणि राजकीय पूर्वग्रह असलेली मते; त्यानंतरच्या लेखकांनी मात्र संदर्भ गोळा केले आणि इतिहास लिहिला. उदा.पॅरिस कम्युनच्या दप्तरांचा त्यांनी अभ्यास केला आणि सत्यावर आधारलेला इतिहास लिहिण्याचा प्रयत्न केला जो आजच्या इतिहासकारांनाही उपयुक्त आहे. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेस आणि नंतर जी मते मांडण्यात आली ती इतिहासाच्या मुशीत नष्ट झाली असे ॲक्टनसारखे इतिहासकार म्हणतात ते काही खोटे नाही, कारण जी मते मांडण्यात आली, जे काही निष्कर्ष काढण्यात आले, त्याची आजही पुनर्मांडणी चालू आहे. त्या काळातील होणारे विध्वंस आणि नंतर होणारी उभारणी हा क्रम आजच्या काळातही सुरू आहे. त्या काळात मांडलेले तत्त्वज्ञान वेगवेगळ्या स्वरुपात तग धरून आहे आणि हे तत्त्वज्ञान आजही राजकारणी, अर्थतज्ञ, आदर्शवादी मंडळींना जेरीस आणते. किंबहुना आजच्या आधुनिक जगातील जटील प्रश्र, अडचणी आणि संकटे याची पूर्वसूचना फ्रेंच राज्यक्रांतीने दिली होती असे म्हणायला जागा आहे. अर्थात, इतिहास जसाच्या तसाच परत घडतो असे नाही, त्यात थोडाफार फरक पडतोच, त्यामुळे सध्या जे घडते आहे त्याचा इशारा फ्रेंच राज्याक्रांतीत कसा मिळतो यासाठी वाचकांना जरा अभ्यास करावा लागेल. एका इतिहासकाराने म्हटल्याप्रमाणे आपल्याला फ्रेंच राज्यक्रांती समजणार नाही जोपर्यंत ही क्रांती सामान्य कायद्याला धरून होती आणि सामान्यांनी घडवून आणली होती हे आपण समजून घेत नाही. या क्रांतीत भव्य दिव्य काही नव्हते, ना ती एकमेवाद्वितीय होती. (अर्थात हे खोटे आहे. यामागे समाजवादी व अराजकवादी मंडळींचा हात होता हे आता सिद्ध झाले आहे). त्यामुळे काही लेखक ज्याप्रमाणे या घटनेने अत्यंत भारावून गेले होते तसे भारावून जाण्याचे आपल्याला कारण नाही. आपण जे घडले होते त्याच्यावर लक्ष केंद्रित करणे योग्य ठरेल.

या पुस्तकात त्या काळातील महत्त्वाच्या व्यक्तिंचा मानसशास्त्रीय प्रभाव त्यांच्यावर आणि समाजावर कसा पडला याचा ऊहापोह केला आहे. त्यांचे आयुष्य, ते कसे जगले आणि ते मृत्यूला कसे सामोरे गेले हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. एके काळी उत्तुंग स्थानावर पोहोचलेली ही माणसे एका क्षणात कशी धुळीस मिळाली, ज्यांच्या अंगावर भरजरी पोषाख होते ते नंतर भणंग कसे झाले याचीही ही कहाणी आहे. या माणसांच्या चरित्रामधून उलगडत जाणारा हा फ्रेंच राज्यक्रान्तीचा इतिहास वाचकांना मनोरंजक वाटेल, पण त्याच वेळी त्यांच्या अंगावर काटा उभा राहील याची मला शंका नाही. दोन व्यक्तिचित्रांमध्ये ऐतिहासिक घटना दिल्या आहेत ज्यामुळे या कथेमध्ये सुसंगती राहील अशी काळजी घेतली गेली आहे. या व्यक्तिचित्रांना जोडणारी ही पाने नसती तर कदाचित हा इतिहास समजणे अवघड गेले असते. जगाचा इतिहास म्हणजे त्यातील थोर माणसांचे चरित्रच असते असे उगाच म्हणत नाहीत. या पुस्तकातील नायकांचा असा विश्वास होता, की ते समाजाचे नेतृत्व करत होते आणि ते खरेही होते, पण त्यांचेही नेतृत्व कोणीतरी करत होते हेही स्पष्ट आहे. या पुस्तकात या क्रांतीची कथा सांगितली आहे ती तुम्ही इतरत्र वाचली असेल, पण माणसांचा क्रांतीवरील प्रभाव आणि माणसावर पडलेला क्रांतीचा प्रभाव या बद्दल तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल.

क्रांतीमध्ये जी उलथापालथ झाली त्यात माणसांचे अनेक गट निर्माण झाले. या गटात असंख्य नागरिक विभागले गेले तर काही एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. मिहाबूच्या भोवती जी माणसे जमा झाली होती ती होती, ‌‘लाफायेत, बार्नेव्ह, सियेस, यांच्यासारखी नॅशनल असेंब्लीमधील राजकारणातील आदर्शवादी आणि कारस्थानी राजकारणी. तर दुसरीकडे व्हर्निऑ, कॉन्डोसे, ब्रिस्सॉट, रोलँड, दातो इ. इ. हे जिहाँ (Gironde)गटात होते. ही मंडळी एक विचारधारा असलेली होती. यात अर्थतज्ञ होते, अहंगंड असलेले पुरोगामी लोक होते. अजून एका गटात रॉबस्पिअर, सेंट जस्ट, कुथाँ हे कमिटीचे सदस्य , दहशतीचे पुरस्कर्ते होते. ज्यांचा नंतर जाग्या झालेल्या फ्रान्समध्ये नाश झाला. बर्रास, ताल्येहाँ, फुशे आणि त्यांचे पाठिराखे ज्यांनी वरील दहशतीनंतर राज्य सांभाळले आणि एका सिसेरियन हुकुमशहाचा मार्ग मोकळा केला (नेपोलियन). फ्रेंच राज्यक्रांती या गटांभोवती हेलकावे खात राहिली. या सगळ्या माणसात तीन माणसांनी मात्र इतरांना आपल्या प्रभावाखाली झाकाळून टाकले. ‌‘मिहाबू, दातो आणि बोनापार्ट. तुम्ही परमेश्वर म्हणा, नशीब म्हणा किंवा इतर काही म्हणा, परमेश्वराने या तिघांच्या हातून अराजकाच्या परिस्थितीतून सुव्यवस्था आणण्याचे प्रयोग केले. या तीन वास्तववादी माणसांचे कार्य जर पाहिले, तर त्यात खूपच साम्य आहे.

फ्रेंच राज्यक्रांतीवर हे पुस्तक लिहिताना मला मोबियसच्या पट्टीची आठवण झाली. या पट्टीवर जर आपण फ्रेंच राज्यक्रांतीतील घटना टाकल्या तर आपण जेथून सुरुवात केली तेथेच परत येऊन पोहोचतो. ही राज्यक्रांती फसली असे म्हणायचे का? हा एक वादाचा मुद्दा आहे. समाजवादी, कम्युनिस्ट आणि इतर डाव्या विचारांची मंडळी असे कधीच म्हणणार नाहीत आणि मान्यही करणार नाहीत. ही राज्यक्रांती घडवून आणण्यात आली ती खालील कारणांसाठी – राजेशाही नष्ट करणे, चर्चचा प्रभाव कमी करणे, सत्ता नाहीरे वर्गाकडे देणे, प्रजातंत्राची स्थापना करणे, संविधानाची स्थापना करणे..इ.इ.इ. पण काय झाले हे आपण थोडक्यात बघू – नेपोलियनने परत राजेशाही प्रस्थापित केली, चर्चचा प्रभाव काही कमी झाला नाही. चर्च नष्ट करून रॉबेस्पियरने नवीन धर्माची स्थापना केली पण तो थोड्याच कालावधीत नष्ट झाला, सत्ता गरीबांकडे राहीली नाही. नेपोलियन राजा झाला आणि संविधान लोप पावले. नेपोलियन सत्तेवर आला आणि प्रजातंत्राचे बारा वाजले. हे पाहिल्यास, ही क्रांती फसली असेच म्हणावे लागेल. जो धर्म जनमानसात रुजलेला आहे, त्याची जागा नवीन धर्म पूर्णपणे घेऊ शकत नाही. उदा. हिंदू धर्मावर एवढी आक्रमणे झाली, तो नष्ट करण्याचे एवढे प्रयत्न झाले पण हा धर्म काही नष्ट झाला नाही. ज्यूंडाइझम ख्रिश्चन नष्ट करू शकले नाहीता आणि इस्लाम ख्रिश्चन धर्म नष्ट करू शकला नाही, मग त्यांची मूलभूत तत्त्वे काही असोत…

आता जे पुस्तक ‘‘गुलामीची १२ वर्षे’’ मी सप्रेम भेट देणार आहे, त्याबद्दल थोडेसे..

आयुष्यातील तीस वर्षे स्वतंत्र राज्यात स्वातंत्र्य उपभोगल्यावर सॉलोमन नॉरथप या माणसाचे अपहरण झाले व तो गुलाम म्हणून विकला गेला. त्या भयंकर गुलामीतून १८५३ साली त्याची नशिबाने सुटका झाली तेव्हा एक तप उलटून गेले होते. त्या भयंकर काळाबद्दल किंवा एकंदरीतच त्याच्या आयुष्याबद्दल लिहिले तर वाचकांना त्यात रस वाटेल असे मित्रमंडळींना वाटल्याने हा लेखन प्रपंच.

…हा इतिहास मोठा विचित्र आहे. त्यातील सत्य हे काल्पनिक गोष्टीपेक्षाही अद्भुत आहे. जरा विचार करा, तीस वर्षे या माणसाने स्वातंत्र्यात काढली. साधे का होईना त्याच्या डोक्यावर छप्पर होते ज्यातून त्याला हाकलण्याचा कोणालाही अधिकार नव्हता. दुर्दैवाने त्यानंतर १२ वर्षे तो गुलाम झाला, दुसऱ्याची मालमत्ता झाला. अक्षरश: एखादे खेचर, घोडे असतात तसे आणि त्याचा दर्जा त्यांच्यापेक्षाही हीन होता. त्यांनी त्याला त्याच्या घरादारापासून तोडले, त्याच्या बायकापोरांपासून तोडले. त्यांच्या तोंडातील घास हिरावून घेतला व दक्षिणेत भाजत्या उन्हात, शेतात, ज्याचा शून्य मोबदला मिळतो अशा कष्टप्रद कामाला जुंपले आणि ते सुद्धा एका क्रूर मालकाच्या चाबकाखाली. भयंकर ! अशी माणसे जगात असतात हे वाचून तुमचे रक्त तापेल…

– फ्रेडरिक डग्लस.(८१८-१८९५)

हे पुस्तक वाचल्यावर वाचकांना प्रश्न पडेल की सॉलोमन नॉरथपचे पुढे काय झाले. खरे सांगायचे तर त्याचा मृत्यू हे शेवटपर्यंत रहस्यच राहिले. त्याच्या पत्नीचा, मुलांचा शोध लागला पण सॉलोमन नॉरथपच्या थडग्याचा साधा उल्लेखही कुठे सापडला नाही. आश्चर्य म्हणजे त्याचा अमेरिकेत त्या काळात झालेल्या जनगणनेतही उल्लेख सापडत नाही. पण सुटल्यानंतर तो अमेरिकेत सगळीकडे गुलामगिरीच्या विरुद्ध भाषणे देत हिंडत होता. शेवटी तो कॅनडात गेला होता. तेथे त्याच्या सभेत काहीतरी गोंधळ झाला . त्यानंतर मात्र त्याचा पत्ता लागला नाही….

नॉरथपचे पुढे काय झाले. खरे सांगायचे तर त्याचा मृत्यू हे शेवटपर्यंत रहस्यच राहिले. त्याच्या पत्नीचा, मुलांचा शोध लागला पण सॉलोमन नॉरथपच्या थडग्याचा साधा उल्लेखही कुठे सापडला नाही. आश्चर्य म्हणजे त्याचा अमेरिकेत त्या काळात झालेल्या जनगणनेतही त्याचा उल्लेख सापडत नाही. पण सुटल्यानंतर तो अमेरिकेत सगळीकडे गुलामगिरीच्या विरुद्ध भाषणे देत हिंडत होता. शेवटी तो कॅनडात गेला होता. तेथे त्याच्या सभेत काहीतरी गोंधळ झाला. त्यानंतर मात्र त्याचा पत्ता लागला नाही….

ज्यांना हे पुस्तक घ्यायचे आहे त्यांनी कृपया मला रु ६३० + रु ५० = रु ६८० gpay करावेत. फोन नं : ९८२३२३०३९४. दुसऱ्या कुठल्याही क्रमांकावर gpay करू नये.

काही वाचकांना पुस्तकावर माझी सही पाहिजे होती पण मी पुस्तक अगोदरच रवाना केले होते. हे टाळण्यासाठी कृपया जेव्हा आपण पैसे पाठवाल तेव्हा त्यावर signed copy असे लिहिलेत तर बरं होईल..

ही भेटीची ही सवलत भेटपुस्तकाच्या प्रती संपेपर्यंतच उपलब्ध असेल. कारण नंतर परत छापून ही योजना चालू ठेवणे शक्य नाही.

Dear Friends and Readers,

Forgot to make one request. Kindly share this post with your friends and relatives..

Warm Regards,

Jayant Kulkarni

Posted in मी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल... | 1 Comment

राणीचा (मारी ॲन्टोनेट) शिरच्छेद

नमस्कार!

फ्रेंच राज्यक्रांतीवर पुस्तक लिहायला घेतले तेव्हा नुसत्या सनावळ्या लिहिण्यात काही अर्थ नव्हता, मला त्यातील महत्त्वाच्या व्यक्तिंवर लिहायचे होते. त्यांच्या विचारांचा समाजावर काय परिणाम झाला याबद्दल लिहायचे होते. त्यांनी काय चूका केल्या त्याबद्दल लिहायचे होते आणि शेवटी ही राज्यक्रांती का फसली हे वाचकांना समजावे अशी माझी इच्छा होती म्हणून यातील महत्त्वाच्या व्यक्तिंची चरित्रे आणि त्यातून उलगडला जाणारा इतिहास असे स्वरूप ठरवले. याच ढाच्यावर त्या काळातील एका लेखकाचे पुस्तकही सापडले. तो ढाचा आणि त्यात माझे विचार आणि इतर वाचन याची गोळाबेरीज म्हणजे हे पुस्तक. या घटनेने जगावर जो काही परिणाम केला त्याचा परामर्श घ्यायचा म्हणजे मोठेच पुस्तक लिहावे लागणार याची मला कल्पना होती. पुस्तक पूर्ण झाले आहे आणि दुसरे प्रुफ रिडींग सुरू आहे. त्याच वेळी प्रकाशक शोधण्याचे कामही सुरू आहेच. मला वाटते पुस्तक ४००/५०० पानांचे होईल. कदाचित जास्तीही! निश्चित नाही…असो.

प्रकरण ७

राणीचा (मारी ॲन्टोनेट) शिरच्छेद

१७९३च्या वसंतऋतूत विशेष फौजदारी न्यायाधिकरणाने आपले काम सुरू केले,त्याचे नाव ठेवले गेले, ‘‘क्रांतीकारी न्यायाधिकरण’’ लवकरच हे न्यायाधिकरण इतर सरकारी खात्यांपेक्षा जास्त व्यस्त झाले. अजून फाशीची शिक्षा सर्रास देण्यात येत नव्हती. अंदाजे दोन दिवसाला एक या प्रमाणात मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात असे, पण जसे युद्ध भडकले तशी ही संख्या वाढू लागली. जिहोन्डीन गटाच्या सदस्यांना या न्यायाधिकरणासमोर उभे करण्यात आले, त्या आधी थोडेच दिवस मारी ॲन्टोनेटचे डोके गिलोटीन खाली उडवण्यात आले. १० ऑगस्ट नंतर तिला, लुईला आणि तिच्या बरोबर असणाऱ्यांना ‘टेंपल’ नावाच्या इमारतीत तुरुंगात टाकले गेले होते. मारी ॲन्टोनेटने मुर्खपणाने तिच्या आयुष्यात (फ्रान्समध्ये) उन्मत्तपणे अनेक चुका केल्या होत्या, पण टेंपलमेध्ये जे हाल तिने भोगले त्याने तिची त्या पापांमधून जवळजवळ मुक्तता झाली, तिला सहानुभूती मिळू लागली. तिला फ्रान्समधून हद्दपार करण्याची शिक्षा देणे सहज शक्य होते, पाहिजे तर परत आली तर मृत्यूदंड, असेही कलम त्यात घालता आले असते, पण तिला गिलोटीन खाली ठार मारण्याची क्रूर शिक्षा दिल्यामुळे, तिला जगभर जास्तच सहानुभूती मिळू लागली. अर्थात, १७८९ मध्ये व्हर्साय येथे जमावाच्या तावडीत जर ती सापडली असती तर काय झाले असते याची कोणी कल्पना करू शकत नाही. त्यापेक्षा ही शिरच्छेदाची शिक्षा बरी होती म्हणायची. जनता आता तिला मनापासून शिव्याशाप देत होती. या राणीइतकी वाईट राणी आजवर फ्रान्सने पाहिली नाही असे लोक उघडपणे बोलू लागले. तिच्या वाईट राज्यकारभाराबद्दल तिला एकटीला दोषी धरता येत नाही. ती ज्या वातावरणात वाढली, घटनाक्रम, तिच्या सल्लागारांचे बदसल्ले आणि तिचे अप्रामाणिक सहकारी या सगळ्यांना दोष द्यावा लागेल. तिने जो काही काळ दरबारात फ्रान्सची राणी म्हणून काढला त्यात ती खऱ्या अर्थाने कधीच फ्रेंच झाली नाही. ती ऑस्ट्रियन होती आणि शेवटपर्यंत ऑस्ट्रियनच राहिली. तिच्या कारवाया पाहिल्यावर असे म्हणावेसे वाटते, की ती फ्रान्सच्या पारंपरिक शत्रूची, ऑस्ट्रियाची, फ्रान्सच्या दरबारातील एक निर्बुद्ध हेर होती. फ्रान्सची बहुतेक जनता या बाईला फ्रान्सची कट्टर शत्रू मानत होती. फ्रान्सच्या संस्कृतीचा सर्वनाश करणे हेच ऑस्ट्रियाचे ध्येय आहे असे जनता मानत असल्यामुळे या राणीची जनमानसात काय प्रतिमा असेल याची कल्पना आपण करू शकतो. ऑस्ट्रिया आणि इंग्लंडने मिळून फ्रान्सच्या नौदलाची आणि सैन्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आणि सात वर्षांच्या युद्धात फ्रान्सचे पंख कापले, पण फ्रान्सची जनता त्यांचा एवढा तिरस्कार करत नसे कारण ते शेवटी शत्रू होते. त्यांना सगळ्यात जास्त तिरस्कार फ्रान्समधील ऑस्ट्रियाच्या मित्रांचा वाटे.

मारी ॲन्टोनेटची आई मारी थेरेस ही ॲस्ट्रियाची एक कर्तबगार राणी होती. तिला एकूण १६ मुले झाली आणि त्यातील १३ जगली आणि मोठी झाली. मारी ॲन्टोनेट ही त्यातील सगळ्यात धाकटी मुलगी. मारी थेरेस मुलं मोठी होईपर्यंत त्याच्यांशी अत्यंत प्रेमळपणे वागायची, त्यांचे लाड करायची, पण नंतर मात्र तिच्यातील सम्राज्ञी आणि कावेबाज राजकारणी जागी व्हायची आणि त्या सगळ्या मुलांचा, मुलींचा वापर युरोपच्या राजकारणाच्या पटावरील प्यादी म्हणून केला जायचा. (अर्थात यात काही नवीन नाही. आपल्याकडेही राजकारणासाठी सोयरीक जुळवण्याची शेकड्याने उदाहरणे पडली आहेत). मारी ॲन्टोनेटने व्हिएना आणि आपल्या आईला मागे सोडले आणि अशाच एका राजकारणी चालीसाठी ती फ्रान्सला रवाना झाली. त्यानंतर तिच्या आईची आणि तिची परत भेट झाली नाही. फ्रान्सच्या आणि ऑस्ट्रियाच्या एका तहावर तिच्या आणि फ्रान्सच्या दुफांबरोबर झालेल्या विवाहाने शिक्कामोर्तब होणार होते. त्यावेळी तिचे वय होते १४ आणि लुईचे वय होते १५. (त्या काळात सिंहासनाचा वारस असलेल्या राजपूत्राला दुफां या बिरुदाने ओळखले जाई. याचा फ्रेंचमध्ये उच्चार जरी दुफां असला तेरी त्याचे स्पेलिंगप्रमाणे उच्चार होतो डाऊफिन, हा शब्द डॉल्फिन या शब्दाचे फ्रेंचकरण आहे. त्या घराण्याच्या कोट ऑफ आर्मसवर डॉल्फीनचे चित्र आहे, हा मासा सागरी विजय, बुद्धिमत्ता, सर्व सागरांवर आणि नद्यांवर याचा संचार असतो, हा जात्याच हुशार असतो, या सगळ्याचे प्रतिक म्हणून याला झेंड्यावर जागा देण्यात आली होती) लुईच्या आजोबांचा मृत्यू झाल्यावर (लुई – १५ वा), (म्हणजे यांचे लग्न होऊन जवळजवळ चार वर्षांनी) ते फ्रान्सच्या राजा आणि राणी या पदावर आरुढ झाले. (लुईचे वडील आधीच मरण पावले होते म्हणून हाच सिंहासनाचा वारस होता) लुईच्या तुटक निरस स्वभावाच्या आत्या, त्याचा भाऊ ‘काऊंट द प्रॉव्हेन्स’, लुईच्या दोन वहिनी, ही सगळी मंडळी ॲन्टोनेटचा द्वेष करायची. खरे तर त्यांना तिची भीती वाटायची, कारण त्यांना ऑस्ट्रियाच्या मैत्रीची भीती वाटायची. दरबारात ऑस्ट्रियाच्या बाजूने जे सरदार आणि अधिकारी होते त्यांच्या केंद्रस्थानी स्वतःला ठेवण्यात तिने यश मिळवले. अर्थात तिला ते सहज शक्यही होते. जे ऑस्ट्रियाचे शत्रू होते त्यांच्याशी तिने शत्रूत्व पत्करले. दरबारातील इतर सरदारांनी तिला आदर दाखवला नाही, कारण तिचा नवराच तिला आदर दाखवत नसे. त्याला राजदरबारातील कृत्रिम वातावरणापेक्षा शिकार आणि गावाकडील सरळ साधे आयुष्य जास्त आवडे. या आचरट बाईला आणि त्याला लग्नाच्या बेडीत का अडकवले आहे ते त्याला उमजत नव्हते, पण काहीही असले तरी तो तिच्या फटकळ स्वभावाला घाबरून असे, तिच्या टिंगल टवाळ्यांना घाबरत असे. जवळ जवळ सात वर्षे त्याने तिच्याबरोबर रतिक्रिडा केली नाही. अर्थात त्याला इतरही बरीच कारणे होती. लुईला त्याच्या पत्नीच्या सौंदर्याचा उबग आला. तिच्या मूर्ख चुकांमुळे आणि अत्यंत उधळ्या स्वभावाने त्याचे बरेच नुकसानही झाले. थोडक्यात काय राज्यक्रांती होईपर्यंत लुईने त्याच्या बायकोकडे ढुंकुनही पाहिले नव्हते, पण राज्यक्रांती सुरू झाली आणि त्याने तिच्याशी अत्यंत प्रेमाने वागण्यास सुरुवात केली. मागे केलेल्या चुकांची दुरुस्ती करण्याचा त्याने अतोनात प्रयत्न केला. दुर्दैवाने हे खरे असले तरी तो कायम तिच्यापुढे दबून वागला हेही खरं आहे.

मारी ॲन्टोनेटला व्हिएन्नातून, म्हणजे तिच्या आईकडून काय करायचे, कसे वागायचे याच्या सतत सूचना यायच्या. फ्रान्सच्या दरबारात ऑस्ट्रियाचा एक मर्सी नावाचा मुत्सद्दी राजदूत होता, त्याच्या सगळ्या सूचना ती पाळायची. ऑस्ट्रियाचे हितसंबंध जपणे हे तिने आपले कर्तव्यच मानले होते. तिने तिच्या नवऱ्यावर प्रभाव टाकण्याचा बराच प्रयत्न केला, अर्थात त्यात तिला फारसे यश मिळाले नाही. फ्रान्सच्या दरबारातील ऑस्ट्रियाच्या अधिकाऱ्यांना फ्रान्समध्ये प्रशासकीय अधिकार मिळावेत यासाठी हे सगळे प्रयत्न चालले होते, जेणे करून ऑस्ट्रियाला फ्रान्सच्या दरबारात काय चालले आहे याची इत्थंभूत वित्तंबातमी कळावी. जेव्हा तिचे या कामाकडे दुर्लक्ष होत असे, तेव्हा लगेचच व्हिएन्नामधून तिला ताकीद मिळे आणि मर्सी येऊन तिला तिची कर्तव्ये समजावून सांगत असे.

जर मारी ॲन्टोनेटला तिच्या आईसारखी बुद्धी असती, तर ती युरोपच्या चांगल्या वाईट राजकारणातील एक अत्यंत महत्त्वाची व्यक्ती झाली असती, पण तिचा स्वभाव पडला उच्छृंखल, उधळा, मौजमस्तीत रमणारा. अर्थात हा स्वभाव टिकला राज्यक्रांती होईपर्यंत. त्यानंतर मात्र तिचे रुपांतर एका प्रौढ गंभीर स्त्रीमध्ये झाले, म्हणजे लग्नानंतर जवळजवळ २० वर्षांनी! ती उच्चपदावर बसलेली एक अडाणी स्त्री होती. तिला ना राजकारणात रस होता ना राणीच्या कर्तव्यांमध्ये, ना फ्रान्सच्या संस्कृतीमध्ये, ना जनतेच्या सुखदुःखात आणि मुख्य म्हणजे तिला स्वतःत बदल करण्याची मुळीच इच्छा नव्हती. लाडात वाढल्यामुळे ती हटवादी झाली होती आणि ती लहरी होती, भविष्याबद्दल बेफिकीर असणाऱ्या या बाईला ऐषारामात जगण्याची चटक लागली होती. तिची आई सोडून तिचा कोणावरही विश्वास नव्हता. आईबद्दल तिला नितांत आदर वाटत असे आणि तिची प्रत्येक आज्ञा पाळण्याची ती आटोकाट प्रयत्न करत असे. जेव्हा लुईने तिच्या अवास्तव मागण्या धुडकावल्या आणि प्रशासकीय गुपिते, योजना तिला सांगण्यास नकार दिला, तेव्हा मात्र तिने त्रागा करण्यास सुरुवात केली. जेव्हा लुईने मर्सीचे सगळे सल्ले धुडकावून लावले तेव्हा मात्र तिची खात्री झाली की तिचा नवरा एक तर मूर्ख असला पाहिजे किंवा तिच्या शत्रूंनी त्याचे कान भरले असले पाहिजेत.

जरी मारी ॲन्टोनेट राणी असली तरी राजदरबारी तिचे शत्रू तिचा सतत अपमान करत असत. शिवाय वृत्तपत्रे तिच्या विरुद्ध सतत चिथवणारे लेख आणि पत्रके छापत होती. जनता तिच्यावर नाखूश होती. तिचा नखरेलपणा, उच्छृंखल वागणे, तिचे नृत्याचे वेड, मुखवटे घालून होणारे नृत्याचे कार्यक्रम, नाटके, आणि रंगेल वागणे या सगळ्याने फ्रान्सच्या जनतेला धक्का बसला. जरी नागरिकांनी १८व्या शतकातील बुरसटलेल्या अमीर उमरावांवर कितीही टीका केली तरी या बाबतीत मात्र त्यांना राणीचे हे बेधुंद वागणे अजिबात पसंत नव्हते. फ्रान्स दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा असताना, तिची उधळपट्टी, जुगाराच्या टेबलावर पैसे उधळणे हे जनतेच्या डोळ्यावर आले नसते तरच नवल. आजवर फ्रान्समध्ये राजांच्या रखेल्या असे वागत असत. राणीकडून त्याच प्रकारचे बेताल वागणे जनतेने प्रथमच अनुभवले. असे वागून ती कर्जबाजारी झाली आणि वारंवार अडचणीत सापडली. मर्सीने तिचे हिशेब तपासल्यावर त्याच्या लक्षात आले की बाईसाहेबांनी जवळजवळ ५ लाख लिव्हाचे देणे करून ठेवले होते. आता ही असली बातमी राजदरबारी गुप्त राहू शकत नाही आणि तेथून बाहेर पसरण्यास कितीसा वेळा लागणार? जनता कुजबुजू लागली की राणीचे हे कर्ज नेकरने सरकारी खजिन्यातूनच भरले असणार! हे अर्थातच खोटे होते कारण लुईने स्वतःच्या खाजगीतून हे कर्ज फेडले होते, पण शेवटी अप्रत्यक्षपणे ते पैसे सरकारनेच भरले असे म्हणावे लागते. बरे एकदा नाही दोनदा हे कर्ज फेडण्यात आले. तिची काही अयोग्य व्यक्तिंशी चांगली घसट होती, उदा.. ड्युक द लोझां, एवढेच नाही तर फार्सन नावाचा एक स्विडीश कर्नल तिचा प्रियकरही होता. हा एक प्रकारचा व्याभिचारच होता पण तिच्या प्रियकराचे आणि तिचे प्रेम मरेपर्यंत टिकून होते हे विशेष.

ॲन्टोनेटने राजाच्या मंत्र्यांशी उभा दावा मांडला, तो स्वतःसाठी आणि स्वतःच्या फालतू भाटांसाठी. ती तिच्या परिचितांसाठी सढळ हाताने खर्च करत असे आणि त्यामुळे अनेक भानगडी उपस्थित झाल्या. मालजारबला द्याव्या लागलेल्या राजिनाम्यात तिचा हात होता, टुर्गो प्रामाणिकपणे त्याचे कर्तव्य पार पाडू लागल्यावर तिला त्याची अडचण होऊ लागली तेव्हा तिने त्याची रवानगी बस्टीलला करण्याचा हट्ट पार पाडला. ती निर्बुद्धपणे स्वतःलाच फसवत राहिली आणि तिच्या मूर्ख सल्लागारांनीही तिची सतत फसवणूक केली. अशा सल्लागारांवर विश्वास ठेवण्याची चुक तिला फार महाग पडणार होती. जर मारी ॲन्टोनेट सामान्य नागरिक असती तर ती एक उत्तम नटी झाली असती, पण ती उच्चपदावर होती आणि तिच्या कर्तव्यांकडे तिचे दुर्लक्ष होत होते. जनतेशी नाळ जुळण्यासाठी तिला फार काळ द्यावा लागला आणि दुर्दैवाने त्याला फार उशीर झाला. त्यातच हिऱ्याच्या हाराचे एक प्रकरण झाले त्याने तिची प्रतिमा अजूनच मलीन झाली. (हे प्रकरण तुम्हाला इंटरनेटवर सापडेल. – अफेअर ऑफ द डायमंड नेकलेस. या प्रकरणात तिच्यावर भ्रष्टाचाराचा खोटा आरोप झाला होता. दुसऱ्याच कोणीतरी तिच्या नावाने तो नेकलेस खरेदी केला होता.. अशी काहीतरी ती कहाणी आहे.) त्यात रोहान नावाचा एक कार्डिनलही सापडला, पण प्रकरण शेवटी राणीवर शेकले. इतके शेकले की काही काळ निदर्शनांच्या भितीने ॲन्टोनेटने पॅरिसच्या बाहेरच मुक्काम टाकला.

या घटना आणि काही अनेक अफवांनी, ती त्रस्त झाली. त्यातच ऑस्ट्रियाविरोधी गटाने पसरवलेल्या अश्लाघ्य अफवांनी (ती समलिंगी होती अशी अफवा पसरविण्यात आली होती) जनतेच्या मनात या दुर्दैवी स्त्रीबद्दल भयंकर गैरसमज पसरला. त्याच काळात राज्यक्रांतीने जोर पकडला होता आणि राजघराण्याविषयी जनमानसात भयंकर द्वेष पसरला होता. ॲन्टोनेट क्रांतीचा तिरस्कार करायची आणि तिला त्याची भीतीही वाटायची. तिला राज्यघटना, संविधान, लोकशाहीवादी या सगळ्या गोष्टींचा मनापासून तिटकारा होता. ती म्हणायची, ‘‘या अनागोंदी माजलेल्या देशात राहण्यापेक्षा मी कुठलेही धोके पत्करण्यास तयार आहे..’’ तिला जनतेचे मन कधीच समजले नाही, ना तिला सैन्याबद्दल काही ममत्व होते. तिला क्रांतीचे मूळतत्त्वच समजले नव्हते त्यामुळे त्यावर उपाययोजना करण्याचा प्रश्नच नव्हता. तिला असे वाटत होते, की जर ऑस्ट्रियाच्या सेना फ्रान्सम्ध्ये घुसल्या तर जनता आनंदाने त्या सेनेला शरण जाईल, या जनतेचा उर्मटपणा म्हणा किंवा शौर्य हे भीतीतून आले आहे अशी तिने स्वतःची भ्रामक समजूत करून घेतली होती. तिने स्वतःला, तिच्या नवऱ्याला अणि मुलाबाळांना वाचवण्यासाठी जे काही उद्योग केले त्याने जनतेचे तिच्याबद्दलचे मत अजूनच कलुषित झाले. सरकारच्या खजिन्यात सतत येत असलेल्या तुटीमुळे शेवटी लुईला ‘‘मि. डेफिसीट’’ असे नाव पडले आणि तिला ‘‘मादाम डेफिसीट’’. कारण या तुटीत तिच्या उधळ्या स्वभावाचाही सहभाग होताच. पुढे लुईने संसदेत जो नकाराधिकार वापरण्याचा सपाटा लावला, त्यामुळे त्याला लोक ‘‘मि. व्हेटो’’ असे म्हणू लागले आणि तिला ‘‘मादाम व्हेटो’’. जनसामान्यांनी ॲन्टोनेटला फ्रान्सची, समानतेची, स्वातंत्र्याची शत्रू म्हणून जाहीर करून टाकले.

ऑस्ट्रियाने आणि त्याच्या मित्रदेशांनी फ्रान्सवर आक्रमण करावे यासाठी चाललेल्या कारस्थानात ॲन्टोनेटचा सहभाग आहे अशी शंका व्यक्त होत होती, पण आता जनतेची याबाबतीत खात्रीच पटली. १० ऑगस्टनंतर, देशातून राज घराणे पळाले तरच प्राण वाचतील अशी परिस्थिती निर्माण झाली. तिचे राजकारणातील अज्ञान आणि कुठलीही स्पष्ट भूमिका न घेण्याने तिचे फार नुकसान झाले. तिला असे वाटत होते, की एमिग्रेस (फ्रान्समधून पलायन केलेले सरदार आणि इतर लोक. यात लुईचा सख्खा भाऊही होता.) मंडळींचे युरोपातील अस्तित्त्व मिटवले आणि त्यांच्या कटकारस्थानांचा एकदा बिमोड केला, की परदेशी ताकदींच्या हस्तक्षेपाने फ्रान्समधील यादवी टळू शकेल आणि जनमानस परत एकदा राजाच्या चरणी एकनिष्ठ होईल. तिला एमिग्रेस मंडळींचा आणि साँक्युलॉट वर्गाचा तेवढाच तिरस्कार होता, कारण हे वर्ग स्वतःच्या फायद्यासाठी आणि चालत आलेल्या सुखसोयींसाठी राजाचा बळी देण्यास निघाले होते. यातील विरोधाभास लक्षात घ्या. मारी ॲन्टोनेटला एमिग्रेसचा मनस्वी तिटकारा वाटत असे, तर जनता, राणी आणि लुई एमिग्रेसना आतून सामील असल्याचा आरोप करत होती. साँक्युलॉट राजाचा आणि राणीचा सतत अपमान करत असत आणि त्यांनी मित्र देशांना दुखावले होते, एवढेच नाही तर जे जे संविधानिक होते ते सगळे उध्वस्त करण्याचा त्यांनी चंग बांधला होता. त्यांच्या दडपणाखाली लुईला त्याच्या सुधारणांच्या योजना राबवणे अशक्य झाले. राज्यक्रांती झाली आणि ॲन्टोनेट धैर्याने त्याला सामोरी गेली. तिचे व्यक्तिमत्व आता जास्त परिपक्व झाले. त्या गोंधळाच्या काळात ती लुईपेक्षा जास्त कावेबाजपणे आणि चतुराईने वागली. त्याच काळात मिहाबू आणि बार्नेव्ह तिला मदत करण्यास तयार होते पण फाजील आत्मविश्वासाने तिने त्या दोघांनाही फसवले. तिने त्या काळात ज्या प्रकारे लुईची आणि तिच्या कुटुंबाची काळजी घेतली त्यासाठी तिचे कौतुक केल पाहिजे. त्यासाठी तिच्या काही गुन्ह्यांसाठी तिला क्षमा केली पाहिजे असे काही इतिहासकारांचे म्हणणे पडते.

मारी ॲन्टोनेट, लुई आणि त्याच्या कुटुंबास ‘‘टेम्पल’’च्या इमारतीत नजर कैदेत ठेवले गेले. ही इमारत पूर्वी लुईच्या भावाची म्हणजे काऊंट दक्ट्वाची मालमत्ता होती. ॲन्टोनेट, दुफां आणि त्यांच्या मुलीला दुसऱ्या मजल्यावर दोन प्रशस्त खोल्या देण्यात आल्या. लुईला वरचा मजला देण्यात आला तर खालच्या मजल्यावर मादाम एलिझाबेथची सोय करण्यात आली. (लुईची बहीण) ही राजघराण्यातील मंडळी नजरकैदेत जरी असली तरी त्यांच्या सेवेस बाराच्या आसपास नोकर देण्यात आले, पण काहीच दिवसात कम्युनच्या वकिलाने या ऐषारामी सोयींना हरकत घेतली. तो म्हणाला, ‘‘ज्यांना शिक्षा व्हायला पाहिजे त्यांना अशा सुखसोयी पुरवणे अडचणीचे ठरेल.’’ नंतर त्याने ॲन्टोनेटला काही दासी पाहिजेत का? असे विचारले, पण त्या प्रश्नावर तिने फणकाऱ्याने उत्तर दिले, की तिला सोबतीला फक्त राजाची बहीण पुरेशी आहे. सहा दिवासांनंतर नोकर चाकरांना सुट्टी देण्यात आली आणि राजकन्या आणि डचेसची रवानगी तुरुंगात करण्यात आली. सुरुवातीला लुई आणि त्याच्या मुलाबाळांना राजघराण्यातील व्यक्तींना मिळते तशीच वागणूक मिळत होती. उदा.त्यांना वीस प्रकारचे पदार्थ जेवणात मिळत होते, लुईला मद्य मिळत होते, खोलीमध्ये चांगले फर्निचर ठेवण्यात आल होतेे, पुस्तके ठेवण्यात आली होती. आता त्यांचे हे विशेषाधिकार कमी करण्यात आले. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात आली. लुईला एक नोकर देण्यात आला जो त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हेरही होता. कैद्यांना बागेत एकत्र फिरण्याची परवानगी होती जेथे त्यांना पहारेकऱ्यांकडून बाहेरच्या बातम्या मिळू शकत होत्या.

लुईची रवानगी गिलोटीनच्या वधस्थळावर झाली आणि मारी ॲन्टोनेट घाबरली, पण तिला अजूनही आशा वाटत होती, की तिला फार तर देशाबाहेर हाकलतील, तिचा शिरच्छेद करणार नाहीत….

क्रमशः

– जयंत कुलकर्णी

May be an image of 2 people

All reactions:

76Asha Subhedar, Mandar Dharmadhikari and 74 others

Posted in इतिहास, कथा | Leave a comment

पानगळ !

नमस्कार!

मध्ये मी माझ्या तीन कथासंग्रहाबद्दल लिहिले होते. त्यातील बहुतेक कथा अनुवादित किंवा काही परकीय लेखकांच्या कथांवर आधारित आहेत. काही कथांची पार्श्र्वभूमी मी भारतीय करण्याचा प्रयत्नही केला आहे. त्यातील ही एक कथा.. याचा मूळ लेखक बहुधा ओ’हेन्री असावा… त्याच्या कथेचे नाव आठवत नाही द लिफ असे काहीतरी आहे – कथा ठीक आहे ..पण नंतर मला स्वतःलाच एवढी आवडली नाही .. लिहून बरीच वर्षे झाली…

पानगळ !

पाँडिचेरीची आपली एक स्वत:ची वेगळीच संस्कृती आहे. फ्रेंचांची वसाहत असल्यामुळे या भागात फ्रेंच आणि तामीळ संस्कृतीचे एक सुरेख मिश्रण आपल्याला आढळते. अजूनही बरीच फ्रेंच कुटूंबे येथे तग धरून आहेत. काही तरूणांनी येथील स्थानिक घरांशी घरोबा केल्यामुळे अजून एक मिश्र संस्कृती जन्माला आली आणि त्यात तामिळ सुसंस्कृतपणा आणि फ्रेंचांचा धाडसीपणा या गुणांचा एक सुरेख संगम आपल्याला यांच्या पुढच्या पिढ्यांमधे आढळेल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे फ्रेंच लोकांची कलासक्तीही या पिढ्यांमधे पुरेपूर उतरली आहे. मी जे सांगतोय ती परिस्थिती साधारणत: १९४२-४३ सालातली. आता सगळी फ्रेंच कुटुंबे फ्रान्सला परतली आहेत, अर्थात एखादे कुटूंब हट्टाने येथे तग धरून राहिले असेल, नाही असे नाही पण जी काही कुटूंबे येथे राहीली आहेत त्याचे मुख्य कारण आहे येथील स्वस्ताई. आपण जर पाँडिचेरीला गेलात तर आपल्याला फ्रेंच आणि भारतीय संस्कृतीचा मिलाप असलेल्या अनेक इमारती अजूनही दिसतील. मला तर वाटते या दोन संस्कृतीच्या मिलापामुळे जी नवीन पिढी तयार झाली त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमधेही बराच बदल झालेला असणार. शेवटी दोन्ही जिन्सचे गूण नवीन पिढीत उतरत असणारच ना !

पाँडिचेरीचे पुड्डूचेरी झाले तरीही या आगळ्या वेगळ्या संस्कृतीच्या या खुणा या शहराने अजूनही जपून ठेवल्या आहेत. त्यात ना कोणाचा धर्म आड आला ना विचार. पाँडिचेरीत, आपण जर इस्ट कोस्ट रोड पकडलात तर आपण एका छोट्याशा पण सुंदर ऐय्यननरप्पन देवळापाशी पोहोचाल त्याच्या शेजारी फार पूर्वी मोकळे मैदान आणि घनदाट झाडी होती. त्या नयनरम्य जागेत एक छोटीशी वस्ती वसलेली होती. १०/१५ वर्षापूर्वी एक फ्रेंच कलाकार फ्रान्स आणि पाँडिचेरीतील महागाईला कंटाळून या शांत वातावरणात वस्तीला आला आणि तेथेच राहिला. त्याने जी चित्रे तेथे जन्माला घातली त्यामुळे त्या गावाचे नाव जगप्रसिद्ध झाले आणि चित्रे विकत घेणार्‍यांचा राबता तेथे वाढला. त्यामुळे दोन गोष्टी झाल्या. एक तर त्या गिर्‍हाईकांसाठी रहाण्याच्या सोयी तयार झाल्या आणि इतर कलाकारांची पावले त्या गावाच्या दिशेला वळाली. कलाकारांसाठी तर हा स्वर्गच होता. इतर कलाकारांची गाठ पडायची, चर्चा झडायच्या तेथे सुरू झालेल्या हॉटेलचे नावही बघा – व्हिंचीज ग्रास आणि एका टपरीचे नाव ही फारच कलात्मक – “कट इअर”. हळू हळू या गावात कलाकारांचे बंगले, कलाकारांचे स्टुडिओ, तीन मजली अपार्टमेंटस्‍ अशा सोयी तयार झाल्या आणि या गावाचे नाव झाले “रेनेसांस” त्याचे झाले रेनेसांपूरम. रेनेसांपूरममधे आपण ज्या संस्कृतीचा वरती उहापोह केला आहे त्याचा प्रचंड प्रभाव पडला आहे हे आपण तेथे गेल्यावर आपल्याला जाणवेलच. सुंदर फ्रेंच स्थापत्यशास्त्राचे नमूने आपल्याला येथे ठायी ठायी दिसतील. इमारतींच्या गुळगुळीत भिंती, मोठ्या खिडक्या, त्याला असणार्‍या विशिष्ठ महिरपी..एखाद्या फ्रेंच खेडेगावात असल्याचा भास झाला नाही तरच नवल……

अशाच एका स्टुडिओ अपार्टमेंट्च्या इमारतीमधे दुसर्‍या मजल्यावर दोन मैत्रिणींचा स्टुडिओ अपार्टमेंट होता. त्यांची नावे त्या दरवाजावर होती “ कोंकणा बॅनर्जी आणि अमेलिया. कोंकणा होती बंगालची आणि तेथे गुरूकूलमधून आली होती तर अमेलियाचा आजोबा पाँडिचेरीचा होता. अमेलिया लहानपणीच पॅरीसला गेली होती आणि आता परत पाँडिचेरीला परतली होती. त्यांची गाठ मागच्याच वर्षी “कट ईअर”मधे पडली होती आणि कला, सॅलाड, कॉफी पासून ते वाईनपर्यंत त्यांच्या आवडीनिवडी जुळल्यामुळे त्या आता चांगल्या घट्ट मैत्रिणी झाल्या होत्या आणि दोघींनी मिळून एकच स्टुडिओ काढला होता.

त्या नोव्हेंबरमधे या शांत आणि कलासक्त गावाला एका अनाहूत पाहुण्याने भेट दिली – “ स्वाईन फ्लू” अर्थात त्यावेळी या पाहुण्याचे नावही माहीत नव्हते. माहीत होते ते फक्त त्याचे पराक्रम. सर्दी, पडसे, घसा दुखणे, ताप, जास्त ताप, तिसरा दिवस आणि खेळ खलास. थोड्याच दिवसात रेनेसांपुरममधे या पाहुण्याची दशहत पसरली. नाजूक अमेलिया आणि या पाहुण्याची कोठे तुलना होणार ? दोघांची भेट झाली आणि अमेलिया अंथरुणाला खिळली. त्या संध्याकाळी ती तिच्या अंथरूणावर मलूल होऊन, गळ्यापर्यंत पांघरूण ओढून खोलीच्या त्या फ्रेंच खिडकीबाहेर शुन्यात नजर लावून पडली होती.

दुसर्‍याच दिवशी कोंकणाला जिन्यात अमेलियाला तपासायला येणारे डॉक्टर भेटले. अमेलियाला तपासत असताना त्यांनी कोकणाला हाक मारली…जरा बाहेरच्या खोलीत ये….

“मला वाटते तिची बरं व्हायची शक्यता…………. दहात…..एक आहे. डॉ. थर्मामिटर झाडत म्हणाले. या डॉक्टरांना थर्मामिटर झाडताना बोलायची सवय का असते कोण जाणे. झटकत बोलताना ते फार तुच्छतापूर्वक बोलतात असे समोरच्याला उगीचच वाटते.

“ या निराशावादी रुग्णांनी आमच्या शास्त्र खोटे ठरवण्याचे ठरवलेले दिसते आहे.” ते हसून म्हणाले.

“तुझ्या या मैत्रिणीने तर मरायचेच ठरवले आहे. तिच्या मनाविरूद्ध काही भयंकर झाले आहे का ? काय आहे तिच्या मनात ?”

“हंऽऽऽऽऽ तिला एकदा हिमालय रंगवायचा आहे…..”

“ते एवढे महत्वाचे नाही. मी त्याबद्दल नाही बोलत. काही प्रेमभंग वगैरे……”

“प्रेम त्या इच्छेएवढे महत्वाचे………….. जाउदेत पण तसे काहीच नाही” कोंकणा.

“मग मला वाटते तिला भयंकर अशक्तपणा आलाय त्याचा परिणाम असावा हा. हे बघ मी माझ्यापरीने आमच्या शास्त्रात जे काही सांगितले आहे त्यानुसार प्रयत्न करतोय पण हिने आता चितेतील गोवर्‍याच मोजायच्या ठरवल्या असतील तर मी आणि वैद्यकीय शास्त्र तरी काय करणार ? औषधांचा बरे होण्यात फक्त पन्नास टक्केच सहभाग असतो.. तिने जर सावरून नवीन लागलेल्या सिनेमाची चौकशी केली तर मी म्हणेन तिची बरी व्हायची शक्यता १० त ………….५ होईल.”

कोंकणाला हसू आले. ’हा डॉक्टर काय प्रॉबेबलिटीने उपचार करतो की काय ”

डॉक्टर गेल्यावर मात्र भलतेसलते विचार मनात येऊन तिला रडूच कोसळले. रुमाल भिजल्यावर तिने तो धुण्याच्या कपड्यात फेकला आणि डोळे पुसत ती आपला इझेल घेऊन अमेलियाच्या खोलीत आली. वातावरण हलके करण्यासाठी तिने जुन्या हिंदी सिनेमातील एक छान तान घेतली आणि अमेलियाकडे नजर टाकली व दुसर्‍या टोकाला आपले काम चालू केले. ती एका जहिरात कंपनीसाठी एका तगड्या, रांगड्या शेतकर्‍याचे चित्र रंगवत होती. तिच्यासारख्या नवीन कलाकारांना अंगावर पडेल ती कामे करावीच लागतात. प्रसंगी आपली आवड बाजूला ठेवूनही. त्या समोरच्या कॅनव्हासवर पूर्ण ताकदीने पेन्सिलीच्या हळुवार रेषा उमटवत असताना तिला अस्पष्ट असा कण्हण्याचा आवाज आला. हातातील पेन्सील बाजूला ठेवून तिने पटकन पलंगाकडे धाव घेतली. अमेलियाचे डोळे सताड उघडे होते. तिच्या ह्रदयाचा ठोका चुकला. पण तिने खिडकीबाहेर नजर लावली होती आणि ती पुटपुटत उलट्या क्रमाने आकडे मोजत होती.

“बारा… अकरा……. दहा..नऊआठ…….सात………………….सहा…..”

कोंकणाने खिडकीबाहेर तिने जेथे नजर लावली होती तेथे बघितले. काय होते तेथे मोजण्यासारखे ? शेजारच्या इमारतीची एक भिंत आणि त्यावर एक सुकलेला कसलातरी कसाबसा चढलेला वेल. पानगळीत त्या वेलाची बहुतेक पाने गळून गेली होती. काही टोकाला होती तीही गळण्याच्या अवस्थेत होती.

“अमेलिया, काय मोजती आहेस तू ?”

“सात ! ती आता पटापट पडताएत. परवा जवळ जवळ शंभर होती. मोजतानाच माझी दमछाक झाली. ते बघ अजून एक पडले. आता फक्त सहाच राहिली.

“ काय सहा, काय पाच ? अमेलिया, जागी हो !”

मोठ्या कष्टाने अमेलिया म्हणाली

“ ती पाने ग ! त्या वेलीवरची पाने मोजतीए मी. शेवटच्या पानाबरोबर मी जाणार. हे मला परवाच कळले आहे. डॉक्टरांनी सांगितले नाही का तुला ?”

“काय वेडेपणा आहे हा ! त्या पानाचा आणि तुझा काय संबंध आहे का ? हा वेल तर तुला आवडत होता ना ? डॉक्टरांनी तर मला सकाळी सांगितले की तू आता बरी व्हायच्या मार्गावर आहेस. चल हा वेडेपणा आता बंद कर आणि मला माझे काम करूदे ! मी सूप करते ते पी गरम गरम. बरे वाटेल तुला. माझे हे काम झाले की त्या पैशात आपण तुला एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवू आणि तुझी आवडणारी वाईनही आणू !” कोंकणाने हसून सांगितले.

“वाईनची गरज भासेल असे वाटत नाही. नको त्यात पैसे खर्च करूस” अमेलिया खालच्या भकास स्वरात म्हणाली.

“मी ही खिडकी बंद करू का ? मला या उजेडाचा त्रास होतोय !”

“तू दुसर्‍या खोलीत नाही का करू शकत तुझे काम ? मला या पानांवर लक्ष ठेवायचे आहे”

“म्हणूनच मी ती बंद करणार आहे !”

“तुझे काम झाले की सांग मला. मी वाट पहाते आहे त्या शेवटच्या पानगळीची. कंटाळा आलाय मला आता या वाट पहाण्याचा”

“आता जरा डोळे मिटून गप्प पडशील तर बरं होईल” कोंकणा रागावून म्हणाली.

“मी खालच्या बेहरामजीला घेऊन येते. त्याचेही एक स्केच करायचे आहे याच कामासाठी. आलेच मी” असे म्हणून कोंकणा बाहेर पडली.

म्हातारा बेहरामजीसुद्धा एक कलाकार होता. त्याच्या कलेचा दर्जा काय ? हा एक संशोधनाचा विषय. त्या संशोधनाअंती तो त्या गावात एक चेष्टेचा विषय झाला होता हे मात्र खरे. आयुष्यातील साठ वर्षं ओलांडल्यावर त्याला आपण एक कलाकार आहोत याचा साक्षात्कार झाला होता आणि त्याने ते सिद्ध करण्यासाठी मायकेल एन्जेलोसारखी दाढीही ठेवली होती. बेहरामजी एक अप्रसिद्ध, हारलेला, अतिसामान्य कलाकार होऊन गेला असेही पुढे कोणी लिहिण्याचे धाडस करणार नाही एवढा तो सामान्य होता. अर्थात या सगळ्या मतांचा/चेष्टेचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नव्हता आणि पुढे होईल असे वाटतही नव्हते. बेहरामजीचा स्वत:वर प्रचंड विश्वास होता आणि त्यामुळे आपल्या हातून एक दिवस भव्य दिव्य कलाकृती जन्म घेईल याची त्याला खात्री होती. अर्थात ती तयार करायला त्याने अजून सुरवात केली नव्हती ही गोष्ट अलाहीदा. त्याचा चरितार्थ चालवायला तो मॉडेल म्हणून काम करत असे आणि त्याच्या स्वभावामुळे तो सर्व कलाकारांना प्रियही होता. जरा जास्तच झाल्यावर तो त्याच्या भव्यदिव्य कलाकृतीबद्दल बडबडायचा पण त्याच्या खोलीत एझेलवर लावलेल्या कॅनव्हासवर त्याने रंगाचा एक साधा ओरखाडाही उठवला नव्हता. त्याच्या रांगड्या व्यक्तिमत्वामुळे मृदू स्वभावाच्या माणसांवर त्याची करडी छाप पडायची हीच काय ती जमेची बाजू.

कोंकणा बेहरामजीच्या खोलीत पोहोचली तेव्हा तो त्या अंधार्‍या खोलीत त्याच्या कॅनव्हास समोर उभा होता. तोच कॅनव्हास जो गेले कित्येक वर्षात तसाच कोरा होता आणि वाट बघत होता. कोंकणाने अमेलिया कशाची वाट बघते आहे ते सांगितल्यावर बेहरामजीने हात झाडले आणि तो त्याच्या मजेशीर पारशी वळणाच्या बोलीत म्हणाला “ काय बोलते तुम्ही ? साला जगामंधी असे काय असते काय. अरे माणूस पान पडल्यावर मेला तर काय होनार ? साला मी तर असले कायबी एकले नाय. तिच्यासाठी साला कामच करायचा दिल करत नाय आता. काय वेडा हाय काय ती ? पण चांगला हाय हां ती डिकरी….”

“बेहरामजी ती आजारी आहे. तुला यायचे नसेल तर येऊ नकोस पण असे बोलू नकोस बाबा. मी तसेच काळजीत आहे.” कोंकणाने नाराजी दर्शविली.

“अरे तू रागवू नको बाबा. मीबी तेच म्हनतो ना. साला ही जागाच खराब हाय. माझा हे चित्र झाला ना की ते विकून आपण हे गाव सोडून एका चांगला गावात जाऊ. काय ! चल आता जाउ तुझ्या घरामंदी.”

ते दोघे कोंकणाच्या स्टुडिओत आले तेव्हा अमेलिया गाढ झोपली होती. खिडकीचे पडदे ओढून तिने बेहरामजीला पायाचा आवाज न करण्याची खुण करुन तिच्या मागे यायला सांगितले. त्या खोलीतून त्या दोघांनी एकामेकांकडे बघितले आणि कोंकणाने शांतपणे खिडकी उघडली. दोघेही स्तब्धपणे त्या वेलाकडे बघत राहिले. मनातील खळबळ कोणीच बोलेना. कदाचित त्या वेलाकडे बघत ते अमेलियाच्या आयुष्याचा विचार करत असावेत किंवा त्यांच्याही मनावर त्या पानांची गुढ गडद छाया पडली असेल. शांतता होती हे खरे. बेहरामजीने न बोलता (हे कधी होत नाही) आपली जागा घेतली आणि कोंकणाने आपले काम सुरू केले. रात्रभर वारा भणाणत वहात होता आणि दुरवर कुत्र्यांचे रडणे ऐकू येत होते. मनावर दडपण आणणारे वातावरण !

सकाळी कोंकणा उठली तेव्हा तिला अमेलिया डोळे सताड उघडे ठेवून पडद्याकडे भकास नजरेने पहात होती.

“उघड ती खिडकी, बघू दे मला” अमेलिया किंचाळली.

हताश होत कोंकणाने खिडकी उघडली.

काल सुटलेल्या वादळी पावसातही त्या वेलावर एक पान तग धरून होते. एकच शेवटचे पान. पिवळसर हिरवे आणि सुकलेले.

“हे शेवटचे पान. काल रात्री वार्‍यात ते पडले नाही हे नवलच आहे. पण आज ते पडेल आणि मी या जगात नसेन.” अमेलिया रडक्या पण ठाम स्वरात म्हणाली.

“अग तुला असे बोलताना काहीच कसे वाटत नाही ? माझातरी विचार कर थोडा ! कोंकणालाही रडू कोसळले.

पण अमेलियाने उत्तर दिले नाही. माणसाला या लांबच्या गुढ प्रवासाला निघताना फार एकटे वाटत असावे. आणि येथे तर अमेलियाने एका वाळक्या पानाशी आपले आयुष्य जोडले होते. हे नाते इतर नात्यांपेक्षा तिला आता फारच घट्ट वाटत होते.

दिवस असाच उदासवाणा पार पाडला. संधिप्रकाशातही ते पान त्यांना दिसत होते. रात्र होताच वारे सुटले आणि कोंकणाने खिडक्या बंद केल्या. उजाडल्यावर अमेलियाने परत चिडचिड करत ती खिडकी उघडण्याची आज्ञा केली.

ते पान अजून तसेच तेथेच होते.

अमेलियाने एक दिर्घ श्वास घेतला आणि त्या पानाला प्रेमाने नजरेने कुरवाळले. मग तिने कोंकणाला हाक मारली.

“ कोंकी, मी खरच फार दुष्ट आहे ! माझा दुष्टपणा उघडकीस यावा म्हणूनच ते पान तेथे अजून तग धरून आहे. फारच वाईट वागले मी तुझ्याशी. मला थोडीशी कॉफी देतेस का ? आणि एक आरसाही दे. जरा मला हात दे, आणि बसते कर मला. मला तुझ्याकडे जरा डोळे भरून बघू देत. तुझी माफी मागायची म्हणजे गुन्हाच ठरेल.”

थोड्याच वेळात अमेलियाच्या ओठातून तिची इच्छा बाहेर पडली

“ एखाद्या दिवशी मी हिमालय रंगवणार हे निश्चित”.

दुपारी डॉक्टर आले आणि कोंकणाची अमेलियाच्या बडबडीपासून सुटका झाली. डॉक्टरांना सोडायला ती जिन्यापर्यंत गेली. डॉ. म्हणाले “ मला वाटते तिला आता कसला धोका उरला नाही. थोडी काळजी घेतलीत तर ठणठणीत होईल ती.”

त्या दुपारी कोंकणा अमेलियाच्या पलंगापाशी आली आणि तिने तिला परत बसते केले.

“अमेलिया मला तुला काहितरी सांगायचे आहे.

“कालच बेहरामजी गेला. तो म्हणे गेले दोन दिवस त्या विचित्र तापाने आजारी होता. सफाईवाल्याला तो त्याच्या खोलीत जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्याचे कपडे वाळूने माखले होते आणि तो थंडगार पडला होता. कुठे गेला होता तो रात्री कोणास ठावूक. त्यांना एक शिडी आणि हिरव्या पिवळ्या रंगाने माखलेले पॅलेटही सापडले. तुला आश्चर्य वाटत होते ना की ते पान का पडले नाही? ऐक,

त्या रात्री ते पान पडल्यावर तो त्या भिंतीवर ते पान रंगवत होता.”

– जयंत कुलकर्णी.

Posted in प्रवर्ग नसलेले | 1 Comment

फ्रेंच राज्यक्रांती

नमस्कार!

सध्या फ्रेंच राज्यक्रांतीवर पुस्तक लिहितोय. जगात घडून गेलेल्या अत्यंत महत्त्वाच्या या घटनेने आपण अचंबित होतो. त्या काळातील माणसे, त्यांचे राजकारण, त्यांची त्यांच्या तत्त्वांवरील निष्ठा हे वाचल्यास सध्याच्या राजकारण्यांशी त्यांची तुलना होणे अपरिहार्य आहे. असो ती तुलना मी मनातल्या मनात रोज करतोच. पण त्या क्रांतीतील तीन चार व्यक्‍तिरेखा मला अत्यंत आवडतात कारण जेव्हा ती क्रांती रक्‍तरंजित झाली तेव्हा ते मोठ्या धैर्याने त्या दहशतीच्याविरुद्ध उभे राहिले. त्यांनी, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचे प्राणही गमावले… तो इतिहास खरोखरच विस्मयकारक आहे… त्यातील एक क्रांतीकारक डिमुलां कॅमिली (Desmoulins camillie) हा माझ्या आवडत्या व्यक्तिरेखांपैकी एक. दुसरा आहे डॅन्टॉन. हे पुस्तक केव्हा पूर्ण होईल ते मला सांगता येणार नाही, परंतु ते पूर्ण होईपर्यंत तुम्हाला त्यातील कथा ऐकाव्या लागणार… 🙂 पुस्तक ७० % पूर्ण झाले आहे…पण अजून बरेच राहिले आहे..

कॅमिली डिमुलाने त्याच्या पत्नीस, तुरुंगातून लिहिलेले शेवटचे निरोपाचे पत्र. दोन तीन दिवसांनी गिलोटीनखाली त्याचे शीर धडावेगळे होणार होते हे लक्षात घ्या. हे पत्र माझ्या पुस्तकातून घेतले आहे.

१ एप्रिल सकाळी ८ वाजता.

निद्रेचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. एकदा माणूस झोपला की तो सगळ्या काळज्यातून मुक्त होतो. आपण बंधनाता आहोत हे तो विसरतो. ही माझ्यावर परमेश्वराने दयाच केली म्हणायची. काही क्षणापूर्वीच मी तुला स्वप्नात पाहिले. मी स्वप्नातच सगळ्यांना अलिंगन दिले. तुला, होरेसला आणि तुझ्या आईला. तुम्ही सगळे घरातच होता, पण आपल्या लहानग्याला त्या स्वप्नात जंतुंसंसर्गाने दृष्टी गमवावी लागली आणि झालेल्या अतीव दुःखाने मला जाग आली.

मी परत माझ्या कोठडीत आलो तेव्हा पहाट उगवली होती आणि फटफटले होते. तू दिसली नाहीस आणि तुझे बोलणेही मला ऐकू न आल्यामुळे मी उठलो. म्हटले तुझ्याशी जरा बोलावे आणि नाही जमले, तर निदान काही लिहावे तरी., पण मी जेव्हा खिडकी उघडली तेव्हा मला सत्य परिस्थितीची जाणीव झाला आणि मी हताश झालो. या भिंती, दरवाजे आणि कड्याकुलपांनी आपल्यात कित्येक योजने अंतर निर्माण केलंय याची तुला कल्पना नाही. माझ्या मनाला आणि विचारांना प्रचंड निराशेने घेरले. मी माझ्या अश्रूत विरघळून गेलो. मी जिवंतपणी या माझ्या थडग्यात ओक्साबोक्षी रडलो. ल्युसिला! ल्युसिला! कुठे आहेस तू? काय करू मी?

काल संध्याकाळी मी जेव्हा तुझ्या आईला उद्यानात पाहिले तेव्हाही मला असेच उचंबळून आले आणि माझ्या डोळ्यात पाणी आले. मी जमिनीवर कोसळलो. मी हात जोडले. जणुकाही मी तिच्याकडे क्षमेची भीक मागतोय. तिने तुला ही हकिकत संगितली असणार. माझ्याकडे पाहताना तिला रडू फुटले, पण मला तिचे अश्रू दिसू नयेत म्हणून तिने आपला चेहरा रुमालाने झाकून घेतला. जेव्हा तू परत येशील तेव्हा तिला तुझ्या जवळ बसायला सांग म्हणजे मला तू पटकन दिसशील. त्यात काही धोका आहे असं मला वाटत नाही.

माझा चष्मा काही ठीक नाही. मला वाटते तू माझ्यासाठी मी सहा महिन्यापूर्वी आणला होता तसा नवीन चष्मा आणावास हे बरं. चांदीचा नको. स्टीलचाच आण कारण तो नाकावर नीट बसतो. १५ नंबरचा चष्मा माग. त्या दुकानदाराला ते बरोबर समजेल. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, लोला, मी तुझ्याकडे तुझ्या निरंतर प्रेमाची मागणी करतोय. तुझे एक चित्र मला पाठव. ज्या माणसाला त्याच्या देशबांधवांच्या प्रती एवढी सहानुभूती वाटायची त्या माणसाबद्दल तुझ्या चित्रकाराला निश्चितच सहानुभूती वाटेल व तो तुला दिवसातून दोनदा चित्र रंगवण्यासाठी बोलावेल आणि ते चित्र पूर्ण करेल. या भयंकर जागेत ज्या दिवशी मला तुझे चित्र मला मिळेल तो दिवस माझ्यासाठी सगळ्यात मोठा सण असेल. आनंदाचा आणि आनंदात धुंद होण्याचा दिवस. ते चित्र मिळेपर्यंत मला तुझ्या केसांची एक बट पाठव जी मी माझ्या हृदयाशी जपून ठेवीन.

माझ्या प्रिय ल्युसिला! आपल्या प्रेमाच्या सुरुवातीच्या दिवसांची मला आठवण येतेय!. मला आठवतंय जेव्हा एखादा माणू केवळ तुझ्याकडून आलाय यासाठी मला फार महत्त्वाचा वाटे. कालच ज्या माणसाने माझे पत्र तुला पोहोचते केले तो परत आल्यावर मी त्याला विचारले, ‘‘तू तिला पाहिलेस का?’’ त्याने होकारार्थी उत्तर दिल्यावर क्षणभर मला तू तेथेच उभी आहेस असा भास झाला. तो बिचारा सरळ साधा माणूस आहे, कारण तो माझी पत्रे तपासत नाही. माझ्या कानावर आलंय की हा माणूस मला दिवसातून दोनदा भेटणार आहे. एकदा सकाळी आणि एकदा संध्याकाळी. आपल्या प्रेमाच्या दिवसात आपले निरोप पोहोचते करणारे जेवढे मला प्रिय होते तेवढाच हा माणूसही मला प्रिय आहे, कारण तो आपल्या अडचणींच्या काळात आपले निरोप पोहोचते करतोय.

आज मला खोलीच्या एका भिंतीत एक भेग पडलेली आढळली. मी त्याला कान लावल्यावर कोणाचातरी विव्हळण्याचा आवाज मला ऐकू आला. मी त्याला बोलते केले. त्याने माझे नाव विचारल्यावर मी त्याला माझे नाव सांगितले. ते ऐकल्यावर तो किंचाळलाच, ‘‘अरे देवा’’ एवढे बोलून त्याने पलंगावर अंग टाकल्याचा आवाज मला आला. त्याच क्षणी मी त्याचा आवाज ओळखला. तो फॅब्रे द इग्लाटिना होता.

‘‘हो मी फॅब्रे द इग्लाटिनाच आहे.’’ तो मला म्हणाला.

‘‘पण तू? आणि इथे? कसं शक्य आहे? म्हणजे प्रतिक्रांती झाली की काय?

पण भीतीमुळे आम्ही पुढे जास्त काही बोललो नाही. जर आम्ही पकडलो गेलो असतो तर आम्हाला दुसऱ्या खोल्यात हलवून त्यांनी आमची ही छोटीशी चैनही आमच्यापासून हिसकावून घेतली असती आणि आम्हाला अजून छोट्या कोठड्यातून ठेवण्यात आले असते. ते अर्थातच आम्हाला परवडणारे नाही कारण त्याच्या कोठडीला ती उबदार ठेवण्याची सोय आहे आणि माझी खोली तशी आरमदायी आहे. तुला सांगतो प्रिये, एकांतवासाची कोठडी म्हणजे काय असते याची तुला कल्पना येणार नाही. तुम्हाला का पकडण्यात आले आहे याचे कारण माहीत नसते, तुमची चौकशी होत नाही. तुम्हाला रहस्यमयरित्या नुसते पकडून कुठेतरी कोठडीत डांबले जाते. भयंकर! तुम्हाला वाचण्यास एक पानही मिळत नाही. ही कोठडी म्हणजे जिवंतपणीचे मरण! तुम्ही एक शवपेटीत बंद आहात हे समजण्यासाठीच जणु तुम्ही जिवंत असता.

ते म्हणतात तुम्ही जर निष्पाप असाल तर तुम्ही शांत आणि धीराचे असता. पण प्रिये, माझ्या प्राणप्रिये, माझा निष्पापपणा बहुतेक वेळा मला दुर्बळ बनवतो कारण मी एक पिता आहे, एक नवरा आहे, एक मुलगा आहे. जर माझा विश्वासघात पिट किंवा कोबूने केला असता तर एकवेळ मी समजू शकलो असतो, पण रॉबेस्पिएअरने माझ्या अटकेच्या आदेशावर सही केली, ज्या प्रजासत्ताकासाठी मी माझे आयुष्य पणाला लावले त्याने माझा विश्वासघात करावा ! माझ्या प्रामाणिकपणाचे हेच का बक्षीस?

मी जेव्हा येथे आलो तेव्हा मला हेरॉल्ट द शेशल्स, सायमन,फेरॉक्स इ. मंडळी दिसली, पण त्यांना एकांतवासाची कोठडी नसल्यामुळे ते एवढे काही दुःखी दिसत नव्हते. मी या रिपब्लिकसाठी जेवढ्या शिव्याशाप सहन केले तेवढ्या शिव्या कोणीही खाल्या नसतील. मी जनतेसाठी अनेकांशी वैर पत्करले, क्रांतीच्या काळात गरीबी पत्करली. मला तू सोडून जगात कोणाचीही क्षमा मागण्याची गरज नाही. माझी लायकी नसतानाही तू मला क्षमा केली आहेस कारण तू मला माझ्या गुणदोषांसहीत पत्करले आहेस. जे माझे मित्र म्हणवतात, त्याच रिपब्लिकन्स मंडळींनी मला तुरुंगात डांबले आहे. मला एकांतवासाची कोठडी दिली आहे जणु काही मी एक कारस्थानी गुन्हेगार आहे. सॉक्रेटिसने विषाचा प्याला पिला, पण तुरुंगात त्याला त्याचे मित्र आणि पत्नी भेटत तरी होते. तुला सोडून राहणे किती अवघड आहे याची तुला कल्पना नाही. एखादा अट्टल गुन्हेगाराला जर जबरी शिक्षा द्यायची असेल तर त्याला त्याच्या ल्युसिलापासून तोडावे. त्यापेक्षा मृत्यू परवडला असे तो निश्‍चित म्हणेल. मला खात्री आहे ल्युसिला, एखाद्या गुन्हेगाराला तू कधीच आपला पती म्हणून स्विकारणार नाहीस आणि मी फ्रान्सच्या प्रजेच्या सुखासाठी धडपडतो म्हणूनच तुझे माझ्यावर प्रेम आहे याचीही मला जाणीव आहे. मी फ्रान्सच्या जनतेसाठीच जगतोय म्हणून मी तुझ्या प्रेमाला पात्र आहे.

ते मला हाका मारत आहेत. या क्षणी क्रांतीच्या न्यायालयाचे आधिकारी माझी चौकशी करण्यासाठी येणार आहेत. ते मला फक्त एकच प्रश्न विचारतील. काळजी करू नकोस. ते विचारतील, ‘‘तू प्रजासत्ताकाच्या विरुद्ध कट कारस्थाने केलीस का?’’ असे विचारून ते प्रजासत्ताकाचा अपमान करत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही, कारण मी स्वतःच प्रजासत्ताचे शुद्ध रूप आहे ! माझ्या पुढे काय वाढून ठेवले आहे याची मला जाणीव आहे. माझ्या ल्युसिलाचा, लोला आता मला निरोप दे! लाडके, माझ्या वडिलानाही मी त्यांची आठवण काढली आहे हे सांग. हा समाज कृतघ्न आहे, रानटी आहे. माणसाच्या कृतघ्नतेचे आणि रानटीपणाचे एवढे उत्तम उदाहरण तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. माझ्या आयुष्याचे अंतीम क्षण तुझा अपमान करणार नाहीत. माझी भीती साधार खरी ठरली आहे आणि माझे भाकीतही खरे ठरले म्हणायचे! मी एका स्वर्गिय गुण आणि सौंदर्य लाभलेल्या स्त्रीशी लग्न केलंय. मी आजवर एक चांगला पती, एक चांगला मुलगा होतो आणि मी एक चांगला बापही झालो असतो. ज्यांना स्वातंत्र्याची चाड आहे अशा सर्व प्रामाणिक रिपब्लिकन माणसांना आज माझ्याबद्दल वाईट वाटतंय, माझ्याबद्दल आदर वाटतोय. मी वयाच्या तिसाव्या वर्षी मरणार आहे, पण गेली पाच वर्षे, क्रांतीच्या अनेक कड्यावरून मी न पडता चाललो हे एक आश्‍चर्यच मानले पाहिजे. या क्षणी तरी मी जिवंत आहे.

मी माझ्या आठ ग्रंथांच्या उशीवर आज शांतपणे माझे मस्तक ठेवून विसावलो आहे. त्यात मी जे विचार मांडले आहेत त्यातून मी माझ्या देशबांधवांना जुलुमी सरकारपासून वाचवण्याचा प्रयत्न केलाय. सत्तेची धुंदी सर्व माणसांना चढते हे सत्य आहे. डेनिस सायराकुस म्हणतो ते यांच्या बाबतीत किती खरे आहे, ‘‘जुलूम हा एक सुंदर एपिटाफ आहे’’

हे अभागी विधवे तू स्वतःचे थोडे सांत्वन कर, कारण तुझ्या गरीब बिचाऱ्या कॅमिलीचा एपिटाफ यापेक्षा कितीतरी चांगला आहे. त्याच्या थडग्यावरील ओळी जुलुमी सत्ताधीशांना ठार मारणाऱ्या ब्रुटस आणि कॅटोच्या थडग्यावरील ओळी आहेत. माझ्या प्रिय ल्युसिला! खरे तर माझा जन्म कविता लिहिण्यासाठी, दुःखी जनतेचे रक्षण करण्यासाठी, तुला आणि तुझ्या आईला सुखी ठेवण्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्या वडिलांसाठी पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करण्यासाठी झाला होता. मी अशा प्रजासत्ताक देशाचे स्वप्न पाहिले होते ज्याचा सारे विश्व आदर करेल. माणूस एवढा अन्यायी आणि रानटी असेल असे मला मुळीच वाटले नव्हते. माझ्या लिखाणातील उपहासात्मक, बोचऱ्या विनोदाने किंवा टीकेने माझे कर्तृत्व झाकाळून गेले आहे असे मानणे मला वाटते बरोबर नाही, पण मला कल्पना आहे त्या उपहासाने माझा बळी घेतला आणि माझ्या डॅन्टॉनबरोबरच्या माझ्या मैत्रीचाही मी बळी आहे.. डॅन्टॉन आणि फिलिप या माझ्या मित्रांबरोबर मला ठार मारणार आहेत यासाठी मी माझ्या मारेकऱ्यांचे आभार मानतो.

माझे सहकारी इतके भेदरट निघतील असे मला वाटले नव्हते. त्यांनी कुठल्या कुठल्या अफवांवर विश्वास ठेवून मला वाऱ्यावर सोडले हे मला माहीत नाही, पण हे सत्य आहे की आम्ही मृत्यूला कवटाळतोय ते आम्ही मोठ्या धैर्याने देशद्रोह्यांवर टीका केली त्यासाठी आणि आम्ही सत्यावर प्रेम केलं म्हणून. आम्ही शेवटचे खरे प्रजासत्ताकवादी म्हणून मरणार आहोत याचे सारे जग साक्षी आहे.

माझ्या प्रियतमे मला क्षमा कर. ज्या क्षणी आपण एकमेकांपासून दूर झालो, त्याच क्षणी खरेतर माझे खरे आयुष्य संपले. मी आता फक्त माझ्या आठवणींवर जगतोय. तुला विसरण्यापेक्षा स्वतःला कशात तरी गुंतवून ठेवलेले बरे. माझी ल्युसिला, माझी लोला, मी तुला प्रार्थना करतोय, की मला हाका मारू नकोस. तू मला साद घालू नकोस कारण त्याने मी माझ्या थडग्यात छिन्नविछिन्न होतो. आपल्या लहानग्यासाठी काहीतरी करणे तुला भाग आहे. आता तुला आपल्या होरेससाठीच जगायचे आहे. त्याला माझ्याबद्दल सांग. इतर लोक सांगणार नाहीत ते सत्य त्याला सांग. मी असतो तर त्याच्यावर किती प्रेम केले असते ते त्याला सांगशील. माझ्यावर अत्याचार होत असले तरी देवाच्या अस्तित्त्वावर माझा विश्वास आहे. माझ्या रक्ताने माझ्या चुका धुतल्या जातील, माझी दुर्बलता धुतली जाईल आणि परमेश्वर माझ्या सदगुणांचा आणि माझ्या स्वातंत्र्यावरील प्रेमाचा गौरव करेल. प्रिये, लाडके एक दिवस मी तुला परत भेटेन! ल्युसिला, माझी ॲनेट! मी मृत्यूबद्दल संवेदनशील आहे, सगळेच असतात, पण मॄत्यू माझी सर्व अपराधांपासून सुटका करेल माझे दुर्दैव हाच माझा अपराध आहे.

मी तुझा निरोप घेतो! लोला! माझ्या आत्म्या, माझे जिवन, या पृथ्वीतलावरील माझी स्वर्गदेवता, मी तुला माझ्या चांगल्या मित्रांच्या स्वाधीन करून जात आहे. ही माणसे सदाचारी आहेत, प्रामाणिक आहेत.

होरेस, बाबा, ल्युसिला आता मी तुमचा कायमचा निरोप घेतो. माझ्या आयुष्याचा किनारा आता मला दूर जाताना दिसतोय. मला ल्युसिला तू अजून दिसतेस, माझी लाडकी ल्युसिला अजून किनाऱ्यावर माझा निरोप घेत उभी असलेली मला दिसतेय! माझ्या बांधलेल्या हातानी मी तुला मिठी मारण्याचा प्रयत्न करतोय. माझी तडफड होतेय आणि माझे निर्जीव डोळे तुला पाहण्याचा अजूनही प्रयत्न करत आहेत….

कॅमी..

(रॉबेस्पिअर हा कॅमिली डिमुलाचा शाळकरी मित्र होता आणि शिवाय कॅमिलीचा मुलगा होरेस, त्याचा मानसपुत्र होता.)

मृत्यू :

दुपारी अधिकारी त्याला गिलोटीनसाठी तयार करण्यासाठी आले. तो कोपऱ्यात अंग दुमडून बसला. एखादे चवताळलेले जनावर जसे आक्रमक होते, तसा तो त्या अधिकाऱ्यांशी झगडला. गिलोटीनला घेऊन जाण्यासाठी जी गाडी येते त्यात मृत्यूच्या वाटेवर असतानाही त्याने त्यांच्याशी झटापट केली. त्याला घोडदळाने, पायदळाने, तोफदळाने आणि नॅशनल गार्डच्या सैनिकांनी घेरले असताना त्याने त्याची बंधने तोडण्याचा प्रयत्न केला. त्याने स्वतःचे कपडे वैफल्यग्रस्त होऊन रागाने टराटरा फाडले. त्याने त्याची छाती, मान उघडी टाकली. त्याने जमलेल्या जमावाकडे मदतीची याचना केली ‘‘तुमच्या मित्राला हे ठार मारणार आहेत! मला मदत करा.’’

कॅमिली डिमुलां! ८९ साली त्याने देशभक्तांना हातात बंदुका घेण्याचे आवाहन केले होते. आता जमलेल्या जमावाने त्याला साधी ओळख दाखवण्यासही नकार दिला. ज्या माणसांसाठी त्याने आपले आयुष्य खर्ची घातले ती माणसे आता त्याला वाचवणार का? त्याची झटापट पाहून एका सैनिकाने त्याला गाडीच्या तक्तपोशीला बांधून टाकण्याची धमकी दिली. त्या धमकीने तो शांत झाला आणि त्याने सभोवताली नजर फिरवली. मृत्यू त्याच्या इतक्या जवळ आलाय यावर त्याचा विश्वास बसेना. तेवढ्यात त्याची नजर गिलोटीनकडे गेली. गिलोटीनचे पाते मावळणाऱ्या सूर्याच्या लालसर प्रकाशात लालभडक दिसत होते. प्लेस द ल रेव्होल्युशनच्या चौकात जमलेल्या त्या प्रचंड समुदायामध्ये त्याची कृष आकृती मधोमध उठून दिसत होती. फारच केविलवाणे दृष्य होते ते! (या चौकाचे मूळ नाव होते कॉन्कॉर्ड चौक. जेव्हा या चौकात गिलोटीनखाली माणसे मारण्यात आली तेव्हा त्याचे नाव झाले रेव्होल्युशन चौक) त्याने तेथेही झटापट केली. तो प्रचंड घाबरला होता. जेव्हा तो गिलोटीनच्या पात्याखाली आला तेव्हा त्याच्या मित्रांच्या रक्ताने माखलेले ते पाते त्याला दिसले आणि तो एकदम शांत झाला. त्याचे आवसान परत आले. तो म्हणाला, ‘‘स्वातंत्र्यलढा सुरू करण्यासाठी हे बक्षीस योग्यच आहे.’’ मग त्या घरंगळत येणाऱ्या पात्याखाली त्याचे मुंडके उडले. त्याचा मृत्यू झाला, पण त्या क्षणापर्यंत तो स्वतःचा मालक होता. मरताना त्याने त्याच्या लाडक्या बायोकोच्या केसाची ती बट हातात घट्ट धरली होती…

ल्युसिला आणि डिलॉन यांची मस्तके काही दिवसांने गिलोटीनखाली धडावेगळी झाली. या सगळ्या नाट्याचा उबग आलेली ल्युसिला मात्र अत्यंत धीराने, न डगमगता, मृत्यूला सामोरी गेली.

  • जयंत कुलकर्णी.
Posted in मी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल... | Leave a comment

एका धर्मच्छळाची कहाणी

नमस्कार वाचक मित्र आणि मैत्रिणींनो,

आज अजून एक पुस्तक आपल्या हातात देताना मला अत्यंत आनंद होत आहे. हा आहे इन्क्विझिशनचा इतिहास. हे प्रकरण युरोपमध्ये कसे सुरू झाले आणि त्याचे लोण भारतात कसे पोहोचले याचा इतिहास आपल्याला हे पुस्तक वाचल्यावर कळेल. इस्लाम धर्म काय किंवा ख्रिश्चन धर्म काय, त्याच्या प्रसारासाठी राज्यसत्तांनी या धर्मांना भरपूर मदत केली. प्रसंगी युद्धेही केली हे आपण लक्षात घेतले पाहिजे. जर हिंदू राजे प्रबळ असते तर असले प्रकार होते ना! असो. मी कारणमिमांसा करत नाही. ती आपल्याला करायची आहे.

खाली माझ्या मनोगतातील काही परिच्छेद देत आहे….

नमस्कार !

मनोगत लिहिण्याआधी पोर्तुगीजांनी भारताच्या काही भागावर कसा कब्जा केला त्याचा इतिहास थोडक्यात सांगणे मला वाटते, गैर ठरणार नाही. अगोदर तो सांगतो –

पोर्तुगालमधील सर्व ज्यू नागरिकांना बाटवल्यानंतर दोन आठवड्यांनी, म्हणजे ७ जुलै १४९७ या दिवशी वास्को द गामा याने लिस्बनच्या बंदरातून फक्त १४८ खलाशांना घेऊन भारतासाठी प्रस्थान ठेवले. जरी माणसांची संख्या कमी असली तरी त्याच्या काफिल्यामध्ये तीन जहाजे आणि अजून एक बोट होती, ज्यात तीन वर्षे पुरेल एवढे अन्न इत्यादि साहित्य भरलेले होते. त्याला केप ऑफ गुड होपेला वळसा मारून भारताला जायचे होते. १८ मार्च १४९८ या दिवशी त्याला मलबारच्या किनाऱ्यावरील कालिकत हे शहर दिसले. ही पहिली पोर्तुगीज मंडळी जी भारताच्या किनाऱ्यावर उतरली. २९ ऑगस्टला तो समुद्री मार्गाने अंदाजे ३२० मैल प्रवास करून गोव्याला पोहोचला. तेथून तो १० जुलै १४९९ ला लिस्बनला पोहोचला. त्याच्या बोटीत काळे मिरे, लवंगा, जायफळ, दालचिनी, मौल्यवान खडे आणि इतर सामान ठासून भरले होते. ते सामान पाहून पोर्तुगीज राजाचे डोळे विस्फारले आणि नंतर भारतासाठी अनेक मोठ्या सागरी मोहिमा आखण्यात आल्या. १५०२ मध्ये वास्को द गामाने त्याची भारतासाठी दुसरी सफर १५०२ मध्ये केली. यावेळी त्याच्या काफिल्यात १५ जहाजे होती, भारताच्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर त्याने काही कारण नसताना दहशतीसाठी कालिकतवर तोफांचा भडिमार केला आणि त्यानंतर कोचीन आणि क्रांगनूरची शिबंदी मजबूत केली १५०५ मध्ये फ्रान्सिस्को द अल्मेडाची पोर्तुगीज इंडियाचा व्हाईसरॉयपदी नेमणूक झाली आणि तो २२ जहाजे आणि २५०० सैनिक/खलाशी घेऊन कोचीनला उतरला. तेथे त्याने एक दगडी किल्ला बांधला. २ फेब्रुवारी १५०९ या दिवशी दिव येथे अल्मेडाच्या आरमाराची मुसलमान आरमाराशी भीषण सागरी युद्ध झाले ज्यात अल्मेडाने शत्रूचे आरमार बुडवून नष्ट केले आणि सागरावर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. अल्मेडानंतर १५०९ साली अफान्सो द अल्बुकेर व्हाईसरॉय झाला. १० नोव्हेंबर १५१० या दिवशी त्याने अदिलशाहचा पराभव करून गोवा जिंकले व गोव्यास राजधानी म्हणून घोषित केले. त्याच वर्षी त्याने त्या बेटावर तटबंदी बांधली आणि किल्ला बांधून तेथे आपली शिबंदी मजबूत केली. १५१५ साली याचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा गोव्यामध्ये ल्युसो-इंडियन लोकांची संख्या बऱ्यापैकी वाढली होती. त्यानंतर जवळजवळ १०० वर्षे पोर्तुगीजांचे समुद्रावर आणि मसाल्याच्या व्यापारावर वर्चस्व होते. हा व्यापार इतका प्रचंड झाला, की पोर्तुगालचा राजा मॅन्युएलने स्वतःला “लॉर्ड ऑफ द नॅव्हिगेशन, कॉन्क्वेस्ट अँड कॉमर्स ऑफ इंदिया, पर्शिया अँड इथोपिया”असे घोषित केले. राजाने मसाल्याचा सगळा व्यापार स्वतःच्या अखत्यारीत आणला. राजा मॅन्युएल अशारितीने युरोपमधील सगळ्यात धनाढ्य राजा झाला. पुढे काय झाले हा इतिहास आहे… २ मार्च १५६० या दिवशी सेंट झेव्हियरच्या कृपेने भारतात इन्क्विझिशनची स्थापना झाली. त्यानंतर काय झाले हे वाचकांना कळेलच…

इन्क्विझिशन ही एक युरोपमधील धार्मिक न्यायदानाची प्रक्रिया असल्यामुळे त्याला मराठीत योग्य असा प्रतिशब्द नाही म्हणून पुस्तकात तोच शब्द वापरला आहे. पूर्वी “धर्मसमीक्षण संस्था” हा शब्द वापरला जायचा, पण या संस्थेमध्ये फक्त धर्माचे समीक्षण चालत असे असे म्हणणे धाडसाचे ठरेल.

प्रथम मी हे का लिहिले हे सांगणे मला आवश्‍यक वाटते. हे वाचल्यावर वाचकांना वाटेल, की हा सगळा प्रकार नव्याने बाटलेल्या ख्रिश्‍चनांबाबत झाला आहे मग आपल्याला काय त्याचे? पण डेलॉनने एका ठिकाणी स्पष्ट केले आहे, की जेवढ्या ख्रिश्‍चनांवर हे खटले चालवले जायचे तेवढेच इतर धर्मियांवर चालवले जायचे. मुख्यतः हिंदूंवर. एके ठिकाणी तो म्हणतो या इतर जणात जादूटोण्यासाठी अटक केलेल्यांची संख्याही जास्त असायची. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की वेताळाची पूजा हा प्रकारही जादूटोण्यात गणला जायचा. त्यांचे काय झाले असावे हे मी सांगण्याची गरज नाही. हिंदूंना हिंदू म्हणून जगणे अशक्य केले जायचे आणि मग बाटवले जायचे हे एक उघड गुपित आहे. सगळ्यात जास्त अन्याय या ख्रिश्‍चन मंडळींनी केले ते ब्राह्मणांवर आणि लहान मुलांवर ते कसे ते तुम्हाला वाचल्यावर कळेलच. इस्लामी अतिरेक्यांचा ह्युमन शिल्ड असा जो प्रकार हल्ली बोलण्यात येतो त्याच्यात आणि या लहान मुलांना त्यांच्या मातापित्यांनी आणि नातेवाईकांनी धर्मांतर करावे म्हणून ओलीस धरणे, यात फारसा फरक मला वाटत नाही. का ते तुम्हाला ते सविस्तर वाचल्यावर कळेलच. आता इस्लामचा विषय निघालाच आहे म्हणून सांगतो, तुम्ही जर या दोन्ही धर्मांचा नीट अभ्यास केला तर तुम्हाला उमजेल, की या दोन्ही धर्मांच्या मूळतत्त्वांमध्ये फारसा फरक नाही. दोन्ही धर्मांनी आपली जमात वाढवण्यासाठी जगभर अत्याचार केले. राज्यसत्ता आणि धार्मिक सत्ता एकत्र आली, की मानवजातीवर काय भीषण परिणाम होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे दोन्ही धर्म.

हे पुस्तक वाचताना मला मीच अनुवादीत केलेल्या फ्रान्झ काफ्काच्या “द ट्रायल” या पुस्तकाची आठवण येत होती. त्यातही नायकाला त्याला का अटक झाली आहे हे शेवटपर्यंत कळत नाही. नला तर वाटते, काफ्काने ट्रायल लिहिण्याआधी डेलॉनचा वृत्तांत वाचला असावा आणि इन्क्विझिशनच्या तत्त्वांचा सामाजिक कादंबरी लिहिताना वापर केला असावा. शिवाय इन्क्विझिशन आणि इस्लाममधील ब्लास्फेमीचे कायदे यात मला कमालीचे साम्य आढळले. असो.

पोर्तुगीज ख्रिश्‍चनांनी वंशवादही भरपूर जोपासला होता हेही आपल्याला कळून येईल. गोऱ्या ख्रिश्‍चन कैद्यांना वेगळी, चांगली वागणूक मिळे, तर स्थानिक नागरिकांना वेगळी हीन वागणूक मिळे. उदा. तुरुंगात गोऱ्यांना गाद्या मिळत, तर स्थानिकांना फरशीवर झोपावे लागे. तेथे मात्र येशूपुढे सर्व समान या तत्त्वांचा त्यांना विसर पडे. यावरून मला दुसऱ्या महायुद्धातील एक घटना आठवली. जेव्हा दोस्तांचे सैन्य पॅरिसच्या वेशीवर पोहोचले तेव्हाची ही घटना आहे..

“…दरम्यान व्हॅटिकॅनमधील ब्रिटिश राजदूत सर ओस्बोर्न याने परराष्ट्र मंत्रालयाला २६ जानेवारी १९४४ रोजी एक विचित्र बातमी दिली, ‘व्हॅटिकॅनच्या कार्डिनल सचिवाने मला बोलावून रोममधे दोस्तांचे फक्त गोरे सैन्यच तैनात असेल अशी आशा व्यक्त केली.` त्याने घाईघाईने पोपची बाजूही सावरायचा प्रयत्न केला, ‘ पोपला रंगभेद मान्य नाही, पण ही विनंती मान्य करता येऊ शकेल असे वाट इ. इ.` हा भेदभाव जे सैनिक त्यांच्या स्वातंत्र्यासाठी लढले त्यांच्या बाबतीत घडला हेही लक्षात घेतले पाहिजे. हिंदूंमध्ये जातीभेद आहे (आता होता असं म्हणायला हवं) हे मान्यच आहे. तो वाईट आहे हेही मान्य आहे, पण या पोपच्या वंशभेदाबद्दल फार कुठे चर्चा झालेली आढळत नाही. एका स्थानिक हुशार ख्रिश्‍चन माणसाला धर्मगुरू होण्यास पोर्तुगीजांनी केवळ तो पूर्वाश्रमीचा ब्राह्मण होता म्हणून कसे अडथळे आणले हेही वाचणे मजेशीर आहे…. असो अधिक लिहित नाही… आपण पुस्तक वाचावे ही विनंती.

  • – जयंत कुलकर्णी
Posted in प्रवर्ग नसलेले | Leave a comment

आरण्यक…

..मला एखादे पुस्तक आवडले की मी ते वाचता वाचता त्याचा अनुवादच करून टाकतो. म्हणजे मला राहवतच नाही… खालील परिच्छेद असाच एक वरील पुस्तकातील आहे…

एकूण पाने : २६१

किंमत : ३५०. घरपोच (पोस्टाने)

ज्यांना हे पुस्तक विकत घ्यायचे आहे त्यांनी कृपया मला मेसेज करावा.

आरण्यक…….

चंद्रप्रकाशात आसमंत न्हाऊन निघाला आणि थंडी पार हाडात मुरली. पौष गेला. मी लवटोलियाच्या कचेरीच्या तपासणीसाठी गेलो होतो. रोज झोपायला रात्रीचे अकरा वाजायचेच. एके दिवशी मी जेऊन स्वयंपाकघरातून बाहेर पडलो. पाहिले तर त्या हाडे गोठविणाऱ्या थंडीत एक स्त्री त्या चंद्रप्रकाशात कचेरीच्या कुंपणाजवळ उभी होती. अशा वेळी, जेव्हा आकाशातून बर्फासारखे थंड दव टिपकण्यास सुरुवात झाली होती.

‘‘कोण उभे आहे रे तिकडे?’’ मी आमच्या पटवारीला विचारले.

‘‘हुजूर ती ना? कुंता आहे.’’ काल मला भेटली होती. तुम्ही आज येणार आहे कळल्यावर तिने मला विचारले की तिची मुले उपाशी आहेत. जर मी उद्या येऊन मालकांच्या ताटातील उरलेसुरले घेऊन गेले तर चालेल का? मी अर्थातच हो म्हटले. म्हणून ती आज आली आहे आणि तुमचे जेवण होण्याची वाट पाहात बसली आहे.

मी हे बोलत होतो तवढ्यात बलुआ टेहलूने माझे सारे राहिलेले उष्टे गोळा करून त्या बाईच्या पितळेच्या भांड्यात घातले. ते मिळताच ती तेथून चालती झाली.माझ्या त्या भेटीत मी लवटोलियाला आठ दहा दिवस राहिलो. प्रत्येक रात्री ती बिचारी मला विहिरीजवळ माझे जेवण होण्याची वाट पाहात थांबायची. एवढ्या कडाक्याच्या थंडीतही तिच्या अंगावर एका साडीशिवाय दुसरे काही नसायचे.

शेवटी मी कुतुहलाने पटवारीला विचारलेच, ‘‘ ही कुंता जी रोज भात घेऊन जाते ती आहे तरी कोण? या जंगलात ती कुठे राहाते? काय करते? दिवसा तर ती कधी मला दिसत नाही!’’‘‘सांगतो हुजूर! हे पातेलं जरा आत ठेऊन येतो.’’ पटवारी म्हणाला.

त्या दिवशी संध्याकाळी जेवणानंतर खोलीत घमेल्यात एक छोटीशी अगटी पेटवली होती, त्याच्याच जवळ एका खुर्चीत काही हिशेब पाहात होतो. शेवटी मनाशी म्हटले ‘चला बास झाले काम आता. कंटाळा आला.’ मी सगळी आवरा आवर केली, पटवारीला हाका मारली आणि कुंताची कहाणी ऐकण्यास बसलो.

‘‘ऐका हुजूर’’ पटवारी म्हणाला. ‘‘दहा वर्षांपूर्वी या भागात एक देवीसिंह नावाच्या रजपूताची भयंकर दहशत होती. या भागातील सगळे गणगोत,शेतकरी, कुळे, कुरणांचे भाडेकरी सगळे त्याच्यापुढे चळाचळा कापत. त्याचा दराराच तेवढा होता. शिवाय सगळे त्याच्या मिंध्यात होते कारण त्याचा धंदा होता सावकारीचा. तो चढ्या व्याजाने कर्ज देर्इ कारण मुद्दलासकट व्याज वसूल करण्याची त्याची ताकद होती. त्यासाठी त्यने दहा पंधरा पहेलवान पाळले होते. सध्याचा सावकार रासबिहारीसिंह जसा आहे तसा तो दहा वर्षांपूर्वी होता.हा देवीसिंह जौनपूर जिल्ह्यातून पूर्णियात येऊन स्थायिक झाला होता. जेव्हा आला तव्ही त्याची जेवण्याची भ्रांत होती. पण हळूहळू त्याने सावकारीचे बस्तान बसवले आणि येथील घााबरट गणगोतांवर व शेतकऱ्यांवर दहशत बसवली. येथे स्थिरावल्यावर चार पाच वर्षांनी तो चैन करायला बनारसला गेला होता. तेथे एका नाचणारीणीच्या कोठ्यावर गाणे ऐकायला गेला असताना तिच्या मुलीच्या प्रेमात पडला. तेव्हा तिचे वय असेल पंधरा/सोळा. देवीसिंहने तिला पळवून येथे आणले. तेव्हा त्याचे वय असेल सत्तावीस/अठ्ठावीस. देवीसिंहने तिच्याशी लग्न केले. पण जेव्हा त्याच्या बिरादरीच्या लोकांना कळले की ती एका तवायफची मुलगी आहे तेव्हा त्यांनी त्याला बिरदरीबाहेर काढले. त्याला वाळीत टाकले. देवीसिंहला पैशाची कमी नव्हती. त्याने या सामाजिक बहिष्काराची फिकीर केली नाही. बिरादरीचा आदेश पायाखाले तुडवला. पण जर धंदा चालू नसेल तर साठवलेला पैसा किती दिवस पुरणार? हुजूर, ऐषारामासाठी पैसे उडाले आणि या रासबिहारीच्या कोर्टकचेरीच्या लफड्यात उरलेले पैसे संपले. देवीसिंह कंगाल झाला. नंतर चार पाच वर्षांनीच त्याचा देहांत झाला. ही कुंता त्याची विधवा आहे हुजूर. आत्ता दिसते त्याच्यावर जाऊ नका हुजूर. एकेकाळी तिचे सौंदर्य आरसपानी होते आणि ऐट तर विचारू नका हुजूर! लवटोलियाहून कुशी आणि कल्बालियाच्या संगमावर ती स्नानासाठी मोत्याच्या झालरी लावलेल्या मेण्यात बसून जायची. एकेकाळी साखरेची चिमूट जिभेवर टाकल्याशिवाय ही बाई पाणी प्यायची नाही. आता तिची काय अवस्था झाली आहे पाहा. सगळ्यात वाईट म्हणजे हुजूर तिला जातीची प्रतिष्ठा नाही कारण ती एका नाचणारीणीची मुलगी आहे हे सगळ्यांना माहीत आहे. ना तिच्या नवऱ्याच्या बिरादारीचे लोक ना स्थानिक गणगोत तिला आपले मानत नाहीत. गहू काढून झाला की शेतात फिरायचे व पडलेले गव्हाचे दाणे वेचायचे, हे एवढेच अन्न तिला आणि तिच्या अर्धभुकेल्या लहानग्यांना मिळते. तेही सहा महिन्यासाठी. मग परत तिची आणि तिच्या मुलांची उपासमार होते. कधी खायला मिळते कधी नाही. पण मी तिला कधीही भीक मागताना पहिलेले नाही हुजूर! तुम्ही येथे जमीनदाराचे मॅनेजर म्हणून आला आहात म्हणजे तुम्ही इथले राजेच आहात. मला वाटते तुमच्या ताटातील उरलेसुरले तिला मी वाढले तर तुम्ही मला आणि तिला माफ कराल.’’

‘‘तिच्या आईचा काही पत्ता लागला का?’’ मी विचारले.

‘‘मी त्या बाईला कधी पाहिलेले नाही सरकार.’’ पटवारी म्हणाला.

‘‘ना कुंताने तिच्या आईची कधी चौकशी केली. बिचारी खडतर कष्ट उपसून तिच्या मुलांचे पालनपोषण करते खरं. आत्ता ती अशी दिसते पण बिचारी कोमेजून गेली आहे. पूर्वी ती सुंदर दिसायची. एवढी सुंदर स्त्री या भागात कोणी पाहिली नव्हती हुजूर. आता तिचे वय झाले. शिवाय विधवा झाल्यावर तिच्या सौंदर्याला उतरती कळा लागली ती लागलीच. पण अत्यंत प्रामाणिक आणि शांत आहे ही कुंता. पण येथे कोणी तिच्याकडे ढुंकुनही पाहात नाही. ते तिचा तिरस्कार करतात आणि तिची हेटाळणी करतात. बहुधा ती एका नाचणारीणीची मुलगी आहे हे त्या मागचे कारण असावे.’’

‘‘ते ठीक आहे पटवारी, पण ती एवढ्या रात्री एकटी या जंगलातून हिंडत असते त्याची तिला भीती नाही वाटत? लवटोलिया येथून दोनएक मैल असेल ना!’’ मी विचारले.

‘‘ पण घाबरली तर तिचे पोट कसे भरणार? तिला तर या जंगलातून दिवसरात्र एकटीलाच प्रवास करावा लागतो. तिचे असे कोण आहे या जगात जो तिची काळजी घेईल हुजूर?’’ पटवारी म्हणाला.

हे सगळे झाले पौष महिन्यात. वेळेवर पैसे देण्याचा थोडाफार दबाव कुळांवर टाकून झाल्यावर मी मुख्य कचेरीला परतलो. माघ महिन्यात मधेच मला परत लवटुलियाला जावे लागले. मला एका चराऊ कुरणाचा नवीन दराने भाडेपट्टीकरार करायचा होता.थंडी अजून कमी झाली नव्हती. दिवसभर जे पश्‍चिमेचे वारे चालायचे ते संध्याकाळी दुप्पट वेगाने वाहायचे आणि त्याच्याबरोबर बोचरी थंडी आणायचे. एक दिवस मी कचेरी सोडली आणि भटकत भटकत कचेरीच्या उत्तरेस फेरफटका मारण्यास गेलो. बोराचे जंगल बरेच माजले होते. जिकडे पाहावे तिकडे बोराची वने दृष्टीस पडत होती. छपरा आणि मुजफ्फरपूरच्या कलवार जातीच्या व्यापाऱ्यांनी हे जंगल भाडेपट्टीवर घेतले होते. तेथे रेशमाच्या आळ्या पाळून ते बऱ्यापैकी पैसा कमवत होते. त्या बोरवनात मी थोडासा भरकटलो. तेवढ्यात माझ्या कानावर एका बाईचा आक्रोश पडला. पाठोपाठ मुलांचा आरडा ओरडा आणि माणसांचे शिव्याशाप माझ्या कानावर पडले. मी जरा पुढे जाऊन पाहिले तर रेशमाच्या व्यापाऱ्यांच्या नोकरांनी एका बाईला केस पकडून फरफटवत चालवले होते. तिच्या अंगावरचे कपडे फाटलेे होते आणि मागे मागे दोन तीन मुलं टाहो फोडत चालली होती. एका नोकराच्या हातात एक टोकरी होती आणि त्यात पिकलेली बोरे. मला पाहताच ते सगळा चचापले आणि सारवासारव करू लागले,

‘‘ हुजूर आम्ही हिला पटवारीकडे घेऊन चललो होतो. आमच्या झाडांची बोरे तोडत होती. बरे झाले तुम्ही आलात सरकार !’’

मी प्रथम काय केले तर त्या नोकरांना दरडावले व त्या स्त्रिला त्यांच्या हातून सोडवले. तोपर्यंत ती बाई लाजेने एका बोराच्या झाडामागे लपली होती. तिची ती अवस्था पाहून मला तिची कीव आली. ते दृष्य पाहून मला फार वाईट वाटले. ते नोकर त्या बाईला आणि तिच्या मुलांना सोडण्यास बिलकुल तयार नव्हते. मी त्यांची समजूत घालण्याचा बराच प्रयत्न केला,

‘‘ या गरीब बाईने बोरे तिच्या मुलांसाठी वेचली तर तुमचे एवढे मोठे काय नुकसान होणार आहे की तुम्ही हिला पटवारीच्या ताब्यात द्यायला निघाला आहात? तुमच्या रेशमाचे काही नुकसान होणार आहे का एवढ्याशा बोरांनी? सोडून द्या तिला.’’ मी म्हणालो.‘‘

त्यातील एक जण म्हणाला, ‘‘ सरकार आपण या बाईला ओळखत नाही. हिचे नाव आहे कुंता. लवटोलियामधे राहते आणि पक्की चोर आहे. मागच्याच वर्षी हिला आम्ही बोरे तोडताना रंगे हात पकडले होते. आता मात्र तिला धडा शिकविल्याशिवाय आम्ही….’’कुंता ! नाव ऐकून मी चक्रावून गेलो. तिला मी ओळखू तर शकलो नाही कारण एकतर मी तिला रात्री पाहिले होते आणि तिच्यात बराच बदलही झाला होता. ती आता अधिकच कृष झाली होती.मी त्या नोकरांना धमकावले आणि तिची सुटका केली. बिचारी शरमेने करपून गेली होती. मुलाबाळांना घेऊन तिने पळ काढला. त्या गडबडीत बिचारीची बोराने भरलेली परडी तेथेच राहिली. कदाचित शरम वाटल्यानेही तिने ती तेथेच सोडली असेल.. मला माहीत नाही. मी त्यातील एका नोकरास ती टोकरी कचेरीत पोहोचविण्यास सांगितले. ते तेवढ्यानेही खूष झाले. त्यांना वाटले, चला काही नाही तर तिची टोकरी तरी जप्त होईल! खिन्न मनाने मी कचेरीस परत आलो. आल्यावर मी पटवारीला ही कहाणी सांगितली आली नाराज होत म्हणालो,

‘‘ बनवारीलाल, तुमच्या भागातील लोक एवढे निष्ठूर कसे काय?’’

बनवारीच्या चेहऱ्यावर विषाद पसरला. त्याचा चेहऱ्यावर त्याला लागलेली बोचणी स्पष्ट दिसत होती. तो एक भला माणूस होता आणि त्याच्या मनात इकडच्या लोकांबद्दल प्रेम, दया होती हे मला माहीत होते. त्याने त्याच रात्री ती बोराची टोकरी आणि बोरे काढायचा आकडा एका शिपायाबरोबर तिच्या घरी, लवटोलियाला पाठवून दिला.त्या रात्री आणि नंतर मात्र कुंता जेवण घेण्यास कचेरीवर कधीच आली नाही. बहुधा चोरी करताना पकडले गेल्यामुळे शरमेने तिला मला तोंड दाखवावेसे वाटले नसेल… –

विभूतीभूषण बंदोपाध्याय.-

अनुवाद : जयंत कुलकर्णी.

ज्या समाजात जातींना एवढे अवास्तव महत्व दिले जाते, त्या समाजात ‘जातच नसणे’ याचा भयंकर अनुभव कुंताला आला असेल…

Posted in प्रवर्ग नसलेले, मी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल... | Leave a comment

पैशाचे मानसशास्त्र (भाग – १)

#PsychologyofMoney

पैशाचे मानसशास्त्र (भाग – १)

प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन.

गेल्या काही दिवसात एका पुस्तकाचा अनुवाद हातावेगळा केला. हे पुस्तक अनुवाद करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः तरूणांसाठी. मी वाचत गेलो आणि झपाट्याने त्याचा अनुवादही पूर्ण केला. अनुवाद सोप्यात सोप्या शब्दात करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. हा अनुवादही तुम्हाला सोपा आणि रंजक वाटेल. असो

आता पुस्तकाबद्दल -श्री मॉर्गन हाऊजेल यांनी पैशाच्या संदर्भात आपण कसे वागावे याचा जो धडा घालून दिला आहे तो खरेच डोळ्यात अंजन घालणारा आहे. त्यांनी नुसता उपदेश केलेला नाही तर अनेक चमत्कारिक आणि मजेशीर उदाहरणे देऊन त्यांचे मुद्दे आपल्याला पटवून सांगितले आहेत आणि त्यामुळेच अवघड विषयावरील हे पुस्तक वाचताना एक क्षणही कंटाळा येत नाही. त्यांनी या पुस्तकात प्रस्तावना आणि वीस प्रकरणात हा विषय मांडून एकप्रकारे आपल्याला मदतच केली आहे. ज्याप्रमाणे वॉल्डन आपल्याला जिवनाची काही रहस्यं उलगडून दाखवते त्याचप्रमाणे हे पुस्तक आपल्याला सध्याच्या काळात पैशाशी कसे वागावे याचे धडे देते आणि ते अत्यंत आवश्यक आहेत. कोणाला वाटेल हे पुस्तक शेअरमधे गुंतवणूक करण्यासाठी आहे पण हा विषय फार व्यापक आहे आणि आपल्या आयुष्याच्या सगळ्या अंगांना स्पर्ष करून जातो. यात आपले मन, बुद्धी, समाज, संस्कार, ज्या काळात आपण वाढलो त्याचा परिणाम, सुखाच्या आणि दुःखाच्या कल्पना, गरज, हव्यास, पुरेसे म्हणजे काय… अशा अनेक बाबींचा ऊहापोह आपल्याला आढळेल. उदा. प्रस्तावनेत तो म्हणतो – दोन विषयांचा प्रत्येकाच्या आयुष्यावर परिणाम होतोच मग तुम्ही ते माना किंवा न माना. – तुमची प्रकृती आणि पैसा.तेथेच पुढे त्याने एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट प्रकाशात आणली आहे. तो म्हणतो, ‘‘आधुनिक वैद्यकीय शास्त्राच्या अशक्य वाटणाऱ्या विजयाने माणसाचे आयुर्मान जगभर उंचावले गेले आहे. माणसाच्या शरीराचे कार्य कसे चालते याबाबतीत डॉक्टरांच्या जुनाट ज्ञानाची जागा नवनवीन शोधांनी घेतली आहे आणि मला वाटते त्यामुळे प्रत्येकाचे प्रकृतीस्वास्थ्य आता तुलनेने निरोगी झाले आहे. वित्त उद्योगात म्हणजे – गुंतवणूक, वैयक्तिक वित्तव्यवस्थापन, औद्योगिक व्यवस्थापनात गोष्ट वेगळी आहे.

गेल्या वीस वर्षापासून उच्च दर्जाच्या विद्यापिठातून उच्च दर्जाची बुद्धिमत्ता व शिक्षण यात ओढले जात आहे. काही वर्षांपूर्वी फायनांशियल इंजिनियरींग या विषयाचे प्रिन्स्टन विद्यापिठात सगळ्यात जास्त स्तोम माजले होते. पण या विषयाने आपल्याला एक उत्तम गुंतवणुकदार बनवले आहे का? हा खरा प्रश्न आहे. मला तरी तसे काही झाल्याचे दिसत नाही.

चुकत माकत आणि अनुभवातून शिकत आपण चांगले शेतकरी झालो, कुशल प्लंबर झालो आणि अत्याधुनिक केमिस्टही झालो. पण चुकत माकत आणि त्यातून शिकत आपण आपल्या पैशाचे चांगले व्यवस्थापन करण्यास शिकलो आहे का? आपली कर्जात बुडण्याची शक्यता कमी झाली आहे का? आपण संकटकाळासाठी पैशाची पुरेशी बचत करण्यास शिकलो आहे का? आपण आपल्या निवृत्तीसाठी आर्थिकदृष्ट्या तयार आहोत का? आपल्या सुखासाठी पैसा काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याबाबतीत आपले विचार स्पष्ट आहेत का?याची उत्तरे होकारार्थी आहेत असे मी दुर्दैवाने म्हणू शकत नाही. म्हणजे तसा ठाम पुरावा माझ्याकडे तरी नाही.

आपल्याला पैशाबद्दल जे शिकवले जाते ते पदार्थविज्ञानासारखे (नियम आणि समीकरणे). मानसशास्त्रात शिकवतात तसे नाही (भावना आणि त्याच्या अनेक छटा)आपण काय शिकलो नाही आणि काय शिकायला पाहिजे ते या पुस्तकातून जाणून घेण्यास तुम्हाला आवडेल…आता प्रत्येक प्रकरणात कशावर लिहिले आहे हे पुढच्या लेखात लिहीन पण तोपर्यंत मला खात्री आहे की तुम्ही हे पुस्तक वाचलेले असेल आणि मला पुढे लिहावे लागणार नाही. नव्हे, तुम्ही ते वाचावेच असा माझा आग्रह आहे…

– जयंत कुलकर्णी.

Posted in मी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल... | 3 Comments

प्रेमचंद के फटे जूते (व्यंग्य): हरिशंकर परसाई

प्रेमचंदचे फाटके जोडे

प्रेमचंदचे एक चित्र माझ्यासमोर आहे. म्हणजे एक छायाचित्र. पत्नीसमवेत आपले छायाचित्र काढले होते. डोक्यावर जाड्याभरड्या कापडाची टोपी, अंगावर एक कुडता आहे आणि खाली धोतर. गाल बसले आहेत आणि गालाची हाडे वर आली आहेत पण मिशीमुळे चेहरा जरा तरी भरल्यासारखा वाटतोय.

पायात कॅनव्हासचे जोडे आहेत ज्याच्या नाड्या निष्काळजीपणाने बांधल्या आहेत. नाड्यांच्या टोकाचा पत्रा उलगडल्यावर ती टोके जोड्याच्या भोकात जात नाहीत मग नाड्या कशातरी बांधल्या जातात.

उजव्या पायातील बूट तसा ठीक आहे पण डाव्यापायातील जोडा फाटला आहे आणि त्यातून करंगळी बाहेर आली आहे.

कितीही प्रयत्न केला तरी माझी दृष्टी या जोड्यावरून हटत नाही. मनात विचार आला, जर फोटो काढण्यासाठी आपण हे असे कपडे केले आहेत तर तू नेहमी कसले कपडे घालत असशील ? पण या माणसाचे वेगवेगळे कपडे असणे अशक्य आहे. प्रसंगानुरुप कपडे बदलण्याची कला या माणसाला अवगत नाही. तो जसा आहे तसाच या छायाचित्रात आहे.

मग मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहतो. अरे साहित्यातील बाप माणसा, तुला माहीत आहे का की तुझा जोडा फाटला आहे ? आणि त्यातून करंगळी बाहेर आली आहे? याची तुला लाज वाटत नाही? धोतर जरा खाली खेचले असतेस तर ती बाहेर डोकावणारी करंगळी झाकली गेली असती ना! पण हा जोडा तुझ्या खिजगणतीतही दिसत नाही. तुझ्या चेहऱ्यावर किती प्रचंड आत्मविश्र्वास दिसतोय. जेव्हा छायाचित्रकाराने त्याच्या डोक्यावर झाकलेल्या काळ्या कपड्यातून ‘स्माईल प्लीज’ म्हटले असेल तेव्हा तू हसण्याचा प्रयत्न केला असणार. वेदनांच्या खोल गर्तेतून एखादे स्मित वर ओढून काढताना छायाचित्रकाराने थँक यू! म्हटले असणार त्यामुळे हे अर्धेमुर्धे स्मित तुझ्या चेहऱ्यावर उमटले असावे. याला हास्य तरी कसे म्हणावे? यात उपहास आणि बोचरी टीका आहे.

हा कसा माणूस आहे की जो फाटकी पादत्राणे घालून स्वतःचे छायाचित्र काढून घेतोय, तरी पण कोणाला तरी हसतोय.

तुला फोटोच काढायचा होता तर निदान चांगले बूट तरी घालायचे होतेस. मी तर म्हणतो तू फोटो काढून घेतलाच नसता तर असे काय मोठे बिघडले असते? बहुतेक पत्नीने आग्रह केल्यावर ‘‘ एवढच ना? चल काढूया फोटो’’ असे म्हणून तू खुर्चीवर बसला असशील. पण फोटो काढण्यासाठी सुद्धा एखाद्या माणसाकडे बूट असू नयेत हे केवढे मोठे दुर्दैव आहे. तुझा फोटो पाहता पाहता मी तुझ्या वेदना माझ्यात सामावून घेतो आणि मग मात्र मला आतून गलबलून येते. मला रडू कोसळणार तेवढ्यात माझे दृष्टी तुझ्या डोळ्याकडे जाते आणि त्यातील वेदना पाहून मी थबकतो. माझे अश्रू आतच सुकतात.

तुला फोटोचे महत्व कधीच कळले नाही हेच खरं. जर कळले असते तर कोणाकडून तरी जोडे उसने आणले असतेस. लोक तर कपडे उसने आणून सण साजरा करतात आणि उसन्या मोटारीतून वरात काढतात. फोटो काढण्यासाठी बायकोही उसनी आणली जाते आणि तुला साधे जोडे उसने मागता आले नाहीत. काय म्हणावे तुला. म्हणूनच म्हटले की तुला फोटोचे महत्व कळलेच नाही. काही लोक तर फोटोला वास यावा म्हणून अत्तरे चोपडून फोटोला उभे राहातात. अट्टल बदमाशांच्या फोटोलाही त्यामुळे आजकाल सुवास येतो. आजकाल टोपी आठ आण्याला मिळते तर जोडे पाच रुपयाला. जोड्याची किंमत नेहमीच टोपीपेक्षा जास्त असते. आजकाल तर जोडे खूपच महाग झाले आहेत. कधी कधी तर एका बूटाच्या जोडीवर पन्नास टोप्या फुकटही देतात म्हणे. तू ही जोड्यांच्या आणि टोप्यांच्या किंमतीच्या ओझ्याखाली दबला गेला होतास. ही विडंबना मला आजवर कधी एवढी बोचली नव्हती जी आज तुझा फाटका बूट पाहताना बोचते आहे. तुला भले लोक थोर कथाकार, नाटककार, कादंबरीकार. युग प्रवर्तक असे काय काय म्हणतात पण फोटोतही तुझा बूट फाटकाच आहे. माझा जोडा फार चांगला आहे असे मला म्हणता येत नाही. फक्त तो वरून मात्र चांगला दिसतो. बोटे बाहेर येत नाहीत व दिसतही नाहीत पण अंगठ्याखाली त्याचा तळ फाटला आहे. चालताना अंगठा खाली जमिनीवर घासला जातो आणि हुळहुळा होतो. माझ्या जोड्याचा तळ पूर्ण झिजेल, पूर्ण तळवा सोलला जाईल पण बोट बाहेर आलेले दिसणार नाही. तुझी करंगळी दिसते आहे पण पाय सुरक्षित आहेत. माझी करंगळी दिसत नाही पण तळवा मात्र सोलला गेला आहे. तुला लाज कशी झाकावी याची काहीच माहिती नाही आम्ही मात्र लाज झाकण्यासाठी मरणही पत्करू शकतो. तू ऐटीत फाटके जोडे घालून बसला आहेस पण आम्ही मात्र असे बसू शकत नाही. असा फोटो तर मी या आयुष्यात काढून घेणार नाही मग माझे चरित्र कोणी फोटोविना छापले तरी बेहत्तर.

तुझे हे उपरोधिक हास्य माझ्या उत्साहावर पाणी ओतते.

काय अर्थ आहे तुझ्या या हास्याचा? कसले म्हणायचे हे हास्य?

होरीचे गोदान झाले म्हणून हे हास्य?

का पौषाच्या रात्री नीलगाय हलकूचे शेत चरून गेली?

का डॉक्टर क्लब सोडून आले नाहीत म्हणून सुजान भगतचा मुलगा मेला म्हणून?

नाही बहुतेक माधोने बायकोच्या अंत्यविधीसाठी ठेवलेल्या पैशाने दारू झोकली म्हणून असावे.

मी परत तुझ्या फाटक्या बूटाकडे पाहातो.

सामान्य जनतेच्या लेखका, कसा काय फाटला हा? काय वणवण फिरत होतास की काय ? वाण्याचा तगादा चुकविण्यासाठी दोन चार मैलाचा फेरफटका मारून मग घरी परतायचास की काय? पण फिरून बूट फाटत नाहीत झिजतात. कुंभनदासचे जोडे नाही का फतेहपूरसिक्रीचे फेरे मारून मारून झिजले? त्याला नंतर खूपच पश्र्चात्ताप झाला म्हणे. शेवटी बिचारा म्हणाला, ‘‘आवत जात पन्हैया घिस गई, बिसर गयो हरि नाम!’’आणि देणाऱ्यांना म्हणायचा, ‘‘जिनके देखे दुख उपजत है, तिनको करबो परै सलाम!’’

चालून चालून जोडे झिजतात फाटत नाहीत. तुझा कसा फाटला?

मला वाटते, तू कशालातरी ठोकर मारत असावास. अशा गोष्टींवर ज्या युगेन युगे एकावर एक जमून दगड झाल्या आहेत. त्यावर ठोकरा मारून मारून बहुतेक तू तुझा जोडा फाडून घेतलास. रस्त्यावर निर्माण झालेल्या उंचवट्यावर बहुधा तू आपले जोडे अजमावले होतेस! पण तू त्याला टाळूनही पुढे जाऊ शकला असतास. अशा विरोधांशी तह करता येतो हे तू विसरलास. सगळ्या नद्या पर्वतांना थोड्याच तासतात? कित्येक नद्या रस्ता बदलून, वळसे घालून वाहातातच ना !पण तू तह करू शकला नाहीस. मला वाटते तुझ्या पायाचे हे बोट मला काहीतरी सांगते आहे. ज्याची तुला घृणा वाटते त्याकडे तू हाताच्या बोटाने नाही तर पायाच्या बोटाने इशारा तर करत नाहीस ना?

ज्याच्यावर पाय आपटून आपटून तुझे जोडे फाटले ते तर तू दाखवत नाहीस ना?

पण मला आता समजते आहे आणि उमगतेही आहे. तुझ्या ओठावरील हे उपहासाने भरलेले हास्य आणि तुझ्या पायाच्या बोटाचा रोखही मला समजतोय.

तू माझ्यावर नाही! नाही! आम्हा सगळ्यांवर हसतो आहेस.

आम्ही, जे बोटे झाकून पण तळवे घासून चालत आहोत. आम्ही, जे सत्याला वळसे मारून निघून जात आहोत.

मला क्षणभर तू बोलतो आहेस असा भास झाला.

‘‘मी तरी सत्यासाठी माझे जोडे फाडले. माझी करंगळी फाटलेल्या जोड्यातून बाहेर आली. पण माझ्या पायाचे तळवे सुरक्षित राहिले आणि मी चालत राहिलो. पण करंगळी झाकण्याच्या नादात तुम्ही तुमचे तळवे सोलवटून घेतलेत. आता तुम्ही भविष्यात चालणार कसे ?

– अनुवाद : जयंत कुलकर्णी

Posted in लेख | 1 Comment

माझी पुस्तके

माझी पुस्तके.
Posted in प्रवर्ग नसलेले | Leave a comment

श्रद्धांजली !!

Posted in लेख | Leave a comment

दोन घटना ; एक दुसऱ्या महायुद्धातील आणि दुसरी आत्ताची.

दोन घटना ; एक दुसऱ्या महायुद्धातील आणि दुसरी आत्ताची.

आज करोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूच्या आकड्याने १००००० चा आकडा पार केला. आणि जवळजवळ सर्व देशात तो पसरला आहे. या शिवाय जगाची अर्थव्यवस्था कोसळण्याच्या बेतात आहे. ही परिस्थिती जर अशीच राहिली तर करोना व्हायरस किंवा भूकेने मेलेल्या लोकांची संख्या मला वाटते एकच होईल. परमेश्र्वराकडे मी प्रार्थना करतो की जगातील सर्व शास्त्रज्ञांना लवकरच यावरील लस शोधण्यात यश येऊ देत. कम्युनिस्ट आणि समाजवादावरील लस, हे प्रकरण संपले की आपोआपच निर्माण होईल याचा मला विश्र्वास आहे आणि सुबुद्ध माणूस ही लस स्वतःच टोचून घेईल. करोना व्हायरस हा चीनमुळे पसरला यात मला वाटते कोणाच्याच मनात आता शंका नसावी. अर्थात याला अपवाद असतील फक्त माओवादी आणि कम्युनिस्टांनी पोसलेले काही पत्रकार, राजकारणी आणि वरून कम्युनिस्ट आणि आतून भांडवलशाहीच्या आशिर्वादाने पोट भरणारे तथाकथित समाजवादी.. नुसते भारतातीलच नव्हे तर जगभरातील.


जगभरात खान मार्केटस्‌ पसरली आहेत आणि त्यांचा एक कलमी कार्यक्रम असतो तो म्हणजे मानवशत्रू कम्युनिस्ट यांची तळी उचलून धरणे. या बाबतीतही हेच झाले आहे हे आपल्याला खालील माहिती वाचल्यावर लक्षात येईल. आता कोणी म्हणेल (नेहमीप्रमाणे) की अशा अनेक कॉन्स्पिरसी थेअरीज नेटवर पसरल्या आहेत पण मी जे खाली लिहिले आहे त्याचे सर्व पुरावे तुम्हाला शोधल्यास सापडतील. ज्याला या बाबतीत शंका आहे त्यांनी ती माहिती स्वतः शोधावी.

जेव्हा वुहान व्हायरसमुळे मरून पडलेल्या माणसांचे व्हिडिओ इंटरनेटवर पसरले तसे चीनच्या सिपीसीला काहीतरी हालचाल करणे भाग पडले. त्यांनी पहिले पाऊल उचलले ते म्हणजे हा व्हायरस वुहानच्या माशांच्या बाजारातून पसरला याची हाकाटी सुरुवात केली. सिपीसीच्या प्रतिनिधीने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यात हे प्रथम जाहीर केले. चीनमधील हुबेई प्रांताची वुहान ही राजधानी आहे आणि हे त्या प्रांतातील सगळ्यात मोठे शहर आहे. सर्वच बाबतीत. हुआनान सिफूड मार्केट हे वुहानच्या जिॲनघान भागात आहे. माशांची आणि सर्व प्रकारच्या जंगली प्राण्यांची खाण्यासाठी विक्री करणारा हा एक मोठा बाजार आहे. सिपीसीने (वुहान हेल्थ कमिशन) असे म्हणणे मांडले की ही साथ तेथे अचानक सुरु झाली आणि त्याची कुठलीही कल्पना कोणालाही नव्हती. ही साथ या बाजाराशी संबंधीत आहे असे काही मेडिकल इन्स्टिट्युटचे म्हणणे आहे असेही जाहीर करण्यात आले. हा रोग न्युमोनिया सदृष असल्यामुळे लोकांचा त्यावर विश्र्वास बसला.

३० डिसेंबरला सिपीसीने एक अंतर्गत सुचना जाहीर केली की अशा प्रकारचे रुग्ण आढळल्यास वुहान हेल्थ कमिशनच्या त्वरित निदर्शनास आणून द्यावे. ही सुचना झपाट्याने इंटरनेटवर पसरली. तोपर्यंत ही सुचना ही त्या खात्याची अंतर्गत बाब होती हे लक्षात घ्या. पण ती आता इंटरनेटवर पसरली आहे हे समजल्यावर घाईघाईने त्या खात्याने ३१ डिसेंबरला एक जाहीर सुचना छापली. त्यात त्या पसरलेल्या न्युमोनिया सदृष आजाराचा आणि त्या बाजाराचा संबंध आहे असे काही मेडिकल इन्स्टिट्युटचे म्हणणे आहे असे जाहीर करण्यात आले. पण त्याच नोटीशीमधे एक महत्वाची माहितीही पुरवली होती. ती म्हणजे हा जो आजार आहे तो संसर्गजन्य आहे असा कुठलाही पुरावा आढळलेला नाही. कारण कुठल्याही वैद्यकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना हा आजार जडलेला नाही. (हे वाक्यच धुळफेक करणारे आणि विनोदीही आहे)

१ जानेवारीला तो हुआनान बाजार बंद करण्याची नोटीस लागली आणि तो तातडीने बंद करण्यात आला. लगेच तो स्वच्छ आणि निर्जंतुक करण्यात आला. या योगे सर्व पुरावे नष्ट करण्यात आले असावेत. (किंवा तो पर्यंत सिपीसीला वाटत होते की हे एवढ्यावरच थांबेल.) त्यानंतर झालेल्या प्रत्येक पत्रकार परिषदेत हेच सांगण्यात आले की वुहान मधील ज्याला ज्याला हा संसर्ग झाला आहे तो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या बाजाराच्या संपर्कात आलेला आहे.

जानेवारीच्या २६ तारखेला इंस्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजीने असे जाहीर केले की जे नमुने गोळा करण्यात आले होते त्यातील ५८५ पैकी ३३ नमुन्यामधे नॉव्हेल करोना व्हायरस न्युक्लिक ॲसिड सापडले आहे आणि तो वेगळा करण्यात त्यांच्या शास्त्रज्ञांना यश आले आहे आणि त्यावरून असं दिसत आहे की हा व्हायरस प्राण्यांतून संक्रमीत झाला आहे. या सगळ्या प्रचारातून वुहानच्या त्या बाजारातून हा व्हायरस पसरला आहे ही सरकारी भूमिका सर्वांना मान्य झाली होती. परंतु काही दिवसांनंतर एका जर्नलमधे (जर्नल सायन्स) प्रकाशित झालेली माहिती काहीतरी वेगळेच सांगत होती. या अहवालामधे लॅन्सेटमधे प्रसिद्ध झालेल्या एका रिसर्च पेपरचा दाखला दिला होता. लॅन्सेटमधे प्रसिद्ध झालेल्या या माहितीची तारीख होती १५ फेब्रुवारी २०२० आणि याचे शिर्षक होते ‘‘क्लिनिकल फिचर्स ऑफ पेशन्टस्‌ इन्फेक्टेड विथ २०१९ नॉव्हेल कोरोना व्हायरस इन वुहान, चायना.’’ हा पेपर लिहिला होता प्रो.चाओलिन हुआंग, येमिंग वँग, प्रो. शिंगवँग ली, प्रो. लिली रेन, प्रो. जिअँनपिंग झाओ, यीहू, या पेपरची तारीख होती जानेवारी २४, २०२०. यामधे वुहानच्या त्या बाजारात या व्हायरसची लागण कशी झाली नसावी याचा उहापोह केला होता. या पेपरचा मुख्य लेखक होता जिन-तान हॉस्पिटलचा डेप्युटी डायरेक्टर प्रो. चाओलिन. या हॉस्पिटलला अज्ञात व्हायरसने बाधित झालेल्या रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. एका पत्रकाराने त्याची या संदर्भात मुलाखात घेतली तेव्हा तो म्हणाला, ‘‘ हा लॅन्सेटमधील पेपर फार महत्वाचा आहे. यात कोरोना व्हायरसच्या पहिल्या पेशंटवर चर्चा करण्यात आली आहे. त्यात काढलेले निष्कर्ष खालील प्रमाणे-
१ पहिल्या पेशंट १ डिसेंबरला सापडला आणि त्याच्यात जी लक्षणे आढळली त्याचा आणि हुआनच्या त्या बाजाराशी काहीही संबंध नव्हता,
२ साथ पसरल्यानंतर या पेशंटचा आणि इतर रुग्णांचा संबंध आला नव्हता.
३ डिसेंबर च्या १० तारखेला अजून तीन रुग्ण सापडले. त्यातील दोन रुग्णांचा वुहानमधील त्या बाजाराचा कसलाही संबंध नव्हता.
४ दिसेंबर १५ नंतर मात्र त्या बाजारातून अनेक रुग्णांची बातमी बाहेर आली.
५ त्या बाजारात कुठल्याही प्रकारची वटवाघुळे विकली जात नव्हती आणि तेथे एकही वटवाघुळ सापडले नाही असा अहवाल चीनी सिडीसी ने दिला आहे.

या पेपरमधे एकूण ४१ रुग्णांचा अभ्यास केला गेला आहे आणि त्यातील १४ रुग्णांचा त्या बाजाराशी कसलाही संबंध आला नव्हता.

जानेवारी २९ तारखेला लॅन्सेटमधेच जिन यिनतान हॉस्पिटलमधे असलेल्या कोरोनाने बाधित ९९ रुग्णांचा अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला. त्यात असे म्हटले आहे की त्यातील ५० रुग्णांचा त्या मासळीबाजाराचा कसलाही संबंध आला नव्हता. न्यु इंग्लंड जर्नलच्या मतानुसार जानेवारी २२ अगोदर जे ४२५ रुग्ण सापडले होते त्यापैकी ४५ रुग्णांचा वुहानमधील त्या मासळीबाजाराचा कसलाही संबंध आला नव्हता. ज्या डॉक्टरांनी हा अहवाल दिला आहे हे चीनमधील वैद्यकीय तज्ञ आहेत. हा पेपर वाचल्यावर जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीतील साथीच्या रोगांचे एक तज्ञ, डॅनियल लुसी म्हणाले, ‘‘ या पेपरमधील माहिती जर खरी आहे गृहीत धरले तर कोरोनाचा पहिला रुग्ण नोव्हेंबरच्या सुरुवातीस सापडला असला पाहिजे.’’ कारण संसर्ग आणि त्याची लक्षणे दिसण्यात काही काळ जावा लागतो ज्याला आपण इनक्युबेशन पिरिअड म्हणतो. हे जर खरे असेल तर कोरोना शांतपणे पसरत होता आणि जेव्हा तो त्या मासळीबाजारात प्रकट झाला त्यावेळी त्याला तेथे येऊन बराच काळ उलटला असला पाहिजे.

नॅशनल हेल्थ कमिशनचे तज्ञ वुहानमधे ३१ डिसंबर २०१९ या दिवशी आले. या तज्ञांनी कोरोना व्हायरसची लागण कोणाला झाली आहे हे ओळखण्यासाठी काही मार्गदर्शक अटी जाहीर केल्या. १) त्या रुग्णाचा वुहानच्या मासळीबाजाराशी संबंध आलेला असला पाहिजे. २) त्याला ताप असला पाहिजे आणि ३) जिनोम सिक्वेंसिंग प्रमाणे ते सिद्ध झाले असले पाहिजे. ही तिनही लक्षणे जर आढळली तर त्या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे असे मानण्यात यावे असे जाहीर करण्यात आले. या मार्गदर्शक तत्वांनुसार तज्ञांचा दुसरा गट येईपर्यंत काम चालले होते. ही तारीख होती
जानेवारी १८. त्यात डॉ. जॉग नानशान हेही होते. या गटाने या मार्गदर्शक तत्वांमधे सुधारणा केली. प्रश्र्न असा होता की जर १४ रुग्णांचा संबंध त्या मासळी बाजाराशी आला नव्हता तरीही अशी अट का घालण्यात आली. याचाच अर्थ असा होतो की कोरानाचा दुसरा कुठलातरी स्त्रोत असला पाहिजे आणि तो दडपण्यासाठी ही सगळी धडपड चालली होती. हे म्हणजे तुमची हरवलेली किल्ली फक्त एकाच दिव्याखाली शोधा असं सांगण्यासारखे आहे.

गॉरडॉन चँग जो एशियन घडामोडींचा तज्ञ मानला जातो म्हणतो, ‘‘ आपल्याला माहिती आहे की चीनने जे रुग्णांचे आकडे जाहीर केले ते विश्र्वास ठेवण्यालायक नाहीत. बेजिंगने जवळजवळ सहा आठवडे कोरोना दडपून ठेवला होताआणि मग जेव्हा सिसीपीने जानेवारीच्या २० तारखेला कोरोना अधिकृतरित्या जाहीर केला तेव्हापासून मग त्यांनी माहिती दडपण्यास सुरुवात केली किंवा प्रचारी आकडे प्रसारित करण्यास सुरुवात केली. हे आपल्याला कशावरून समजले? कारण त्यांनी २६ जानेवारीला कोरोनासाठी जो सेंट्रल लिडींग ग्रुप स्थापन केला त्यात ९ माणसांची नेमणुक केली गेली. त्यात पार्टीचे गोबेल्सना नेमण्यात आले होते. उदा. या ग्रुपचा व्हाईस चेअरमनला कम्युमिस्ट प्रचार यंत्रणेचा सर्वेसर्वा समजले जातो. पार्टीला रुग्णांची काळजी नव्हती, कोरोनाची काळजी नव्हती. पुढे काय होणार आहे हे माहीत असल्यामुळे त्यांनी जगाला उत्तर देण्यासाठी असल्या नेमणूका केल्या. त्यांना माहिती दडपायची होती आणि जी काही बाहेर येईल त्यावर मजबूत नियंत्रण ठेवायचे होते. त्यांना कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यापेक्षा ते जास्त महत्त्वाचे वाटत होते. अर्थात चीनला हे काही नवीन नाही. माओच्या राज्यात एकंदरीत दोन कोटी प्रजा माओने ठार मारली. त्यानंतर तिआनमेनमधे काय झाले हेही आपल्याला माहीत आहे. यावर मी एक लेख लिहिणार आहे. असो. ज. रॉबर्ट स्पाल्डिंग सार्सच्या काळात चीनमधे होता. तो म्हणतो, ‘‘ मी त्या काळात चीन मधे होतो. नंतर आमची तेथून सुटका करण्यात आली पण तेव्हाही सिपीसीने सार्स दडपण्याचा अतोनात प्रयत्न केला. जेव्हा त्यांना ते अशक्य झाले तेव्हा मात्र त्यांनी आत्ताप्रमाणे खोटा प्रचार सुरु केला होता.’’ तुम्ही जर त्याकाळातील बातम्या वाचल्यात तर तुम्हाला कोरोनाच्या बातम्या वाचतोय की काय असा भ्रम होईल.

जानेवारीच्या १० तारखेला चीनने नॉव्हेल कोरोनाचा पूर्ण जिनोम सिक्वेन्स जाहीर केला. किंवा त्यांना तो करावा लागला असं म्हणा हवं तर. हा प्रसिद्ध झाल्यावर जगभरातील सगळे विषाणूशास्त्रज्ञ त्याचे विश्लेषण करू लागले. जानेवारीच्या ७ तारखेला नॅशनल इंस्टिट्युट ऑफ कम्युनिकेबल डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन चे एक प्रोफेसर झँग यॉनझेन यांनी फुदान युनिव्हर्सिटीच्या स्कुल ऑफ पब्लिक हेल्थ यांच्या सहयोगाने एक रिसर्च पेपर ‘द नेचर’ या मसिकाकडे दाखल केला. हा ३ फेब्रुवारीला प्रसिद्ध झाला. यात असे प्रतिपादन केले होते की हा विषाणू CoVZC45 आणि CoVZXC21 या दोन विषाणूंशी साधर्म्य दाखवतोय. हे दोन विषाणू झाउशान प्रांतातील वटवाघुळातून पिपल्स लिबरेशन आर्मीच्या शास्त्रज्ञांनी वेगळा केला होता. वुहानमधे सापडलेल्या कोरोना विषाणूमधे असलेले न्युक्लिओटाईड हे CoVZC45 या विषाणूनमधील न्युक्लिओटाईड ८९.१% जुळतात. एवढेच नाही तर त्यातील अमायनो ॲसिड (प्रोटिनमधे) हे १००% सारखे आहेत. जगातील इतर शस्त्रज्ञांनी मग ब्लास्ट नावाची संगणक प्रणाली वापरून उपलब्ध असलेल्या डाटावरून व्हायरल सिक्वेन्सचा तुलनात्मक अभ्यास केला. या अभ्यासाचे निकाल झँगच्या संशोधनाशी तंतोतंत जुळले. चीनच्या सेंटर फॉर डिसिज कंत्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेतील अजून एका शास्त्रज्ञाने, ज्याचे नाव होते लु रॉजिआन आणि त्याच्या चमूने एक पेपर लॅन्सेटमधे प्रकाशित केला. तारीख होती ३० जानेवारी. त्यात त्यांनी असे प्रतिपादन केले होते की कोरोना विषाणू बाधीत रुग्णांमधे आढळलेले विषाणू हे झुशानमधे वटवाघुळातून बाजूला केलेल्या विषाणूंशी अत्यंत जवळचे साधर्म्य दाखवतात. (८८%) त्यात इतरही बरीच माहीती दिली आहे पण ती मला समजली नाही म्हणून मी येथे देत नाही. वटवाघुळातून हा विषाणू प्रथम शोधला इम्स्टिट्युट ऑफ मिलिटरी मेडिसीन नानजिंग कमांड येथील शास्त्रज्ञांनी. हे मुख्यालय आहे झुशान येथे. त्यांनी ५ जानेवारी २०१८ रोजी जो पेपर प्रसिद्ध केला त्या पेपरचे छायाचित्र दिले आहे. यात असे लिहिले की या मिलिटरीच्या शास्त्रज्ञांना झुशान शहरात सार्स सदृष अनेक विषाणू वटवाघुळात सापडले आहेत. त्याचे नामकरण झाले-झाउशान विषाणू. थोडक्यात काय शास्त्रज्ञांना आता समजले आहे की आत्ता सापडलेला विषाणू हा झाउशान विषाणू किंवा बॅट लाईक व्हायरस किंवा सार्स या विषाणूंसारखाच आहे. जो १८ साली चीनच्या मिलिटरीच्या शास्त्रज्ञांनी ( नानजिंग मिलिटरी रिसर्च इन्स्टिट्युट ) वटवाघुळांपासून वेगळा काढला होता. आता या विषाणूमधील साधर्म्य इतके कसे काय हा एक वादाचा विषय होऊ शकतो. विशेषतः जेव्हा एखादा विषाणू दुसऱ्या सावजावर उडी मारतो तेव्हा त्याच्या प्रोटीनच्या कवचात अनेक बदल होतात. त्यामुळे १००% साधर्म्य आढळणे अत्यंत दुर्मिळ आहे. मग या विषाणूत काही बदल केला गेला का ? जेणेकरून तो मूळ विषाषूसारखा होईल (तेवढाच घातक ) शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की ही शक्यता नाकारता येत नाही. हे करता येणे शक्य आहे का? याचे उत्तर आहे रिव्हर्स इंजिनिअरींग करून हे करता येऊ शकेल. हा विषाणू नैसर्गिकरित्या तयार झाला नसण्याची शक्यता जवळजवळ नाही कारण मग तो १०० % समान नसता. या विषाणूत जे काही उलटबदल झाले ते एखाद्या प्रयोगशाळेत झाले असण्याची शक्यता जास्त आहे.

जानेवारीच्या २१ तारखेला पाश्चर इन्स्टिट्युट, शांघाई, येथील शास्त्रज्ञांनी सायन्स चायना लाईफ सायन्सेस या मासिकात एक पेपर प्रकाशित केला. त्यात त्यांनी एका महत्वाच्या घटनेचा उल्लेख केला आहे. या पेपरचे शिर्षक वाचल्यावर आपल्याला कळून येते की हे संशोधन कुठल्या दिशेने चालले होते. त्याचा अर्थ साधारणतः असा होतो, ‘‘सध्याच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना विषाणूचा सर्वांगिण वाढ किंवा बदल आणि माणसाला त्याचा संसर्ग कसा होतो याचा अभ्यास करण्यासाठी त्याच्यावर असलेल्या प्रोटीनच्या तुऱ्याचे मॉडेलिंग.’’ त्यात त्यांनी एक बाब लक्षात आणून दिली आहे की जरी वुहान नॉव्हेल करोना विषाणू मधी एस-प्रोटीन आणि सार्सच्या याच प्रोटीनमधे फारसे साम्य नसले तरी त्यात काही ठिगळं अशी होती की ज्याच्यात १००% साम्य आढळळे आहे. हे तुरे किंवा इंग्रजीमधे त्यांना स्पाईक म्हणतात कोरोना विषाणूसाठी फार महत्वाचे आहेत कारण याच स्पाईक्सने तो मानवी पेशींवर हल्ला करू शकतो. माणसाच्या पेशींवरही अशीच काही स्पाईक्स असतात आणि हे रिसेप्टर किंवा तुरे कुठल्या पेशींना त्याच्याची संयोग करू द्यायचा हे ठरवतात. थोडक्यात याला जर कुलुपाची उपमा दिली तर कोरोनाचे तुरे (एस प्रोटीन) हे त्या कुलुपाची किल्ली असतात. एकदा का ही किल्ली त्या कुलुपाला लागली की हा विषाणू पसरतो माणसाच्या पेशींचा नाश करतो. पण निसर्गाने इतर पेशी हल्ला करू नये म्हणून निसर्गात आढळणाऱ्या इतर विषाणूंकडे ही किल्ली दिलेली नाही. थोडक्यात एका गाडीची चावी दुसऱ्या गाडीला लागत नाही. ती लागण्यासाठी काय करावे लागेल ? त्या किल्लीत सुधारणा करावी लागेल. तेच काम २००७ पासून वुहानमधील संशोधानत चालले होते असं म्हणायला हरकत नाही.

आता हे जे सगळे पेपर्स प्रकाशित झाले होते त्यातील धोका सिपीसीच्या लक्षात येऊ लागला होता. साऊथ छायना मॉर्निंग पोस्ट मधील फेब्रुवारी २८च्या बातमीनुसार शांघाई पी ३ प्रयोगशाळा बंद करण्याचा आदेश देण्यात आला. याच प्रयोगशाळेने वुहान कोरोना विषाणूचा पहिला जिनोम सिक्वेनस जगाला दाखवला होता. त्यामुळे या विषाणूवरचे तेथील संशोधन जवळजवळ बंद पडले. प्रो. झँग यॉन्गझेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ११ जानेवारीला हा पेपर प्रसिद्ध केला होता ते याच प्रयोगशाळेतून. हा पेपर ५ जानेवारीलाच तयार झाला होता. (चाईशिनमधे आलेल्या बातमीनुसार) त्याच दिवशी शांघाई पब्लिक हेल्थ क्लिनिकल सेंटरने हे संशोधन नॅशनल हेल्थ कमिशनच्या नजरेस आणून दिले आणि हा विषाणू पसरू नये म्हणून काहीतरी उपाय करावा हे सुचवले. त्यांच्याकडून ११ तारखेपर्यंत काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी हे संशोधन व्हायरॉलॉजिकल.ऑर्ग या स्थळावर तो प्रदर्शित करण्याचे ठरवले. जगाला ही माहिती देणारी ही पहिलीच संस्था ठरली. हुबेई हेल्थ कमिटीने मग सगळ्या रक्ताचे नमुने, त्याच्या संबंधित असलेली माहिती (डाटा) नष्ट करण्याचा आदेश दिला. एवढेच नाही तर या संदर्भात कुठलाही पेपर प्रकाशित करण्यावर बंदी घातली. त्यानंतर मात्र हे प्रकरण वरच्या पातळीवर हाताळले जाऊ लागले आणि चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने एक आदेश जारी केला. त्यानुसार (पत्र क्र. २०२०/३) वरील सुचना देशभर रवाना करण्यात आल्या. यानंतर मात्र करोनाच्या प्रकरणात धावपळ करणारी चीनी शास्त्रज्ञ मंडळी एकदम शांत पडली.

सिपीसी आपल्यापासून काय लपविण्याचा प्रयत्न करते आहे? त्यांनी सहा आठवडे ही बातमी दडपली. नंतर हा विषाणू चीनभर पसरू दिला आणि एवढेच नव्हे तर तो जगभरही पसरत असताना सिपिसीने सतत खोट्यानाट्या बातम्या हेतुपुरस्कर पसरवल्या. हे कृत्य अत्यंत बेजबाबदार आणि जगासाठी धोकादायक आहे. चीनी जनता आणि त्यांच्याबरोबर सारी पृथ्वी संकटात सापडली आहे. हा विषाणू माणसांपर्यंतच मर्यादित राहिला तर ठीक आहे. जर तो जनावरात पसरला तर काय होईल याची कल्पनाच करवत नाही आणि तो पसरणारच नाही अशी ग्वाही कोणी देत नाही. हा विषाणू आता पृथ्वीतलावरून जाणार नाही हे निश्चित. तो परत परत मुटेट होऊन येणार. प्रत्येक वेळा जेव्हा त्याची साथ पसरेल आणि माणसे मरतील त्या माणसांच्या खुनासाठी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनालाच जबाबदार धरले जाईल किंवा जबाबदार धरले पाहिजे. याला आपणही जबाबदार आहोत. विशषतः पश्चिमी राष्ट्रे. या राष्ट्रांनी चीनच्या आर्थिक मदतीला भुलून त्यांच्या प्रयोगशाळेत संशोधन करण्यासाठी तरूण शास्त्रज्ञ पाठवले. त्यांच्या युनिव्हर्सिटींबरोबर संशोधनाचे कार्यक्रम आखले. त्यांच्या उद्योग जगताकडून देणग्या स्विकारल्या (ज्या खरेतर सरकारीच होत्या). आणि मुख्य म्हणजे या सगळ्या कार्यक्रमात कसलाही विधिनिषेध बाळगला नाही. पुढे काय होणार आहे याची तमा बाळगली नाही. काही शास्त्रज्ञ वारंवार सावधानतेचे इशारे देत असताना यांनी वर्तमानपत्रे आणि चीनी पुरस्कृत मिडियाचा वापर करून त्यांना गप्प बसवले त्यांचा आवाज दाबून टाकला. आपण आत्ता आपल्या येथे जे पाहतोय ते हेच आहे. आपल्या येथील तथाकथित समाजवादी विचारसरणीची वर्तमानापत्रे आणि त्यांचे पत्रकार सध्या हेच काम करताना दिसतात. कम्युनिस्टांची विचारसरणी ही एका हुकुमशहाची विचारसरणी आहे आणि ती पार शेवटपर्यंत झिरपली आहे. प्रत्येक कम्युनिस्ट हा हुकुमशहाच असतो, फॅसिस्ट असतो हे इतिहासात अनेक वेळा सिद्ध होऊनही सामान्य लोक त्या तत्वज्ञानाला बळी पडतात हे एक शोकांतिका आहे. असो. हे जरा विषयांतर झाले आहे…

आता आपण एका संशोधिकेच्या काळ्या कर्तृत्वावर प्रकाश टाकणार आहोत. आपण जर इंटरनेटवर शोध घेतलात तर आपल्याला या बाईबद्दल बरीच माहिती मिळू शकेल. हिचे नाव आहे ‘‘शी झेंगली’’ शी हे हिचे आडनाव आहे. ही एक विषाणूशास्त्रज्ञ आहे आणि वुहान इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजीमधे संशोधन करते. चीनची जी व्हायरॉलॉजीची जी कमीटी आहे त्याची ती एक वरिष्ठ सदस्य आहे. ती चायनीज जर्नल ऑफ व्हायरॉलॉजीची संपादकही आहे. तिने अनेक वर्षेवटवाघुळांवर आणि कोरोना विषाणूंवर संशोधन करण्यात घालवली आहेत. जवळ जवळ तिनशे विषाणू तिने शोधले आहेत जे वटवाघुळापासून तयार होतात. याच बाईने सार्सचा विषाणू शोधला होता. वर ज्या किल्लीचा उल्लेख झाला आहे ती किल्ली याच बाईने प्रथम शोधून काढली. याच शास्त्रज्ञाने २०१५ साली एक तिच्या संशोधनाबद्दल पेपर वाचला होता त्यात कृत्रिमरित्या विषाणू कसा तयार करता येईल याचा उहापोह केला होता. ती ज्या प्रयोगशाळेत काम करत होती त्या प्रयोगशाळेत या प्रकारच्या संशोधनासाठी लागणारी सर्व उपकरणे होती हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्या काळात या प्रयोगशाळेत ज्या काही सोयी आहेत तशा जगात कुठल्याही विषाणूंच्या प्रयोगशाळेत नाहीत असेही बोलले जात होते.

शी झेंगलीने एक नाही तर वटवाघूळे आणि विषाणू यावर चार पेपर प्रसिद्ध केले होते. हे वाचताना सामान्य वाचकांना असे वाटण्याची शक्यता आहे की हे सगळे पेपरद्वारे प्रकाशित करण्याची या शास्त्रज्ञांना परवानगी कशी मिळते ? ज्या लोकांना अशा प्रयोगशाळेत काम केले आहे त्यांना याचे उत्तर माहीत असेल. एक म्हणजे पेपर पसिद्ध करणे हा एक मानाचा भाग असतो. त्यात जर तो एखाद्या आंतराष्ट्रिय मासिकात प्रसिद्ध झाला तर अजूनच, दुसरे म्हणजे बऱ्याच वेळा ही शास्त्रे एखाद्या देशात फार कमी जणांना कळत असतात मग हे संशोधन खरेच झाले आहे का हे कळण्यासाठी तो पेपर प्रसिद्ध करणे हा सगळ्यात सोपा मार्ग कारण मग त्यावर जगभर त्यावर चर्चा केली जाते. प्रश्र्न विचारले जातात आणि ढोंग असेल तर लगेचच उघडे पडते. तिसरे आणि महत्वाचे म्हणजे त्या प्रयोगशाळेस मिळणारे पैसे हे या पेपर्सवर अवलंबून असतात. चवथे कारण म्हणजे त्या शास्त्रज्ञाची वैयक्तिक महत्वाकांक्षा. तर २०१० साली शी झेंगली सार्सच्या विषाणूवर संशोधन करत असताना ती हा विषाणू माणसात पसरू शकतो का याचाही अभ्यास करत होती. त्यात मग एस-प्रोटीनचा अभ्यास करण्यात आला आणि मग सिंथेटिक विषाणू हे नवीन शास्त्र जगाला माहीत झाले. या तिच्या संशोधनातून शी झिंगलीला माणसात करोना विषाणूला प्रवेश करायचा झाला तर त्या एस प्रोटीनमधे काय बदल करावे लागतील हे माहीत झाले होते आणि ते कसे करायचे याचेही संशोधन तिने केले होते. २०१३ साली तिने आणि तिच्या गटाने अजून एक पेपर ‘‘द नेचर’’ मधे प्रसिद्ध केला ज्यात तिने एका नवीन संशोधनाची चर्चा केली होती. काय होते ते संशोधन? तिने वटवाघूळातून तीन प्रकारचे विषाणू बाजूल काढण्यात यश मिळवले होते आणि चीनी हॉर्सशू वटवाघुळ हे अशा प्रकारच्या अनेक विषाणूंचा खजिनाच आहे हेही तिने त्यात म्हटले होते. याच संशोधनादरम्यान सार्स प्रकारच्या विषाणूंना माणसाच्या पेशीत प्रवेश करण्यासाठी माध्यमाची गरज नाही असेही सिद्ध झाले. मग २०१५ मधे तिने आणि तिच्या सहाय्यकांनी ब्रिटिश जर्नल नेचर मेडिसीन या नियत्कालिकात एक पेपर प्रसिद्ध केला त्यात त्यांनी प्रयोगशाळेत विषाणू कसा तयार करता येईल याचा उहापोह केला आहे. सार्स विषाणूचे विभाजन करण्यात यश मिळवल्यावर जाती-प्रजातीतील विषाणूंच्या संक्रमणाचा मार्ग मोकळा झाला. यात वापरल्या जाणारे उंदीर हे हिमनगाचे एक टोक होते. त्यांनी नंतर या विषाणूचा माकडांवर प्रयोग करून पाहिला. याचा उद्देश एकच होता की या तयार केलेल्या विषाणूंचा माणसावर काय परिणाम होतो याच अभ्यास करणे. हे संशोधन प्रसिद्ध झाल्यावर जगभर खळबळ माजली.

पाश्चर इन्स्टिट्युट पॅरिसयथे काम करणारे प्रसिद्ध विषाणूशास्त्रज्ञ सिमॉन वेन हॉबसन म्हणाले, ‘‘ काही शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत नवीन विषाणू जन्मास घातले आहेत, जे माणसांच्या पेशीत वाढू शकतात. हा विषाणू जर प्रयोगशाळेतून उघड्या जगात निसटला तर तो कसा पसरेल हे कोणालाही वर्तवणे शक्य नाही.’’ त्यांची ही भविष्यवाणी किती खरी ठरली आहे याचा प्रत्यय आपल्याला येतोच आहे. यामागचे कारण स्पष्ट आहे. निसर्गात जेवढे विषाणू आहेत त्यापासून इतर जातीप्रजातींना संरक्षणाचे कवच निसर्गानेच दिलेले आहे. (कुठलाही नैसर्गिकरित्या पसरलेला विषाणू करोना एवढ्या वेगाने पसरत नाही.) त्यात तुम्ही ढवळाढवळ केली पण त्यातून तयार होणाऱ्या भस्मासुरापासून संरक्षणाचे कवच मात्र तुम्ही दिले नाहीत किंवा देऊ शकला नाहीत. अर्थात या संकटाच्या सुचनेची ली झेंगली यांनी तमा बाळगली नसावी किंवा तिच्या मालकांनी म्हणा हवी तर. कारण नोव्हेंबरमधे १४ तारखेला या बाईने अजून एक पेपर प्रसिद्ध केला व त्यावर एक भाषणही दिले. हा मात्र चीनमधेच केला. याचा विषय होता, ‘‘बॅट करोना व्हायरस अँड इटस्‌ क्रॉस- स्पिसिज इन्फेक्शन.’’ २०१४ साली ऑक्टोबरमधे या प्रकारच्या संशोधनातील धोक्याची जाणीव होताच ओबामा यांनी या प्रकारच्या संशोधनाला होणारी मदत थांबवली. याच वेळी शी झेंगलीचेही अनुदान थांबले. या सगळ्या प्रकारात एक गोष्ट मात्र लक्षात आली ती म्हणजे ही जी अमेरिका, युरोप आणि चीनमधील प्रयोगशाळांमधे माहितीची देवाणघेवाण चालली होती त्यामुळे चीनमधील सर्व प्रयोगशाळांना युरोप आणि अमेरिका येथील माहितीची द्वारे उघडी झाली. पण असे दुसऱ्याबाजूने झाले असे म्हणता येत नाही कारण चीनमधे लोकशाही नाही आणि एकाधिकारशाहीमुळे तेथे संपूर्ण निर्बंध घालता येतात आणि त्याबद्दलची माहिती बाहेर येणे फार कठीण आहे.

आता चीनने अमेरिकेला या विषाणूसाठी जबाबदार धरले आहे. हे नको असेल तर अमेरिकेला सर्व माहिती जगासमोर ठेवावीच लागेल आणि मला वाटते आता जे खटले आंतरराष्ट्रिय न्यायालयात चालतील त्यात ही माहिती आपल्याला कळेल आणि अजून कायकाय गोष्टी बाहेर पडतील देव जाणे. २३ तारखेला कोरोनाच स्फोट झाला आणि सिपीसी ने या विषाणूची जबाबदारी त्या मासळीबाजारावर ढकलण्याचा चंग बांधला यात शी झेंगलीचीही मदत घेण्यात आली. कशी? तिने एक तज्ञ म्हणू सांगितले की हा विषाणू नैसर्गिकरित्या त्या मासळीबाजारात तयार झाला आहे. हे जर खरे असेल तर तेथील शास्त्रज्ञांना आणो वैद्यकीय अधिकाऱ्यांना चौकशीसाठी का बोलावण्यात आले ? डॉ लीचा मृत्यू का झाला आणि डॉ आयफेन का नाहीशी झाली याची उत्तरे सिपीसीने दिली पाहिजेत. पण ती मिळणार नाहीत कारण तेथे सिपीसी आणि कम्युनिझमची एकाधिकारशाही आहे. अशा राष्ट्राशी संबंध ठेवायचे का नाही हे आत जगाला ठरवावे लागेल. काही शास्त्रज्ञांच्या मते हा विषाणू वुहानमधी पी४ या प्रयोगशाळेतून आला ही आता एक कॉन्स्पिरसी थेअरी राहिलेली नाही. आता त्याची खात्री पटली आहे. किंवा आता असं म्हणावे लागेल की ही कॉन्स्पिरसी थेअरी आहे हे त्यांना सिद्ध करावे लागेल. या घटनेनंतर या संस्थेची दारे इतर देशातील शास्त्रज्ञांना खुली केली पाहिजेत. मला तर वाटते ज्या प्रमाणे जगातील कुठल्याही (करारात सामील असलेल्या) अणुशक्ती केन्द्रात एका संस्थेच्या (इंटरनॅशनल ॲटोमिक एनर्जी एजन्सी) सदस्यांना तपासणीसाठी जाता येते तशीच काहीतरी प्रक्रिया/नियम विषाणू प्रयोगशाळांना लावावा. आता खालील घटनाक्रम काय सांगतो ?
– कोरोना विषाणूच स्फोट झाल्यावर वुहानची विषाणू प्रयोगशाळा गप्प झाली. खरेतर या प्रयोगशाळेने ही साथ आटोक्यात आणण्यासाठी जगाबरोबर प्रयत्न करणे अपेक्षित होते.
– जानेवारी २ : वुहान पी४ प्रयोगशाळा : वुहान इंस्टिट्युटच्या डायरेक्टर जनरलने इ-मेल द्वारे खालील आदेश पाठवला.- विषय होता न्युमोनिया सदृष अज्ञात विषाणूबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती उघड करण्याबाबत. त्यातत म्हटले होते, ‘‘नॅशनल हेल्थ कमिशनच्या आदेशानुसार या साथीबद्दल आणि विषाणूबद्दल कुठलीही माहिती (डाटा) स्वतःच्या वेबवर, इंटरनेटवर, छापलेल्या मिडियावर त्यात सरकारी मिडियाही आला, किंवा बाहेरील प्रयोगशाळा ज्यांच्याशी सहकार्याचा करार आहे उघड करण्यास बंदी घालण्यात आली आहे.’’ याच्यावर सही आहे डॉ. यान-यी वँग यांची.
– जानेवारी २१ : वुहान पी ४ प्रयोगशाळा : अमेरिकेने कोरोनाच्या रुग्णांवर प्रयोग करण्यासाठी फुकट दिलेले रेमडेसिविर या औषधाचे चीनी शास्त्रज्ञांनी वुहान इंन्स्टि. ऑफ व्हायरॉलॉजी मधे पेटंट घेण्यात आले.
– फेब्रुवारी ३ : वुहान पी४ प्रयोगशाळा : डॉ. वू शिआवा यांनी धोक्याची घंटा वाजवली. आणि मुख्य म्हणजे त्यात त्यांनी स्वतःचे नाव वापरले होते. त्यात त्यांनी शी झेंगलीने ज्या प्रयोगशाळेत हे काम केले होते त्याची सुरक्षिता आणि कारभार बेभरवशाचा आहे असे म्हटले (व्हिसल ब्लोअर) त्यातून हा विषाणू निसटला असण्याची शंका व्यक्त केली होती. त्यात त्यांनी असेही म्हटले होते की हे काम आता त्या प्रयोगशाळेत कोणीही करू शकत होते.
– फेब्रुवारी ४ : वुहान पी४ प्रयोगशाळा : डुओयीचे चेअरमन शू बो यांनीही त्यांचे खरे नाव वापरून एक जतावणी दिली की या प्रयोगशाळेत नवी विषाणू जन्माला घालण्याचे काम चालले असावे. आणि साथ पसरण्यास त्या प्रयोगशाळेतील विषाणू कारणीभूत असावा.
– फेब्रुवारी ७ : वुहान पी४ प्रयोगशाळा : पिपल्स लिबरेशन आर्मीच्या उच्चपदी काम करणाऱ्या विषाणूअस्त्राच्या तज्ञ जनरल चेन वी यांना वुहानमधील ही प्रयोगशाळा ताब्यात घेतली.
– फेब्रुवारी १४ : वुहान पी४ प्रयोगशाळा : चीनचे प्रमुख शि जिनपिंग यांनी चीनच्या सुरक्षा धोरणात बायोसिक्युरिटी अंतर्भूत करण्याचा आदेश काढला. बायोसिक्युरिटीचा कायदा अमलात आणण्याचाही आदेश.
– फेब्रुवारी १५ : वुहान पी४ प्रयोगशाळा : चीनच्या इंटरनेटवर कोरोनाचा पहिला रुग्ण हुआंग यानलिंग हिचा मृत्यू झाल्याची बातमी पसरली. इन्स्टिट्युटने ही बातमी फेटाळली पण तिची सर्व माहिती इंटरनेटवरून काढून टाकण्यात आली. ही मायक्रोबायोलॉजिस्ट पेशंट झिरो होती असे काही लोकांचे म्हणणे आहे.
फेब्रुवारी १७ : वुहान पी४ प्रयोगशाळा : या प्रयोगशाळेतील एक संशोधक चेन क्वानजिॲओ हिने उघडपणे या प्रयोगशाळेचा एक डायरेक्टर वँग यानयी याच्यावर हा विषाणू पसरविण्याचा जाहीर आरोप केला.

ही जी प्रयोगशाळा आहे ही एका फ्रेंच प्रयोगशाळेच्या सहकार्याने बांधण्याचे ठरवले होते. पण जेव्हा त्याचे बांधकाम संपत आले तेव्हा ते काम या फ्रेंच कंपनीकडून काढून घेण्यात आले आणि ते एका चीनी कंपनीला देण्यात आले. ही कंपनी पिपल्स लिबरेशन आर्मीची कंपनी होती असे म्हणतात किंवा तिच्या मर्जीतील असावी. त्यामुळे या इमारतीत चीनी आर्मीसाठी एक खास विभाग सुरू करण्यात आला. तेव्हाच फ्रेंच कंपनीला येथे बायोकेमिकल शस्त्रांत्राचे संशोधन सुरू असल्याची शंका आली होती. या सर्व इन्स्टिट्युटचे प्रमुख सिपीसीच्या अत्यंत जवळचे मानले जातात. काहींचे पुर्वज तर सत्तेतही होते. यांच्या मालकीचे औषधांचे कारखाने आहेत आणि या कंपन्यांनी करोनावरील अनेक औषधांच्या पेटंटसाठी अर्ज केले आहेत. या सगळ्या संस्थांमधून आर्मीचे जनरल्स काय करतात हे एक उघड गुपीत आहे. यावर अधिक माहितीसाठी ‘‘अनरिस्ट्रिक्टेड वॉरफेअर‘’ हे छोटे पुस्तक वाचावे. एका चीनी माणसानेच लिहिले आहे. या विषयातील एक तज्ञ डॉ फ्रान्सिस बॉईल ज्यांनी अमेरिकेचा ‘‘बायालॉजिकल वेपन अँटी टेररिझमचा’’ कायदा लिहिला ते म्हणतात, ‘‘ ज्या नॉव्हेल करोना विषाणूला सध्या आपण तोंड देतोय ती एक अतिप्रगत, आक्रमक जैविक हत्यारप्रणाली आहे.’’ आता या सगळ्याचा अर्थ काय आहे हे कोणी सांगायला नको. जोपर्यंत चीन मधे कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना सत्तेवर आहे तोपर्यंत या जगात याच्यापुढे शांतता प्रस्थापित होणे कठीण आहे….. असो आता खाली इतिहासातील अजून एका घटनेकडे लक्ष वेधतो…

घटना आहे दुसऱ्या महायुद्धातील. ही वाचा आणि मग विचार करा या दोन घटनांमधे काय साम्य आहे ते…कारणे काहीही असतील पण त्याचा परिणाम एकच आहे.. खालील परिच्छेद माझ्याच पुस्तकातील आहेत..

तेरा एप्रिल १९४१ला जपानने सोव्हिएट रशियाशी अनाक्रमणाच्या तहावर सह्या केल्या होत्या. जपानचा या “टोरा” पर्यंतच्या प्रवासास त्याच दिवशी सुरूवात झाली होती. या तहाचे मुख्य कारण दोन्हीही देशांसाठी समान होते : दोन आघाड्यांवर युद्ध टाळणे. जपानने चीनवर सप्टेंबर १९३१ सालीच आक्रमण केले होते आणि रुझवेल्टच्या सरकारला जपानच्या अतिपूर्व देशांवर सत्ता गाजवण्याच्या प्रयत्नांची काळजी वाटत होती. जपानने फ्रान्सच्या इंडो-चायनाच्या वसाहती ताब्यात घेतल्यावर ब्रिटन आणि अमेरिकेने चोवीस जुलै १९४१ रोजी जपानची त्यांच्या देशातील मालमत्ता गोठवली, जप्त केली. या कारवाईने जपानला पुरेशी ताकीद मिळेल व जपान विचार करून प्रत्युत्तर देईल व चर्चेला प्रारंभ होईल असा या देशांचा होरा होता पण जपानचे सरकार हे प्रखर राष्ट्रवादी असलेल्या सेनादलाच्या कह्य्यात होते व विलक्षण दुराभिमानी असलेल्या या देशाला जागतिक वस्तूस्थितीची जाणीव नव्हती. त्यांनी या इशार्‍याकडे हेतूपुर:सर दुर्लक्ष केले. ही मालमत्ता गोठवल्यावर काहीच दिवसांनी अमेरिकेच्या सरकारने जपानला तेल निर्यात करायला बंदी घातली. जपान त्या काळात अमेरिकेतून त्यांच्या एकूण गरजेच्या पंचाहत्तर टक्के तेल आयात करत असल्यामुळे जपानला याचा फटका बसलाच. आपली वर्तणूक सुधारण्याऐवजी जपानने त्याच्या तेलासाठी इतरत्र म्हणजे आग्नेय देशांकडे, विशेषत: बर्मा आणि डच ईस्ट इंडीज म्हणजे आत्ताचे इंडोनेशीया यांच्याकडे मागणी नोंदवायला सुरवात केली.. हे तेल जपान त्याच्या विस्तारवादी धोरणासाठीच वापरणार हे निश्चित असल्यामुळे जपानला तेलाचा पुरवठा करायची अमेरिकेची ना नैतिक जबाबदारी होती ना कायदेशीर. जपानला मात्र या तेलबंदीमुळे अमेरिकेवर हल्ला करणे अत्यंत आवश्यक वाटत होते. (निर्यातीवर निर्बंध घातल्यावर काय होऊ शकते हे यावरून कळते. वीस पंचवीस ट्रिलियन डॉलरच्या नुकसानभरपाईचे खटले चालू झाल्यावर किंवा त्यांचा निकाल लागल्यावर चीनवर जपानवर घातले होते तसे निर्बंध लादले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.)

यानंतर मात्र अमेरिकेने प्रलोभन-दंडनीतीचे धोरण अवलंबले. एकीकडे अमेरिकेचा मुख्य सचीव कॉर्डेल हल याने त्याच्या कार्यालयात जपानच्या राजदूताबरोबर जवळजवळ शंभर तास चर्चा केली तर दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्टने सतरा ऑगस्टला एका भाषणात जपानची जाहीरपणे कानउघडणी केली की जपानने जर एशियामधे ढवळाढवळ करायचे थांबवले नाही तर अमेरिकेला त्या विभागातील त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी प्रत्यक्ष कारवाई करावी लागेल. ही पोकळ धमकी नाही हे दर्शवण्यासाठी अमेरिकेने त्यांचे पॅसीफिक फ्लीट कॅलिफोर्नियातून पर्ल हार्बर येथे हलवले. चीनचे कोमिंगटान नॅशनॅलिस्ट जनरल चॅंग काय-शेकच्या नेतृत्वाखाली जपान विरुद्ध लढत होते त्यांचीही मदत वाढविण्यात आली आणि त्याच बरोबर पस्तीस B-17 बाँबर्स फिलिपाईन्सला हलविण्यात आली. आता तेथून ते जपानवर हल्ले चढवू शकत होते. फिलिपाईन्स अमेरिकेच्याच संरक्षणाखाली असल्यामुळे हे करण्यात त्यावेळी त्यांना काही अडचण आली नाही. (अमेरीकी व चीनी लष्कराच्या हालचाली अशाच झाल्या आहेत.)

दुर्दैवाने रुझवेल्टच्या सरकारी बाबूंना विशेषत: अर्थमंत्रलयाचे सचिव डीन एचेसन याला जपानच्या शोवा राजघराण्याचा स्वाभिमान यात डिवचला गेला असेल याची कल्पना आली नाही किंवा आली असली तरी ते एवढे महत्वाचे असेल असे त्याला वाटले नसेल. ( अमेरिकेतील बाबुंनाही चीन ही काय चीज आहे हे माहीत असेल ही शंकाच आहे. किंवा माहीत असले तरी अर्थिक फायद्यासाठी सगळे चालवून घेतले जात असेल. माहीत नाही) या राजघराण्याने अमेरिकेचे हे कृत्य युद्धाला चिथावणी आहे असे समजून पाऊले टाकायला सुरवात केली. गेली दहा वर्षे जपान चीनमधे युद्ध करत होता तरीही अमेरिकेतील धोरणे ठरविणार्‍यांना जपान हा एक धोकादायक देश आहे व त्याच्याकडे गांभिर्याने बघायला पाहिजे असे वाटत नव्हते. सगळ्यात हद्द झाली ती म्हणजे कित्येक अधिकार्‍यांचा व पुढार्‍यांचा असा समज होता की जपानी वैमानिकांच्या मिचमिच्या डोळ्यांमुळे ते इतक्या दूरवर त्यांची विमाने उडवू शकणार नाहीत. एका इतिहासकाराने लिहिले “अमेरिकेच्या नेतृत्वाने फालतू वंशभेदाच्या कल्पनांनी जपान पर्ल हार्बरवर तीन हजार चारशे मैल दूर हल्ला करूच शकणार नाहीत असा फाजील आत्मविश्वास बाळगला होता. अमेरिकन नौदलाचा निवृत्त सचिव जोसेफस डॅनियल्स याने म्हटले “जपानचे नौदल आता आपल्या पॅसीफिक तळांवर अचानक हल्ला करेल याची भीती कोणालाच राहिली नव्हती. रेडिओमुळे आता “आश्चर्य, धक्का” इत्यादी बंद झाले आहे.” हा फाजील आत्मविश्वास फक्त अमेरिकेलाच होता असे मानायची काही गरज नाही: १९४१च्या एप्रिलमधे ब्रिटनच्या हवाईदलाचा प्रमुख सर चार्ल्स पोर्टल याने परराष्ट्र खात्याच्या सचिवाला- एंथनी एडनला सांगितले की तो जपानच्या हवाईदलाला इटलीच्या हवाईदलापेक्षाही कमी दर्जाचे मानतो.

सतरा ऑक्टोबरला ले. जनरल हिडेकी टोजो (ज्याचे टोपणनाव रेझर होते) हा हवाईदल आणि नौदलाच्या पाठिंब्यावर टोकियोमधे सत्तेवर आला आणि तणाव दूर व्हायची शक्यता मावळू लागली. त्यानंतर तीनच आठवड्यात राजाच्या सैन्यदलाच्या मुख्यालयात पर्ल हार्बरवर हल्ल्याची योजना तयार झाली सुद्धा. त्याच बरोबर फिलिपाईन्स, मलाया, डच ईस्ट इंडीज, थायलॅंड, बर्मा व पश्चिम पॅसीफिक विभागातही आक्रमण करून ती बेटे काबीज करायच्या योजना तयार झाल्या. या विभागाला जपाननी सदर्न रिसोर्सेस एरिया असे नाव दिले होते पण प्रत्यक्षात त्याला ते ग्रेटर ईस्ट एशिया को-प्रॉस्पेरीटी स्फिअर असे संबोधत. म्हणजे हा जपानच्या सभोवताली पसरलेला प्रदेश जपानसाठी कच्चा माल पुरवणार होता पण त्या विभागातील देशांना ही त्यांच्या प्रगतीची संधी आहे असे भासविण्यात येणार होते. हे सगळे प्रदेश ताब्यात आल्यावर या योजनेचा दुसरा भाग या प्रदेशांचे अमेरिकेपासून व तिच्या दोस्त राष्ट्रांपासून संरक्षण कसे करायचे यासाठी खर्ची घातला होता. या योजनेचा तिसरा भाग होता शत्रूच्या दळणवळण व्यवस्थेवर निर्णायकी हल्ले करणे जेणेकरून तो जपानचे अतीपूर्वेतील अधिकार मान्य करेल. या मुख्यालयातील काही तज्ञांचे तर असेही म्हणणे होते की जपानने ऑस्ट्रेलिया व भारतावरही हल्ला करावा व जर्मनीशी मध्यपूर्वेत हातमिळवणी करावी. जपाननी सदर्न रिसोर्सेस एरिया ही कल्पना आणि हिटलरची लेबेनस्रॉमची कल्पना यात बरेच साम्य होते. या योजनांमधे ब्लिट्झक्रिग सारखे अचानक व जलद आक्रमण करून अमेरिकेचे पॅसीफिक नौदल निष्प्रभ करायचे, असे डावपेच होतेच. या सुचना धोकादायक होत्या व जवळ जवळ रद्दच होणार होत्या परंतू यावर चाललेल्या एका वादळी बैठकीत एड्मिरल यामामोटो याने पर्ल हार्बरवर जपानच्या इज्जतीसाठी जर हल्ला केला नाही तर राजिनामा देईन अशी धमकी दिल्यावर या योजनेला जीवदान मिळाले. जनरल टोजोने सत्ता ग्रहण केल्यावर या सगळ्याच योजनेला पूर्ण मान्यता मिळाली.

कुठलीही योजना परिपूर्ण नसते या उक्तीला धरून या योजनेतही काही तृटी होत्याच. पहिली म्हणजे ओआहू येथील हे बंदर अत्यंत उथळ होते. म्हणजे बोटी बुडाल्या तरी त्या रसतळास न जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. जर त्या रसतळास गेल्या नाहीत तर परत उपयोगात आणता येणार होत्या. गुप्तहेरांच्या बातमीनुसार पर्ल हार्बरवर कुठल्याही प्रकारच्या पुरवठा करणार्‍या व तेलाच्या नौका नव्हत्या म्हणजे जपानवर हल्ला करायचे अमेरिकेचे कुठलेही नियोजन नव्हते हे सिद्ध होत होते त्यामुळे स्वसंरक्षणासाठी हा हल्ला केला असेही जागतिक स्तरावर म्हणता येणार नव्हते आणि या प्रकारच्या खिंडीत गाठून केलेल्या हल्ल्याने अमेरिका चर्चेला तयार होईल असे वाटणे हाच एक मोठा भ्रम होता. या योजनेच्या तयारीत भाग घेतलेल्या एडमिरल ओनिशी ताकिजिरो याने त्यावेळी एका महत्वाच्या बाबीकडे सगळ्यांचे लक्ष वेधले होते “अमेरिकेचा राष्ट्राभिमान एवढा कडवा आहे की युद्ध घोषीत न करता जर हा हल्ला झाला तर त्या देशाबरोबर चर्चेची सगळी दारे कायमची बंद होतील”. अमेरिकेची मेन नावाची युद्धनौका १८९८ साली क्युबाच्या किनार्‍यावर बुडली/बुडविण्यात आली त्या नंतर काय झाले यावरून तरी जपानने धडा घेणे आवश्यक होते. पण जपानच्या सगळ्यात जास्त प्रतिष्ठा लाभलेल्या सेनानीच्या या युद्धकाळात दिलेल्या राजिनाम्याच्या धमकीपुढे नमून नॅव्हल स्टाफ आणि सरकारने अखेरीस यामामोटोची योजना स्विकारली. …

चीन बद्दल फाजील विश्र्वास बाळगणाऱ्यांना काय किंमत चुकवावी लागणार आहे हे काळच ठरवेल

हे असे होईल का माहीत नाही. पण होऊ नये अशी मनोमन इच्छा आहे. अर्थात सामान्य माणसांच्या इच्छेला या जगात विचारतो कोण? ही सगळी माहीती दिली आहे. यावरून निष्कर्ष काय काढायचे आहेत ते ज्याचे त्याने काढावेत. काही वेळ reading between the lines ही करावे लागणार आहे… तेवढे कष्ट तुम्ही घ्याल याची खात्री आहे… तीन तारखे पर्यंत चीनच्या कृपेने वेळ आहेच 🙂

– जयंत कुलकर्णी.

Posted in लेख | Leave a comment

सिनेमा….

…..परवा एक मित्र सिनेमाला गेला होता. सिनेमा झाल्यावर त्याने माझ्या घरी चक्कर मारली. रविवार होता आणि सिनेमाचे तिकीट फारच जास्त होते अशी त्याची तक्रार होती. मी विचारले किती होते तिकीट? “चारशे” त्याने उत्तर दिले. मला तिकीट महाग झाले आहे याची कल्पना होती पण ती त्याच्या पगाराच्या १% असेल याची मात्र मला मुळीच कल्पना नव्हती. हे त्याच्या लक्षात आणून दिल्यावर मात्र त्याने हळहळ व्यक्त केली पण तो परत तेथेच सिनेमाला जाणार आहे याची मला खात्री आहे. दुसरा पर्याय त्याच्याकडे नाही. तो गेल्यावर मी अंथरुणावर पडलो आणि डोळे मिटले आणि मला माझ्या लहानपणीचा सिनेमा आठवला….

आमच्या गावात दोन प्रसंग रोज साजरे व्हायचे. पहिली म्हणजे रोज संध्याकाळी अंधार जेव्हा अरुंद रस्त्यांवर सावल्या लांब व्हायच्या तेव्हा रस्त्यावरील खांबावरील कंदील पेटविण्यात सरकारी माणूस यायचा. हा एक आणि दुसरा त्यानंतर लगेचच एक बैलगाडी सिनेमाची जाहिरात करण्यास येत असे तो. पहिल्या प्रसंगात गल्लीतील सगळी लहान मुले हजेरी लावायची आणि तेथे एकच दंगा उडायचा. तो माणूस सायकलवर यायचा, सायकल त्याच्या स्टँडवर मागे खेचून लावायचा. त्याच्या हँडलच्या खाली असलेला एक पितळ्याचा बिल्ला मला अजून आठवतोय. तो त्या सायकलचा कर भरल्याचा बिल्ला असायचा. मग तो शांतपणे सायकलला लावलेली शिडी खाली घ्यायचा. ही शिडी बांबूची असायची आणि त्याला किती पायर्‍या होत्या ते मला अजून आठवतंय. असो. ती शिडी तो मग शांतपणे फरफटत त्या दिव्याच्या खांबाशी फरफट न्यायचा आणि त्याला लावायचा. मग मात्र तेथे एकदम शांतता पसरायची. खिशातून आगकाडीची पेटी काढून तो त्यातील एक काडी पेटवायचा. एका हाताने कंदिलाची काच वरती करून तो ती वात पेटवायचा. इतका वेळ आम्ही सगळे श्वास रोखून त्याचे ते काम पहात असू. जणू काही कसला आवाज झाला तर ती पेटती काडी विझेल किंवा ती शिडी घसरेल.. तो ज्या एकाग्रतेने तो कंदील पेटवायचा त्याच एकाग्रतेने आम्ही तो सोहळा पहात असू. त्याने कंदिलाची काच खाली केली की मग मात्र तेथे एकच गोंधळ उडे. सामना जिंकण्यास एक धाव हवी आहे अशी त्यावेळेस परिस्थिती असायची. हे असे का? हे माहीत नाही.. बरं हा प्रकार रोजच व्हायचा तरी पण ती शांतता पसरणे आणि मग एकच गोंधळ होणे हे रोजच व्हायचे. मग कोणाच्या तरी घरून चहा येई (बहुतेक वेळा आमच्याच घरून) असाच प्रकार आठवड्यातून तो एकदा कंदिलाची वात कापायला किंवा काचेवरची काजळी रांगोळीने साफ करण्यासाठी यायचा तेव्हा व्हायचा…

हा कंदील रात्री कोण विझवत असे हे मात्र लहानपणी मला कधीच कळले नाही… आजी म्हणायची झाडावरच्या मुंजाला त्या प्रकाशाने झोप आली नाही की तो त्यावर फुंकर घालतो…त्या काळात रात्री वारा सुटला की मला मुंजाच फुंकर घालतो याची खात्री वाटे. तो मंद उजेड फेकणारा कंदील, त्याचा मिणमिणता प्रकाश, फडफडणारी वात आणि मुंजाची फुंकर हे कधीतरी मला पाहायला आवडेल हे मात्र खरे… पण आता ते शक्यच नाही म्हणा..

त्यानंतर सिनेमाच्या जाहिरातीची गाडी येत असे. या बैल गाडीला एकच बैल असे. गाडाच म्हणाना ! बैलाच्या अंगावर एक मळलेली झूल असे आणि त्याची शिंगे रंगवलेली असत. गळ्यात सतत वाजणार्‍या घंटा असत. मला शंका आहे की त्या बैलाला थोडा वेळ झाला की मान हलविण्यास शिकवले असावे. नाहीतर ठरावीक वेळाने त्या घंटा कशा वाजल्या असत्या.? (गाडी उभी असेल तेव्हा…) त्या गाडीला बांबूच्या तट्ट्यांनी शाकारलेले असायचे आणि त्याच्या दोन्ही बाजूला सिनेमाचे अत्यंत टुकार (हल्लीच्या तुलनेत) पोस्टर चिकटवलेले असायचे. चालू असलेल्या सिनेमाचेच पोस्टर लावायचे बंधन त्या गाडीवाल्यावर नव्हते आणि तंबूच्या मालकावरही नव्हते. कुठलेतरी पोस्टर लावले की झाले.. कारण आज कुठला सिनेमा आहे याची घोषणा स्वत: गाडीवान करायचा. आमच्या चौकात आला की तो गाडी उभा करायचा आणि एक पत्र्याचा भोंगा काढायचा. त्यातून बारशाला जसं बाळाच्या कानात कुर्र ऽऽ कुर्र ऽऽ असा आवाज करतात तसा आवाज तो त्या भोंग्यातून काढायचा. मुलांची झुंड तेथेच असायची. त्या गोंधळात ज्यांना ऐकू जायला पाहिजे त्यांना त्याची घोषणा ऐकू जावी म्हणून तो मुलांना गप्प करण्यासाठी प्रयत्न करायचा. अर्थात तो असफल झाल्यावर मग तो गोळ्यांचे अस्त्र बाहेर काढायचा मग मात्र जाहिरात पुढे जायची, “कुर्र ऽऽऽऽ कुर्र.ऽऽऽ… ऐका हो ऐकाऽऽऽ आज रात्री ऽऽऽ xxxx टॉकीजच्या रुपेरी पडद्यावर ऽऽ पहा खास लोकाग्रह परत समुंदरी डाकू…. लोकाग्रहास्तव हा शब्द त्याला म्हणता यायचा नाही मग तो त्याचा उच्चार लोकास्तव किंवा काहीही करायचा… मग त्यात काम करणार्‍या नट नट्यांची नावे जाहीर केली जायची. पहिली दोन नेहमीच प्रसिद्ध नट नट्यांची असायची… मी हा सिनेमा त्या तंबूत पाहिला. मला गोष्ट विशेष आठवत नाही. पण एक समुद्री चाचा आणि एक सुंदरी अशी काहीतरी गोष्ट होती… ( परवा गुगलवर शोध घेताना कळाले की त्यात नासीर खानने काम केले होते आणि त्यातील एक गाणे खाली टाकले आहे. नटी बहुधा फियरलेस नादिया/नादिरा असावी.) नवीन सिनेमा असेल तर घड्या घातलेली गाण्याची पुस्तके विकली जायची आणि जाहिराती वाटल्या जायच्या.

सिनेमाच्या तंबूतील वातावरणावर नंतर केव्हातरी लिहेन पण त्या काळात एकच प्रोजेक्टर वापरला जायचा आणि रीळ संपल्यावर ते रीळ गुंडाळून दुसरीकडे पाठवावे लागे. मग दुसरे रीळ लावल्यावर मग परत सिनेमा परत सुरू. पण, मधे हा जो वेळ असे त्यासाठी पडद्यावर कायम एक चित्र दिसत असे. गाईला चारा घालणार्‍या बाईचे ते चित्र मला अजूनही आठवतेय. जर हे रीळ न गुंडाळता तसेच पुढे पाठवले तर भयंकर मारामारी होण्याची भीती असे…. पडद्यावर केव्हाही प्रेक्षक दिसत असत. (सावल्या) पण त्याने काही भिघडायचे नाही म्हणा…

एकदा असंच सिनेमाला गेलो असताना (स्वतःच्या सतरंज्या घेऊन जाव्या लागत. सिनेमा बघण्याचे तसे कष्टाचे काम होते. खाण्याचा डबाही बरोबर घ्यावा लागे) तंबूचा मालक समोर आला. आम्ही सगळी शहरातील मंडळी आलेली पाहून तो त्याच्या डोअरकिपरकडे पाहून ओरडला, “अरे…. सावकार मंडळी आली आहेत. आत जा, जागा साफ कर, (म्हणजे बिड्यांची थोटके उचल) आणि धर्मेंद्रला म्हणावं आज जरा चांगलं काम कर !” तो हे इतके आत्मविश्वासाने म्हणत असे की आम्हाला ते खरंच वाटे….

आणि हो ! तिकीट होते फक्त १ आणा दोघांसाठी ! आम्हाला बहुतेक वेळा फुकटच !

– जयंत कुलकर्णी.

Posted in लेख | Leave a comment

प्राकृत…

प्राकृत…

कोसाकोसावर बदलणारी बोली भाषा सोडल्यास या जगाच्या पाठीवर अंदाजे दोन हजार भाषा बोलल्या जातात, असा अंदाज आहे. यातील बहुतेक भाषांचा अभ्यास झालेला आहे किंवा सुरू आहे. पण आफ्रिकेतील काही दुर्गम विभाग व ॲमेझॉनमधील काही घनदाट जंगलातील भाग जेथे अजूनही पुढारलेल्या (?) जगातील माणसे पोहोचली नाहीत, तेथील भाषांचा उगम कसा झाला किंवा भाषा ही संवादाचे साधन म्हणून कशी विकसित झाली, याचा अभ्यास अजूनही सुरू आहे. उदा. डॅनियल एव्हरेट याने एका जमातीच्या भाषेचा अभ्यास केला. त्याचे ‘डोन्ट स्लीप देअर आर स्नेक्स’ हे पुस्तक वाचण्याजोगे आहे. असो. ज्या भाषा माहीत आहेत, त्यांचे वर्गीकरण चार खंडांमध्ये करता येते. एक – आफ्रिका खंडात बोलल्या जाणाऱ्या भाषा, दोन – युरेशिया खंडात बोलल्या जाणाऱ्या भाषा, तीन – प्रशांत महासागर खंडात बोलल्या जाणाऱ्या व चार – अमेरिकन खंडात बोलल्या जाणाऱ्या भाषा. युरेशिया खंडात बोलल्या जाणाऱ्या भाषांत सेमेटिक, कॉकेशस, युरल- अल्टाईक, एकाक्षरी, द्रविड इ.इ. व इंडोयुरोपीय भाषा येतात. इंडोयुरोपीय भाषां या उत्तर भारत, अफगाणिस्थान, इराण व युरोपमध्ये बोलल्या जातात. या भाषा केंटुम व शतम या दोन प्रकारांत विभागल्या गेल्या आहेत. केंटुम हा लॅटिन शब्द आहे व त्याचा अर्थ शत (१००) असाच होतो. शतममध्ये इलिरियन, बाल्टिक, स्लोव्हानिक, अर्मेनियन व इतर आर्य भाषांचा समावेश करण्यात येतो. अर्थात आता आर्य/अनार्य हा फरक निकालात निघण्याची वेळ आलेली असल्यामुळे आता या भाषांना काय म्हणावे हा एक प्रश्नच आहे. आर्य भाषांमध्ये प्रामुख्याने इराणी, दरद व इतर भारतीय भाषा येतात. असे म्हणतात की अवेस्ताची भाषा ही वेदांच्या भाषेशी बरीच मिळतीजुळती आहे. दरद भाषा पामीर व उत्तर पंजाबमध्ये येणाऱ्या प्रदेशात बोलली जात असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो. बऱ्याच संस्कृत साहित्यात काश्मीरच्या आसपासच्या प्रदेशाला दरद या नावाने ओळखले जाई, ही खरी गोष्ट.

जर काळात विभागणी केली, तर भारतीय भाषांची वर्गवारी पुढीलप्रमाणे करता येईल : इ.स. ५००पर्यंत बोलल्या जाणाऱ्या भाषा, नंतर ५०० ते ११०० या काळात बोलल्या जाणाऱ्या भाषा. हेच प्राकृत भाषांचे युग असे समजले जाते. आता या प्राकृतात त्या काळात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषा, पाली भाषासहित गणल्या जातात. ११००नंतरचा काळ ते आत्तापर्यंत हा आधुनिक भारतीय भाषांचा काळ समजला पाहिजे. यात अपभ्रंश व त्याचे काही पोटविभाग मोडू शकतात.

या मध्ययुगीन भारतीय भाषांचे तीन भाग पाडले जातात. १) पाली, शिलालेखांमधे वापरली जाणारी प्राकृत, २) जैन आगमांमध्ये वापरली गेलेली अर्धमागधी व ३) ज्यात अश्वघोषाने प्राचीन नाटके लिहिली ती प्राचीन प्राकृत. दुसऱ्या भागात आपल्याला एका लेखात परिचय करून दिलेली गाथासप्तशती, गुणाढ्यची बृहत्कथा लिहिलेली आहे. याच काळात मला वाटते प्राकृतात व्याकरणाचा प्रवेश झाला. तिसऱ्या भागात अपभ्रंश नावाची भाषा येते, जी अपभ्रंशावरून तयार झाली असावी. असे म्हणतात की अपभ्रंशाची वाढ ही वैय्याकरणांच्या प्राकृतच्या क्लिष्ट नियमांमुळे झाली. शक्य आहे, कारण प्राकृतच्या वाढीत संस्कृतमधील जटिल व्याकरणाचा महत्त्वाचा सहभाग आहे. हेमचंद्राने बाराव्या शतकात प्राकृत व्याकरणाच्या ग्रंथात जी अपभ्रंशची उदाहरणे दिली आहेत, त्यावरून अपभ्रंश ही त्या काळात बरीच प्रगल्भ झाली होती असे अनुमान काढता येते. पुढे जे संस्कृतचे झाले, तेच अपभ्रंशचे झाले. जशी वैय्याकरण्यांनी व्याकरणाचे नियम आणखी अवघड केले, तशी हीसुद्धा भाषा मागे पडली व त्याची अनेक सुटसुटीत रूपे जन्माला आली. त्याच आत्ताच्या मराठी, गुजराथी, बंगाली, सिंधी पंजाबी या भाषा.

आता एक अत्यंत वादाचा मुद्दा. काही विद्वानांचे असे म्हणणे आहे की प्राकृत हे संस्कृतचेच भ्रष्ट रूप आहे. पण आता हे ग्राह्य धरले जात नाही. मलाही तेवढे पटत नाही. अर्थात तेवढा आधिकार नसल्यामुळे मी ठामपणे वाद घालू शकत नाही, पण जर भाषांना सुधारण्यासाठी वैय्याकरण्यांनी व्याकरणांचे नियम अधिकाधिक केले व त्यात चुका होणार नाहीत अशी तजवीज केली हे जर मानले, तर सुधारणा कुठल्या भाषेत झाल्या हे पाहावे लागेल. अर्थातच हे व्याकरणाचे नियम प्राकृतला लावले जाऊन त्यातून संस्कृत तयार झाली असावी. वैदिक काळात बोली भाषा कुठली होती हे समजण्यास आता मार्ग नाही, पण बहुधा संस्कृत ग्रंथ सोडल्यास प्राकृतच बोलली जात असावी.

प्राकृत भाषेत निर्माण झालेल्या साहित्याचा परामर्श आता घ्यायला हरकत नाही. प्राकृतात दोन धर्मांचे साहित्य निर्माण झाले. बौद्ध साहित्य व जैन साहित्य. जरी त्यांचे तत्त्वज्ञान वेगळे असले, तरी ही दोन्ही साहित्य साधारणत: एकाच काळी निर्माण झाली. अर्थात त्यांचे विकसित होण्याचे मार्गही वेगळे होते. पाली साहित्य बुद्धाच्या निर्वाणानंतर साधारणत: दोनशे-एक वर्षांत लिहिले गेले. त्यात मुख्यत: बुद्धाचे उपदेश होते. हे ग्रंथ राजगृह, वैशली व पाटलीपुत्र या राज्यांत रचले गेले. हे ग्रंथ रचले गेले तो काळ कुठला होता हा कदचित वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण एक गोष्ट निश्चित आहे की सर्व बौद्ध मठातून बुद्धाचा उपदेश ऐकण्यासाठी भारतातीलच काय, परदेशी भिख्खू उपस्थित असणार. त्यांच्या भाषाही वेगवेगळ्या असणार. उदा. अवंती, कोशांबी, कनोज, साकाश्य, मथुरा या प्रांतातील मठवासीयांच्या बोलीभाषा वेगवेगळ्या असणार, तर दक्षिण भागातील भाषाही वेगेवेगळ्या असणार. मठांमधे जे नियम पाळावे लागत, त्या संदर्भातील ग्रंथाचे नाव होते ‘विनय’. विनय रचताना व या नियमांचा अभ्यास करताना त्यांच्यात भाषेची सरमिसळ झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही सरमिसळ अनेक शतके चालली होती हे लक्षात घ्यायला हवे. हे मूळ उपदेश होते कौशलच्या राजभाषेत व मगधाहून आलेल्या भिख्खूंच्या भाषेत. जे भिख्खू पश्चिम प्रदेशातून आले होते, त्यांच्या भाषेचा प्रभाव या कामावर पडणे शहज शक्य होते. हे साहित्य अशोकाच्या काळातच काही प्रमाणात लिपिबद्ध झाले होते. पण बहुतांश बौद्ध साहित्याची निर्मिती झाली सिंहलद्वीपमध्ये. हे काम पार पाडले होते ज्याने धर्मप्रसाराचे काम हाती घेतले होते तो राजपुत्र महेंद्र, अशोकाचा मुलगा. प्राचीन इतिहासातील या छोट्याछोट्या गोष्टी लक्षात घेतल्या, तर पालीवर कुठल्या एका भूभागाचा अधिकार कसा काय मान्य केला जाईल? बौद्ध धर्मग्रंथ लिहिले गेले त्यात जी भाषा वापरली गेली, त्यावर इतर अनेक बोली भाषांचा प्रभाव पडला असणार हे कोणीही मान्य करेल. त्याचे प्रमाण किती हे आता कोणी सांगू शकत नाही. प्राकृत भाषेतील दुसरे महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे जैन आगम साहित्य. भगवान महावीरांचा जन्मही पूर्वेकडेच झाला व अर्थातच त्यांचा उपदेश हाही पूर्वेतील भाषांमधे झाला असला पाहिजे. त्यांचा जन्म झाला वैशालीमध्ये, पण त्यांचे कार्यक्षेत्र होते मगध. जैन परंपरेनुसार भगवान महावीरांनी त्यांच्या पट्टशिष्यांना त्यांचा उपदेश सांगितला. त्यातील एक होता गणधर. याने या उपदेशांचे संकलन केले असे म्हणतात. हा उपदेश मगधातील प्रचलित भाषेत होता. बुद्धसुद्धा मगध देशात भ्रमण करीत होताच. त्याचा जन्म कोसलामध्ये झाला असे म्हणतात. त्याचे जे काही झाले, ते शिक्षणही तेथेच झाले. महावीर उत्तर मगधातील होत. त्यामुळे या दोन साहित्यांतील भाषेत का फरक आहे, हे लक्षात घेण्यास मदत होईल. महावीरांच्या निर्वाणानंतर जवळजवळ १५० वर्षांनी मगध-पाटलीपुत्रात भयानक दुष्काळ पडला व अनेक संतांना प्राण वाचविण्यासाठी देश सोडून जाणे भाग पडले. बरेच श्रमण मृत्युमुखी पडले. अशा नैसर्गिक आपत्तीत स्मृतिसंचित ग्रंथ नष्ट होतील या भीतीने त्यांना लिपीबद्ध करण्यात आले. त्यासाठी पाटलीपुत्रात जैन संतांची व श्रमणांची परिषद बोलाविण्यात आली व त्यात आगम साहित्याची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला व पार पाडण्यात आला. हा काळ होता साधारणत: इ.स.पूर्व चौथ्या शतकात. यानंतर जवळजवळ आठशे वर्षे आगम साहित्यामध्ये कसलाही बदल केला गेला नाही. दुसरी परिषद झाली मथुरेमध्ये चौथ्या शतकात. त्यानंतर तिसरी झाली दोनशे वर्षांनंतर. या परिषदेचे प्रमुख होते संत देवर्धिगणी. सहाव्या शतकात एक शेवटची परिषद झाली, त्यात सगळ्या उपलब्ध प्रतींचा मेळ घालून एक प्रत केली गेली. अर्थात यात सगळ्या प्रतींच्या भाषेचा प्रभाव पडला असणार. या आगम साहित्यात भगवान महावीरांचा उपदेश आहे व त्याची भाषा अर्धमागधी आहे असे मानले जाते. हे असे मानण्याचे मुख्य कारण आहे की खुद्द या प्रतीत तसे नमूद केले आहे. अर्धमागधीमध्ये जेव्हा हा उपदेश केला गेला व जेव्हा अर्धमागधी भाषेतया शेवटच्या आवृत्त्या निर्माण केल्या गेल्या, त्यामध्ये १००० वर्षे उलटून गेली होती. या उलट बौद्ध साहित्य बुद्धाच्या निर्वाणानंतर साधारणत: ५०० वर्षांतच निर्माण झाले. त्यामुळे आगमांची भाषा ही पिटकांच्या भाषेपेक्षा नवीन असू शकेल. बरेच आगम साहित्य काळाच्या ओघात नष्ट पावले. जे काही उरले, त्यात फारशी सरमिसळ नाही. पालीइतकी तर मुळीच नाही. कारण बौद्ध धर्म जगभर पसरण्याचा तो काळ होता. बुद्ध विहारात अनेक प्रांतातील श्रमण ये-जा करीत असत हेही एक प्रमुख कारण होतेच. या झाल्या पाली व अर्धमागधी बोली भाषा.

ज्या अर्धमागधीबद्दल आपण बोलतोय, त्यात पूर्वेच्या भाषेचा प्रभाव आपल्याला जाणवतो; तर पाली भाषा प्राचीन आहे, पण त्यामध्ये मध्य प्रदेशातील भाषांचा प्रभाव जास्त जाणवतो. त्यामुळे या दोन्ही भाषांचा अभ्यास करणे कठीण होते. यामधे आपल्याला मदत करतात शिलालेखांतील भाषा. आपल्याला माहीतच आहे की हे शिलालेख अंदाजे इ.स.पू. २७० ते २५० या काळात खोदले गेले आहेत. या खोदलेल्या शिलालेखाच्या भाषांचा अभ्यास म्हणजेच बहुधा भारतातील प्राचीन भाषांचा पहिलावाहिला अभ्यास असावा. धम्माचा प्रसार व राज्याधिकाऱ्यांना त्याचा राज्यशकट हाकण्याचा दृष्टीकोन समजावा म्हणून सम्राट अशोकाने हे लेख खोदवून घेतले. त्यामुळे त्याची शैली एकच आहे, पण स्थानानुसार त्याची भाषा बदलत जाते. उदा. शाहबाजगढी मंसेरा येथे लिहिलेले लेख व गिरनार येथील लेख हे भाषिक दृष्टीकोनातून खूपच भिन्न आहेत. अर्थात हा फरक समजणे अवघड आहे. या शिलालेखांची भाषा ही राजभाषा किंवा अशोकाच्या दरबारातील भाषा असणार. राजभाषेमध्ये बोलीभाषेइतका फरक पडत नाही, कारण त्यात फारच कमी लोक बोलतात/लिहितात. भाषेच्या दृष्टीकोनातून अशोकाच्या शिलालेखांचेही चार भाग पाडता येतात. उत्तर-पश्चिमचे लेख, गिरनारचा लेख, गंगाजमुना ते महानदी या पट्ट्यातील लेख व दक्षिणेतील लेख. यातील दक्षिणेतील लेखांवर इतर भाषांचा काही प्रभाव पडला नाही, कारण ती भाषा सर्वस्वी वेगळी होती. गिरनार येथील लेखांवर गुजरातच्या बोली भाषांचा प्रभाव पडला. गोश्रुग गुहेत जे खरोष्टी लिपीतील धम्मपदे सापडली, त्याला धम्मपद प्राकृत याच नावाने ओळखले गेले. स्टाईनला मध्य आशियात खोतान येथे जी कागदपत्रे सापडली, ती चडोत-खरोष्टीमध्ये लिहिण्यात आली होती. ही भाषा पेशावर येथे बोलल्या जाणाऱ्या भाषेशी जवळीक दाखविते. गिरनार येथील लेखातील भाषा ही पालीशी साम्य दाखविते, कारण यावर मध्य भारतातील भाषांचा प्रभाव पडलेला दिसतो. प्राचीन नाटकांमधे तीन भाषा आढळतात. संस्कृत, शौरसेनी व मागधी. यातील प्रतिष्ठित संस्कृतमध्ये बोलताना दाखविले जात, सुशिक्षित स्त्रिया व अशिक्षित पुरुष शौरसेनीमध्ये व अशिक्षित – ज्यांची टर उडविली जाई, ते मागधीमध्ये व्यवहार करताना दाखविले जात. यातील शेवटच्या दोन्ही प्राकृतच आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. अश्वघोषाने नाटके लिहिली, त्याचा काळ होता अंदाजे दुसरे शतक. या नाटकांची भाषा नंतरच्या नाटकांपेक्षा बरीच भिन्न आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यात शौरसेनी, मागधी व अर्धमागधी यांचा उपयोग केलेला आढळतो. त्यानंतर भासाच्या नाटकात प्राचीन प्राकृताचे दर्शन घडते, तर मृच्छकटिकमध्ये सर्व प्राकृतांचे दर्शन घडते. भारताच्या बाहेर – विशेषत: अफगाणिस्तानच्या सीमेवर – जी प्राकृत बोलली जायची, तिला नियप्राकृत असे नाव होते. प्राकृतातही रूढीप्रियता होतीच व तिची पावलेही व्याकरणाच्या दृष्टीने संस्कृतच्या पावलावर पडत होती. खरे म्हणजे जेथे संस्कृतचा प्रभाव नव्हता, त्या भागात प्राकृत उमलली. थोडक्यात, आपण प्राकृताचे पुढील प्रकार पाहिले – १) शौरसेनी, २) मागधी, ३) अर्धमागधी व ४) अपभ्रंश.. आणखी सगळ्यात महत्त्वाची प्राकृत आपल्याला पाहायची आहे, ती म्हणजे महाराष्ट्री प्राकृत. महाराष्ट्री प्राकृत ही सगळ्यात श्रेष्ठ समजली जाई. दंडींनी एके ठिकाणी व्याकरणाचे काही नियम सांगताना म्हटले आहे, ‘इतर नियम हे महाराष्ट्रीप्रमाणे समजावेत.’ महाराष्ट्री ही काही फक्त कवींची भाषा होती असे समजण्याचे कारण नाही. गोदावरीच्या खोऱ्यात बोलली जाणारी सर्वात प्राचीन अशी भाषा आहे ती. त्याचेच आत्ताचे स्वरूप म्हणजे आपली मराठी.

बुद्ध आणि महावीर यांच्या काळात प्राकृत भाषेला राजमान्यता व जनमान्यता मिळाल्यावर चहूबाजूंनी तिची प्रगती होऊ लागली. आपण पाहिलेच आहे की अश्वघोषाच्या काळात तर त्यात साहित्य निर्मितीही होऊ लागली होती. अर्थात प्राकृताच्या या अनेक रूपांतून एका प्राकृताचे आगमन झाले. प्रथम शौरसेनी व नंतर महाराष्ट्री. काही तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की त्याचा महाराष्ट्राचा काही संबंध नाही. पण ते खोटे, प्रांतीय हेवेदाव्यातून प्रतिपादन केले गेले असे माझे म्हणणे आहे. त्यांचे म्हणणे की फक्त काही व्यंजनांचा लोप होत असल्यामुळे ती भाषा वेगळी झाली. पण ती व्यंजने येथेच का लोप पावली याचे उत्तर ते देत नाहीत. याचे कारण येथे ती भाषा बोलणारे लोक असावेत. शेवटी भाषा अशीच तर निर्माण होत असते. असो.

शौरसेनीची लक्षणे सांगताना वररुचीने प्राकृत प्रकाशमध्ये काय लिहिले आहे, ते आपण वर एके ठिकाणी पाहिलेच आहे. त्यात त्याने ‘उरलेले महाराष्ट्रीप्रमाणे’ असा उल्लेख केला आहे. म्हणून काही लोकांचे म्हणणे आहे की महाराष्ट्रीच प्राकृतचे मुख्य स्वरूप आहे. पण शौरसेनी ही त्यानंतर जन्माला आली. आचार्य दंडींनी त्यांच्या काव्यदर्शनमध्ये म्हटले आहे, ‘महाराष्ट्राश्रयां भाषा प्रकृष्टं प्राकृतं विदु: ’. म्हणजे महाराष्ट्रात बोलली जाणारी महाराष्ट्रीच उत्कृष्ट प्राकृत आहे. पण याची पुढची ओळ आहे, ‘सागर: सूक्तिरत्नानां सेतुनन्धादि यन्मयम.’ म्हणजे ज्यात सेतुबन्धसारखे ग्रंथ रचले गेले आहेत, म्हणून ती श्रेष्ठ. अर्थात भाषा श्रेष्ठ इ.इ.वर माझा स्वत:चा विश्वास नाही. भाषा केवळ अचुक व्याकरणामुळे श्रेष्ठत्वाला पोहोचत नाही. मला वाटते त्यात होणाऱ्या संभाषणामुळे, साहित्य-काव्यामुळे ती त्या पदास पोहोचू शकते. म्हणूनच पुरुषोत्तमने आपल्या प्राकृतानुशासनमध्ये महाराष्ट्री आणि शौरसेनी एक कशी झाली आहे याबद्दल प्रतिप्रादन केले आहे. उद्योतनसुरीने पाययभाषा व मरहट्टय भाषा या दोन्ही वेगवेगळ्या आहेत असे प्रतिपादन केले आहे. महाराष्ट्रीमध्ये जे दोन महत्त्वाचे ग्रंथ रचले गेले – १) गाहाकोस म्हणजे गाथासप्तशती व २) गौडवहो म्हणजे गौडवध, त्यामुळे महाराष्ट्री व इतर प्राकृत यांच्यात संबंध दाखविण्याची गडबड सुरू झाली असावी, असे माझे मत आहे. सेतुबंधमध्ये ज्या भाषेत तो ग्रंथ रचला गेला, त्याबद्दल कसलाही उल्लेख नाही; परंतु तो महाराष्ट्रीमध्ये रचला गेला आहे असे आचार्य दंडींनी म्हटले आहे आणि त्यावर विश्र्वास ठेवण्यास हरकत नसावी.

वर आपण त्या काळातील परिस्थितीचा एक धावता आढावा घेतला. आता प्राकृत भाषेचे प्रकार पाहू. हे पुनरुक्तीचा धोका पत्करून लिहिले आहे. हा भाग डॉ. जगदीशचंद्र जैन यांच्या लेखनाचा जवळजवळ अनुवादच आहे. माझी काही मते त्यात आढळतील.

पाली व सम्राट अशोकाच्या धर्मलिप्या.

बुद्धघोषाने बौद्ध त्रिपिटक किंवा बुद्धवचनांच्या संदर्भात पाली या शब्दाचा वापर केला आहे. यालाच मागधी असेही म्हटले जाते. या भाषेचा प्रसार दक्षिणेतही झाला, कारण अशोकाच्या लेखात वापरली गेलेली भाषा आणि पाली यात बरीच समानता आढळते.
हे शिलालेख भारताबाहेरही आढळतात, जे खरोष्टीत कोरलेले आढळतात, हे आपण वर पाहिलेच आहे. पण याची भाषा प्राकृतच आहे.
भारतेतर प्राकृत अर्थात इतर ठिकाणी आढळणारी प्राकृत.

यात खरोष्टी लिपीत लिहिलेले प्राकृत धम्मपदतील १२ परिच्छेद आहेत, ज्यात बुद्धाचा उपदेश लिहिला आहे, खरोष्टीमध्ये लिहिलेले हे लेख चिनी तुर्कस्तानमध्ये सापडतात. या प्राकृताला नियाप्राकृत या नावाने ओळखले जाते.

अर्धमागधी

ज्याप्रमाणे बौद्ध त्रिपटकात वापरल्या गेलेल्या भाषेला पाली असे संबोधले गेले, तसेच जैन आगम साहित्यात वापरल्या गेलेल्या भाषेला अर्धमागधी असे संबोधले गेले. याला आर्ष भाषा म्हणजे ऋषींची भाषा असेही म्हणतात. ही भाषा खास जैनांच्या आगम साहित्यात आहे. याचे बहुतेक नियम वेगळे आहे. त्यामुळे बहुतेक संस्कृत नाटकात याचा वापर केला गेलेला दिसत नाही.

भरताने ‘नाट्यशास्त्र’ या त्याच्या प्रसिद्ध ग्रंथात ज्या सात भाषांचा उल्लेख केला आहे, त्यात अर्धमागधीचा उल्लेख केला आहे. उदा. मागधी, आवंती, प्राच्या, शौरसेनी, वान्हिका व दाक्षिणात्या या त्या उरलेल्या सहा भाषा. निशीथचूर्णीकाराने तर मगधातील अठरा भाषांना अर्धमागधी म्हणून संबोधले आहे. या भाषेत मागधी व प्राकृत या दोन्हींचा प्रभाव आढळल्यामुळे अभयदेव या भाषेला अर्धमागधी असे संबोधतो.

शौरसेनी

मथुरेच्या आसपासच्या प्रदेशात बोलली जाणारी ही भाषा. दिगंबर जैन संप्रदायाचे अनेक ग्रंथ या भाषेत आढळतात. काही तज्ज्ञ या भाषेला महाराष्ट्रीच्या आधीची मानतात, पण मी मानत नाही. कारण त्या काळात वरील सर्व भाषा भारताच्या वेगवेगळ्या भागात बोलल्या जात होत्या व त्यांची गाठ साहित्यातच पडत असे.

महाराष्ट्री

ही भाषा अत्यंत समृद्ध होती, त्यामुळेच यात सर्वोत्तम साहित्यनिर्मीती झाली असावी. या भाषेतील व्यंजने मोठ्या प्रमाणावर काढली गेल्यामुळे ही भाषा कर्णमधुर झाली. काव्यरचनेमध्ये त्यामुळे या भाषेचा वापर प्रामुख्याने केला गेला. आपण गाथासप्तशतीचे किंवा जयवल्लभाच्या वज्जालग्गाचे उदाहरण या संदर्भात घेऊ शकतो.

पैशाची

ही एक अत्यंत प्राचीन अशी प्राकृत बोलीभाषा आहे. म्हणजे जवळजवळ पाली, शिलालेख व अर्धमागधी यांच्याइतकी जुनी. मध्य आशियामध्ये, म्हणजे खोतान येथे सापडलेले काही लेख व कागद (हो, तेव्हा कागद होते) सापडले, त्यात खरोष्टी लिपीत पैशाचीमध्ये लिहिलेले आढळते. काही तज्ज्ञांच्या मते पैशाची ही पालीचेच एक रूप आहे. वररुचीने प्राकृतप्रकाशमध्ये पैशाचीचे मूळ शौरसेनी आहे असा उल्लेख केलेला आढळतो. रुद्रटाच्या काव्यालंकारवर लिहिलेल्या टीकेत नमिसाधूने या भाषेला पैशाचिक असे म्हटले आहे. हेमचंद्रने प्राकृतव्याकरण या ग्रंथात पैशाचीच्या नियमांबद्दल लिहिले आहे. त्रिविक्रमने शब्दानुशासनमध्ये व सिंहराजने प्राकृतरूपावतारमध्ये पैशाचीचा उल्लेख केलेला सापडतो, तर मार्कंडेयने प्राकृतसर्वस्वमध्ये कांचीदेशीय, पांड्य, पांचाल, गौड, मागध, व्राचड, दक्षिणात्य, शौरसेन, कैकेय, शाबर व द्राविड या नावाचे अकरा पिशाच देश सांगितले आहेत. अर्थात त्यानुसार येथे त्या काळात पैशाची बोलली जात असणार. मार्कण्डेयने फक्त तीन देशांचा या बाबतीत उल्लेख केला आहे, ते म्हणजे कैकेय, शौरसेन व पांचाल. रामशर्मा तर्कवागीशने प्राकृतकल्पतरूमध्ये कैकेय, शौरसेन, पांचाल, गौड, मागध व व्राचड पैशाचीचा उल्लेख केला आहे. लक्ष्मीधरच्या षड्भाषाचंद्रिकामध्ये पैशाची व चूलिका पैशाची ही भाषा राक्षस, पिशाच्च व खालच्या दर्जाचे लोक बोलत होते असा उल्लेख आहे. त्याने तर पैशाची बोलणाऱ्या देशांमध्ये बरीच भर घातली आहे, ती याप्रमाणे – पांड्य, केकय, बाल्हिक, सह्य, नेपाल, कुंतल, सुधेष्ण, भोज, गांधार, हैवक व कनोज. मला वाटते या प्राकृतात उच्च जमातीतील व्यक्तींना बोलण्यास परवानगी नव्हती. भोजदेवाच्या सरस्वतीकंठाभरणममध्ये तसा उल्लेख आढळतो. आचार्य दंडींनीही काव्यादर्शमध्ये पैशाची म्हणजे भूतभाषा असा उल्लेख केला आहे.
पण पैशाची ही संस्कृतला जास्त जवळची आहे, हे निर्विवाद. याच कारणामुळे अनेक दानपत्रे संस्कृतमध्ये आहेत का पैशाचीमध्ये, हे पटकन ओळखू येत नाही. गुणाढ्याची प्रसिद्ध बृहत्कथा पैशाची भाषेतील सगळ्यात प्राचीन साहित्य आहे. त्याची प्रत उपलब्ध नाही, पण त्याचे उल्लेख मात्र सापडतात.

मागधी..

मगध जनपदाची ही भाषा. मगध जनपद म्हणजे बिहारच्या आसपासचा प्रदेश. ज्याप्रमाणे इतर प्राकृतात स्वतंत्रपणे साहित्यकृती आढळतात, तशा या प्राकृतात आढळत नाहीत. अर्थात काही संस्कृत नाटकात यातील काही वाक्ये आढळतात. मार्कण्डेयच्या प्राकृतसर्वस्वमध्ये ही भाषा राक्षस, भिक्षू, क्षपणक व चेट जमातीचे लोक बोलत असत. भरताच्या नाट्यशास्त्रामध्ये असे नमूद केले आहे की अंत:पुरात राहणारे, घोड्यांचा सांभाळ करणारे, किंवा आपत्तीत सापडलेले नायक ही भाषा बोलतात. दशरूपकार म्हणतात, खालच्या जातीतील जमाती ही भाषा बोलतात. शूद्रकाच्या मृच्छकटिकात संवाहक, शकारचा नोकर, वसंतसेनेचा नोकर कुंभीलक, चारुदत्ताचा नोकर वर्धमानक हे लोक या भाषेत संभाषण करतात. शाकुंतलमध्ये दोन शिपाई, कोळी याच भाषेत बोलताना आढळतात. मुद्राराक्षसात जैन साधू, दूताच्या किंवा चांडाळच्या रूपात आलेले सिद्धार्थ इ. मागधीमध्येच बोलतात. पुरुषोत्तमने या भाषेत शाकारी, चान्डाली व शाबरी या भाषा आहेत असे नमूद केले आहे.

या झाल्या विविध प्राकृत भाषा. त्यांची मजा घ्यायची असेल, तर प्राकृत साहित्याबद्दल व व्याकरणाबद्दल लिहायला पाहिजे. पण ते पुन्हा केव्हातरी…

-जयंत कुलकर्णी.

Posted in लेख | Leave a comment

वॉल्डन !

For wordpress post

नमस्कार !

मी वॉल्डनचे मराठीत भाषांतर केले आहे आणि कळविण्यास आनंद होतो की ते आता विक्रीस उपलब्ध आहे. एकूण  २६ प्रती आता शिल्लक आहेत. कोणाला पाहिजे असल्यास खालील माहितीचा उपयोग करावा.

पुस्तकाचे नाव : वॉल्डन व  हेन्री डेव्हिड थोरो यांचे संक्षिप्त चरित्र.

एकूण पाने : ४५०

किंमत : रु. ५५०. भारतात घरपोच.
Please contact me at jayantckulkarni(at)gmail(dot)com

आपला,
जयंत कुलकर्णी.

Posted in मी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल... | 2 Comments

बौद्धधर्मप्रसारक…

फो
बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह.

Untitled-1

गौतमबुद्ध किंवा तथागत याच्या काळात जे राजे होऊन गेले त्यांची बुद्धाच्या धर्मप्रसारात बरीच मदत झाली. किंबहुना या राजांमुळेच बुद्धधर्माने भारताच्या सीमा ओलांडल्या व जवळजवळ तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. उदा. सम्राट अजातशत्रू हा महावीर व बुद्धाच्या समकालीन होता व त्याने जैन व बौद्धधर्म या दोन्ही धर्मांना राजाश्रय दिला. नुसता राजाश्रय दिला एवढेच नाही तर या धर्मांचा थोडाफार आक्रमकपणे प्रसारही केला. यानेच बुद्धाच्या मृत्युनंतर पहिली धर्मपरिषद भरविली. पण मिशनरी वृत्तीने धर्मप्रसार करण्याची सुरवात झाली सम्राट अशोकाच्या काळात. त्याने खोदलेल्या असंख्य शिलालेखातून हे कार्य कशा प्रकारे चालत असे याची आपल्याला कल्पना येऊ शकते. यातील सगळेच शिलालेख वाचले गेले आहेत व त्यांचे मराठीत, इंग्रजीमधे केलेली भाषांतरे उपलब्ध आहेत. ती जरुर वाचावीत कारण हे शिलालेख वाचण्यासारखेच आहेत. हे शिलालेख सम्राट अशोकाच्या राज्यातच नव्हे तर त्याच्या राज्याबाहेर व काही श्रीलंकेतही सापडतात. सम्राट अशोकाने हे धर्मप्रसारक सिरिया, इजिप्त, मॅसिडोनिया इ. देशांमधून पाठविले व त्यांनी तेथे धर्मप्रसाराचे काम उत्तम प्रकारे पार पाडले. त्या काळात त्या देशात अँटिऑक थिऑस, टॉलेमी, मॅगॉस, गोनटस व अलेक्सझांडरसारखे राजे राज्य करीत होते. थोडक्यात भारतीय उपखंडातून हे धर्मप्रसारक एशिया, आफ्रिका व युरोप खंडात धर्मप्रसारासाठी प्रवास करीत होते हे आपल्या लक्षात येते.
बुद्धाच्या मृत्युनंतर जवळजवळ ३५०/४०० वर्षांनी अजुन एका राजाने बौद्धधर्माच्या प्रसाराला हातभार लावला आणि तो म्हणजे कुशाणांचा राजा कनिष्क.

Kushanmap

असे म्हणतात बुद्धाने त्याच्या हयातीतच कनिष्क पेशावरला एक भव्य स्तूप बांधेल असे भविष्य वर्तविले होते. मध्य एशियामधून जी यु-ची जमात भारतात स्थलांतरीत झाली त्यांचा हा राजा. त्यांच्या स्थलांतराबद्दल परत केव्हातरी लिहीन कारण तोही विषय बराच मोठा आहे. याच्याच राज्यातून भारतातून पहिला धर्मप्रसारक चीनमधे गेला व त्याबरोबर बौद्धधर्म.

Coin_of_Kanishka_I

अर्थात याबाबतीत मतांतरे आहेत. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की चीनला बौद्धधर्माबद्दल कळले ते त्यांच्या कनिष्काच्या राजदरबारात असलेल्या त्यांच्या राजदुताकडून. ते काहीही असले तरी चीनमधून येथे आलेले बौद्ध भिख्खू व येथून गेलेले बौद्ध धर्मप्रसारक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे बौद्धग्रंथ मूळस्वरुपात आजही उपलब्ध आहेत. चीनचा एक सेनापती कौ-वेन-पिंग-चाऊ याच्या एका पुस्तकात अशी नोंद आढळते – सम्राट मिंग-टी याने त्साई-इन व इतर तेरा जणांवर एक वेगळी आगळी कामगिरी सोपवली जी आजवर जगात कुठल्याच राजाने आपल्या सैनिकांवर सोपवली नव्हती. त्यांना भारतात जाऊन बौद्धधर्माचे पवित्र ग्रंथ चीन मधे घेऊन यायचे होते. या उल्लेखामुळे चीनी इतिहासकरांच्या मते बौद्धधर्म हा हान घराण्याचा सम्राट मिंग-टी (लिऊ-झुआंग) सम्राटाच्या काळात चीनमधे प्रथम आला. काळ होता २५-७५ साल. पण सगळं सोडून त्याने ही कामगिरी या तेराजणांवर का सोपवली असेल हा खरा प्रश्र्न आहे. त्यासाठी चीनमधे एक दंतकथा सांगितली जाते.

” त्याच्या राज्यकारभाराच्या चवथ्या वर्षी सम्राट मिंग-टीच्या स्वप्नात एक अवतारी पुरुष आला ज्याचे शरीर झगझगत्या सोन्याचे होते. त्याच्या मस्तकामागे प्रभावळ चमकत होती. या आकृतीने त्याच्या महालात प्रवेश केला व ती नाहिशी झाली.’’ त्या काळातील प्रथेप्रमाणे त्याने त्याच्या मंत्र्यांना या स्वप्नाचा अर्थ विचारला. त्यातील एक मंत्री, फौ-ई, जो त्याच्या दरबारात राजजोतिषी होता, त्याने सांगितले,

‘महाराज आपण भारतात जन्मलेल्या एक महान साक्षात्कारी पुरुषाबद्दल ऐकले असेल. त्याचे नाव आहे शाक्यमुनी बुद्ध. आपल्या स्वप्नाचे मुळ त्या थोर पुरुषाच्या शिकवणीत दडलेले आहे.’’

हे ऐकल्यावर त्याने ताबडतोब त्याच्या दरबारातील अठराजणांची भारतात जाऊन ते पवित्र ग्रंथ चीनमधे आणण्यासाठी नियुक्ती केली. दंतकथा काहीही असो त्याचा मतितार्थ एवढाच की चिनी सम्राटाच्या कानावर बुद्धाच्या शिकवणीबाबतीत बरीच माहीती पडली असणार. इतकी की त्याला त्याची स्वप्नेही पडू लागली होती. ही मंडळी अकरा वर्षानंतर चीनला परत आली व त्यांनी येताना ग्रंथ तर आणलेच पण असे म्हणतात की त्यांनी राजा उदयन याने काढून घेतलेली बुद्धाची अनेक चित्रेही बरोबर आणली. बुद्धाने त्याच्या काळात राजा उदयनाच्या दरबाराला अनेकवेळा भेटी दिल्या होत्या कदाचित त्या काळात ही चित्रे काढली असावीत. (किंवा त्या चित्राच्या नकला असाव्यात. ही चित्रे जर चीनमधे मिळाली तर बुद्ध दिसायला कसा होता यावर बराच प्रकाश पडेल किंवा पडलाही असेल. मला कल्पना नाही.) बौद्धग्रंथ एकोत्तर आगम ज्याचे फक्त चीनी भाषांतर उपलब्ध आहे त्यात राजा उदयन याने बुद्धाची प्रतिमा चंदनाच्या लाकडात कोरुन घेतली असा उल्लेख सापडतो. या मंडळींनी त्यांच्याबरोबर दोन पंडीतही चीनला नेले. एक होता काश्यप मातंग नावाचा बौद्ध पंडीत. त्याला सम्राटाने काही प्रश्र्न विचारले. (मध्यभारतातील हा एक ब्राह्मण होता व त्याने बौद्धधर्म स्वीकारुन त्याचा पूर्ण अभ्यास केला होता. याच्या बरोबर अजुन एक पंडीत होता त्याचे नाव होते गोभर्ण. या दोघांबद्दल आपण नंतर वाचणार आहोत.) असो. पहिला प्रश्र्न होता,

‘धर्मदेवाने या देशात अवतार का घेतला नाही ? हे सांगू शकाल का आपण ?’’

‘‘ या विश्र्वाच्या मध्यभागी का-पि-लो नावाचा देश आहे. तीन युगांच्या बुद्धांनी येथेच जन्म घेतला. सर्व देवांची आणि ड्रॅगनची येथेच जन्म घेण्याची मनिषा असते. या प्रदेशात जन्म घेऊन बुद्धधर्माचे पालन करावे व सत्याचे खरे स्वरुप समजावे ही एकच इच्छा घेऊन ते येथे जन्म घेतात. बुद्धाच्या तत्वज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पसरला आहे. हा धम्म शिकविण्यासाठी हजारो भिख्खू या विश्र्वात संचार करीत असतात.’’

यावर विश्र्वास ठेऊन सम्राटानी ताबडतोब एक मठ बांधण्याचा आदेश दिला. काश्यप मातंग व त्यांच्या बरोबर असणाऱ्या मंडळींनी हे सर्व बौद्ध साहित्य एका पांढऱ्याशूभ्र घोड्यावर लादून आणले म्हणून राजाने त्या मठाला नाव दिले श्र्वेताश्र्व मठ.

श्र्वेताश्र्व मठ बराचसा जसा होता तसा ठेवला आहे.

White Horse Temple 1

भारतात गेलेले चीने व त्यांच्याबरोबर परत आलेले पंडीत यांचे नाव तर इतिजहासात अजरामर झाले पण ज्या घोड्यावर हे ग्रंथ लादून आणण्यात आले त्याच्या योगदानाचा विसर पडू नये म्हणून त्याचे नाव या मठाला देण्याची कल्पना मला तरी भारी वाटते. या मठात पुजेसाठी त्यांनी एका बुद्धाच्या मुर्तीची स्थापना केली. वेशीवरही त्यांनी एक बुद्धाची प्रतिमा सामान्यजनांच्या दर्शनासाठी ठेवली जेणे करुन सर्वांना या थोर माणसाचे सतत स्मरण होत राहील. हीच कहाणी आपल्याला अनेक चिनी ग्रंथात आढळते. जवळजवळ तेरा ग्रंथात. (श्री बील यांचे पुस्तक).

पण या लेखाचे प्रयोजन हा इतिहास सांगणे हे नसून जे धर्म प्रसारक भारतातून इतर देशात, विशेषत: चीनमधे गेले त्यांची आठवण करुन देणे आहे. मधे एका लेखात मी या अशा थोर धर्मप्रसारकांबद्दल एक लेखमालिका लिहून त्यांच्या चरणी अर्पण करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती, ती वेळ आता आली आहे असे मला वाटते. मी या धर्मप्रसारकांबद्दल जेवढा विचार करतो तेवढेच माझे मन त्यांच्याबद्दल अपार आदराने भरुन जाते. आपल्या भूमीपासून दूर्, अवघड प्रवास करत, संकटांवर मात करीत हे धर्मप्रसारक दूरवर बुद्धाचा धर्म शिअकवीत राहिले त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. मध्य एशिया, अफगाणीस्तान या प्रदेशाबद्दल माझ्या मनात एक सुप्त आकर्षण आहे ते तेथे नंतर प्रस्थापित झालेल्या इस्लाम धर्मामुळे नव्हे तर अत्यंत चिकाटीने, अहिंसक मार्गाने भारतीय बौद्धांनी केलेल्या बौद्धधर्मप्रसारामुळे.

हा जो पंडीत काश्यप मातंग होता हा चीनमधे गेलेला पहिला धर्मप्रसारक मानला जातो.
काश्यप मातंग. (किआ-येह मो-थान) कंसात दिलेले हे त्याचे त्या काळातील प्रचलीत चीनी नाव आहे. हा काश्यप गोत्रात जन्मला म्हणून याचे नाव काश्यप मातंग असावे.

पंडीत काश्यप मातंग.
हा हिंदू ब्राह्मण मगध देशात जन्मला पण त्याचे कार्यक्षेत्र होते पेशावर किंवा पुरुषपूर. काश्यप मातंगांना चीनला नेण्यात आले तो काळ साधारणत: सन ६७ ते ७५ असा असावा. हल्ली काही सापडलेल्या चीनी कागदपत्रांवरुन/किंवा लेखांवरुन काही इतिहासकार असे मानतात की चीनमधे बौद्धधर्म पोहोचला तो ख्रिस्तपूर्व १ या काळात. अर्थात त्याच्याही आधी म्हणजे ख्रिस्तपूर्व १२० या काळात बौद्धधर्माविसयी चीनमधे माहीती होती हे निश्चित. ते कसे ते या लेखाचा विसय नाही. आपण मात्र असे म्हणू की असे असले तरी तरी काश्यप मातंगाच्या काळात चीनमधे धर्माचे खरे आगमन झाले.

काश्यप मातंग आणि गोभर्ण यांना पहिली अडचण आली ती भाषेची. त्यांना खोतानपर्यंत संस्कृतची साथ होती. संस्कृत समजणारी बरीच मंडळी त्याकाळात तेथे होती. चीनच्या सिमेवर बोलली जाणाऱ्या खोतानी भाषेचाही त्यांनी बराच अभ्यास केला होता पण चीनमधे आल्यावर हे सगळे कोलमडले. सम्राटाने बांधलेल्या मठात जेव्हा चीनी बौद्धांनी या दोन धर्मगुरुंना बुद्धाची शिकवण सांगण्याचा आग्रह धरला तेव्हा त्यांची मोठी पंचाईत झाली. त्यांनी चीनी भाषेचा अभ्यास मोठ्या चिकाटीने चालू केला पण त्यांना लगेचच उपयोगात आणता येईल असा एखादा ग्रंथ रचण्याशिवात गत्यंतर नव्हते. त्यांनी ज्यांच्याबरोबर ते आले होते त्या चीनी सरदारांच्या मदतीने चीनी जनतेसाठी किंवा अभ्यासकांसाठी एक सूत्र लिहिले. याचे नाव होते ‘‘बुद्धाने सांगितलेली बेचाळीस वचने.’’ काश्यप मातंगाने हे करण्यात खूपच दूरदृष्टी दाखविली असे म्हणायला पाहिजे. बऱ्याच वेळा कशाला, बहुतेक वेळा ज्ञानी पंडीतांना काय सांगू आणि किती सांगू असे होऊन जाते. पण काश्यप मातंगांनी तो मोह आवरला व चीनी अभ्यासकांच्या पचनी पडेल अशा साध्यासुध्या, सहजतेने समजेल, अशा ग्रंथाची रचना केली. हा ग्रंथ अजुनही टिबेटमधे व मोंगोलियामधे त्या त्या भाषेमधे उपलब्ध आहे. हाच संस्कृत भाषेतील चीनी भाषेत भाषांतरीत झालेला पहिला ग्रंथ असे काही जणांचे म्हणणे आहे पण ते चुकीचे आहे. हा ग्रंथ चीनी भाषेतच रचला गेला. त्यात थेरवदा व महायान पंथाच्या सुत्रांचे भाषांतर आहे हे खरे.

त्या काळात चीनमधे ताओ व कन्फुशियस तत्वज्ञानाचे प्राबल्य होते. सम्राटाच्या दरबारात अर्थात त्यांचेही धर्मगुरु होतेच. या मंडळींनी काश्यप मातंगाच्या कार्यात अडथळे आणण्याचा भरपूर प्रयत्न केला पण शेवटी एका वादविवादात हरल्यावर सम्राटानेच बौद्ध धर्म स्वीकारल्यावर त्यांचे प्राबल्य बरेच कमी झाले व बौद्धधर्माची पताका चीनमधे फडकू लागली. एवढ्या कमी काळात हे यश आश्चर्यजनकच म्हणायला हवे. अर्थात त्याच्यामागेही बरीच कारणे होती.
एकतर बुद्धाचा धर्म सुटसुटीत, कशाचेही अवडंबर न माजविणारा होता.
शिवाय ताओंचे तत्वज्ञान सामान्यजनास कळणे अत्यंत अवघड होते.
शेवटी सगळ्यात महत्वाचे कारण होते ते म्हणजे खुद्द सम्राटानेच दिलेला राजाश्रय.

काश्यप मातंग यांनी आपला देश सोडून चीनमधे बौद्धधर्माच्या प्रसारास वाहून घेतले. ते परत कधीच भारतात परत आले नाहीत. लो-यांग येथे पो-मा-स्सूच्या मठात त्यांनी अखेरचा श्र्वास घेतला तेव्हा त्यांचे वय बरेच असावे.
त्याच मठात त्यांचे एक चित्र रंगविलेले आहे. त्यावरुन आपल्याला ते कसे असावेत याची कल्पना येऊ शकते.

काश्यप मातंग.

Kashyap-Matang

त्यांनी केलेल्या अडतिसाव्या सुत्राचे मराठी भाषांतर येथे देत आहे.
३८ वे सूत्र.
जिवनाची क्षणभंगुरता.
बुद्धाने एका श्रमणास विचारले,
किती काळ तू जिवंत राहणार आहेस याची तुला कल्पना आहे का ?
‘‘अजुन काही दिवस तरी !’’ श्रमणाने स्मितहास्य करीत उत्तर दिले.
‘‘तुला जिवनाबद्दल काही माहिती आहे असे मला वाटत नाही.’’ बुद्ध म्हणाला.
त्याने तेथेच असलेल्या दुसऱ्या श्रमणास हाच प्रश्न केला.
‘‘हे जेवण संपतोपर्यंत तरी ! ’’ त्याने उत्तर दिले.
‘‘तुलाही जिवनाबद्दल काही माहिती आहे असे वाटत नाही.’’
मग त्याने तिसऱ्या श्रमणास हाच प्रश्र्न केला.
‘‘ या एकाच श्र्वासापर्यंत.’’ त्याने उत्तर दिले.
‘‘ बरोबर ! तुला जिवनाचा खरा अर्थ समजला आहे असे मी म्हणू शकतो’’
बुद्धाने स्मितहास्य करीत उत्तर दिले…..

काश्यप मातंगांनंतरही त्यांनी सुरु केलेले हे कार्य त्यांच्या शिष्यांनी मोठ्या धडाडीने सुरु ठेवले. एवढेच नव्हे तर भाषांतरीत ग्रंथात अधिकाधीक अनमोल ग्रंथांची भर पडत गेली…

त्यातीलच एक श्रमण होता ‘‘धर्मरक्ष’’ त्याचे चिनी भाषेतील नाव आहे ‘‘चाऊ फा-लान’’…

दोन हजार वर्षे टिकून राहिलेल्या या मठाचा पाडाव केला १९६६ मधे थोर पुढारी माओत्से तुंग यांच्या अनुयायांनी. श्र्वेताश्र्व मठाच्या लुटीचे वर्णन कम्युनिस्ट पार्टीच्या एका सदस्याने असे केले आहे –

या मठाजवळील कम्युनिस्ट पार्टीच्या शाखेने सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची एक टोळी घेऊन हा मठ उध्वस्त करण्यासाठी त्यावर चाल केली. १००० वर्षापूर्वी (अंदाजे ९१६ साली) लिॲओ घराण्याने तयार करुन त्या मठात ठेवलेले अठरा अरहतांचे पुतळे प्रथम फोडण्यात आले. दोन हजार वर्षांपूर्वी भारतीय भिख्खूंनी आणलेले ग्रंथ जाळण्यात आले. जेडचा श्र्वेत अश्र्वाचा अनमोल पुतळा तोडण्यात आला. आज ज्या काही वस्तू त्या मठात दिसतात त्याची कहाणी वेगळीच आहे.

कंबोडियाच्या राजाने, नरोद्दम सिंहनुक याने या मठाला भेट देण्याची इच्छा प्रदर्शित केल्यावर चौ-एन्लायची गडबड उडाली. कारण नरोद्दम सिंहनुकची भेट ही सदिच्छा भेट होती आणि तो जगाला चीनमधे सगळे कसे व्यवस्थीत चालले आहे हे सांगणार होता. त्याच्या भेटीआधी चीनमधील इतर मठातील बऱ्याच वस्तू रातोरात त्या मठात हलविण्यात आल्या. व नंतर कम्युनिस्ट पक्षाच्या आदेशानुसार त्या देणगी म्हणून स्वीकारण्यात आल्या ज्यामुळे त्या वस्तू परत पाठविण्याचा प्रश्र्न उदभवला नाही.

महायानातील महापरिनिर्वाण सुत्रामधे शाक्यमुनींनी असे भविष्य वर्तविले होते की त्याच्या निर्वाणानंतर सैतान, राक्षस व वाईट प्रवृत्ती बौद्धधर्माचा नाश करण्यासाठी बौद्धधर्मामधे महंत, भिख्खूं म्हणून जन्म घेतील व धर्माचा नाश करतील. हे खरे आहे की दंतकथा यावर मी भाष्य करणार नाही पण जे घडले ते तसेच झाले. राजकारणी भिख्खूंनी कम्युनिस्ट पक्षाला हाताशी धरुन (किंवा उलटे) बौद्ध संघाचे नियम बदलले. आता त्यांना निळे कपडे घालण्याची परवानगी देण्यात आली. दारु पिण्यास व मांसभक्षण करण्यासही परवानगी देण्यात आली. विवाह करण्यास उत्तेजन देण्यात आले तर संपत्ती जमा करण्यात काहीही वाईट नाही असे सांगण्यात आले. ज्यांनी याला विरोध केला त्यांना निर्घृणपणे ठार मारण्यात आले. हे अर्थातच सगळे सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली चालले होते. या प्रकारे त्यांनी तिन्ही धर्म नष्ट करण्याच प्रयत्न केला.

लेनिन याने म्हटल्याप्रमाणे – ‘‘धर्माचे अस्तित्व मिटविण्यासाठी धर्मातुनच प्रयत्न व्हायला पाहिजे.’’ तसे प्रयत्न नेटाने करण्यात आले. पण काय झाले हे आज आपण पहातोच आहोत… तिन्हीही धर्म/तत्वज्ञान आज जिवंत आहेत व त्यांच्या अनुयायांमधील धर्मावरील श्रद्धाही चांगल्या बळकट झालेल्या दिसतात. असो.

धर्मरक्षाबद्दल आपल्याला माहिती मिळते ती त्याच्या चरित्रावरुन. हे चरित्र हे सहाव्या शतकाच्या सुरवातीस लिहिले गेले व अजुनही सेन्गीयु येथे जपून ठेवले आहे. त्याचे नाव आहे ‘‘झु फाहू झुआन’’ म्हणजेच ‘‘धर्मरक्षाचे चरित्र’’. हीच माहीती नंतर अनेक चिनी पुस्तकातून आपल्याला आढळते पण त्याचे मूळस्थान हेच पुस्तक आहे. धर्मरक्षाबद्दल अभ्यास करताना आपल्याला याच चरित्रात्मक पुस्तकापासून सुरवात करावी लागेल.

धर्मरक्षचे पुर्वज हे युची जमातीचे होते. हे घराणे अनेक पिढ्या मध्य एशियातील चीनच्या सीमेवर असलेल्या डुनहुआंग या शहरात रहात होते. काही तज्ञांचे म्हणणे असेही आहे की हाही मगधाचा एक ब्राह्मण होता. खरे खोटे माहीत नाही. तो कुठला होता हे महत्वाचे नसून त्याने काय काम केले हे मह्त्वाचे आहे. हे शहर म्हणजे चीनची अती पश्चिमेकडील सैन्याची वसाहत होती. (ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात). काहीच काळानंतर रेशीममार्गावरील (सिल्करुटवरील) ते एक महत्वाचे व्यापारी केंद्र झाले. येथे आठ वर्षांचा असतानाच धर्मरक्षाने आपले घरदार सोडले व एका तो मठात दाखल झाला. तेथे त्याने एका गाओझुओ नावाच्या विदेशी श्रमणाकडे आसरा घेतला व शेवटी त्यालाच आपले गुरु मानले. धर्मरक्षचा हा गुरु बहुदा भारतीय असावा. हे नाव भारतीय श्रमणाचे कसे ? तर त्याचे उत्तर हे आहे की त्या काळात भारतीय किंवा विदेशी नावांचे चीनीकरण करण्याची पद्धत सर्रास रुढ होती. या चीनी नावांमुळे खरी नवे शोधण्यास बऱ्याच इतिहासकारांना बरेच कष्ट करावे लागले हे मात्र खरे !. तर या श्रमणाकडे आसरा घेतल्यावर धर्मरक्षने खडतर मेहनत घेतली. असे म्हणतात त्या वयात तो दिवसाला दहाहजार शब्द असलेले श्लोक म्हणायचा. तो मुळचाच अत्यंत बुद्धिमान व एकपाठी होता. त्या काळात म्हणजे अंदाजे काश्यप मातंगाच्या काळात चीनच्या राजधानीत मठ, देवळे, बुद्धाची चित्रे, हिनयान पंथांचे ग्रंथ यांचा बराच बोलबाला होता पण महायान पंथाच्या सुत्रांचा अभ्यास मात्र पश्चिमी प्रदेशात होत असे. किंबहुना ही ‘‘वैपुल्य सुत्रे’’ राजधानीत माहीत असावीत की नाही अशी परिस्थिती होती. बौद्ध धर्माचे खरे तत्वज्ञान व मुक्तीचा खरा मार्ग याच पंथाच्या शिकवणीत दडलेला आहे याची खात्री असणारा धर्मरक्ष मग त्याच्या अभ्यासासाठी बाहेर पडला. त्याच्या गुरु बरोबर पश्चिमेकडील देशविदेशांच्या यात्रेस त्याने प्रारंभ केला. असे म्हणतात त्या प्रवासादरम्यान त्याने ३६ भाषांचा व लिप्यांचा अभ्यास केला व त्यात लिहिलेल्या महायान सुत्रांचा खोलवर अभ्यासही केला. (यातील अतिशयोक्ती सोडली तर त्याने किती कष्ट घेतले हे यावरुन कळते. त्या काळात एवढ्या भाषा त्या भागात बोलल्या जायच्या का नाहीत याची शंकाच आहे) हा त्यातील कुठल्याही श्र्लोकाचे उत्तमपणे विवेचन करु शकत असे.

हे सगळे ग्रंथ घेऊन मग तो चीनला पोहोचला. ‘‘डुनहुआंग’’ ते टँगची राजधानी ‘‘चँग-ॲन’’ या प्रवासात त्याने या ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर करण्याचे काम सुरु केले. त्याने ज्या संस्कृत/पाली सुत्रांचे चिनी भाषेत भाषांतर केले त्याची यादी पाहिल्यास मन थक्क होते. भद्रकल्पिका, तथागतमहाकरुणानिर्देश, सद्‌धर्मपुंडरिक, ललितविस्तार, बुद्धचरितसुत्र, दशभुमीक्लेषचेदिकासुत्र, धर्मसमुद्रकोषसुत्र हे त्यातील काही ग्रंथ. एकूण ग्रंथ होते १४९. शिवाय त्याने अजुन एक महत्वाचे काम केले ते म्हणजे बुद्धाच्या जातक कथांचे चीनी भाषेत भाषांतर केले. बरं हे नुसते लिहून तो थांबला नाही तर गावोगावी, त्याच्या मठात त्याने या सुत्रांवर सतत प्रवचने दिली व धम्माचा प्रसार केला. चीनमधे जो काही बौद्धधर्म प्रारंभीच्या काळात पसरला त्याचे बरचसे श्रेय धर्मरक्षालाच जाते.

अखेरच्या काळात धर्मरक्षाने वानप्रस्थाश्रम स्वीकारला व तो निर्जन जंगलात एकांतवासात रहाण्यास गेला. त्याच्या ज्ञानलालसेबद्दल एक दंतकथा याच काळात निर्माण झाली. तो ज्या नदीकिनारी रहात असे त्या नदीचे पाणी एक दिवस अचानक आटले. (एका माणसाने ते दुषीत केले असेही म्हणतात) ते पाहून धर्मरक्ष त्या जंगलात विलाप करीत भटकू लागला, ‘‘ही नदी अशी आटली तर मला जे काही थोडेफार पाणी लागते तेही मिळणे मुष्कील आहे.’’ हा आक्रोश ऐकताच ती नदी परत दुथडी भरुन वाहू लागली. अर्थात ही एक बोधकथा आहे म्हणून आपण त्यातून काही बोध घ्यायचा असेल तर घेऊ व सोडून देऊ.

नंतरच्या काळात त्याने टँगची राजधानी चँग-ॲनच्या ‘निल‘ वेशीबाहेर एक मठ स्थापन केला व तेथे महायानाचा अभ्यास करीत आपले आयुष्य व्यतीत करु लागला. त्याच्या शिष्यांची संख्या आता न मोजता येईल एवढी झाली होती. पण त्याच काळात धर्मरक्ष सामान्यजनांमधे लोकप्रिय झाला तो एका घटनेमुळे…

त्याच्या विद्यार्थ्यांमधे एक श्रमण दाखल झाला होता. तो आठव्यावर्षीच श्रमण झाला होता याचाच अर्थ तो ज्ञानी असावा. ही घटना घडली तेव्हा त्याचे वय तेरा होते. त्याचे नाव होते झु-फाशेंग. चँग-ॲनमधे एक अत्यंत श्रीमंत व प्रतिष्ठीत गृहस्थ रहात असे. एक दिवस तो धर्मरक्षाच्या मठात आला. त्याची गाठ या झुशी पडली. त्या माणसाने धर्मरक्षाकडे दोन लाख नाणी मागितली. त्या मागणीला धर्मरक्ष उत्तर देणार तेवढ्यात त्या लहान मुलाने उत्तर दिले, ‘‘ तुम्हाला ते पैसे मिळतील !’’ ते ऐकून तो माणूस उद्या येतो असे म्हणून निघून गेला. फा-शेंग म्हणाला, ‘‘ त्या माणसाला ते पैसे खरेच पाहिजे होते यावर माझा विश्वास बसला नाही. मला वाटते तो आपली परिक्षा घेण्यासाठी आला असावा.’’ धर्मरक्षाने त्यालाही असेच वाटले असे उत्तर दिले. दुसऱ्या दिवशी तो माणुस आला व त्याने त्याच्या कुटुंबियांसमवेत धर्माची दिक्षा घेतली.

जेव्हा क्सिओनू व क्सिॲन्बी टोळ्यांनी सम्राट हुईच्या राजधानीवर हल्ला केला त्या धामधुमीच्या काळात धर्मरक्षाने त्याच्या शिष्यांसह पूर्वेकडे पळ काढला. तेथे तो एका निसर्गरम्य कुन नावाच्या तळ्याकाठी पोहोचला. दुर्दैवाने झालेल्या दगदगीमुळे तो तेथे आजारी पडला व त्याने या जगाचा निरोप घेतला. त्यावेळी त्याचे वय होते ७८.

हुई आणि हुआई सम्राटांच्या मधल्या युद्धाच्या धामधुमीच्या काळातही हे भाषांतराचे काम अडखळत का होईना चालू होते. फा-जू नावाचा एक श्रमण होता त्याने लोकस्थान सुत्राचे भाषांतर केले. हा कुठून आला होता, त्याचे भारतीय नाव काय होते हे अज्ञात आहे. तसाच एक श्रमण होता त्याचे नाव होते फाल-ली याने जवळजवळ १०० श्लोकांचे भाषांतर केले. हे दोघे आणि त्यांचे काम काळाच्या उदरात गडप झाले ते झालेच.

ही तत्वज्ञान व माहितीची देवाणघेवाण बघता, पूर्व आणि पश्चिम कधीच भेटणार नाहीत हे प्रसिद्ध वाक्य खोटे ठरते. हे प्रदेश भेटले आणि मध्य एशियात भेटले. त्यांच्यात वैचारिक व आर्थिक देवाणघेवाणही होत होती….

या सुरवातीच्या काळात हे जे ग्रंथांचे भाषांतर झाले ते एवढे अचुक नसायचे. चीनी भाषा ही भारतीय पंडितांना एकदम नवीन व अनाकलनीय होती. त्यांचा बराच वेळ हा ती भाषा शिकण्यातच जायचा. भारतीय पंडीत खऱ्या अर्थाने चिनी भाषा शिकले ते हुएन-त्संगच्या काळात. पण आपण चिनी भिक्षुंबद्दल नंतर पाहणार आहोत. त्यामुळे हा विषय येथेच सोडून देऊ.

या दोन महत्वाच्या महंताबद्दल आपण वाचले पण एकदा राजाश्रय मिळाल्यावर भारतातून चीनमधे जाणाऱ्या बौद्ध महंतांची तुलनेने रीघच लागली. राजाने बांधून दिलेल्या श्र्वेताश्र्व मठात भाषांतराचे व धर्मप्रसाराचे काम मोठ्या नेटाने चालू झाले.

चिनी सम्राटांनी बौद्धधर्माला राजाश्रय दिल्यावर त्यांना भारतातून अजुन धर्मगुरुंची गरज भासू लागली व त्यांनी अनेक धर्मगुरुंना चीनला येण्याचे आमंत्रण दिले. त्यांची नावे काही तिबेटच्या ग्रंथात आढळतात ती अशी- आर्यकाल, स्थाविरचिलू, काक्ष, श्रमण सउविनय. हे पहिल्या तुकडीत होते तर नंतर आलेल्यांची नावे होती, पंडीत धर्मकाल व त्याच्या बरोबर गेलेले अनेक भिक्षू ज्यांची नावे आज आपल्याला माहीत नाहीत. पण काही जणांची चिनी इतिहासातून कळतात – महाबल, धर्मकाल, विघ्न, त्साऊ लुयेन, त्साऊ ता-ली व धर्मफळ. १७२-१८३ या काळात अजुन एक पंडीत आला त्याचे नाव होते त्साऊ फा-सो. हे अर्थात त्याचे चिनी नाव आहे. त्याचे भारतीय नाव माहीत नाही. त्याने दोन ग्रंथाचे भाषांतर केले पण ते ७३० साली नष्ट झाले असा चिनी इतिहासात उल्लेख आहे. महाबल यानेही त्याच मठात राहून एका ग्रंथाचे भाषांतर केले तो मात्र अजुनही चिनी त्रिपिटकामधे आहे. यात बोधिस्त्वाच्या कल्पनेबद्दल बरीच चर्चा केली आहे. त्यातच बुद्धाच्या आयुष्याबद्दल बरीच माहीती मिळते.

तिसऱ्या शतकात धर्मपाल चीनला गेला. जाताना त्याने त्याच्याबरोबर कपिलावस्तूमधून काही संस्कृत ग्रंथ नेले. यानेही त्याच मठात आश्रय घेऊन त्या ग्रंथाचे भाषांतर केले. त्यात त्याला मदत झाली एका तिबेटी श्रमणाची. हा तिबेटी असला तरी त्याचे वास्तव्य अनेक वर्षे मध्य भारतात होते. याचे नाव आहे खान मानसिआन कदाचित खान हे त्या काळात आडनाव नसून पद होते हे लक्षात घेतल्यास ते खान मानसिंह असेही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याने भाषांतर केलेल्या ग्रंथाचे नाव होते मध्यमासुत्र. हा दीर्घआगमामधील काही सुत्रे घेऊन रचला गेला.

या काळामधे हे सगळे पंडीत त्यांच्या कामात सतत सुधारणा करीत धर्मप्रसार करीत होते. उदा. धर्मकाल जेव्हा चीनमधे आला तेव्हा त्याला उमगले की चीनमधे विनयसुत्राबद्दल विशेष माहीती नाही. त्यात लिहिलेल्या नियम माहीत नसल्यामुळे बरेच प्रश्न उद्‌भवत होते. संघ नीट चालण्यासाठी अशा नियमांची आवश्यकता होती. प्रतिमोक्षसुत्रामधे हे सगळे नियम बुद्धानंतर सम्राट अशोकाने भरविलेल्या महापरिषदेने घालून दिलेले आपल्याला आढळतात. धर्मकालाने या नियमांचे भाषांतर करण्याचे काम प्रथम हाती घेतले व तडीस नेले. काळ होता इ.स. २५० हाच चिनी भाषेतील ग्रंथ विनयपिटीका. दुर्दैवाने हाही ग्रंथ ७३० साली नष्ट झाला अशी नोंद आढळते.

अंदाजे २२४ साली अजुन दोन पंडीत भारतातून चीनमधे आले. एक होता विघ्न आणि दुसरा होता लु-येन. हे एकमेकांचे मित्र होते. या पंडितांनी बरोबर धर्मपादसुत्र आणले व त्याचे भाषांतर केले – थान-पोक-किन. त्यांनी हे काम सुरु केले तेव्हा त्यांना चिनी भाषेचा विशेष गंध नव्हता पण त्याने डगमगून न जाता मोडक्यातोडक्या चिनी भाषेत त्यांनी हे काम नेटाने पुढे चालू ठेवले. पण त्यामुळे एक नुकसान झाले ते म्हणजे या भाषांतरात मूळ भाव उतरला नाही. हा ग्रंथ अजुनही चीनमधे काओ-सान-क्वान (प्रसिद्ध धर्मगुरुंच्या आठवणी) या ग्रंथात जपून ठेवलेला आहे. पंडीत विघ्नाच्या मृत्युनंतरही लु-येन याने हे काम चालू ठेवले व आणखी तीन ग्रंथाचे भाषांतर केले ज्यात बुद्धाने जी सुत्रे सांगितली ती लिहिली आहेत.

वर उल्लेख केलेला खान सान नी ही मुळचा तिबेटी पण भारतात स्थायीक झाला होता. तिबेटच्या पंतप्रधानाचा (खान्-कू) हा मुलगा. २४१ साली याने चीनचा रस्ता धरला व तो त्यावेळची राजधानी नानकिंग येथे पोहोचला. त्यावेळी तेथे वू घराण्याचे राज्य होते. सम्राट सन खुएनची या धर्मगुरुवर विशेष मर्जी बसली. त्याने त्यास नवीन मठ बांधण्याचा आदेश दिला. त्याने तो लगेच आमलात आणून त्या मठाला नाव दिले किएन-कू मठ. ज्या गावात हा मठ बांधला गेला त्या गावाचेही नाव ठेवण्यात आले बुद्धग्राम. याचे उद्‌घाटन खुद्द सम्राटांच्या हस्ते करण्यात आले. याही महंताने एकूण १४ ग्रंथांचे चिनी भाषेत भाषांतर केले. त्यातील एक महत्वाचा होता शत परमिता सन्निपातसुत्र. हा म्हणजे आपल्या जातक कथा आहेत. दुसरा ग्रंथ होता संयुक्तावादनसुत्र. हा एक महायान पंथाचा ग्रंथ आहे. काळ होता २५१.

एक लक्षात येते की भारतातील धर्मगुरु हे सरळ चीनला अफगाणिस्थानमार्गे जात नसत. ते अगोदर मध्य एशियात जात व तेथून रेशीममार्गाने एखाद्या व्यापारी तांड्याबरोबर चीनला जात.

याखेरीज अजुनही काही धर्मप्रसारक भारतातून चीनला गेले त्यांची नावे –
कल्याणरुण, कल्याण, आणि गोरक्ष. यातील गोरक्षक हे नाव नाथपंथियांच्या साधूचे वाटते. याबाबतीत संशोधनाची गरज आहे. गोरक्षकनाथांचा काळ हा अकराव्या शतकाचा मानला जातो आणि हा पंडीत गेला दुसऱ्या शतकात. काही नाथपंथीयांनी बौद्धधर्माची दिक्षा घेतली होती का यावर संशोधन होणे जरुरी आहे…. एका थोर धर्मप्रसारकाविषयी आपण वाचणार आहोत.
त्याचे नाव कुमारजिव….

कुमारजीव.
चीनमधील कुचा येथील कुमारजीवाचा सुंदर पुतळा.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

कुमारजिवाचे काम खरोखरच आपल्याला आचंबित करणारे आहे. त्यांनी जवळजवळ १०० संस्कृत ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केले आणि एवढ्यावरच न थांबता त्यांनी सुरु केलेल्या या कामात सामील होण्यासाठी दुसरी फळी उभारली. या त्यांच्या शिष्यांनीही त्यांचे काम मोठ्या जोमाने पुढे चालू ठेवले. हे त्यांचे यश फार मोठे म्हणावे लागेल. त्यांचे शिष्य नुसते हे काम करुन थांबले नाहीत तर सुप्रसिद्ध फा-इन सारख्यांनी बौद्ध धर्माचा प्रसारही चीनमधे केला.

या काळातील काही बौद्ध धर्मगुरुंची ही नावे पहा –
धर्मरक्ष, गौतम संघदेव, बुद्धभद्र, धर्मप्रिय, विमलाक्ष व पुण्यत्राता. या सर्वांचे काम आपण थोडक्यात बघणार आहोत.

धर्मरक्ष ३८१ साली चीनेमधे आला व त्याने त्या अवघड भाषेचा अभ्यास करुन अनेक ग्रंथाचे भाषांतर केले. उदा. १) मायाकाराभद्ररिद्धीमंत्र सूत्र २) नरकसूत्र, ज्यात बुद्धाने नरक या संकल्पनेवर भाष्य केले आहे. ३ शिलगुणगंध सूत्र ४) श्रामण्यफळसूत्र.

याच्यानंतर आला गौतम संघदेव. हा एक काश्मीरचा श्रमण होता. याने ३८८ साली त्यावेळच्या चीनी राजधानीत, म्हणजे खान आन या शहरात पाऊल टाकले. त्यावेळी तेथे फु राजघराणे राज्य करीत होते. त्याने जवळजवळ ७ ग्रंथांचे भाषांतर केले. त्याने भाषांतर केलेल्या काही महत्वाच्या ग्रंथांची नावे आहेत – मध्यमागम सूत्र, हा एक हिनयान पंथाचा ग्रंथ आहे. दुसरा आहे अभिधर्मह्र्दयशास्त्र. ३९१ साली त्याने त्रिधर्मसूत्राचे भाषांतर केले.

३९८ साली चीनमधे आला बुद्धभद्र. हा शाक्य होता. साधारणत: त्याच काळात कुमारजीवाला पकडून चीनमधे आणण्यात आले. कुमारजीवाने याच बुद्धभद्राचा अनेक वेळा त्याच्या कामात सल्ला घेतला असे म्हणतात. या बुद्धभद्राला कुमारजीवाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. याचाच सहाध्यायी होता जगप्रसिद्ध फा-ईन. कुमारजीवाच्या मृत्युनंतर जेव्हा फा-ईन भारताचा प्रवास करुन चीनमधे परतला तेव्हा याने त्याच्याबरोबर संघासाठी नियमावली असणारा ग्रंथ लिहिला. तो म्हणजे विनयपिटिका. २५० साली नियमावली नसल्यामुळे आपण पाहिले आहे की धर्मकालाने पहिला प्रतिमोक्ष हा ग्रंथ लिहिला होता. बुद्धभद्राने त्यातील काही भाग उचलून त्यावर सविस्तर भाष्य केले आणि एक नवीन ग्रंथ रचला ज्याचे नाव त्याने ठेवले – प्रतिमोक्षसंघिकामूल. संघ वाढत असल्यामुळे त्यात शिस्त आणण्यासाठी विनयग्रंथाची त्याकाळात फारच जरुरी भासल्यामुळे हे काम तत्परतेने उरकण्यात आले. बुद्धभद्राने चीनमधे ३१ वर्षे काम केले. तो भारतात परत आला नाही. त्याने चीनमधेच आपला प्राण ठेवला तेव्हा त्याचे वय होते ७१. त्याचे सात ग्रंथ आजही चीनमधे जपून ठेवले आहेत ते खालीलप्रमाणे – (तीन ग्रंथांची नावे आधी येऊन गेलेली आहेत)

१ महावैपुल्य सूत्र ज्यात खुद्ध बुद्धाची भाषणे दिली आहेत.
२ बुद्धध्यानसमाधीसागर सूत्र
३ मंजुश्री प्रणिधानपद सूत्र
४ धर्मताराध्यान सूत्र

बुद्धभद्राच्या थोडे आधी अजुन एक धर्मगुरु काबूलवरुन चीनमधे येऊन गेला त्याचे नाव होते संघभट. पण त्याच्याबद्दल आजतरी काहीच माहिती उपलब्ध नाही. अजून किती पंडीत चीनमधे या कामासाठी दाखल झाले असतील याची आज आपल्याला कल्पना नाही. कित्येक ग्रंथ कम्युनिस्ट राजवटीत नष्ट करण्यात आले असावेत किंवा कुठल्यातरी सरकारी ग्रंथालयात धूळ खात पडले असतील. ते जेव्हा केव्हा बाहेर येतील तेव्हा अजून बरीच माहिती उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच काळात अजून एक महत्वाच्या कामास सुरुवात झाली ती म्हणजे चीनी धर्मगुरुंनी संस्कृत शिकण्यास सुरुवात केली. ही कल्पना कुमारजीव यांच्या एका शिष्याची, फा-ईनची.

३८८ साली संघभटाने कात्यायनीपुत्र रचित विभासशास्त्राचे चीनी भाषेत भाषांतर केले जे चीनमधे पि-फो-शालून या नावाने ओळखले जाते. या ग्रंथाचे एकुण १८ भाग आहेत. त्याच वर्षी त्याने आर्य वसुमित्र बोधिसत्व संगितीशास्त्र या ग्रंथाचे भाषांतर केले. ३८४ साली त्याने बुद्धचरितसूत्राचे भाषांतर केले. हा मूळ ग्रंथ संघरक्षाने रचिला होता.

३८२ साली अजून एका धर्मप्रिय नावाच्या श्रमणाने एका महत्वाच्या ग्रंथाचे भाषांतर केले ज्याचे नाव होते महाप्राज्ञपरिमित सूत्र. हे प्रसिद्ध दशसहस्रिका प्राज्ञ परिमिता या ग्रंथाचा काही भाग आहे.

थोडक्यात काय, भारतातून चीनकडे जाणाऱ्या पंडितांचा ओघ सारखा वाढत होता व त्यांनी तेथे अचाट काम केले. नवीन धर्माचा प्रसार करताना नवबौद्धांना संदर्भासाठी ग्रंथ लागतील हे ओळखून त्यांनी ग्रंथाच्या भाषांतराचे काम प्रथम हाती घेतले आणि अतोनात कष्टाने तडीस नेले. हे करताना त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्याचे थांबविले नव्हते. त्यासाठी त्यांनी राजाच्या आश्रयाने मठ बांधले. तेथे संघांना आसरा दिला. त्यांच्यासाठी चीनी भाषेत नियमावली लिहिल्या.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या सर्व कामात भारताच्या मध्य भागातून अनेक पंडीत चीनला गेले पण काश्मीरातूनही अनेकजण गेले हे विसरुन चालणार नाही. हे वाचल्यावर एक विचार मनात येतो काश्मीरमधील सध्याच्या युवकांना हा इतिहास माहिती असेल का ? तो जर त्यांना सांगितला तर काही फरक पडेल का ?

(शक्यता कमीच आहे पण मधे एका पाकिस्तानी कार्यक्रमात एका बाईने एका अतिरेक्याला सडेतोड उत्तर दिले होते…ती म्हणाली, आमचा अरबस्तानाशी कसलाही संबंध नाही. अरब हे आमच्या भूमिवरील आक्रमक होते. हिंदूशाहीचा राजा दाहीर हाच आमचा हिरो असायला हवा. आम्ही प्रथम हिंदू होतो, नंतर बौद्ध झालो व त्यानंतर ख्रिश्चन व मुसलमान हे आम्ही विसरु शकत नाही… असे उत्तर देणारी पिढी जेव्हा काश्मीरात तयार होईल तो दिवस भारताच्या व काश्मीर खोऱ्याच्या भाग्याचा.) असो.

आता आपण कुमारजीव या महान ग्रंथकर्त्याकडे वळू. कुमारजीवाचे पिता हे भारतीय होते अर्थात त्याचवेळेचा भारत ज्यात अफगाणिस्तानही मोडत होते. कुमारजीवाचे वडील ‘कुमारयाना’, काश्मिरमधे एका राज्याच्या पंतप्रधानपदी कार्यरत होते. त्यांच्यावर बौद्धधर्माचा एवढा प्रभाव पडला की पामीरच्या डोंगर रांगा पार करुन ते कुचाला गेले. तेथे ते आल्याची कुणकुण लागल्यावर तेथील राजाने त्यांची त्वरित राजगुरुपदी नेमणूक केली. त्याकाळी गुणवंतांची कदर अशा प्रकारे व्हायची. विद्वान पंडितांसाठी त्याकाळी युद्धं होत असत असा तो काळ. तर कुचाला हा राजगुरु असताना कुचाची राजकन्या, जिवाका त्याच्या प्रेमात पडली व तिने त्याच्याशीच विवाह करण्याचा हट्ट धरला. अर्थातच तो पुरा करण्यात आला. यांना जो पुत्र झाला त्याच्या नावात मातापित्यांचे नाव गुंफण्यासाठी त्याचे नाव ठेवण्यात आले कुमार + जिवाका. म्हणजेच कुमारजीवा. कुमारजीवाचे जन्म साधारणत: ३३४ त ३४४ या काळात झाला असावा. तो सात वर्षांचा असताना त्याची आई एका भिक्षुणीसंघात दाखल झाली. असे म्हणतात (जरा अतिशयोक्ती वाटते) की तो सात वर्षांचा असतानाच त्याची अनेक सूत्रे तोंडपाठ होती. तो नऊ वर्षांचा झाल्यावर त्याच्या आईने त्याला काश्मिरला नेले व शिक्षणासाठी शिक्षकांचा जो शिक्षक बंधुदत्त त्याच्याकडे सोपविले. या प्रवासादरम्यान त्यांना एक अरहत भेटला ज्याने कुमारजीवाचे भविष्य सांगितले असे म्हणतात. आजवर कुमारजीवाचा अभ्यास हिनयानाच्या सर्वास्तिवादी तत्वज्ञानाच्या अभ्यासापुरता मर्यादित होता. येथे त्याला वेदांचा व तंत्रविद्या, खगोलशास्त्र या विषयांचा अभ्यास करण्यास मिळाला व याचवेळी त्याची महायानाच्या तत्वज्ञानाशी ओळख झाली. या शिक्षणाचा अजून एक फायदा त्याला झाला आणि तो म्हणजे त्याची ओळख अतिविशाल हिंदू ग्रंथविश्र्वाशी झाली. थोड्याच काळात तो त्यात पारंगतही झाला. महायानाची ओळख झाल्यावर तर त्याने एका ठिकाणी म्हटले आहे की मी इतके दिवस दगडाला सोने समजत होतो. आता मात्र माझी ओळख खऱ्या सोन्याशी झाली आहे. (मला मात्र हे काही विशेष पटले नाही. खरे तर हिनयानपंथाचे तत्वज्ञान जास्त मूलभूत स्वरुपाचे आहे. मला तरी वाटते महायानात हिंदू तत्वज्ञान भरपूर घुसडलेले आहे. उदा. बोधिसत्वाची कल्पना. हे चूक असू शकेल !) गंमत म्हणजे त्याला या अभ्यासात यारकंदचा राजपुत्र सत्यसोमाची खूपच मदत झाली. गुगलअर्थवर यारकंद कुठे आहे हे जरुर पहावे.

काशघरला एक वर्ष काढल्यावर कुमारजीव कुचाला परतला. कुचामधे राजदरबाराच्या पाठिंब्याने त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. यानंतर मात्र तो जवळजवळ वीस वर्षे कुचामधे राहिला. हा काळ त्याने महायानाचे तत्व समजून घेण्यात व्यतीत केले. ते तत्वज्ञान पटल्यावर त्याने महायानपंथाचा स्वीकार केला. एवढ्यावरच न थांबता त्याने त्याच्या गुरुंनाही हे तत्वज्ञान समजावून सांगण्याचे ठरविले. त्याला अशी आशा होती की गुरुंना पटल्यावर तेही या पंथाचा स्वीकार करतील. त्याने बंधुदत्तांना कुचास येण्याचे आमंत्रण दिले. आपल्या गुरुला महायानाची थोरवी सांगताना कुमारजीवाने त्यांच्या समोर शून्यतेची कल्पना व तत्व मांडले. ते सगळे शांतपणे ऐकल्यावर बंधुदत्तांनी सगळे शून्य आहे, किंवा सगळे विश्र्व शेवटी मिथ्या आहे हे म्हणणे म्हणजे फुकाची बडबड आहे असे म्हणणे मांडले. ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी एक कथा कथन केली –

एका विणकराकडे एक वेडसर माणूस आला व त्याने त्याला सगळ्यात तलम धागा विणण्यास सांगितला. तो पाहिल्यावर त्याने तो जाड असल्याचे त्या विणकराला सांगितले.

‘‘पैशाची काळजी करु नकोस. मला तलमात तलम धागा विणून दाखव !’’

विणकराने त्याला दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी तो धागा पाहिल्यावर त्या माणसाने तो जाड असल्याचे सांगितले. विणकराला राग आला पण त्याने तो आवरला व त्याला परत दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. तिसऱ्या दिवशी विणलेला धागा पाहून त्या माणसाने तोही जरा जाडसर असल्याचे सांगितल्यावर विणकराला आला राग. हवेत बोट दाखवून तो म्हणाला,

‘‘तो बघ तुला पाहिजे तसा धागा तेथे आहे.’’ हवेत काहीच न दिसल्यामुळे त्याने विचारले, ‘‘ कुठे आहे तो धागा? मला तर दिसला नाही’’

‘‘तो इतका तलम झाला आहे की नुसत्या नजरेस दिसणे शक्यच नाही’’ विणकराने उत्तर दिले.

त्या उत्तराने त्या माणसाचे समाधान झाले.

‘‘या धाग्याचे एक वस्त्र विणून मला उद्या दे. ते मला राजाला भेट द्यायचे आहे’’ असे म्हणून त्या माणसाने त्याचे पैसे मोजले व तो तेथून निघून गेला.

आता हे स्पष्टच आहे की असा कोणताही धागा तेथे नव्हता व त्याचे पैसे मोजायचेही काही कारण नव्हते त्याचप्रमाणे महायानातील शून्यता या कल्पनेत/तत्वज्ञानात काहीच अर्थ नाही व त्यात वेळ घालविण्यात काही कारण नाही हे स्पष्ट आहे.’’

हे मात्र मला पटले पण कुमारजीवाला मात्र स्वत:च्या गुरुचे मतपरिवर्तन करण्यात नंतरच्या काळात यश मिळाले. त्याच्या म्हणण्यास मान्यता देऊन त्याच्या गुरुंनी महायानपंथाची शिकवण स्वीकारली.

३७९ साली एक सेंग-जुन नावाचा चीनी महंत कुचाला आला होता. त्याने कुमारजीवाची माहिती चीनच्या राजाला (सम्राट जिन. राजधानी : चँगॲन) एका अहवालात पाठविली. सम्राटाने तो अहवाल वाचून कुमारजीवाला चीनमधे आणण्याचे प्रयत्न सुरु केले. जवळजवळ दोन दशके प्रयत्न करुन तो निराश झाला. हे प्रयत्न विफल झाले त्याला कारण होते सम्राटाचाच एक सेनापती लु-कुआंग. या सेनापतीने कुमारजीवाचे महत्व न ओळखता आल्यामुळे त्याला अटक करुन सतरा वर्षे तुरुंगात टाकले. (हा बौद्धधर्मिय नव्हता. तो धर्माच्या विरुद्ध होता का नाही याबद्दल माहिती उपलब्ध नाही. काही जणांचे असेही म्हणणे आहे त्या काळात तो इतका ताकदवान झाला होता की त्याने जवळजवळ राजा विरुद्ध बंडच पुकारले होते.) राजदरबारातून कुमारजीवाला राजधानीत पाठविण्याचे सारखे आदेश निघत होते. इकडे कुमारजीवाने सर्वस्तीवादी विनयाचा अभ्यास सुरु केला होता. यावेळी त्याच्याबरोबर होता पंजाबमधील (किंवा उत्तर भारत म्हणूया) एक पंडीत ज्याचे नाव होते विमलाक्ष. (हा एक उत्तर भारतीय भिक्खू होता ज्याने कुचाच्या दिशेने प्रस्थान ठेवले होते. जेव्हा चिन्यांनी ३८३ मधे कुचावर हल्ला करुन ते काबीज केले तेव्हा याने तेथून पळ काढला. नंतर जेव्हा त्याला कुमारजीव चँगॲनमधे आहे हे कळले तेव्हा तोही चँगॲनला गेला. कुमारजीवाचा मृत्यु झाल्यावर याने तेथे बरेच काम केले. हा त्याच्या ७७व्या वर्षी तेथेच मृत्यु पावला)

३६६-४१६ या काळात त्सिन् घराण्याची सत्ता चँगॲनवर प्रस्थापित झाली. याचा एक राजा याओ त्सिंग हा बौद्धधर्माचा फार मोठा चाहता होता. त्याने या धर्माला उदार राजाश्रय दिला होता. असे म्हणतात त्याच्या काळात त्याने ३००० श्रमणांना सांभाळले होते. याच्या दरबारात प्रवेश मिळाल्यावर कुमारजीवाचे भाग्य उजळले. या राजाने त्याला त्याच्या राज्यात बौद्ध धर्माचा प्रसार करण्याची आज्ञा दिली व बौद्धधर्माचा चीनमधील मार्ग मोकळा झाला. एकदा राजाश्रय मिळाल्यावर कुमारजीवाने भाषांतराचे काम मोठ्या धडाडीने हाती घेतले. त्याने जवळजवळ ९८ ते १०० बौद्ध संस्कृत ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केले. त्यातील काहींची नावे आपण अगोदरच पाहिली आहेत. त्याने स्वत: काही ग्रंथ रचले का नाही याबद्दल आजतरी काही माहिती उपलब्ध नाही. बहुतेक त्यासाठी त्याला वेळच मिळाला नसावा. कुमारजीवाची मातृभाषा ना संस्कृत होती ना चीनी. तरीही त्याने हे भाषांतराचे काम पार पाडले याबद्दल त्याचे आभारच मानले पाहिजेत. कदाचित कुचामधे असताना त्याला चीनी भाषेची तोंडओळख झाल्याची शक्यता नाकारता येत नाही पण हे खरे मानले तरीही त्याने फार अवघड काम पार पाडले असेच म्हणावे लागेल.. संस्कृतमधून चीनी भाषेत भाषांतर करताना त्याने स्वत:ची एक स्वतंत्र शैली निर्माण केली त्यामुळे ती सगळी भाषांतरे ही चीनी भाषेतील मूळ लेखनच वाटते. असे म्हणतात की त्याची शैली ही ह्युएनत्संगपेक्षा श्रेष्ठ आहे. वरील ९८ ग्रंथाचे ४२५ भाग आहेत. यावरुन हे काम किती प्रचंड असेल याची कल्पना येते. यातील ४९ ग्रथांची नावे चीनी त्रिपिटिकात लिहून ठेवली आहेत त्याची नावे येथे विस्तारभयापोटी देत नाही. ही यादी आपण जर नीट पाहिली तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की यात तांत्रिकविद्येवरील एकही ग्रंथ नाही. ह्युएनत्संगच्या काळात मात्र या विषयावरील ग्रंथांचा चीनमधे बराच बोलबाला झाला. त्याने अश्र्वघोष व नागार्जुन यांची चरित्रं लिहिली, ती चीनमधे बरीच लोकप्रिय झाली. कुमारजीवाची लोकप्रियता इतकी वाढली की असे म्हणतात त्या काळात त्याच्याकडे १००० श्रमण शिकत होते. फा-ईन हा त्याचाच एक शिष्य. याने भारतात जाऊन बुद्धाच्या सर्व पवित्र ठिकाणांना भेटी दिल्या व कुमरजीवाच्या आज्ञेने त्याचे प्रवासवर्णन लिहिले. त्यानेही अनेक ग्रंथ भारतातून चीनमधे नेले. आपल्या शिष्याची किर्ती पाहण्यास कुमारजीवाचा गुरु विमलाक्ष चीनमधे आला पण दुर्दैवाने विमलाक्षाच्या आधी कुमारजीवाचा मृत्यु झाला. विमालाक्षाने आपल्या शिष्याचे काम पुढे नेले व ‘दशाध्याय विनय निदान’ नावाच्या ग्रंथाचे चीनी भाषेत भाषांतर केले. हेही वयाच्या ७७व्या वर्षी चीनमधे मरण पावले.
कुमारजीवाच्या काळात काश्मिरमधून अजून एक पंडीत चीनमधे आला. त्याचे नाव होते पुण्यत्रात. यानेही कुमारजीवाच्या प्रभावाखाली दशाध्यायविनय व सर्वस्तिवाद् विनय या दोन ग्रंथांचे भाषांतर केले.

एक लक्षात येते की काश्मिर भागातून अनेक श्रमण चीनमधे येतजात होते व तेथे अगोदरच स्थायिक झालेल्या पंडितांच्या मार्गदर्शनाखाली कठोर परिश्रम करीत होते. आता त्यांच्यापैकी काहींची नावे व त्यांचे काम पाहुया..

काश्मिरमधून या काळात जे काही पंडीत चीनमधे गेले त्यांची नावे खालीलप्रमाणे-
१ बुद्धयास २ धर्मयास ३ धर्मक्षेम ४ बुद्धाजिवा आणि ५ धर्ममित्र.

बुद्धयासाने आकाशगर्भबोधिसत्व, दीर्घ आगाम व धर्मगुप्त विनयाचे सूत्राचे भाषांतर केले. ज्या चिनी इतिहासात या सर्व बौद्ध पंडितांचा उल्लेख किंवा व्यवस्थित नोंद केलेली आढळते. याचे नाव फो-थो-ये-शो असे आहे.

याच्या मागोमाग काश्मिरमधून आला पंडित धर्मयास. साधारणत: ४०७ साली. याने आठ वर्षात सव्याकरण सूत्र व सारिपुत्ताअभिमधर्म सूत्रांचे भाषांतर केले. ही सगळी त्रिपिटकात सामावलेली आहेत.

४१४ साली धर्मक्षेमाने चीनमधे पाऊल ठेवले. जरी तो काश्मिरातील पंडितांबरोबर चीनमधे आला असला तरी तो कश्मिरी नव्हता. तो होता मध्य भारतातील. चीनी सम्राटाने (सम्राट त्सू-खू-मान-सून्, उत्तर लिॲन घराणे) याला बौद्ध ग्रंथाचे भाषांतर करण्यासाठी खास आमंत्रण दिले होते म्हणजे हा किती ज्ञानी असेल याची कल्पना येते. त्यानेही भाषांतराचे काम मोठ्या धडाडीने हाती घेतले. थोड्याच काळात त्याची किर्ती दूरवर पसरली आणि त्याला वी घराण्याच्या राजाकडून बोलाविणे आले. त्याने त्याला बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी आमंत्रण दिले. पहिल्या राजानी परवानगी नाकारल्यावर या दोन सम्राटांमधे जी हाणामारी झाली त्यात बिचाऱ्या धर्मक्षेमास आपले प्राण गमवावे लागले. तो वीच्या राज्यात जात असताना त्याच्यावर मारेकरी घालण्यात आले व त्याला ठार मारले गेले. त्याने भाषांतर केलेल्या अनेक ग्रंथांपैकी बारा शिल्लक आहेत. त्यातील काही महत्वाचे असे –
१ महविपूल सूत्र २ महाविपूलमहासानिपत्त सूत्र ३ महापरिनिर्वाण सूत्र

काश्मिरमधून अजुन एक पंडीत आला ज्याचे नाव होते बुद्धजिवा. हा साधारणत: ४२३ साली आला असावा. त्यानेही दोन महत्चाचे ग्रंथ चीनी भाषेत आणले ते म्हणजे महाशासक विनय आणि प्रतिमोक्ष महिशासक.

यानंतर या काळात काश्मिरमधून आलेला शेवटचा पंडीत होता धर्ममित्र. हा आला साधारणत: त्याच काळामधे. त्याने ४२३ ते ४४१ या काळात बरेच काम केले त्यातील महत्वाचे होते आकाशगर्भबोधीसत्वधारिणी सूत्र. हा वयाच्या ८२व्या वर्षी चीनमधेच मृत्यु पावला.

आता आपण एका महत्वाच्या व लोकप्रिय पंडीताकडे वळूया.

काश्मिर ज्याला त्या काळात चिनी भाषेत कि-पिन असे नाव होते ( आत्ता आहे का हे माहीत नाही ) त्याने एक अत्यंत अनुभवी धर्मप्रसारक चीनमधे पाठविला. तो म्हणजे गुणवर्मन. हा धर्मप्रसाराच्या कामात अत्यंत वाकबगार होता. असे म्हणतात त्याने चीनला जाण्याआधी आख्खी जावा बेटे बौद्ध केली होती. जावा बेटात त्याने शुन्यापासून सुरुवात केली होती त्यामानाने चीनमधील काम सोपे होते. चीनमधील धर्मप्रसाराचे काम तसे सुरळीत चालले होते फक्त मधून मधून ताओ व कनफुशियसचा अनुयायी असणारा एखादा राजा गादीवर आला की बौद्धांवर अत्याचार व्हायचे. पण त्याच काळात बौद्धांची संख्या वाढली होती हेही नाकारता येत नाही. या कामास बुद्धाच्या भूमीवरुन सतत मदत मिळत होती हेही खर्ं. अशा काळात गुणवर्मनसारखा पंडीत चीन येथे आल्यावर बौद्धधर्मप्रसारकांची ताकद अजुन वाढली.

हा स्वत: काश्मिरच्या राजघराण्यातील होता. (काही जणांचे म्हणणे तो गांधारातील होता असेही आहे) दुर्दैवाने जरी यांचे घराणे काश्मिरवर अनेक वर्षे राज्य करीत असले तरी याचा जन्म झाल तेव्हा याच्या आजोबांना (हरिभद्र) त्यांच्या उपद्रवी मुल्यांमुळे राज्यातून हद्दपार करण्यात आले होते. त्याकाळात राजेशाही असली तरी कशा प्रकारची होती हे या उदाहरणावरुन समजून यावे. प्रत्यक्ष राजाला हद्दपार करण्याची क्षमता त्या काळात मंत्रीगण व जनता बाळगून होते. मला वाटते पाचशे राजकर्त्यांना हाकलून देण्यापेक्षा हे सोपे असावे. त्यामुळे याचा जन्म जंगलातच झाला. गुणवर्मनाबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते. एकदा तो लहान असताना त्याच्या आईने त्याला एक कोंबडा मारायला सांगितला. त्याने हे धम्माविरुद्ध आहे हे सांगितल्यावर साहजिकच त्याच्या आईला राग आला. ती म्हणाली,

‘‘ तू मार त्याला. जे काही पाप लागेल ते मी माझ्या शिरावर घेते. व त्यासाठी काही शिक्षा असेल तर तीही मी भोगेन.’’ दुसऱ्या दिवशी किंवा काही दिवसांनंतर असेल, गुणवर्मनाचे बोट दिव्यावर भाजले. त्याने आईकडे धाव घेतली.

‘‘ माझ्या हाताची आगाआग होती आहे. या वेदना जरा तू घेतेस का ?’’

‘‘अरे हे तुझे शारीरिक दुखणे आहे. ते मी कसे घेऊ शकेन ?’’
हे ऐकल्यावर गुणवर्मनाने तिला तिच्या बोलण्याची आठवण करुन दिली.

असे म्हणतात जेव्हा गुणवर्मन १८ वर्षाचा झाला तेव्हा कोणीतरी भविष्यवाणी केली की तो लवकरच राजाधिपती होईल. नंतर दक्षिणेकडे जाईल व एक सन्यासी होईल. आणि खरोखरच ही भविष्यवाणी खरी ठरली. वयाच्या विसाव्या वर्षी त्याने बौद्ध धर्माची दिक्षा घेतली व तो श्रमण झाला. विसाव्या वर्षी त्याचा सर्व सूत्रांचा अभ्यास पूर्ण झाला. लोक त्याल त्रिपिटकावरील अधिकारी पुरुष मानू लागले. तो तीस वर्षांचा असताना काश्मिरच्या राजाचा मृत्यु झाला. त्याच्या मंत्रीमंडळाने गुणवर्मन हा राजघराण्यातीलच असल्यामुळे त्यालाच राज्याभिषेक करायचे ठरविले. अर्थातच गुणवर्मनाने त्या मागणीला नम्रतापूर्वक नकार दिला व काश्मिर सोडले. तेथून तो श्रीलंकेला गेला. तेथे धम्माच्या कामाला त्याने वाहून घेतले व जावा बेटांवर पोहोचला. त्या काळात चीनी भाषेत जावा बेटांना चो-पो असे म्हणत. फा-ईनने थोडे आधी या बेटाना भेट दिली होती. त्याने त्याच्या प्रवासवर्णनात नमूद केले आहे की या बेटांवर हिंदू धर्माची पताका फडकत होती. गुणवर्मनाने मोठ्या कल्पकतेने व कष्टाने बौद्ध धर्माचा प्रचार केला व हिंदू धर्माचे प्राबल्य जवळजवळ नष्ट केले. जावामधे कलिंगाच्या राजांनी राज्यविस्तार केला होता. ( जावाच्या एका लोककथेत गुजराथमधील एका राजाने येथे सत्ता प्रस्थापित केली असाही उल्लेख आहे. ७५ साली. जेव्हा जावाबेटांवर न्यायपाल किंवा नायपाल नावाचा राजा राज्य करीत होता तेव्हा तेथे एक मोठे बौद्ध विद्यापीठ होते ज्याचे वर्णन अनेक चीनी बौद्ध धर्मगुरुंनी केले आहे. ते होते सुवर्णद्विप नावाच्या बेटावर. नालंदा विद्यापिठात प्रवेश करण्याआधी या संस्थेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करावे लागत असे. हे बहुदा गुणवर्मनने स्थापन केले असावे. खात्री नाही…)

गुणवर्मन येण्याआधी म्हणे जावाच्या राजाच्या आईला स्वप्न पडले होते की कोणी थोर महंत उद्या जावाच्या किनाऱ्यावर लागणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी गुणवर्मनची बोट तेथे लागली. तिच्या आग्रहाखातर राजा गुणवर्मनच्या स्वागतासाठी किबाऱ्यावर गेला आणि तिच्याच आग्रहाखातर त्याने बौद्धधर्माचा स्विकार केला. त्याने राजाज्ञा केली की
१ बौद्ध महंताचा अनादर कोणी करु नये.
२ कुठल्याही प्राण्याची हिंसा करु नये.
३ गरिबांना दानधर्म करावा.

यानंतर काहीच काळानंतर सारे जावा बौद्धधर्मीय झाले. जावामधील या यशानंतर गुणवर्मनाची किर्ती बौद्धजगतात पसरली. अर्थात चीनी श्रमणांच्या कानावर त्याची किर्ती पडली असणारच. ४२४ साली चीनी बौद्धजन आणि महंत वेन सम्राटाकडे गेले आणि त्यांनी त्याला विनंती केली की त्यांनी गुणवर्मनाला साँग प्रदेशात बौद्धधर्माच्या प्रसारासाठी बोलावून घ्यावे. त्याने त्याच्या त्या प्रदेशातील सरदारांना तशी आज्ञा केली. गुणवर्मन कसा नानकिंगला पोहोचला याची माहीती चीनी ग्रंथातून दिली गेली आहे. तो हिंदू-नंदी नावाच्या जहाजातून चीनच्या दिशेने रवाना झाला. त्याचे जहाज भरकटून दुसरीकडेच कुठेतरी लागले असे म्हणतात. आता ही व यासारखी सविस्तर माहिती चीनमधील कुठल्या ग्रंथातून मिळते हे पहाणे वावगे ठरणार नाही. खाली त्या ग्रंथांची नावे व काळ दिला आहे.

१ चू सानत्संग ची ची : लेखक : सेंग् यू, काळ : ५१५
२ शेन सेंग चुआन : लेखक : अज्ञात, काळ : १४१७
३ फा युआन चू लिन: लेखक : ताऊ शिह, काळ: ६६८
४ कू यिन ई चिंग तूची: लेखक: शिंग माई, काळ: ६६४
५ काय युआन चे चियाओ लू : लेखक : त्शे चिंग, काळ: ७३० ( याच काळात अनेक भाषांतरे नष्ट झाली आहेत.
६ चेंग युआन सिन तिंग चे चियाओ मूलू : लेखक: युआन चाओ, काळ: ७००
७ लि ताय सानपाओची : लेखक: फेईचँगफँग, काळ: ५९७
८ ता टँग नी तिएन लू : लेखक : ताऊ हुआन, काळ‘ ७००
९ फॅन-ई-मिंग-ई-ची : लेखक : फायुन, काळ : १२००
१० फुत्झूतुंग ची : लेखक : ची, पान काळ: १३००
११ चिशेन चाऊ सानपाओ कान तुंग लू : लेखक अज्ञात, काळ : १३००

म्हणजे चीनी दरबारातून या सर्व बौद्ध महंतांची चरित्रे लिहून ठेवण्यात आली. आहेत. मला वाटते आपल्याकडे ही लिहिलेली असावीत व बरिचशी नालंदाला लावलेल्या आगीत नष्ट झाली असवीत. अर्थात सगळ्यात जुने जे पुस्तक आहे त्यातीलच बरीचशी माहिती नंतरच्या पुस्तकात आढळते. असो.

चीनी सम्राटाला गुणवर्मन चीनच्या किनाऱ्याला लागल्याची खबर मिळताच त्याने त्याच्या सरदारांना त्याला कसलाही त्रस होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितली व त्याला त्वरित राजधानीस पाठविण्यास सांगितले. त्याचा हा रस्ता चे-हिंग नावाच्या राज्यातून जात होता. येथे गुणवर्मन एक वर्षभर राहिला. या प्रदेशाचा राजा/सरदार मरायला टेकला होता. गुणवर्मनाने त्याला धम्म सांगून त्याचे चित्त थाऱ्यावर आणले असे म्हणतात.

सम्राट गुणवर्मनला भेटण्यास अतिशय आतुर झाल्यामुळे त्याने त्याला ताबडतोब नानकिंगला येण्याची विनंती केली. ४३१ मधे (महिना माहीत नाही) गुणवर्मन नानजिंगला पोहोचला. वेन घराण्याच्या सम्राटाने स्वत: पुढे जाऊन त्याचे स्वागत केले. भेटल्यावर सम्राटाने त्याला काही प्रश्र्न विचारले. त्यातील एक असा होता,

‘‘ बुद्धाच्या शिकवणीनुसार मी अहिंसेचे पालन करतो पण काही वेळा मला त्याचे पालन करता येत नाही. अशा वेळी काय करावे हे मला कळत नाही. कुपया याबाबत मार्गदर्शन करावे.’’

त्याने त्याचे काय प्रबोधन केले ते मला माहीत नाही परंतू राजाचे समाधान झाले असावे कारण लगेचच गुणवर्मन यांची राहण्याची सोय जेतवन विहारात केली. या येथे राहून गुणवर्मन यांनी लगेचच बौद्धधर्माच्या प्रसाराचे काम हाती घेतले. प्रथम त्यांनी विहारामधे सद्धर्म पुंडरिक सूत्र व दक्षाभूमी सूत्रावर प्रवचने देण्यास सुरुवात केली. त्याच्याच एका शिष्याने त्यांना ती प्रवचने पुस्तक स्वरुपात प्रसिद्ध करण्याचे सुचविल्यावर त्यांनी एकूण तीस भागात ती लिहिली व प्रसिद्ध केली. त्यातील दोन त्यांच्या मृत्युनंतर त्यांच्या शिष्यांनी लिहिलेली आहेत. त्याच काळात त्या विहारात एक इश्र्वर नावाचा महंत शा-सिन नावाचा एक ग्रंथ लिहित होता पण काही अडचणींमुळे त्याने ते काम अर्धवट सोडले होते. गुणवर्मन यांनी ते काम पूर्ण करण्याचे ठरविले. या ग्रंथाचे शेवटचे १३ भाग त्यांनी पूर्ण केले असे म्हणतात.

गुणवर्मन यांच्या काळात बौद्ध भिक्षुणींचा एक प्रश्र्न सोडविण्यात आला. त्याची हकिकत अशी :
जेव्हा गुणवर्मन नानजिंगला पोहोचला तेव्हा ज्या विहारात त्यांची सोय करण्यात आली होती तेथे एका बांबूच्या बेटापाशी त्याचे मन अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी तेथेच आपली दिक्षाभूमी उभारली. या दिक्षाभूमीवर ते चीनी जनतेला बौद्धधर्माची दिक्षा देत असत. (चीनी महंतांनी गुणवर्मन या नावाचा अर्थ लावला तो असा : ज्याने गुणांचे चिलखत परिधान केले आहे असा. या माणसाने खरोखरीच गुणांचे चिलखत परिधान केले होते. सम्राटाच्या एवढ्या जवळ असून त्याच्या हातून कधीही काहीही वावगे घडले नाही.) ४२९ साली आठ भिक्षुणी श्रीलंकेवरुन एका जहाजातून नानजिंगला अवतरल्या. त्यांनी यिंगफू नावाच्या मठात आश्रय घेतला. तीन वर्षे त्या तेथेच होत्या. त्या काळात त्यांनी चीनी भाषेवर बऱ्यापैकी प्रभुत्व मिळविले. त्यांनी स्थानिक भिक्षुणींना विचारले,

‘‘ येथे पूर्वी कधी भिक्षुणी आल्या होत्या का ?’’

‘‘ श्रमण व भिक्षू आले होते पण भिक्षुणी प्रथमच आल्या आहेत’’

हे उत्तर ऐकल्यावर त्या भिक्षुणी चमकल्या. कारण स्त्रियांना दिक्षा देण्यासाठी भिक्षुणी आणि महंत दोन्हीची गरज असते.

‘‘जर तुमच्या गुरुंना पूर्वी दिक्षा मिळाली असेल तर त्यांना हे माहीत असायला पाहिजे होते.’’

त्या भिक्षुणींना काय उत्तर द्यावे ते कळेना. त्यांना त्यांची दिक्षा वैध नाही कळल्यावर अतोनात दु:ख झाले. त्यांनी गुणवर्मन यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. गुणवर्मन यांनी त्या स्त्रियांना दिक्षा देण्याची तयारी दाखविली व नंदी जहाजाच्या नाखव्याला श्रीलंकेतून अजून भिक्षुणींना घेऊन येण्याची विनंती केली. तसेच या ज्या श्रीलंकेवरुन आठ जणी आल्या होत्या त्यांना चीनी भाषेचा अभ्यास करण्यास सांगितले म्हणजे त्यांनी चीनी स्त्रियांशी बोलून त्या दिक्षा घेण्यास सक्षम आहेत का हे कळेल. असे म्हणतात नंदी जहाज दहा वर्षांनंतर अजून दहा भिक्षुणींना घेऊन नानजिंगला परतलं आणि आता भिक्षुणींची संख्या पुरेशी असल्यामुळे तिनशे चीनी स्त्रियांना दिक्षा देण्यात आली. अशा रितीने चीनी भिक्षुणींचा संघ अस्तित्वात आला. आता या संघासाठी नियम करणे आले. यिंग-फाऊ मठाच्या भिक्षुणी गुणवर्मन यांच्याकडे आल्या आणि त्यांनी प्रर्थना केली. आता भिक्षुणींची संख्या पुरेशी असल्यामुळे तेही काम पूर्ण करण्यात आले. (या गोष्टीमधे काळाचा जरा गोंधळ झाला आहे असे मला वाटते)

जेव्हा गुणवर्मन प्रवचनांमधे ताओ आणि कनफ्युशियस यांच्या तत्वज्ञानातील उदाहरणे देत असे तेव्हा काही श्रमणांनी त्यांना विचारले, ‘‘ हे कसे काय ?’’ तेव्हा त्यांनी उत्तर दिले, ‘‘ चीनी सामान्यजनांना ज्या भाषेत कळते तीच भाषा वापरायला पाहिजे नाहीतर बहिऱ्यांसमोर पाच स्वर आळविल्यासारखे किंवा आंधळ्यांसमोर पाच रंगाचे वर्णण केल्यासारखे होईल.’’

याने भाषांतर केलेल्या ग्रंथाची संख्या जास्त नसली तरी त्याच्या कनवाळूपणामुळे तो सामान्यजनात फार लोकप्रिय होता. नानजिंगला असताना तो महायान पंथातील दोन सूत्रांवर प्रवचने देत असे. एक होते अवात्माशकसूत्र आणि दुसरे दशभूमिकासूत्र.

एक दिवस प्रवचने देऊन झाल्यावर हा ज्ञानी पंडीत आपल्या निवासस्थानी परत गेला. त्याच्या मागे त्याचे शिष्य काही शंकांचे निरसन करुन घेण्यासाठी गेले असता गुणवर्मन त्यांना मृत अवस्थेत सापडले. त्यांच्या समोर एक ३० श्लोकांचे सूत्र पडले होते ज्यात ‘‘ हे सूत्र माझ्या निधनानंतर भारतात व चीनमधे प्रसिद्ध करावे अशी शेवटची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावेळी यांचे वय होते सदुसष्ठ….

….त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांचा अंत्यविधी दिक्षाभूमीवर भारतीय पद्धतीने करण्यात आला. नाहीतर तो सामान्यपणे दिक्षाभूमीपुढे करण्यात येतो…

यानंतरच्या काळातही बरेच महत्वाचे महंत चीनमधे आले…उदा. गुणभद्र, धर्मजात यास, खिऊ-ना-फी-ती व चाऊ फा कियू…. त्यांच्याबद्दल पुढील भागात…
या भागासाठी श्री बोस यांच्या लिखाणाचा व इतर रिसर्च पेपर्सचा आधार घेण्यात आला आहे.

गुणवर्मन जावाबेटातून चीनमधे आले त्यानंतर अंदाजे चार वर्षांनी मध्य भारतातून गुणभद्राने चीनमधे पाऊल ठेवले. याचा जन्म एका ब्राह्मणकुटुंबात झाला होता. याने महायान पंथाचा इतका खोलवर अभ्यास केला होता की लोक त्याला ‘‘महायान’’ या टोपणनावानेच ओळखू लागले. याचा चीनमधे येण्याचा काळ चीनी ग्रंथात ४३५ असा नमूद केला आहे. याने आठ वर्षात ७८ ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केले. दुर्दैवाने यातील फक्त २८ ग्रंथ वाचले व उरलेले काळाच्या ओघात नष्ट झाले. हा पंडित वयाच्या ७८ व्या वर्षी चीनेमधेच मृत्यु पावला. याने भाषांतरीत केलेल्या काही ग्रंथांची नावे खालीलप्रमाणे. ही नावे मी देत आहे कारण पुढे कधी कोणाला ही नावे लागली तर ती एके ठिकाणी सापडावीत.
१ श्रीमालादेवीसिंहनाद
२ संधीनिर्मोचनसूत्र
३ रत्नकारंदकव्युहसूत्र
४ लंकावतातसूत्र
५ कर्माच्या आड येणारे अडथळे दूर कसे करावेत या संबंधी मार्गदर्शन करणारा एक ग्रंथ..

एक लक्षात घ्यावे लागेल की हे सर्व पंडीत लहानपणापासून बौद्ध धर्माचा अभ्यास करीत होते. सुरवातीस जरी पाठांतरावर भर असायचा तरी थोड्याच काळानंतर त्या सूत्रांचा त्यांनी सखोल अर्थ शोधला असणार. शिवाय नंतर संघात जी वादविवाद करण्याची एक विशिष्ट पद्धत होती/असते त्यामुळे या सर्व श्रमणांची मते चांगली ढवळून निघायची. शिवाय एक लक्षात घेतले पाहिजे की सर्वसामान्य भिख्खू होते तसे अत्यंत बुद्धीमान श्रमणही होतेच. आणि जे ब्राह्मण पंडीत ज्यांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला होता त्यांना सर्व ज्ञान कसे जतन करायचे याचे चांगलेच ज्ञान होते.

गुणभद्रानंतर चीनमधे आला चाऊ फा कीन. याचे भारतीय नाव माहीत नाही. याने सहा ग्रंथांचे भाषांतर केले पण ते नंतर कुठेही सापडले नाहीत ना त्यावरील टीका सापडली. एका ठिकाणी हे ग्रंथ ७३० साली नष्ट झाले अशी नोंद आढळते. या ७३० साली असे काय घडले होते की बरेच बौद्ध ग्रंथ या वर्षी नष्ट झाले असा उल्लेख आढळतो. यावर कोणीतरी संशोधन केले पाहिजे.

४८१ साली अजून एक भारतीय पंडीत चीनमधे आला. त्याचे नाव धर्मजालायास्स. हाही मध्य भारतातून आला. याचे भाषांतरातील योगदान विशेष नाही. पण याने एका ग्रंथाचे भाषांतर केले त्याचे नाव आहे अमितार्थसूत्र.
यानंतर पाचव्या शतकातील शेवटचा पंडीत जो चीनमधे आला त्याचे नाव होते गुणवृद्धी. हाही मध्यभारतातून आला होता. याने तीन वर्षात तीन ग्रंथांचे सहा भागात भाषांतर केले. त्यातील दोनच आज माहीत आहेत. १ सुदत्तसूत्र २ एक सूत्र ज्यात शंभर सूत्रांचा तौलनिक अभ्यास केला आहे.

आपण प्रथम पाहिले की काश्मिर व आफगाणिस्थानमधून हे पंडीत जात होते.
(अफगाणिस्थानमधे काहीच काळापूर्वी जे मेस आयनाक नावाचे शहर सापडले त्याबद्दल वाचल्यावर पूर्ण अफगाणिस्थान हा कसा बौद्धधर्मिय होता आणि तेथे अमेक बौद्धमठ कसे होते याची कल्पना यावी. याबद्दल विकीवर माहिती उपलब्ध आहे. व त्यावर एक माहितीपटही आहे. तो जरुर बघावा.) नंतर मध्यभारतातून ते जाऊ लागले. आता याच्या पुढच्या काळात दक्षिण भारतातून काही पंडीत जाणार होते. पहिला होता धर्मरुची. यांनी कुमारजिवांना त्यांच्या कामात मदत केली आणि स्वत: दोन ग्रंथांचे भाषांतर केले. १ श्रद्धाबलधानावतार मुद्रा सूत्र आणि २ सर्व बुद्धविषय अवतार सूत्र.. हा मठांच्या नियमांचा तज्ञ होता. हे नियम चीनमधील इतर मठांतून शिकविण्यासाठी फिरताना हा चँगॲनमधून बाहेर पडला आणि दुर्दैवाने त्याच्याबद्दल परत काहीही ऐकू आले नाही….

रत्नमती…

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

यानंतर मध्यभारतातून रत्नमती नावाचा पंडीत चीनमधे आला. याने तीन ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील एक होता, महायानोत्तरतंत्रशास्त्र. चीनमधील तांत्रिक पंथाचा हा पहिला उल्लेख आहे. याचा अर्थ हा चीनमधे येण्याआधी या शास्त्राचा चीनमधे चंचूप्रवेश झाला असणार. आपल्या प्रसिद्ध ह्युएनत्संगला या विषयात फार रस होता. याबरोबर धारिणींचा व तंत्रमंत्रांचा चीनीजनमानसात प्रवेश झाला असे म्हणायला हरकत नाही. याने भाषांतर केलेला दुसरा ग्रंथ होता सद्धर्मपुंडरिकसूत्र शास्त्र.

त्याच वर्षी अजून एक थोर भाषांतरकार चीनमधे आला. त्याचे नाव होते बोधीरुची. हा उत्तर भारतातून चीनला गेला असे म्हणतात. पण याने भाषांतरावर जास्त भर न देता धर्मप्रसाराच्या कामाला वाहून घेतले. तरीसुद्धा त्याने २७ वर्षात ३० भाषांतरे केली आणि त्यातील जवळजवळ सगळी आज उपलब्ध आहेत. अर्थात चीमनमधे. त्यातील काहींची नावे आहेत, १ लंकावतारासूत्र २ गयाशिर्ष ३ रत्नकुट ४ विद्यामात्रासिद्धिसूत्र ५ सताक्षरासूत्र.

५२४ साली बुद्धशांत नावाचा एक पंडीत चीनमधे आला त्याने चीनमधे अंदाजे २५ वर्षे व्यतीत केली असावीत असा अंदाज आहे. त्याने भाषांतर केलेले काही ग्रंथ आहेत, १ धशधर्मक २ अशोकदत्तव्याकरण ३ सिंहनाडीकासूत्र.. यानंतर प्राचीन नगरी बनारसमधून एक पंडीत चीनला गेला. त्याचे नाव होते गौतम प्राज्ञऋषी. याने तीन वर्षात १८ भाषांतरे केली. यातील बरीच ७३० सालापर्यंत उपलब्ध असल्याचा उल्लेख आहे पण आता फक्त १३ ग्रंथांचाच उल्लेख सापडतो. त्याने भाषांतरीत केलेल्या काही ग्रंथांची नावे आहेत, १ व्यासपरीप्रिच्छा २ विमलदत्तापरिप्रिच्छा ३ एकश्लोकशास्त्र व चौथे अष्ठबुद्धकसूत्र.

त्या काळात राजा, राजापूत्र, राण्या, सरदार, श्रीमंत व्यापारी यांनी बौद्धधर्म स्विकारुन संघात प्रवेश घेतल्याची असंख्य उदाहरणे आहेत. आता राजाने राज्य कारभार सोडून संन्यास घ्यावा की नाही हा वादाचा मुद्दा होऊ शकेल कदाचित पण बुद्धाच्या शिकवणीचा प्रभाव प्रचंड होता याबद्दल दुमत असायचे कारण नाही. सर्वसंसार परित्याग करुन हे महान लोक सहजपणे श्रमण होत व धम्माच्या प्रसारासाठी बाहेर पडत. याचे एक उदाहरण म्हणजे उद्यानच्या राजाच्या एका मुलाने सिंहासनाचा त्याग करुन संघाची वाट धरली होती. हे राज्य सध्याच्या गिलगिट भागात असावे. या राजपुत्राचे नाव होते उपशुन्य. त्याने नंतर चीनची वाट धरली. त्याने एकूण पाच ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील दोन आहेत, १ विमलकिर्तीनिर्देश २ सुविक्रांतविक्रमी सूत्र. याच भागातून अजून एक पंडीत चीनला गेला त्याचे नाव होते, विमोक्षप्रज्ञऋषी. हा कपिलवस्तूतील एका शाक्य कुटुंबातील होता. याने गौतमप्रज्ञऋषी नावाच्या दुसऱ्या एका महंताबरोबर पाच ग्रंथांवर काम केले. त्यातील दोन आहेत, १ विवादसमानशास्त्र २ त्रिपूर्णसूत्रोपदेश

सहावे शतक :
या काळात नरेंद्रयास, जिनगुप्त व त्यांचे आचार्य जिनयास्स व ज्ञानभद्र या महंतांनी चीनच्या बौद्धधर्मावर बराच प्रभाव टाकला. किंबहुना असे म्हणवे लागेल की जे काही बौद्धधर्माचे स्वरुप आज चीनमधे दिसते त्याचा पाया या महंतांनीच घातला. या काळात बौद्धधर्मप्रसारकांना चीनमधे फार छळ सहन करावा लागला. त्याकाळात चीनमधे अनेक घराणी विविध प्रदेशांवर राज्य करुन गेली. क्वचितच एखादे घराणे दीर्घकाळ राज्य करीत असे. धम्मद्वेष्टा राजा गादीवर आला की हे महंत अज्ञातवासात जात असत, लपून बसत व बौद्धधर्माचा पाठिराखा गादीवर आल्यावर परत आपले काम जोमात सुरु करीत.
यानंतर एक महत्वाचा महंत चीनमधे आला त्याचे नाव होते परमार्थ. या बौद्ध धर्मगुरुबद्दल बरीच माहिती चीनी ग्रंथात आढळते. हा नानजिंगला अंदाजे ५४८ साली आला. तो चीनमधे २१ वर्षे राहिला. तेवढ्या काळात त्याने एकूण ४० भाषांतरे केली. हा अंदाजे ५६९ साली मृत्यु पावला तेव्हा त्याचे वय होते ७१. भाषांतरामधे त्याचा क्रमांक चौथा लागतो. पहिले तीन आपण पाहिलेच आहेत. त्याने भाषांतरीत केलेल्या ग्रंथांवर प्रवचने दिली ती त्याच्या एका शिष्याने लिहून ठेवली. गंमत म्हणजे ती अस्सल चीनी भाषेत असल्यामुळे ती मूळ भाषांतरांपेक्षा मोठी झाली आहेत पण ती अचूक आहेत असे म्हणता येईल.

याचे अजून एक महत्वाचे कार्य म्हणजे त्याने चीनी भाषिकांना समजेल अशी भाषा त्याच्या प्रवचनात व लेखनात वापरण्यास सुरुवात केली. त्याची काही उदाहरणे आपण नंतर वाचूयात. अगोदर तो कोण होता, कुठला होता हे आपण पाहू.
परमार्थ याचा एक लाडका चीनी शिष्य होता, ज्याचे नाव होते हुई-काई. याच्या भाच्याने परमार्थाचे एक चरित्र लिहिले होते. याच्यातून थोडीफार जी माहिती मिळते त्यातून हे स्पष्ट होते की हा चीनी नव्हता तर भारतीय होता. याचे पुर्वाश्रमीचे नाव होते कुलनाथ. याचा जन्म झाला होता मध्यभारतातील उज्जैनमधे. हा जन्माने ब्राह्मण असून त्याचे गोत्र भारद्वाज होते. त्या ग्रंथात लिहिले आहे की त्याची नितिमत्ता अत्यंत उंच दर्जाची होती. त्याचा सर्व सूत्रांचा अभ्यास पूर्ण झाला होता. साहित्य, जादू, चित्रकला व हस्तकलेमधे याने चांगले प्राविण्य मिळविले होते. परमार्थाने तारुण्यात काय केले याबद्दल कुठेही विशेष माहिती मिळत नाही. परंतू तो काळ त्याने निव्वळ अभ्यासात व्यतीत केला असावा. अनेक देश विदेशांचा प्रवास करीत त्याने फुनानमधे मुक्काम ठोकला. फुनान म्हणजे आत्ताचे दक्षिण व्हिएटनाम. (मेकाँग नदीचे खोरे) हा भाग त्याकाळात पूर्णपणे हिंदू होता. त्याकाळी चीनमधे राज्य करीत असलेल्या लिअँग घराण्याच्या वू नावाच्या राजाने बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अतोनात संपत्ती खर्च केली होती.

सम्राट वू

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून देशोदेशीचे अनेक बुद्धिमान महंत तो स्वखर्चाने चीनला आणत असे. या सम्राटाला जन्म-मृत्युच्या चक्रात अडकण्याची प्रचंड भिती वाटत असे. महायानामधे यावर काहीतरी उपाय सापडेल या आशेने त्याने अशा महंतांचा शोध घेण्यास सुरुवात केली. याच शोधात फुनानमधून त्याला हे रत्न हाती लागले. ही माहिती खरी असावी कारण हा ग्रंथ ५९७ साली लिहिण्यात आला होता म्हणजे परमार्थ चीनला आल्यानंतर जेमतेम साठ वर्षांनी. या लेखकाचे नाव होते पाओ-कुई. याचाही मृत्यु परमार्थाच्या मृत्युनंतर तेरा वर्षांनी झाला. त्यामुळे या लेखकाने लिहिलेली ही माहिती बऱ्यापैकी विश्र्वसनीय आहे. अलिकडे सापडलेल्या काही ग्रंथात परमार्थच्या चीनच्या प्रवासाची माहिती आढळते. त्यात सम्राट वूने मगधाच्या दरबारात काही प्रतिनिधी सूत्रे व ग्रंथ मिळविण्यासाठी पाठविले होते. त्यावेळेस त्या प्रतिनिधींची गाठ कुलनाथाशी पडली. त्याने प्रथम चीनला जाण्यास ठाम नकार दिला पण बऱ्याच प्रयत्नांनंतर तो त्याच्या एका शिष्याबरोबर चीनला जाण्यासाठी जहाजात चढला. त्या शिष्याचे नावही दिले आहे – गौतम. त्यावेळेस त्याने मगध सम्राटाकडून लाकडात कोरलेली बुद्धाचे एक प्रतिमा चीनी सम्राटासाठी बरोबर घेतली. असे म्हणतात या प्रतिमेची नक्कलच मग सर्वदूर बुद्धाचे चित्र म्हणून प्रसारीत झाली.

परमार्थ नान्हाईला २५ सप्टेंबर ५४४६ या दिवशी पोहोचला. नान्हाई म्हणजे हल्लीचे कॅन्टन किंवा ग्वाझाऊ. ज्याचा चिनी अर्थ आहे तांदूळाचे शहर. जेव्हा तो दरबारात पोहोचला तेव्हा त्याच्या स्वागतासाठी स्वत: सम्राट पुढे आला. एवढेच नव्हे तर आपल्याला वाचून आश्र्चर्य वाटेल, सम्राटाने परमार्थाला साष्टांग नमस्कार घातला. सम्राटाचे वय त्यावेळेस होते ८५. असे आजवर चीनमधे कधीच घडले नव्हते. त्यानंतर सम्राटाने परमार्थाशी एका मठात (पाओ-युन) चर्चा केली. दुर्दैवाने परमार्थाला सम्राटाविरुद्ध चाललेल्या बंडाळीची कल्पना आली नाही. टोबा जमातीच्या हौ-चिंग नावाच्या एका नेत्याने सम्राटाविरुद्ध बंडाचे निशाण उभारले. या रणधुमाळीत सम्राट वूची उपासमार करुन त्याचे हत्या करण्यात आली. त्या अगोदर परमार्थाला जेमतेम दहा महिने राजाश्रय मिळाला असेल नसेल. त्याने नानकिंगमधून पळ काढला व तो नानकिंगच्या आग्नेय दिशेला १५०० मैलावर असलेल्या सिॲओ पर्वताच्या पायथ्याशी पोहोचला. तेथे फुचुन प्रांताचा अधिपती असलेल्या लु-युआन-चे नावाच्या सरदाराने त्याला आश्रय दिला. यानेही नुकताच बौद्धधर्म स्विकारला होता. तेथे राजाश्रय मिळाल्यावर परमार्थाने परत एकदा आपले भाषांतराचे काम सुरु केले. त्यावेळेस अशा धामधुमीच्या कालातही त्याच्या हाताखाली वीस तज्ञ काम करीत होते यावरुन या कामाचे महत्व लक्षात येते. दुर्दैवाने यातील बरेच ग्रंथ काळाच्या उदरात गडप झाले आहेत.

ज्या बंडखोराने वू सम्राटाची हत्या केली होती, अनेक मठ उध्वस्त केले होते त्याला आता बौद्धजनांचा पाठिंबा आवश्यक वाटू लागला. बौद्ध जनतेचा विश्र्वास संपादन करण्यासाठी त्याने ज्याला बौद्धधर्मियांमधे मान आहे अशा परमार्थाला राजधानीत येण्याचे आमंत्रण दिले. नाही म्हणायचा प्रश्र्नच नव्हता. यात हाऊ-चिंगचा दुसराही एक उद्देश होता. परमार्थाला जवळ ठेवून त्याच्यावर लक्षही ठेवता येणार होते व बौद्धधर्माचा अभ्यास त्याच्या दरबारी चालू आहे असा देखावाही ऊभा करत येणार होता. असो. परमार्थ राजधानीत पोहोचला. चारवर्षापूर्वी त्याने याच दरबारात मानाने पाऊल ठेवले होते. चार महिने हाऊ चिंगच्या दरबारात स्थानबद्धतेत काढल्यावर परत एकदा सत्ताबदल व रक्तपात परमार्थास पाहण्यास मिळाला. त्यानंतर सम्राट युआनच्या काळात मात्र परमार्थाने शहाणपणा करुन दरबार सोडला व नानकिंग शहरात चेंग-कुआनच्या मठात आसरा घेतला. तेथे त्याने सुवर्णप्रभाससूत्राचे भाषांतर केले. नंतरच्या काळात त्याने चीनमधे बराच प्रवास केला. त्याचे वर्णन करणे शक्य आहे पण वाचकांना कदाचित ते कंटाळवाणे वाटण्याची शक्यता आहे म्हणून ते येथे देत नाही. पण प्रवासात पाओशिएन मठात त्याने मैत्रेयसूत्राचे व अजून एका सूत्राचे भाषांतर केले. दहा वर्षे प्रवास केल्यानंतर परमार्थाला आता घरी जाण्याची ओढ लागली असावी…. त्याच्या चरित्रात लेखक लिहितो…

‘‘ बौद्धधर्माचा एवढा प्रचंड अभ्यास केल्यानंतर, त्याच्या प्रसारासाठी एवढी पायपीट व समुद्र पार केल्यानंतर हळुहळु त्याला उमगले की त्याला जे पाहिजे होते ते या शिकवणीत मिळत नाही. बौद्धधर्माची शिकवण अपूर्ण आहे हे उमगताच तो खचला. खिन्नतेने त्याच्या विचारांवर मात केली. त्याने लंकासुखाला (मलेशियाला) जाण्याचे ठरविले. त्याच्याबरोबर आलेल्या ग्रामस्थांनी व शिष्यांनी त्याला तेथेच राहाण्याचा इतका आग्रह केला की त्यांचे मन त्याला मोडवेना. त्याने जहाजात चढण्याचा निर्णय रद्द केला व परत एकदा भाषांतराच्या कामाला लागला…. चीन सोडण्याचा विचार नंतर त्याच्या मनात अजून एकदा आला व त्यावेळी तो एका छोट्या बोटीतून प्रवासाला लागलाही पण त्याच्या दुर्दैवाने ती बोट उलट फिरलेल्या वाऱ्यामुळे परत किनाऱ्याला लागली. शेवटी शेवटी तर या सगळ्याचा कंटाळा येऊन त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. कँटनच्या उत्तरेला असलेल्या पर्वतात तो आत्महत्या करण्यास गेला असता त्याचा एक शिष्य अभिकोषधर्मावर प्रवचन देत होता. त्याला हे कळल्यावर त्याने डोंगरात धाव घेतली. असे म्हणतात तेथे खरोखरच पाठ शिवणीचा खेळ झाला. त्या प्रांताच्या राज्याधिकाऱ्यानेही काही सैनिक पाठविले व स्वत: तेथे हजर झाला. त्याने तर त्याच्यापुढे चक्क लोटांगण घातले व शेवटी काही दिवसांनी परमार्थाची मानसिक स्थिती मूळपदावर आली. दुर्दैवाने या आलेल्या झटक्यानंतर त्याचा अत्यंत लाडका शिष्य, हुई-काई एका आजारात मृत्युमुखी पडला. तो धक्का सहन न होऊन परमार्थही आजारी पडला व त्या आजारपणातच त्याचा अंत झाला. तेव्हा त्याचे वय होते ७१. दिवस होता १२ फेब्रुवारी ५६९. दुसऱ्या दिवशी त्याचा अंत्यसंस्कार कँटनच्या बाहेर उरकण्यात आला व तेथे एक त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ एक स्तूपही उभारण्यात आला…

परमार्थाचे चीनीबौद्धधर्मातील व चीनी बौद्धजिवनातील योगदान काय यावर आपण थोडीशी माहिती घेऊ.
चीनमधे सहाव्या शतकात बरीच जुनीपुराणी माहिती गोळा करुन ग्रंथ लिहिण्यात आले.. एकाचे नाव होते काओ-सेंग-शुआन..म्हणजे थोर बौद्ध भिख्खूंची चरित्रे. यात या महंतांच्या तत्वज्ञाची माहिती तर आहेच पण ते सामान्य माणूस म्हणून कसे होते याबद्दलही माहिती आहे. दुसरा होता सु-काओ-सेंग चुआन, हा या ग्रंथाचा दुसरा भाग होता. या दोन्ही ग्रंथांवर फ्रेंच तज्ञांनी अतोनात कष्ट घेऊन काम केले आहे. आज या महंत/पंडीतांबद्दल जी माहिती उपलब्ध आहे ती या ग्रंथांवर प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे बेतलेली आहे.

लिअँग आणि चेन घराण्याची सत्ता असताना जी काही राजकीय उलथापालथ झाली त्यात परमार्थाने उच्चवर्गातील चीनी बुद्धिवंतांना योगाचाराची दिक्षा दिली. त्यांच्यामधे योगाचाराची गोडी निर्माण केली. त्याचा प्रभाव पार ह्युएनत्संगपर्यंत टिकला. आपल्याला कल्पना असेलच ह्युएनत्संगने योगाचाराचे एक विद्यापीठच काढले होते. हिंदूंचा योगाभ्यास आणि बौद्धांचा योगाचारामधे बराच फरक आहे. पण योगाचाराचा पाया योगाभ्यासच आहे असे मला वाटते. कारण चौथ्या-पाचव्या शतकात दोन ब्राह्मण बंधूंनी बौद्ध धर्म स्विकारला. त्यांचा योगाभ्यास झालेला असणार. त्यांची नावे होती आसंग व वसूबंधू. यातील वसूबंधू हा पहिला योगाचारी म्हणून ओळखला जातो. चीनला जाण्याआधी परमार्थावर या दोघांच्या तत्वज्ञानाचा प्रभाव पडला असणार. (परमार्थांचा जन्म वसूबंधू नंतर १५० वर्षांनी झाला) किंवा म्हणूनच त्याला योगाचारात रस निर्माण झाला असावा. शिवाय वल्लभींच्या राज्यात तोपर्यंत योगाचाराच्या एका विद्यापीठाची अगोदरच स्थापना झाली होती. आपल्याकडे परंपरा जपण्याची तेव्हाची पद्धत लक्षात घेता परमार्थावर वसूबंधूचा प्रभाव पडणे सहज शक्य आहे. एक लक्षात घेतले पाहिजे हे तिघेही योगाचारी होण्याआधी महायानी होतेच. परमार्थाला ‘जाणीवेतून केलेले कर्म आणि त्या दोन्हीचे अध्यात्मिक साक्षात्काराशी असलेले नाते’ याचे विश्र्लेषण करण्यात अत्यंत रस होता. तो विचारे, ‘‘जर मनुष्य स्वभाव मूळत: चांगला आहे व प्रत्येकजण अध्यात्मिक साक्षात्कारास पात्र आहे तर मग मनुष्यप्राणी यावर विश्र्वास का ठेवत नाही आणि साक्षात्कारी माणसांसारखे का वागत नाहीत?’’ महायनाच्या मुळापाशी हाच प्रश्र्न आहे आणि ज्यावर परमार्थाने आयुष्यभर विचार केला. शेवटी काय झाले हे आपण पाहिलेच आहे. योगाचारामुळे त्याच्यावर चीनमधे भरपूर टीकाही झाली पण शेवटी ताओवाद्यांना व कनफ्युशियस तत्वज्ञानी यांच्यावरही योगाचाराचा थोडासा का होईना प्रभाव पडलाच. हे यश परमार्थाचेच म्हणावे लागेल. हे तत्वज्ञान परदेशातील लोकांना सांगणे किती अवघड आहे हे आपणाला माहितच आहे. उदा. पाश्चिमात्य तत्वज्ञानात सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट म्हणतात. म्हणजे जो बघतो ते सब्जेक्ट आणि जे दिसते ते ऑब्जेक्ट. पण योगाचारामधे ग्राहक आणि ग्राह्य ही संकल्पना आहे. सोप्या भाषेत आकलक आणि आकलन. तुम्ही एखादी वस्तू बघितलीत पण त्याचे आकलन प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो. एखादा रंगांधळा लाल रंगाला करडा रंग म्हणतो तर तुम्ही लाल….मला हे थोडक्यात चांगले समजवून सांगता येणे अवघड आहे. पण हा सर्व चित्ताच्या पटलावरील प्रतिमांचा खेळ आहे असे योगाचारी त्या काळात मानत. उदा मी डोळे मिटले मग माझ्यापुरता समोरचा डोंगर अस्तित्वात नाही…इ.इ.इ. आत्ताचे माहीत नाही. त्यातही बराच बदल झालाच असेल. असो. तर असे हे तत्वज्ञान त्या धामधुमीच्या काळात चीनी बुद्धिमान लोकांना समजवून सांगणे किती अवघड असेल याची कल्पना आपण करु शकतो. शिवाय हे सगळे चीनी भाषेत.

उज्जैनचा हा ब्राह्मण श्रमण होतो. धम्माचा अभ्यास करतो. त्यातूनही अवघड अशा योगाचाराचा अभ्यास करुन परदेशी जातो, व तेथे भव्य, दिव्य कार्य करतो…याचे काय स्मारक उज्जैन मधे आहे? त्याचे कोणी वंशज आहेत का? त्याच्या तारुण्यातील वर्षांचा हिशेब लागत नाही तो लागेल का ? असे अनेक प्रश्र्न माझ्या मनात येतात. मीही कल्पनेने त्या प्रश्र्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो…..

यानंतर चीनमधे आला नरेंद्रयास्स.
नरेंद्रयास्स यांचे चरित्र आपल्याला चीनी सिऊ काओ सेंग त्सुआन या ग्रंथात वाचण्यास मिळते. हा उद्यानचा रहिवासी होता. याने भारतभर प्रवास केला होता. तो श्रीलंकेलाही जाऊन आला. त्यानंतर त्याने चीनला जाण्याचे ठरविले. पाच सहाय्यकांबरोबर त्याने हिंदूकुश पर्वत रांगा चढण्यास सुरुवात केली. लवकरव त्यांच्या समोर दोन रस्ते उभे ठाकले. एक रस्ता जो अत्यंत कठीण होता तो माणसांसाठी होता आणि जो सोपा होता त्यावर राक्षसांचा वास होता. म्हणजे बहुदा चोर, दरोडेखोरंच्या टोळ्या यांचा वास असावा. बरेच वाटसरू, व्यापारी सोपा मार्ग पकडत व लुटले जात किंवा मारले जात. या फाट्यावर एका राजाने वैश्रमणाचा एक भव्य पुतळा उभा केला होता. हा पुतळा ज्या दिशेला बोट दाखवित असे तो मार्ग बरोबर असा संकेत होता. यांच्याबरोबर जे श्रमण होते त्यातील एकाने नजरचुकीने चुकीचा मार्ग पकडला. अवलोकितेश्र्वराची प्रार्थना करुन जेव्हा त्याने त्याचा शोध घेतला तेव्हा त्याचे प्रेत त्या रस्त्यावर सापडले. त्या काळात त्या भागात तूर्की वंशाच्या लोकांच्या चीनी लोकांशी चकमकी चालू होत्या. त्या संकटांवर मात करुन तो चीनच्या राजधानीत पोहोचला अंदाजे ५५६ मधे. त्यावेळेस त्याचे वय होते ४०. चीनमधे आल्यावर त्याने तिएन-पिंग मठात राहण्यास सुरुवात केली व अर्थातच भाषांतराचे काम हाती घेतले. असे कित्येक ग्रंथ अहेत जे भारतातून नष्ट झाले होते पण चीनमधे शाबूत होते. त्या चीनी ग्रंथांचे फ्रेंच अभ्यासकांनी फ्रेंच भाषेत भाषांतर केले जे परत संस्कृतमधे भाषांतरीत करण्यात आले आहेत. नरेंद्रयास्साने ज्या ग्रंथांचे भाषातर केले त्यातील काही – १ पो-सुकिएन चे सुन मेइ किंग २ युई त्संग किंग ३ युईतेंग सान मी किंग…व अजून चार आहेत. दुर्दैवाने तार्तार वंशीय चाऊ घराण्याची सत्ता आल्यावर हे सगळे चित्र पालटले. त्यावेळचा चाऊ राजा हा बुद्धाचा द्वेष करीत असे. सम्राट वौ’ने बुद्धधर्म चीनमधून हद्दपारच केला असे म्हणायला हरकत नाही. सगळे धर्मगुरु, श्रमण, पंडीत त्यामुळे अज्ञातवासात गेले किंवा परत आपल्या मूळस्थानी गेले. सुदैवाने त्यानंतर गादीवर आलेले सुई घराणे हे बौद्धधर्माचे आश्रयदाते असल्यामुळे परत एकदा धर्माने चीनमधे जोर धरला. परत आलेल्या श्रमणांनी आपल्याबरोबर अनेक संस्कृत ग्रंथ आणले होते त्याचे भाषांतर करण्यासाठी नरेंद्रयस्साचे नाव पुढे आले. त्याला अज्ञातवासातून सन्मानाने परत राजधानीमधे बोलाविण्यात आले व नवीन ग्रंथांचे भाषांतर करण्यासाठी तीस श्रमणांना त्याच्या हाताखाली देण्यात आले. या सहाय्यकांच्या मदतीने त्याने तीन वर्षात आठ ग्रंथांचे भाषांतर केले. मी जेव्हा ग्रंथ म्हणतो तेव्हा पानांची संख्या हा आधार न धरता विषय हा आधार धरला आहे. काही शेकडो पानांचे असतील तर काही थोड्या पानांचे असावेत. या चमूने केलेले भाषांतर तेवढे समाधानकारक नसल्यामुळे अजून एका पंडीताला शोधून काढण्यात आले. हाही त्या काळात भूमिगत झाला होता. त्याचे नाव होते जिनगुप्त. त्यावेळेस नरेंद्रयास्स कुआन झी मठात रहात होता.

जिनगुप्त येईपर्यंत भाषांतराचे काम स्थगित ठेवण्यात आले. त्यानंतर चारच वर्षांनी या थोर माणसाचा मृत्यु झाला. थोर यासाठी की त्याने अत्यंत कठीण काळात बौद्धधर्माची पताका फडकत ठेवली होती. भुमिगत राहून एखाद्या क्रांतीकारकांसारखे त्याने श्रमणांचे जाळे विणले. त्याने हे जे मोठे काम केले त्यासाठी त्याच्या असमाधानकारक भाषांतराला क्षमा केली पाहिजे……

चीनी बुद्धाची प्रतिमा..

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

” मी मागे वळून बघतो तेव्हा मी ज्या प्रसंगातून गेलो ते आठवून मलाच घाम फुटतो. कल्पना करता येणार नाही अशा संकटाना तोंड देत मी अनेक खडतर मार्गाने धोकादायक जागी प्रवास केला. हे करताना मी कधीच स्वत:च्या प्राणाची पर्वा केली नाही कारण माझ्यासमोर एक निश्चित ध्येय होते. व ते साध्य करण्यासाठी मी सरळमार्गांचाच वापर केला…. जे मला मिळवायचे आहे त्याच्या दहा हजाराव्वा हिस्सातरी मिळेलच अशा आशेने मी ज्याठिकाणी मृत्यु अटळ आहे अशा ठिकाणीही त्याला मोठ्या धैर्याने सामोरा गेलो……
….फा-शिएन.

फा-शिएनचे हे वाक्य भारतीय पंडितांनाही लागू पडते.

५५७ साली भारतातून चार पंडीत चीनला पोहोचले. म्हणजे निघाले होते दहा पण त्यातील चार जण जिवंतपणे चीनला पोहोचले. त्यांची नावे होती –
१ ज्ञानभद्र २ जिनायास्स ३ यशोगुप्त आइ ४ जिनगुप्त. पहिले दोन शेवटच्या दोघांचे आचार्य होते. वर म्हटल्याप्रमाणे या चौघांनी दहाजणांचा एक चमू तयार केला व चीनसाठी प्रस्थान ठेवले. ज्ञानभद्राने चीनमधे आल्यावर विशेष कार्य केलेले आढळत नाही. त्याने फक्त एकाच ग्रंथाचे चीनी भाषेत भाषांतर केले ते म्हणजे पंचविद्याशास्त्र. यात त्याने त्याच्या शिष्यांची मदत घेतली अशी नोंद चीनी इतिहासात आढळते.

जिनयास्स : आचार्य जिनयास्सांनी त्यांच्या शिष्यांच्या मदतीने सहा ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील फक्त दोन ग्रंथांची नावे सध्या ज्ञात आहेत. १ महामेघसूत्र २ महायानाभिस्मय सूत्र. यशोगुप्ताने आपल्या आचार्यांच्या हाताखाली दोन ग्रंथांचे भाषांतर केले. १ अवलोकितेश्र्वरासमुखाधारिणी हा भारताच्या कुठल्या भागातून गेला होता ते कळत नाही. तो जेथून आला त्याचे नाव चीनी इतिहासात लिहिले आहे, पण हे ‘यिऊ-पो’ कोठे आहे हे समजत नाही.

शेवटचा पण महत्वाचा पंडीत आहे – जिनगुप्त किंवा ज्ञानगुप्त.

जिनगुप्त

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या पंडितांबद्दल माहिती मिळते ती ताओ-सिआन नावाच्या लेखकाने ६५० साली प्रकाशित केलेल्या एका ग्रंथात. या ग्रंथाचे नाव आहे सियु-काओ-सेंग-चाऊआन. इतर ग्रंथांतून माहिती गोळा करुन त्याचे चरित्र लिहिले असा उल्लेख त्याने त्या ग्रंथात केला आहे. म्हणजे हा पंडीत महत्वाचा असला पाहिजे. जिनगुप्तांनी एकूण ३६ ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील सगळ्यात महत्वाचे आहेत बुद्धचरित व सद्धर्मपुंडरिकासूत्र. बुद्धचरित लिहून त्याने कुमारजीव आणि इतरांबरोबर स्थान मिळविले असे म्हणायला हरकत नाही. हा अफगाणिस्तानमधील (सध्याचे पाकिस्तान) पेशावरचा एक श्रमण होता. त्याच्या घराण्याचे नाव होते कंभू. जातीने हा क्षत्रिय असून त्याच्या वडिलांचे नाव होते वज्रसार. घरातील सगळ्यात लहान असलेल्या या मुलात पहिल्यापासूनच विरक्तीचा भाव दिसू लागला होता. असे म्हणतात वयाच्या सातव्या वर्षीच त्याने वडिलांकडे श्रमण होण्यासाठी परवानगी मागितली आणि त्याच्या वडिलांनी ती दिली. त्यांची परवानगी घेऊन त्याने महावन मठात प्रवेश घेतला. तेथेच त्याला आचार्य ज्ञानभद्र आणि जिनयास्स यांची शिकवण लाभली. किंबहुना त्यांच्यामुळेच त्याचे भवितव्य घडले. तो २७ वर्षांचा असतानाच त्याच्या आचार्यांनी चीनला धम्म प्रसारासाठी जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्यांच्या शिष्यांनाही बरोबर घेतले. त्यांचा मार्ग बिकट व खडतर होता. त्यांनी रस्त्यात कपिचा नावाच्या शहरात एक वर्ष मुक्काम केला. या खडतर प्रवासात जिनगुप्ताने आपल्या आचार्यांची चांगली काळजी घेतली. खोतान पार करुन ते अखेरीस ५५७ साली चीनला पोहोचले. दुर्दैवाने दहापैकी हे चारचजण तग धरु शकले. ५५९-५६० याच काळात केव्हातरी जिनगुप्त चँगॲनला आला व चाओतांग मठात राहिला. राजधानीत स्थानिकांत मिळून मिसळून राहिल्यामुळे तो लवकरच चीनी शिकला. त्या काळात चँगॲनला मिंग घराण्याचे राज्य होते. त्यांनी या चौघांसाठी एक नवीन मठ बांधला. त्याच मठात हे चौघे भाषांतराचे काम करु लागले. त्यांनी भाषांतर केलेल्या अवघड ग्रंथाची नावे आहेत – कनकवर्णऋषी परिप्रच्छसूत्र आणि अवलोकितेश्र्वर सूत्र.

जिनगुप्ताच्या न्यायी स्वभावामुळे तो चांगलाच लोकप्रिय झाला आणि प्रथमच एका भारतीय माणसाला एका सुभ्याचा अधिकारी म्हणून नेमण्यात आले. त्या जबाबदारीतून वेळ काढून त्याने अजून दोन ग्रंथांचे भाषांतर केले.
दुर्दैवाने याच सुमारास चाऊ घराण्याचा उदय झाला आणि त्यांनी बौद्धधर्माचा राजाश्रय काढून घेतला. नुसता काढून घेतला नाही तर बौद्धांना चीनमधून हद्दपार करण्याचा हुकूम काढला. या राजकीय धुमाळीत अनेक पंडितांना, मठवासियांना चीनमधून हुसकावून लावण्यात आले. जिनगुप्तही या वादळाला पाठ देत मध्य एशियात पोहोचले. (सध्याचा उगुर प्रांत). त्याचवेळी भारतातून काही चीनी भिक्खू चीनला परतत होते. चीनी राज्यसत्ता बौद्धांच्या विरुद्ध असल्यामुळे तेथे कुठे जाण्याचा प्रश्र्नच नव्हता. त्यांची आणि जिनगुप्ताची त्याच प्रांतात गाठ पडली. त्यांनी भारतातून जवळजवळ २०० ग्रंथ आणले होते. त्यांनी जिनगुप्तास त्यांचे भाषांतर करण्याची विनंती केली. त्यांना प्रथम जिनगुप्त हा साधासुधा श्रमण आहे असे वाटले पण लवकरच त्यांना त्याचे ज्ञान किती सखोल आहे हे कळले. त्यांनी त्याला धम्माचा प्रसार करु असे वचन दिले. ५८१ साली धम्मावर दाटलेले काळे ढग हटले आणि राज्यसत्ता सुई घराण्याच्या हातात गेली. हे घराणे बौद्धधर्माचे मोठे पाठिराखे होते. तात्कालिन राजाने ताबडतोब एक समिती नेमली व भाषांतराचे काम सुरु करण्याची अनुमती दिली. या समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्षपद नरेंद्रयास्स यांना देण्यात आले होते असा उल्लेख सापडतो. या समितीचे काम समाधानकारक न वाटल्यामुळे इतर भिक्खूंनी सम्राटाची गाठ घेतली व त्याला जिनगुप्तास उगुरमधून बोलाविण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करुन सम्राटाने ताबडतोब तसे आज्ञापत्र रवाना केले. इकडे जिनगुप्तासही चीनला परतायचे वेध लागले होते. ते आज्ञापत्र मिळताच तो लगबगीने चीनला परतला. तो आल्यावर त्याच्यावर ही जबाबदारी टाकण्यात आली. त्याला सहाय्य करण्यासाठी धर्मगुप्त व दोन चीनी श्रमणांची नेमणूक करण्यात आली. याचबरोबर दहा चीनी श्रमणांची हे भाषांतर तपासण्यासाठी नेमणूक करण्यात आली. यांचे काम त्या भाषांतरात मूळचा भाव जपला जात आहे की नाही हे तपासण्याचे होते. ते यासाठी जिनगुप्तांशी चर्चा करीत व आवश्यक त्या सुधारणा करीत. यामुळे भाषांतरे बरीच अचुक होऊ लागली. एवढेच नाही तर भाषांतराची शैली मूळ चीनी वाटावी यासाठी अजून दोन साहित्यिक श्रमणांचीही नेमणूक करण्यात आली. हा असा शास्त्रशुद्ध भाषांतराचा प्रकार चीनमधे प्रथमच होत होता. लवकरच जिनगुप्ताची नेमणूक तेंग घराण्याच्या राजगुरुपदी करण्यात आली आणि बौद्धधर्माची पताका परत एकदा फडकू लागली. त्याने भाषांतर केलेल्या ग्रंथांची संख्या एकंदरीत ३७ भरते व त्यात एकूण १६६ प्रकरणे अंतर्भूत होती. त्यातील काहींची नावे अशी-
१ बुद्धचरित्र २ फा-किऊ ३ वी-तो ४ राष्ट्रपालपरिपृच्छसूत्र ५ भद्रपालश्रेष्ठीपरिपृच्छ सूत्र आणि इतर. ( सगळी नावे उपलब्ध आहेत पण विस्तारभयापोटी येथे देत नाही.)

सम्राट चाऊने जिनगुप्तास काही भारतीय खगोलशास्त्रांवरील ग्रंथांचे भाषांतर करण्यास सांगितले. त्यात एकूण २०० प्रकरणांचे भाषांतर करण्यात आले. साल होते ५९२ ! भारतातून चीनमधे या मार्गाने आणि प्रकाराने कुठले कुठले ज्ञान-विज्ञान गेले हा एक संशोधनाचा विषय ठरावा. जिनगुप्ताचा सहाशे साली ७८व्या वर्षी मृत्यु झाला. जिनगुप्ताने धम्मासाठी खूपच हालआपेष्टा काढल्या पण धम्मापासून तो कधीही ढळला नाही आणि ना त्याच्या मनात भारतात परत जायचा कधी विचार आला.

५०० ते ६०० या काळात भारतातून नाव घेण्याजोगे अजून तीन धर्मगुरु चीनला गेले. १ गौतम धर्मज्ञान. हा पूर्वी चीनला गेलेल्या गौतमाऋषींचा सगळ्यात थोरला मुलगा. अर्थातच तो बनारसचा होता. चीनमधे गेल्यावर त्यावेळच्या सम्राटाने त्याच्यावर काही प्रशासकीय जबाबदाऱ्या टाकल्या ज्या त्याने चांगल्या प्रकारे पार पाडल्या. एकदा तर तो एका प्रांताचा सुभेदारही झाला. त्याने एक ग्रंथ चीनी भाषेत लिहिला ज्याचा विषय होता – विविध प्रकारच्या कर्माचे होणारे विविध परिणाम.
दुसरा धर्मगुरु होता विनितऋषी. हा उद्यानदेशीचा श्रमण ५८२ साली चीनला पोहोचला व त्याने दोन ग्रंथांचे भाषांतर केले. १ गयशीर्षसूत्र आणि २ महायानवैपुल्यधारिणीसूत्र.

या शतकातील चीनला जाणारा शेवटचा श्रमण होता धर्मगुप्त. हाही जिनगुप्त ज्या मार्गाने चीनला आला त्याच मार्गाने चीनमधे आला. त्याने एकूण दहा ग्रंथांचे भाषांतर केले. त्यातील काहींची नावे – १ वज्रछेदिकाप्रज्ञपरिमितासूत्र २ निदानसूत्र ३ निदानशास्त्र…

ह्युएनत्संग व इ-शिंगचा काळ ( ६००-७००)

या शतकात पहिला श्रमण चीनला पोहोचला त्याचे नाव होते प्रभाकरमित्र. मध्यभारतातील एका क्षत्रिय कुटुंबातील या श्रमणाने चीनमधे पाऊल ठेवले त्यावेळेस थान घराण्याचे राज्य चालू होते. त्याने तीन ग्रंथाचे भाषांतर केले व चीनमधे वयाच्या ६९व्या वर्षी देह ठेवला. त्याने लिहिलेल्या ग्रंथाची नावे – रत्नताराधारिणीसूत्र २ प्रज्ञाप्रदीपशास्त्रटिका ३ सुत्रालंकारटिका. हा चीनला गेला त्यानंतर दोनच वर्षांनी ह्युएनत्संगने त्याच्या भारतयात्रेस सुरुवात केली. अंदाजे ६५२ साली एका नवीन पंडीताने चीनला भेट दिली. त्याचे नाव होते अतिगुप्त. याला दोन वर्षात एकाच ग्रंथाचे भाषांतर करता आले. – धारिणीसंग्रहसूत्र. यानंतर चीनला गेला ‘नाडी’ नावाचा पंडीत. याने भारत, श्रीलंका येथे फिरुन १५०० हिनयान व महायान पंथाचे बौद्ध ग्रंथ जमा केले होते. याच पंडीताला चीनी सम्राटाने कुठलेतरी औषध शोधण्यासाठी परदेशी पाठविले होते. चीनमधे परतल्यावर त्याने तीन ग्रंथ लिहिले. १ सिंहव्युहराजाबोधिसत्वपरिपृच्छसूत्र २ विमलज्ञानबोधिसत्व ३ माहीत नाही…

यानंतर अजून एका दिवाकर नावाच्या पंडिताने मध्यभारतातून चीनमधे पाऊल ठेवले. त्याने बारा वर्षे चीनमधे काढली ज्या काळात त्याने १८ ग्रंथांचे भाषांतर केले. यानंतर गेला रत्नचित. हा काश्मिरचा रहिवासी होता. ६९३-७०६ या काळात त्याने सात ग्रंथांचे भाषांतर केले. तो वयाच्या १००व्या वर्षी चीनमधेच मृत्यु पावला. . दुसऱ्याचे नाव होते धर्मऋषी किंवा धर्मरुची. हा काश्यप गोत्र असलेला पंडीत दक्षिण भारतातून आला होता. चालुक्यांच्या दरबारात असलेल्या चीनी राजदूताने विनंती केल्यावर सातव्या शतकाच्या शेवटी शेवटी अजून एका थोर पंडिताने चीनमधे प्रवेश केला. चीनी सम्राटाने याचे नाव बदलून बोधीरुची असे ठेवले.याने जवळजवळ ५३ ग्रंथांवर टिका लिहिली. आज दुर्दैवाने यांच्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. अजून एक गंमत म्हणजे असे म्हटले जाते की मृत्युसमयी त्याचे वय १५६ होते.

आठव्या शतकात प्रमिती नावाचा एक श्रमण मध्यभारतातून चीनला गेला. हाही एक उत्तम भाषांतरकार होता. ( याने परवानगी नसताना काही ग्रंथ नालंदामधून चीनला नेले असे मी कुठेतरी वाचलेले स्मरते. पण खात्री नाही) त्याने एकाच ग्रंथाचे भाषांतर केले पण ते उत्तम होते. त्याचे नाव लांबलचक होते. – महा-बुद्धोश्निश-तथागत-गुह्य-हेतू-साक्षातक्रिता-प्रसन्नार्थ-सर्व-बोधीसत्वकार्या-सुरंगमसूत्र.

याच्यानंतर वज्रबोधी नावाचा पंडीत चीनमधे गेला.
वज्रबोधी…

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

केरळचा हा ब्राह्मण ७१९ साली चीनला पोहोचला आणि त्याने चार पुस्तकांचे भाषांतर केले. असे म्हणतात शाओलिन मठात यानेच चीनी मार्शल आर्टचा पाया घातला. निश्चित नाही. ( हा योगसामर्थ्याने त्याचे शरीर वज्रापेक्षाही कठीण करु शकत असे असा प्रवाद आहे.) हा ७१व्या वर्षी हा चीनमधे मरण पावला.

नंतर एक पंडीत नालंदामधून पाठवला गेला. त्याचे नाव होते शुभाकरसिंह. याने बरोबर चार ग्रंथ आणले होते ज्याचे त्याने भाषांतर केले. हाही त्याच्या वयाच्या ९९व्या वर्षी चीनमधे मृत्यु पावला.

यानंतर अमोघवज्र नावाचा अत्यंत प्रसिद्ध व महत्वाचा पंडीत चीनमधे गेला.
अमोघवज्र

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

याचे गुरु होते वर उल्लेख झालेले वज्रबोधी. याने भाषांतराबरोबर बौद्धधर्माच्या प्रसाराचे काम हाती घेतले. चीनमधे जो काही तांत्रिक धम्माचा प्रसार झाला तो अमोघवज्रामुळे. याने अनेक तांत्रिकसूत्रांचे व धारिणींचे चीनी भाषेत भाषांतर केले. याने नुसते हेच केले नाही तर भारतीय संस्कृतीची चीनी जनतेला ओळख करुन दिली.

वज्रबोधी होते दक्षिण भारतातील, अमोघवज्र होता उत्तर भारतातील. म्हणजे त्या काळात उत्तरेपासून, अफगाणिस्तान, मध्य आशिया, श्रीलंका, कंबोडिया, मलेशिया, ब्रह्मदेश इत्यादि. देशांमधे हे सर्व श्रमण व त्यांचे संघ ये जा करीत असत. व धम्माच्या प्रसाराच्या कामाची आखणी करीत असत. याचे मुख्य केंद्र अर्थातच नालंदा हे असावे व पलिकडे जावा/सुमात्रा बेटे असावीत. अमोघवज्र त्याच्या गुरुबरोबर चीनला गेला व त्याने त्याच्या गुरुंना त्यांच्या कामात बरीच मदत केली. जेव्हा वज्रबोधी मृत्युशय्येवर होते तेव्हा त्यांनी त्यांच्या या शिष्याकडून एक वचन घेतले. ते म्हणजे त्याने भारतात परत जाऊन नवनवीन बौद्ध ग्रंथ आणावेत व त्याचे भाषांतर करावे. दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी या महाभागाने ९ वर्षांनी परत भारताची भूमि गाठली. भारतात व श्रीलंकेत त्याने जवळजवळ पाच वर्षे पायपीट केली व अनेक हस्तलिखिते घेऊन परत चीन गाठले. या कामामुळे त्याची किर्ती सम्राटापर्यंत पोहोचली नसेल तरच नवल. सम्राट त्याच्या कामाने इतका प्रभावित झाला की त्याने अमोघवज्रांना एक बहुमान बहाल केला – ज्याचा अर्थ होतो प्रज्ञा-मोक्ष. काही वर्षांनंतर (७४९) अमोघवज्रांना परत भारतात जाण्याची इच्छा झाली. तशी परवानगी मिळाल्यावर ते बंदरावर पोहोचले. तेवढ्यात सम्राटाला ‘आपण काय केले हे ! असे वाटून त्यांना परत येण्याची विनंतीवजा आज्ञा केली. त्यामुळे अमोघवज्र परत एकदा चीनमधे अडकून पडले पण झाले ते चीनच्या भल्यासाठीच झाले असे म्हणण्यास हरकत नाही. परत फिरल्यावर त्यांनी हिनशान नावाच्या मठात मुक्काम केला व आपले भाषांतराचे काम पुढे चालू ठेवले. दोनच वर्षात त्यांना अजून एक पुरस्कार मिळाला- त्रिपिटकभदंत.

७७१ साली ताई-शून सम्राटाच्या वाढदिवसाला त्यांनी एक भाषांतरित ग्रंथ सम्राटाला भेट दिला. त्यात सुरुवातीला ते म्हणतात, ‘‘मी लहानपणापासून माझ्या गुरुचरणी स्वत:ला वाहून घेतले. त्यांची सेवा मी जवळजवळ १४ वर्षे केली. त्यांची सेवा करतानाच मी त्यांच्याकडून योगशास्त्र शिकलो. त्यानंतर मी भारतात पाच प्रदेशात फिरलो व ५०० ग्रंथ जमा केले. हे असे ग्रंथ होते की आजपर्यंत चीनमधे आणले गेले नव्हते. मी ७४६ साली परत राजधानीत आलो. तेव्हापासून आत्तापर्यंत मी ७७ ग्रंथांचे भाषांतर केले आहे.’’ आठव्या शतकात मला वटते हा एकमेव पंडीत होता ज्याने एवढे भव्यदिव्य काम केले. तो स्वत: तांत्रिक असल्यामुळे त्याने तांत्रिक मार्गावर बरीच पुस्तके लिहिली असावीत. त्यांच्या काही ग्रंथांची नावे खाली देत आहे. त्यावरुन त्यांच्या कामाची आपल्याला कल्पना येऊ शकेल.

१ महामयुरीविद्या रागिणी २ कुंडीधारिणी ३ मारिचीधर्म ४ मारिचीदेवीपुष्पमाला सूत्र ५ गाताअनंतामुख धारिणी. ६ सर्वतथागताधिष्टान ह्र्दयगुह्य धातू करंडमुद्र धारिणी ७ महर्षी सूत्र ८ महाश्री-देवी-द्वादासबंधनशास्त्र नाम-विमलामहायान सूत्र. ९ गांगुलीविद्या १० रत्नमेघ धारिणी ११ सालिसंभवसूत्र १२ राष्ट्रपालाप्रज्ञापरिमिता १३ महामेघसूत्र १४ घनव्युहसूत्र १५ पर्णसवारी धारिणी. १६ वैश्रमणदिव्यराजा सूत्र १७ मंजुश्रीपरिपृच्छसूत्राक्षरमंत्रिकाद्याया १८ पंचतंत्रिसदबुद्धनामपुजास्वीकारलेख १९ अवलोकितेश्र्वर-बोधिसत्व-निर्देशमंत-भद्र धारिणी २० अष्ट मंडलसूत्र २१ चक्षूरविशोधन विद्या धारिणी २२ सर्व रोगप्रसन्न धारिणी २३ गवलप्रसनन धारिणी २४ योगा संग्रह महार्थ आनंद परित्राण धारिणी २५ एकाकुधार्या धारिणी २६ अमोघ पासवैरोचनबुद्धमहाआभिषेक प्रभासमंत्र सूत्र २७ नीतिशास्त्र सूत्र २८ तेजप्रभा-महाबल-गुणापादविनयश्री धारिणी २९ ओ-लो-तो-लो धारिणी ३० अश्निशचक्रवर्ती तंत्र ३१ बोधीमंदनिर्देशैकाकशरोस्निश चक्रवर्ती राजा सूत्र ३२ बोधीमंदव्युह धारिणी ३३ प्रज्ञापारमिताअर्धसटीका ३४ वज्रशेखरयोगा सूत्र ३५ महाप्रतिसार धारिणी ३६ गरुडगर्भराजा तंत्र ३७ वज्र-कुमार-तंत्र ३८ सामंतनिदानसूत्र ३९ महायान-निदानसूत्र ४० हारितीमात्रिमंत्रकल्प ४१ सर्व धारिणींची एक सुत्री….

एका धारिणीचे नाव आपण पाहिले असेल सर्व रोग… यात कुठल्याही रोगापासून कशी सुटका करुन घ्यावी याबद्दल विवेचन आहे आणि गंमत म्हणजे या ग्रंथात म्हणे पुष्कळ आकडेमोड आहे. एवढे प्रचंड काम करुन अखेरीस ७०व्या वर्षी अमोघवज्रांनी आपला देह ठेवला. सम्राटावर त्यांचा एवढा प्रभाव होता की त्यांना मरणोत्तरही काही पुरस्कार व पदव्या देण्यात आल्या.

नवव्या शतकात म्हणजे ८०० ते ९०० या काळात भारतातून चीनला जाणाऱ्या पंडितांची संख्या अचानक कमी का झाली ते कळत नाही. मी जो दशकुमारचरितमचा अनुवाद केला, त्यात मला बौद्धधर्माबद्दल फार चांगले लिहिलेले आढळत नाही. अर्थात ते हिंदू पंडिताने लिहिले असल्यामुळे मी समजू शकतो. पण कदाचित सामान्य माणसाच्या नजरेतून धम्म उतरत चालला होता हे निश्चित. या शतकात एकही पंडीत भारतातून चीनमधे गेला नाही. कदाचित असेही कारण असेल की त्यांना चीनमधून कोणी बोलावले नसेल ….

हळूहळू भारतातून चीनला जाणाऱ्या बौद्ध श्रमणांची व पंडीतांच्या संख्येला ओहोटी लागत होती. पुढच्या शतकात चीनी इतिहासात भारतातून ९७२ साली फक्त तीन पंडीत आल्याची नोंद सापडते. त्यांची भारतीय नावेही माहीत नाहीत. १ कोचे २ फुकीं ३ चेने-ली.

९७३ साली धर्मदेव नावाचा अजून एक महान पंडीत चीनमधे आला. त्याची कीर्ति त्यावेळच्या सम्राटापर्यंत (सुंग घराणे) पोहोचल्यावर त्याला दरबारात बोलावून त्याचा सत्कार करण्यात आला. याच काळात लाकडावर ग्रंथ कोरुन त्यापासून पुस्तके छापण्याची प्रक्रिया चालू झाली. एकूण १३०,००० फळ्या तयार करण्यात आल्या ज्यापासून मग त्रिपिटकाची पुस्तके छापण्यात आली. धर्मदेवाने ९७३ साली भाषांतराचे काम सुरु केले आणि ९८१ पर्यंत त्याने ४६ ग्रंथांचे भाषांतर केले. या भाषांतरातही धारिणींचा भरणा आहे कारण त्याकाळात त्रांत्रिकमार्गाचा पगडा चीनी जनमानसावर बसला होता. धर्मदेवाने अजून एका लोकप्रिय ग्रंथाचे भाषांतर केले – सुखावती-व्युह. या महायानी ग्रंथात स्वर्गाचे वर्णन आहे. धर्मदेवाचा मृत्यु १००१ साली झाला. या महान पंडीतालाही मरणोत्तर अनेक पुरस्कार जाहीर करण्यात आले.

९७५ साली पश्र्चिम भारतातून एक मंजुश्री नावाचा राजपूत्र चीनमधे श्रमण बनून गेला व त्याने नुकत्याच निवर्तलेल्या चीनी सम्राटाला श्रद्धांजली वाहिली असा एक उल्लेखही सापडतो. हा चीनमधे आल्यावर सिअँग-कोनो मठात राहिला होता. तेथे त्याच्या स्वभावामुळे तो खूपच लोकप्रिय झाला. इतर भिक्खूंना मत्सर वाटल्यामुळे त्यांनी सम्राटाला जाऊन सांगितले की त्याला भारतात परत जायचे आहे. या राजपुत्राला अजून चीनी समजत नसल्यामुळे त्याच्यात चीनी सम्राटात संवाद होऊ शकला नाही. सम्राटाने भारतात जाण्याचा आदेश काढल्यावर मंजुश्रीची चडफड झाली पण दुसरा मार्ग नसल्यामुळे त्याने भारताचा रस्ता पकडला असे म्हणतात पण तो भारतात आला नाही. तो कुठे नाहीसा झाला याबद्दल इतिहासात उल्लेख नाही.

९८० साली अजून दोन पंडीत काश्मिरमधून चीनला गेले. एकाचे नाव होते दानपाल आणि दुसऱ्याचे चीनी नाव होते – तिनशीत्साई. पण दुसऱ्या एका ग्रंथात तो जालंदर येथील एका मठाचा श्रमण होता असाही उल्लेख होता. त्याने जवळजवळ वीस वर्षे चीनमधे काम केले. त्याने भाषांतर केलेल्या ग्रथात एक महत्वाचा ग्रंथ होता ज्याचे नाव होते धर्मपद. याचे भाषांतर मंगोलि भाषेतही झाले आहे. याचा मृत्यु १००० साली झाला.

दानपाल उद्यान देशातून चीनला गेला होता. त्यानेही तेथे बरेच काम केले. हा दरबारात असताना सुंग सम्राटाला पश्चिम भारतातील एका राजाचे पत्र आले. एका श्रमणाने ते आणले होते. ते त्याने याला वाचण्यास सांगितले अशी नोंद आहे. त्या पत्रात तो राजा म्हणतो, ‘‘ मी असे ऐकले आहे की चीनमधे परमेश्र्वराचा अंश असलेला एक राजा राज्य करतो. मी स्वत: आपल्याला भेटण्यास येऊ शकत नाही याचा मला खेद वाटतो. कोअँगयिन (ज्या श्रमणाने ते पत्र आणले होते त्याचे नाव ) याने आपल्या कृपेने तथागताच्या रत्नजडीत सिंहासनावर कास्याची दक्षिणा चढविली आहे. त्याच्या बरोबर मी आपल्यासाठी तथागताचा अवशेष पाठवीत आहे… पत्रातील चीनमधील इतर पंडितांचे पत्तेही वाचण्यात आले अशी नोंद आहे. या पंडिताने १११ ग्रंथांचे चीनी भाषेत भाषांतर केले असे मानले जाते. धारिणी चीनमधे लोकप्रिय होण्यामागे याच्या भाषांतराचा मोठा सहभाग होता.

सुंग घराण्याच्या इतिहासात अजून एका श्रमणाची नोंद आहे ज्यात हा श्रमण स्वत:बद्दल सांगतो, ‘‘ मी तॉ-लो-मेनचा श्रमण आहे. माझे नाव यँक-चो आहे. भारतातील लि-टे नावाच्या देशातून मी आलो. या देशाचा राजा या-लो-ऑन-टे असे आहे. माझे गाव अ-जों-इ-टो ( अजंठा?) आहे आणि माझ्या पत्नीचे नाव मो-हि-नी आहे.’’ श्रमण असून विवाहीत कसा हे समजत नाही.

यानंतर ९९० साली नालंदामधून अजून एक श्रमण चीनमधे आला. त्याचे नाव होते पाऊकिटो. त्याने बुद्धाचे काही अवशेष सम्राटासाठी आणले होते अशी नोंद सापडते. ९९५ साली मध्य भारतातून एक श्रमण चीनमधे आला त्याचे नाव होते कालकांती. त्याने भूर्जपत्रावर लिहिलेले काही ग्रंथ चीनमधे आणले. नंतर ९९७ साली राहुल नावाचा एक श्रमण पश्चिम भारतातून चीनला गेला. त्यानेही काही पवित्र ग्रंथ चीनच्या सम्राटाला अर्पण केले. त्या शतकातील शेवटचा श्रमण होता नि-वी-नी. यानेही काही ग्रंथ बरोबर नेले पण त्याचे पुढे काय झाले याची इतिहासात नोंद नाही.

१०००-११०० या शतकात या सगळ्या प्रकाराला ओहोटी लागली. सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे इस्लाम धर्माचे भारतावर झालेले आक्रमण. त्यामुळे भारतात बुद्धाचा अहिंसेचा संदेश मला वाटते लोकांच्या पचनी पडेनासा झाला. तसेच इस्लाम धर्माच्या वादळी आक्रमक हिंसाचाराने मध्य आशिया व्यापून टाकला. चीनला जाण्याच्या मार्गावर अनेक श्रमणांची कत्तल झाली व त्यांच्या धर्माचा प्रसार करण्याच्या ध्यासाचा यात बळी गेला. १००४ साली मगधाहून धर्मरक्षाने चीनला भेट दिली. त्याने काही ग्रंथ बरोबर नेले होते. त्यांचे भाषांतर करुन त्याने वयाच्या ९६व्या वर्षी चीनमधेच देह ठेवला. अधूनमधून एखादा श्रमण चीनला जात होता, नाही असे नाही पण ती परंपरा खंडीत होण्याच्या मार्गावर होती हे नाकारण्यात अर्थ नाही.

शेवटचा श्रमण, ज्ञानश्री चीनमधे गेला १०५३ साली. त्यानंतर त्या ज्ञानाच्या मार्गावर अंध:कार पसरला तो पसरलाच…
या सर्व श्रमणांनी चीनला काय दिले? मुख्य म्हणजे त्यांनी चीनला धर्म दिला. चित्रकला, मुर्तिकला, दिली. चीनमधील कित्येक गुहांमधे असलेली चित्रे भारतातील अजंठाच्या चित्रकलेशी साम्य दाखवतात. हळूहळू ज्ञानी पंडीत नामशेष झाले. इतके नामशेष झाले की मंगोल बादशहा (चीनच्या प्रांताचा) कुबलाईखानला काही ग्रंथाचे भाषांतर करण्यासाठी बौद्ध धर्मगुरु/पंडीत पाहिजे होता. त्याला शोधून एकही तसा माणूस भारतात सापडला नाही….

(चेंगिजखान स्वत: बौद्ध नव्हता पण त्याला बौद्ध धर्माची पूर्ण कल्पना होती. त्याचा लडाखमधील लामांशी सतत संपर्क असे. तो त्यांना त्याच्या विजयासाठी प्रार्थना करण्यासाठी सांगे. चेंगिजखानचे कित्येक सरदार, मंत्री हे बौद्ध होते व असे म्हणतात त्यांनी त्याच्या काळातच एक पाच मजली बौद्ध मठ बांधण्यास घेतला होता. कुबलाईखान हा त्याचा नातू. ज्याने आपले लहानपण त्याच्या आजोबांबरोबर घालविले, तो नंतर चीनचा सम्राट झाला त्याने त्यामुळे बौद्धधर्माला उदार आश्रय दिला होता. असो. चेंगिजखानाबद्दल परत केव्हातरी….)

चीनी बुद्ध साल ५८१-६१७.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ज्याने धम्म सांगितला, धर्मातील हिंसेला रजा दिली त्या तथागताला, अनेक वर्षे सर्व हालआपेष्टा सहन करुन त्याची शिकवण सामन्याजनांना, सम्राटांना, चक्रवर्तींना सांगणाऱ्या सर्व पंडितांना, श्रमणांना वंदन करुन ही लेखमालिका संपली असे जाहीर करतो.
प्राचीन दिपांकर बुद्धाला वंदन असो.
वैदुर्यप्रभास बुद्धाला वंदन असो.
शाक्यमूनी बुद्धाला वंदन असो.
भूत वर्तमान व भविष्यकाळांच्या बुद्धाला वंदन असो.
आनंदी बुद्धाला वंदन असो.
विरोचन बुद्धाला वंदन असो.
रामध्वजराजा बुद्धाला वंदन असो
मैत्रेय बुद्धाला वंदन असो.
अमिताभ बुद्धाला वंदन असो
सत्याचा मार्ग दाखवणार्‍या बुद्धाला वंदन असो.
अमर वज्र बुद्धाला वंदन असो
रत्नप्रभास बुद्धाला वंदन असो.
नागराज बुद्धाला वंदन असो.
वरूण बुद्धाला वंदन असो.
नारायण बुद्धाला वंदन असो.
पुण्यपूष्प बुद्धाला वंदन असो
मणिध्वज बुद्धाला वंदन असो.
मैत्रीबाला बुद्धाला वंदन असो.
व्युहराजा बुद्धाला वंदन असो.

जयंत कुलकर्णी

समाप्त.

Posted in इतिहास, लेख | Leave a comment

बहादुर शाह ज़फ़र व नानासाहेब पेशवे

Bahadur_Shah_II

बहादुर शाह ज़फ़र व नानासाहेब पेशवे

माझ्या स्वर्गवासी आईने आपल्या वडिलांकडून म्हणजे हजरत शाह गुलाम हसन साहेब यांच्याकडून ऐकलेली ही हकिकत आहे.

ज्या दिवशी बहादुर शाह दिल्लीच्या लाल किल्ल्यातून निघाले ते सरळ हजरत निजामुद्दीन औलियाच्या दरग्यावर आले. त्यावेळी बादशाहाला फारच नैराश्य आले होते. ते भयंकर घाबरलेले होते. काही बाजारबुणगे आणि पालखी उचलणारे भोई हे सोडल्यास इतर कोणी स्वार ही बरोबर नव्हते. त्यांचा चेहरा उतरला होता आणि त्यांच्या पांढर्‍याशुभ्र दाढी वर माती आणि धूळ जमा झाली होती.

बादशाह तेथे आल्याची बातमी ऐकून नानासाहेब तेथे हजर झाले. त्यांनी पाहिले की मजारच्‍या दरवाजाला डोके टेकवून बादशाह बसले आहेत, चेहरा पडलेला, डोळ्यात चिंता आहे. ते दृष्‍य पाहून त्‍यांच्‍या जिवाची घालमेल झाली..डोळ्‍यात अश्रू तरळले पण आता वेळ नव्हता…पण त्यांना पाहिल्यावर त्‍यांच्‍या चेहर्‍यावर नेहमीप्रमाणे हसू पसरले. मग म्हणाले,

‘‘ मी तुला पहिल्यांदाच सांगितले होते की हे नालायक बंडखोर शिपाई अडेलतट्टू आहेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणे चूक आहे. स्वत: तर बुडतीलच पण मला घेऊन बुडतील. शेवटी तेच झाले. पळून जा… मी जरी मोह माया त्याग केलेला एक फकीर असलो तरी माझ्यात तेच रक्त आहे ज्याच्यात शेवटपर्यंत लढण्याची हिंमत आहे. माझ्या बापजाद्यांवर यापेक्षाही वाईट प्रसंग कोसळले पण त्यांनी हिंमत सोडली नाही. पण मला तर माझ्या समोरच माझा अंत दिसतोय. दिल्लीच्या तख्तावरील मी तैमुरचा अखेरचा वंशज आहे यात आता काही शंका उरली नाही. मुघलांची सल्तनत शेवटचे आचके देत आहे…काही काळाचाच काय तो प्रश्न. मग मी विनाकारण खूनखराबा का करायला सांगू ? म्हणूनच मी किल्ला सोडून इथे निघून आलो. शेवटी हा मुलुख खुदाचा आहे, त्याला पाहिजे त्याला देईल नाहीतर बरबाद करेल. त्याची मर्जी. अनेक दशके आमच्या वंशाने हिंदुस्थानवर आपले चलन चालवले आता दुसर्‍याची पाळी असेल तर तसे होऊ देत. ते हुकमत चालवतील स्‍वत:ला बादशाह म्हणवून घेतील. ठीक आहे. त्यात वाईट वाटण्यासारखे काही नाही. नाहीतरी आम्हीही दुसर्‍यांचे राज्य खालसा करून आमचे राज्य स्थापन केले आहे ना !’’

अत्यंत निराश मनाने हे उद्‌गार काढून त्यांनी एक पेटी नानासाहेबांच्‍या हातात दिली आणि म्हणाले,

‘‘ ही दौलत आता तुमच्या हवाली करतोय !’’

‘‘ अमीर तैमूरने जेव्हा कॉन्‍स्‍टनटाईनवर विजय मिळवला तेव्हा सुलतान जलदरम बायजीदच्‍या खजिन्‍यातून ही वस्तू त्‍यांच्‍या हातात पडली. याच्यात हुजूर हजरत मुहम्मदाच्‍या मुबारक दाढीतील पाच केस आहेत. हे आजवर आमच्‍या खानदानात अत्यंत पवित्र म्हणून सांभाळले गेले आहेत. आता माझ्याकडे ना जमिनीवर जागा आहे ना आकाशात ! आता ही पवित्र वस्तू घेऊन कुठे हिंडू? तुमच्या शिवाय आता यावर कोणाचा हक्क असेल असे मला वाटत नाही. तुम्हीच याचा सांभाळ करू शकता आणि तो तुमचाच हक्कही आहे. दिवस भयंकर आहेत, माझ्या प्राणापेक्षाही प्रिय अशी ही वस्तू मी तुमच्या स्वाधीन करतोय. ती वस्तू आजवर आमच्या खानदानापासून कधीही दूर गेलेली नाही. त्याचा सांभाळ करा.’’

नानासाहेबांनी ती पेटी घेतली आणि दर्गा शरीफच्या खजिन्यात ठेऊन दिली. ती पेटी आजही तेथे आहे आणि इतर पवित्र वस्तूंप्रमाणे दर वर्षी सन हिजरीच्या तिसर्‍या महिन्यात श्रद्धाळूंसाठी दर्शनासाठी बाहेर काढली जाते.

बादशहा नानासाहेबांना म्हणाले की तीन दिवसांपासून जेवायला वेळच मिळाला नाही. तुमच्या घरी काही असेल तर घेऊन या. नानासाहेबांनी उत्तर दिले,

‘‘ आम्हीही मृत्यूच्या जबड्यात उभे आहोत. कुठल्याही क्षणी आमची कत्तल होऊ शकते. अन्न तर आता तयार करता येणार नाही. घरी जाऊन पाहतो काही आहे का ते. असल्यास लगेचच हजर करतो. मी तर म्हणतो तुम्हीच माझ्याबरोबर चला. जोपर्यंत मी आणि माझी मुले जिवंत आहेत तोपर्यंत तुमच्या केसाला बोटही लावण्याची कोणाची हिंमत होणार नाही. आम्ही मेल्यावरच ते संभव आहे.’’

बादशाह म्हणाले,
‘‘ आपण हे म्हणताय हे आमच्यावर उपकार आहेत पण या जर्जर शरीरासाठी तुमच्या तरुण मुलांची कत्तल होणे हे मला बिलकूल मान्य नाही. दर्शन झाले आहे, अमानत तुमच्याकडे सोपवली आहे. आता औलियाच्या कृपेनेच त्याच्या लंगरमधे दोन घास मिळतात का ते पाहातो. मग हुमायुंच्या मकबर्‍याला जाईन म्हणतो. तेथे नशिबात जे असेल ते होईल.’’

नानासाहेब घरी आले आणि त्यांनी काही खाण्यास आहे का हे विचारले. त्यांना उत्तर मिळाले,

‘‘ पिठले व सिरका घातलेली चटणी आहे.”

त्यांनी एका तबकात रोटी, पिठले व चटणी घेतली. एका मखमली कापडात ते अन्न झाकले व बादशहाकडे घेऊन आले. बादशहाने पिठल्‍याबरोबर व चटणीबरोबर चण्याची रोटी खाल्ली व तीन तासाने पाणी प्राशन केले आणि त्या अन्नासाठी परमेश्वराचे आभार मानले.

त्यानंतर हुमायुंच्या मकबर्‍यावर गेले जेथे त्यांना अटक झाली.

दुसर्‍याच दिवशी त्यांची रवानगी रंगूनला झाली. तेथेही त्यांनी उरलेले आयुष्य दर्वेश्‍यासारखे व्यतीत केले…

अनुवाद : जयंत कुलकर्णी
मूळ लेखक : शम्सुल-उलेमा ख्वाजा हसन निज़ामी दहेलवी

Posted in कथा, भाषांतर | Leave a comment

नर्गिस नजर


Simple, Free Image and File Hosting at MediaFire

नर्गिस नजर

मिर्जा शाह रुख, बहादूर शाहच्या एका मुलाचे नाव होते. त्याच्या मुलीचे नाव होते शहजादी नर्गिस नजर. १८५७ चा जो गदारोळ झाला तेव्हा तिचे वय होते सतरा.
दिल्लीच्या लाल किल्ल्यात दिवाने खास आणि मोती मशिदीच्या पश्चिमेला, गोरा बागेच्या पूर्वेला एक दगडी तलाव तुम्हाला दिसेल. या तलावात मधोमध एक सुंदर महाल उभा आहे. यात तलावात उत्तरेकडून पाणी वाहात येते. संगमरवरी पाटातून पाणी झुळझुळू वाहत येते आणि त्यातच मोठे मोठे दिवे उभे आहेत. याच्यावरून पाणी वाहत त्या तलावात येते. त्या पाटात मासे कोरले आहेत जे वाहत्या पाण्यामध्ये हलल्याचा भास होतो. हे आजही तुम्ही पाहू शकता. मिर्जा शाह रुख याच जलमहालात राहात होते. त्यांच्या पत्नीचा अकाली मृत्यू झाल्यामुळे त्यांचे त्यांच्या मुलीवर म्हणजे ‘‘नर्गिस नजर’’ वर अतोनात प्रेम होते.

जलमहल काश्मिरी शाली, पर्शियामधून आणलेल्या पडद्यांनी व बनारसी रेशमाने खूपच सजवलेला होता. नर्गिस नजरला घर सजविण्याचा भयंकर शौक होता. या बाबतीत तिची अभिरुची ही अत्यंत उच्च दर्जाची होती. त्या काळात लाल किल्ल्यात सगळ्यात चांगला, सजवलेला महाल कुठला असे विचारले असते तर याच महालाकडे बोट दाखवावे लागले असते.

नर्गिस नजर सकाळी सूर्य उगवल्यावर उठायची. उन्हाळ्यात तिचा छपरी पलंग अंगणात टाकला जाई. फरशी संगमरवरी होती आणि पलंगाचे पाय व खांब सोन्याचे होते. त्यावर नक्षीतून हिरे माणके जडवलेली होती. मखमली चादरी होत्या, रेशमी तक्के होते. चार मऊ तक्के उशाला होते तर त्याच्याच शेजारी छोटे छोटे गोल चार तक्के होते ज्यांना गल-तकिया म्हटले जाई. हे तक्के गालाला टेकू देण्यासाठी होते. जर शहजादीचे मस्त उशीवरुन ओघळले तर तिच्या गालाला यांचा आधार मिळे. दोन मोठे मोठे तक्के दोन्ही बाजूला असत ज्याने शहजादी साहिबा आपल्या गुडघ्यांना आधार देई. शहजादी साहिबा झोपण्याआधी त्या तक्क्यांच्या जवळ मोगरा, जूही आणि पांढर्‍या चाफ्याची फुले ठेवली जात जेणेकरून शहजादी साहिबांना रात्रभर त्याचा सुवास येत राहील. शहजादी साहिबा जशी अंथरुणात शिरत तसे नाचणार्‍या, गाणार्‍या मुली येत व हलक्या आवाजात जाणे बजावणे करीत. ते ऐकत ऐकत मग बाईसाहेबांना झोप लागत असे. सकाळी सुद्धा या मुली पलंगाशेजारी येऊन गात असत आणि त्‍यांचे सुमधूर गाणे ऐकत शहजादी साहिबा परत एकदा पहाटेच्या साखरझोपेत गुडूप होत.

उठल्यावर शहजादी साहिबा काही लगेच उठत नसतच. त्‍या तश्याच त्‍या गाद्यागिरद्यांवर बसून शरीराला आळोखेपिळोखे देत बसत आणि आपल्या नाजूक ओठांवर हात ठेऊन जांभया देत. मग त्या गाणार्‍या मुली त्यांच्याशी हसत खेळत बोलून त्‍यांचे मन रिझविण्‍याचा प्रयत्न करीत. एक म्हणे,

‘‘हुजूर जांभई येतीये का? रुमाल आणू का?’’ दुसरी म्हणे, सरकार, अंगडाई पहायला मासेही पहा मधून मधून वर येत आहेत.’’ यावर नर्गिस नजर म्हणे,

‘‘ चल काहीतरीच ! कंटाळा आला तुझ्या या खोट्या बोलण्याचा !’’ मग ती मुलगी म्हणे,

‘‘मी खोटे बोलते? या आरश्याला विचारा. तोही तेच पाहतोय. याच्यात ही केस विखुरले आहेत बघा ना ! तेथेही कोणी तरी मेंदी लावलेल्‍या लांबसडक बोटांनी आपले केस सावरतंय ना ! तोही हे पाहण्यात मस्त झालाय… खरंच !’’

तिसरी म्हणे,

‘‘ढगातून जशी सोनेरी किरणे बाहेर येतात तशी आमच्या शहजादीच्या लालचुटूक ओठातून त्यांच्या दंतपंक्ती दिसतात आणि या गालाचे काय सांगू ? केस विखरून चेहर्‍यावर असे आले आहेत की वाटतंय पौर्णिमेचा चंद्र ढगांआडून डोकावतोय की काय !’’
चौथी म्हणे,

‘‘ नाही ग ढगांनी चंद्रावर आक्रमण केले असावे पण चंद्राच्या तेजाने ते ढग हिच्या केसांसारखे विखूरलेले दिसतात.’’

नर्गिस नजर ही खुशामत ऐकून पांघरूणातून बाहेर येई व चवड्यांवर बसे. मग बाहेर येऊन दूध व बेसनाने हात पाय धूत असे. मग त्यानंतर जोडे बदलले जात, न्याहरी केली जाई, त्यानंतर घरात चक्कर मारुन सगळे ठीकठाक आहे की नाही याची खातरजमा ती स्वत: करायची. वेगवेगळ्या प्रकाराने वस्तूंची आदला बदल करून घर आवरण्यात तिला फार रस असे. दुपारच्या जेवणानंतर मग गाण्याचा कार्यक्रम असायचा. संध्याकाळी फुलांच्या बागेतील सैर ! रात्रीच्या जेवणाबद्दल तर बोलायलाच नको. मोठ्या थाटात मैत्रिणींबरोबर ते जेवण होई. वाद्ये वाजत, गाणे बजावणे, नाच याची नुसती रेलचेल असे.

ज्या रात्री बहादूर शाह बादशाह लाल किल्ल्यातून हुमायूंच्या मकबर्‍यात पळून गेले तेव्हाच सगळ्यांना आता कळून चुकले की आता इंग्रजांचा विजय अटळ आहे. तेव्हा नर्गिस नजर जलमहलच्या किनार्‍यावर उभी राहून आकाशातील चांदण्या निरखत उभी होती. पाण्यात तिचे प्रतिबिंब पडले होते आणि त्‍या सौंदर्याकडे पाहात तिला एक प्रकारची नशाच चढली होती.

तेवढ्यात तिचे अब्बा मिर्जा शाह रुख आत आले आणि म्हणाले,

‘‘नर्गिस बेटा अब्बा हजरत (बहादूरशाह जफर) बरोबर जाण्याची माझी इच्छा आहे. तुला पाहिजे असेल तर सवारीचा बंदोबस्त करतो. सकाळी तू पण ये.

नर्गिस नजर म्हणाली,

‘‘अब्बाजान तुम्ही सुद्धा लगेच निघू नका. रात्री माझ्याबरोबर चला. दादाजींबरोबर जाण्यात धोका आहे. इंग्रज त्यांच्या शोधात असणार आणि शेवटी जे कोणी त्यांच्या बरोबर सापडतील त्यांनाही गुन्हेगार ठरवले जाईल म्हणून म्हणते दादाजींच्या बरोबर हुमायुंच्या मकबर्‍याला जाणे उचित होणार नाही. त्यापेक्षा गाजीनगरला (गाझियाबाद) जाऊ या. तेथे माझ्‍या दाईचे घर आहे. असं ऐकलंय की ती जागा खूपच सुरक्षित आहे. वेष बदलून जायला लागेल. ही धामधूम संपेल तेव्हा परत इथे येता येईल. मिर्जा म्हणाले, ‘‘ठीक आहे. तू म्हणशील तसं. गाजीपूरला जाण्याची व्यवस्था करतो. तुझ्या बरोबर अजून कोणाला घेणार आहेस का?’’ नर्गिसने सांगितले,

‘‘ नाही, कोणी नाही. मी एकटीच येणार आहे. शिवाय नोकरांना बरोबर ठेवणेही बरोबर नाही आणि त्यांना तरी यायचे आहे की नाही कोणास ठाऊक !’’
मिर्जा हे ऐकून बाहेर गेले आणि नर्गिस नजर परत आपल्या आणि चंद्राच्या प्रतिबिंबात बुडून गेली.

थोड्या वेळाने नर्गिस नजरने तिच्या दासींना हाक मारली पण काही प्रतिसाद आला नाही. सगळे पळून गेले होते आणि नर्गिस नजर त्या जलमहालात आता एकटीच उरली होती. तिच्या आजवरच्या आयुष्यात तिच्या हाकेला कोणी “ओ ” दिली नाही असे प्रथमच घडले होते. ती घाबरून आत पळाली. झुंबरं पेटली होती पण आत कोणीच नव्हते. आतील जिवघेण्या शांततेला नर्गिस नजर घाबरली आणि परत अंगणात आली. किल्ल्यात बराच गलबला चालला होता, सगळेजण मिळेल त्या मार्गाने किल्ल्याबाहेर पळत होते. तिने बराच वेळ तिच्या अब्बाची वाट पाहिली पण त्यांचा काही पत्ताच नव्हता. नर्गिस नजर घाबरून मुसमुसून रडू लागली. रात्री दोन वाजता महालाचा एक कारकून आला व म्हणाला,

‘‘साहिबे आलम (मिर्जा शाह रुख) यांनी सांगितलंय की ‘इंग्रजांचे हेर चारी दिशेला त्यांचा शोध घेत फिरत आहेत त्यामुळे मी येऊ शकणार नाही. तुझ्या बरोबर गाजीपूरलाही येऊ शकणार नाही. पण तुझी जाण्याची सगळी व्यवस्था केली आहे.’ तुम्हाला माझ्या बरोबर जायला सांगितले आहे आणि ते स्वत: वेष बदलून दुसरीकडे कुठेतरी जाणार आहेत.’’

नर्गिस नजरने घाबरून विचारले, ‘‘ पण कुठे जायचा विचार आहे त्यांचा ?
कारकून म्हणाला,

‘‘ मला माहीत नाही !’’ नर्गिस नजरने हुकूम दिला, ‘‘ ताबडतोब जा आणि सगळी माहिती करून ये ! ते माझ्याबरोबर गाजीनगरला का येत नाहीत?’’

तो कारकून गेला आणि आत जाण्याचा धीर न झाल्यामुळे ती अंगणात चकरा मारत राहिली. थोड्या वेळातच तो परत आला आणि त्याने बातमी सांगितली,

‘‘ अब्बा हजरत साईसच्या वेषात निघून गेले. कुठे गेले कोणालाच माहीत नाही. तुमच्यासाठी रथ तयार आहे.’’

नर्गिस नजरच्या डोळ्यात पाणी तरळले आणि थोड्याच क्षणात त्याच्या धारा लागल्या. तिच्या आयुष्यातील हुंदके देत रडण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. तिने एका संदुकित तिचे दागदागिने व जरुरी पुरते कपडे भरले. त्या नोकराने ते तिच्या हातातून घेतल्यावर ती विमनस्कपणे मागे वळून त्या सजवलेल्या जलमहलकडे पहात राहिली. म्हणाली,

‘‘ आता परत तू दृष्टीस पडशील का हे माहीत नाही. ही आपली शेवटची भेट.’’

रात्रीचे तीन वाजले होते. नर्गिस नजर रथात बसून गाजीनगरच्या दिशेला निघून गेली. सकाळी आठ वाजता तेथे पोहोचली. रस्त्यात एवढा गोंधळ होता की त्यांना कोणी अडवले नाही ना कोणी त्यांची विचारपूस केली. गाजीनगरमधे नर्गिस नजरच्या दाईचे घर बर्‍यापैकी प्रसिद्ध होते. ती त्‍या दाईच्‍या घरासमोर उतरल्याबरोबर ती दाई धावत घराबाहेर आली. तिने तिच्‍या हातातून सगळे सामान घेतले व तिला आत नेले. बसवले व तिचा चांगला पाहुणचार केला.

नर्गिस नजर दोन तीन दिवस तिच्या दाईच्या घरात आरामात राहिली पण तेवढ्यात बातमी आली की बादशाह पकडले गेले आहेत आणि शहजादीची हत्या झाली. त्‍याच्‍या दुसर्‍या दिवशी अशीही बातमी आली की फौज गाजीनगर लुटण्यासाठी येत आहे. नर्गिस नजरने आपल्या दागिन्यांची पेटी त्‍या दाईकडून जमिनीत गाडली व येणार्‍या संकटाची वाट पाहू लागली. थोड्याच वेळात शिखांच्या तुकड्यांनी शहरात प्रवेश केला व बंडखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांच्या खबर्‍यांनी त्यांना सांगितले की बादशहाची नात त्या गावात आहे. दोन चार शिख तिच्या घरी आले आणि त्यांनी त्या दाईच्या घरातील सगळ्यांना अटक केली. नर्गिस नजर एका खोलीत लपली होती तिलाही दरवाजा तोडून ताब्यात घेण्यात आले. कसला पडदा आणि कसले काय ! तसेच बाहेर आणण्यात आले. त्यांच्या सरदाराने विचारले, ‘

‘ तू बादशहाची नात आहेस का ?’’ नर्गिस नजरने उत्तर दिले,

‘‘मी एका माणसाची मुलगी आहे. जर बादशहाची नात असते तर येथे या खोपटात कशाला आले असते ? आणि अशी पडद्याविना तुमच्या समोर आली असते का? तुम्ही हिंदुस्थानी आहात तुम्हाला बायकांना त्रास देण्यात शरम नाही वाटत? तो सरदार म्हणाला,

‘‘काय त्रास दिला आम्ही ? आम्हाला फक्त हे सांग की तू बादशहाची नात आहेस का नाही. आम्ही ऐकले आहे की तू बादशहाची नात आहेस आणि तुझ्या बापाने इंग्रजांच्या बायका पोरांच्या कत्तलीत भाग घेतला होता

.’’ नर्गिस म्हणाली, जसे पेरता तसे उगवते. जर माझ्या बापाने असे काही केले असेल तर त्याचा जाब त्यांना विचारा. मी कुठलाही गुन्हा केलेला नाही, मारले तर मुळीच नाही.’’

हे ऐकून दुसरा तरुण शिख सैनिक म्हणाला,

‘‘ तू तर नुसत्या नजरेने घायाळ करतेस. तुला तलवारीची, खंजिराची काय गरज ?’’ हे ऐकून नर्गिस नजरने मोठ्या तडफेने त्याला उत्तर दिले. खरं तर परक्या पुरुषाशी बोलण्याचा तिच्या आयुष्यातील हा पहिलाच प्रसंग होता.

‘‘खामोश ! शहजादीसमोर अशी उद्धट भाषा वापरायची नसते. तुझी जबान उपटून काढू आम्ही. काय समजलास?’’

हे ऐकल्यावर त्या शिख सैनिकाने नर्गिस नजरचे केस पकडले व त्यांना जोरात झटका दिला. नर्गिस नजर कळवळली. तिच्या डोळ्यातून संताप आणि अश्रू एकदमच बाहेर पडले. तेवढ्यात शिख सरदाराने त्या सैनिकाला बाजूला केले आणि ओरडला,

‘‘ स्त्रियांशी असे वागणे बरोबर नाही. थांब!’’

हे ऐकून त्याने नर्गिस नजरचे केस सोडून दिले. दिल्लीला जाण्यासाठी भाड्यावर एक बैलगाडी मागवली गेली. त्यात नर्गिस नजरला बसविण्यात आले व बाकी सर्वांना पायी चालण्यास सांगण्यात आले. एका सैनिकाने विचारले,

‘‘ तुझे दागदागिने, पैसे कुठे आहेत?’’ नर्गिस म्हणाली, ‘‘ज्याला समजण्याची अक्कल आहे त्यांना समजेल की मीच दौलत आणि जडजवाहीर आहे. माझ्याकडे अजून काही नाही.’’ हे ऐकल्यावर ते शिख गप्प बसले.

हिंडन नदीजवळ एका गावातील जाटांनी व गूजरांनी शिखांवर गोळ्या झाडल्या व चकमकींना सुरुवात झाली. गावकऱ्यांची संख्या खूपच जास्त होती. थोड्याच वेळात त्यांनी सर्व शिख सैनिकांची कत्तल केली व आम्हाला घेऊन ते गावात पोहचले.

अडाण्‍यांनी नर्गिस नजरच्‍या अंगावर जे काही दोनचार दागदागिने होते ते उतरवले. एवढेच नाही तर तिचे रेशमी, किमती कपडेही उतरवले व तिच्‍या अंगावर एका चांभारणीचे मळलेले, फाटके कपडे चढवले. नर्गिस नजरने ढसाढसा रडत ते कपडे अंगावर चढवले. थोड्याच वेळात गावातील काही अडाणी मुसलमान आले व त्‍यांच्‍या पुढार्‍याने गूजर लोकांकडून नर्गिस नजरला विकत घेतले व त्‍यांच्‍या गावाला घेऊन गेले. हे लोक रांगड जातीचे होते तर काही तगा जातीचे मुसलमान होते. गावात पोहोचल्यावर त्‍या पुढार्‍याने जाहीर केले की या चांभारणीची शादी तो त्‍याच्‍या मुलाशी लाऊन देणार आहे. हा पुढारी म्‍हातारा होता पण त्याचा मुलगा अनाडी व वयाने लहान होता. तब्येतीने चांगला होता, तगडा होता. नर्गिस नजरने नाईलाजाने होकार दिला. गावाच्या काझीने त्‍यांचा निकाह लाऊन दिला आणि नर्गिस नजर त्‍या पुढार्‍याच्‍या घरात नवीन दुल्‍हन बनून आरामात राहू लागली. तीन चार महिने तुलनेने आरामात गेले.

इंग्रज सरकारच्या ताब्यात सगळा प्रदेश आला आणि त्यांचे खबरे गावोगावी पैशाच्या मोहाने खबर घेत फिरू लागले. कुठल्यातरी खबर्‍याने दिल्लीला अधिकाऱ्याला खबर पोहोचवली की मिर्जा बागी मिळत नाही पण त्याची मुलगी एका गावात एका घरात राहाते. त्‍या अधिकाऱ्याने लगेच त्‍या गावात त्याचे पोलीस पाठवले. मेरठवरून आलेल्या त्‍या पोलिसांनी गावाला वेढा घातला. नर्गिस नजर, तिच्‍या सासर्‍याला व नवर्‍याला पकडून दिल्लीला आणले गेले. त्‍या अधिकाऱ्याने नर्गिस नजरला खोदून खोदून बरेच प्रश्न विचारले पण त्यातून त्‍याच्‍या हातात काही लागले नाही. कारण तिला काहीच माहिती नव्हते. शेवटी त्याने निर्णय दिला की त्या दोघांनी बंडखोर मिर्जाच्या मुलीला आसरा दिला असल्यामुळे सरकार विरोधात गुन्हा केला आहे. त्या दोघांना त्याने १० वर्षांसाठी तुरुंगात पाठवून दिले व म्हणाला,

‘‘ या मुलीला दिल्लीमधे कुठल्यातरी मुसलमानाच्या हवाली करा.’’

नर्गिसला जेव्हा तिला विचारण्यात आले की तिला कुठे राहायला आवडेल तेव्हा तिने सांगितले,

‘‘ माझ्या खानदानातील कोणी असेल तर त्यांच्याकडे सोडा !’’

नंतर चौकशी केल्यावर तैमूर खानदानाचे लोक अजूनही लपत छपत जंगलातून फिरत आहेत असे कळाले. दिल्लीमधे अजून कोणी आलेले नाही. हे समजल्यावर त्या अधिकाऱ्याने नर्गिस नजरला एका मुसलमान शिपायाच्या हवाली करण्यात आले. तो तिला घरी घेऊन गेला. त्‍या शिपायाची पत्नी दरवाजातच उभी होती. जेव्हा तिने पाहिले की नवरा एका सुंदर आणि जवान बाईला घरी घेऊन आलाय तेव्हा तिने त्याला थप्पड मारली व दोघांना धक्के मारुन बाहेर काढले.

नर्गिस नजरला आयुष्यात पहिल्यांदाच कोणी तरी धक्का मारला होता. त्‍या शिपायाने एकंदर रागरंग पाहिला व तिला त्‍याच्‍या मित्राकडे घेऊन गेला. बुजूर्ग होते. नर्गिस नजरची कहाणी ऐकून त्‍यांच्‍या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्यांनी तिला ठेऊन घेतले. नर्गिस नजर एक रात्र तेथे आरामात राहिली. दुसर्‍या रात्री नर्गिस नजर झोपलेली असताना काही माणसांनी तिचे तोंड दाबून तिला उचलले. त्यांची पकड इतकी पक्की होती की तिच्या तोंडातून कसलाही आवाज निघाला नाही. ज्या गावात तिची शादी झाली होती त्याच गावाचे ते लोक होते. त्यांनी तिला उचलले व दिल्लीजवळ एका गावात नेऊन ठेवले. हे गावही तगा जातीच्या मुसलमानांचे होते. त्यांनी तिला झोपण्यासाठी एक चारपाई दिली. हे त्या पुढार्‍याचेच घर होते. पुढची तीन चार वर्षे नर्गिस त्याच घरात आरामात राहिली. ती अंगावर पडेल ते काम उरकत असे पण शेणाने घर सारवणे व म्‍हशींचे दूध काढणे तिला जमत नसे.

चार वर्षांनंतर तिचा नवरा तुरुंगातून सुटून आला. त्याला उरलेली शिक्षा माफ झाली होती. तो नर्गिसला घेऊन त्‍याच्‍या मूळ गावी जाऊन राहिला जेथे त्यांनी उरलेले आयुष्य व्यतीत केले. कसे ते सांगायची गरजच नाही. त्यांना मुलेही झाली. १९११ साली नर्गिस नजर अल्लाला प्यारी झाली…..

नर्गिस नजर सांगायची, ‘‘ जेव्हा मी दिल्लीजवळ तगा मुसलमानाच्या घरात आले तेव्हा पावसाचे दिवस होते. ढगांचा गडगडाट सुरु होता आणि विजा कडमडत होत्‍या. मी एकटी त्‍या खोपटात एका डुगडुगणार्‍या चारपाईवर मळलेली चादर ओढून पडले होते. डोळे मिटले आणि स्वप्नात पाहिले की माझ्‍या जलमहालात सोन्याच्या पलंगावर झोपली आहे. जूही आणि चाफ्याची फुले व रेशमी तक्केही माझ्‍या बाजूला आहेत आणि गाणार्‍या मुली गोड आवाजात हळू गात आहेत आणि त्याची एक अनोखी मजा येते आहे. तेवढ्यात मी एका दासीला आवाज दिला आणि क्षणात माझ्‍या पलंगाचा पडदा वर गेला आणि तिने पळत येऊन मला कवटाळले व लाडाने आलिंगन दिले. मी तिला लाडात येऊन एक थप्पड मारली. ती जोरजोरात हसायला लागली आणि मी स्वप्नातून बाहेर आले.

सगळीकडे काळाकुट्ट अंधार होता. या स्वप्नाने आणि जलमहलच्या आठवणींनी मी बेचैन झाले. मला काही सुचेना. मी दरवाजात चादर ओढून कशीबशी आधार घेत उभी राहिले. पाऊस धुवाधार पडत होता, विजा चमकत होत्या. त्याच्या प्रकाशात अंगणातील पाणी एकदम चमकून उठे व परत अंधारात गुडूप होई. मला क्षणभर असे वाटले की मी जलमहलच्या अंगणातच तलावातील चंद्राच्या प्रतिबिंबांचे खेळ पाहाती आहे. जेव्हा माझ्यावर संकटे कोसळली तेव्हा मी घाबरले नव्हते आणि मला कधी माझे जूने दिवस आठवले नाहीत पण आज काय झाले होते कोणास ठाऊक मला जलमहलच्या सारख्या आठवणी येत होत्या. हेही आठवत होते की मी हिंदुस्थानच्या बादशहाची नात आहे आणि माझ्या वडिलांची लाडकी आहे. मी सतरा वर्षापर्यंत शहजादी होते आणि आज एक निर्धन अनाथ मोलकरीण आहे. माझ्याकडे त्यावेळी किल्ल्यातील सगळ्यात सुंदर कपडेलत्ते होते आणि प्रत्येक गोष्ट कशी स्वच्छ असायची. मला त्याची आवडच होती.

पुरलेल्या दागिन्यांची जागा जेव्हा मी गुपचूप उकरली तेव्हा मला तेथे काही सापडले नाही. कोणी चोरले माहीत नाही. मागच्या जमान्यातील एकही गोष्ट आता माझ्याकडे शिल्लक नाही. फक्त मीच आहे आणि ती सुद्धा बदललेली आणि खचलेली.

हा विचार मनात आल्यावर माझे अवसान गळाले व मी चक्कर येऊन खाली पडले. सकाळपर्यंत तशीच दरवाज्यात पडले होते.

सकाळी जाग आली तेव्हा मी नेहमीची मोलकरीण होते. माझे नाव नागू होते.
मला सगळे त्याच नावाने हाका मारत.
समोर तीच चूल होती ज्यावर मी भाकर्‍या बडवते आणि घरातील सगळी कामे मला इतर मोलकरणींबरोबर करावी लागतात.

माझ्‍या मनात विचार आला, ‘‘जे काही पाहिले होते ते एक स्‍वप्‍न होते आणि जे काही ऐकले ती एक कहाणी….

अनुवाद : जयंत कुलकर्णी.
मूळ लेखक : शम्सुल-उलेमा ख्वाजा हसन निज़ामी दहेलवी

Posted in कथा | Leave a comment

शहजादी

Ladies_cabul1848b

शहजादी

मी आत्ता ज्या घरासमोर उभा आहे ज्याच्या भिंती मातीच्या, कच्च्या होत्या आणि त्याचा एक भाग पावसाळ्यात ढासळला होता. दरवाजावर फाटका तुटका एक घाणेरडा पडदा लटकत होता. मी आवाज दिल्यावर म्हातारी मुलाजिमा बाहेर आली आणि शहजादी साहिबांनी मला आत बोलावून घेतले.
घराचे आंगण खूपच छोटे होते. एक दोन चारपाई जेमतेम मावल्या असत्या एवढेच. दालन तर इतके छोटे होते की त्यात दोन चारपाईसुद्धा मावल्या असत्या की नाही शंकाच आहे. त्या दालनाच्या दक्षिणेस एक छोटी कोठी ही आहे.

मी आत गेलो. शहजादी साहिबा एका पोतेर्‍यावर बसल्या होत्या. एका बाजूला एक चारपाई होती व तिच्या समोर हे पोते अंथरले होते. त्‍या वर बसून शहजादी साहिबा पितळी छोट्या खलबत्त्यात आपले पान कुटीत होती. हे पोते ही बरेच जीर्ण व जागोजागी फाटलेले दिसत होते. ठिगळं लावलेली एक पांढरी चादर ही त्‍या वर अंथरलेली दिसत होती. एक छोटा तक्‍क्‍या होता पण बराच मळलेला. शहजादी साहिबांसमोर एक राख भरलेले मातीचे भांडे ठेवले होते पिकदाणी म्हणून. उजव्या बाजूला पानाचे तबक होते. त्याची कल्हई उडालेली होती पण स्वच्छ होते. त्‍यावर पानाचा एकही डाग नव्हता. दालनाच्या कड्या व कोयंडे पुरातन होत्‍या आणि खारींनी व घुशींनी खाली जमीन ठिकठिकाणी उकरून ठेवली होती.

शहजादी साहिबांचे केस आता पूर्णपणे पिकले आहेत. पापण्या व भुवयाही पांढर्‍याशुभ्र झाल्या आहेत. तरुणपणी त्‍या निश्‍चितच उंचापुर्‍या असणार पण आता त्‍या पार वाकल्‍या आहेत. त्‍यांचे कपडे स्वच्छ होते पण ठिकठिकाणी ठिगळं लावलेली दिसत होती. त्‍यांचे बोलणेही अत्यंत स्पष्ट व आवाजही खणखणीत आहे. वागण्या बोलण्यात अजूनही खानदानी आदब व मिठ्ठास भरली आहे. भाषा उच्च दर्जाची उर्दू ! पण आता वृद्धत्वामुळे चेहर्‍यावर सुरकुत्यांचे जाळे पडले आहे आणि आता शरीरही थकले आहे. त्‍या आत्मविश्वासाने व गंभीरपणे बोलतात. त्‍यांच्‍या या अशा बोलण्याने व उर्दू वरील प्रभावामुळे समोरच्यावर त्यांची छाप पडतेच.

त्यांच्या समोर जाऊन मी त्यांना अभिवादन केले तर म्हणाल्या,

‘‘ जिते रहो ! मियां माझे दृष्टी खराब झाली आहे तेव्हा पासून दरगाह शरिफमधे हजेरी नाही लावू शकले. तुला कधी पाहिले नाही पण तुझे नाव खूप ऐकले आहे. जेव्हा बडी बी ने सांगितले की ख्वाजा साहिब आले आहेत आणि त्यांना मला भेटायचे आहे तेव्हा मला फार आनंद झाला. मी तिला म्हटले सुद्धा , ‘ज्यांचे नाव अनेक वेळ ऐकले होते त्यांची आता प्रत्यक्ष भेट होणार ! त्यांना माझ्या खानदानाबद्दल पुष्कळच आदर वाटत असे.’ आता डोळ्याच्या खाचा झाल्यात आणि आता हातपायही थकलेत… बोला, काय काम काढलंत या बुढीकडे ?’’
मी म्हटले,

‘‘ ते तर मी सांगतोच पण मला प्रथम हे सांगा तुम्हाला येथे काही त्रास तर नाही ? ही जागा तर फारच लहान आहे. आणि छतावरही बर्‍याच ठिकाणे गळतंय दिसते. भोकेही पडलेली दिसतात छपराला. त्यातूनही माती गळत असणार !’’

“अरे मियां तू निदान काळजीने विचारलेस तरी. देवानेच महाल आणि किल्ला हिसकावून घेतल्यावर आता जे काही आहे ते चांगलच म्हणायच. महिन्याला दीड रुपया भाडे आहे. त्यात यापेक्षा काय चांगले मिळणार मियां ! वरुन माती पडतेच आणि रात्री चारपाच वेळा चादर झटकावी लागते. एक काळ असा होता की लाल किल्ल्यात मी माझ्या महालात झोपत होते. त्‍या वेळेस छतावर एका चिमणीने घरटे केले होते आणि तिच्‍या घरट्‍याचे काही गवत माझ्या पलंगावर पडल्यावर मला रात्रभर झोप आली नव्हती. आता येथे रात्रभर माती पडते आणि मला ते सगळे सहन करावे लागते.’’

मी विचारले, ‘‘ सरकार काही पेन्शन देत नाही का ?

‘‘देते ना ! महिन्‍याला दहा रुपये. उशीरा का होईना पण मिळते.

‘‘इतर काही उत्‍पन्‍न…? मी विचारले.

‘‘जी हां ! एक घर आहे ज्‍याचे महिन्‍याला सात रुपये भाडे येते. मी प्रथम त्यातच राहात होते जेव्हा लक्षात आले की १० रुपयात घर चालणार नाही तेव्हा ते भाड्‍याने दिले आहे आणि या स्‍वस्‍त भाड्‍याच्‍या घरात राहतेय. तेवढेच पैसे होतात. आता आम्ही दोन माणसे राहतो येथे. एक ही बडी बी आणि एक मी. घराचे भाडे आणि आमचा दोघींचा व पान सुपारीचा खर्च या सतरा रुपयात भागवतो कसाबसा.’’ शहजादी साहिबांनी सांगितले.

‘‘ तुम्ही जर आपल्या आठवणी मला जर सांगितल्या तर लिहून त्या छापाव्यात अशी माझी इच्छा आहे. मला तुमच्या खानदानाबाबत नेहमीच कुतूहल आणि आदर वाटत आलेला आहे आणि तुमच्या खानदानातील अनेक मान्यवर स्त्री पुरुषांच्या आठवणी मी लिहिल्या आहेत ज्यात सध्याची परिस्थितीबद्दल मी लिहिले आहे…’’
हे ऐकताच त्यांचे पान कुटणारे हात थांबले. त्या माझ्याकडे पाहून म्हणाल्या,

‘‘ नको मियां गल्लीबोळातून, घराघरातून माझ्या नावाची चर्चा व्हावी असं मला मुळीच वाटत नाही.’’

मी म्हटले, ‘‘मी तुमचे नाव कुठेच लिहिणार नाही फक्त हकिकत छापेन. मग ?

‘‘हकिकत तरी काय असणार ? दोन वाक्यात संपते ती. हम बादशाह थे आणि आता फकिर आहोत. संपले. अजून काही विचारशील तर अजून एक वाक्य त्यात घालता येईल – आता आमची मौत जवळ आली आहे. बस्स संपले आमचे हालात.’’ त्या म्हणाल्या.

‘‘ म्हणूनच म्हणतोय आपली कहाणी सांगा मी तुमचे नाव कुठेही छापणार नाही. आणि तुमचा पत्ताही छापणार नाही.

शहजादी साहिबांना इतका राग आला की त्या बर्‍याच वेळ काही बोलल्याच नाहीत. त्यांच्या चेहर्‍यावरील ते भाव मी शब्दात पकडू शकत नाही. नंतर पानदान जवळ ओढून त्यांनी माझ्यासाठी एक बारके पान बनवले आणि सांगू लागल्या –

‘‘ मियां १८५७ सालच्‍या लधाईत माझे वय १०-११ असेल. आम्‍ही किल्ल्यात राहात होतो. बादशाह सलामत आमच्‍या घरावर नाराज होते. पण आमचा पगार महिन्याच्या महिन्याला मिळत असे. माझे तीन भाऊ होते आणि मी एकच बहीण. माझ्या वडिलांनी उतरत्या वयात माझी आई जिवंत असतानाही अजून एक लग्न केले होते. माझी आई तिच्‍या सवतीशी खूप भांडत असे आणि आम्हीही आमच्‍या आईची बाजू घेऊन तिच्याशी भांडत असू. पण माझ्‍या सावत्र आईचे माझ्यावर खूप प्रेम होते. खरे तर मी माझ्या दोन्ही आयांची लाडकी होते. आमच्या घरात नोकर चाकर भरपूर होते. बंडाच्या आधीच सहा महिने माझी सावत्र आई आजारी पडली आणि अल्लाला प्यारी झाली. माझे दोन भाऊही त्याच वेळी त्या साथीत मेले. जेव्हा बंड झाले तेव्हा मी, माझा एक भाऊ, अब्बा हजरत आणि अम्मा एवढेच उरलो होतो.

“बादशाह सलामत किल्ल्यातून निघून हुमायूंच्या मकबरेत राहण्यास ला गेले. बाकीचे लोकही किल्ल्या बाहेर निघून इतरत्र पांगले व किल्ला रिकामा झाला. पण आमचे घर इतर इमारतींपासून बर्‍याच अंतरावर होते आणि खूपच भक्कम होते. बहुधा ती इमारत सगळ्यात जुनी असावी. अब्‍बा हजरत म्‍हणाले,

‘‘एवढी सुरक्षित जागा सोडून कुठे जाणार ? इथेही मरायचे आणि बाहेर गेले तरी मरायचेच. बाहेर कुत्र्याच्या मौतीने मरण येणार त्यापेक्षा घरातच थांबू. जे खुदाच्या मनात असेल ते या घरातच होईल.’’

बादशाह सलामत गेल्यावर दोन दिवस आमच्याकडे कोणी फिरकले नाही. नोकर चाकर सगळे पळून गेले होते. आम्ही घराचे दरवाजे बंद करून घेतले. घराला मोठमोठे दरवाजे होते व त्याला कवाडं होती, ती लावायलाच दोन तीन माणसे लागत. तिसर्‍या दिवशी बाहेर घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. खूप माणसे आपापसात काहीतरी मोठ्‍या आवाजात बोलत होती. थोड्‍याच वेळात दरवाजे तोडण्‍याचे आवाज ऐकू यायला लागले. माझ्‍या भावाचे वय त्यावेळी सोळा असेल. अब्‍बांनी व अम्‍माने हातपाय धुतले व माझ्‍या भावाला सांगितले, ‘‘ चल तूही वजू करून घे (हातपाय धुवून घे) आपली मरण्याची वेळ जवळ आली आहे. शेवटचा नमाज़ पढायला पाहिजे. चल !’’ ते ऐकून माझ्‍या ह्रदयात कालवाकालव झाली. मी धावत जाऊन अम्‍माला बिलगले. तिने मला कुरवाळले व रडत रडत माझ्‍या केसातून हात फिरवला. म्‍हणाली,

‘‘ घाबरू नकोस, अल्‍लाह आपल्याला मदत करेल. तोच काहीतरी सुटकेचा मार्ग दाखवेल.”

त्यानंतर सगळ्यांनी हातपाय धुतले व प्रार्थनेसाठी सतरंजी अंथरली. खाली मान झुकवून आम्‍ही अल्‍लाहची प्रार्थना केली व मदतीचा याचना केली. तिकडे दरवाजे तोडण्याचे आवाज येतच होते. आमच्या सगळ्यांचे डोळे मिटलेले असतानाच दहा पंधरा गोरे व दहाबारा शिख सैनिक संगिनी लावलेल्या बंदुका घेऊन आत शिरले. अब्बा व भाईजान एकदम उठून उभे राहिले. अब्बांनी मला उचलून कडेवर घेतले व चादरीने माझा चेहरा झाकला. एका शिखाने अब्बांना विचारले,

‘‘तुम्ही कोण आहात आणि येथे का बसला आहात ?’’ अब्बांनी उत्तर दिले,

‘‘ हे माझे घर आहे आणि मी येथेच राहातो. शाहआलमची औलाद आहे !’’

त्या शिखाने त्याच्या इंग्रज साहेबाला हे समजावले. त्या इंग्रजी साहेबांच्यामधे आणि त्या शिख सैनिकात काहीतरी बोलणे झाले जे मला काही समजले नाही. तो शिख सैनिक माझ्या अब्बांना म्हणाला,

‘ साहेब विचारताहेत की बादशाह तर पळून गेला, इतर जणही पळून गेले मग तुम्ही का नाही पळून गेला?’’ अब्बा हजरतने सांगितले,

‘‘शाहआलम आमच्यावर काही कारणाने नाराज असल्यामुळे आम्हाला त्यांच्याबरोबर घेऊन गेले नाहीत आणि आम्ही त्यांच्या मागे गेलो नाही. आम्ही या धामधुमीत कसलाही भाग घेतला नाही आणि आम्हाला विश्वास आहे की इंग्रज सरकार निष्पापांना त्रास देणार नाही. आम्ही निष्पाप आहोत म्हणून पळालो नाही.’’

त्या इंग्रज अधिकाऱ्याने सांगितले की तुम्हाला टेकडीवर यावे लागेल. तेथे आम्‍ही तुमची चौकशी करू. जर तुम्ही निर्दोष असला तर तुमच्या जिवास काही धोका नाही. अब्‍बांनी सांगितले की त्‍यांच्‍या बरोबर त्यांची बीबी आणि मुलगी आहे आणि येथे गाडी घोडा काही नाही. यांना पायी चालण्याची सवय नाही. इंग्रज अधिकाऱ्याने उत्तर दिले की या धामधुमीत तुमच्या सवारीची व्यवस्था करणे शक्‍य नाही. इथेच थांबलात तर आम्‍ही तर तुम्हाला सोडून जाऊ पण दुसरी कुठली तुकडी आली तर ती तुमच्याशी असेच वागेल याची मी खात्री देऊ शकत नाही. कदाचित तुम्ही काही बोलण्याआधीच तुम्हाला ठार मारतील. म्‍हणून तुम्‍ही आत्ताच येथून रवाना झालेले बरं! रस्त्यावर काही घोडा गाडी मिळाली तर यांची व्यवस्था करू नाहीतर यांना चालवावे लागेल.

अब्‍बांनी असहाय्य होऊन निघण्याची तयारी केली. त्यांनी काही किमती दागदागिने बरोबर घेतले. इतर सगळे सामान तेथेच सोडले आणि त्‍या फौजेबरोबर बाहेर आले. अम्‍मा हजरत नेहमी आजारीच असायची. मला माझ्‍या भावाने कडेवर घेतले. आता घराचे परत दर्शन होणार नाही म्‍हणून आम्‍ही आमच्‍या महालावर एकदा शेवटची नजर फिरवली. अर्थात तेच खरे झाले. आम्हाला त्‍या वास्तूचे परत दर्शन झालेच नाही.

आम्‍ही घराबाहेर आल्‍यावर तो इंग्रज व ते शीख सैनिक घोड्यांवर स्वार झाले व दौडत निघून गेले. आमच्या बरोबर त्याने दोन शीख घोडेस्वार दिले व आम्हाला सगळ्यांना टेकडीवर त्यांचा तळ पडला होता तेथे जाण्यास सांगितले. किल्ल्याच्या महाद्वारापर्यंत तर ते घोडेस्वार आमच्या बरोबर हळूहळू चालले पण बाहेर आल्यावर मात्र त्यांनी आम्हाला घाई करण्यास सुरुवात केली. तोपर्यंत ते अम्मा व आब्बा हजरतांना काही बोलले नाहीत. अम्माला चालणे मुश्कील जात होते. दर दहा पावलांना ती खाली बसत होती. त्यांचे शरीर आता थरथरु लागले. अम्मा थांबल्यावर त्या स्वारांनाही थांबावे लागे. आम्ही किल्ल्याच्या बाहेर आलो आणि त्यातील एक जण म्हणाला की असे चाललात तर संध्याकाळ होईल. तुम्ही जरा भरभर पावले का उचलत नाही? अब्बांनी नम्रतेने उत्तर दिले,

‘‘मेरे भाई, तुम्ही बघताच आहात की माझ्याबरोबर एक आजारी स्त्री आणि एक लहान मुलगी आहे. ही बाई आयुष्यात आत्तापर्यंत कधी रस्त्यावर चालली नाही. आम्ही हे मुद्दाम करत नाही. या दोघींमुळे असहाय्य आहोत.भरभर चालायचे असले तरी चालता येत नाही.’’

हे ऐकल्यावर ते चूप झाले पण तेवढ्यात माझ्या भावाच्या तोंडून निघून गेले,

‘‘तुम्ही तर हिंदुस्थानी आहात, तुम्हाला यांची दया येत नाही का ?’’ यावर एक शिख म्हणाला,

‘‘आम्ही काय करणार ? आम्ही तर हुकुमाचे ताबेदार आहोत. यावर माझा भाऊ म्हणाला, ‘‘ त्यांनी यांच्यावर जबरदस्ती करा असा हुकुम तर नाही दिला ना !’’

“आम्ही कुठली जबरदस्ती केली यांच्यावर?’’ त्याने विचारले.

‘‘ पण आता जबरदस्ती करावी लागणार असं दिसतंय कारण तुम्ही जाणून बुजून हळूहळू चालताय. तुमचा काहीतरी यात डाव दिसतोय.’’

असं म्हणून एकाने त्याचा घोडा आमच्या पाठीमागे आणला व तो आम्हाला ढकलू लागला. अम्मा हजरत त्या घोड्याला पाठीमागे पाहून घाबरली. त्यांना फीट येत असत. त्यांना एकदम फीट आली व ती धाडकन खाली पडली व जोरजोरात ओरडू लागली. हे पाहून ते दोन्ही स्वार एकदम चूप झाले. थोड्या वेळाने तो शिख स्वार अब्बाला म्हणाला, ‘‘ मी पायी चालतो. तुम्ही या आजारी बाईला घेऊन घोड्यावर स्वार व्हा.’’ शेवटी अब्बा हजरतने अम्माला उचलले व घोड्यावर बसले. त्‍या बिचार्‍या शिख स्‍वाराला मात्र त्‍या टेकडापर्यंत चालत जावे लागले. मी पण भाईजानच्‍या कडेवरुन पहाडावर पोहोचली. तेथे सगळीकडे इंग्रजांची फौज पसरली होती. आम्हाला एका तंबूत ठेवण्यात आले. त्या शिख स्वाराने लंगरमधून आमच्यासाठी रोटी आणून दिली. ती रात्र आम्ही त्याच तंबूत काढली.

दुसर्‍या दिवशी त्‍या फौजेच्‍या जनरलसमोर आम्‍हाला उभे करण्यात आले. दिल्‍लीतील त्‍याचा कोणी हेर त्‍याच्‍या बाजूला उभा होता. त्याने त्‍या माणसाला विचारले,

‘‘ यांना ओळखतोस का?’’ यावर त्याने आमच्याकडे पाहात उत्तर दिले,

‘‘ हो साहिब ! हे बादशाहच्‍या खानदानाचे आहेत आणि किल्‍ल्‍यातच राहतात. जेव्हा लाल किल्ल्यात अंग्रेज बायका मुलांची कत्तल होत होती त्यात याने भाग घेतला होता. हे ऐकताच त्या जनरलचा चेहरा लालबुंद झाला. त्याने रागाने आब्बाकडे पाहिले. आब्बा हजरतने सांगितले,

‘‘ हा माणूस खोटे बोलतोय. हा माझ्याकडे नोकर होता आणि चोरी करताना हा अनेक वेळा पकडला गेलाय आणि त्यासाठी त्याने मारही खाल्ला आहे. शेवटी मी याला हाकलून दिले होते. त्याचा सूड म्हणून हा कुभांड रचतोय. तुम्ही त्याला एवढेच विचारा की बादशाह माझ्यावर अनेक वर्षं नाराज होते की नाही आणि मला केव्हा पासून दरबारात येण्यास बंदी होती, तेही याला विचारा.’’

त्या माणसाने यावर सांगितले, ‘‘ मी यांच्याकडे नोकर होतो हे बरोबर आहे. पण मी कसलीही चोरी केली नव्हती. पगार कमी होता म्हणून मी ती नोकरी सोडली. आणि बादशाह यांच्यावर नाराज होते हेही ठीक आहे पण जेव्हा दंगल सुरु झाली तेव्हा त्यांना खूष करण्यासाठी याने परत दरबारात ये जा सुरु केली होती. शिवाय जे लोक कत्तलीच्या विरुद्ध होते त्यांच्या विरुद्ध यांनी बरीच भाषणे ठोकली. त्यांनी जमावाला भडकावले की सापाला आणि त्यांच्या पिल्लांना सोडणे हे इस्लामच्या तत्त्वात बसत नाही. त्यांना ठेचलेच पाहिजे. हे ऐकूनच जमावाने इंग्रजी बायका पोरांची कत्तल केली.’’

ते ऐकून तो जनरल रागाने काळा निळा झाला. त्याने आब्बाचे काही ऐकले नाही. आब्बा त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न करीत होते पण ते ऐकतच नव्हते. ओरडले,
‘‘यांना ताबडतोब गोळ्या घाला. यांनी आमच्या बायका पोरांची कत्तल केली पण आम्ही यांच्यावर दया करतो. या दोन स्त्रियांना छावणीबाहेर सोडून द्या. त्यांना जायचे तेथे जाऊ देत.’’

गोरे आणि देशी शिपाई पुढे झाले आणि त्यांनी भाईजानचे व अब्बा हजरतचे हात मागे बांधले. अब्बा हजरत माझ्याकडे पाहून रडू लागले पण भाईजान चुपचाप उभे होते. अम्माने एक किंकाळी फोडली व बेशुद्ध पडली. मी आब्बांकडे त्यांना मिठी मारण्यासाठी धावत सुटले पण तेवढ्यात एका शिपायाने मला धक्का मारुन अम्माच्या पायात ढकलले. मी पाहिले, ते शिपाई अब्बांना व माझ्या भावाला फरफटत थोडे दूर घेऊन गेले. त्यांच्या समोर चारपाच शिपाई आपल्या बंदुका घेऊन उभे राहिले. शेजारीच तो जनरलही उभा होता. तो काहीतरी ओरडला. शिपायांनी बंदुका खांद्याला लावल्या व नेम घेतला. त्याच वेळी मला अब्बाजानचा आवाज आला,

‘‘लो बेटी अल्लाह तुझे रक्षण करो ! आम्ही आता या दुनियेतून जातो.’’ त्यानंतर माझ्या भावाचा आवाज माझ्या कानावर पडला,

‘‘ अम्मा, अम्मा, मी तुला असं पाहू शकत नाही. सलाम, अम्मा, मीही चाललो !’’

बंदुकींचा आवाज झाला आणि बराच धूर झाला. मी पाहिले की भाईजान व अब्बा खाली मातीत पडले होते. मी धाय मोकलून रडत होते आणि घाबरल्यामुळे तोंडातून शब्दही उमटत नव्हता. तेवढ्यात अम्मा शुद्धीवर आली. मला अजून आठवतंय, मी तिला म्हटले,

‘‘भाईजान व अब्बाजान को मार डाला ! मार डाला ! बघ ते तेथे मातीत तडफडत पडले आहेत. त्यांच्या डोक्यातून रक्त उसळतंय ! आता ते गेलेऽऽऽ मला आता कधीच भेटणार नाहीतऽऽ. अब्बाने मला शेवटी हाक मारली होती व भैय्याने पण तुला ! अम्मा, अम्मा आता काय होणार? आता आपल्यालाही मारणार का? का परत कैदेत टाकणार ?’’ अम्मा जमिनीला हात टेकत कशीबशी उठली व तिने एकवार अब्बा आणि भाईजानकडे निरखून पाहिले. त्यांची तडफड आता पूर्ण थांबली होती. ते पाहून तिच्या हातापायातील अवसानच गळाले. खाली पडली आणि किंचाळली,

‘‘ माझा बेटाऽऽऽ माझा बेटाऽऽऽ माझा लालऽऽ माझी सोळा वर्षांची मेहनत, माझा शेवटचा आधार, माझा दुल्हा माझ्यापासून हिरावून घेतला. संपल ! सगळं संपल आता. अल्लाह ही हकिकत आहे का स्वप्न ? माझा सरताज येथे धुळीस मिळालाय आणि माझ्या मुलाच्या रक्तात भिजलाय ! हे दोघे तर दंगल सुरु झाल्यावर घराच्या बाहेरही पडले नव्हते. अरेऽऽऽ कसला सूड घेतलास रे माझ्यावर ! माझी तुला दया नाही का आली? तुला माझ्या मुलीचीही दया नाही आली आणि आम्हाला बेसहारा सोडून दिलेसऽऽऽ.’’

अम्मा रडत होती तेवढ्यात फौजेचे देशी शिपाई आले. माझे व अम्माचे हात पकडून त्यांनी आम्हाला ओढत बाजूला नेले. जाताना आमची दृष्टी त्या दोन प्रेतांवर पडली. गोळ्या त्यांच्या छातीवर व चेहर्‍यावर लागल्या होत्‍या. निपचित पडले होते. त्‍यांचे विद्रूप चेहरे रक्‍तात झाकले गेले होते. ना अम्मा चालू शकत होती ना मी. बक्र्‍यांना ओढतात तसे ते आम्हाला ओढत ओढत नेत होते. टेकडीवर आमचे पाय रक्तबंबाळ झाले. त्यावेळेस आमचे काय हाल झाले हे मी शब्दात सांगू शकत नाही. मला नाही वाटत कोणाच्या नशीबात असं काही कधी आले असेल !’’

छावणीच्‍या बाहेर आल्यावर त्‍या शिपायांनी आम्हाला तेथेच सोडून दिले. अम्‍मा तर बेशुद्ध पडली होती. मी तिच्या शेजारी रडत बसले होते. एक गवत कापणारा डोक्यावर गवताची पेंडी घेऊन तिकडून चालला होता. मला पाहिल्यावर त्याने डोक्यावरून गवताची पेंडी खाली उतरवली व माझ्याकडे आला. तो हिंदू होता हे मला पक्के आठवतंय. त्याने अम्माकडे पाहिले आणि म्हणाला की ही बाई मेली आहे. मला तेथेच सोडून तो छावणीत गेला व एकदोन मुसलमानांना घेऊन आला. त्यांनी पण हेच सांगितले की ही बाई मेली आहे. त्यांनी माझ्या व अम्माच्या अंगावरील सगळे दागिने उतरवले व सरकार जमा केले. त्यानंतर त्यांनी एक खड्डा खणला व त्यात अम्माला गाडून टाकले. दोन माणसांनी मला उचलले व अजमेरी दरवाज्यावर सोडून दिले. तेथे मी एकटी बसून रडत बसले असताना खानिमच्या बाजारात काही मुसलमान सोनार आपल्या स्त्रियांना घेऊन आले. ते कुतुब साहिबच्या दर्शनाला चालले होते. ते मला त्यांच्या बरोबर घेऊन गेले. जेव्हा दिल्लीमधे सगळे सुरळीत झाले तेव्हा ते सोनारही परत दिल्लीत आले आणि त्यांनी मला माझ्या काही नातेवाईकांच्या हवाली केले. या शहजाद्यांबरोबर मी लहानाची मोठी झाले. त्यांच्यातीलच एकाशी माझी शादी झाली. शादीनंतर माझी पेन्शन सुरु झाली. परमेश्वराने मला अनेक मुले दिली पण त्यातील एकही जिवंत राहिले नाही. शेवटी माझा नवराही मेला. आता चार वर्षांपासून माझ्या डोळ्यांनाही दिसत नाही…

ऐकलीस का माझी कहाणी ? माझ्या रोमारोमातून तुला फक्त उसासेच ऐकू येतील, या जगात आल्यावर मी माझ्या आयुष्याची पहिली दहा वर्षे सुखासमाधानात काढली व उरलेली सत्तर वर्षे हालअपेष्टात. आता कबरीत पाय सोडून बसले आहे. आज मेले काय आणि उद्या मेले काय ! ही बिचारी बडी बी भेटली आहे…त्यामुळे ठीक चालले आहे म्हणायचे. बाजारातून जरुरी पुरते सामान आणते आणि दिवसभर माझ्या आसपास बसून असते. आमचे शेवटचे दिवस एकमेकींच्या सोबतीने कसेबसे ढकलतोय खरं….

अनुवाद : जयंत कुलकर्णी.
मूळ लेखक : शम्सुल-उलेमा ख्वाजा हसन निज़ामी दहेलवी

Posted in इतिहास, कथा | 1 Comment

कुलसूम ज़मानी बेगम…

image1

….. आपण फाळणीच्‍या कथा मंटोच्‍या कथांमधून वाचल्या. मी त्या कथांचे भाषांतर येथे केले आहे. इतिहासात ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या, चांगल्या किंवा भीषण, त्‍याच्‍या पार्श्वभूमीवरील कथा या नेहमीच ह्रदयद्रावक असतात. उदा. पानिपतच्या पार्श्वभूमीवरील माझी ‘‘नथ’’ ही कथा. (अवांतर : या कथेवर मी आता इंग्रजीमधे एक कादंबरी लिहिण्यास घेतली आहे, ती होईल तेव्हा होईल.) असो. आज मी एका नवीन कथा मालिकेला सुरुवात करीत आहे. अर्थात हाही अनुवादच आहे पण हिंदीतून मराठीमधे. या कथांचा अनुवाद करण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे यातही मराठ्यांचा सहभाग आहेच. १८५७ सालचे स्वातंत्र्यसमर. या कथांमधे बादशाह आणि त्याच्या कुटुंबाचे काय हाल झाले याच्या दुर्दैवी कहाण्या आहेत. वाचण्यास वाईट वाटतेच पण जे आहे ते आहे…

या कथांचे मूळ लेखक आहेत शम्सुल-उलेमा ख्वाजा हसन निज़ामी दहेलवी. त्यांचा जन्म झाला १८८० मधे, म्हणजे १८५७ नंतर फक्त २३ वर्षांनी. त्यांच्या कानावर जे पडले ते बर्‍यापैकी खात्रीशीर असावे. त्यांचा मृत्यू झाला स्वातंत्र्य मिळाल्यावर १९५५ मधे. त्यांची वेषभूषा साधारण अशी असे. डोक्यावर सुफी टोपी, अंगात लांबलचक कुडता, खांद्यावर एक फ़किर ओढतात तशी शाल किंवा पंचा. त्यांचे केस लांब राखले होते. त्यांच्या बोलण्यात अमृताची गोडी होती तर डोळ्यात जादू होती.

त्यांनी ५०० हून जास्त पुस्तके लिहिली. त्यांची लेखनशैली मंटोसारखीच आहे. किंवा मंटोची त्यांच्या सारखी आहे असे म्हटले तरी हरकत नाही. छोटी छोटी वाक्ये पण अत्यंत परिणामकारक. छोट्या वाक्यातून एखादे चित्र उभे करण्याचे त्यांचे कसब वाखाणण्यासारखे आहे. त्यांच्या या शैलीमुळे त्यांना ‘‘मुसव्विरे फितरत’’ असे ही म्हटले जाई. मुसव्विर म्हणजे चित्रकार व फितरत म्हणजे स्वभाव, प्रकृती इ. इ. त्यांच्या लिखाणात म्हणींचा सढळ हाताने वापर केलेला दिसतो. अर्थात पुढे ज्या कथा येणार आहेत त्यात बहुधा म्हणी वापरण्यास पुरेसा वाव नसावा असे वाटते.

ख्वाजा हसन निज़ामी उर्दू शिकले ते बादशहाच्या अनेक शहजाद्यांबरोबर. हे नावाचे शहजादे कुचा चलान किंवा हज़रत निज़ामुद्दीन वस्तीत वास्तव्यास असत. त्यांच्या बरोबर राहिल्यामुळे त्यांच्या ह्रदयात त्या शहजाद्यांप्रती थोडीफार प्रेमभावना निर्माण झाली असल्यास त्यांना दोष देता येणार नाही किंवा ते नैसर्गिक आहे असंही म्हणता येईल. त्या भग्न मनाच्या शहजाद्यांवरअणि त्यांच्या कुटुंबीयांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली ती भारतात व बाहेरही बरीच लोकप्रिय झाली. त्यातील सगळ्यात प्रसिद्ध पुस्तक होते ‘बेगमात के आंसू’. त्यातील काही कथा पुढे येणार आहेतच.

मुल्ला वाहदीने त्यांची एक आठवण सांगितली – एकदा ख्वाजा हसन निज़ामी भयंकर आजारी पडले. त्यांच्या आईने त्यांना एका दर्वेशीकडे उपचारासाठी पाठवून दिले. हा दर्वेशी शेवटचा बादशाह जफ़रचाही उपचार करीत असे असे म्हटले जाई. त्या तांत्रिकाने त्यांच्या गळ्यात एक नादे अलिचा मंत्रावलेला ताईत अडकवला व त्यांना घरी पाठवून दिले. ते पाहिल्यावर त्यांची आई गर्वाने म्हणाली, ‘‘ माझ्या मुलाला बादशहाने नादे अलिचा ताईत दिलाय !’’ बादशाह या शब्दापाशी ती थोडीशी अडखळली व रडू लागली. ख्वाजासाहेबांनी विचारले, ‘‘ अम्मा, तू का रडतेस ?’’ तिने उत्तर दिले, ‘‘ बेटा आता ते बादशाह नाही राहिले. इंग्रजांनी त्यांचे तख्त व ताज दोन्ही हिसकावून घेतले आहे.’’ ख्वाजा निज़ामी म्हणतात – त्या घटनेने माझ्या ह्रदयात कालवाकालव झाली. ते जेव्हा १९२२ साली मदिनेला गेले तेव्हा त्यांना प्रार्थना केली की – हे दोन्ही जगांच्या परमेश्वरा मी दिल्लीच्या बरबाद झालेल्या शहजाद्यांचा आक्रोश तुझ्यापुढे सादर करतोय. ते तख्त व राजमुकुटासाठी रडत नाहीत. ते आज आहे उद्या नाही. पण आज त्यांना वाळलेली भाकरी आणि लाज झाकण्या पुरते कापड ही मिळणे आज दुरापास्त झाले आहे. त्यांच्या अपमानित आयुष्यालाही काही सीमा आहे. आता तरी त्यांना माफ कर !’’

१९११ मधे जॉर्ज पंचमचा दिल्ली दरबार झाला. त्यात सगळ्या धर्मगुरूंनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. ख्वाजा हसन निज़ामींनाही बोलावणे आले होते पण ते म्हणाले, ‘‘ ज्या सिंहासनावरून शाहजहाँ व त्यांच्या वारसांनी जनतेला दर्शन दिले त्या सिंहासनावर जॉर्ज पंचमला बसलेले मला पाहावणार नाही. माझ्या रजईची मजा त्या दरबारापेक्षा केव्हाही जास्त आहे.’’

या मालिकेत एकूण ११ कथा आहेत. हिंदीतून प्रथमच अनुवाद करीत असल्यामुळे चूका अपेक्षित आहेत त्याकडे कृपया दुर्लक्ष करावे…

त्यांच्या (मूळ लेखकाच्या) इतर मतांशी मी सहमत नाही…. हेही अगोदरच सांगतो. विशेषत: त्यांच्या आर्य समाजाबद्दलची जी मते आहेत त्यांच्याशी…

कुलसूम ज़मानी बेगम…

ही एका गरीब दर्वेशीनीची दु:खभरी कथा आहे. त्या धामधुमीत तिच्यावर गुदरलेल्या संकटांची ही कहाणी आहे. या बाईचे नाव होते कुलसूम ज़मामी बेगम. ही शेवटचा मोगल सम्राट अबु जफ़र बहादूर शाह ची लाडकी मुलगी.

ही अल्लाला प्यारी होऊन बरीच वर्षे उलटली. मी अनेक वेळा या शहजादीसाहेबांच्या तोडून त्यांची कहाणी ऐकली आहे. आता तुम्ही म्हणाल तुमची आणि हिची गाठ कुठे पडली. तर हिची हुजूर निज़ामुद्दीन औलियांवर अतोनात श्रद्धा होती आणि अनेकवेळा ती त्यांच्या दरबारात हजर व्हायची व मला तिच्या दु:खभर्‍या कहाण्या ऐकण्याची संधी मिळत असे. खाली ज्या कुठल्या घटनांचे वर्णन आले आहे ते एक त्यांनी तरी सांगितलेल्या आहेत किंवा त्यांची मुलगी ज़िनत ज़मानी बेगम हिने सांगितले आहे. ही बेगम अजून जिवंत आहे आणि पंडितांच्या एका मोहल्ल्यांमध्ये राहाते.

तिने सांगितलेली कहाणी –

माझ्या बाबाजानची बादशाही संपुष्टात आली आणि दिल्लीच्या लाल किल्ल्या मधे सिंहासन व राजमुकूट लुटले गेले तेव्हा तेथे एकच भयाण गोंधळ माजला होता. चहूकडे निराशे शिवाय काही दिसत नव्हते. मला तर पांढरे शूभ्र संगमरवर ही काळे दिसू लागले होते. दिवसभर आज कोणी काहीच खाल्ले नव्हते. माझ्या कडेवर माझी दीड वर्षाची मुलगी ज़ीनत दुधासाठी टाहो फोडत होती. काळजीने व चाललेल्या गोंधळाने मला दुध येत नव्हते ना कुठल्या दाईला. आम्ही सगळे चिंताग्रस्त चेहर्‍याने बसलेलो असतानाच जिल्‍ले सूबहानीचा खास दूत (राजाचा) आम्हाला बोलाविण्यासाठी आला. मध्यरात्र, स्मशान शांतता आणि मधेच येणारा तोफांचा गडगडणार्‍या आवाजाने आम्ही दचकत होतो. जीव मुठीत धरुन बसलो होतो. पण सुल्तानी आदेश मिळाल्यावर आम्ही हजर राहण्यासाठी रवाना झालो. बादशाह नमाज़ाच्‍या चटईवर बसले होते. हातात जपाची माळ होती. मी पुढे होऊन तीन वेळा पुढे झुकून मुजरा केल्यावर त्यांनी मोठ्या प्रेमाने मला जवळ बोलावले व म्हणाले, ‘‘ कुलसूम, तुला आता देवाच्या पदरात टाकतोय ! असेल आपल्या नशिबात तर परत भेट होईल. तू आता तुझ्या पतीबरोबर ताबडतोब बाहेर निघून जा. मी पण जाण्याचा विचार करतोय. तुमच्या डोळ्यातील अश्रू आता मला पाहावणार नाहीत पण माझ्याबरोबर राहिलात तर बरबाद व्हाल. मला सोडून गेलात तर खुदाच्या कृपेने कुठेतरी काहीतरी सोय होईल.’’
असे म्हणून त्यांनी आपले थरथरणारे हात मला आशीर्वाद देण्यासाठी वर उचलले व मोठ्या आवाजात परमेश्वराची करुणा भाकली. त्यांच्या आवाजातील दर्द माझ्या ह्रदयाला घरे पाडून गेला.

‘‘ हे खुदावंद, हे बेवारस मुले तुझ्या स्वाधीन करत आहे. या दुनियेत आता यांची मदत करणारे कोणी नाही. महालात राहणारी ही मुले आता जंगलात चालली आहेत. तैमूरच्या नावाची आणि या मुलींची इज्जत राख. हे परवर्दिगार फक्त हीच नाही तर हिंदुस्तानचे सारे हिंदू-मुसलमान माझी लेकरेच आहेत आणि लवकरच या सर्वांवर संकट कोसळणार आहे. माझ्या कर्मामुळे, दुर्भाग्यामुळे यांची परवड नको. सगळ्यांना सुखरूप ठेव.’’

प्रार्थना झाल्यावर त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला व ज़ीनतला प्रेमाने कुरवाळले. माझ्या नवर्‍याच्‍या (मिर्ज़ा ज्‍यायुद्दीन) हातात काही दागदागिने ठेवले व नूर महल बेगमसाहिबांना निरोप दिला. या त्‍यांच्‍या बेगम.

रात्री आमचा काफिला किल्ल्यातून निघाला. यात दोन पुरुष व तीन स्त्रिया होत्या. पुरुषात एक माझा नवरा होता व दुसरा खुद्द बादशहाचा मेव्हणा होता ‘मिर्ज़ा उम्र सुल्तान’. स्त्रियांमध्ये, मी, दुसरी होती नवाब नूर महल व तिसरी होती हाफिज सुल्तान जी बादशाहाच्या सासुरवाडीची होती. आम्ही जेव्हा रथात चढलो तेव्हा पहाटेचा अंधार दाटून आला होता. आकाशात एकही तारा दिसत नव्हता फक्त दूरवर पहाटेचा तारा चमकत होता. आम्ही आमच्या घरावर व महालांवर शेवटची नजर टाकली तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते थांबण्याचे नावच घेईनात. नवाब नूर महलचेही डोळे भरून आले होते. त्या अंधूक प्रकाशात ते अश्रू त्या ताऱ्याप्रमाणे चमकत होते.
शेवटी लाल किल्ल्याचा निरोप घेऊन आम्ही कोराली नावाच्‍या गावात पोहोचलो व आमच्या सारथ्‍याच्‍या घरात थांबलो. बाजरीची भाकरी ताकाशी खाल्ली. खोटं कशाला सांगू, त्या वेळेस इतकी भूक लागली होती की महालातील बिर्याणीपेक्षाही ते जेवण मला जास्त रुचकर लागले. एक दिवस तर शांततेत गेला पण दुसर्‍या दिवशी आसपासच्या गावातील जाट व गूजर लोकांच्या टोळ्या कोराली लुटण्यासाठी चाल करून आले. त्यांच्याबरोबर अनेक स्त्रियाही होत्‍या ज्या आमच्या अंगाला झोंबू लागल्या. आमचे सगळे दागदागिने व कपडे या लोकांनी लुटले. जेव्हा या धिप्पाड बायका आमच्या शरीराला झोंबत तेव्हा त्‍यांच्‍या शरीराला व कपड्यांना येणार्‍या वासाने आम्हाला मळमळू लागे.

या लुटीनंतर आमच्याकडे जे काही सामान राहिले त्यात आमचे एका वेळचे जेवणही आले नसते. शिवाय पुढे काय वाढून ठेवले असेल या विचारांनी ही आमच्या जीवाचा थरकाप उडत होता. ज़ीनत तहानेने व्याकूळ होऊन रडत होती. समोरून एक शेतकरी चालला होता. मी असाहय्‍यपणे त्याला हाक मारली, ‘‘ भाईजान इस बच्‍चीको थोडा पानी पिला दे ! मेहरबानी होगी !’’ त्याने ताबडतोब एका सुरईत पाणी भरून आणले व म्हणाला, ‘‘ तू मला भाई म्हणालीस ! आजपासून तू माझी बहीण व मी तुझा भाऊ !’’ हा कोरालाचा एक सधन शेतकरी असावा. त्याचे नाव ‘बस्‍ती’ होते. त्याने आपली बैलगाडी तयार केली व आम्हाला त्यात बसवले व म्हणाला की तो आम्हाला पाहिजे तेथे सोडून येईल. आम्ही म्हणालो, ‘‘ मेरठ जिल्ह्यामध्ये अजारा गावात मीर फ़ैज अली नावाचे शाही हकीम राहतात त्यांच्याकडे आम्हाला सोड. त्यांचे व आमच्या घराण्याचे फार जुने संबंध आहेत.’’ बस्‍ती आम्हाला अजाराला घेऊन गेला खरा पण तेथे मीर फ़ैज अलीने तेथे आम्हाला ज्या प्रकारे वागवले तसा प्रसंग शत्रूवरही येऊ नये. त्यांनी कानावर हात ठेवले, ‘‘ तुम्हाला आसरा देऊन मी माझे घरदार बरबाद करू इच्छित नाही.’’ ( हे पुस्तक जेव्हा मीर फ़ैज अलीच्या मुलांनी वाचले तेव्हा त्यांनी हा आरोप अमान्य केला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या वडिलांनी त्यांना आश्रय दिला होता. असो.)

वातावरण असे होते की कुठेही आशेला स्थान नव्हते. एक तर मागे इंग्रजी फौज येईल या भीतीचे दडपण सतत आमच्या मनावर होते. आमची अवस्था बिकट होती. सगळ्या माणसांची नजर फिरली होती. जी माणसे आमच्या नजरेच्या इशार्‍यावर नाचत, चालत, जे आमच्या हुकूमाची क्षणोक्षणी वाट पाहत असत त्यांना आज आमचा चेहराही नजरेसमोर नकोसा झाला होता. मला त्या बस्‍तीचे खरोखरीच कौतुक वाटतंय ज्याने मानलेले भावाचे नाते शेवटपर्यंत निभावले. शेवटी असहाय्य होऊन आम्ही अजारा सोडले व हैदराबादचा रस्‍ता पकडला. सगळ्या स्त्रिया बस्‍तीच्‍या गाडीत बसल्या होत्‍या व पुरुष मंडळी गाडीबरोबर चालत होती. तिसर्‍या दिवशी एका नदीच्या काठी पोहोचलो. तेथे कोयलच्‍या नवाबाच्‍या फौजेचा डेरा पडला होता. जेव्हा त्यांना कळाले की शाही खानदानाची माणसे आहेत तेव्हा त्याने आमचे चांगले आगत स्वागत केले व हत्तीवर बसवून नदी पार करून दिली. आम्ही उतरलो तेवढ्यात समोरून एक फौज आली व नवाबांच्‍या फौजेशी लढू लागली.

माझ्या पतीने नवाबाच्‍या बाजूने लढण्याचा निर्धार केला तेवढ्यात रिसालदाराचा निरोप आला की त्यांनी स्त्रियांना घेऊन ताबडतोब निघून जावे. ‘ जे काही होईल ते आमचे होईल.’ समोर एक शेत होते ज्यात वाळलेला गहू उभा होता. आम्ही त्यात जाऊन लपलो. आता मला माहीत नाही की आम्ही लपलेले कोणी पाहिले की एखाद्या बंदुकीच्या गोळीने त्या शेताला आग लागली. पण आग लागली खरी. आम्ही सगळे तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण हाय ! आम्हाला पळताही येत नव्हते. गवतात पाय अडखळत आम्ही धडपडत होतो. डोक्यावरच्या चादरी तेथेच राहिल्या. तसेच बोडक्या डोक्याने धडपडत शेताच्या बाहेर आलो. आमचे तळ पाय त्या आगीच्या धगीने हुळहुळू लागले. उष्णतेने घशाला कोरड पडली व आता जीव जातो की काय असे वाटू लागले. ज़ीनतची तर सारखी शुद्ध हरपत होती. पुरुषांनी कसेबसे आम्हाला सांभाळत बाहेर आणले.

नवाब नूर महल तर बाहेर आल्या आल्या बेशुद्ध पडली. मी ज़ीनतला छातीशी धरुन माझ्या पतीच्या चेहर्‍याकडे केविलवाण्या नजरेने पाहू लागले व मनात परमेश्वराला विचारू लागले, ‘‘ आता कुठे जाऊ? कुठेच आसरा दिसत नाही.’’ नशीब असे पालटले की शाहीची फ़किरी झाली. फ़किर या अवस्थेतही शांत असतात असे म्हणतात, येथे तेही नशिबात नव्हते.

फौजा लढत लढत जरा दूरवर गेल्यावर बस्तीने पिण्यास पाणी आणले. आम्ही नवाब नूर महलच्या चेहर्‍यावर पाणी शिंपडल्यावर ती शुद्धीवर आली व रडू लागली. म्हणाली, ‘‘ मी आत्ताच तुझ्या वडिलांना, बाबा जज़रत ज़िल्ले सुबहानींना स्वप्नात पाहिले. त्यांना साखळदंडात जखडलेले होते. ते म्हणत होते, ‘ आज आमच्यासाठी या काट्यांनी भरलेल्या गाद्या मखमली फर्शीपेक्षा सुखदायक आहेत. नूर महल घाबरू नकोस. जरा हिंमत दाखव. माझ्या नशीबात वृद्धपणी या यातना भोगायचे लिहिले होते त्याला काय करणार ? कुलसूमला एकदा बघण्याची इच्छा आहे. तुरुंगात जाण्याआधी तिला एकदा डोळे भर भरून पाहायचे आहे मला !’

हे ऐकून माझे डोळे उघडले. माझ्या ओठातून एक चित्कार बाहेर पडला. ‘कुलसूम, बादशाहांना खरोखरीच साखळदंडात जखडले असेल का? मी स्वत:लाच हतबलपणे प्रश्न केला. ‘त्यांना खरच एखाद्या सामान्य कैद्याप्रमाणे तुरुंगात पाठवतील का? मिर्ज़ा उम्र सुल्तानने याचे उत्तर दिले ‘‘ या सगळ्या अफवा आहेत. एक बादशाह दुसर्‍या बादशाहा बरोबर असे वागत नाहीत. आदराने वागतात. तू घाबरू नकोस. ते कैदेत असतील पण सुस्थितीत असतील. हाफिज मुलतान म्‍हणाली, ‘‘ या रानटी फिरंग्यांना बादशहाची काय किंमत असणार ? ते तर स्‍वत:च्‍या बादशहाची मुंडकी कापून सोळा आण्यांना विकतात. नूर महल, तुम्ही त्यांना साखळदंडात जखडलेले पाहिले आहे. मी सांगते या बनेल, लबाड पक्‍क्‍या बदमाश व्यापाऱ्यांकडून यापेक्षाही वाईट वागणूक अपेक्षित आहे.’’ पण माझ्या नवर्‍याने सगळ्यांची समजूत काढली व सगळ्यांना शांत केले.

तेवढ्यात बस्‍ती नावेतून गाडी आमच्या किनार्‍यावर घेऊन आला. त्यात बसून आमचा प्रवास परत सुरू झाला. आम्ही थोडे अंतर कापले असे नसेल, संध्याकाळ झाली आणि आमची गाडी एका गावात जाऊन थांबली. या गावात मुसलमान राजपुतांची वस्ती होती. जमिनदाराने एक खोली आमच्यासाठी रिकामी केली ज्यात गवताचे बिछाने होते. ते यावरच झोपत. त्याला ते प्‍याल किंवा पाल म्हणत. आम्हालाही त्याने त्यातल्यात्यात मऊ बिछाना देऊन आमची सरबराई केली.

माझा जीव त्या वातावरणात घुसमटला पण दुसरा काही मार्ग दिसत नव्हता. दिवसभराची धावपळ व कष्‍टांनंतर जरा निवांत क्षण वाट्याला आले होते. मी तशीच असहायपणे त्या गवतावर पडले, लगेचच मला झोप लागली.

मध्यरात्री आम्हाला सगळ्यांनाच एकदम जाग आली. खाली गवत टोचत होते आणि पिसवा सर्वांगाचे लचके तोडत होत्या. त्यावेळी आमचे जे हाल झाले ते फक्त परमेश्वरालाच माहीत ! आम्हाला मऊ मऊ गाद्यागिरद्यांवर झोपण्याची सवय होती त्यामुळे आमची झोप उडाली, नाहीतर गावातील माणसे याच गाद्यांवर झोपली होती. त्या काळोखात चहूबाजूंनी कोल्हेकुई ऐकू येते होती. माझे काळीज भीतीने धडधडले. नशीब बदलायला वेळ लागत नाही हेच खरं ! काही वर्षांपूर्वी जर कोणी सांगितले असते की शहेनशाहे-हिंदची बायका मुले अशी धूळ मातीत लोळत फिरतील तर कोणाचा विश्वास बसला असता? अशा प्रकारे ठिकठिकाणी नशीबाच्या ठोकरा खात शेवटी हैदराबादला पोहोचलो आणि सिताराम पेठमधे एक घर भाड्याने घेतले. जबलपुरात माझ्या पतीने लुटीतून वाचलेली एक जाडजूड अंगठी विकली ज्याने प्रवास खर्च भागला व काही दिवस गुजराण ही झाली. पण शेवटी जवळ जे काही होते ते पूर्णपणे संपले. आता पोट कसे भरायचे हा यक्षप्रश्न समोर उभा राहिला. काय करावे ? माझे पती एक उत्कृष्ट लिपिक होते. त्यांनी दरूद शरीफ (पैगंबाराला उद्देशून केलेली विनवणी) एका कागदावर लिहिली आणि चारमिनार येथे अर्पण करण्यासाठी गेले. त्यांनी आपल्या सुवाच्य अक्षरात ती प्रार्थना लिहिली होती आणि त्याच्या भोवती वेलबुट्टीची नक्षी ही काढली होती. त्यात त्यांना सुंदर शब्दात प्रेषित महंमदाचे आणि त्याच्या कुटुंबियांचे गुणगान गायले होते. तो कागद पाहिल्यावर लोकांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. पहिल्याच दिवशी कोणीतरी तो प्रार्थनेचा कागद ५ रुपायाला विकत घेतला. त्यानंतर असं झाले की ते जे लिहितील ते विकले जाऊ लागले. अशा प्रकारे आमचा उदरनिर्वाह चांगला होऊ लागला. पण मुसा नदीला आलेल्या पूराला घाबरून
आम्ही कोतवाल अहमदच्या घरात राहण्यास आलो. या माणसाची पुष्कळ घरे अशी भाड्याने दिली होती. हा माणूस निजामाचा खास नोकर होता.

काही दिवसांनंतर अशी बातमी पसरली की त्याने ,म्हणजे नवाब लष्करजंगने काही शहजाद्यांना आसरा दिल्यामुळे नवाब लष्करजंगवर इंग्रज सरकारची वक्र नजर वळली आहे. त्याने आता असा आदेश काढला की कोणीही दिल्ली बादशहाच्या कुठल्याही नातेवाईकाला आसरा देऊ नये. जनतेने कोणी आलेच तर त्याला पकडून इंग्रजांच्या ताब्यात द्यावे. हे ऐकून मी इतकी घाबरले की माझ्या नवर्‍याला बाहेर पडण्यास मी मज्जाव केला. पण याने फाके पडण्याची परिस्थिती निर्माण झाली. शेवटी त्यांना लाचार होऊन एका नवाबाच्‍या मुलाला १२ रुपये पगारावर कुराण शिकविण्याची नोकरी पत्करावी लागली. ते गुपचूप त्‍यांच्‍या घरी जात शिकवणी करीत व गुपचूप परत येत. पण त्या नवाबाने त्यांना नोकरापेक्षाही वाईट वागणूक देण्यास सुरुवात केल्यावर मात्र माझ्या नवर्‍याचा धीर सुटला. ते घरी येत व ढसढसा रडत, ‘हे अल्‍ला, या नराधमाची नोकरी करण्यापेक्षा लखपटीने मरण परवडले. तू मला किती लाचार बनवले आहेस बघ ! जे नवाब कालपर्यंत आमचे गुलाम होते, आज आम्ही त्यांचे गुलाम झालो आहोत. याच दरम्यान कोणीतरी आमची खबरबात मियां निज़ामुद्दीन साहेबांपर्यंत पोहोचवली. मियांना हैदराबदमधे खूपच मान होता कारण मियां हजरत काले मियांसाहेब, चिश्ती निज़ामी फक़रीचे चिरंजीव होते आणि दिल्लीचे बादशाह आणि निजामाचे पीर होते. मियां रात्री आमच्या घरी आले व आमचे ते हाल पाहून खूप रडले. एक काळ असा होता की जेव्हा ते लाल किल्ल्यात येत तेव्हा सोन्याच्या वेलबुट्टी असलेल्या मसनदीवर त्यांना बसवले जात होते आणि बेगम एखाद्या दासी सारखी त्यांची सेवा करीत असे. आज ते घरी आले तर त्यांना बसण्यासाठी खाली अंथरायला फाटकी सतरंजी ही नव्हती. त्यांच्या डोळ्यासमोर भूतकाळ फिरू लागला. काय होते आणि हे काय झाले असे सारखे उसासे सोडत म्हणू लागले. आमची त्यांनी बराच वेळ चौकशी केली व नंतर निघून गेले. सकाळी सकाळी त्यांचा निरोप आला की त्यांनी पैशाची व्यवस्था केली आहे. आता हजची तयारी करण्यास हरकत नाही. हे ऐकल्यावर आमच्या आनंदास पारावार राहिला नाही.

थोडक्यात सांगायचे तर हैदराबादहून आम्ही मुंबईला आलो. तेथे आमचा मित्र व प्रामाणिक सोबत्याला, बस्तीला, त्याचा खर्च देऊन निरोप दिला. जहाजावर चढल्यावर एक माणूस आमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होता. जेव्हा त्याला कळले की आम्ही शाही खानदानातील आहोत तेव्हा तो उतावळा होऊन आमच्याकडे पाहत बसे. त्यावेळी आम्ही सगळे दर्वेशीच्या वेषात होतो. एक हिंदू, ज्याचे बहुतेक एडनमधे दुकान होते, त्याने विचारले, ‘‘ तुम्ही कुठल्या पंथाचे फक़िर आहात ?’’ त्याच्या या प्रश्नाने माझ्या जखमांवर जणू मीठच शिंपडले. मी म्हटले, ‘‘ आम्ही मजलूम शाह गुरुचे चेले आहोत. (मजलूम = पिडीत) तोच आमचा बाप होता आणि तोच आमचा गुरु ! पापी लोकांनी त्याचे घरदार हिसकावून घेतले आणि आम्हाला त्याच्या घरातून जंगलात हाकलून दिले. आम्ही त्याच्या दर्शनासाठी तडफडतोय आणि तो आमच्या.’’
यापेक्षा आमच्या फ़किरीची हकिकत काय सांगणार ? आमची कहाणी ऐकून तो हिंदू व्यापारी रडू लागला, ‘‘ बहादूर शाह आपल्या सगळ्यांचेच बाप व गुरु आहेत. काय करणार, रामाची हीच इच्छा असावी. कारण नसताना बिचारे बरबाद झाले.’’

मक्‍केला पोहोचल्यावर अल्लाहने एका अजीब ठिकाणी आमची राहाण्याची सोय केली. माझा अब्‍दुल कादिर नावाचा एक गुलाम होता ज्याला मी बर्‍याच वर्षापूर्वी मुक्त करून मक्‍केला पाठवून दिले होते. येथे आल्यावर त्याने बरीच संपत्ती गोळा केली व ज़मज़मचा फौजदार झाला. आम्ही आलोय ही बातमी त्याच्यापर्यंत पोहोचल्यावर बिचारा धावतपळत आला व माझ्या पायावर लोळण घेऊन बराच रडला. त्याचे घर चांगले मोठे असल्यामुळे आम्ही मग तेथेच राहिलो. काही दिवसांनी सुल्‍तान रोमचा एक अधिकारी, जो मक्‍केतच राहात होता त्याला आमच्याबद्दल कळले तेव्हा तो आम्हाला भेटण्यासाठी आला. कोणी तरी त्याला सांगितले होते की दिल्ल्लीच्या बादशहाची मुलगी आली आहे आणि पडदा न करता तुमच्याशी बोलते. त्याने अब्‍दुल कादिरतर्फे माझ्याकडे भेट मागितली. जी मी मंजूर केली.

दुसर्‍या दिवशी तो अधिकारी आमच्या घरी आला व खूपच आदराने माझ्याशी बोलला. जाताना त्याने आमच्या आगमनाची बातमी सुल्‍तानाला सांगण्याची परवानगी मागितली पण मी बेपर्वाईने उत्तर दिले, ‘‘ आता मी सगळ्यात शक्तिमान अशा सुल्‍तानाच्‍या दरबारात आले आहे. आता मी दुसर्‍या कुठल्या सुलतानाच्‍या दरबारात कशी हजेरी लाऊ ? आता मला कोणाचीच पर्वा राहिलेली नाही.’’ त्या बिचार्‍याने आम्हाला खर्च करण्यासाठी मोठी रक्कम मंजूर केली. आम्ही तेथे ९ वर्षे राहिलो. त्यानंतर १ वर्ष बगदाद शरीफ व एक वर्ष नजफ अशरफ व करबलामधे काढले. एवढ्या काळानंतर मात्र दिल्लीची आठवण आलीच. बेचैन होऊन दिल्लीला परत आले. येथे इंग्रज सरकारने दया येऊन महिन्याला १० रुपयाची पेंशन सुरु केली. पेन्शनचा हा आकडा ऐकून मला प्रथम हसू आले,

‘‘ माझ्या बापाचा एवढा मोठा मुलूख घेऊन मला फक्त दहा रुपये !’’ पण नंतर विचार केला, ‘‘ मुलुख तर खुदाचा ! नाही कोणाच्या बाबाचा ! त्याला पाहिजे त्याला तो देतो आणि हिसकावून घेण्याची इच्छा झाली तर हिसकावून घेतो. त्याच्या परवानगीशिवाय तर मनुष्याला श्वास घेण्याचीही हिंमत नाही…’’

अनुवाद : जयंत कुलकर्णी.

क्रमश:

पुढची कथा : गुलबानो.

Posted in कथा | Leave a comment

स्टिकीन

Untitled-2

स्टिकीन

१८८०च्या उन्हाळ्यात मी एका निमुळत्या कनूमधून फोर्ट रँगेलहून निघालो. मला वायव्य अलास्काच्या बर्फाळ प्रदेशाची पाहणी पूर्ण करायची होती. १८७९च्या हिवाळ्यात मला ही भटकंती अर्धवट सोडावी लागली होती. सगळे सामान, म्हणजे फार काही नाही, ब्लँकेट इ.इ. बोटीत चढल्यावर माझ्या इंडियन सोबत्यांचा निरोप समारंभ  सुरु झाला. धक्क्यावर त्यांचे बरेच नातेवाईक आणि मित्रपरिवार त्यांना प्रवासाच्या शुभेच्छा देण्यास जमा झाला होता. मी माझ्या मित्राची वाट पहात होतो. अखेरीस रेव्हरंड यंगसाहेबांचे आगमन झाले पण त्यांच्या मागे एक चिमुकला काळा कुत्राही धावत आला. त्याने लगेचच सामानात जेथे जागा होती तेथे आपले बस्तान मांडले. मला कुत्री आवडतात पण हे कुत्रे इतके छोटे आणि कुचकामी दिसत होते की मी त्याला घेऊन जाण्यास लगेचच विरोध केला.

‘‘ रेव्हरंड याला का घेतलाय बरोबर ? प्रवासात उपयोग तर दूरच, याचे आपल्याला ओझेच होईल. मला वाटते याला तुम्ही धक्क्यावरील  एखाद्या इंडियनकडे सोपवलेला बरं. तो त्याला खेळण्यासाठी घरी घेऊन जाईल. मला वाटतं त्याचा तेवढाच उपयोग आहे.  आपला या वेळचा प्रवास हा अशा खेळण्याला झेपणारा नाही. बिचारा पावसापाण्यात आणि बर्फात अनेक आठवडे भिजणार. त्याला लहान बाळासारखे कोण सांभाळणार ?’’

पण त्याच्या मालकाने त्याचे बरेच गुणगान गायले. ‘‘ जॉन हा कुत्रा म्हणजे एक आश्चर्य आहे, तो कितीही थंडी सहन करु शकतो, पोहण्यात सीललाही मागे टाकेल असा पोहतो. उपाशी राहण्यात आपण कोणी त्याचा हात धरु शकणार नाही याची मला खात्री आहे. त्या बाबतीत तो अस्वलालाही मागे टाकेल. त्याच्या इतका हुशार, तल्लख बुद्धीचा कुत्रा मी आजवर पाहिलेला नाही…इ.इ.इ…मी सांगतो आपल्या या चमू मधे हा कुत्रा सगळ्यांना भारी ठरेल !’’

मला नाही वाटत कोणाला त्याचे कूळ शोधता येईल. मी एवढी कुत्री पाहिली आहेत पण यात कुठल्याच जातीच्या खुणा मला दिसल्या नाही. हां ! एक मात्र आहे, त्याच्या हलक्या पावलाने तरंगत गेल्यासारखे चालण्याच्या लकबीने मला कोल्ह्याची मात्र तीव्रतेने आठवण आली. त्याचे पाय छोटे होते आणि त्या छोट्या पायावर त्याच्या शरीराचे मुटकुळं अगदी उठून दिसे. त्याची कातडी मऊ आणि केस लांब, रेशमी व थोडे कुरळे होते. जेव्हा त्याच्या मागून वारा सुटे तेव्हा त्याचे केस पार विस्कटून जात. त्यावेळी हा कुत्रा अगदीच वेडा गबाळा दिसे. पाहिल्या, पाहिल्या, त्याची डोळ्यात भरण्यासारखी एकच गोष्ट होती ती म्हणजे त्याची डौलदार शेपटी. एखाद्या खारीच्या फुगलेल्या शेपटासारखी आणि गंमत म्हणजे त्यात तशाच रंगाच्या छटाही होत्या. शेपटी इतकी लांब होती की पार त्याच्या नाकापर्यंत पोहोचे. नीट पाहिले तरच त्याचे छोटे तीक्ष्ण कान व डोळे दिसत. डोळ्यावर असणार्‍या गडद रंगाचे ठिपक्यांनी तो थोडासा बनेल ही दिसे.. रे. यंगने मला सांगितले की हा कुत्रा त्‍याच्‍या पत्‍नीला स्‍टिका येथील एका खनीज उत्खनन करणार्‍या एका माणसाने भेट दिला होता. तेव्हा ते पिल्लू एखाद्या घुशी इतके छोटे होते. जेव्हा ते फोर्ट रँगेलला आले तेव्हा स्टिकीन इंडियन्सने त्याला सांभाळले होते आणि शुभशकुनाचे म्हणून त्यांच्या जमातीवरुन त्याचे नाव स्टिकीन ठेवले. थोड्याच काळात स्टिकीन सगळ्यांचा लाडका झाला. जिकडे जाईल तिकडे त्याचे कौतुक होत असे आणि इंडियन्सच्या स्वभावानुसार सगळ्यांनी त्याला देवाची देणगी म्हणून सांभाळले. शुभशकूनी होता ना तो !

आता आमच्या या प्रवासातही त्याने आपल्या स्वभावाचे दर्शन घडवलेच. तो कधीकधी फार विक्षिप्तपणे वागायचा तर कधी कधी एकदम गप्प बसायचा. त्यावेळी त्याला कोणीही बोलका करु शकत नसे. त्याला कितीही डिवचायचा प्रयत्न करा, तो शांतच राही. तो प्रत्येक वेळी काहीतरी स्वतंत्रपणे करत असे. कित्येक वेळा तो कोड्यात टाकणार्‍या गोष्टी करत असे, ज्याने माझे लक्ष त्याने वेधून घेतले. आठवड्या मागून आठवडे उलटले, आम्ही प्रवासात असंख्य ओढे ओलांडले, बेटांना वळसे घातले, डोंगरातून पाणी ओतणार्‍या नद्या ओलांडल्या पण या कुत्र्याने कधीही भुंकून गोंधळ घातला नाही. ज्या दिवशी प्रवासात काही विशेष घडत नसे त्यादिवशी हा कुत्रा बोटीत जगाकडे दुर्लक्ष करुन निवांत पडत असे, जणू काही तो गाढ झोपला आहे. पण मला शंका आहे त्याला बोटीत आणि आजूबाजूला काय चालले आहे हे कळत होते. किनार्‍यावर जेव्हा काही इंडियन बदकाची किंवा सीलची शिकार करण्यासाठी जात तेव्हा ते जाण्याआधीच तो बोटीच्या काठावर हनुवटी टेकवून पेंगुळलेल्या डोळ्यांनी बाहेर पहात बसे. ते पाहिल्यावर मला कंटाळलेल्या पर्यटकांची आठवण आल्याशिवाय रहात नसे. जेव्हा त्‍याच्‍या कानावर आमची किनार्‍यावर उतरण्याची चर्चा पडे तेव्हा मला शंका आहे, त्याला ते कळायचे कारण तो लगेचच उठून आम्ही कुठल्या प्रकारच्या किनार्‍यावर उतरणार आहे हे उठून पाही व बाहेर उडी मारण्याची तयारी करे. किनारा आला की तो पाण्यात उडी मारे व पोहत आमच्या अगोदर किनार्‍यावर उतरे. किनार्‍यावर मग स्वारी अंग जोरजोरात अंग हलवून खार्‍या पाण्याचा निचरा करुन जंगलात शिकारीसाठी नाहिसा होत असे. हा सगळ्यांच्या आधी किनार्‍यावर उतरायचा पण बोटीवर मात्र सगळ्यात शेवटी चढायचा. आम्ही जेव्हा किनार्‍यावरुन परतण्याची तयारी करत असू तेव्हा ही स्वारी गायब असायची. आम्ही त्‍याला हाका मारुन मारुन दमत असे पण हा पठ्ठ्या काही येत नसे. नंतर नंतर आम्हाला कळून चुकले की हा आम्ही बोलवल्यावर येत नसे पण हकलबेरीच्या झाडाझुडपांआडून काय चालले आहे ते पहात असणार. कारण आम्ही कंटाळून बोट पाण्यात ढकलली की हा प्राणी कुठून तरी येत असे व पाण्यात उडी मारुन आमच्या बोटी मागे पोहत येत असे. जणू त्याला खात्री होती की आम्ही वल्हवण्याचे थांबून त्याला बोटीवर घेऊ. हा उडाणटप्पू बोटी शेजारी आला की त्याची मानगूट धरुन कोणीतरी त्याला वर उचलत असे व पाणी निथळण्यासाठी त्याला तसेच बोटी बाहेर धरत असे व मग आत फेकत असे. त्याची ही खोड मोडण्यासाठी आम्ही एकदा त्याला बोटीवर घेतलेच नाही व तसेच बोट वल्हवत राहिलो जेणेकरून त्याला असे केल्यास जास्त पोहायला लागते हे कळेल पण त्याचा उपयोग झाला नाही कारण जेवढे जास्त पोहायला मिळे तेवढा तो जास्तच खूष होई.

आळशीपणात त्याचा हात या अख्ख्या जगात कोणी धरला नसता, तरी हिंडायला किंवा शिकारीला जाताना तो कायम उत्साही व तयार असे. डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही इतक्या अंधार्‍या रात्री एकदा आम्ही रात्री १० वाजता एका किनार्‍यावर उतरलो. ही जागा सालमन माशांच्या झुंडी ज्यात पोहोत होत्या अशा प्रवाहाच्या तोंडाशी होती. पाण्यातील फॉस्पोरसमुळे पाणी प्रकाश फेकत होते. सालमन सळसळत पाण्यात पळत होते. लाखो माशांच्या लाख लाख चंदेरी शेपट्या पाणी घुसळून काढत होत्या. तो सगळा प्रवाहच चांदीसारखा चमकत होता. त्या गडद अंधारात ते सगळे दृष्य डोळ्याचे पारणे फेडत होते. हे विलोभनीय दृष्य अजून चांगले दिसावे म्हणून मी एका इंडियनला बरोबर घेतले व बोटीतून त्‍या प्रवाहामधून पुढच्या खळखळाटापर्यंत जाण्यासाठी निघालो. मला वाटले त्या उसळणार्‍या पाण्‍यात हे दृष्‍य फारच भन्‍नाट दिसेल. आणि तसे ते दिसलेही. माझ्या बरोबर आलेला इंडियन ते सळसळणारे मासे पकडण्यात गर्क असताना मी प्रवाहाच्या दिशेला नजर टाकली. एक धुमकेतूच्या आकाराचे काहीतरी आमच्याच मागे मागे येत होते. त्याच्या मागे धुमकेतूचा असतो तसा प्रकाशाचा पिसाराही दिसत होता. मला वाटले एखादा भयंकर प्राणी अमच्यावर हल्ला करायला येतोय. मी इंडियनला सावध केले व नीट पाहिले तर त्या प्राण्याचे डोळेही चमकलेले मला दिसले. आता हा भयंकर प्राणी काय करतोय असा विचार माझ्या मनात आला तेवढ्यात मला तो प्राणी पूर्ण दिसला. स्टिकीन होता तो !. मी मुक्कामाच्या जागेवरुन निघताना त्याने पाहिले होते व आम्ही काय करतोय हे पाहण्यासाठी गुपचूप आमच्या मागे पोहत त्याने आम्हाला गाठले होते.

आम्ही जेव्हा जरा लवकरच तंबू ठोकत असू तेव्हा आमच्यातील सगळ्यात चांगला शिकारी पटकन जंगलात शिकारीसाठी एखादे हरीण मिळते आहे का ते पाहण्यासाठी शिरे. स्टिकीनला त्याचा वास लागताच तो त्याच्या मागे पळे. किंबहुना जंगलात बंदुक घेऊन कोण जातंय याची तो वाटच पहात असे. मी सांगतोय ते तुम्हाला विचित्र वाटेल किंवा तुमचा कदाचित विश्र्वासही बसणार नाही पण मी कधीच हातात बंदुक घेऊन चक्कर मारण्यास जात नसे पण मी निघालो की स्टिकीन सगळ्यांना सोडून, हो ! त्याच्या मालकालाही सोडून माझ्या बरोबरच येत असे. ज्या दिवशी हवा वादळी असे व बोट वल्हवणे शक्य नसे त्या दिवशी मी जंगलात किंवा एखाद्या टेकडीवर मुक्काम टाके व जंगलात अभ्यास करण्यासाठी फेरफटका मारण्यास जाई. त्यावेळेस स्टिकीन नेहमीच माझ्या बरोबर येई मग हवा कितीही खराब असो, बर्फ पडत असो, पाऊस पडत असो. करवंदांच्या जाळ्यातून, पॅनॅक्स व रबसच्या काटेरी जाळ्यातून एखाद्या कोल्ह्यासारखा तो हलक्या पावलाने तरंगत पळत असे. फार क्वचित त्या झाडांवरील पाणी त्याच्यामुळे खाली सांडत असे. बर्फ तुडवत, धडपडत, बर्फाळ पाण्यातून पोहत, या ओंडक्यावरुन त्या ओंडक्यावर उड्या मारत, बर्फात पडलेल्या भेगांवरुन उड्या मारत एखाद्या कसलेल्या गिर्यारोहकाच्या धीराने, चिकाटीने, निराश न होता तो माझ्या मागे पळत असे. एकदा तो माझ्यामागे एका हिमनदीवर चालत असताना बिचार्‍याचे तळपाय बर्फाच्‍या टोकदार काट्‍यांनी कापले गेले. त्‍याच्‍या प्रत्येक पावलाबरोबर त्याच्या पायाचा रक्ताळलेला ठसा बर्फात उमटू लागला. पण एखाद्या इंडियनसारखा तो चिकाटीने माझ्या मागे येत राहिला. त्याची किंव येऊन मी त्याच्या पंज्यांना माझे हातरुमाल बांधले. कितीही संकट आले किंवा अडथळा आला तरी त्याने कधीच माझी मदत मागितली नाही. किंवा उंऽऽउंऽ ही केले नाही. किंवा कधी कसली तक्रारही केली नाही. एखाद्या तत्वज्ञानी माणसाला समजलेले असते त्या प्रमाणे त्याला बहुधा समजले होते की आनंद मिळवायचा असेल तर कष्ट हे उपसायलाच लागतात.

हे सगळे खरे असले तरी स्टिकीनचा खरा उपयोग आमच्यापैकी कोणालाच कळला नव्हता असेच म्हणावे लागेल. तो कुठल्याही संकटाला काही कारण नसताना, विचार न करता सामोरे जात असे आणि तेही त्याच्या मनाप्रमाणे. त्याने कधीही आमची आज्ञा ऐकली नाही आणि आमच्यापैकी कोणताही शिकारी त्याला शिकारीच्या मागावर सोडू शकला नाही ना त्याने टिपलेला पक्षी आणायला सांगू शकला नाही हे सत्य आहे. त्याची स्थितप्रज्ञता कधी ढळलेली मी पाहिली नाही. कधी कधी वाटे त्याला काही भावना अहेत का नाही ! साध्यासुध्या वादळाचा तो आनंद लुटे आणि पावसाबद्दल म्हणाल तर जशी रोपे पावसाळ्यात तरारुन उठतात तसा तो प्रफुल्लित होऊन चेकाळे. तुम्ही कितीही त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करा त्याने शेपूट हलविण्यापलिकडे काही भावना व्यक्त केलेल्या मला आठवत नाही. वरवर तो हिमनगासारखा थंड वाटे व गंमतीजमतींपासून अलिप्त राही. परंतु या धाडसी, हुशार, निर्भय, कुत्र्याच्या थंड स्वभावामागे आमची दोस्ती होऊ शकेल असेल असे काहीतरी असेल म्हणून मी त्याच्याशी दोस्ती करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. मी सांगतो म्हातारे मॅस्टिफ आणि अनुभवी बुलडॉगही याच्या इतके अलिप्त राहू शकणार नाहीत. त्याला पाहिल्यावर मला वाळवंटातील स्थितप्रज्ञ, छोट्या कॅक्टसचीच आठवण येते. कितीही वाळूची वादळे येऊ देत कॅक्टसच्या खिजगणतीतही नसते ते वादळ ! स्टिकीननेही कधी आनंदाने शेपूट हलविली नाही ना इतर कुत्र्यांसारखा तो तुमच्याकडे प्रेमाच्या अपेक्षेने पाही. त्याच्याकडे पाहिल्यावर मला तर वाटायचे की त्याची फक्त एकच इच्छा असावी, ‘‘मला एकट्याला राहू दे !’’ खरा निसर्गपूत्र खरा ! त्याच्या जीवनाचे सगळे सार निसर्गाच्या गुढ शांततेत दडलेले असावे. निसर्गातील टेकड्यांइतका जूना आणि तेवढाच सळसळता चिरतरुण त्याचा मूळ स्वभाव त्याच्या डोळ्यात उमटत असे.. त्या डोळ्यात डोकावून पाहण्याचा मला कधीच कंटाळा आला नाही. त्याच्या डोळ्यात पाहणे म्हणजे एखाद्या निसर्गचित्रात डोकावून पाहण्यासारखे होते पण प्रत्यक्षात त्याचे डोळे छोटे आणि एखाद्या डोहासारखे खोल होते. डोह ! ज्यात काहीही स्पष्ट दिसत नाही. माझ्या अभ्यासात मला प्राण्यांच्या आणि झाडांच्या डोळ्यात पाहणे नवीन नव्हते पण या प्राण्याच्या डोळ्यात मला फार लक्ष देऊन पाहायला लागत असे. मनुष्यप्राणी सोडून इतर प्राण्यांमधे लपलेली बुद्धिमत्ता जोपर्यंत एखाद्या प्रसंगात आपल्या समोर येत नाही, तोपर्यंत आपल्याला कळत नाही हेच खरे. संत आणि कुत्री हे अनेक प्रसंगांना तोंड देत, त्या प्रसंगातून तावूनसुलाखून बाहेर पडल्यावरच ते परिपूर्ण होतात यावर माझा विश्र्वास आहे.

सुम डुम आणि ताकूच्या उंच कड्यामधून वाहणार्‍या खाड्‍यांचा अभ्‍यास केल्‍यावर आमची बोट स्‍टिफनच्‍या खिडीतून लिनच्‍या कॅनॉलमधे शिरली. त्‍यानंतर आयसी स्ट्रेट मधून क्रॉस साऊंड मधे आम्ही जेथे कोणी मनुष्य पोहोचला नाही अशा दर्‍यांमधील ठिकाणांचा शोध घेतला. ही जागा फेअरवेदर रेंजच्‍या बर्फाळ डोंगरांमधे शिरणार्‍या समुद्रापाशी आहे. या ठिकाणी आम्हाला उधाणाची योग्य दिशा मिळाली खरी पण त्‍याचबरोबर ग्‍लॅशियर बेमधील समुद्राला मिळणार्‍या मोठमोठ्‍या हिमनगांचे आरमारही आमच्‍या सोबत प्रवास करत होते. आम्‍ही हळूहळू वल्‍हवत व्‍हॅनक्‍युअर पॉईंट व विंबल्‍डनला वळसा मारला. केप स्पेन्सर नंतर तर आमची नाजूक बोट हवेवर पिसाने हेलकावे खावे तशी त्या पाण्यात हेलकावे खात होती. पुढे कित्येक मैल आमचा आवाज आकाशाला गवसणी घालणार्‍या उंच कड्यांनी वेढला गेला. या कड्‍यांवर आदळणार्‍या लाटांचा आवाज छातीत धडकी भरवत होता. एकंदरीत सगळे दृष्‍य भितीदायकच होते. आमच्‍या बोटीला काही झाले असते तर किनार्‍यावर उतरण्‍याचा काही प्रश्नच नव्‍हता कारण ते सरळसोट सुळके पाण्‍यामधे खोलवर उतरले होते. आम्‍ही मोठ्‍या उत्‍सुकतेने उत्‍तरेकडील काठ न्‍याहाळत चाललो होतो. कुठे बोट लावता येईल का हे पहात होतो. आम्‍ही त्‍या सुळक्‍यांबद्दल चर्चा करत असताना स्‍टिकीन मात्र शांतपणे त्‍या सुळक्‍याकडे त्‍याच्‍या मिचमिच्‍या डोळ्‍यांनी पहात बसला होता. शेवटी एकदाची जेथे समुद्राचे पाणी आत घुसले होते ती जागा दिसली. आता त्‍या जागेला टेलर बे असे नाव आहे. संध्‍याकाळी साधारणत: ५ वाजता आम्‍ही त्‍या मुखापाशी पोहोचलो आणि एका अवाढव्य हिमनदीच्या समोर, स्प्रुसच्या बनात मुक्काम टाकला.

तंबू उभा करायची तयारी चालू असताना ज्यो नावाचा एक शिकारी पूर्वेची भिंत चढून डोंगरावर गेला. तो तेथे रात्रीच्या जेवणासाठी एखादी जंगली मेंढी मिळते का ते बघणार होता. मी आणि रे. यंग हिमनदीकडे गेलो. आमच्या लक्षात आले की ती हिमनदी पाण्यापासून तिच्या प्रवाहाने वाहून आणलेल्या रेताड मुरुमासारख्या मातीने वेगळी झाली होती. ज्या सुळक्यांच्या भिंती होत्या तेवढ्या लांबीएवढी ही रेताड, घसरडी माती पसरली होती. तिची लांबी जवळजवळ असेल तीन मैल. पण सगळ्यात महत्वाचा शोध आम्हाला लागला तो म्हणजे ती नुकतीच पुढेपर्यंत पसरली होती आणि परत मागे गेली होती. हिमनदीच्या टोकाला ती माती वाहत्या बर्फाने नांगरली गेली होती आणि तिच्यात असलेली झाडे अस्ताव्यस्त उखडली गेली होती. बरीचशी झाडे मुळापासून उन्मळून पडली होती तर काही गाडली गेली होती. कित्येक झाडे बर्फाच्या सुळक्यावरुन खाली कलली होती आणि केव्हाही उन्मळून पडतील अशी त्यांची अवस्था होती तर काही बर्फाच्या आधाराने भक्कमपणे पाय रोवून अजून उभी होती. जी झाडे उभी होती त्यांच्या माथ्यावर बर्फाचे उंच मिनार तयार झाले होते. झांडांवर आकाशाला टेकणार्‍या निमुळत्या सुळक्यांना त्या प्राचीन वृक्षांच्या फांद्या जवळजवळ टेकल्या होत्या. ते दृष्‍य मला तरी फारच आगळे वेगळे वाटले. मी जेव्‍हा त्‍या हिमनदीवर पश्‍चिम बाजूने चढून गेलो तव्‍हा मला आढळले की ती खूपच फुगली होती व तिच्‍या किनार्‍यावरील झाडांना तिने कवेत घेतले होते.

ही प्राथमिक टेहळणी केल्‍यानंतर मुक्‍कामाला परत जातानाच मी उद्यासाठी त्‍या हिमनदीवर अजून खोलवर शिरण्‍याची योजना मनात आखली. मला दुसर्‍या दिवशी पहाटेच जाग आली. काल पाहिलेल्या दृष्यं डोळ्यासमोर होतीच पण मुख्य कारण होते वादळाच्या भयानक आवाज. वार्‍याने उत्‍तरेकडून बर्फाचे वादळ आणले होते तर खाली पावसाच्‍या ढगांनी पावसाच्‍या सरीवर सरी पाठवून पूर आणला होता जणू काही जगबुडीच येणार होती. ओढे भरभरुन वहात होते व त्‍याचे पाणी किनार्‍यावर चढले होते. पण मुख्‍य म्‍हणजे असंख्‍य नवीन ओढे, प्रवाह तयार झाले व एखादा समुद्रच जमिनीवर पसरल्याचा भास होत होता. पाण्याचा रौद्र आवाज व फेसाळलेले पाणी वाट मिळेल तिकडे घुसत होते. मी कॉफी करणार होतो व थोडेसे खाऊनही घेणार होतो पण वादळ पाहिल्यावर मात्र मी विचार बदलला. कारण निसर्ग त्याचे सगळ्यात महत्वाचे धडे त्याच्या रौद्र रुपातच शिकवतो आणि जर थोडी काळजी घेतली तर आपण त्या वादळाबरोबर निसर्गात हिंडू फिरु शकतो, त्याच्याबरोबर आपले नाते प्रस्थापित करु शकतो. आपणही नॉर्डिक दर्यावर्द्यांसारखे गाऊ शकतो, ‘‘फुटणारी वादळे आमच्या वल्ह्यांना जोर देतात तर चक्रीवादळ आमचा चाकर आहे आणि आम्हाला पाहिजे तेथे घेऊन जाणे त्याचे काम आहे.’’ थोडक्यात मी काही उगीचच धोका पत्करण्यांपैकी नाही पण मी कशाला घाबरतही नाही. मी माझ्या समोरचा ब्रेड खिशात टाकला आणि पटकन बाहेर पडलो.

रे. यंग आणि इतर इंडियन्स अजून झोपले होते आणि स्टिकीनही झोपलेला असेल असे मला वाटले. पण मी काही यर्ड गेलो असेन नसेन, त्याने आपले तंबूतील अंथरुण सोडले. त्या वादळातून वाट काढली व माझ्या मागे आला. आता माणसाला वादळाचे आकर्षण वाटावे, त्यात भाग घेऊन त्याने धाडस दाखवावे, मुसळधार पावसाचे आणि वादळी वार्‍याचे संगीत ऐकावे, किंवा निसर्गाचा अभ्‍यास करावा, हे मी समजू शकतो पण या असल्‍या वादळाचे या छोट्‍या कुत्र्याला काय आकर्षण वाटले असेल हे माझ्या आकलनाच्या पलिकडचे होते. पण तो माझ्या मागे आला, कसलीही न्याहरी न करता, श्र्वास गुदमवणार्‍या वादळी वार्‍याला तोंड देत मागे मागे आला. मी थांबलो व त्याला परत पाठविण्याच खूप प्रयत्न केला.

‘‘बास्स ! आता पुढे येऊ नकोस’’ मी त्याला वादळात ऐकू यावे म्हणून ओरडलो. ‘‘स्टिकीन ! तुझ्या डोक्यात हे काय भलतेच शिरलंय ? तुला वेड लागलंय. या वादळात तुझ्यासाठी काहीच नाही. एखादा ससाही तुला मिळायचा नाही. वादळाशिवाय आज येथे काही नाही. तंबूत परत जा आणि उबेत मस्त झोप. तुझ्या मालकाबरोबर न्याहरी कर. जरा शहाण्यासारखा वाग ! स्टिकीन. मी तुला बरोबर नेणार नाही. हे वादळ तुला ठार मारेल !’’

पण निसर्गाचे वेड जसे माणसाला असते तसे कुत्र्यांनाही असावे. तोच माणसाला आणि बहुधा कुत्र्यालाही त्याला पाहिजे तसे वागण्यास उद्युक्त करतो. आपल्याला, कितीही खडतर रस्ता असला तरी मग आपण ठेचकाळत, तो सांगेल त्या रस्त्याने जात राहतो कारण निसर्गाला आपल्याला काही धडे द्‍यायचे असतात. मी बर्‍याच वेळा थांबलो, आरडाओरडा करुन पाहिला पण त्‍याला झिडकारणे काही मला जमले नाही. आता सांगा पृथ्वीला चंद्राला झिडकारणे शक्य आहे का ? मी एकदा त्‍याच्‍या मालकाला एका डोंगरावर असेच नेले होते आणि तेथे एका किरकोळ अपघातात बिचार्‍याचा खांदा निखळला होता आज त्‍याच्‍या कुत्र्याची पाळी दिसत होती. हा छोटा प्राणी तेथेच पावसात भिजत, लुकलुकत्या डोळ्यांनी माझ्याकडे पहात होता आणि जणू सांगत होता, तुम्ही जाणार तेथे मी येणार आहे. काही झाले तरी !’’ मग मात्र मी त्याला परत पाठविण्याचा नाद सोडला व त्याला बरोबर येण्याची परवानगी दिली. त्याला एक ब्रेडचा तुकडा दिला.. यानंतर सुरुवात झाली अकराळ विकराळ निसर्गातील माझ्या आयुष्यातील सगळ्यात धाडसी सफरीची..

पुराचे पाणी वार्‍याने आमच्‍या चेहर्‍यावर फटकारे ओढत होते. आम्‍हाला अक्षरश: चाबकाने फोडून काढल्‍यासारखे आम्‍हाला झोडपून काढत होते. शेवटी आम्‍ही ग्‍लॅशियरच्‍या समोरील एका घळीत श्र्वास घेण्यासाठी व परिस्थितीचा एकंदरीत आढावा घेण्यासाठी थांबलो. माझा मुळ उद्देश ग्लॅशियरची पाहणी करण्याचा होता परंतु वार्‍याचा वेग उघड्‍यावर प्रचंड होता. आम्हाला अक्षरश: ढकलत होता. अशा वार्‍यात बर्फातील एखाद्‍या छोट्‍या भेगेच्‍या काठावरुन तोल सावरत उडी मारणेही धोक्‍याचे होते. पण माझा वादळाचा अभ्‍यास मात्र मस्त चालला होता. बर्‍याच बाबींची मी मनोमन नोंद करत होतो. त्‍या ग्‍लॅशियरच्‍या शेवटी अंदाजे ५०० फुट उंचीच्‍या खडकावर पाण्‍याचा प्रवाह गोठला होता. त्या खडकावर गोठल्यामुळे तो धबधबा पुढे झुकला होता. उत्तरेकडून वादळ घोंघावत ग्लॅशियरवरुन खाली आले पण ते आमच्या डोक्यावरुन जात असल्यामुळे आम्ही त्या रौद्र निसर्गाचा अनुभव घेऊ शकलो. ते वादळ कुठल्या मंत्राचे पठण करतंय, वादळाने उडविलेल्या ओल्या मातीचा वास, आणि दबत्या आवाजात ते आम्हाला काय सांगतंय हे सगळे आम्ही डोळे विस्फारुन अनुभवत होतो. जंगलातून फांद्या भिरभिरत आमच्याकडे उडून येत होत्या. त्या फांद्यातून आणि पानांतून वारा शिळ वाजवत होता, एवढेच काय वार्‍यावर उडणारे बर्फाचे छिलकेही आवाज करत होते. एखादे लावलेले वाद्य जसे कर्णमधूर आवाज काढते तसेच हे सगळे आवाज मला वाटत होते. ग्‍लॅशियरच्‍या कडेला असणार्‍या पाण्‍यातून बर्फाचे मोठमोठे हिमनग, एकमेकांना हाका मारत, आरडाओरड करत, वरची थंडी न सोसल्‍यामुळे समुद्राच्या उबदार पाण्याकडे सर्व शक्तीनिशी गडगडत धाव घेत होते. त्या हिमनगांमुळे काही खडकही आपल्या जागेवरुन सुटून त्यांच्याबरोबर खाली येत होते.

आम्ही ज्या आसर्‍याला उभे होतो त्‍या जागेवरुन मी दक्षिणेकडे नजर टाकली. आमच्‍या डोक्‍यावर डाव्‍या बाजूला ते वाहणारे पाणी होते आणि त्‍याच्‍यावर दाट जंगल असलेला डोंगर. बर्फ जमलेले सुळके उजव्‍या बाजूला तर समोर धुरकट, कोंदट काहूरा. मी तो निसर्ग माझ्‍या रेखाटनाच्‍या वहीत बंदीस्‍त करण्‍याचा प्रयत्न केला पण वाऱ्याने आणि पावसाने माझा तो प्रयत्न उधळून लावला. जे काही तयार झाले त्याला मी काही रेखाटन म्हणणार नाही. वादळ थोडे ओसरल्यावर मी ग्लॅशियरच्या पूर्वेच्या बाजूची पाहणी केली. जंगलाच्या काठावर असलेल्या सर्व वृक्षांची वादळाने पार वाट लावली होती. जी काही झाडे उभी होती, त्यांच्या बुंध्यांवर बर्फाने उमटवलेले ओरखडे स्पष्ट दिसत होते. गेली हजारो वर्षे तग धरुन उभे असलेले हजारो वृक्ष जमिनदोस्त झाले होते तर काही त्या मार्गावर होते. बऱ्याच ठिकाणी मला पन्नास एक फुट खालचे दिसत होते. तेथे मी अचंबित करणारे दृष्य पाहिले. खडबडीत दगडी भिंती आणि पाण्यामधे सापडून दोन तीन फुट रुंदीचे ओंडके चक्क कापले जात होते, आणि काहींचा तर लगदा होत होता.

मी तीन मैल अंतरावर स्टिकीनसाठी त्या हिमनदीच्या बर्फाच्या पृष्ठभागावर माझ्या आईसॲक्सने पायऱ्या केल्या व तो भाग चढून गेलो. जेथेपर्यंत माझी नजर पोहोचत होती तेथपर्यंत आकाशाखाली ती हिमनदी पसरली होती. तिला हिमनदी म्हणावी की हिमनद म्हणावे असा प्रश्र्न मला पडला इतका त्याचा पसारा अवाढव्य होता. असे वाटत होते की त्या हिमनदीला अंतच नव्हता. पाऊस सुरुच होता फक्त त्याचे पाणी आता बर्फाइतकेच थंड होऊ लागले होते. त्या बर्फाळ पाण्याची मला विशेष काळजी वाटत नव्हती पण खाली ओथंबणारे ढग जेव्हा हिमासारखे दिसू लागले तेव्हा मात्र मी ठरवले की आता जमिनीपासून जास्त दूर जाण्यात अर्थ नाही. पश्र्चिम किनारा दिसतच नव्हता.. हे ढग जर खाली विसावले किंवा वाऱ्याने परत जोर धरला तर मला बर्फाला पडलेल्या तड्यांच्या जंजाळात सापडण्याची भीती वाटत होती. बर्फाचे स्फटीक म्हणजे ढगांची फुले. हा एक नाजूक सुंदर फुलांचा प्रकार आहे पण जेव्हा ही फुले वादळात वाऱ्यावर उडतात तेव्हा भयंकर रुप धारण करतात. गोठवणारी ही फुले दंश करतात. जेव्हा ती एकत्र होतात तेव्हा त्यांच्या हिमनद्या तयार होतात आणि त्यात खोल भेगा पडतात व बर्फात अनेक खाई तयार होतात. त्या तसल्या वातावरणात मी हळुवार पावलांनी त्या हिमफुलांच्या समुद्रावर फिरलो. साधारणत: एका मैलावर मला बर्फ बऱ्यापैकी निर्धोक वाटला. हिमनदीचा मधला भाग कधी कधी बाजूच्या भागांपेक्षा जास्त वेगाने धावतो तेव्हा मात्र त्या बर्फाला प्रचंड प्रमाणात भेगा पडतात. या येथे त्या अगदी अरुंद होत्या. काही भेगा अर्थातच मोठ्या होत्या पण त्याला मी वळसा मारुन जाऊ शकत होतो आणि शिवाय थोडीशी उघडीपही झाली.

या उघडिपीने धीर येऊन मी दुसऱ्या बाजूला जायला निघालो; निसर्ग शेवटी तुम्हाला त्याला पाहिजे ते करण्यास भाग पाडतो हेच खरं. सुरुवातीला आम्ही भरभर चालत होतो. आकाशही एवढे धोकादायक दिसत नव्हते. मी माझ्या कंपासने माझ्या दिशेची नोंद ठेवत होतो कारण जर परतावे लागले आणि जर तुफान आले तर अगदीच आंधळे व्हायला नको. पण ग्लॅशियरवरील खुणा याच माझ्या मुख्य मार्गदर्शक होत्या. पश्चिमेला आम्हाला अनेक भेगा पडलेला बर्फ लागला. ज्यावरुन आम्हाला उड्या मारुन त्या पार कराव्या लागल्या. शेवटी आडव्या पसरलेल्या मोठ्या भेगा लागल्या. त्यातील कित्येक वीस ते तीस फुट रुंद व हजार एक फुट तरी खोल असाव्यात. दिसण्यास त्या सुंदर पण त्याच वेळी भयंकर भीतीदायक होत्या. त्याच्या काठावरुन चालताना मी अत्यंत काळजीपूर्वक चालत होतो पण आमचे स्टिकीन महाराज एखाद्या ढगाप्रमाणे तरंगत माझ्या मागे येत होते. एखादी अरुंद भेग मी उडी मारुन पार करत असे व स्टिकीन तर ती सहज उडी मारुन पार करत होता. हवामान पटकन बदलत होते. धुरकट वातावरणातून मधून मधून आंधळे करणारा प्रकाश चमकत होता. जेव्हा सूर्य पूर्णपणे ढगातून बाहेर आला तेव्हा त्या हिमनदीच्या काठावरील सुळक्यांनी तेजाने झळकत आम्हाला दर्शन दिले. त्यांनी गळ्यात ढगांच्या माळा घातल्या होत्या तर खाली प्रचंड सपाटीवर हिमकणांची उमललेली फुले प्रकाशाने चमचम करीत होती. हे बघत असतानाच एकदम अंधार पसरे व ते दृष्य अंधारात बुडून जाई.

स्टिकीनला मात्र या प्रकाशाचे, अंधाराचे, घळींचे, बर्फाचे, किंवा तो ज्यात घसरु शकला असता अशा पाण्याच्या ओहोळांचे काहीही पडले नव्हते. त्याला मुळी कशाची भीतीच वाटत नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसत नव्हती ना काळजी, ना आश्चर्य ना भीती. तो आपला त्या हिमनदीवर हुंदडत मजेत फिरत होता. एखाद्या बागेत फिरल्यासारखं ! त्याच्या शरीराचा जणू एक उड्या मारणारा चेंडूच झाला होता. त्याला बर्फातील घळींवरुन सहज उड्या मारताना बघणे हा एक प्रसन्न अनुभवच होता. तो खरोखरीच धाडसी होता का धोका काय आहे हे न कळल्यामुळे तो धाडस करत होता हे समजणे कठीण आहे. मी मात्र प्रत्येक वेळा त्याला सावध करत होतो. वेळोवेळी त्याच्यावर ओरडत होतो. मी त्याच्याबरोबर अनेक दौरे केले असल्यामुळे मला त्याच्याशी बोलण्याची सवयच लागली होती. मी बोलतो ते त्याला समजत असणार असा माझा विश्र्वास होता.

पश्चिम किनाऱ्यावर पोहोचण्यास आम्हाला अंदाजे तीन तास लागले असतील. या ठिकाणी हिमनदीचे पात्र साधारणत: सातएक मैल असेल. तेथे मी उत्तरेकडे वळलो मला फेअरवेदर माउंटनमधील धबधबे पहायचे होते, अर्थात ढग बाजूला सरले असते तर ! जंगलाच्या परिघावरुन चालणे तुलनेने बरेच सोपे होते पण त्या किनाऱ्यावरही वादळाने व फुगलेल्या हिमनदीने झाडांची धुळदाण उडवली होती. तासभर चालल्यावर आम्ही एक समुद्रात उतरलेला ताशीव कडा वरुन पार केला. आम्ही थबकलो. आम्ही त्या हिमनदीच्या एका फाट्यावर आलो होतो. तेथे दोन मैल रुंदीचा एक धबधबा आमच्या समोर उभा ठाकला. मुख्य पात्रावरुन तो पश्चिमेला पाणी ओतत असणार. आता मात्र त्या धबधब्याचे पाणी मधेच गोठले होते. गोठलेल्या क्षणी ज्या लाटा त्यात उठत होत्या त्या अजुनही तशाच होत्या तर काही बर्फाचे कडे तुटलेल्या अवस्थेत दिसत होते. प्रवाह खूपच खळखळता, उसळता व भयंकर असणार. त्या धबधब्याबरोबर तीन चार मैल चालल्यानंतर तो एका तलावात पडत असल्याचे मला दिसले. त्यातही त्याने मोठमोठ्या बर्फाच्या लाद्या आणून ओतल्या होत्या.

त्या तळ्याचे पाणी पुढे कुठे जाते आहे हे पाहण्याची मला खरे तर उत्सुकता होती पण दिवस ओसरला होता आणि शिवाय आकाशात चिन्हे काही ठीक दिसत नव्हती. दिवस मावळायच्या आत बर्फावरुन खाली उतरणे ठीक होते. मी पुढे जाण्याचा विचार मनातून काढून टाकला व त्या नयनरम्य, सुंदर देखाव्यावरुन नजर फिरवली व परतीचा रस्ता पकडला पण परत केव्हातरी या ठिकाणी जास्त वेळ काढायचे असे मनोमन ठरवूनच ! आम्ही चांगलीच चाल पकडली व लवकरच ग्लॅशियरच्या मुख्य भागावर आलो. आता पश्चिम किनारा दोन मैल तरी मागे राहिला असेल. येथे मात्र आम्हाला बर्फातील भेगांचे जाळेच लागले व ढगातूनही हिमाचे कण पडू लागले आणि थोड्याच वेळा हिमवर्षाव सुरु झाला. आता मात्र त्या हिमवर्षावात परतीची वाट सापडेल का ? या काळजीने मला त्रस्त केले. स्टिकीन मात्र घाबरलेला दिसत नव्हता. नेहमीप्रमाणे तो शांत होता. पण मी एक पाहिले होते की वादळ सुरु झाल्यानंतर जो आकाश झाकाळून टाकणारा अंधार पसरतो त्यात मात्र तो इकडे तिकडे न पळता माझ्या मागे, अगदी जवळून चालत असे. हिमवर्षावाने आम्हाला चालण्याची घाई केली पण आमची वाटही झाकून टाकली. मी घाईघाईने, शक्य असेल तेवढ्या वेगाने चालत होतो. प्रसंगी पळत उड्या मारत भेगा पार करत होतो, बर्फाच्या लाद्यांवरुन ढांगा टाकत चालत होतो. मला तेथून लवकर बाहेर पडायचे होते. दोन तास असे चालल्यावर आम्ही एका भल्या मोठ्या भेगेपाशी आलो. अगदी सरळ, पण खोल अशी ही छोटी दरी एखाद्या नांगराच्या फाळाने कापावी तशी दिसत होती. मी आता काळजीपूर्वक उडी मारण्याआधी माझ्या ॲक्सने भुसभुशीत बर्फात एक पायरी तयार करुन मग त्यावरुन उडी मारत होतो. कारण येथे फक्त एकच संधी मिळते. स्टिकीन अर्थातच विनासायास माझ्या मागे उड्या मारत येत होता.

असे बरेच अंतर काटल्यावर आम्ही जवळ जवळ पळायला लागलो कारण रात्री त्या ग्लॅशियरवर मुक्काम करण्याच्या कल्पनेनेच माझा थरकाप उडाला. स्टिकीनची मात्र कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यायची तयारी दिसत होती. जर तेथेच मुक्कम करावा लागला असता तर आम्ही एक रात्र त्या बर्फावर नाचत नाचत शरीरात उब निर्माण करुन राहू शकलो असतो, नाही असं नाही, पण आम्ही भिजलो होतो आणि आम्हाला भूकही लागली होती. वाऱ्यात अजूनही बर्फ उडत होता व थंडी मी म्हणत होती. रात्रीचा मुक्काम जरा अवघडच झाला असता. बर्फाच्या उडणाऱ्या कणांमुळे मला कुठली वाट कमी धोक्याची आहे हे समजत नव्हते. ढगातून मधे मधे ते सुळके दिसत होते पण त्यामुळे वातावरण अधिकच भीतीदायक वाटत होते. मी आपला वाऱ्याची दिशा पाहून आणि अंदाजाने वाट काढत होतो. प्रत्येक भेगेजवळ माझा कस लागत होता पण स्टिकीन आरामात माझ्या मागे येत होता. किंबहुना जशा अडचणी वाढल्या तसा त्याचा अत्मविश्र्वास मला वाढतोय की काय अशी शंका मला येऊ लागली. गिर्यारोहकांचेही असेच असते. जेवढ्या अडचणी, धोके जास्त तेवढा आत्मविश्र्वास जास्त. प्रत्येक भेग पार केली की आम्ही इच्छा करत असू की ही शेवटची असू देत पण भेगा जास्तच धोकादायक होत होत्या.

शेवटी आमची वाट एका सरळसोट आणि रुंद भेगेने अडवलीच. मी लगेचच त्याच्या काठावरुन उत्तरेकडे चालत जात कुठे ती पार करण्यासारखी जागा आहे का याची पाहणी केली. तेथे अशी जागा नाही म्हटल्यावर खालच्या बाजूला उतरलो. या अंदाजे दोन मैलांच्या अंतरात मला फक्त एकच जागा अशी सापडली की जेथे मी ती भेग पार करण्याचा विचार करु शकलो. पण उडीसाठी हे अंतर बरेच जास्त होते आणि पुढच्या बाजूला बर्फ भुसभुशीत होता. मला तो प्रयत्न करावासा वाटला नाही. पण एक फायदा होता तो म्हणजे माझी बाजू पलिकडील बाजूपेक्षा एक फुट तरी उंच होती. पण काहीही म्हणा ती रुंदी छातीत धडकी भरवणारी होती हे मात्र खरे. जेव्हा असली भेग लांबलचक आणि सरळसोट असते तेव्हा तुमचा तिच्या रुंदीचा अंदाज नेहमीच चुकतो हे मला चांगले माहीत होते. मी जरा पुढची बाजू नीट निरखून पाहिली व अंतराचा नीट अंदाज घेतला. शेवटी मी ती उडी मारु शकेन असा आत्मविश्र्वास मला आला पण त्याच वेळी परत मागे उडी मारण्याची वेळ आली तर ती मारता येईल का? ही खात्री माझे मन मला देईना. अनोख्या जागेवर पाऊल ठेवायचे तर त्या जागेहून परत पहिल्या ठिकाणी येता आले पाहिजे असा सर्व गिर्यारोहकांचा अलिखीत नियम असतो. मी खाली बसलो व शांतपणे हा नियम मोडायचा का नाही यावर गंभीरपणे विचार केला.

मी डोळे मिटले व डोळ्यासमोर सकाळच्या प्रवासाचा नकाशा आणला व त्यावर माझा मार्ग रेखाटला. माझ्या अंदाजाने आत्ता मी जेथे बसलो होतो ती जागा सकाळी मी जेथे ही भेग पार केली होती त्यापेक्षा दोन एक मैल वरच्या बाजूला होती. सगळ्यात वाईट म्हणजे ही जागा मी सकाळी पाहिलीच नव्हती. थोडक्यात मी परतीचा रस्ता चुकलो होतो. धोका पत्करुन ही उडी मारावी का पश्चिमेच्या काठावर असलेल्या जंजगलात घुसावे व तेथे मस्तपैकी शेकोटी पेटवून रात्र काढावी? असा प्रश्र्न मला छळू लागला. तसे केले असते तर फक्त भुकेशीच सामना करावा लागला असता. पण मी आत्ताच इतका दमलो होतो व इतका बर्फ तुडवला होता की त्या या असल्या वादळात त्या जंगलापर्यंत मी पोहोचू शकेन याची माझी मलाच खात्री देता येईना. पण त्या भेगेच्या पलिकडे दिसणारा प्रदेश मला तुलनेने सपाट वाटला. शिवाय मला वाटले की मी आता दोन्ही किनाऱ्यांच्या जवळपास मध्यभागी होतो. मी आहे त्या वाटेवरुन जायचे ठरवले पण ही एक भयंकर, भीती वाटणारी उडी माझ्या वाटेत ’आ’ वासून उभी होती. शेवटी पाठीमागे जाण्याच्या वाटेवरील संकंटांचा विचार केल्यावर मी धीर करुन उडी मारलीच. मी व्यवस्थित पण थोडासा धडपडत पलीकडे पोहोचलो आणि स्टिकीनही माझ्या मागोमाग आला. आता भीती पार पळाली होती पण हा आनंद थोडा वेळच टिकला कारण आम्ही शंभर एक यार्ड चाललो असू नसू, आमच्या समोर अजून एक पण जास्त रुंद व खोल भेग दत्त म्हणून उभी राहिली. मी ताबडतोब त्याची पाहणी करायला घेतली.  मला खात्री होती की दोन्ही टोकाला कुठेतरी एखादी पार करण्यासाठी जागा सापडेल. वरच्या बाजूला साधारणत: अर्ध्या मैलावर ती भेग मी नुकतीच जी भेग पार केली होती त्याला मिळाली होती. मी परत मागे फिरलो व दुसऱ्या टोकाला काय आहे ते पाहण्यास मागे फिरलो. तेथेही ही भेग त्याच भेगेला मिळालेली पाहून मी हादरलोच. थोडक्यात काय, आम्ही आता दोन मैल लांबीच्या एका छोट्या बेटावर उभे होते आणि बर्फातील खोल खाईंनी वेढले गेलो होतो. आता सुटकेचे दोनच मार्ग होते ते म्हणजे आलेल्या मार्गाने परत जाणे किंवा जेथे जाणे अशक्य आहे अशा एका बर्फाच्या नैसर्गिक पूलावरुन ती भेग पार करणे. हा पूल अंदाजे त्या खाईच्या मध्यभागी असेल.

हा शोध लागताच मी खचलो व त्या पुलाच्या दिशेने पळालो व त्याचे अत्यंत बारकाईने निरिक्षण केले. हिमनदीच्या वेगवेगळ्या भागांचा वाहण्याचा वेग वेगवेगळा असल्यामुळे आणि खाली तळाशी जमिनीचा भाग कमी जास्त सखोल असल्यामुळे या भेगा तयार होतात. सुरवातीला प्रत्येक भेग ही इतकी बारीक असते की त्यात चाकूचे पातेही आत जाऊ शकत नाही. ही भेग हळूहळू मोठी होत जाते. आता काही ठिकाणे या भेगा सांधल्या जातात किंवा काही ठिकाणी भेगांच्या चिरफळ्या उडतात. अगदी लाकूड तोडतान जसे लाकडावे तुकडे एकमेकांना चिकटलेले राहतात तसे. काही भेगा या पुलाने जोडल्या जातात. जसा बर्फ वितळतो तशी भेगा मोठ्या होत जातात आणि हे पूल जे पहिल्यांदी चांगले भक्कम असतात त्याचा बर्फाचा एक जाड पापूद्रा होतो. मधला भाग वातावरणाला जास्त उघडा असल्यामुळे तो अधीक वितळतो झुलत्या पुलाचे दोरखंड जसे खाली वर्तुळाकार होत जातात अगदी तसेच. अतिशय धोकादायक असा हा प्रकार. माझ्या समोरचा हा पूल तसा बराच जुना दिसत होता कारण त्याची बरीच झीज झालेली दिसत होती. त्याखाली असलेली भेग जवळजवळ पन्नास फुट रुंद असावी आणि त्यावरील तिरक्या पूलाची लांबी असेल सत्तरएक फुट. मधला पातळ थर पृष्ठभागापासून अंदाजे २५ ते ३० फुट खाली होता व त्याची उलटी कमान दोन्ही बाजूला पृष्ठभागापासून अंदाजे आठ ते दहा फुट खाली जोडली गेली होती. हे आठफुट खाली उतरायचे आणि परत वरती चढायचे हे सगळ्यात कठीण काम होते कारण या भिंती अगदी ताशीव व सरळसोट होत्या. माझ्या पूर्वायुष्यातील भटकंतीत अनेक प्रसंग येऊन गेले पण एवढा भयानक कुठलाच नव्हता. आणि तो सुद्ध आम्ही भुकेलेले व ओलेचिंब असताना ओढवलेला होता. आकाश गडद झाले होते. बर्फ उडत होता आणि रात्र जवळ येत चालली होती. पण नाईलाजने आम्हाला या सगळ्यांना सामोरे जायला लागणार होते. त्याशिवाय गत्यंतरच नव्हते.

मी भेगेच्या कडेला पण जरा आतल्या बाजूला माझा गुडघा रोवता येईल एवढा  मोठा खड्डा खोदला. मग खाली वाकून माझ्या छोट्या कुऱ्हाडीने १७ ते १८ इंच खाली एक पायरी खोदली. त्याच बरोबर हाताच्या पकडीसाठी एक खोबणही खोदली. ही पायरी जरा अरुंद होती पण चांगली झाली. आतल्या बाजुला थोडीशी उतरती असल्यामुळे माझ्या टाचांना त्या पायरीत चांगली पकड मिळत होती. मग त्या पायरी उतरुन मी माझी डावी बाजू भिंतीला लावली व खाली वाकून, वाऱ्याचा अंदाज घेत, तोल सावरत खाली माझ्या डाव्या हाताने आधार घेत, उजव्या हाताने पायऱ्या व खोबणी खोदत गेलो. खाली पूलापर्यंत पोहोचल्यावर मी तेथे एक उतरण्यासाठी ६ ते ८ इंचाची एक पायरी खोदली. अर्थात या पायरीवर तोल सांभाळत उभे राहून त्या पुलावर पाय ठेवणे ही एक अवघड कसरत होती. पूल पार करणे त्या मानाने सोपे काम होते. वर आलेली बर्फाची अणकुचीदार टोके कु़ऱ्हाडी ने हळुवारपणे सपाट करत, एक दोन इंच पुढे सरकायचे, असे करत  मी गुडघ्यावर रांगत पुढे गेलो. मी खाली बघत नव्हतो ना आजुबाजूला. समोरचा निळसर बर्फ एवढेच काय ते मला दिसत होते. अशा तऱ्हेने पूल पार करुन मी सगळ्यात अवघड काम सुरु केले, ते म्हणजे समोरच्या भिंतीत पायऱ्या खोदण्याचे. पायरी खोदायची, खोबण खोदायची आणि त्याच्या आधाराने, घोंघावणाऱ्या वाऱ्यात उभे राहून वरची पायरी खोदायची. अशावेळी तुमचे शरीरच तुमची दृष्टी होते आणि कोणास ठाऊक कसे तुमच्या अंगात १०० हत्तींचे बळ संचारते. आजवर एवढ्या तणावात मी कधीच राहिलो नव्हतो. मी ते धाडस कसे केले, हे आता सांगू शकत नाही. मला तर वाटते कोणीतरी ते माझ्याकडून करवून घेतले असणार. मी माझ्या आजवरच्या आयुष्यात मृत्युचा तिरस्कार कधीच केला नाही. पण कधी कधी डोंगर दऱ्यातून फिरताना माझ्या मनात अशा डोंगरात हिंडताना, फिरतानाच मृत्यु यावा, किंवा एखाद्या हिमनदीवर यावा, आजारी पडून किंवा किरकोळ अपघातात नको असा विचार आला आहे, किंबहुना मी तशी परमेश्र्वराकडे प्रार्थनाही केली आहे बरेचदा ! पण असा मृत्यु समोर उभा ठाकला की त्याला सामोरे जाणे फार कठीण असते हे मी आता अनुभवाने सांगू शकतो. अगदी तुम्ही परिपूर्ण, आनंदी आयुष्य जगला असलात तरीही..

पण आमच्या बिचाऱ्या स्टिकीनची काय अवस्था झाली असेल त्याचा विचार करा ! मी जेव्हा माझ्या पहिल्या खड्ड्यात गुडघा रोवून खाली वाकून खोदत होतो तेव्हा या बिचाऱ्या छोट्या कुत्र्याने माझ्या खांद्यावरुन त्याचे डोके खुपसून, वाकून खाली काय चालले आहे ते पाहिले. त्याने त्याच्या गुढगर्भित डोळ्यांनी तो खालचा चमकणारा बर्फ पाहिला आणि मग त्याने माझ्या नजरेला नजर दिली, खालच्या स्वरात जरा गुरगुरला व जणू विचारले, ‘‘ तू इथून उतरणार आहेस? या खाईत उतरणार आहेस ?’’ ही पहिली वेळ होती जेव्हा मी त्याला खाईत स्वत:हून डोकावून पाहताना पाहिले. माझ्याकडे पाहताना त्याच्या डोळ्यात अविश्र्वास उमटलेला मला स्पष्ट दिसला. त्याला त्या खाईचा धोका जाणवला हेच त्याच्या शहाणपणाचे लक्षण होते. आजपर्यंत बर्फावर घसरणे किंवा त्यात काही धोका असतो हे त्याच्या खिजगणीतही नव्हते. त्याच्या डोळ्यात उतरलेली भीती आणि आवजातील फरक मला इतका जाणवला की मी त्याच्याशी एखाद्या घाबरलेल्या लहान मुलाबरोबर बोलतात तसा बोलू लागलो. मला त्याला शांत करायचे होते कदाचित माझीही भीती त्यामुळे कमी झाली असेल काय माहीत…‘‘ मनातील भीती काढून टाक पोरा ! जरी अवघड असले तरी आपण पलीकडे सुखरुप जाणार आहोत. जगात कुठलीही वाट सोपी नसते. जास्तीत जास्त काय होईल ? आपण घसरुन खाली खाईत पडू पण एक फायदा लक्षात घे. असले भारी थडगे सोम्यागोम्यांच्या नशिबी नसते आणि जेव्हा बर्फ वितळेल तेव्हा आपली हाडे त्या मातीत मिसळून जातील.’’

stickeen

पण माझ्या या उपदेशाने त्याला काही धीर आलेला दिसला नाही. तो रडू लागला. त्याने एक नजर त्या हिमनदीवर टाकली आणि तो सैरावैरा पळू लागला. त्याला बहुधा दुसरीकडे कुठंतरी ती भेग पार करता येते का हे बघायचे असावे. तो जेव्हा इकडे तिकडे पळून, गोंधळून परत जागेवर येई तेव्हा माझी एखादी पायरी खोदून झालेली असायची. मला मागे वळून बघणे शक्यच नव्हते पण मी त्याला ऐकू शकत होतो. जेव्हा मी आता या पूलावरुन जाणार आहे याची त्याला खात्री पटली तेव्हा मात्र त्याने निराशेने मोठ्या आवाजात रडण्यास सुरुवात केली. ते सगळे दृष्य कोणाच्याही छातीत धडकी भरवणारेच होते पण ते तसे आहे हे कळण्याची बुद्धिमत्ता एवढ्या छोट्या प्राण्याकडे होती हे मात्र मला विशेष वाटले. कुठल्याही अनुभवी गिर्यारोहकालाही हा धोका एवढ्या पटकन ओळखता आला नसता. मलाही आला नव्हता.

मी पलिकडे पोहोचलो आणि मग मात्र तो किंचाळू लागला. पुढे मागे पळून तो परत परत त्या उतरण्याच्या जागेवर येई व मोठ्याने गळा काढे. बहुधा त्याला मृत्युची चाहूल लागली असावी. तो शांत, अलिप्त स्टिकीन हाच का ? असा प्रश्र्न मला पडला. मी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी ओरडलो. त्याला सांगितले की पूल दिसतो तेवढा धोकादायक नाही, तू सहज पार करु शकशील पण तो प्रयत्न करण्यासच घाबरत होता. हे शहाणपण त्याच्यात कुठून आले ? मी परत परत त्याला बोलवत होतो, चुचकारत होतो. त्याला सांगत होतो की एकदाच प्रयत्न कर ! तो पुढे आला, त्याने खाली पाहिले आणि परत एकदा केकाटला व खाली लोळण घेतली.. जणू तो म्हणत होता, ‘‘उं..उंऽऽऽ कसली भयानक जागा आहे ही…मी कधीच तिकडे येणार नाही…’’ भीतीच्या वादळात नेहमीचा स्टिकीन हरवून गेला होता. ती तशी परिस्थिती नसती तर मी त्याच्या घाबरण्याला खोऽखो हसलो असतो पण खालच्या खाईत मृत्यु दबा धरुन बसला होता आणि त्याच्या ह्रदयद्रावक केकाटण्याने कदाचित परमेश्र्वराला जागही आली असती… बहुधा आली असावी. त्याच्या सर्व हालचाली आता पारदर्शक झाल्या. पूर्वी त्याच्यावर एक निष्काळजीपणाचे आवरण त्याने चढवलेले असायचे ते आता गळून पडले. आता मला तो काय विचार करत होता आणि त्याच्या ह्रदयात काय कालवाकालव चालली आहे हे स्पष्ट वाचता येत होते. त्याचा स्वर आणि हालचाली, आशा आणि निराशेच्या खेळात त्याच्या डोळ्यात उमटलेल्या भाव भावना इतक्या मनुष्यासारख्या होत्या की त्या वाचताना कोणाचीही चूक होणे शक्यच नव्हते. त्यालाही माझा प्रत्येक शब्द कळत होता. त्याला तेथेच रात्रीभर सोडणे माझ्या जीवावर आले होते. मला ते शक्यच नव्हते. सकाळी तो सापडला नसता तर ? या विचारानेच माझा थरकाप उडाला. त्याला प्रयत्न करायला लावण्यासाठी मी त्याला घाबरविण्याचे ठरवले. मी त्याच्याकडे पाठ करुन चालायला लागलो व त्याला सोडून जाण्याचे नाटक केले. पण त्याचाही फायदा झाला नाही. मी एका उंचवट्याआडून पहात होतो. मला तसे करताना पाहून तो जास्तच जोरात रडू लागला. मी थोडावेळ तेथे लपून परत काठावर गेलो व त्याला गंभीर आवाजात सांगितले की आता मात्र त्याला सोडून जाण्याशिवाय माझ्याकडे कुठलाही पर्याय नाही आणि तो जर आला नाही तर मी फक्त उद्या परत येण्याचे वचन देऊ शकतो. ‘‘परत जंगलात गेलास तर तुला लांडगे फाडून खातील तेव्हा तिकडे जाऊ नकोस.’’ मी त्याला हातवारे करुन खूप समजावले. ‘‘ चल ! स्टिकीन चल ! युऽऽयुऽऽ

मी काय म्हणत होतो हे त्याला कळत होते. शेवटी धीर धरुन त्याने त्याचे अंग चोरुन मी खोदलेल्या पायरीवर पाय टाकला. त्याने त्याचे शरीर मागे बर्फाच्या भिंतीला टेकवले जणू त्याच्या कातडीचा त्याला आधार मिळत होता. त्याने पहिल्या पायरीवर नजर टाकली, पुढचे पाय एकत्र केले व त्या पायरीवर तो हळूच घसरल. जवळजवळ डोक्यावरच उभा होता तो. मग पाय न उचलता तो त्या पायरीच्या काठावर आला व परत पुढचे पाय त्याने खालच्या पायरीवर टेकले. तो हळूहळू तोल सावरत, वादळाला तोंड देत, घड्याळाचा सेकंदाचा काटा जसा थरथरतो तसा थरथरत त्याने पूलावर पाय ठेवला. तो टोकाला पोहचला आणि क्षणभर थबकला तेव्हा मी गुडघ्यावर खाली बसलो व त्याला उचलण्याची तयारी केली. पण मला भीती वाटत होती की तो आता ही भिंत चढणार कशी ? माझ्याकडे जर एखादी दोरी असती तर मी त्याला फासाने वर उचलून घेतले असते पण माझ्याकडे दोरीही नव्हती. कपड्याची दोरी तयार करता येईल का असा मी विचार करत असतानाच स्टिकीन मी खोदलेल्या पायऱ्यांकडे व खोबणींकडे टक लाऊन पहात असल्याचे मला दिसले. जणू काही तो त्या मोजत होता आणि त्यातील अंतर त्याच्या मेंदूत गणीतासाठी साठवत होता. आणि एकदम त्याने उसळी मारली. पायऱ्यांवर आणि खोबण्यात पंजे रोवून त्याने जी उडी मारली ती पार माझ्या डोक्यावरुन.. ते त्याने इतक्या वेगात केले की मला कळलेही नाही. ‘‘चला ! सुखरुप आला एकदाचा !’’ मी सुटकेचा नि:श्र्वास टाकला.

‘‘ छान छान ! मी ओरडलो ‘‘शाबास रे पोरा ! शाबास !’’ मी त्याला पकडून कुरवळण्याचा प्रयत्न केला पण तो निसटला आणि भुंकत भुंकत बागडू लागला. निराशेच्या गर्गेतून आशेच्या दिशेने मारलेली अशी झेप मी तरी माझ्या आयुष्यात पाहिली नाही. आणि त्यानंतरचा त्याचा अवर्णनीय आनंद… त्याने स्वत:भोवती गिरक्या मारल्या, माझ्या भोवती फिरला, जमिनीवर अत्यानंदाने लोळला आणि त्याने काय काय केलं हे मी सांगितले तर तुम्हाला खोटे वाटेल. मी त्याच्याकडे धावलो. मला वाटले आता याला जर शांत केले नाही तर हा हर्षवायुने मरेल. मी त्याला पकडणार तेवढ्यात तो निसटला व थोडे अंतर पळाला, अचानक वळाला आणि तेथून त्याने माझ्या चेहऱ्यावर झेप घेतली. मला जवळजवळ खालीच पाडले त्याने. तो परत एकदा केकाटला आणि त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. हे मी स्वत: पाहिले आहे. भावनांचा हा उद्रेक मी प्राण्यांमधे कधीच पाहिला नाही ना अनुभवला. या छोट्या कुत्र्यामधे या भाव भावना आहेत हे कोणी मला आधी सांगितले असते तर माझा त्यावर विश्र्वास बसला नसता. एवढ्या सहनशील व गंभीर स्वभावाच्या या कुत्र्यात या एवढ्या भावना दडल्या आहेत हे कळल्यावर कोणीही त्याच्या गळ्यात गळा घालून रडला असता. मीही मग तेच केले.

पण हर्षवायु आणि अतिदु:ख किंवा अति भीती या भावनांना शांत करण्याइतके महत्वाचे दुसरे काम त्यावेळी नसते. त्यासाठी मी पुढे धावलो व त्याच्यावर हा तमाशा बंद करण्यासाठी ओरडलो. आम्हाला अजून बरेच अंतर काटायचे होते आणि अंधार डोकवत होता. आमच्यापैकी कोणीही असल्या दुसऱ्या संकटाला घाबरत नव्हतो कारण परमेश्र्वर असली परिक्षा जन्मात फक्त एकदाच घेतो असे म्हणतात. त्यावेळी तरी आम्ही त्यावर विश्र्वास ठेवला खरं ! पुढे हिमनदीवर भेगांचे अक्षरश: जाळे पसरले होते पण त्या सगळ्या छोट्या व सर्वसाधारण आकाराच्या होत्या. संकटातून सुटका झाल्याचा आनंद आमच्या मनात मावत नव्हता. आम्ही न दमता धावलो. विजयाची धग आमच्या स्नायूत उतरली होती. स्टिकीन तर जे मधे येईल त्याच्या वरुन उडतच चालला होता तो पार अंधार पडेपर्यंत. त्यानंतर मात्र त्याने त्याची नेहमीची कोल्ह्याची चाल पकडली. शेवटी ती ढगाळ शिखरे आमच्या दृष्टीस पडली. आमच्या पायाखाली दगड आहे याची आम्हाला जाणीव होऊ लागली आणि आम्ही आता संकटातून बाहेर पडलो आहोत याची आमची खात्री पटली. आम्ही प्रचंड दमलो आहोत याचीही आम्हाला जाणीव झाली. अंधारात आम्ही ती रेताड जमीन पार केली. सकाळचा ओळखीचा रस्ता पार करुन आम्ही रात्री दहा वाजता मुक्कामी पोहोचलो. मोठी शेकोटी पेटली होती आणि मेजवानीची तयारी चालू होती.  हूना इंडियन्सची एक टोळी आम्हाला भेटण्यास आली होती आणि त्यांचेच स्वागत करण्यासाठी ही तयारी चालली होती. त्यांनी रे. यंग यांच्यासाठी छोट्या व्हेलचे मांस व जंगली स्ट्रॉबेरीज आणल्या होत्या. ज्योने शिकारीवरुन एक जंगली बोकड आणला होता. पण आम्ही दमल्यामुळे फारसे खाऊ शकलो नाही. लवकरच आम्ही निद्रेची आराधना करु लागलो. ‘‘जेवढे जास्त कष्ट तेवढी जास्त गाढ झोप’’ ही म्हण तयार करणाऱ्याने खरे कष्ट केले आहेत का ही शंका माझ्या मनात आली पण पापणीआड बर्फाच्या भेगा पाहता पाहता मला केव्हा गाढ झोप लागली हेच कळले नाही.

त्या अनुभवानंतर स्टिकीन बदलला. नंतर त्या मोहिमेत एकटे एकटे राहण्याऐवजी तो मला चिकटून रहात असे. एवढेच काय तो मी सोडून कोणाच्याही हातातून साधा घासही घेत नसे. रात्री जेव्हा सगळीकडे किर्र शांतता पसरे तेव्हा तो शेकोटीपाशी येऊन माझ्या गुडघ्यावर त्याचे मस्तक ठेऊन बसत असे. जणू काही मी त्याचा परमेश्र्वर आहे. आणि जेव्हा त्याची नजर माझ्या नजरेस भिडे तेव्हा तो जणू म्हणे, ‘‘त्या ग्लॅशियरवर काढलेला तो दिवस किती भयंकर होता नाही….?’’

नंतर बरीच वर्षे गेली पण त्या दिवसाच्या आठवणी माझ्या मनातून काही केल्या जात नाहीत. त्या अजूनही मनात ताज्या आहेत. कधी कधी निवांत क्षणी मी तो दिवस परत एकदा अनुभवतो. ते ढग, ते सुळके, ती उध्वस्त झाडे, गोठलेले धबधबे, खोल खोल बर्फातील खाई, पडणारा बर्फ, मी खोदलेल्या पायऱ्या आणि अर्थातच त्यावर घाबरुन उतरलेला स्टिकीन, त्याचे केकाटणे, रडणे आणि नंतर त्याचा आनंद, हे सगळे माझ्या डोळ्यासमोर उभे राहते. मी आयुष्यात अनेक कुत्री पाहिली आणि त्यांच्या हुशारीच्या व निष्ठेच्या गोष्टीही सांगितल्या पण स्टिकीनची सर कोणालाही येणार नाही. पहिल्यांदा दुर्लक्षित असलेला हा छोटा कुत्रा नंतर मात्र सगळ्यांचा लाडका झाला. आम्ही वादळाशी दिलेल्या झुंजीने तो एका रात्रीत सगळ्यांना माहीत झाला. आज एखाद्या खिडकीतून पहावे तसे स्टिकीनच्या डोळ्यातून मी प्राणिमात्रांकडे अनुकंपेने पाहतो, त्यांच्याबद्दल विचार करतो.

दुर्दैवाने स्टिकीनच्या कुठल्याच मित्राला शेवटी स्टिकीनचे काय झाले हे माहीत नाही. माझे काम झाल्यावर मी कॅलिफोर्नियाला गेलो आणि माझ्या या छोट्या मित्राला परत कधीही पाहिले नाही. मी त्याच्याबद्दल त्याच्या मालकाकडे बऱ्याच वेळा चौकशी केली. शेवटी रे. यंग यांनी मला उत्तर दिले की १८८३च्या उन्हाळ्यात स्टिकीनला एका पर्यटकाने फोर्ट रँगेलवरुन चोरुन नेले व एका बोटीतून त्यांच्या बरोबर नेले. त्याचे पुढे काय झाले हे रहस्यच राहिले. आता तो या जगात नसेलच पण मी त्याला कधीच विसरु शकणार नाही.

माझ्यासाठी स्टिकीन अजरामर आहे…..

मुळ लेखक : जॉन मुर
अनुवाद: जयंत कुलकर्णी.

Posted in कथा, भाषांतर, लेख | Leave a comment

बौद्धधर्मप्रसारक… भाग-१

फो
बुद्धाचे चिनीभाषेतील नाव व चिनीलिपीतील त्याचे चिन्ह.
Untitled-1

गौतमबुद्ध किंवा तथागत याच्या काळात जे राजे होऊन गेले त्यांची बुद्धाच्या धर्मप्रसारात बरीच मदत झाली. किंबहुना या राजांमुळेच बुद्धधर्माने भारताच्या सीमा ओलांडल्या व जवळजवळ तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. उदा. सम्राट अजातशत्रू हा महावीर व बुद्धाच्या समकालीन होता व त्याने जैन व बौद्धधर्म या दोन्ही धर्मांना राजाश्रय दिला. नुसता राजाश्रय दिला एवढेच नाही तर या धर्मांचा थोडाफार आक्रमकपणे प्रसारही केला. यानेच बुद्धाच्या मृत्युनंतर पहिली धर्मपरिषद भरविली. पण मिशनरी वृत्तीने धर्मप्रसार करण्याची सुरवात झाली सम्राट अशोकाच्या काळात. त्याने खोदलेल्या असंख्य शिलालेखातून हे कार्य कशा प्रकारे चालत असे याची आपल्याला कल्पना येऊ शकते. यातील सगळेच शिलालेख वाचले गेले आहेत व त्यांचे मराठीत, इंग्रजीमधे केलेली भाषांतरे उपलब्ध आहेत. ती जरुर वाचावीत कारण हे शिलालेख वाचण्यासारखेच आहेत. हे शिलालेख सम्राट अशोकाच्या राज्यातच नव्हे तर त्याच्या राज्याबाहेर व काही श्रीलंकेतही सापडतात. सम्राट अशोकाने हे धर्मप्रसारक सिरिया, इजिप्त, मॅसिडोनिया इ. देशांमधून पाठविले व त्यांनी तेथे धर्मप्रसाराचे काम उत्तम प्रकारे पार पाडले. त्या काळात त्या देशात अँटिऑक थिऑस, टॉलेमी, मॅगॉस, गोनटस व अलेक्सझांडरसारखे राजे राज्य करीत होते. थोडक्यात भारतीय उपखंडातून हे धर्मप्रसारक एशिया, आफ्रिका व युरोप खंडात धर्मप्रसारासाठी प्रवास करीत होते हे आपल्या लक्षात येते.
बुद्धाच्या मृत्युनंतर जवळजवळ ३५०/४०० वर्षांनी अजुन एका राजाने बौद्धधर्माच्या प्रसाराला हातभार लावला आणि तो म्हणजे कुशाणांचा राजा कनिष्क.

Kushanmap

असे म्हणतात बुद्धाने त्याच्या हयातीतच कनिष्क पेशावरला एक भव्य स्तूप बांधेल असे भविष्य वर्तविले होते. मध्य एशियामधून जी यु-ची जमात भारतात स्थलांतरीत झाली त्यांचा हा राजा. त्यांच्या स्थलांतराबद्दल परत केव्हातरी लिहीन कारण तोही विषय बराच मोठा आहे. याच्याच राज्यातून भारतातून पहिला धर्मप्रसारक चीनमधे गेला व त्याबरोबर बौद्धधर्म.

कुशाणांचा राजा कनिष्क

Coin_of_Kanishka_I

अर्थात याबाबतीत मतांतरे आहेत. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की चीनला बौद्धधर्माबद्दल कळले ते त्यांच्या कनिष्काच्या राजदरबारात असलेल्या त्यांच्या राजदुताकडून. ते काहीही असले तरी चीनमधून येथे आलेले बौद्ध भिख्खू व येथून गेलेले बौद्ध धर्मप्रसारक यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे बौद्धग्रंथ मूळस्वरुपात आजही उपलब्ध आहेत. चीनचा एक सेनापती कौ-वेन-पिंग-चाऊ याच्या एका पुस्तकात अशी नोंद आढळते – सम्राट मिंग-टी याने त्साई-इन व इतर तेरा जणांवर एक वेगळी आगळी कामगिरी सोपवली जी आजवर जगात कुठल्याच राजाने आपल्या सैनिकांवर सोपवली नव्हती. त्यांना भारतात जाऊन बौद्धधर्माचे पवित्र ग्रंथ चीन मधे घेऊन यायचे होते. या उल्लेखामुळे चीनी इतिहासकरांच्या मते बौद्धधर्म हा हान घराण्याचा सम्राट मिंग-टी (लिऊ-झुआंग) सम्राटाच्या काळात चीनमधे प्रथम आला. काळ होता २५-७५ साल. पण सगळं सोडून त्याने ही कामगिरी या तेराजणांवर का सोपवली असेल हा खरा प्रश्र्न आहे. त्यासाठी चीनमधे एक दंतकथा सांगितली जाते.

” त्याच्या राज्यकारभाराच्या चवथ्या वर्षी सम्राट मिंग-टीच्या स्वप्नात एक अवतारी पुरुष आला ज्याचे शरीर झगझगत्या सोन्याचे होते. त्याच्या मस्तकामागे प्रभावळ चमकत होती. या आकृतीने त्याच्या महालात प्रवेश केला व ती नाहिशी झाली.’’ त्या काळातील प्रथेप्रमाणे त्याने त्याच्या मंत्र्यांना या स्वप्नाचा अर्थ विचारला. त्यातील एक मंत्री, फौ-ई, जो त्याच्या दरबारात राजजोतिषी होता, त्याने सांगितले,

‘महाराज आपण भारतात जन्मलेल्या एक महान साक्षात्कारी पुरुषाबद्दल ऐकले असेल. त्याचे नाव आहे शाक्यमुनी बुद्ध. आपल्या स्वप्नाचे मुळ त्या थोर पुरुषाच्या शिकवणीत दडलेले आहे.’’

हे ऐकल्यावर त्याने ताबडतोब त्याच्या दरबारातील अठराजणांची भारतात जाऊन ते पवित्र ग्रंथ चीनमधे आणण्यासाठी नियुक्ती केली. दंतकथा काहीही असो त्याचा मतितार्थ एवढाच की चिनी सम्राटाच्या कानावर बुद्धाच्या शिकवणीबाबतीत बरीच माहिती पडली असणार. इतकी की त्याला त्याची स्वप्नेही पडू लागली होती. ही मंडळी अकरा वर्षानंतर चीनला परत आली व त्यांनी येताना ग्रंथ तर आणलेच पण असे म्हणतात की त्यांनी राजा उदयन याने काढून घेतलेली बुद्धाची अनेक चित्रेही बरोबर आणली. बुद्धाने त्याच्या काळात राजा उदयनाच्या दरबाराला अनेकवेळा भेटी दिल्या होत्या कदाचित त्या काळात ही चित्रे काढली असावीत. (किंवा त्या चित्राच्या नकला असाव्यात. ही चित्रे जर चीनमधे मिळाली तर बुद्ध दिसायला कसा होता यावर बराच प्रकाश पडेल किंवा पडलाही असेल. मला कल्पना नाही.) बौद्धग्रंथ एकोत्तर आगम ज्याचे फक्त चीनी भाषांतर उपलब्ध आहे त्यात राजा उदयन याने बुद्धाची प्रतिमा चंदनाच्या लाकडात कोरुन घेतली असा उल्लेख सापडतो. या मंडळींनी त्यांच्याबरोबर दोन पंडीतही चीनला नेले. एक होता काश्यप मातंग नावाचा बौद्ध पंडीत. त्याला सम्राटाने काही प्रश्र्न विचारले. (मध्यभारतातील हा एक ब्राह्मण होता व त्याने बौद्धधर्म स्वीकारुन त्याचा पूर्ण अभ्यास केला होता. याच्या बरोबर अजुन एक पंडीत होता त्याचे नाव होते गोभर्ण. या दोघांबद्दल आपण नंतर वाचणार आहोत.) असो. पहिला प्रश्र्न होता,

‘धर्मदेवाने या देशात अवतार का घेतला नाही ? हे सांगू शकाल का आपण ?’’

‘‘ या विश्र्वाच्या मध्यभागी का-पि-लो नावाचा देश आहे. तीन युगांच्या बुद्धांनी येथेच जन्म घेतला. सर्व देवांची आणि ड्रॅगनची येथेच जन्म घेण्याची मनिषा असते. या प्रदेशात जन्म घेऊन बुद्धधर्माचे पालन करावे व सत्याचे खरे स्वरुप समजावे ही एकच इच्छा घेऊन ते येथे जन्म घेतात. बुद्धाच्या तत्वज्ञानाचा प्रकाश सर्वदूर पसरला आहे. हा धम्म शिकविण्यासाठी हजारो भिख्खू या विश्र्वात संचार करीत असतात.’’

यावर विश्र्वास ठेऊन सम्राटानी ताबडतोब एक मठ बांधण्याचा आदेश दिला. काश्यप मातंग व त्यांच्या बरोबर असणाऱ्या मंडळींनी हे सर्व बौद्ध साहित्य एका पांढऱ्याशूभ्र घोड्यावर लादून आणले म्हणून राजाने त्या मठाला नाव दिले श्र्वेताश्र्व मठ.

श्र्वेताश्र्व मठ बराचसा जसा होता तसा ठेवला आहे.

White Horse Temple 1

भारतात गेलेले चीने व त्यांच्याबरोबर परत आलेले पंडीत यांचे नाव तर इतिजहासात अजरामर झाले पण ज्या घोड्यावर हे ग्रंथ लादून आणण्यात आले त्याच्या योगदानाचा विसर पडू नये म्हणून त्याचे नाव या मठाला देण्याची कल्पना मला तरी भारी वाटते. या मठात पुजेसाठी त्यांनी एका बुद्धाच्या मुर्तीची स्थापना केली. वेशीवरही त्यांनी एक बुद्धाची प्रतिमा सामान्यजनांच्या दर्शनासाठी ठेवली जेणे करुन सर्वांना या थोर माणसाचे सतत स्मरण होत राहील. हीच कहाणी आपल्याला अनेक चिनी ग्रंथात आढळते. जवळजवळ तेरा ग्रंथात. (श्री बील यांचे पुस्तक).

पण या लेखाचे प्रयोजन हा इतिहास सांगणे हे नसून जे धर्म प्रसारक भारतातून इतर देशात, विशेषत: चीनमधे गेले त्यांची आठवण करुन देणे आहे. मधे एका लेखात मी या अशा थोर धर्मप्रसारकांबद्दल एक लेखमालिका लिहून त्यांच्या चरणी अर्पण करण्याची इच्छा प्रदर्शित केली होती, ती वेळ आता आली आहे असे मला वाटते. मी या धर्मप्रसारकांबद्दल जेवढा विचार करतो तेवढेच माझे मन त्यांच्याबद्दल अपार आदराने भरुन जाते. आपल्या भूमीपासून दूर्, अवघड प्रवास करत, संकटांवर मात करीत हे धर्मप्रसारक दूरवर बुद्धाचा धर्म शिअकवीत राहिले त्याबद्दल त्यांचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. मध्य एशिया, अफगाणीस्तान या प्रदेशाबद्दल माझ्या मनात एक सुप्त आकर्षण आहे ते तेथे नंतर प्रस्थापित झालेल्या इस्लाम धर्मामुळे नव्हे तर अत्यंत चिकाटीने, अहिंसक मार्गाने भारतीय बौद्धांनी केलेल्या बौद्धधर्मप्रसारामुळे.

हा जो पंडीत काश्यप मातंग होता हा चीनमधे गेलेला पहिला धर्मप्रसारक मानला जातो.
काश्यप मातंग. (किआ-येह मो-थान) कंसात दिलेले हे त्याचे त्या काळातील प्रचलीत चीनी नाव आहे. हा काश्यप गोत्रात जन्मला म्हणून याचे नाव काश्यप मातंग असावे.

पंडीत काश्यप मातंग.
हा हिंदू ब्राह्मण मगध देशात जन्मला पण त्याचे कार्यक्षेत्र होते पेशावर किंवा पुरुषपूर. काश्यप मातंगांना चीनला नेण्यात आले तो काळ साधारणत: सन ६७ ते ७५ असा असावा. हल्ली काही सापडलेल्या चीनी कागदपत्रांवरुन/किंवा लेखांवरुन काही इतिहासकार असे मानतात की चीनमधे बौद्धधर्म पोहोचला तो ख्रिस्तपूर्व १ या काळात. अर्थात त्याच्याही आधी म्हणजे ख्रिस्तपूर्व १२० या काळात बौद्धधर्माविसयी चीनमधे माहीती होती हे निश्चित. ते कसे ते या लेखाचा विसय नाही. आपण मात्र असे म्हणू की असे असले तरी तरी काश्यप मातंगाच्या काळात चीनमधे धर्माचे खरे आगमन झाले.

काश्यप मातंग आणि गोभर्ण यांना पहिली अडचण आली ती भाषेची. त्यांना खोतानपर्यंत संस्कृतची साथ होती. संस्कृत समजणारी बरीच मंडळी त्याकाळात तेथे होती. चीनच्या सिमेवर बोलली जाणाऱ्या खोतानी भाषेचाही त्यांनी बराच अभ्यास केला होता पण चीनमधे आल्यावर हे सगळे कोलमडले. सम्राटाने बांधलेल्या मठात जेव्हा चीनी बौद्धांनी या दोन धर्मगुरुंना बुद्धाची शिकवण सांगण्याचा आग्रह धरला तेव्हा त्यांची मोठी पंचाईत झाली. त्यांनी चीनी भाषेचा अभ्यास मोठ्या चिकाटीने चालू केला पण त्यांना लगेचच उपयोगात आणता येईल असा एखादा ग्रंथ रचण्याशिवात गत्यंतर नव्हते. त्यांनी ज्यांच्याबरोबर ते आले होते त्या चीनी सरदारांच्या मदतीने चीनी जनतेसाठी किंवा अभ्यासकांसाठी एक सूत्र लिहिले. याचे नाव होते ‘‘बुद्धाने सांगितलेली बेचाळीस वचने.’’ काश्यप मातंगाने हे करण्यात खूपच दूरदृष्टी दाखविली असे म्हणायला पाहिजे. बऱ्याच वेळा कशाला, बहुतेक वेळा ज्ञानी पंडितांना काय सांगू आणि किती सांगू असे होऊन जाते. पण काश्यप मातंगांनी तो मोह आवरला व चीनी अभ्यासकांच्या पचनी पडेल अशा साध्यासुध्या, सहजतेने समजेल, अशा ग्रंथाची रचना केली. हा ग्रंथ अजुनही टिबेटमधे व मोंगोलियामधे त्या त्या भाषेमधे उपलब्ध आहे. हाच संस्कृत भाषेतील चीनी भाषेत भाषांतरीत झालेला पहिला ग्रंथ असे काही जणांचे म्हणणे आहे पण ते चुकीचे आहे. हा ग्रंथ चीनी भाषेतच रचला गेला. त्यात थेरवदा व महायान पंथाच्या सुत्रांचे भाषांतर आहे हे खरे.

त्या काळात चीनमधे ताओ व कन्फुशियस तत्वज्ञानाचे प्राबल्य होते. सम्राटाच्या दरबारात अर्थात त्यांचेही धर्मगुरु होतेच. या मंडळींनी काश्यप मातंगाच्या कार्यात अडथळे आणण्याचा भरपूर प्रयत्न केला पण शेवटी एका वादविवादात हरल्यावर सम्राटानेच बौद्ध धर्म स्वीकारल्यावर त्यांचे प्राबल्य बरेच कमी झाले व बौद्धधर्माची पताका चीनमधे फडकू लागली. एवढ्या कमी काळात हे यश आश्चर्यजनकच म्हणायला हवे. अर्थात त्याच्यामागेही बरीच कारणे होती. मी मंकी हे पुस्तक मराठीत  लिहिले आहे. त्यात हे कसे त्रास द्यायचे याचे वर्णन आहे.

एकतर बुद्धाचा धर्म सुटसुटीत, कशाचेही अवडंबर न माजविणारा होता.

शिवाय ताओंचे तत्वज्ञान सामान्यजनास कळणे अत्यंत अवघड होते.

शेवटी सगळ्यात महत्वाचे कारण होते ते म्हणजे खुद्द सम्राटानेच दिलेला राजाश्रय.

काश्यप मातंग यांनी आपला देश सोडून चीनमधे बौद्धधर्माच्या प्रसारास वाहून घेतले. ते परत कधीच भारतात परत आले नाहीत. लो-यांग येथे पो-मा-स्सूच्या मठात त्यांनी अखेरचा श्र्वास घेतला तेव्हा त्यांचे वय बरेच असावे.
त्याच मठात त्यांचे एक चित्र रंगविलेले आहे. त्यावरुन आपल्याला ते कसे असावेत याची कल्पना येऊ शकते.

काश्यप मातंग.

Kashyap-Matang.jpg

त्यांनी केलेल्या अडतिसाव्या सुत्राचे मराठी भाषांतर येथे देत आहे.
३८ वे सूत्र.
जिवनाची क्षणभंगुरता.
बुद्धाने एका श्रमणास विचारले,
किती काळ तू जिवंत राहणार आहेस याची तुला कल्पना आहे का ?
‘‘अजुन काही दिवस तरी !’’ श्रमणाने स्मितहास्य करीत उत्तर दिले.
‘‘तुला जीवनाबद्दल काही माहिती आहे असे मला वाटत नाही.’’ बुद्ध म्हणाला.
त्याने तेथेच असलेल्या दुसऱ्या श्रमणास हाच प्रश्न केला.
‘‘हे जेवण संपतोपर्यंत तरी ! ’’ त्याने उत्तर दिले.
‘‘तुलाही जीवनाबद्दल काही माहिती आहे असे वाटत नाही.’’
मग त्याने तिसऱ्या श्रमणास हाच प्रश्र्न केला.
‘‘ या एकाच श्र्वासापर्यंत.’’ त्याने उत्तर दिले.
‘‘ बरोबर ! तुला जीवनाचा खरा अर्थ समजला आहे असे मी म्हणू शकतो’’
बुद्धाने स्मितहास्य करीत उत्तर दिले…..

काश्यप मातंगांनंतरही त्यांनी सुरु केलेले हे कार्य त्यांच्या शिष्यांनी मोठ्या धडाडीने सुरु ठेवले. एवढेच नव्हे तर भाषांतरीत ग्रंथात अधिकाधीक अनमोल ग्रंथांची भर पडत गेली…

त्यातीलच एक श्रमण होता ‘‘धर्मरक्ष’’ त्याचे चिनी भाषेतील नाव आहे ‘‘चाऊ फा-लान’’……

दोन हजार वर्षे टिकून राहिलेल्या या मठाचा पाडाव केला १९६६ मधे थोर पुढारी माओत्से तुंग यांच्या अनुयायांनी. श्र्वेताश्र्व मठाच्या लुटीचे वर्णन कम्युनिस्ट पार्टीच्या एका सदस्याने असे केले आहे –

या मठाजवळील कम्युनिस्ट पार्टीच्या शाखेने सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली शेतकऱ्यांची एक टोळी घेऊन हा मठ उध्वस्त करण्यासाठी त्यावर चाल केली. १००० वर्षापूर्वी (अंदाजे ९१६ साली) लिॲओ घराण्याने तयार करुन त्या मठात ठेवलेले अठरा अरहतांचे पुतळे प्रथम फोडण्यात आले. दोन हजार वर्षांपूर्वी भारतीय भिख्खूंनी आणलेले ग्रंथ जाळण्यात आले. जेडचा श्र्वेत अश्र्वाचा अनमोल पुतळा तोडण्यात आला. आज ज्या काही वस्तू त्या मठात दिसतात त्याची कहाणी वेगळीच आहे.

कंबोडियाच्या राजाने, नरोद्दम सिंहनुक याने या मठाला भेट देण्याची इच्छा प्रदर्शित केल्यावर चौ-एन्लायची गडबड उडाली. कारण नरोद्दम सिंहनुकची भेट ही सदिच्छा भेट होती आणि तो जगाला चीनमधे सगळे कसे व्यवस्थीत चालले आहे हे सांगणार होता. त्याच्या भेटीआधी चीनमधील इतर मठातील बऱ्याच वस्तू रातोरात त्या मठात हलविण्यात आल्या. व नंतर कम्युनिस्ट पक्षाच्या आदेशानुसार त्या देणगी म्हणून स्वीकारण्यात आल्या ज्यामुळे त्या वस्तू परत पाठविण्याचा प्रश्र्न उदभवला नाही.

महायानातील महापरिनिर्वाण सुत्रामधे शाक्यमुनींनी असे भविष्य वर्तविले होते की त्याच्या निर्वाणानंतर सैतान, राक्षस व वाईट प्रवृत्ती बौद्धधर्माचा नाश करण्यासाठी बौद्धधर्मामधे महंत, भिख्खूं म्हणून जन्म घेतील व धर्माचा नाश करतील. हे खरे आहे की दंतकथा यावर मी भाष्य करणार नाही पण जे घडले ते तसेच झाले. राजकारणी भिख्खूंनी कम्युनिस्ट पक्षाला हाताशी धरुन (किंवा उलटे) बौद्ध संघाचे नियम बदलले. आता त्यांना निळे कपडे घालण्याची परवानगी देण्यात आली. दारु पिण्यास व मांसभक्षण करण्यासही परवानगी देण्यात आली. विवाह करण्यास उत्तेजन देण्यात आले तर संपत्ती जमा करण्यात काहीही वाईट नाही असे सांगण्यात आले. ज्यांनी याला विरोध केला त्यांना निर्घृणपणे ठार मारण्यात आले. हे अर्थातच सगळे सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली चालले होते. या प्रकारे त्यांनी तिन्ही धर्म नष्ट करण्याच प्रयत्न केला.

लेनिन याने म्हटल्याप्रमाणे – ‘‘धर्माचे अस्तित्व मिटविण्यासाठी धर्मातुनच प्रयत्न व्हायला पाहिजे.’’ तसे प्रयत्न नेटाने करण्यात आले. पण काय झाले हे आज आपण पहातोच आहोत… तिन्हीही धर्म/तत्वज्ञान आज जिवंत आहेत व त्यांच्या अनुयायांमधील धर्मावरील श्रद्धाही चांगल्या बळकट झालेल्या दिसतात. असो.  

क्रमश:
जयंत कुलकर्णी.

Posted in लेख | Leave a comment

वॉल्डन – २

वॉल्डन

IMG_0120

….अनुभवाने माझी दृष्टी आत तीक्ष्ण झाली आहे आणि मला स्पष्ट दिसतंय की तुम्ही हलाखीचे जीणं जगताय. कर्जे न फेडता आल्यामुळे तुम्ही जामिनावर बाहेर आहात. काहीतरी उद्योग करून तुम्हाला कर्जातून बाहेर पडायचे आहे. कर्ज – एक अतिप्राचीन दलदल ज्यातून मानव बाहेर पडायचा युगानुयुगे प्रयत्न करत आहे. कर्जबाजारी दररोज नवीन दिवसाचा वादा करतात. रोज दिवाळखोरीत मरण जगतात. पुढे आजारपणात उपयोगी पडेल म्हणून तुम्ही आजारी पडेपर्यंत कष्ट करून पैसे गोळा करता आणि दिवाळे निघणार्‍या बँकेत ठेवता. किती पैसे, कुठे ठेवले आहेत हे महत्त्वाचे नाही. सर्वसाधारणपणे सगळीकडे हीच परिस्थिती आहे.

मला कधीकधी आश्‍चर्य वाटतं की आपण दक्षिणेकडे असलेली निग्रोंची गुलामगिरी एवढ्या सहजपणे कशी काय मान्य करतो. आता दक्षिणेकडे गुलामांचे मालक आहेत आणि उत्तरेत ही आहेत. ही मंडळी दक्षिण व उत्तर दोन्ही गुलाम करायला निघाली आहेत. दक्षिणेचा मालक असला तर तेे भयंकर असेल तर आता उत्तरेचा मालक असला तर तेे महाभयंकर आहे असे म्हणावे लागते. पण गुलामीच्या प्रथेला ह्रदयात स्थान देणारे, गुलाम हाकणारे सगळ्यात भयंकर आहेत असे मी म्हणतो. माणसांमधे परमेश्वराचा अंश असतो असे म्हणतात पण एखाद्या हमरस्त्यावर दिवस रात्र गुलामांचा व्यापार करणारे दलाल पहा, त्यांच्यात परमेश्वराचा अंश कसा काय असेल ? घोड्याला चारा घालणे व पाणी घालणे हे तो स्वत:चे सर्वोच्च कर्तव्य समजतो. त्याच्या भवितव्याला तो त्याच्या माल पोहोचविण्याइतकेच महत्त्व देतो. परमेश्वरानेच माणसाला जन्माला घातल्यामुळे माणसात परमेश्वराचे प्रतिबिंब पडते असे प्राचीन ग्रंथ म्हणतात. मग आहे का त्याच्यात परमेश्वराचा अंश ? आहे का तो थोडासा तरी परमेश्वरा सारखा ? पण तो दिवस लपून छपून काढतो. तुम्ही पहाल तो कायम घाबरलेला असतो. तो मरणाला किंवा परमेश्वराला घाबरत नाही तर तो घाबरत असतो त्याचे स्वत:चे स्वत:बद्दल जे मत झाले आहे त्याला. या मतांचा गुलाम असताना त्याच्या कर्माने जी प्रसिद्धी त्याला मिळाली आहे त्याला. पण खरं म्हटलं तर समाजाची आपल्याबद्दल असलेली मते ही आपल्या स्वत:ची स्वत:विषयी असलेल्या मतापेक्षा कमी जहाल असतात. माणसं स्वत:स किती ओळखतात त्यावरून त्याचे नशीब ठरते असे मला वाटते. ज्या प्रमाणे श्री. विलबरफोर्स यांनी इंग्लंडच्या साम्राज्यातून गुलामी हद्दपार केली तसा आपल्या येथे दूरदूरच्या प्रांतात कोण विलबरफोर्स येणार आहे ? शिवाय घरात अखंडपणे घरकाम करणार्‍या स्त्रियांचाही विचार करावा लागेल. त्या इतक्या अपरिपक्व आहेत की त्यांना त्यांच्या भवितव्याची चिंताही भेडसावत नाही.

आज बहुसंख्य माणसे अगतिक होऊन जगत आहेत. संन्यासी वृत्तीने जगणारी माणसे खरे तर अगतिक असतात हे अनेक वेळा सिद्ध होते आहे. काहीच न जमल्यामुळे संन्यास घेणे ही नित्याचीच बाब झाली. निराशेने ग्रासलेल्या शहरांची वाटचाल निराशेने ग्रासलेल्या देशाकडे चालली आहे. ज्या प्रमाणे मिन्क व मस्क्रॅट प्राणी सापळ्यातून सुटण्यासाठी स्वत:चे पाय कुरतडतात तशीच यांची अवस्था झाली आहे हेच खरे. खेळांच्या आवरणाखाली ही तुम्हाला हीच अगतिकता सापडेल कारण त्यात खेळ उरलेलाच नाही कारण हे खेळही कष्ट केल्यानंतरच खेळले जातात. पण निराशेपासून स्वत:ला दूर ठेवण्यातच शहाणपणा असतो.

वेस्ट मिनिस्टरच्या न्यु इंग्लंड प्रायमरमधे प्रश्नोत्तराच्या स्वरुपात धार्मिक शिक्षण केले जाते. यात एक महत्त्वाचा एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे माणसाच्या जन्माचा अर्थ काय ? त्याचे या इहलोकात काम काय? ( याचे उत्तर अर्थातच परमेश्वराची भक्ती हे आहे) पण या प्रश्नापेक्षा माणसाच्या खर्‍या गरजा काय आहेत आणि त्या भागविण्याचे खरे मार्ग कुठले आहेत हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे. सध्यातरी समाजाने जाणूनबुजून जगण्याची सर्वसामान्य रीत स्वीकारलेली दिसते आहे. ती त्यांना इतर जीवन पद्धतीपेक्षा जवळची वाटते म्हणून असेल कदाचित पण त्यामुळे त्यांना दुसरी कुठली जीवन पद्धती अस्तित्वात नाही असे प्रामाणिकपणे वाटते. पण अजूनही उशीर झालेला नाही. आपले गैरसमज आपण सहज दूर करू शकतो. आत्ता जे आहे ते तसे नव्हते. कितीही प्राचीन असली तरी विचारपद्धतीवर आणि जीवनपद्धतीवर आंधळा विश्वास ठेऊ नये हेच खरं. आज एखाद्या तत्त्वाची चलती असेल तरी ते उद्या ते टिकाव धरेल याची शाश्वती देता येत नाही. त्या तत्त्वांचा धूर झालेला कदाचित तुम्हाला पहावा लागेल किंवा याउलट ज्याच्याकडे दुर्लक्ष झाले आहे अशा विचारप्रवाहांचं पाऊस उद्या पडणारच नाही असेही कोणी ठामपणे म्हणू शकत नाही. जुनी जाणती मंडळी तुम्हाला हे जमणार नाही असे ठामपणे म्हणतात आणि तुम्ही ते सहजपणे करून दाखवता. या जुन्या खोडांचे मार्ग वेगळे आणि आजच्या तरुणांचे मार्ग वेगळे. प्राचीन काळी माणसाला अग्नी कसा प्रज्वलित ठेवायचा असा गहन प्रश्न पडत असे तर आता लाकडे इंजिनात सारून माणसे जगभर पक्षांच्या वेगाने प्रवास करतात. याचा अर्थ शब्दश: घ्यायला नको. मी एखादा विचार प्रज्वलित ठेवून पुढे कसा न्यायचा याबद्दल बोलतोय. अनुभव हा चांगल्या मार्गदर्शकाला आवश्यक असणारा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे असे मी मानत नाही कारण त्याच्या भूतकाळात त्याने यशापेक्षा अपयशच जास्त पचविले असण्याची शक्यता जास्त आहे. त्याने एवढे जगून मुलभूत ज्ञान मिळवले असेल का ही शंका मनात येणे अत्यंत रास्त आहे. अगदी खरं सांगायचं तर या म्हातार्‍यांकडे तरुणांना सल्ला देण्यासारखे काही उरलेले नाही कारण त्यांच्या वेळचे जग वेगळे, संकल्पना वेगळ्या, प्रश्न वेगळे आणि त्याची उत्तरे वेगळी. शिवाय आपण ते अनुभवी आहेत, अनुभवी आहेत, असे म्हणतो त्या बाबतीत बोलायचे झाले तर तो अनुभव अत्यंत वैयक्तिक असतो. त्याचा कितपत उपयोग आजच्या तरुणांना होईल याची मला शंकाच आहे. या ग्रहावर मला येऊन तीस वर्षं झाली पण चांगल्या सल्ल्यातील मला साधा ‘स‘ ही ऐकू आलेला नाही. ज्याचा उपयोग होईल असे त्यांनी मला काही सांगितलेले नाही कारण बहुधा त्यांना ते शक्यही नसावे. माझ्या आयुष्यात मी जी वाटचाल केली त्यात मी ठेचकाळलो असेन, मी नाही म्हणत नाही पण ज्यांनी हे आयुष्य उपभोगले आहे त्यांचा मला काही फायदा झाला आहे असे मला तरी वाटत नाही. हं.. एक मात्र खरं की मला जरा कुठला आगळा वेगळा अनुभव आला असेल तर माझ्या मार्गदर्शकांनी त्या प्रकारच्या अनुभवाबद्दल काही सांगितलेले मला तरी आठवत नाही….

क्रमशः….

वॉलडन : हेन्री डेव्हिड थोरो.
अनुवाद : जयंत कुलकर्णी.

Posted in भाषांतर | Leave a comment

बाळासाहेब xxx ( पाहिजे तर लोखंडे म्हणू.)

बाळासाहेब xxx ( पाहिजे तर लोखंडे म्हणू.)

मागच्या एका कथेत आपण आमच्या मालोजीरावांबद्दल ऐकले. मालोजीरावांची जीवनगाथा म्हणजे एक अद्‌भुत कादंबरी सहज होईल. पण आज आपण त्यापेक्षाही अद्‌भुत अशा आमच्या मित्राबद्दल वाचणार आहोत. मालोजीराव काय आणि बाळासाहेब काय, अशी माणसे या पृथ्वीतलावर जन्म घेतात असे कोणी मला आत्ता सांगितले, तर मी त्याला निश्चितच मूर्खात काढेन.

बाळासाहेब काही आमच्याबरोबर इंजीनिअरिंग कॉलेजला नव्हता. तो आमच्याबरोबर होता एफवायपर्यंत. त्याला आमच्याबरोबर इंजीनिअरिंगला प्रवेश मिळाला होता, पण त्याने तो नाकारला आणि परत बी ग्रूप घेऊन एफवायला बसला. बाळासाहेबांना हे असले सहज शक्य होते, कारण ते कमालीचे बुद्धिमान होते. मधून मधून बाळ्या आणि बाळासाहेब म्हटले की अहोजाओ हा घोळ तुम्ही कृपया चालवून घ्या, कारण तो घोळ केवळ त्याच्या नावामुळे आहे. पण त्याची आणि आमची मैत्री नसती, तर मला त्याला आदराने बाळासाहेब म्हणूनच संबोधायला आवडले असते. आमच्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये साहेब मालोजीरावांचे रूम पार्टनर म्हणून राहत असत. हॉस्टेलवरील दोन खोल्या म्हणजे १०१ व १०२ म्हणजे आमचा अड्डाच झाला होता म्हणा ना. एकात बाळासाहेब व मालोजीराजे राहत, तर दुसऱ्यात कलीम व भट्या राहायचे.

माझ्यात आणि या मित्रांमध्ये एक जवळीक निर्माण झाली होती ती माझ्या आईवडिलांमुळे. माझे वडील होते भारतीय वायुदलाचे एक निवृत्त सैनिक. कुठल्याही धार्मिक अवडंबरावर त्यांचा काडीचाही विश्र्वास नव्हता. आई थोडेफार देवाचे करायची, पण ब्राह्मणाचे घर असून आमच्या घरात पार स्वयंपाकघरापासून देवघरापर्यंत सगळ्यांना मुक्त प्रवेश असायचा. यात हे माझे मित्रही आले. या गोष्टीचे त्यांना फार अप्रूप वाटायचे. त्या काळात आमच्या शहरात ही बाब तशी विशेष मानली पाहिजे. आमच्या काही नातेवाइकांनी तर आमचे नावही टाकले होते…पण आम्हाला काही फरक पडत नव्हता, कारण नव्या पिढीचा हळूहळू उदय होत होता व अर्थकारणाला देशात व व्यक्तिगत पातळीवर महत्त्व प्राप्त होऊ लागले होते. हे आमचे हॉस्टेलवरचे मित्र हॉस्टेलच्या जेवणाचा कंटाळा आला की हक्काने आमच्याकडे जेवायला येत. पोटभर जेवत. (हॉस्टेलवरच्या जेवणाबद्दल मी लिहीत नाही, कारण जे कुठल्याही हॉस्टेलवर राहिले आहेत, त्यांना त्यात नवीन काही नाही.) आम्हीही सुट्टीत बाळासाहेबांच्या शेतावर असलेल्या घरी जात असू…

बारामतीच्या पुढे एका आडगावात बाळासाहेबांची दहा-बारा एकर जमीन होती. घर चांगले सुखवस्तू होते, कारण बाळासाहेबांसकट त्याचे तीन भाऊ अत्यंत बुद्धिमान होते. सगळ्यात मोठा इंजीनियर झाला व सरकारी नोकरी करत होता. दुसरा इंजीनियर झाला आणि एका मोठ्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होता. तिसरा माझगाव डॉकवर कंटेनर हलवायचे काम करीत असे. त्याच्याकडे भले मोठे वीस ट्रक व ट्रेलर होते असे म्हणतात आणि बाळासाहेब आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत कोणीतरी मोठे होण्याच्या मार्गावर होते. सगळी भावंडे हडकुळी, जणू काही दुष्काळातून आल्यासारखी दिसायची. त्यात सगळ्या हडकुळा म्हणजे आमचा बाळ्या. उंच मान, गालफाडे वर आलेली व सदानकदा केसांना लावलेल्या तेलाने केस चमकत. ओठ पातळ. दात पांढरेशुभ्र. बारीक तलवार कट मिशा. बाळ्याच्या हनुवटीवर एक तीळ होता, हे मला अजून आठवते आहे. वाचताना त्याच्या कपाळावर आठ्यांचे जाळे आवळले जायचे व तो थोडासा चिडल्यासारखा दिसे. यावर त्याचे म्हणणे होते, “बरंय ना. कोणी त्रास द्यायला येत नाही.” बाळ्या केसांचा भांग अगदी व्यवस्थित पाडायचा. त्याला एकही केस इकडे तिकडे झालेला चालायचा नाही. सकाळची कमीतकमी १० मिनिटे तरी भांग पाडण्यात घालवे स्वारी. बाळ्याचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्याने अंगाला कधीही साधा सदरा लावला नाही. स्ट्राईप्स म्हणजे बाळासाहेबांचा जीव का प्राण. मालोजीच्या बरोबर विरुद्ध. बाळासाहेब पायात कायम कोल्हापुरी पायताणे घालायचा. असा हा बाळासाहेब बाहेर निघाला की आम्हाला धनगरी कुत्र्याची आठवण यायची. आम्ही त्याला तसे चेष्टेने म्हणतही असू. त्यावर त्याचे उत्तर ठरलेले असे, ‘‘धनगरच आहोत आम्ही.’’ बाळ्याचे वाचन दांडगे. ज्याप्रमाणे नाव शेवटी बंदराला आसऱ्याला येते, त्याप्रमाणे आमचे बाळासाहेब शेवटी ग्रंथालयात हमखास सापडायचे. मला आठवते आहे, कचऱ्यात पडलेला कागदाचा चिठोराही तो वाचून काढायचा. वाचनामुळे बाळ्याचे इंग्लिश, मराठी उत्तम होते. एखाद्या इंग्ग्लिश पुस्तकाबद्दल ऐकावे तर त्याच्याकडूनच. त्याच्या तोंडून इंग्लिश सिनेमाच्या गोष्टी ऐकताना आम्ही गुंगून जायचो. हे सगळे वैभव असताना त्या घराचे पाय मात्र जमिनीवर होते. एकदा आम्ही त्याच्या वस्तीवर गेलो असताना मी स्वत: माझ्या डोळ्याने पाहिलेय, त्याचे म्हातारे वडील मुंडासे सांभाळत लटपटत गव्हाचे एक पोते ट्रकमध्ये चढवत होते. म्हातारा होता काटक, पण ते आता त्याला शक्य नव्हते. इतरांनी मदत केल्यावर ते पोते कसेबसे गाडीत चढले. गाडीही यांचीच. मी म्हटले,
‘‘ बाळासाहेब, आता म्हाताऱ्याला विश्रांती द्या की!’’
‘‘अरे, ते ऐकत नाहीत. पहिले पोते मीच चढवणार म्हणतो म्हातारा. जाऊ देत, एक दिवस थांबेल…’’ बाळासाहेब कौतुकाने म्हणाले.

बाळ्याच्या घरात गेल्यावर आमची चंगळ असायची. मटण खावे तर बाळ्याच्या आईच्या हातचेच. ताजे मटण व खास धनगरी पद्धत. जरी शहरात शिकायला असले, तरी बाळ्याला शेतीवाडीची पूर्ण कल्पना होती. वडलांचे मुंडासे बाळ्या सहजपणे बांधत असे आणि तेसुद्धा एकदाही न चुकता. धनगरी मुंडासे बांधण्यास किती अवघड असते हे मी तुम्हाला सांगायला नको. अर्थात आता कोणीच त्या पद्धतीने बांधत नाही म्हणा. आपण सध्या जे पाहतो ते सगळे उत्तरेच्या पद्धतीचे. बाळ्याची आई सडपातळ, अंगाने शेलाटी, हालचालीत चपळ. सगळी मुले तिच्यावरच गेली होती. कष्टाला त्या घरात कोणीही हार मानणारे नव्हते. कष्ट शारीरिक असोत किंवा बौद्धिक.

कॉलेजमध्ये बाळ्याचा दिवस कॉलेजच्या ग्रंथालयातच जायचा. अवांतर वाचन अफाट. अभ्यास केव्हा करायचा कोण जाणे, पण याचा नंबर कायम पहिल्या पाचात. एकदा रसायनशास्त्राच्या वर्गात बाळ्याने एक गणित सोडवले. त्याचे उत्तर काही सरांच्या उत्तराशी जुळत नव्हते. सरांनी जरा जास्त ताणल्यावर बाळासाहेबांनी भर वर्गात उत्तर दिले, ‘‘सर, इफ आय ॲम राँग, देन बॉईल्स लॉ इज राँग.’’ चिडून सरांनी बाळ्याला वर्गातून हाकलून दिले, पण नंतर त्याला बोलावून घेतले….
‘‘बाळासाहेब, तुमचे बरोबर आहे. पण लक्षात घ्या, माझे चुकले होते. तुम्हाला वर्गातून हाकलले ते तुम्ही बॉईल्सची अक्कल काढली म्हणून. तुम्ही पुढे मोठ्ठे व्हाल, पण कुठल्याही प्रकारचा माज हा वाईटच, हे चांगले लक्षात ठेवा…’’

बाळ्याने हे मात्र आयुष्यभर लक्षात ठेवले. पण बाळासाहेबांच्या नशिबाला हे मान्य नव्हते. त्याने माजल्यासारखे बाळ्याला छळायला सुरुवात केली. मधल्या काळत आम्ही इंजीनिअरिंगला गेलो व बाळ्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधे बीएस्‌सी करायला गेला. त्या काळात संपर्काची सोय आजच्याएवढी नव्हती. संपर्क कमी होत गेला.

मध्ये एकदा भेटला, तेव्हा त्याने त्याच्या घराची कशी धुळधाण उडाली, ते सांगितले. अमानवी शक्ती – म्हणजे आजकालच्या भाषेत डार्क स्पिरिट्स – दुष्ट प्रवृत्ती जन्माला घालतात असे मानायचे काही कारण नाही. तोडीचा दुष्टपणा करण्यास माणूस पुरेसा आहे…. असे कोणी तरी म्हटले होते..

पहिल्या दोन भावांचा खून झाला, तिसरा जीव वाचविण्यासाठी पळून गेला. वडील वारले होते व आईने गाव सोडून माहेरी आसरा घेतला होता. (तीही नंतर खंगून वारली.) हे सगळे झाले भाऊबंदकीमुळे, असे त्याचे म्हणणे होते. दादागिरी करणारे, दडपशाही करणारे, किंवा इतरांचे हक्क हिंसेने पायदळी तुडविणारे हे गुन्हेगार आहेतच, पण त्यांचा सगळ्यात मोठा गुन्हा हा आहे की ज्यांच्यावर त्यांनी अत्याचार केले आहेत, त्यांना ते या नवीन मार्गाची ओळख करून देतात…. त्यामुळे तिसऱ्या भावाने दोन-चार मुडदे पाडले व तुरुंगात गेला. खरे खोटे त्यालाच माहीत. पण बाळासाहेबांनाही अवकळा आली होती, हे खरे.

‘‘काय रे! मग तुझ्या शिक्षणाचे काय?’’

‘‘चालू आहे मालोजीराजांच्या कृपेने.’’ बाळ्या म्हणाला.

‘‘मी केली असती मदत शक्य असते तर, पण ते म्हणजे ’उघड्यापाशी नागडं गेलं आणि थंडीनं काकडून मेलं’ असं झालं..’’ मी म्हणालो.

‘‘मग आता काय विचार आहे?’’

‘‘मला अमेरिकेत जाऊन संशोधन करायचे आहे… आहेत डोक्यात काही कल्पना. जेनेटिक्समध्ये काम करायचंय मला. मला काजूचे गुणधर्म असणारे शेंगदाणे तयार करायचे आहेत….मालोजीनेही मदत करण्याचं वचन दिलं आहे… बघू या काय होतंय ते…. नाही, म्हणजे करायचंच आहे मला…’’

ते ऐकून आम्ही पडायचेच बाकी होतो. इतरांनी त्याची येथेच्छ टिंगलटवाळी उडवली. मी मात्र गप्प होतो. बाळासाहेब मृगजळाच्या मागे धावणाऱ्यांपैकी नाहीत, हे मला पक्के माहीत होते.

‘‘बुडाले म्हणायचे आमचे पैसे!’’ मालोजी.

‘‘बाळासाहेब, गंमत केली बरं का…नाहीतर बसाल गप्प…’’ मालोजी म्हणाला.

अनेक वर्षे गेली. मालोजी अमेरिकेत गेला आणि त्याने बाळ्यालाही तेथे जाण्यास मदत केली. आमच्यातील अंतर वाढले आणि घसटही कमी झाली. पण शाळा-कॉलेजातील मैत्रीत एक गुण असतो, तो म्हणजे त्या मैत्रीला काळ आणि अंतर याचे बंधन नसते. कितीही वर्षांनी भेटा, कुठेही भेटा, मधली वर्षे गाळून परत त्या भेटीपर्यंत आपण त्याच क्षणी परत येतोच. परिस्थितीशी भांडण्याचे सुरुवातीचे दिवस होते ते. यश-अपयश पचवत सगळ्यांचीच वाटचाल चालू होती. मधेच केव्हा तरी मालोजीचा फोन येई. आम्ही फोन करायचा प्रश्र्नच नव्हता. परवडणेच शक्य नव्हते. फोनवर आम्ही बाळासाहेबांचीही चौकशी करायचो.

‘‘त्याचे ठीक चालले आहे. एका गोऱ्या मुलीशी प्रकरण चालू आहे. बहुधा लग्न करतील ते. माझे सगळे पैसे व्याजासहित परत केले, बरं का त्याने! मी व्याज नको म्हणत होतो, पण धनगराने ऐकले नाही.’’

आम्ही आपापसात आमच्या जातीचा अगदी आरामात उल्लेख करायचो. कोणालाच त्याचे काही वाटत नसे, कारण एकमेकांविषयी वाटणाऱ्या प्रेमाची व आदराची आम्हाला सगळ्यांनाच खातरी होती. मुख्य म्हणजे आम्ही जेव्हा (एकमेकांची) जात काढत असू, तेव्हा त्या जातीचे फक्त चांगले गुणच आमच्या मनात असत. हिणवण्याचा प्रश्र्नच नसे.

‘‘मग चांगलंय की. भेटतो की नाही कधी?’’

‘‘छे रे! तो दुसऱ्या टोकाला आणि मी दुसऱ्या. विमानानेच चार तास लागतात. बघू या, लग्नाला बोलवतोय का… त्याने बोलावले तर मात्र मी जाणार आहे.’’

‘‘तुमचे काय मालोजी? काही प्रकरण?’’ मी हसत विचारले.

‘‘आमचे झाले एकदाच प्रकरण… आता काही होईल असे वाटत नाही…’’ मालोजी.

‘‘पण त्याचे काय चालले आहे? ते काजू आणि शेंगदाणे… त्याचे पुढे काय झाले?”

‘‘चेष्टा करू नकोस. तो जेनेटिक्समधला बाप माणूस समजला जातो आता. मोन्सँटोमध्ये मोठा साहेब आहे आता तो. काहीतरी म्हणत होता तो की त्याचे संशोधन प्राथमिक अवस्थेत असले, तरी योग्य मार्गावर आहे…’’

‘‘येणार आहे का इकडे?’’

‘‘त्याचे संशोधन संपत आले की मग तिकडे त्याच्या फील्ड ट्रायलसाठी येणार आहे असे म्हणत होता…’’

त्यानंतर बरीच वर्षे त्या दोघांची काहीच खबरबात नव्हती. एक दिवस मीही ॲग्रिकल्चरल कॉलेजमधे जाऊन जेनेटिक्सची व त्याचा बियाणे तयार करण्यासाठी वापर यावर थोडीफार माहिती काढली. एक गोष्ट लक्षात आली म्हणजे ते अवघड होते पण कुठल्याच शास्त्रज्ञाने अशक्य आहे असे म्हटले नव्हते. मग मी तो विचार बाजूला सारला.

अशीच अनेक वर्षं सरली आणि अचानक माझ्या कंपनीत बाळासाहेबांचा फॅक्स आला. वाचून मी गारच झालो. बाळासाहेब, त्याची बायको व दोन मुले पुढच्या महिन्यात भारतात येणार होते. त्याला त्याच्या गावाकडे महत्त्वाचे काम असल्यामुळे तो गावीच मुक्काम टाकणार होता. आम्हाला सगळ्यांना त्याने तेथेच बोलावले होते. त्याची बायको व मुले मुंबईला त्याच्या नातेवाइकांच्या फ्लॅटवर माझ्याच गाडीने परतणार होती. बाळ्याने ड्रायव्हरची सोय केली होती. शेवटचे वाक्य खास माझ्यासाठी होते, ‘‘ कोणी आले नाही तरी तू मात्र जरूर येच. महत्त्वाचे बोलायचे आहे.’’

बघता बघता बाळासाहेब येण्याचा दिवस उजाडला. तिसऱ्या दिवशी मी त्याच्या वस्तीवर जाणार होतो. त्या दिवशी उठलो तोच मनात हुरहुर घेऊन. कसा असेल बाळ्या? तसाच असेल का, साहेबासारखा बोलत असेल असे अनेक विचार मनात येत होते. त्याच्या त्या काजूच्या संशोधनाचे काय झाले असेल…? एक ना दोन.. पहाटे गाडी काढली आणि बारामतीला निघालो. दहाच्या सुमारास त्याच्या वस्तीवर पोहोचलो आणि मला ते घर ओळखुच येईना. एकच खोली कशीबशी तग धरून उभी होती. बाकी सगळे घर ढासळले होते, पण घराभोवती हिरवागार उस डोलत होता. मला काही उमजेना…. अर्थात त्याचे उत्तर मला नंतर मिळणार होते. गाडीचा आवाज ऐकून काहीही फरक न पडलेला बाळ्या बाहेर आला… मागे लुकलुकणाऱ्या डोळ्यांची दोन गोरी मुले त्याच्या आड लपून मला न्याहाळत होती. त्या सगळ्यांच्या मागे बाळ्याची गोरीपान, निळ्या डोळ्याची बायको आमच्याकडे पाहत उभी होती. बाळ्याने धावत येऊन मला मिठी मारली आणि आम्ही घराकडे वळलो…

‘‘तू फ्रेश हो! तोपर्यंत मीही आवरून घेतो. आपल्याला आमदाराला भेटायला जायचे आहे. तुझी गाडी आहे, तोपर्यंत दोन चार कामे उरकून टाकू. चालेल ना ?’’

‘‘ तू म्हणशील तसंऽऽ’’

‘‘पण आमदाराकडे काय काम काढलंस बाबा ?’’

‘‘ते सगळं तुला गाडीतच सांगतो.’’ बाळासाहेब म्हणाला.

थोड्याच वेळा चहापाणी करून आम्ही निघालो. वाटेत बाळासाहेबांनी जे काही सांगितले त्याचा गोषवारा असा… मला त्याने सांगितलेले विशेष काही कळले नाही, कारण त्यात मला समजणारी फक्त क्रियापदेच होती. पण थोडक्यात सांगायचे म्हणजे काजूमधील गुणधर्म कुठल्या जीन्समुळे येतात, हे शोधून काढण्यासाठी त्याने एक लाखाच्या वर डीएनएच्या लाईन्सचा अभ्यास केला होता व शेवटी त्याचे म्युटेशन करण्यात त्याला यश आले होते.

‘‘अरे, मला यश मिळाले असे आपले म्हणायचे, पण जे झाले ते अपघाताने. तो अपघात माझ्या संशोधनात का झाला आणि तसा अपघात परत घडवून आणण्यास काय करावे लागेल, हे शोधण्यात माझी गेली आठ दहा वर्षे गेली. आता यापुढे निरोगी बियाणे तयार करण्यात माझी आणखी दहा वर्षे तरी जातील.’’

‘‘काय रे, पण तू म्हणतोस तसे शेंगदाणे जमिनीखाली आले आणि त्या दाण्यांना काजूची चव आली, असं तुला म्हणायचं आहे का?’’

‘‘तूच चव घेऊन बघ ना!’’ असे म्हणून त्याने बरोबर घेतलेल्या छोट्या पोत्यातून शेंगा काढून माझ्या डाव्या हातवर हातावर ठेवल्या. सामान्य शेंगांसारख्या दिसणाऱ्या त्या शेंगा..फक्त एकच फरक होता, तो म्हणजे त्याचा पृष्ठभाग खूपच गुळगुळीत होता.

‘‘अरे, फोडून दे ना!’’ मी म्हटले.

‘‘गरज नाही! बोटाने सहज तुटेल ती. भाजलेली आहे.’’

मी अधिर होत ती फोडली आणि त्यातील दाणे तोंडात टाकले. दाताखाली एक तोडला आणि खरेच सांगतो – मी पडायचाच काय तो बाकी होतो. मी गाडी बाजूला घेतली आणि बाळासाहेबाला मिठी मारली. मला काय बोलावे हे कळेना… मी बधिरच झालो होतो. माझ्या त्या अवताराकडे पहात बाळासहेब हसत होता.

‘‘अरे, माझीही अशीच अवस्था झाली होती…’’
थोड्या वेळाने सावरल्यावर मी विचारले, ‘‘मग आता आमदाराकडे काय काम काढले आहेस?’’

‘‘अरे, पुढचे प्रयोग करायला मला कमीतकमी तीन एकर जमीन पाहिजे आहे. कारण बियाणे तयार करायला एक लॅब उभारावी लागेल. आता ही जमीन ताब्यात घ्यायची म्हणजे आमदाराची मदत घ्यावी लागेल, असे आमचा भाऊ म्हणाला. म्हणून त्याला भेटायला जायचे आहे. ते काम झाल्यावर घर आणि लॅब उभी करण्यात मला तुझी मदत लागेल. नोकरी सोडलीस तरी चालेल. मी परत गेल्यावर तू हा प्लांट बघू शकतोस. त्याची कागदपत्रे कशी करायची इत्यादी… भानगडी नंतर बघू. अर्थात घाई नाही. वहिनींना विचारून निर्णय घे. पण मला वाटते यात मिळेल तेवढा पैसा तुला इतरत्र कुठेच मिळणार नाही.’’

‘‘अरे, पण तू मला सांगितलेस त्यातील एकही शब्द मला कळला नाही. माझा उपयोग तुला फक्त उभारणी करण्यातच होईल असं मला वाटतं.’’

‘‘त्याची काळजी नको. ती माणसे मी नेमेन. मला इथे एक विश्वासू माणूस पाहिजे आहे. बस्स…’’

‘‘बरं, पाहू या नंतर.’’ मी म्हणालो.

आमदाराच्या फार्महाउसमध्ये आमची गाडी शिरली. सिक्युरिटीचे सर्व सोपस्कार पार पाडून आम्ही आत पोहोचलो. आगतस्वागत झाल्यावर आमदारांनीच विषयाला हात घातला,

‘‘बाळासाहेब, तुम्हाला इथे जमीन मिळणे शक्य नाही. मान्य आहे तुमचे नाव आहे सातबाऱ्यावर. मी कुठे म्हणतोय नाही? पण परत इथे पाय टाकाल तर तोच तोडून हातात देऊ. काय समजलात? चालू लागा आता. किसन, साहेबांना सोडून ये त्यांच्या घरी. बाळासाहेब, आता घरी गेल्यावर लगेचच पुण्याला निघायचं. काय कळलं? नाहीतर इथेच मुडदा पडंल तुमचा. का, ते तुमच्या भावाला विचारा…’’

ते ऐकून आमच्या दोघांचे पाय थरथर कापू लागले. हा माणूस जे म्हणतोय ते सहज करू शकेल याची मला खातरी होती. बाळासाहेब काही बोलणार, तेवढ्यात मी त्याला थांबवले.

‘‘बाळासाहेब, उपयोग नाही. आम्हीच कपाळकरंटे… चल, जाऊ या…’’

एवढे बोलून आम्ही परत आलो तर आमदाराची माणसे अगोदरच येऊन थांबली होती. आम्हीही लगेच आवरायला घेतले व पुण्याला टाकोटाक परतलो. बाळासाहेबांनी मग एक शहाणपणाचा निर्णय घेतला, तो म्हणजे बायको-पोरांना लगेचच अमेरिकेला पाठवून दिले. नंतर काय घडले, ते मला फार उशिरा कळले. बाळासाहेबांनी मग कोकणातील खासदारास गाठले व काजूच्या उत्पादनवाढीचा प्रस्ताव ठेवला. पण त्या खासदाराने एकच प्रश्र्न विचारला,

‘‘बाळासाहेब, हे तुमचे काजू देशात कुठेही येतील ना? म्हणजे आमच्या कोकणातील काजूच्या बागा जाळून टाकल्या तरी चालतील. मला नाही वाटत हे शक्य आहे. मला वाटतं आता आम्ही तुम्हाला हा प्रयोग भारतात तरी करू देणार नाही. माझं ऐका, तुम्ही अमेरिकेला परत जा.’’

पण बाळासाहेब हटला नाही त्याने आता मंत्र्यांना गाठण्याची तयारी चालवली.

पण एक दिवस घडले ते विपरीतच. मला फोन आला एका इस्पितळातून. बाळासाहेबांवर कोणीतरी जीवघेणा हल्ला केला होता. मी घाईघाईने तेथे गेलो. माझ्याच्याने बाळासाहेबाकडे पहावेना.

आयसीयूमध्ये तो निपचित पडला होता. जगेल की नाही याचीच डॉक्टरांना शंका होती. पण काटक बाळासाहेब जगला. नुसता जगला नाही, तर हिंडू फिरू लागला. पाच -सहा वर्षे झाली, तो भारतातच राहिला. एक दिवस माझ्याकडे संध्याकाळी आला. येताना बाटली घेऊन आला होता. त्याच्या पिण्याच्या पद्धतीवरून त्याला दारूची सवय लागली असावी असे मला तरी वाटले.

‘‘मला आपल्या देशाने मातीत घातले. मीच केलेले संशोधन मी कंपनीला न सांगता येथे आणले होते. या प्रकारात पाच वर्षं मी येथे घालवली. कंपनी मला परत ये म्हणतेय पण मी हे संशोधन तेथे उघड करू शकत नाही. इतके दिवस ते उघड का केले नाही म्हणून माझी चौकशी होईल. कदाचित एफबीआयकडे प्रकरण जाऊ शकते. तसे झाले, तर मला तुरुंगात खितपत पडावे लागेल. हे संशोधन बासनात गुंडाळून ठेवलेलेच बरे.’’

मीही त्याला होकार दिला.

नंतर बरेच दिवस/महिने/वर्षं बाळासाहेबाचा पत्ता नव्हता. त्याने बायकोलाही काही पत्र लिहिले नव्हते. तिचा व मालोजीचा अनेक वेळा फोनही येऊन गेला. पोलिसात तक्रार झाली…सगळे प्रयत्न झाले. पेपरमध्येही या प्रकरणाची चर्चा झाली, पण बाळासाहेबांचा पत्ता लागला नाही. त्याचे बरेच सामान माझ्याकडे पडले होते, ते मी एका कपाटात नीट ठेवून दिले. बाळासाहेब आत्महत्या करणार नाही याची मला शंभर टक्के खातरी आहे. तो अमेरिकेला परत गेला नाही.. हेही मला माहीत आहे..

मी शोध घेण्याचा बक्कळ प्रयत्न केला, अजूनही करतोय, पण आमचा हा शास्त्रज्ञ मित्र गायब झाला तो झालाच….

जयंत कुलकर्णी.
सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन.

ता.क. : बाळासाहेबांचे एक चिरंजीव जेनेटिक्समध्येच काम करत आहेत आणि असे म्हणतात की त्यांनी काजू नाही, पण असलेच काहीतरी संशोधन अमेरिकेत यशस्वी केले आहे. माझ्याकडे एक ट्रंक भरून बाळासाहेबाचे जे बाड पडले आहे, (त्यात त्याचा अमेरिकन पासपोर्टही आहे) ते त्याला द्यावे की नाही, यावर मी अजून विचार करतोय…. कारण त्यावर कोकणातील शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे…

मला वाटते ते जाळूनच टाकावे. मलाच मोह पडला, तर?

व्यक्तिचित्र व कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.

 

Posted in कथा | 1 Comment

“बुरख्या आडून !”

धुल-नुन-अय्युब हे इराकचे एक सुप्रसिद्ध लेखक आहेत. (१९०८)
इस्लामच्या परंपरा आणि आधुनिक जगाच्या रितिभाती यांच्यातील संघर्ष हा त्यांच्या लेखनाचा विषय. इस्लाम धर्मातील स्त्रियांची इज्जत आणि सन्मान राखण्यासाठी स्त्रियांनी उघड्या जगात बुरखा घालण्याची पद्धत सुरु झाली. स्त्रियांना पुरुषांचे दर्शन व्हायचे ते म्हणजे त्यांच्या वडिलांचे, भावंडांचे आणि नंतर नवर्‍याचे. १९२० साली ही परंपरा हळूहळू मोडीत निघू लागली होती पण आता ती परत मूळ धरू लागली आहे. या बुरख्याकडे पाश्चिमात्य जग स्त्रियांवरील अन्याय, दमन म्हणून पाहतात. पण बर्‍याच वेळा इस्लामी स्त्रिया बुरख्याआड वेगळ्या नजरेने पाहतात. हे त्यांनी छानपणे सांगितले आहे त्यांच्या ‘‘बुरख्याआडून…’’ या कथेत.

 

from-behind-the-veil-nweb

“बुरख्या आडून !”

रस्ता चांगला रुंद असला तरी बेशिस्त चालणार्‍या मुळे तो अगदी अरुंद भासत होता. सुळ्ळकन जाणार्‍या गाड्यांना न जुमानता माणसे चालत होती. त्यातच या गाड्यांची भर पडली होती. गाड्यांमधे श्रीमंत माणसे आरामात बाहेर तुच्छतेने पहात बसली होती. त्यातील तरुण सुंदर स्त्रियांच्या चेहर्‍यावरचे बदलणारे भाव पाहून ते कुठल्या दृष्याकडे पहात आहेत हे सहज उमगत होते.

चालणार्‍या गर्दीत असंख्य प्रकारचे रंगीबेरंगी कपडे दिसत होते. विविधतेने नटलेले ते रस्ते पाहून बाहेरच्या कुठल्याही परदेशी माणसाला वाटले असते की आज कुठला तरी उत्सव आहे की काय. अर्थात त्यांची त्यात काही चूक नाही कारण त्यांच्याकडे एवढे विविध प्रकारचे कपडे फक्त उत्सवात दिसतात.

गर्दीमधे काही बुरखा घातलेल्या स्त्रिया दिसत होत्या तर काही आपले सौंदर्य उधळत चालत होत्या. गंमत म्हणजे त्या सुंदर स्त्रियांकडे कोणी विशेष लक्ष देत नव्हते. पण त्या बुरख्यांकडे मात्र माणसे वळून वळून पहात होती. कदाचित त्या कमनीय आकाराच्या रेशमी, सुळसुळीत बुरख्यात काय दडले असेल याची ते कल्पना करत असावेत. त्यातच चुकून एखादा बुरखा थोडासा जरी दूर झाला तरी आतील रेखीव भुवया, फडफडणाऱ्या पापण्या जर नजरेस पडल्या तर तेवढाही नजारा ह्रदयात आग पेटवण्यास पुरेसा होई. या बुरख्याआडच्या लाजऱ्या जगासाठी उरलेले आयुष्य वेचण्याची त्याला ओढ न लागली तरच नवल.

घायाळ होण्याची संधी शोधत त्या रस्त्यावर फिरणाऱ्या अनेक तरुणांमधे इहसानही एक होता. तरणाबांड, आपल्या देखणेपणाची पूर्ण जाणीव असणारा हा तरुण वाऱ्याने विसकटलेल्या केसामधील एखादी बट आपल्या गोर्‍यापान कपाळावर ओढून त्या रस्त्यावर, कंटाळा आला की फिरायला येत असे.

या इहसानचे वय असेल अंदाजे अठरा. रुबाबदार, दिसायला देखण्या असलेला इहसान अनेक मुलींना व स्त्रियांना आवडत असणार. त्याच्या या देखणेपणाची जाणीव त्याला असल्यामुळे बघा आजही तो त्या रस्त्यावर भिरभिरत्या नजरेने सावज हेरत फिरतोय.

त्याला बुरखा परिधान न केलेल्या स्त्रियांमधे किंवा मुलींमध्ये मुळीच रस नव्हता. त्या त्यांच्या सौंदर्याचे उघड प्रदर्शन करत होत्या पण त्याला त्याचे बिलकूल आकर्षण वाटत नव्हते आणि शिवाय त्या त्यांच्याकडे पाहणाऱ्यांच्या नजरेला नजरही देत नव्हत्या. कोणाच्या लक्षात आले तर काय घ्या ? असा विचार बहुधा त्या करत असाव्यात. मग इकडे तिकडे कटाक्ष न टाकता त्या चालत. भले कोणी त्यांच्या बद्दल, त्यांच्या सौंदर्याबद्दल शेरेबाजी केली तरी त्यांच्या चेहर्‍यावर साधी स्मितरेषाही उमटत नसे मग खुदकन हसणे तर लांबच.

याच कारणामुळे इहसान नेहमी लांबसडक रेशमी बुरखे घालणाऱ्या मुलींच्या मागे फिरायचा. त्या बुरख्याआड होणार्‍या बारीकसारीक हालचाली त्याला जाणवायच्या. उसासे, खुदकन हसण्याचा आवाज, नजरेला नजर देणारे बुरख्यातील डोळे त्याला घायाळ करायचे.

सिहॅमही नेहमीप्रमाणे त्या दिवशी फिरायला त्या रस्त्यावर गेली होती. त्या रस्त्यावर रमतगमत चक्कर मारणे हा तिच्या जीवनाचा एक अविभाज्य घटक होता. आता तिलाही आठवत नव्हते की तिने हा उपक्रम केव्हा सुरू केला आणि तो तिने का सुरू ठेवलाय हेही तिला उमगत नव्हते. किंवा काही कारण असलेच तर ती ते सांगत नसे. काहीही असो, रस्त्यावर वर्दळ झाली की सिहॅमची पावले आपोआप त्या रस्त्याकडे वळत हे खरे. इकडे तिकडे पहात तिचे डोळे इहसानला तो दिसेपर्यंत शोधत असत. तो दिसला की तिच्या छातीची धडधड उगीचच वाढत असे व रक्त सळसळत असे.

तो एकदाचा दिसला की ती अजाणता त्याच्या दिशेला ओढली जायची. त्याच्या बाजूने चालताना त्याचे डोळे तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळत असत व तिच्या अंगावर रोमांच उभे रहात असत. आजही त्याची नजर तिचा बुरखा फाडून तिचा कमनीय बांधा न्याहाळते आहे असे तिला वाटले आणि तिच्या अंगावर शहारा आला. हे आता रोजचेच झाले होते. बुरख्यातून त्याला पाहत आता तिला त्याचा चेहरा चांगलाच लक्षात राहिला होता. आजकाल तर तो नुसता दिसला की ती बुरख्यातच लाजत असे व तिच्या ह्रदयाचे ठोके जलद पडू लागत. ती त्याला मुक्तपणे निरखू शकत होती कारण तिला माहीत होते की बुरखा तिच्या भाव भावना, तिला त्याचे वाटणारे आकर्षण त्याच्यापासून लपवितो आहे. बुरख्यात ती मोकळेपणाने वावरू शकत होती.

आता याला तिचे आकर्षण का वाटते आहे हे आपण सांगू शकत नाही, का त्याच्या नेहमीच्या सवयीनुसार त्याने तिला गटवण्यासाठी पावले टाकली होती हेही आपण सांगू शकत नाही. कारण काही असो, त्या दिवशी त्याने सरळच तिला गाठले आणि तिला अभिवादन केले. तिने गर्रकन वळून त्याच्याकडे पाहिले. त्याच्या सराईत नजरेने टिपले की ती त्याच्यावर चिडलेली नाही. ते पाहताच त्याचा धीर चेपला व तो तिच्या मागे मागे जाऊ लागला. ती एका बागेत शिरली आणि हाही तिच्या मागे बागेत शिरला. तो तिच्या मागे मागे येतोय हे तिला माहीत होते. भीती, उत्सुकता व आनंद या सर्व भावनांचे मिश्रण त्या बुरख्यात पसरले असावे असा अंदाज आपण बांधू शकतो.

तो तिच्या मागे मागे जात शेवटी थबकला. ती एका झाडामागे बसली. त्यानेही लांब ढांगा टाकत तिला गाठले व हसून तो तिला म्हणाला,

“ मासा-अल-खैर !” ( गुड इव्हिनिंग)

“ मासा-अल-खैर !” असे म्हणून तिने तिच्या चेहर्‍यावरचा बुरखा बाजूला केला आणि तिच्या लांबसडक, काळ्याभोर पापण्या इहसानच्या डोळ्यात भरल्या. इतक्या लांब सडक की त्यांची सावली तिच्या गोर्‍यापान गालावर पडली होती. त्याने असे काहीतरी दिसेल अशीच कल्पना केली होती. तिच्या सुंदर चेहरा काळजीने थोडासा आक्रसला होता पण त्यामुळे ती अधिकच सुंदर दिसत होती. भेदरलेल्या हरिणीसारखी ती इकडे तिकडे पहात होती. तिच्या शरीराला हलकासा कंप सुटला. ती जे काय करत होती तो केवढा घोर, अक्षम्य गुन्हा होता याची तिला पूर्ण कल्पना होती. पण तिच्या मनाला एक दिलासा होता तो म्हणजे या मुलाने तिला याआधी कधीच पाहिले नव्हते व त्याला ती माहीतही नव्हती. तारुण्यसुलभ भावनांनी तिला हे धाडस करण्यास प्रवृत्त केले होते व त्याची तिला मोठी मौजही वाटत होती.

त्याने पुढचे पाऊल काय टाकायचे यावर जरा विचार केला आणि म्हणाला,

“मी बर्‍याच वेळा तुम्हाला इथे झाडांतून फिरताना पाहतो. मी आजवर तुझ्याशी बोललो नाही कारण असे एकदम कसे बोलणार ना ? तू कुठल्यातरी चांगल्या घरातील मुलगी दिसतेस.”

“पण तू इतर मुलींबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतोसच की ! मग त्यांच्याच मागे का नाही लागत ?”

“माफ कर ! मला तुला दुखवायचे नव्हते. पण तू पाहतंच आहेस की मी येथे एकटाच फिरतो. मला मग कंटाळा येतो. पण मी पाहिलंय की तुलाही येथे या झाडात फिरायला आवडते म्हणून मला असे वाटले की आपल्या आवडी निवडी एकच असाव्यात. पण तुला यात जर काही वावगे वाटत असेल तर मी लगेचच निघतो” असे म्हणून तो उठला तेवढ्यात तिने त्याला थांबवले.

“ मी कोण आहे हे तुला माहिती आहे का ?” तिने विचारले.

“ बिलकूल नाही पण मला आपल्या आवडीनिवडी जुळतील असे अजूनही वाटते.” त्याने हळुवार आवाजात उत्तर दिले.

“तुला जर माझ्याबरोबर फिरायला यायला आवडलं तर माझी काही हरकत नाही पण माझी एकच अट आहे. तू चालणे झाल्यावर माझ्या मागे येणार नाहीस आणि दुसरीकडे कुठेही मला ओळख दाखवणार नाहीस. मी कोण आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार नाहीस. आहे कबूल ?”

“जशी तुझी इच्छा !” त्याने तिला वचन दिले.

ते दोघे एका दगडी बाकावर शेजारी शेजारी बसले. त्या निरव शांततेत त्यांना एकमेकांच्या ह्रदयाची धडधड ऐकू येत होती. बराच वेळ कोणीच बोलले नाही. त्यांनी स्वत:च स्वत:वर ओढवून घेतलेल्या विचित्र परिस्थितीने ते भारावून गेले होते.

इहसानला अशा भानगडींचा अनुभव होता तरी पण यावेळी मात्र त्याच्या लक्षात आले की हे प्रकरण काहीतरी वेगळे आहे. तिने घातलेल्या अटींनी तो गोंधळून गेला. आजवर असे कधीच झाले नव्हते. गोंधळून त्याने या प्रकरणात फार पुढे जायचे नाही हे मनोमन ठरवून टाकले. आता तो यातून सुटका कशी करून घ्यायची याचा विचार करू लागला.

शेवटी त्याने धीर करून विचारले, “ नाव काय तुझे ?”

“तू माझी अट विसरलास की काय ? मी कोण आहे हे जाणून घेण्याचा कसलाही प्रयत्न करणार नाहीस असे तू मला वचन दिले आहेस.”

“नाही ! नाही विसरलो (माझे आई) पण मला वाटले मैत्रीत नाव माहीत असलेले चांगले असते”

“आपण कुठल्या समाजात राहतोय हे तू विसरलास की काय ? आपण जे करतोय हा आपल्या समाजात एक अक्षम्य गुन्हा आहे. माहिती आहे ना? माझ्या माणसांना हे कळले तर ते मला ठार मारतील. जेव्हा समाज असा असतो तेव्हा आपल्याला काळजी घ्यावी लागते. समाजाचा कर्मठपणा वापरूनच आपल्याला त्यांनी घातलेल्या बेड्या तोडाव्या लागतील. त्यासाठी समाजाला फसवण्यात आपल्याला यश आले पाहिजे. कळलं का?”

“ फारच खोलवर विचार करतेस तू” इहसान चमकून म्हणाला.

“चला ! माझी परत जायची वेळ झाली. मी परत दोन एक दिवसांनी भेटते तुला”

ती निरोप घेताना उभी राहिली आणि इहसानने तिच्या कमरेभोवती हात टाकण्याचा प्रयत्न केला पण तिने तो रागाने झिडकारला. त्याच्याकडे रागाने पहात ती म्हणाली,

“तू कोण आहेस मला माहीत नाही..कदाचित तू मुलींना फसवणारा ही असू शकतोस..काम झालं की मला चुरगाळून फेकून देशील.”

ती समाधानाने घरी गेली. तिच्या मनास एक प्रकारची हुरहुर लागून राहिली होती. पण थोडीशी चलबिचल ही उडाली होती. तिने तिच्या समाजाचे सगळे कायदे एका फटक्यात पायदळी तुडवले होते. हे सगळे कसे घडले, का घडले हेच तिला कळत नव्हते. शेवटी ते तिला पडलेले एक स्वप्न होते अशी तिने स्वत:च्या मनाची समजूत घालून घेतली.

घरात आल्यावर तिने तिचा बुरखा तिच्या खोलीत एका खुर्चीवर टाकला व ती आईला सैपाकघरात मदत करायला गेली. आज ती जरा जास्तच बडबड करत होती. आईच्या एवढ्याशा बोलण्यावर खुदकन हसत होती. कामाची टाळाटाळ न करता आईचा प्रत्येक शब्द झेलत तिने आईला अगदी खुष केले. तिचे वडील घरी आल्यावर ती त्यांना हसतमुखाने सामोरी गेली. त्यांच्या हातातील सामान तिने काळजीपूर्वक घरात नेऊन ठेवले. आज तिच्या हालचालीत एक प्रकारचा मृदुपणा आला होता. एवढे करून कोणीही न सांगताच ती स्वत:च्या खोलीत जाऊन अभ्यास करत बसली.

ती कामे यांत्रिकपणे करत होती पण रात्रभर कूस बदलून बदलून तिच्या झोपेचे खोबरे झाले.

त्यांच्या या भेटी सुरूच होत्या. त्यांच्या गप्पांचा विषय आता हळूहळू बदलत स्त्री पुरुषांच्या संबंधांवर येऊन पोहोचला. ते एकमेकात गुंतत गेले. पण तिने डोके थंड ठेवून त्याला तिची ओळख पटणार नाही किंवा ती कोण आहे हे त्याला कळणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. जगापासून ही भानगड लपवून ठेवण्याची किमया तिने अगोदरच साध्य केली होती.

एक दिवस रात्रीच्या जेवणानंतर सिहॅम तिच्या वडिलांबरोबर गप्पा मारत बसली होती. वडील आपले वर्तमान पत्र चाळत बसले होते मधून मधून तिच्या बोलण्याकडे लक्ष देत होते. तेवढ्यात त्यांचे डोळे एका बातमीवर थबकले. लेख होता बुरखा फेकून देणार्‍या स्त्रियांवर. त्यांनी तो लेख मोठ्याने वाचायला घेतला. त्यांचे वाचन संपते ना संपते, सिहॅमने त्या लेखिकेवर परंपरा तोडल्या बद्दल तोंडसुख घेण्यास सुरुवात केली. बुरखा टाकून देण्याचा निर्लज्जपणा त्या बायका कशा करू शकतात असा तिचा रास्त प्रश्न होता. तिच्या संतापाला वाट देत ती बडबडत होती. तिच्या वडिलांच्या मनात त्यांच्या या बुद्धिमान मुलीबद्दल अभिमान दाटून आला. पारंपारिक रूढींचा आदर शिकवणाऱ्या संस्कारात मुलीला वाढवले याचे त्यांना समाधान वाटले. ‘हिच्यात आणि हिच्या बेजबाबदार, उच्छृंखल मैत्रिणींमधे किती फरक आहे ! दोन पुस्तके वाचली की त्यांना वाटते त्यांना कसेही वागण्यास परवानगी आहे. लाज, शरम काही नाही. ” ते मनाशी म्हणाले. “हिचे नखही कोणाच्या दृष्टीस पडत नाही.”

त्यांचा ऊर अभिमानाने भरून आला. ते जागेवरून उठले व त्यांनी सिहॅमच्या कपाळाचे मोठ्या ममतेने एक हलकेसे चुंबन घेतले.

“ अल्ला तुला असेच ठेवो !” त्यांनी आशीर्वाद दिला.

सिहॅम तिच्या खोलीत पोहोचली आणि तिला हसू आवरेना. तिने खोलीचा दरवाजा लावून घेतला आणि ती वेड्यासारखी हसत सुटली. तिने बाजूलाच पडलेला बुरखा उचलला व छातीशी कवटाळला. एक गिरकी घेतली. खोलीच्या मध्यभागी थांबून ती त्या बुरख्याशी बोलू लागली,

“ मी तुझा किती द्वेष करते हे तुला माहीत आहे ना !. पण त्याला माझ्यापासून दूर ठेवण्याचे काम मी तुझ्याकडून करून घेते. मला तुझ्याबद्दल काडीचाही आदर नाही ना ममत्व. मला तुझा राग येतो. तू नुसता माझ्या नजरेस पडलास तरी माझी चिडचिड होते. पण मला तू आवडतोस सुद्धा. इतर गरीब बिचार्‍या मुलींना तू आवडतोस कारण त्यांचे शील, कौमार्य जपण्यासाठी त्या तुझ्यामागे लपतात. पण त्या जर खरंच प्रामाणिक असतील तर त्यांनी तू भानगडी लपवतोस म्हणून तू आवडतोस असे म्हटले पाहिजे.
मला तू आवडतोस कारण मला माझ्या आवडीप्रमाणे आयुष्याची मजा घेण्यास तू मला मदत करतोस. हे फक्त बुरख्याआडच शक्य आहे.

ज्या मुली बुरखा घालत नाहीत त्यांची मला खरोखरीच कीव येते..”

अनुवाद : जयंत कुलकर्णी

Posted in कथा | 1 Comment

वॉल्डन

अर्थशास्त्र.
मी जेव्हा हे सगळे लिहिले, म्हणजे जवळजवळ सगळे, तेव्हा मी एका जंगलात राहात होतो. माझ्या घरापासून सगळ्यात जवळचे घर एक मैल अंतरावर होते व मी ज्या घरात राहात होतो ते मी स्वत:, माझ्या हाताने उभे केले होते. हेे घर मी बांधले होती मॅसाचुसेट्स प्रांतातील कॉनकॉर्ड येथे वॉल्डन नावाच्या तळ्याकाठी आणि महत्वाचे म्हणजे मी माझ्या दोन हाताने कष्ट करून माझी उपजिविका करत होतो. त्या घरात मी दोन वर्षे आणि दोन महिने राहिलो. सध्या मी माणसात परत आलो आहे.

तुम्हाला कंटाळा येईल म्हणून मी हे सगळे लिहिणार नव्हतो पण मी परत आल्यावर माझ्या शेजार्‍यापाजार्‍यांनी मला इतके प्रश्न विचारले की बस्स. ते प्रश्न कदाचित तुम्हालाही पडतील म्हणून मी हे लिहितोय. मला विचारले गेलेले प्रश्न माझ्या काही मित्रांना उद्धट वाटले किंवा काही तर अनावश्यकही वाटले पण प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मला तसे काहीही वाटले नाही. उलट मी वेड्यासारखा जंगलात एकटा जाऊन राहिलो हे पाहता त्यांनी मला अत्यंत रास्त प्रश्न विचारले असेच मी म्हणेन. काहींनी मला विचारले की मी काय खात होतो, तुम्हाला एकटे एकटे, उदासवाणे वाटले नाही का ? भीती वाटली नाही का ? असे अनेक प्रश्न त्यांनी मला विचारले. मी असा उठून दुसरीकडे जाऊन राहू शकतो यावरून काहींचा मी श्रीमंत असल्याचा समज झाला. त्यांनी लगेचच मी माझ्या उत्पन्नातील किती टक्के समाजकार्यासाठी राखून ठेवले आहे याची चौकशी केली. ज्यांची कुटुंबे मोठी होती, ज्यांच्या घरात अनेक मुले होती, त्यांनी मी काही गरीब मुले सांभाळली आहेत का अशी चौकशी केली. माझ्या ज्या वाचकांना या प्रश्नांच्या उत्तरात काडीचाही रस नाही अशा वाचकांची आधीच क्षमा मागून मी या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करणार आहे. बहुतेक पुस्तकात “मी” लिहीत नाहीत, म्हणजे प्रथम वचनी लिहीत नाहीत. पण या पानांमधे आत्मस्तुतीचा दोष पत्करून “मी” राहणार आहे. बर्‍याच वेळा आपल्या लक्षात येत नाही की शेवटी “मी” च बोलत असतो. माझ्याबद्दल मला जेवढी माहिती आहे तेवढी जर मला इतरांबद्दल असती तर मी इतरांबद्दलच लिहिले असते. लिहिण्याची ही पद्धत माझ्या सारख्या संकोची माणसासाठी मला योग्य वाटते. प्रत्येक लेखकाने इतरांबद्दल लिहावेच पण आपले आत्मचरित्र प्रांजलपणे लिहावे अशी माझी मनापासून इच्छा आहे. त्याने जर हे आत्मचरित्र त्याच्या सारख्याच इतर लेखकांना पाठवले तर किती चांगले होईल. प्रत्येकाचे जग वेगळे, अनुभव वेगळे. मी लिहिलेले कदाचित गरीब विद्यार्थ्यांसाठी जास्त उपयुक्त असेल. माझ्या उरलेल्या वाचकांनी त्यांना त्यातील योग्य वाटेल ते उचलावे. असे करताना या लेखाचे वस्त्र उसवणार नाही अशी मला आशा आहे म्हणजे ज्याला उपयुक्त आहे त्याला ते वस्त्र वापरता येईल.

मला तुमच्याबद्दल, तुमच्या गावाबद्दल, तुमच्या शहराबद्दल काहीतरी सांगायला आवडेल. म्हणजे तुमच्या मानसिक अवस्थेबद्दल नाही तर तुमच्या अवतीभोवती जे काही चालले आहे त्याबद्दल. ते वाईट आहे की नाही, ते बदलता येईल की नाही…ते खरंच इतके वाईट आहे का ? मला या बद्दल लिहायला आवडेल. मी कॉनकॉर्डमधे सगळ्या रस्त्यांवर फिरलो आहे. दुकानातून, कार्यालयातून व शेतातूनही फिरलो आहे. मला एक गोष्ट जाणवली म्हणजे मला भेटलेला प्रत्येकजण शेकडो पद्धतींनी आत्मक्‍लेष करून घेतोय. मी हिंदूस्थानातील ब्राह्मणांच्या आत्मक्‍लेषांच्या चमत्कारिक व सुरस कथा ऐकल्या आहेत पण इथे जे चालले आहे तेही तेवढेच चमत्कारिक आहे. रोमन पुराणात हर्क्युलिसने बारा वेळा जे शिवधनुष्य पेलले ते माझ्या शेजार्‍यांच्या कष्टांपुढे किरकोळच म्हणावे लागेल. कारण ते फक्त बारा वेळा घडले आणि त्या प्रत्येक मोहिमेला कुठेना कुठे तरी अंत होता. पण माझ्या शेजार्‍यांनी त्यांच्या हव्यासापोटी त्यांची लढाई कुठेतरी थांबवलेली मला तरी दिसली नाही. एका हव्यासाची पूर्तता झाली की त्या राक्षसाची अजून दोन डोकी त्यांच्यापुढे तयारच असत्तात. हर्क्युलिसला ज्याप्रमाणे हायड्राची डोकी छाटणारा आयोलास सारखा मित्र भेटला तसा यांना कोणी भेटत नाही.

माझ्या आसपास वावरणार्‍या माझ्या दुर्दैवी तरूण मित्रांनी, गावकर्‍यांनी वारसा हक्काने घरे, शेती, गुरे व शेतीची अवजारे मिळवली आहेत. मी त्यांना दुर्दैवी म्हणतो कारण ज्या सहजतेने त्यांना ही संपत्ती मिळाली आहे, त्या सहजतेने तिचा त्याग करणे जिकिरीचं आहे. त्यापेक्षा त्यांनी उघड्या शेतावर जन्म घेतला असता आणि लांडग्यांनी त्यांचे पालनपोषण केले असते तर बरं झाले असते. मग त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले असते की ते कुठल्या शेतावर मजूरी करण्यास आले आहेत. त्यांना शेतमजूर कोणी बनवले.. माणसाला दोन वेळचे दोन घास पुरत असताना ते शंभर एकर का खात आहेत, जन्मल्या जन्मल्याच ते त्यांच्या शेतात त्यांच्या थडग्यासाठी का खणतात? त्याचे सगळे आयुष्य त्यांना झगडण्यात घालावे लागते. आयुष्याच्या रस्त्यावर या ओझ्याखाली पिचून गेलेले कितीतरी अभागी जीव मी पाहिले. त्यांची शेती, त्यांचे मोठे गोठे जे साफ ठेवणे म्हणजे एक अशक्य काम आहे. शिवाय शंभर एकराची नांगरणी, पेरणी, लाकूड तोड यात बिचारे गुंतून गेलेले असतात. ज्यांना ही वारसाहक्काने आलेली ओढाताण करावी लागत नाही त्यांना या एवढ्याशा जिवासाठी हे का करावे असा प्रश्न पडल्यास नवल ते काय…

पण माणसे हव्यासापोटी तीच चूक पुन्हा पुन्हा करतात आणि त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ ते त्यांच्या जमिनीत खत म्हणून कुजण्यास घालतात. मग त्यांच्या प्रारब्धात कष्ट लिहिलेले असतात. या प्रारब्धाला सर्वसामान्य जनता गरज असेही संबोधते. कुठल्यातरी एका जुन्या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे मग ते या प्रारब्धाचे ओेझे वागवून संपत्ती गोळा करतात ज्याला नंतर वाळवी लागतेे किंवा ती दुसर्‍याच्या तरी हाती लागते. हा सगळा मुर्खपणा आयुष्याच्या शेवटी त्यांच्या लक्षात येतो.

तुलनेने विचारस्वातंत्र्य असलेल्या या देशात माणसे अडाण्यासारखे काबाडकष्ट करतात. बिचारी जनता स्वत:च्या प्रकृतीच्या काळजीत व त्याची काळजी घेण्यासाठी लागणारे पैसे कमविण्यात इतकी बुडून गेलेली असते की त्यांना त्यांच्या काबाडकष्टाची फळे वेचणेही शक्य होत नाही. त्यांनी उपसलेल्या काबाडकष्टाने त्यांची बोटे वाकडी झालेली असतात किंवा थरथरत तरी असतात. दिवसेंदिवस दिवसरात्र काबाडकष्ट करणार्‍या माणसाला प्रामाणिकपणाची चैन परवडेनाशी होत चालली आहे. त्याच्या श्रमाचे मुल्य बाजारात कमी होत चालले आहे. त्याला बिचार्‍याला यंत्र होण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही. जरी पर्याय असेल तरी त्याबद्दल विचार करण्यास त्याच्याकडे वेळ नाही हे सत्य आहे. आपल्याकडे स्वत:च्या प्रगतीसाठी आवश्यक असणारे कुठले ज्ञान नाही हेही त्याला उमजत नाही. मग आपण काय करायला पाहिजे ? प्रथम आपण त्याच्याविषयी कसलाही गैरसमज करून घेता कामा नये. म्हणजे तो आळशीच आहे, त्याला पुढेच यायचे नाही, तो अस्वच्छच आहे..इ.इ. असे विचारही आपण मनात आणता कामा नये. आपण त्याला काही काळ सांभाळले पाहिजे, त्याच्या किमान गरजा भागवल्या पाहिजेत जेणेकरून त्याला हे ज्ञान प्राप्त करण्यास वेळ मिळेल व तो प्रगतीच्या पथावर चालू लागेल. निसर्गात आपण फळांचा बहर येण्याची वाट पाहतो तो निसर्गाचा सर्वोत्तम काळ असं समजतात. पण तेथे पोहोचण्यासाठी आपण त्याची हळूवारपणे हाताळणी करतो. हेही तसेच आहे पण एवढे सर्वोत्तम उदाहरण आपल्या समोर असताना आपण एकमेकांचा हळूवारपणे सांभाळ करू शकत नाही ही खरी शोकांतिका आहे.
तुमच्यापैकी काही जण गरीब आहेत, दारिद्—यात खितपत पडले आहेत. त्यांना जगणे अशक्य आहे. या दारिद्त्यात

त्यांचा जीव गुदमरतोय. मला माहिती आहे की हे पुस्तक वाचणार्‍यांपैकी कित्येकजणांना त्यांच्या जेवणाचे पैसेही देता आलेले नाहीत. त्यांचे कपडे जीर्ण झाले आहेत आणि हे पुस्तक वाचण्यासाठी त्यांनी वेळ उसनवार करून किंवा चोरून आणला आहे…..

– मूळ लेखक : डेव्हिड हेन्री थोरो. अनुवाद : जयंत कुलकर्णी.

Posted in मी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल..., लेख | Leave a comment

नाल….

horseshoe-2662773_640

नाल….

आमच्या इंजिनिअरींग कॉलेजमधे आमच्या टोळीत एकाहून एक नवरत्न होती. त्यातील एक राजघराण्यातील रत्न म्हणजे राजे मालोजीराजे पवार. गंमत म्हणजे आम्ही होतो ही नऊ जण. आता हॉस्टेलवर काय काय चालते याबद्दल मी काही सांगायला नको आणि विशेषत: इंजिनीअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलवर. त्या काळात इंजिनिअरींगच्या मुलांना जरा अवास्तव महत्त्व मिळायचे ही वस्तुस्थिती आहे. त्यातून आमचे राजे म्हणजे राजघराण्यातील. त्या काळात साहेबांकडे निळाशार रंगाचा ब्लेझर इत्यादी.. कपडे असायचे. खाली पांढरी शुभ्र, कसल्या तरी सिल्कची पँट वर पांढरा, वर एकही ठिपका नसलेला पांढरा शर्ट, त्याची अत्यंत छोटी पण चांदीची बटणे, तसलीच कफलिंक्स. त्यातील एक मला त्याने कॉलेज सोडताना भेट म्हणून दिली होती. आजही ती माझ्याकडे आहेत. पण त्या चांदीच्या कफलिंक्सला मी नंतर सोन्याचे प्लेटींग करून घेतले. पण शेवटी चांदीवरील सोन्याचा असला तरी मुलामाच तो. कितीही मुलामा चढवला तरी मध्यमवर्गीय विचार आणि राजांच्या दिलदारीत फरक राहणारच. तसा तो आमच्या स्वभावातही राहिलाच. संध्याकाळी हे कपडे घालून राजे डोळ्यावर रेबनचा ॲव्हिएटरचा गॉगल चढवून बाहेर पडले की आम्ही समजायचो, आज कुठेतरी पार्टी असणार. फायद्याचा विचार करून दिलदारी दाखवणार आम्ही…

मालोजी राजे धारच्या कुठल्यातरी पातीचे एकुलते एक राजकुमार. एकत्र कुटुंब. चुलत्यांची आणि यांची मिळून बक्कळ जमीन, जमीनजुमला, दोन तीन वाडे. शेती म्हणजे दोन डोंगरांमधून पसरलेली. राजांनी ती कधी पूर्णपणे पाहिली असेल की नाही याची मला शंकाच आहे. राजे स्वभावाने दिलदार, मदतीस तत्पर. म्हणजे उसनी दिलदारी नव्हं बरं. म्हणजे कोणी मदत मागितली तर करायची आणि ती आयुष्यभर काढायची असला फालतूपणा राजांकडे नव्हता. अख्ख्या हॉस्टेलचा राजांच्या ब्लेझरवर अधिकार असायचा. सिनियर मुले तो हक्काने मुलाखतीसाठी घालायची. म्हणजे ते मागण्यास येत नसत तर राजेच त्यांना स्वत:हून देत असत. खरे तर त्यांच्या सगळ्याच कपड्यांवर त्यांनी मित्रमंडळींना अधिकार देऊन टाकला होता. कधी कधी मालोजीलाच घालायला कपडे उरायचे नाहीत मग तेव्हा स्वारी खोलीत स्वत:ला कोंडून घ्यायची. ही वेळ शेवटच्या वर्षाचा निकाल लागला की हमखास यायचीच. त्यावेळी दिलखुलास हसत त्यांचे हे वाक्य ठरलेले असायचेच. ‘‘अरे बामना, आमची लंगोटी तरी ठेवतील कारे आमची ही मंडळी. तू एक बामन आणि तो एक साठ्या, साल्यांनो तुम्ही जाम हट्टी.. काही घे म्हटले तरी घेणार नाही.’’ पण आम्ही अभिमानी म्हणून त्याच्याकडून काही घेत नाही याचे त्याला वैषम्य वाटत नसे पण आम्ही जे आहे त्यात भागवत असू याचे त्याला मनापासून वाईट वाटे.

‘‘अरे लेको, लागले तर घ्या ना पैसे. नंतर नोकर्‍या लागल्यावर द्या परत. मी कुठे तुम्हाला फ़ुकट वाटतोय ?” पण आम्हाला माहीत होते की ते पैसे तो परत घेणार नाही आणि म्हणून आम्ही त्याच्याकडून काही घ्यायचो नाही.

मालोजीरावांना ब्राह्मणांचा अत्यंत द्वेष वाटे पण त्यांना ब्राह्मणांचे भयंकर कौतुकही वाटे. ते तसे उघडपणे बोलूनही दाखवत. त्यांचा या बाबतीत वैचारिक गोंधळ भयंकर होता. पण त्याने आमच्या मैत्रीत कधी बाधा आली नाही. यामागचे कारण एकच, माणूस सरळ साधा व दिलदार होता. राजांचे इतिहासावर मनापासून प्रेम.
‘‘ चायला लाईन चुकलीच बरं का आमची. आम्ही खरं म्हणजे इतिहासाचा अभ्यास करायचा.’’ तो म्हणे.

‘‘चला मालोजी, आता इतिहास घडवण्यापासून वाचण्यापर्यंत पाळी आली म्हणजे तुमच्यावर ’’ आम्ही त्याला चिडवत असू.

‘‘आता साल्याहो, इथे कसला इतिहास घडवू !’’

मालोजीराजे उखडायचे. कधी कधी वादाला कडवट वळण लागायचे पण मालोजीराजांमुळेच वाद मिटायचा हे सांगण्यात आम्हाला कमीपणा वाटत नाही. तो माणूसच तसा होता, उमदा. सडसडीत बांधा उंची जवळजवळ सहा फूट आणि त्या काळातील राजेराजवाड्यांचे खेळ तो खेळायचा म्हणजे क्रिकेट व टेनिस. खेळताना पाहत रहावे असे त्याचे एका हाताने मारलेले बॅकहँडचे फटके किंवा केसाची झुल्फे उडवीत गोलंदाजी करतानाची त्याची लकब भल्याभल्यांना घायाळ करून जायची. सगळी व्यसने करणे शक्य असूनही कुठलेही व्यसन नसलेला हा मुलगा काहीच काळात सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनला नसेल तर नवलच. तीन वर्षे होत आली आणि आम्ही मध्यमवर्गीय मुलांनी त्याचा पूर्ण पराभव केला. म्हणजे हळूहळू तोही आता आठवड्यात एकच जिनची पँट घालू लागला. तीच पँट परत पुढच्याच महिन्यात धुण्यासाठी टाकायची. वरती कुठलातरी एखादा टी-शर्ट अडकवायचा आणि पायात स्लिपर्स सरकवून बाहेर पडायचे. आम्हाला वाटले आमच्यामुळे मालोजी बदलला. एक दिवस आम्ही गप्पा मारताना म्हटलेही,
‘ शेवटी ज्या समाजात आपण राहतो त्याची ताकद फार मोठी असते. मालोजीचेच पाहाना, त्याला आता कोणी घरात तरी घेईल का ?’’

‘‘ कोणाला बोंबलायला जायचंय घरी ?’’ मालोजी कडवटपणे म्हणाला. त्याचा असा स्वर आजतागायत आम्ही ऐकला नव्हता.

‘‘ का रे ! ’’ आम्ही विचारले.

‘‘ जाऊ दे रे ! ’’

त्याच्या खनपटीला बसल्यावर त्याने सगळे सांगितले. त्यातील त्याचा काही खाजगी भाग गाळून जेवढे लिहिता येईल तेवढे लिहितो. मालोजी राजांचे गावी एका मुलीवर प्रेम होते. मुलगी हुशार, दिसायला सुंदर, व ग्वाल्हेरला उच्चशिक्षण घेत होती. पण होती बिचारी खालच्या जातीतील. घरच्यांनी नेहमीप्रमाणे निर्वाणीचा इशारा दिला. पण मालोजीने ऐकले तर ते राजे कसले ? त्यांनी सगळे इशारे धुडकावून लावले व लग्न करेन तर हिच्याशीच इ. इ. नेहमीची टेप वाजवली. पण पुढे झाले ते वेगळेच झाले. मालोजीरावांची घरातून हकालपट्टी झाली व इस्टेटीच्या वाटणीतून नाव उडाले. घरच्यांनी व भाऊबंदांनी फसवले आमच्या मालोजीला. मालोजीनेही फक्त एकच अट घातली. माझे शिक्षण होऊ देत. शिक्षण झाल्यावर मला उचल म्हणून एक लाख रुपये द्यावेत, माझे संग्रहालय मला द्यावे, मी परत तुमचे तोंड पाहणार नाही. हे सगळ्यांना सहज मान्य होण्यासारखे होते. त्या जुन्या पुराण्या वस्तूत तसाही कोणाला रस नव्हताच. थोडक्यात एका वाटेकऱ्याचा काटा निघाला म्हणायचा. खरे तर मालोजीला कोर्ट कचेऱ्या सहज करता आल्या असत्या. पण त्याला विलायतेला जाण्याचे वेड लागले होते. (त्याचा पुढचा प्रवास मी अगदी जवळून पाहिलाय. तो आता अब्जाधीश आहे.) थोडक्यात काय आम्ही त्याचा पराभव केला नव्हता तर त्याच्या घरच्यांमुळे त्याच्यावर अशी परिस्थिती आली होती. अशाही परिस्थितीत या माणसाचा चेहरा कधी दुर्मुखलेला आम्ही पाहिला नाही. त्याच्या डोळ्यातून कधी पाणी तर येणे शक्यच नव्हते.

मालोजीला इतिहासाचे भयंकर वेड होते हे वर सांगितलेच आहे. आम्ही त्याची चेष्टाही करत असू,

‘‘ मालोजीराजे जर शिवाजी महाराज झाले नसते तर तुम्ही काय केले असते रे?

त्याच्या जोडीला घराण्याचा भयंकर अभिमानही होता. थोडासा दुरभिमान होता म्हणा ना !. त्याच घराण्याने त्याला समजून न घेता घराबाहेर काढले हे त्याच्या मनाला लागले होते. अर्थात ते तो चेहर्‍यावर दिसू द्यायचा नाही ना त्याच्या बोलण्यात परत त्या गोष्टीचा कधीही उल्लेख झाला. पण या आमच्या मित्राच्या डोळ्यात एकदा पाणी तरळलेले पाहणे आमच्या नशिबी होते. प्रसंग विनोदी होता पण इतिहासाचा जाज्वल्य अभिमान असणार्‍या आमच्या मालोजीराजांच्या ह्रदयाला घरे पाडून गेला.

शेवटची परीक्षा झाल्यावर आम्ही सगळ्यांनी कुठल्यातरी सहलीला जाण्याचे ठरवले. मालोजीचा आग्रह होता कुठल्यातरी किल्ल्यावर जाऊ. शेवटी नांदोसला जायचे व नंतर खालून कोकणातून रांगणा चढायचा असा बेत ठरला. एकत्र अशी ती आमची शेवटचीच सहल असणार होती. पुढे कोण कुठे जाईल हे त्या परमेश्र्वरालाच माहीत. थोडेसे भावूक होत आम्ही निघालो. पावसाळा नुकताच सुरू झाला होता. नांदोसला पोहोचेपर्यंत पाऊस चांगलाच कोसळू लागला. रांगण्याला जाणे होते की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. पण मालोजीने हार मानली नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही रांगण्यासाठी घर सोडले. कट्ट्यावरून सायकली भाड्याने घेतल्या व निघालो.

थोड्याच वेळात पावसाने आम्हाला झोडपले. पावसाच्या तिरक्या रेषांनी एखाद्या कॅनव्हासवर शेडींग केल्या सारखे सगळे चित्र दिसू लागले. सायकल हाणता हाणता आमची पार दमछाक झाली. पूर्वीच्या गवळी सायकली त्या… नावच हर्क्युलस, ॲटलास, रॅले म्हणजे सगळ्यात भारी… सायकलीचे वजन खेचण्यातच माणसे बिचारी अर्धमेली व्हायची. त्यातच चेन मधे पँट अडकली नाहीतर देवाची कृपा… असो. मधेच पाऊस थांबायचा, वातावरण कुंद व्हायचे आणि ज्ञानेश्र्वरांनी भिंत चालवावी तसा वारा एकदम पावसाची भिंत चालवू लागायचा. विजांचा गडगडाट, वार्‍याचा घोंगावणारा आवाज याचा अनुभव घेत आम्ही रांगण्याच्या पायथ्याशी जे नारूर नावाचे गाव आहे तेथे पोहोचलो. तेथे तर वातावरण फारच भीतिदायक होते. गावात जाणार्‍या रस्त्यावरून ओढ्याचे पाणी वाहत होते व त्यातून तुटलेली झाडे, मेलेली जनावरे तरंगत होती. आमचा थरकाप उडाला पण तेथेच खाली असलेल्या एका टपरीत आम्ही शिरलो. त्यावेळी तेथे देऊळ नव्हते. एक छोटी मुर्ती उघड्यावरच ठेवलेली होती. टपरीच्या उबेत आम्ही शिरलो आणि जिवात जीव आला. जरा चौकशी करून कोणी वाटाड्या मिळतो का हे पाहिले. पोरगावकर म्हणाले,
‘‘ मिळेल पण तुम्हाला तास दोन तास थांबावे लागेल. माणसं कुठेतरी अडकली असतील येतीलच एवढ्यात.’’

‘‘ पण एवढ्या पावसात कोणी येणार का आम्हाला वाट दाखवायला ?

‘‘ अहो वरती पाऊस नसतो फक्त ढग. पाऊस इथे खाली.’’

‘‘ ठीक आहे मग आम्ही थांबतो.’’ मालोजी.

आता सगळे निश्चित झाल्यावर मग गप्पांना ऊत आला. चर्चा, वादविवाद सुरू झाले. मालोजीराजेंचे इतिहास प्रेम परत उफाळून आले. आमच्यात एक मुसलमान मित्रही होता. मालोजी नेहमी त्याच्या मागे लागायचा की तू परत हिंदू हो. नाहीतरी तुम्ही बाटलेलेच आहात. तो बिचारा नेहमी गप्प बसायचा व तो विषय हसण्यावारी न्यायचा. पण त्या दिवशी काय झाले होते कोणास ठाऊक. तो फटदिशी त्याला म्हणाला,

‘‘राजे ! उगंच बकवास नको. तुम्ही तुमची मुलगी देणार का माझ्या मुलाला ? बोला ! आहो मी जरी हिंदू झालो तरी तुम्ही आम्हाला अजून एका नवीन जातीत ढकलाल. ’मुसलमान विश्र्वकर्मी.’’

तो जातीने सुतार होता. मालोजी गप्प बसला तो बसलाच. मालोजीचा घराण्याचा इतिहास ऐकून झाला आणि त्या पोरगावकराचा मुलगा आला. घाईघाईने आम्ही जेवून निघालो. आणि खरच थोड्या उंचीवर गेल्यावर पावसाचा एक थेंबही नव्हत पण दाट धुके मात्र होते अर्थात त्याची काही आम्हाला विशेष काळजी नव्हती. वाटाड्याच्या पायाखालचा रस्ता होता. पण चढण दमछाक करणारी होती. किल्ल्याची उंची जवळजवळ ४५०० फूट असावी आणि आम्ही समुद्रसपाटीपासून चढत होतो. वर पोहोचल्यावर सगळ्यांनी शिवाजी महाराज की जय अशा आरोळ्या ठोकल्या. कुठलाही मराठी माणूस दमून भागून गडाच्या माथ्यावर पोहोचला की महाराजांचा जयजयकार करतोच.

गड हिंडता हिंडता दुपार केव्हा सरली ते कळलेच नाही, पोरगावकरांच्या मुलाने आता मात्र परतण्याची घाई करण्यास सुरुवात केली. सारखी आरतीची वेळ झाली असे त्याने पालुपद लावले होते. कसली असे विचारल्यावर म्हणाला ‘‘नालाची आरती. आम्हीही काही जास्त लक्ष दिले नाही. दमलो होतो व जाम भूक लागली होती. चटाचट पावले उचलत आम्ही पोरगावकरच्या पोराच्या आधी खाली पोहोचलो. पाऊस पूर्णपणे थांबला होता. तिन्हीसांजेला वृक्ष जास्त गडद दिसू लागले. मावळतीकडे आकाशात धुरकट ढगातून नारिंगी रंगाची लकेर दिसू लागली. खोपटात पोहोचलो तेव्हा आरतीची तयारी जय्यत सुरू होती. पोरगावकराचे हॉटेल एका पिंपळाच्या झाडाच्या बुंध्याभोवती बांधलेले होते. त्याच बुंध्यावर एक लाकडी देवघर ठोकून बसवले होते व त्या देवघरात एक नाल ठोकला होता. त्याला फुले हार वाहिलेले दिसत होते. तेवढ्यात पोरगावकरांचे सगळे कुटुंबीय आरतीला जमा झाले. आरत्या नेहमीच्याच होत्या पण पूजा मात्र त्या घोड्याच्या नालाची होती. आम्हाला काही समजेना. सगळी पूजा व पोटपूजा उरकल्यावर आम्ही पोरगावकरांकडे हा विषय काढला.

‘‘ हंऽऽ त्याला फार मोठा इतिहास आहे पाव्हणं ! आम्ही मुळचे गारगोटीचे. आमचे सगळे पाव्हणे मंडळी वर देशावर असतात नव्ह का…हा घोड्याचा नाल आमच्याकडे वंशपरंपरागत चालत आला आहे. असे म्हणतात आमच्या पूर्वजांची आणि पहिल्या बाजीरावाची फार दोस्ती होती. उत्तरेत मोहिमेला जाण्याआधी बाजीराव येथे आले होते त्यावेळेस त्यांच्या घोड्याला नाल ठोकले तेव्हा हे जुने नाल आमच्या पूर्वजांनी जपून ठेवले. जे काही आहे ते रावसाहेबांचीच कृपा होती व आहे असे आम्ही मानतो. लोकं हसतात आम्हाला पण त्यो नाल आमचा जीव का प्राण आहे.’’

हे ऐकल्यावर मालोजी ताडकन उठला.

‘‘ पाटील आम्ही पण जे काही आहोत ते राऊसाहेबांमुळेच. आम्ही धारचे पवार.’’

मालोजीने असे म्हटल्यावर पाटलांनी मालोजीला मिठी मारली. त्या मिठीत आम्ही प्रथम त्याच्या डोळ्यात अश्रू पाहिले. नंतर रात्री बर्‍याच गप्पा झाल्या. पहाटे कसेबसे उठून आम्ही निघण्याची तयारी केली. पाटलीणबाईंनी फक्कड चहा बनवला तो घेऊन आम्ही निघणार तेवढ्यात पाटील आले.

‘‘ राजे थांबा. ! तुमच्या सारखी माणसे आता कुठे परत भेटायला ! नाम्या ! काढ रे तो नाल आणि दे साहेबाला’’

‘‘ अहो काय करतायसा !’’ पाटलीणबाई.

‘‘ तू गप्प बस गं जरा ! कोण आहेत माहिते हाय का तुला ? नाही ना? मग जर गप राव्हा की !’’

तेवढ्यात नाम्याने नाल काढला व मस्तकाला लावला. आम्हाला वाटलं तो आता रडणार ! पण तेवढ्यात पाटलांनी तो नाल त्याच्या हातातून घेतला. खाली ठेवला व त्याला साष्टांग नमस्कार घातला.

‘‘ घ्या राजे आमच्या दिलाचा तुकडा तुम्हाला देतूय ! तुमच्याकडंच शोभल तो !’’

असे म्हणून त्यांनी मान फिरवली. आता राजे काय करतात याची आम्ही वाट पाहू लागलो. तो सगळा प्रकार पाहून मालोजीने पाटलांना मिठी मारली व दुसर्‍यांदा टिपे गाळली. खिशातून त्यांनी शंभराच्या दहा नोटा काढल्या व पाटलांच्या हातात कोंबल्या.

‘‘ आवो काय , काय करताय काय तुम्ही राजे? हीच किंमत केली काय आमची?’’

‘‘ असू दे पाटील ! आम्ही असे रिकाम्या हाताने नाही जाऊ शकत.’’

मालोजीराजेंचा घराण्याचा अभिमान जागा झाला. आम्हालाही साक्षात धारचे पवार बोलत आहेत असा भास झाला. वातावरण भारून गेले होते. पाटलांचा निरोप घेऊन आम्ही सायकली काढल्या व नांदोसचा रस्ता पकडला. रस्त्यात कोणी कोणाशी फारसे बोलत नव्हते. घडलेल्या प्रसंगाने सगळेजण बहुधा भारावून गेले होते. संध्याकाळी नितीनचे (ज्यांच्या घरी उतरलो होतो त्यांचे) दाजी आले.

‘‘ कशी काय झाली सायकलची ट्रीप ?’’

‘‘ दाजी मस्तच हो !’ काय गड का काय…. फारच भारी. आणि…’’ मालोजी

‘‘ मग काय नाल मिळाला की नाही?’’ दाजी हसत हसत म्हणाले. आम्ही सगळे एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो.

‘‘ मी तुम्हाला कालच सांगणार होतो पण पोस्टातून यायला उशीर झाला ना मग तसाच घरी गेलो.’’

कोणाला काय बोलावे हेच कळेना. थोड्याच वेळात सगळे जण खो खो हसत सुटले. थोड्या वेळाने त्या हास्यस्फोटात मालोजीही सामील झाला. पण त्याचा चेहरा पडलेला दिसला. दुसऱ्याच दिवशी मालोजी दाजींना घेऊन स्पेशल रिक्षा करून नारूरला सकाळी सकाळी पोहोचला. हजार रुपये म्हणजे आमची वर्षाची वर्षांची फी होती त्या काळी. रविवार होता. किल्ल्याला जाण्यासाठी रग्गड गर्दी होती. हवा मस्त होती. झाडाच्या बुंध्याभोवती पंधराएक जण तरी जमले होते. मधे पाटील उभे राहून नालावर फुलांचा ढीग वाहत होते. जमलेले सगळे आदराने नालाचे दर्शन घेऊन माथा टेकवत होते. पैसे फुले वाहत होते. दाजींनी मालोजीला जरा थांबण्याची खूण केली….सगळी गर्दी ओसरल्यावर मालोजी तावातावाने पुढे आला व त्याने पाटलाला खडसावून विचारले,

‘‘ पाटील तुम्ही मला कालच नाल दिला ना? मग आता हा कुठला आला ?’’ माझे पैसे परत द्या.

‘‘ बसा राजे ! शांत व्हा ! वाईच च्या घ्या. राजे बाजीरावाच्या घोड्याला काय फकस्त योकच नाल मारला व्हता की काय ? आणि त्याच्याकडे काय फकस्त योकच घोडा होता ? माझ्याकडे बाजीरावाच्या घोड्याचे पेटी भर नाल पडले हायती. दावू का?’’

मालोजीच्या डोळ्यात त्यावेळी मला वाटते तिसर्‍यांदा अश्रू तरळले असणार…. दाजी काही बोलले नाहीत, पण मला खात्री आहे मालोजीला तो फसला म्हणून रडू आले नसणार.

पाटलांनी इतिहासाला इतक्या हीन पातळीवर नेऊन ठेवल्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी आले असणार….

लेखक : जयंत कुलकर्णी.
सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. सत्य घटनेवर आधारित. जागा, पात्रे, सर्व काल्पनिक.
ता. क. दाजींनी नंतर नऊशे रुपये वसूल केले ते लिहिण्यास विसरलोच.

Posted in कथा | 1 Comment

फकीर.

fakir

फकीर

जॅक्सन म्हणजे एक वाट चुकलेला फकीर होता. वाहवत जाणे हा त्याचा स्थायीभाव होता असं म्हटलं तरी चालेल. एकदा का एखाद्या गोष्टीच्या मागे लागला की परत मागे फिरणे त्याच्या स्वभावातच नव्हते. ‘‘जॅक्सन’’ याच नावाने त्याला सर्व ओळखत. आगा ना पिछा. बाजारात सुद्धा ‘जॅक्सन’ याच नावाने ओळखला जाई. ना त्याला कोणी जॅक्सन साहेब म्हणून हाक मारीत ना त्याचे पूर्ण नाव कोणाला माहीत होते. पण सगळ्यांना त्याच्याबाबतीत एक गोष्ट माहीत होती ती म्हणजे तो एक इंग्रज होता…वाट चुकलेला साहेब !

त्याच्या तुलनेने चांगल्या दिवसात त्याने दोन उन्हाळे कलकत्त्यात एका नाच गाणे करणार्‍या तद्दन भिकार संगीत बारी बरोबर काढले होते. तो एक उत्कृष्ट नकलाकार होता व असे म्हणतात की त्याच्या नकला पाहून देशी लोकही गडाबडा लोळत. गंभीर चेहर्‍याने म्हटलेली त्याची विनोदी गाणी त्या काळात कलकत्त्यात बर्‍यापैकी लोकप्रिय होती. दारूने झिंगलेला असतानाही, म्हणजे बहुतेक वेळा तो झिंगलेलाच असायचा, तो आपला चेहरा गंभीर ठेवू शकत असे. पण एक दिवस कलकत्याच्या चायना टाऊनमधील एका हॉटेलच्या स्टेजवर दारू पिऊन त्याने भयंकर गोंधळ घातला. त्याला आवरायला व तेथून हाकलून देण्यास तेव्हा सात आठ माणसे लागली होती. कसे कोणास ठाऊक त्याच्या डोक्यात तो एक नाचणारा फकीर आहे असे घुसले होते व त्याच समजुतीत तो त्या हॉटेलच्या व्यवस्थापकाच्या भोवती फेर धरून नाचत नाचत, शेवटी दमून रस्त्यावर एका दिव्याच्या खांबाखाली पडलेला आढळला. त्या तेथेच त्याची कलेची सेवा संपुष्टात आली असे म्हणायला हरकत नाही.

जॅक्सन वाहवतच होता. कलकत्त्याचा रेसकोर्सवर तो वेगवेगळ्या संदर्भात बऱ्याचजणांच्या परिचयाचा होता पण प्रत्येकजण त्याच्याकडे संशयानेच पाही हेही तितकेच खरे आहे. म्हणजे त्याच्या सर्व ओळखीच्या लोकांना त्याची टोपी घालून झाली होती. तुम्ही सर्व काळ सर्वांना फसवू शकत नाही. काही काळ त्याने सायकली चोरून त्या शहराच्या दुसऱ्या भागात भाड्याने देण्याचा धंदाही केला पण त्यामुळे तुरुंगात तीन महिने काढल्यावर त्याचा तो धंदाही बंद पडला. मग तो बॉम्बेला गेला. तेथे मोटर गॅरेजमधे काम करत असतानाच तो भडवेगिरीही करत होता असे म्हणतात. पण त्याला बॉम्बेही सोडावे लागले. दारू पिऊन एका सभ्य पारशी स्त्रीची छेडछाड करणाऱ्या गोर्‍या कळकट्ट कपडे परिधान केलेल्या एका माणसाला पोलीस शोधत असतानाच त्यांना त्याचे शेवटचे नाव जॅक्सन आहे हे कळल्यावर त्यांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. त्यावेळीही तो बाजारात हात भट्टीची पिऊन झिंगून फिरत होता. बहुधा नेटीव्ह वाटावे म्हणून त्याने वेषांतर केले असावे. पण तो निसटला तो निसटलाच. त्याच्यावर सरकारने जाहीर केलेले बक्षिस नंतर कोणी मिळवू शकले नाही व त्याच्याबद्दल नंतर कोणी काही साधे ऐकलेही नाही. गायबच झाला तो !


जॅक्सनच्या आयुष्यात त्याने घेतलेला सगळ्यात महत्त्वाचं निर्णय त्याने त्यावेळी घेतला . तो फकीर झाला.

बहुधा कलकत्त्यात त्या हॉटेलमधे त्याला दारूच्या धुंदीत जो भ्रम झाला होता ते त्याच्या मनात कुठेतरी खोलवर त्याच्या मेंदूने जपून ठेवले असावे. त्याला स्थानिक भाषा तर येतच असत, शिवाय लोकांना गुंगवणारं त्याचे बोलणे त्याच्या साथीला होतेच. त्याला हेही पक्के माहीत होते की हिंदुस्थानात एकदा भगवे कपडे चढवले की तीन वेळच्या जेवणाचे मरण नसते. त्यामुळे दिवसा तीन वेळा जेवण व रात्री हातभट्टीच्या गुत्त्यावर दारू याची त्याला कधीच कमी पडली नाही. तुम्हाला वाटेल दारूच्या धुंदीत त्याने त्याचे खरे स्वरूप कोणा पुढे उघड कसे केले नाही पण त्या मागचे खरे रहस्य हे आहे की तो जेवढी जास्त दारू पीत असे तेवढाच त्याचा तो फकीर असल्याचा भ्रम दृढ होत असे. तो सर्वत्र नाचत, गाणी म्हणत संचार करत असे. फकीर आणि तत्सम मंडळी थोडीशी चक्रम असतातच त्यामुळे याच्या नाचण्याकडे लोक कौतुकाने पहात. किंबहुना तो त्या नाचण्यामुळेच प्रसिद्ध झाला असं म्हणायला लागेल. त्याने केसांच्या जटा वाढवल्या व त्याला हिना चोपडलं. अंगावर एक भगवे कापड व गळ्यात रुद्राक्षांची माळ असा त्याचा अवतार असे. काहीच दिवसात त्याची दाढी ही भरपूर वाढली जी तांबूस रंगाची होती. हे कमी होते की काय म्हणून तो सन्याशांसारखे अंगावर भस्माचे पट्टे ओढत असे. जॅक्सनला आता कोणी ओळखणे शक्यच नव्हते. त्याला आता खऱ्याखुऱ्या फकीराप्रमाणे नावही राहिले नव्हते. बहुधा त्यालाही त्याचे नाव आठवत होते की नाही कोणास ठाऊक. त्याच्या या आयुष्यात त्याने बरीच भ्रमंती केली व बरेच काही पाहिले असणार. अर्थात त्याबद्दल कोणालाच काही माहीत नाहीये हेही ओघाने आलेच. हळूहळू त्याच्या मनात इतर गोर्‍यांविषयी कसलेही प्रेम राहिले नाही. उलट त्याला जे काही अनुभव आले होते त्याबद्दल त्याच्या मनात या स्वार्थी जमातीविषयी थोडासा रागच होता असे म्हणायला हरकत नाही. म्हणजे तसे तो त्याच्या देशी मित्रांना बोलूनही दाखवायचा. अर्थात ओळख न देता.

पण आडवाटेवर, देवळात, मठांमधे त्याला सगळे ओळखत. तो आता अट्टल गांजेकस झाला. सराईतासारखा तो हुक्का ओढे व इतर फकिरांसारखा तोंडातल्या तोंडात पुटपुटत जमिनीवर थुंके. त्याने मांसाहार सोडला. गावोगावी भटकताना गावकरी जे अन्न धान्य देतील त्यावर तो गुजराण करत असे. हळूहळू त्याची दारू कमी झाली. काहीजण म्हणतात त्याची दारू पूर्णपणे सुटलीच. त्याच्या बदललेल्या खाण्यापिण्याच्या सवयींनी त्याची अंगकाठी सडसडीत झाली व चेहर्‍यावर तेज आले. त्याच्या एवढा लंबूटांग फकीर आता अख्ख्या हिंदुस्थानात होता की नाही याची शंकाच आहे. या नाचणार्‍या फकीराचे चालणे बोलणे आता लोकांवर प्रभाव पाडू लागले. हजारो गावात ज्या ठिकाणी तो फेरफटका मारत असे तेथे जनता त्याला फकीर म्हणून मानू लागले.

इंग्रजांच्या इतिहासात त्याच्या प्रवासाची कसलीही नोंद नाही नाहीतर खरं म्हणजे सर्व गोर्‍या माणसांच्या हालचालींच्या नोंदी ठेवल्या जातात. पण ही दंगलीची घटना घडली तेव्हा तो बहुधा विजापूरला असावा. हे विजापूर म्हणजे बिहार मधले. कर्नाटक मधले नाही.रामलीलेचे दिवस होते. सगळीकडे उत्साहाचे वातावरण भरून राहिले होते. नाच गाणे, नाटके यांना नुसता ऊत आला होता. रंगीबेरंगी कपडे करून सगळी जनता रस्त्यावर आली होती. नदीच्या पलीकडे असलेल्या देवळाच्या पायर्‍यांवर माणसांची नुसती गिचमीड झाली होती. भगवे कपडे घातलेले नदीत स्नान करण्यास उतरले होते तर स्त्रिया निळे कपडे करून पाण्यात उतरल्या होत्या. चट्टेपट्टे असलेले रंगीबेरंगी झेंडे घराघरांवर वार्‍यावर फडफडत होते. शहराच्या अरुंद रस्त्यावर दिवसभर व रात्री नुसती गर्दीच गर्दी. बाजार फुलला होता. हे सगळे आपल्या फकीराने पाहिले असणार. त्यावेळेस तो एका गल्लीच्या कोपर्‍यावर निवांत बसून दोन साधूंच्या गप्पा ऐकत बसला होता. त्या दोन साधूंनी डोक्याचा गोटा केला होता व अंगावर केशरी रंगाच्या कफन्या चढवल्या होत्या. त्यांच्या बोलण्यावरून त्याला एक गोष्ट मात्र लक्षात आली. ती म्हणजे त्यांच्यात व शहरात इंग्रजांविरुद्ध बराच असंतोष खदखदतोय. कमिशनरने रामलीलाची मिरवणूक मुसलमान वस्तीतून नेण्यास बंदी घातली होती त्यामुळे हा भडका उडाला होता. त्या दोन साधूंनी त्या मशीदीला शिव्या दिल्या, सरकारला शिव्या दिल्या व वाढत्या बंदोबस्ताबाबत चिंता प्रदर्शित केली. मेळाव्यात बर्‍याच महत्त्वाच्या नेत्यांची भाषणे होणार होती. त्यातीलच एक होते बाबू गोपी नाथ. सरकारला बाबू गोपी नाथांची भीती वाटायची. मागच्या वर्षी खासपूरची दंगल त्यांच्या भाषणानंतर भडकली होती ज्यात अनेक माणसांचे मुडदे पडले होते. या हिंदू मुसलमान दंगलीत गोर्‍या पोलिसांचा नाहक बळी जायचा पण हे सगळे जॅक्सनला माहीत होते. दोन्हीही जमातीची जनता इंग्रजांचा तेवढाच द्वेष करायची याची जॅक्सनला कल्पना होती. अशा अफवांकडे किंवा गप्पांकडे तो नेहमीच दुर्लक्ष करायचा. रोज मरे त्याला कोण रडे ? पण यावेळी बाजारात त्याला काहीतरी नवीनच ऐकू आले. वातावरण तंग होते आणि हिंदू मुसलमान एकत्र येणार…असे काहीतरी नवीनच त्याला ऐकू येते होते. खासपूरमधून २०० मुसलमान गाझी येणार अशी अफवा ही त्याने ऐकली.

त्या वर्षी विजापूरच्या यात्रेला उच्चांकी गर्दी झाली होती. जत्रेचे सगळे खेळ लागले होते व मुले त्याचा आनंद लुटत होती. जादूगार, नाच करणार्‍या मुली नाचून शौकिनांचे मनोरंजन करत होत्या तर एका व्यासपीठावर वाराणशीच्या कुठल्यातरी कंपनीचे नाटक चालले होते. एका कोपर्‍यात चेहर्‍यावरील एकही रेष न बदलणारा फकीर बसला होता. हे सगळे असले तरी संध्याकाळी होणारी हिंदू मुसलमान नेत्यांची भाषणे हेच खरे आकर्षण होते.

संध्याकाळी गोपीनाथ बाबूंनी भाषणास सुरुवात केली आणि तेथे एकदम शांतता पसरली. त्या शांततेचा फायदा घेऊन त्यांनी आपली जहाल मते मांडण्यास सुरुवात केली. त्यात इंग्रज मुसलमान व हिंदूंना कसे आपापसात लढवतात इ.इ. असे अनेक मुद्दे त्यांनी आक्रमकपणे मांडले. त्यानंतर मात्र जत्रेतील गर्दीने आवरते घेतले. आता फक्त भाषणे ऐकायला थांबलेले लोकच मैदानात उरले. हळूहळू जमलेल्या गर्दीत कुजबूज वाढू लागली. थोड्याच वेळात भाषणे देणाऱ्यांचा उद्देश सफल झाला. त्यांचा त्या गर्दी वरील ताबा सुटला. थोड्याच वेळात रस्ते ओस पडले. लोकांनी घराची दारे लावून घेतली. विजापूरला त्या काळी ब्रिटिश सैन्य नसायचे. तेथे फक्त काही इंग्रजी अधिकारी, त्यांचे क्लब हाउस, टेनिस क्लब एवढ्याच महत्त्वाच्या जागा होत्या. त्यावेळी इंग्रज स्त्रिया त्या क्लबात टेनिस खेळत होत्या तर बाजूलाच पुरूष मंडळी निवांतपणे मद्याचे घोट घेत बसले होते.

पुढे काय होणार आहे हे फकिराच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही. त्याच्या मनात सरकार बद्दल काडीचाही आदर नव्हता व त्याने स्वत:ला त्याच्या बांधवांपासून पूर्णपणे तोडले होते. पण रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला असणार्‍या टेनिस क्लबचा व तेथील स्त्रियांचा विचार त्याच्या मनात प्रथम आला. बेफाम झालेली गर्दी त्याच रस्त्याने सरळ चालली होती. त्यांच्या डोक्यात आता फक्त एकच लक्ष होते आणि ते म्हणजे टेनिस क्लब. त्याच क्षणी फकिराच्या मनात एक विचार चमकला आणि तो उठला. जे काही करायचे ते आत्ताच करायला हवे होते.

बेफाम झालेली माणसांनी तेथे आलेल्या पोलिसांना केव्हाच खाली लोळवले होते व ते त्यांना त्यांच्याच लाठ्यांनी मारहाण करत होते. जवळच असलेले दारूचे दुकान फोडले गेले व तेथे एकच गर्दी उसळली. थोड्याच क्षणात तेथे ज्वाळा दिसू लागल्या. आग लागली आणि भडकली, पसरली. फकीराने तेथेच पडलेल्या दोन बाटल्या रिचवल्या व पळण्यास सुरुवात केली. दारूने जळजळत त्याच्या घशात आग ओतली व डोक्यात धुंदी. आता त्याचा आत्मविश्वास अतोनात वाढला. पुढच्या चौकात त्याला त्या गर्दी समोर जाऊन उभे रहायचे होते. बस्स… एकदा का तो तेथे पोहोचला की मग पुढचे सगळे त्याच्या हातात होते. त्याच्या बोलण्याने त्या गर्दीवर तो नियंत्रण आणू शकला असता, म्हणजे असे त्याला वाटत होते.

पुढच्याच क्षणी त्याने उडी मारून किंचाळत शेजारच्या माणसाच्या हातातील तलवार हिसकावून घेतली. तलवार उंचावत, किंचाळत तो नाचू लागला. जवळच पडलेल्या एका पोलिसाच्या प्रेताला लाथ मारून त्याने सुडाची मागणी केली. तलवार उंचावत, गरागरा फिरवत त्याने सगळ्यांना त्याच्या मागे येण्याचे आवाहन केले. जमावाने त्या हैदोस घालणाऱ्या फकीराला पाहिले मात्र दहा पंधरा जण त्याच्या मागे जाऊ लागले. त्यांच्या मागे अजून शंभर व त्याच्या मागे अजून… तलवार उंचावत तो किंचाळत, नाचत, भरभर पळू लागला. त्याच्यामागे बेफाम झालेला जमाव हातात मिळेल ती वस्तू घेऊन साहेबाच्या खुनाची मागणी करू लागला. फकिराच्या मनात फक्त एकाच गोष्टीची काळजी होती …ते उजवीकडे वळतील का ? आता ते चौकात आले. चौकात त्याने त्यांच्याकडे तोंड केले व तो जोरजोरात ओरडू लागला. ते ऐकून जमाच आरडाओरडा करत त्याच्या मागे मागे जाऊ लागला. जमाव माणसाच्या शरीरासारखा वागतो हे त्या फकीराला चांगले माहीत होते. जेथे मेंदू नेईल तेथेच शरीर जाते.

त्याच्या अंगावर धुळीची पुटे चढली होती व अंग रक्ताने माखले होते. त्याच्या डोळ्यात रक्त उतरले होते. जमावाच्या सूड घेण्याच्या आरोळ्यांनी त्यालाच उन्माद चढला. त्याने त्या जमावाला सरळ ट्रेझरीच्या दिशेने नेले. पोलिसांची आलेली कुमक आता त्यांच्या मागे होती व समोर हातात बंदुका घेतलेले ट्रेझरीचे रक्षक. ट्रेझरीचे रक्षण करणार्‍या पोलिसांनी जमाव जवळ येईपर्यंत त्यांच्या बंदुका रोखून धरल्या. जमाव जवळ आल्यावर त्यांची बोटे चापाभोवती आवळली गेली. गोळ्यांची एक फैर उडाली.

नाचणार्‍या फकीराने हवेत एकच गिरकी घेतली व तो खाली धुळीत निपचित पडला…

जॉन आयटन.
स्वैर अनुवाद : जयंत कुलकर्णी.

Posted in कथा | Leave a comment

एका वेड्याची रोजनिशी.

A_madmans_diary_work_by_lu_xun

एका वेड्याची रोजनिशी.

ऑक्टोबर ३

आज एक विचित्र गोष्ट घडली. आज जरा उशीराच उठलो. सावित्रीबाई माझी न्याहरी घेऊन आल्या तेव्हा मी त्यांना किती उशीर झालाय हे विचारले. १० वाजून गेलेत हे ऐकल्यावर मी घाईघाईने आवरले.

खरं सांगायचं तर आज ऑफिसला जायची इच्छाच नव्हती कारण तिथे जाऊन साहेबाचा कडू औषध घेतल्यासारखा चेहरा पहावा लागला असता. मला तो नेहमीच म्हणायचा, “हे बघ मित्रा तुझे डोकं जरा तपासून घे. मला वाटतं त्यात काहीतरी बिघाड झालाय. तू नेहमीच कुठल्यातरी भुताने पछाडल्यासारखा गडबडीत असतोस. शिवाय तुला एखाद्या प्रकरणाचा संक्षिप्त अहवाल दे म्हटले तर तू त्यात इतका गोंधळ घालून ठेवतोस की परमेश्वराच्या बापालाही त्यातून काही समजणार नाही याची मला खात्री आहे. पत्रावर तू कधी समास सोडत नाहीस ना तारीख किंवा क्रमांक.” नालायक लंबू साला. त्याला माझा हेवा वाटतो हेच खरं मी मोठ्या साहेबाच्या केबिनमधे बसतो ना ! शिवाय मी त्यांची पेनं दुरुस्त करून देतो म्हणून त्यांची मर्जी आहे माझ्यावर ! थोडक्यात काय मी ऑफिसला गेलोच नसतो. पण जरा उचल घ्यायची होती म्हणून गेलो.

आमचा साहेब म्हणजे एक हलकट माणूस आहे. त्याच्याकडून पगारापोटी उचल घ्यायची म्हणजे त्याचा चेहरा आकाश कोसळल्यासारखा होतो. जणू काय साल्याच्या खिशातूनच पैसे देतोय. कितीही विनंत्या करा, पाया पडा, अडचणींचा पाढा वाचा पण याला दया येईल तर शपथ. ऑफिसमधे शूर असणारा हा साहेब घरी मात्र बायकोच्या आणि स्वयंपाकीणीच्या ताटाखालचे मांजर आहे. सार्‍या जगाला माहीत आहे.

बँकेत आमच्या खात्यात काम करण्यात काय अर्थ आहे हे मला अजून उमगलेले नाही. आमच्या खात्यात हिरवळच नाही. कायदा विभागाची गोष्ट वेगळी आहे. तेथे एका कोपर्‍यात एक अजागळ माणूस एका डुगडुगणार्‍या टेबलावर सतत काहीतरी खरडत असतो. समोर खरकटा कॉफीचा मग असतो. इतका घाण की त्यांच्यावर मला नेहमीच थुंकावेसे वाटते. पण साल्याचे फार्महाउस बघा एकदा ! कमी किमतीची भेटवस्तू स्वीकारणे तो कमीपणाचे समजतो. “ हे बाहेर कोणाला तरी द्या असे स्पष्टच सांगतो तो.” दहा हजाराच्या खाली तो कुठलीही भेट स्वीकारत नाही. पण दिसायला कसा अगदी साधा भोळा आहे. बोलणेही अगदी मृदू. मला पेन मागतानाही इतक्या अदबीने मागतो. पण कर्जदाराचे पाय त्याच्या समोर थरथर कापतात हे मी स्वत: पाहिलेय.

आमच्या ऑफिसमधे सगळे कसे व्यवस्थित असते. इतर सरकारी खात्यांच्या कार्यालयांसारखा ढिसाळ कारभार नसतो. टेबले, खुर्च्या अगदी व्यवस्थित चकचकीत असतात. आणि खरंच असे वातावरण नसते तर मी केव्हाच राजीनामा साहेबाच्या तोंडावर फेकला असता.

मी माझा जुना शर्ट चढवला व छत्री घेऊन रस्त्यावर आलो. पावसाची रिपरिप चालू होती. रस्त्यावर गर्दी नव्हती. काही बायका डोक्यावर पदर घेऊन रस्ता पार करायचा प्रयत्न करीत होत्या. थोड्याफार छत्र्या ही दिसत होत्या. ऑफिसला जाणार्‍यांची गडबड दिसत नव्हती.तेवढ्यात मला एक ऑफिसला जाणारा माणूस दिसला. मी मनात म्हटले, “ पुढे चालणार्‍या तरुणीच्या नितंबामागे धावणारा तू…. इतरांसारखाच आहेस. स्त्रिलंपट !

बाबांच्या आश्रमातही बायकांच्या मागे लागतात असे माझ्या कानावर आले आहेकाय खरं काय खोटं काय माहीत..! मी असा विचारात बुडलेला असतानाच मी एक कार एका दुकानासमोर थांबलेली पाहिली. मी ती लगेचच ओळखली. बँकेच्या डायरेक्टरची कार आणि ‘त्यातून उतरणारी ती मुलगी त्याची मुलगी असणार.’ मी मनाशी म्हटले.

मी कारण नसताना एका खांबाआड लपलो. ड्रायव्हरने दार उघडले आणि पिंजर्‍यातून एखादी चिमणी चिवचिवत बाहेर पडावी तशी ती डोळ्यांच्या पापण्या फडफडवत, चिवचिवत बाहेर पडली. ती चालताना मोहकपणे डावीकडे, उजवीकडे मान वेळावत पहात होतीतिला पाहताना माझ्यावर एखादी वीज पडावी अशी माझी अवस्था झाली. खलास झालो मीपण आश्रमातील बाबांची एक शिष्या मला याहूनही सुंदर भासायची हे खरं

पण या असल्या हवेत ही बाहेर काय करतेय? आणि ते म्हणतात सुंदर मुली आपल्या चेहर्‍याची काळजी घेतातम्हणजे जाहिरातीत तरी असेच दाखवतात..

तिने अर्थातच मला ओळखले नाही. मी छत्री समोर करून स्वत:ला त्यामागे लपवले पण तेही मला जास्त वेळ करता येईना कारण छत्रीला भोके पडली होती. सध्या किती मस्त रंगीबेरंगी छत्र्या असतात नाहीतर माझीकळकट्ट !

तिच्या छोट्या कुत्र्याला ती आत घेऊन जाऊ शकत नसल्यामुळे तो बाहेरच राहिला. मला हा कुत्रा माहीत आहे. त्याचे नाव मन्या. बहुतेक मनोहरवरून ठेवले असावे नाव. तेवढ्यात मला आवाज ऐकू आला, “मन्या कसा आहेस?” मी चमकून इकडे तिकडे पाहिले. कोण बोलले ते? दोन बायका एका छत्रीतून चालल्या होत्या. त्यातील एक म्हातारी होती तर एक तरुण. त्यांनी मला पार केले, तेवढ्यात मला परत तोच आवाज ऐकू आला, “ लाज वाटायला पाहिजे तुला मन्या.” कोण बोलतय ते.. तेवढ्यात मन्या मला त्या स्त्रियांच्या कुत्रीच्या मागे हुंगत चाललेला मला दिसला. अरे देवामला चढलेली तर नाही ना? दारु प्यायल्यावर हे असे भास मला नेहमीच होतात.

नाही.. चुकती आहेस तू मने..” मन्याने उत्तर दिलेले मला स्पष्ट ऐकू आले. “ मी भो..भो.. गुर्रखूप आजारी होतो.” असामान्य कुत्रा ! त्याला मनुष्यप्राण्यासारखे बोलताना पाहून खरं सांगतो मी अवाकच झालो. पण जरा विचार केल्यावर मला बसलेला धक्का ओसरला. जगात अशी अनेक आश्‍चर्य आहेत. मधे मी इंग्लंडमधे डॉल्फिन पाण्याबाहेर डोकं काढून कुठल्यातरी भाषेत एकमेकांशी संवाद साधतात असे ऐकले होते. ती भाषा अजून शास्त्रज्ञांना उलगडली नाही. मधे तर असेही वाचले होते की टिंबक्टूमधे दोन गायी दुकानात शिरल्या आणि त्यांनी चहाची पावडर मागितली. हे जाऊ देत. पुढे मन्या काय म्हणाला ते विशेष होते, “मने, मी मधे तुला एक पत्र लिहिले होते. टॉमीने दिले नाही का तुला?”

बाबांच्या आश्रमात प्राण्यांची भाषा समजणारे व त्याच्या आधाराने भविष्य वर्तवणारे काहीजण आहेत पण हे म्हणजे फार म्हणजे फारच भारी होते. पत्र लिहिणारा कुत्रा मला जर कोणी दाखवला तर मी माझा एका महिन्याचा पगार हारीन. गेले काही दिवस फक्त मलाच अशी विद्या प्राप्त झाली आहे. मला जे ऐकू येते ते इतरांना येत नाही याची मला खात्री आहे. केव्हापासून बाबा मला बँक सोडून आश्रमात ये म्हणून आग्रह करत आहेत पण मला बँक सोडवत नाही. कारण एकच, आश्रमाबद्दल माझ्या कानावर कधी कधी विचित्र गोष्टी पडतात.

मी विचार केला या कुत्र्याच्या मागे जाऊन याचा एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाकावा. मी छत्री उघडली व त्या दोन बायकांच्या मागे मागे गेलो. टिळक रस्त्यावरून उजवीकडे वळल्या व कॉजवेपाशी एका मोठ्या वाड्यासमोर थांबल्या. हा वाडा मला माहीत आहे. हा पेशव्यांचे सरदार साठे यांचा वाडा. या वाड्याचा मालक अमानवी श्रीमंत आहे. त्याच्या गाड्या, त्याच्याकडे झडणार्‍या मेजवान्या, त्याचे स्वयंपाकी, त्याचा जेवणाचा हॉल….हे सगळे विषय चवीने चघळले जातात त्या गल्लीत. आमच्या बँकेतील काही अधिकारी तर येथे रोज संध्याकाळी पडलेले असतात म्हणेहा साठे बाबांचा शिष्य आहे म्हणे अर्थातच मी त्याचा कधीच फायदा घेतला नाही. मला पटतच नाही ते. माझा एक मित्र तेथे नियमित सतार वाजवायला जातोत्यामुळे मला त्या वाड्याची बरीच माहिती आहे.

त्या बायका वाड्यात दुसर्‍या मजल्यावर गेल्या. ठीक आहे मी कुठल्या घरात त्या गेल्या हे नीट पाहून ठेवले. ‘नंतर याचा छडा लावता येईल’ मी मनात म्हटले.

ऑक्टोबर ४

आज बुधवार. नेहमीप्रमाणे मी आज बँकेत गेलो. मी आज जरा लवकरच आलो. मला पेनं जमवायचा आणि दुरुस्त करण्याचा छंद आहे. लवकर आल्यावर मी खिशातून एक पेन काढले व ते बाथरूममधे जाऊन पाण्याखाली धरले व पाणी पुसण्यासाठी फडकं शोधू लागलो.

आमचा डायरेक्टर एक बुद्धिमान माणूस आहे. त्याची खोली पुस्तकांनी भरुन गेली आहे. ती जाडजूड अवघड विषयांवरची पुस्तके पाहूनच माझ्या सारख्या माणसाची छाती दडपून जाते. त्यात काही जर्मन व संस्कृत पुस्तकेही आहेत. त्याच्या चेहर्‍याकडे पहा जरा….त्याच्या डोळ्यात विद्वत्तेची झाक दिसली नाही तर माझे नावत्याच्या तोंडातून आजवर मी एकही फालतू शब्द बाहेर पडताना ऐकलेला नाही. फक्त जेव्हा तो माझ्या हातात एखादी फाईल देतो तेव्हा मात्र तो “ काय विचित्र हवा पडली आहे आज” हे वाक्य न विसरता उच्चारतो. याचा अर्थ मला अजून समजायचा आहे.

पण तो आमच्या कॅटलक्‍लासमधे मोडत नाही हेच खरं. मला माहीत आहे मी त्याला आवडतो.. आता त्याच्या मुलीलाही तसे वाटले तरकाय मूर्खपणा लावलाय..त्यावर न बोललेलं बरं. मीही काही बंगाली लेखकांची पुस्तके वाचली आहेत. किती बावळट असतात हे बंगाली. यांचा एकदा मला समाचार घेतलाच पाहिजे. मी एका कानडी लेखकाने केलेले चेंडूचे वर्णन वाचले आहे. फारच मस्त लिहिलय त्याने.

तेवढ्यात माझ्या लक्षात आले की डायरेक्टरसाहेब अजून ऑफिसमधे आलेले नाहीत. साडेबारा वाजले. मी त्यांची वाट पहात बसलो आणि साधारणतः: दीड वाजता कुठलेही पेन वर्णन करू शकणार नाही अशी घटना घडली. दार उघडले. मला वाटले साहेबच आले असणार. मी हातातील कागद घेऊन ताडकन खुर्चीतून उठलो. तेवढ्यात उघड्या दारातून ती आत आली. हो तीच ! अरे देवाकाय सुंदर साडी नेसली होती तिने. चंदनी रंगाच्या तिच्या साडीला चंदनाचा वास येत होता. सुंदर अतिसुंदर !

तिने मला अभिवादन केले. “ बाबा अजून आले नाहीत का ?” तिचा आवाज मला एखाद्या स्वर्गीय कोकिळेसारखा भासला मला. स्वर्गीय कोकिळा… “ हे सुंदरी माझ्यावर असे नजरेचे वार करू नकोस. मला मारायचेच असेल तर तुझ्या सुकुमार हातांनीच मला खतम कर” असे मला म्हणावेसे वाटले पण प्रत्यक्षात मी म्हणालो, “ नाही ते अजून आलेले नाहीत.

तिने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला व पुस्तकांवर नजर फिरवली. तेवढ्यात तिचा रुमाल खाली गुळगुळीत फरशीवर पडला, का टाकला कोणास ठाऊक. मी तो उचलण्यासाठी पुढे गेलो पण घसरून नाकावर आपटलो. मी कसाबसा तो हातरूमाल उचलला. त्याच्या स्पर्शानेच माझ्या अंगावर रोमांच उठले. तिने माझे आभार मानले. माझ्याकडे पाहून ती इतकी गोड हसली की तिचे मधाळ ओठ तिच्या हास्यात विरघळले जणू. मग ती बाहेर गेली. मी स्वप्नवत अवस्थेत तेथेच एक तासभर बसलो. तेवढ्यात एका झाडूवाल्याने आत येऊन मला माझ्या तंद्रीतून जागे केले. नालायक कुठचा…‘ बुआ, साहेब बाहेर पडलेत आता तुम्ही घरी जाऊ शकता…”

मला ही आगाऊ मंडळी अगदी सहन होत नाहीत. एकदा तर एका बसमधे एकाने मला त्याच्या कळकट्ट हाताने मला तंबाखू मळून खाण्याचा आग्रह केला होता. आता त्याला कसे सांगू मी बँकेत एक अधिकारी आहे आणि घरंदाज आहे. आम्ही घरंदाज आहोत असे आमचे बाबा म्हणतात. मधे एकदा पोलीस आश्रमात आले होते, तेव्हाही तो पोलीस असेच म्हणाला होता, ‘ तुमच्यासारख्या घरंदाज माणसांकडून ही अपेक्षा नव्हती.” आता पोलीस म्हणाला म्हणजे आमचे घराणे घरंदाज असणारचनाही का? त्याला चांगलेच खडसावेसे वाटले मला..

पण त्यावेळी मात्र मी छत्री घेऊन डायरेक्टरच्या घराकडे घाईघाईने मोर्चा वळवला. तेथे बराच वेळ ती बाहेर येईल म्हणून वाट पाहिली. नंतर घरी येऊन पलंगावर बराच वेळ पडून राहिलो. एकदम उठलो आणि एक कविता खरडली.

तुला पाहिले
जन्माची ओळख पटली
माझ्या अस्तित्वालाच अर्थ उरला नाही
कसे जगू तुझ्याशिवाय प्रिये..

नंतर आठवले की ती कविता एका प्रसिद्ध कवीच्या कवितेची भ्रष्ट नक्कल आहे. फाडून टाकली.

संध्याकाळी मी परत एकदा डायरेक्टरच्या घरावर एक चक्कर मारली. ती बाहेर येईल या आशेने मी तेथे बराच वेळ रेंगाळलो. मला फक्त तिला एकदाच पहायचे होते. पण ती काही बाहेर आली नाही.

६ नोव्हेंबर

आमच्या हेडक्‍लार्कचे डोकं फिरलंय. मी ऑफिसमधे गेल्यागेल्या शिपायाने त्याचा मला बोलावले आहे हा निरोप दिला. मी टाकोटाक त्याच्या केबिनमधे गेलो. गेल्यागेल्या त्याने मला फैलावर घेतले, “ तुला वेड लागलंय का? नाही तुझ्या डोक्यात महमदी कल्पनांची कारंजी थुईथुई उडायला लागली आहेत म्हणून विचारतोय.”

नाही..का काय झालं?”

तुझ्या वयाचा तरी विचार कर आणि मग त्या मुलीच्या मागे लाग. तुला काय वाटले मला काही कळत नाही? ती कुठे आणि तू कुठे? तू एक फडतूस कारकुनही नाहीस. एक मोठे शून्य आहेस तू. आणि ते सुद्धा असले की ज्याने कुठल्याही आकड्यांची किंमत वाढणार नाही. तुझी एक दमडीची किंमत नाही. एकदा जरा आरशात पहा म्हणजे कळेल. व्यंगचित्रात सुद्धा चेहरे बरे दाखवतात असा तुझा चेहरा. तुझ्या डोक्यात असले विचार येतात तरी कुठून?”

नरकात खितपत पडोत त्याची पितरे आणि तो ! त्याचा स्वत:चा चेहरा डोस चिकटवलेल्या औषधाच्या बाटली सारखा दिसतो कारण बावळट त्याचे कुरळे केस मागे वळवतो तर कधी कपाळावर ओढतो. स्वत:ला फार हुशार समजतो साला. तो माझ्यावर का डूख धरून आहे हे मला चांगलेच माहीत आहे. डायरेक्टरची माझ्यावर मर्जी बसली आहे म्हणून जळतो माझ्यावर. बाकी काही नाही. पण मी कशाला त्याची पर्वा करू ? या हेडक्लार्क नावाच्या जनावराला एवढे महत्त्व का द्यायचे? गळ्यात सोन्याची साखळी आहे म्हणून, का चमकणारे बूट घालतो म्हणून. का चांगले टाय घालतो म्हणून ? अरे मी पण काही एखाद्या फडतूस हेडक्लार्कचा मुलगा नाही. माझे घर पाहिले नाहीस अजून. महाल आहे महाल. अर्थात माझ्या बापाचा आहे पण मी तेथेच राहतो ना. थोडे दिवस थांब. माझे वय आत्ताशी बेचाळीस आहे. मी नाही तुला मागे टाकले तर माझे नाव नाही सांगणार. मीही गळ्यात सोन्याची साखळी अडकवीन, महागडे कपडे घालेन व पायात चमकणारे बूट घालेन.

पण माझ्याकडे पैसे नाहीत. काय करू ? बापाकडे रग्गड पैसा आहे पण मला हात लावून देत नाही. म्हणे मी काही करत नाही. बँकेतील नोकरी टिकवली तरी खूप आहे. काय करायची आहे असली नोकरी ? पण आश्रमात नको जायला. भीती वाटते मला आश्रमाची. असो

थोडक्यात पैसे नाहीत

८ नोव्हेंबर

आज दस्तूरमधे इंग्लिश नाटकाला गेलो होतो. रशियन लेखकाचे हाउस ऑफ फूल्स हे कोणीतरी इंग्रजीमधे रुपांतर करून सादर केले होते. बरेच नट पारशी होते. कित्येक दिवसांनी पोट धरून हसलो. नाटक विनोदी आणि बोचरे आहे. मधून मधून गाणीही आहेत. व्यापारी कसे फसवतात, त्यांची मुले कशी व्यभिचारी आहेत व सभ्य माणसांबरोबर कशी उद्धट वागतात याचे चांगले चित्र उभे केले आहे. अर्थात व्यापाऱ्यांना काय नावे ठेवायची म्हणा ! आमचा बापही हेच करतो. व्यापारी मालात, पैशात फसवतात तर आमचा बाप शिष्यांच्या आत्म्यांना फसवून त्यांचे पैसे काढून घेतो. नुकतेच ऐकले की आमच्या बापाने सर्व शिष्यांना मठाची नवी इमारत बांधण्यासाठी पगाराच्या दोन टक्के रक्कम देणगी द्यावी असे आवाहन केले आहे. आणि ते मूर्ख लोक देतील याची मला खात्री आहे. आणि माझ्याकडे साधे नाटक पहायला पैसे नाहीत. बापाची जागा मिळाली तर मी रोज मठात नाटके लावेन आणि सगळ्यांना फुकट दाखवेन. पण बाप मेल्याशिवाय त्याची जागा मिळणार नाही आणि नंतरही त्याच्या शिष्यांनी दिली तर मिळणार. काहीतरी केले पाहिजेकाहीतरी शक्कल लढवायला पाहिजे

गंमत म्हणजे नाटकात टीकाकारांवर बोचरी टीका केली आहेम्हणे लेखकांच्या फक्त चुकाच काढतात. इतक्या की लेखकांना जनतेपुढे पदर पसरून रक्षणाची भीक मागावी लागतेअसे काहीतरी लिहिले होते त्यात. ही नवनाट्य चळवळीतील मंडळी कमाल लिहितात बुआ. मला त्यांची नाटके फार आवडतात. सहजा सहजी मी ती चुकवित नाही अर्थात खिशात पैसे असले तर. बँकेतील माझे सहाध्यायी अडाणी आहेत. खर्डेघाशी शिवाय त्यांना काहीही येत न आणि तिकीट काढून तर मुळीच नाही. कोणी फुकट तिकिटे ओंजळीत टाकली तर हे जाणार

एका नटीने एक गाणे फारच सुंदर सादर केले. मला तर तिची आठवण झाली

९ नोव्हेंबर.

आज सकाळीच आठ वाजता ऑफिसमधे गेलो. हेडक्लार्कने मी लवकर आलो होतो तरीही माझ्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. मी पण तो या जगात नसल्यासारखा ऑफिसमधे वावरलो. मी कागदपत्रे वाचली आणि सगळी नीट संगतवार लावून ठेवली. चार वाजता मी बँक सोडली आणि मुद्दाम वाट वाकडी करून डायरेक्टरच्या घरावरून गेलो. पण तेथे कोणीच दिसले नाही. रात्रीच्या जेवणानंतर झोप न आल्यामुळे बराच वेळ बिछान्यात तळमळत पडलो.

११ नोव्हेंबर

आज डायरेक्टर साहेबांच्या केबिनमधे बसून त्यांची भारी पार्करची जुनी पेनं दुरुस्त करून दिली. सगळे हँडक्राफ्टेड होती. त्यात आमच्या बाईसाहेबांचेही एक होते. ते जरा जास्त काळजीपूर्वक हाताळले. या सगळ्यात बराच वेळ चांगला गेला.

आमच्या साहेबांना त्यांच्या टेबलावर अशी भारी पेनं ठेवायला फार आवडते. त्यांची बुद्धिमत्ता फार कुशाग्र आहे. ते नेहमीच शांत असतात पण ऑफिसमधील अगदी किरकोळ बाबी सुद्धा त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. आमचा बापही बँकेत कारकून होता. पण स्वामी झाल्यापासून त्यांचे पेन सुटले. पुस्तके तर ते कधीच वाचत नव्हते. आमचा बाप म्हणजे अत्यंत सामान्य बुद्धिमत्तेचा माणूसबँकेतील कारकुनी सोडून अध्यात्मात पडला आणि गडगंज पैसा मिळवला. मला त्याचा आणि त्यांच्या शिष्यांचा तो ढोंगीपणा मुळीच आवडत नाही. आई गेल्यावर तर काय आमचा बाप आश्रमात रहायला गेला. तेथे काय रंगढंग उधळले असतील त्याने त्याला माहीत आणि त्याच्या देवाला माहीत. पण आमच्या डायरेक्टर साहेबांचे तसं नाही. त्याच्या डोक्यात डोकावून पहायला आवडेल मला. म्हणजे एवढी बुद्धी असते म्हणजे मेंदूत नक्की काय वेगळे असते हे कळेल. कापावा का त्याच मेंदू एकदा? मला एकदा त्यांच्या मित्रमंडळीत मिसळायचे आहे. कसल्या गप्पा मारतात हे पहायचे आहे कित्येकदा त्यांना विचारावे असे मला फार वाटते पण ते समोर आले की माझी जीभ घशातच अडकते

साहेबांच्या घरी अनेक वेळा जाणे झाले पण ती मात्र कधीच भेटली नाही. बहुतेक ती नसतानाच ते मला बोलावत असावेतनाही पण ते असे मुद्दाम नाही करणार . उमदा माणूस आहे. त्यांच्या घरात एक जादा खोली आहे आणि त्या खोलीमागे एक खोली आहे जिचा विचार केला तरी माझ्या छातीतील धडधड वाढते. आरसेमहालच आहे तो. मांडणीत उंची काचेचे सामान सुबकपणे मांडून ठेवलं आहे. पण मला महाराणींच्या कपडे बदलण्याच्या खोलीत खरा रस आहे. तेथे अनेक प्रकारची अत्तरं मांडून ठेवलेली मला पहायची आहेत. श्वास घ्यायलाही भीती वाटते अशी सुगंधी अत्तरेपण गप्प बस जरा

आज एक भन्नाट कल्पना डोक्यात आली. त्या दोन कुत्र्यांचे संभाषण मला आठवले. ‘चला बरं झालं. आता काय करायचंय हे स्पष्ट झालं’ मी मनाशी म्हटले. त्या दोन मूर्ख कुत्र्यांचा पत्रव्यवहार काहीतरी करून वाचण्यासाठी मिळवायला पाहिजे. कदाचित त्यात मला माझ्या बर्‍याच प्रश्नांची उत्तरे सापडतील. आमचा बापही असेच म्हणतो, ‘माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे आहेत. पैसे फेका उत्तरे मिळवा.पण ही कुत्री मला जास्त प्रामाणिक वाटतात. तीच बरी

मी यापूर्वीच एकदा मन्याला एकांतात गाठले होते. ‘हे बघ मन्या आपल्याशिवाय आता येथे कोणी नाही. मी दरवाजाही बंद करून घेतो म्हणजे तुला कसलीही भीती नको. मला तुझ्या मालकिणीची सगळी माहिती दे ! मी कोणालाही सांगणार नाही.” पण त्या बदमाष कुत्र्याने शेपूट पायात घातली. मागे सरकून त्याने आपले अंग गदागदा हलवले आणि काही ऐकलेच नाही अशा अविर्भावात बाहेरचा रस्ता पकडला.

फार पूर्वीपासूनच माझे मत आहे की कुत्री माणसांपेक्षा खूपच हुशार असतात. ते बोलू शकतात यावर माझा पूर्ण विश्वास आहे. फक्त त्यांच्या आडमुठ्या स्वभावामुळे ते हे रहस्य उघड करत नाहीत. त्यांचे सगळीकडे अगदी बारीक लक्ष असते. त्यांच्या तिखट नजरेतून काहीच सुटत नाही. उद्या काहीही झाले तरी मला नव्यापुलाजवळ मनीच्या घरी गेलेच पाहिजे. आणि जर असेल नशिबात तर मन्याने मनीला लिहिलेली सगळी पत्रे मिळतील…..

१२ नोव्हेंबर

आज दुपारी दोन वाजता मी काहीतरी करून मनीची गाठ घेण्यासाठी निघालो. मला तिला काही प्रश्न विचारायचे होते. त्या कॉजवेच्या भागातील हवेचा एक प्रकारचा दर्प मला मुळीच आवडत नाही. बहुतेक गटाराचा असावा. शिवाय प्रत्येक घरातून पेटलेल्या चुलींमुळे सगळी कडे नुसता धूर भरून राहिला होता. अगदी जीव घुसमटून टाकणारा धूर.

मी दुसर्‍या मजल्यावर गेलो व बेलचे बटण दाबले. एका सुंदर पण चेहर्‍यावर ठिपके असलेल्या तरुणीने दार उघडले. “कोण हवंय?”

मला तुमच्या कुत्र्याशी जरा बोलायचंय.”

फारच साधी मुलगी होती ती. तिचा कुत्रा जोरजोरात भुंकत पळत तेथे आला. मला त्याला पकडायचे होते पण त्या नालायक कुत्रीने माझे नाक तिच्या दातात पकडले. तेवढ्यात मला कोपर्‍यात तिची झोपण्याची टोकरी दिसली. ‘हंऽऽ मला हेच पाहिजे होतं’. मी पळत तेथे गेलो. ती पालथी केली. व कागदाच्या तुकड्यांचा एक गठ्ठा बाहेर काढला. त्या कुत्रीने हे पाहिल्याबरोबर माझ्या पोटरीचा चावा घेतला. मी केलेली चोरी पहाताच ती माझ्याकडे हिंस्रपणे बघत गुरगुरली. पण माझे काम झाले होते. मी तिला म्हटले, “ त्याची आता जरुरी नाहीबाय ! बाय !”

हा सगळा प्रकार पाहून त्या मुलीला मी वेडा असल्याची खात्री पटली असणार. ती घाबरली.

मी घरी पोहोचल्यावर मला वाटले लगेचच दिवसाउजेडी ती पत्रं वाचायला बसावं कारण रात्री मला नीट दिसत नाही पण मोलकरणीने फरशी पुसायला घेतली होती. यांना हा नसता उद्योग नको त्यावेळी करायला कोण सांगतं कोण जाणे. चडफडत मी मग जरा चक्कर मारायला गेलो. चालता चालता काय घडले त्यावर विचार करू लागलो. आता मला त्या सगळ्या भानगडीच्या मुळाशी जाता येईल. कुत्री ही अत्यंत हुशार असतात. त्यांना राजकारणातले सगळे कळते. या पत्रात माल जी माहिती हवी आहे ती सगळी मिळणार याची मला खात्री आहे. विशेषतः: डायरेक्टर साहेबांच्या स्वभावाबद्दल व त्यांच्या नातेवाईकांबद्दल. शिवाय या पत्रांतून तिच्याबद्दल….. गप्प बसायला काय घेशील?

१३ नोव्हेंबर.

आता बघू. पत्रातील अक्षर तसे वाचता येतंय पण जरा कुरतडल्यासारखं दिसतंय….

प्रियतमे मने,

तुझ्या या अत्यंत सामान्य, फालतू नावाची मला सवय होणे कठीणच आहे. त्यांना तुझ्यासाठी दुसरे चांगले नाव सुचले नाही का? मनीशीऽऽऽऽ किती बंडल आणि अतिसामान्य नाव. पण त्याच्यावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. आपण एकमेकांना पत्रं लिहिण्याचा निर्णय घेतला ते एका अर्थाने छानच झालं असे म्हणायला हवे.

(पत्र तसे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून बरोबर लिहिलंय. आमचा हेडक्‍लार्कही एवढे अचूक लिहू शकत नाही. लेकाचा विद्यापीठात होता म्हणे.)

आपल्या भावना, विचार आणि मतांची देवाणघेवाण करणे. मला वाटते या जगातील सगळ्यात निर्भेळ आनंद देणारी ही गोष्ट असावी.

(हंऽऽऽऽ हे वाक्य कुठल्यातरी पुस्तकातील चोरलेले आहे हे निश्‍चित. कुठल्या ते आता आठवत नाही.)

जरी मी आमच्या घराचा दरवाजा एकट्याने ओलांडलेला नाही तर मी माझ्या अनुभवावरून सांगतोय. किती आनंदात आयुष्य चालले आहे माझे. माझी मालकीण, जिला तिचे वडील नूतन अशी हाक मारतात, ती माझ्या प्रेमातच पडली आहे.

( अरे लबाडा…..पण गप्प रहा….)

तिचे वडीलही मला कधी कधी प्रेमाने कुरवाळतात. मी ताज्या दुधाचा चहा आणि क्रीमची बिस्किटे खातो. होय लाडके मला तुला सांगण्यास बिलकुल लाज वाटत नाही की मला ती किचनमधे टाकून दिलेली हाडे मुळीच आवडत नाहीत. मी फक्त हाडांमध्ये मगज असलेली तित्तरची हाडे चघळतो. रिकामी हाडे मला बिलकुल आवडत नाहीत. पण मला सगळ्यात तिरस्कार कशाचा वाटत असेल तर माणसांच्या कुत्र्यांना उष्टे खायला घालण्याच्या सवयीचा. घाणेरडे…. अर्थात कधी कधी आपल्या भिडस्त स्वभावामुळे आपण ते खातो

( हा काय बावळटपणा लावलायदुसरे काही लिहायला मिळाले नाही वाटतं यांना. पुढच्या पानावर कदाचित काहीतरी मिळेल…)

येथे काय चालते हे मी तुला सांगतो. आमच्या घरातील सगळ्यात महत्त्वाचा माणूस म्हणजे नूतन ज्याला बाबा म्हणून हाका मारते तो. फारच विचित्र माणूस आहे.

( आमच्या बापाइतका निश्‍चितच नसणार. पण बघुया काय विचित्रपणा करतो तोपण आता निश्‍चितच काहीतरी गवसणार. मी म्हटले नाही, त्यांचे सगळीकडे बारीक लक्ष असते आणि हे कुत्रे पक्के राजकारणी असतात..

…. विचित्र माणूस. बहुतेक वेळा तो शांत असतो. क्वचितच बोलतो. पण मागच्या आठवड्यात तो एक कागद हातात घेऊन स्वत:शीच बडबडत होता, ‘मिळेल का मला तेमिळेल का…?” दुसरा हात त्याने आकाशात पसरला होता. एकदा तर माझ्याकडे वळून ते म्हणाले, “ मन्या तुला काय वाटते. मिळेल का मला?ते काय म्हणत आहेत यातील एकही शब्द मला कळला नाही. मी त्यांच्या बुटाला शेपटी घासली व तेथून निघून गेलो. पुढच्याच आठवड्यात सकाळी बँकेचे अनेक कर्मचारी, अधिकारी आमच्या घरी आले. त्यांनी सगळ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्या दिवशी जेवणाच्या टेबलावर जेवणे अगदी हसतखेळत झाली. मला चांगलं आठवतंय.

( हंऽऽ म्हणजे ते फारच महत्त्वाकांक्षी दिसतात..लक्षात ठेवले पाहिजे. माझी खरी महत्त्वाकांक्षा बाबांची जागा घ्यायची ही आहे पण बाबा आश्रमात पाऊल टाकून देत नाहीत. विचारले तर ‘शहाणा आहेस’ असे उत्तर देऊन गप्प करतात.)

माफ कर प्रिये..मी आता पत्र पुरे करतो…..(..….) उद्याच मी हे पत्र पूर्ण करेन वचन देतो तुला

सांगितल्याप्रमाणे लाडके मी परत पत्र लिहायला घेतोय. आज माझी मालकीण नूतन..

( हंऽऽऽ बघुया आता काय लिहितोय तो नूतनबद्दल..)

फारच उल्हसित दिसत होती. आज ती कँपात एका डिस्कोथेकमधे नाचायला गेली होती. ती नसताना त्यामुळेच मला शक्य झालंय. तिला नाचायला फार आवडते. पण तिला चांगले कपडे घालण्याचा फार कंटाळा येतो. नाचून एवढा कसला आनंद मिळतो हे मला अजून उमजलेले नाही. कधी कधी ती रात्री जाऊन पहाटे गुपचूप घरी येते. त्यावेळी मात्र मला गप्प रहावे लागते. तिच्या मलूल चेहर्‍याकडे पाहून मी सहज सांगू शकतो की तिने रात्रभर काही खाल्लेले नाही. मी तर असे न खाता राहूच शकत नाही. मला जर कोंबडी मिळाली नाही तर माझं काय होईल ते सांगता येत नाही. अंडी ठीक आहेत पण गाजरं, ढोबळी मिरची माझ्या अन्नात मला मुळीच चालत नाहीत

(लिहिण्याची पद्धत फारच आगळीवेगळी आहे. कोणी माणसाने लिहिले नसणार हे लगेचच लक्षात येते. सुरवात तर फारच छान केली आहे पण नंतर मात्र वळणावर गेलेमी दुसरे पत्र वाचायला घेतो. यावर तारीख नाही.) (आमचे वडीलही महाराज होण्यापूर्वी आईला पत्रे लिहायचे म्हणे. नंतरही ते पत्र लिहायचे पण त्यांच्या लाडक्या शिष्येला. एक विधवा होती ती. होतीच म्हणायला पाहिजे. कारण आता ती या जगात नाही. तिचा संशयास्पद मृत्यू झाला म्हणे. त्यानंतर बहुधा आमच्या बापाने पत्रं लिहिण्याचे बंद केले ते केलेच..)

.. लाडके वसंत ऋतूचं आगमन किती आल्हाददायक असते नाही? कोणाची तरी आस लागल्यासारखे माझे हृद्य तडफडते आहे. माझ्या कानात काहीतरी गुंजन करतंय आणि मी कित्येक वेळा एका पायावर उभा राहून दाराकडे टक लावून बघत बसतो. तुला सांगायला हरकत नाही, माझे चाहते भरपूर आहे. मी बर्‍याच वेळा खिडकीत बसून ते जा ये करत असताना त्यांच्याकडे पहात बसतो. तुला सांगतो परमेश्वराने काय काय नमुने जन्माला घातले आहेत….! काही बावळट, पाळलेले कुत्रे, चेहर्‍यावरची माशी हालणार नाहीत असे कुत्रे रस्त्यावर एखाद्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसारखं चालत असतात. त्यांना वाटत असते की सार्‍या जगाचे डोळे त्यांच्यावरच खिळलेले आहेत. त्यांच्याकडे तर मी ढुंकूनही पहात नाही. काय पण एकेक नमुने पहायला मिळतात

आणि समोरच्या खिडकीत एका अक्राळविक्राळ बुलडॉग असतो. एवढा मोठा की बस्स.. जर तो मागच्या पायावर उभा राहिला तर नूतनच्या वडिलांपेक्षाही कदाचित उंच होईलअर्थात त्याला मागच्या पायावर उभे रहाता येईल की नाही ही शंकाच आहे. हा ठोंब्या अत्यंत निर्लज्ज आहे. मी त्याच्यावर गुरकावतो पण त्याला त्याचे काहीही वाटत नाही. त्याने त्याच्या कपाळावर आठ्या घातल्या तरी हरकत नाही पण तो माझ्याकडे सरळसरळ दुर्लक्ष करतो. मी जर थोडा भुंकलो तर तो जीभ बाहेर काढतो, कान पाडतो आणि परत खिडकीबाहेर नजर लावतो. रानटी ! पण लाडके मला काहीजण आवडतात बरका. तो शेजारच्या कुंपणात सरपटत शिरणारा कुत्रा मला खूपच आवडतो. त्याचे नाक किती सरळ आणि सुंदर आहेत्याचे नावही मस्त आहेजॉनी ..कुठल्याशा सिनेमावरून ठेवले आहे म्हणे.

( काय साला फालतूपणा चालवलाय यांनी. कशाला कागद काळे करतात कोणास ठाऊक. मला माणसांबद्दल सांगा रे. माणसांबद्दल. त्याने माझ्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडेल. दिशा मिळेल. जाऊ देत . मी दुसरे पत्रच वाचतो…)

(आमचा बाप तर कागद काळे करायच्या भानगडीत पडत नाही. त्याच्या आवाजात जादू आहे म्हणे. स्वत: वेडा आहे पण दुसर्‍याला वेड लावतो. शिवाय लिहिले म्हणजे पुरावा मागे राहतो. अक्कल उघडी पडते….)

नूतन टेबलावर बसून काहीतरी भरतकाम करीत होती. आमची नूतन घर कामातही तरबेज आहे बरं का…! मी नेहमीप्रमाणे खिडकीबाहेर पहात टवाळक्या करत होतो. तेवढ्यात घरचा नोकर आला व म्हणाला, “साहेब आले आहेत..”

त्यांना घेऊन ये इथे…” “ मन्या, मन्या,कोण आहेत ते माहिती आहे का? ते गोरेपान गृहस्थ मोठे सरकारी अधिकारी आहेत. आणि काय त्याचे डोळे आहेत..निळेशार.. आणि मुख्य म्हणजे गारगोटी सारखे निर्जीव नाहीत तर तेजस्वी…”

नूतन पळतच तिच्या खोलीत गेली. पुढच्याच क्षणी एक उमदा तरुण आत आला. त्याने आरशात पाहून आपल्या केसांवरून हात फिरवला. खोलीवर नजर फिरवून तो तसाच उभा राहिला. मी तोंड फिरवून माझी जागा घेतली. तेवढ्यात नूतन आत आली. त्याच्याकडे बघून ती गोड हसली.

मी माझे लक्ष नाही असे भासवत खिडकीबाहेर पहात राहिलो. पण माझे कान त्यांच्या बोलण्याकडेच होते. लाडके एवढे कंटाळवाणे संभाषण मी माझ्या आयुष्यात ऐकले नसेल. काल नाचताना कोणाला जास्त झाली होती, कोणाला नाचता येत नाही, कोण नुसतेच जागेवरच जॉगींग केल्यासारखे नाचतात. कोण कसा दिसत होता आणि कोण कशी जास्त नटून आली होतीकोण एक लिना म्हणे तिचे डोळे निळे आहेत पण प्रत्यक्षात ते हिरवट आहेत….

मला कळत नाही तिला या माणसाविषयी एवढे काय प्रेम वाटते.. तो आला की अगदी खूष असते.

( काहीतरी चुकतेय इथे. या माणसाने तिला गटवणे अशक्यप्राय गोष्ट आहे. बघू पुढे काय आहे…)

हा माणूस दिसल्यावर जर तिला हसू फुटू शकते तर तिच्या वडिलांच्या केबिनमधे बसणार्‍या माणसाला पाहिल्यावरही तिला हसू फुटत असेल. तो तर अगदी कासवासारखा दिसतो..

(कोणाबद्दल बोलतोय तो?)

त्याचे नाव जरा विचित्र आहे आणि तो सारखा पेनं दुरुस्त करत असतो. त्याचे केस वाळलेल्या गवताच्या पेंडीसारखे आहेत. तिचे बाबा त्याला नोकर येणार नसला की घरी बोलवतात. त्याला पाहिले की नूतनला हसूच आवरत नाही.

(खोटारडा! हलकट!मला माहिती आहे तू एक नंबरचा खोटारडा आहेस. मला माहीत आहे माझ्यावर जळतो तू. आणि शिवाय तो हेडक्‍लार्कही तुला सामील आहे. तो तर माझा द्वेष करतो. तो माझ्याविरुद्ध कट कारस्थाने करतोअजून एक पत्र वाचले पाहिजे म्हणजे खरे काय ते कळेल.)

(बाबांनी आईला लिहिलेले एक पत्र मला पडताळात सापडले होते. गरीब बिचारी माझी आई. बाबांनी नुसत्या शिव्याच घातल्या होत्या तिला. पत्रावरची शाई अश्रूंनी पुसट झाली होती. काय झाले असेल बिचारीचे. फार सुंदर होती म्हणे ती. बाबा मात्र अगदीच कुरूप. मी बाबांवर गेलोय की काय? तिच्यावर पाळत ठेवायला बापाने खास माणसांची नेमणूक केली होती.)

प्रिय मने, मला माफ कर अगं बरेच दिवस तुला लिहायला वेळच मिळाला नाही. सध्या मी स्वप्नात तरंगतोय. कोणीतरी लिहिलेले आहे ना, प्रेम म्हणजे पुनर्जन्मच ! शिवाय घरात मोठी धामधूम चालू आहे. तो आता सारखा घरी येतो. नूतनचे वडीलही सध्या आनंदात आहेत. फरशी पुसणार्‍या बाईंना स्वत:शीच बडबडण्याची सवय आहे. त्यांच्या बडबडीतून मला कळले की लवकरच नूतनचे लग्न होणार आहे.

( मला पुढे वाचवले नाही.)

हे सगळे मोठ्या हुद्द्यांवरच्या लोकांसाठी आहे. तिला योग्य वर मिळावा अशी कोणाची इच्छा नाही. सगळा पैशाचा खेळ. मीही इंदूरचा राजा असतो तर तिला मागणी घातली असती. मग या सगळ्या लोकांची तडफड पहायला मजा आली असती. ते दोघे तर त्यांच्यावर थुंकण्याच्या लायकीचे पण नाहीत. पण काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. मी त्या मूर्ख कुत्र्याच्या पत्रांचे फाडून फाडून हजार तुकडे केले व कचरा पेटीत टाकले

३ डिसेंबर.

हे लग्न होणे शक्यच नाही. ही अफवाच असणार. तो एक मोठा सरकारी अधिकारी असला म्हणजे माझ्यापेक्षा काय वेगळे आहे त्याच्याकडे? या अडाणी समाजात त्याला मान आहे एवढेच. तसा तर तो माझ्या बापालाही आहे आणि त्याच्यानंतर मलाही मिळणार आहे अर्थात मी ती जागा मिळवली तर. पण त्यासाठी काय करावे लागणार आहे याची मला कल्पना नाहीठीक आहे कळेल पुढे केव्हातरी. त्याचा हुद्दा त्याला कपाळात तिसरा डोळा देत नाही ना त्याचे नाक सोन्याचे आहे. इतरांसारखेच नाक आहे त्याला. त्या नाकातून तो जेवत नाही ना खोकत. इतरांसारखा किंवा माझ्यासारखा फक्त शिंकतोच ना? मला या रहस्याचा भेद करायलाच पाहिजे. दोन माणसात हा फरक कशामुळे पडतो हे शोधायला पाहिजे.. मी फक्त एक साधा कारकून का झालो

कदाचित मी इंदूरचा राजा असेनही फक्त एखाद्या कारकुनासारखा दिसत असेन. कदाचित मलाच मी कोण आहे हे माहीत नसेल. इतिहासात अशा कितीतरी घटना आहेत ज्यात एखादा भिकारी एकदम संस्थानिक निघतो किंवा एखादा कामगार श्रीमंत व्यापार्‍याचा हरवलेला मुलगा निघतो. आपले सिनेमे तर अशा गोष्टींनी खच्चून भरले आहेत. जेथे धूर आहे तेथे खाली काहीतरी पेटलेले असतेच असे म्हणतात. समजा उद्या मी एकदम इंदूरी पागोट्यात व हिर्‍यांचा शिरपेच घालून अवतरलो तर ती काय म्हणेल? ओवाळेल का मला? तिचे वडील, आमचे डायरेक्टर साहेब काय म्हणतील? ते महत्त्वाकांक्षी आहेत, लॉजचे सदस्य आहेत. निश्‍चितच ते फ्रीमॅसन आहेत. मी शोधून काढलं आहे. त्यांनी कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी मला ते माहीत आहे. माझ्यासाठी फारच सोपे होते ते. आमचा बापही एका लॉजचा सदस्य आहे नामाझा बाप व हा दोघेही प्रथम भेटणार्‍या माणसाशी हस्तांदोलन करताना फक्त पहिली दोन बोटे पुढे करतात. मी पाहिलंय ना.. मी एखादा संस्थानिक नाही होऊ शकणार का? बाबांना सांगितले तर ? ते परमेश्वराचे एजंट आहेत असे म्हणतात. किंवा कमीतकमी बँकेचा मॅनेजर तरी? मी एक कारकून का आहे? त्यापेक्षा जास्त काहीतरी का नाही?…

५ डिसेंबर

आज सगळी सकाळ वर्तमानपत्रे वाचण्यात घालविली. इंदूरला विचित्र गोष्टी घडत आहेत. मला काही सगळ्या समजल्या नाहीत पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे त्या संस्थानाची गादी रिकामी आहे. गादीचा वारस शोधण्यात कारभाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतोय कारण दंगे सुरू झाले आहेत.

हे सगळे मला विचित्र वाटतंय. गादी रिकामी कशी काय राहू शकते? काही लोक म्हणतात की त्या गादीवर एक स्त्री बसणार आहे. एक स्त्री कशी काय गादीवर बसू शकते? अशक्य ! फक्त राजाच गादीवर बसू शकतो. ते म्हणतात की तेथे राजाच नाही पण ते कसे शक्य आहे संस्थानाला राजा नाही असे कसे होईल? राजा असेल पण कुठेतरी लपला असेल. तो तेथेच असेल पण कदाचित अर्थव्यवस्था ढासळल्यामुळे, किंवा राजकीय अस्थिरतेमुळे किंवा दुसर्‍या मंत्र्यांच्या कटकारस्थानांमुळे त्याने सध्या लपण्याचे ठरवले असेलकाय माहीतकदाचित इतरही कारणेही असतील.

८ डिसेंबर.

मी बँकेत जाणारच होतो पण विचारपूर्वक गेलो नाही. मी सतत त्या इंदूरच्या भानगडीबद्दल विचार करीत होतो. एखादी स्त्री कशी काय राज्य करू शकते हा विचार काही माझ्या मनातून जात नव्हता. याला सरकारने परवानगीच दिली नाही पाहिजे. बाकीचे संस्थानिक काय करताएत? इतर संस्थानिकांमधेही खळबळ माजली आहे. ग्वाल्हेरमधे ही बंडाळी माजण्याची चिन्हे दिसू लागली आहेत असे म्हणतात. या सगळ्या बातम्यांनी मी हादरून गेलो. स्वयंपाक करणार्‍या बाईंनीही हे ओळखलंय.

साहेब आज तुमचे कशातच लक्ष नाही.” खरं होतं तिचे. लक्ष नसल्यामुळे मी दोन काचेची भांडी जमिनीवर फेकली.

रात्रीच्या जेवणानंतर मला थोडा अशक्तपणा वाटल्यामुळे ऑफिसचे घरी आणलेले काम करायचा मूडच नव्हता. मी तसाच गादीवर तळमळत पडून राहिलोअर्थात मनात सारखा इंदूरचे विचार येतच होते

आमच्या आश्रमाच्या गादीचा विचार करण्यात तसा अर्थ नव्हता. बाबा अजूनही मला त्या लायक समजत नव्हते. मनाला गोंधळात टाकणारे सर्व ग्रंथ मी वाचून काढले. त्याने मी अजूनच गोंधळात पडलो. बाबांना काही विचारले तर ते म्हणतात, “ एवढा घोडा झालास पण अक्कल येत नाही अजून. ते सगळे समजून घेण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्यावर बडबड करता आली म्हणजे बस्स.. ” मला ते एवढे काही पटत नाही पण वाद टाळण्यासाठी मी आपला गप्प रहातो. पण एक दिवस त्यांचा आणि माझा वाद होणार आहे हे निश्‍चित

४३ एप्रिल..

आजचा दिवस विजय दिवस म्हणूनच साजरा करायला हवा. शेवटी इंदूरच्या गादीचा वारस सापडला. गादीला राजा मिळाला. तो मीच आहे. एखादी वीज पडावी तसे आजच हे माझ्या अचानक लक्षात आले. तसे मला एकदा बाबा मेले आणि मी त्यांची जागा घेतली असेही स्वप्न पडले होते. पण ते स्वप्न होते. हे अगदी सत्यात उतरले आहे.

मला हेच कळत नाही इतकी वर्षे मी स्वत:ला एक कारकून कसा काय समजत होतोमी कारकून आहे ही मूर्खपणाची कल्पना माझ्या डोक्यात कशी काय घुसली कोणास ठाऊक. नशीब यासाठी कोणी मला वेड्यांच्या इस्पितळात टाकले नाही. आता सगळे कसे स्वच्छ झालंय. मला एक कळत नाही हे सगळे पडद्याआड कसे झाकले गेलंय.. मला वाटतंय की लोकांना वाटते की त्यांचा मेंदू हा डोक्यात असतो. पण ते सगळे खोटे आहे. अरबी समुद्रावरून वाहणार्‍या वार्‍यातच मेंदू असतो. तो जेथे जाईल तेथे वास करतो.

आज पहिल्यांदाच मी सावित्रीला मी कोण आहे हे सांगितले. मी जेव्हा तिला सांगितले की आठवा तुकोजी होळकर तुझ्यापुढे उभा आहे तेव्हा तिने कपाळावर हात बडवून घेतला. मरायचीच ती. नैसर्गिकच आहे. राजघराण्यातील माणूस तिने आजवर पाहीलाच नव्हता ना !

मी पहिल्यांदा तिला शांत केले. तिला सांगितले की माझे बूट अस्वच्छ आहेत म्हणून काही मी तिला हत्तीच्या पायी देणार नाही. बायका म्हणजे एक नंबरच्या मूर्ख असतात. भव्यदिव्य गोष्टींमधे त्यांना रसच नसतो. ती घाबरली होती कारण तिला वाटले की सगळे संस्थानिक हे तुळोजीसारखे क्रुर असतात. मी तिला समजावून सांगितले की ते दिवस आता गेलेमी काही आज बँकेत गेलो नाही. कशाला जाऊ ? मुळीच जाणार नाही. त्या न संपणार्‍या कागदांच्या भेंडोळ्यात माला परत अडकून पडायचे नाही

८६ मार्च. दिवस आणि रात्रीमधे केव्हातरी

आज मला बोलाविण्यासाठी बँकेतून शिपाई आला. कारण मी गेले तीन आठवडे बँकेत गेलोच नव्हतो. त्याच वेळी नेमका आश्रमातून बाबांचा एक भगव्या कपड्यातील शिष्यही आला. त्या दोघांची गाठ पडू नये म्हणून मला किती धडपड करावी लागली. त्या भगव्याला मला एक भांडे फेकून मारावे लागले. माझा अवतार पाहून बिचार्‍याने पळ काढला. पण शिपाई चांगला दांगट होता. त्याने मला धरले व निरोप सांगितला. अर्थात माझा त्याला विरोध नव्हताच. मीही गंमत म्हणून बँकेत गेलो.

आमच्या बावळट हेडक्लार्कला वाटले की मी त्याच्या पुढे लोटांगण घालीन व गयावया करत काहीतरी खोटीनाटी कारणे देईन. पण तसे काहीच झाले नाही. मी त्याच्याकडे एक अनोळखी माणूस असल्यासारखे पाहिले. माझ्या नजरेत ना राग होता ना कीव. मग मी शांतपणे माझ्या जागेवर जाऊन बसलो. जणू काही झालेच नव्हते. त्यांची धावपळ पाहण्यासाठी मला शून्यात नजर लावावी लागली. ‘जर तुम्हाला कळले की तुमच्यासमोर कोण बसलंय तर तुमची किती धावपळ उडेल याची तुम्हाला कल्पनाच नाहीहेडक्‍लार्कही माझ्यासमोर लोटांगण घालेल. हो ! जसा हल्ली तो डायरेक्टर साहेबांपुढे घालतो.’

त्यांनी माझ्यासमोर एक कागदांचा गठ्ठा आदळला. मला त्या सगळ्या कागदपत्रांचे सार लिहून काढायचे होते म्हणे. पण मी त्यांना साधा स्पर्शही केला नाही. वाचणे तर दूरच.

थोड्याच वेळात ऑफिसमधे गडबड उडाली. शेवटी डायरेक्टरसाहेब येत आहेत अशी कुजबुजही सुरू झाली. कित्येक कारकुनांनी एकमेकांकडे अर्थपूर्ण नजरा टाकल्या. ते येताना त्यांचे लक्ष जाईल अशा हालचाली केल्या पण मी साधा हललो ही नाही. सगळ्यांनी आपले कपडे नीट केले, बटणे तपासली पण मी…. अंऽऽहं. डायरेक्टरची काय एवढी तमा बाळगायची? मी तो आला म्हणून उभे रहायचे? कदापि नाही.. हा कशाचा डायरेक्टर आहे. एखाद्या बाटलीच्या बुचासारखा दिसतो सामान्य बाटलीचं सामान्य बूचया पलीकडे काही नाही. त्यांनी माझ्यासमोर एक कागद सही साठी ठेवल्यावर मला जरा आश्चर्यच वाटले.

त्यांना वाटले मी नेहमीप्रमाणे माझी किरट्या अक्षरातील सही करेनबरोबर आहे त्यांचे. पण मी जेथे वर डायरेक्टरसाहेब सही करतात त्याच जागेवर मोठ्या लफ्फेदार अक्षरात माझी सही ठोकली…. तुळाजी होळकर (सातवा)… त्यानंतर पसरलेला सन्नाटा तुम्ही पहायला हवा होता. मी फक्त माझा हात हवेत झाडला व म्हणालो, ‘मला कुठलाही सभारंभ नकोय.. मग मी बाहेर पडलो व सरळ डायरेक्टर साहेबांच्या घराचा रस्ता पकडला.

ते घरी नव्हतेच. त्यांच्या दरवानाने मला थांबविण्याचा प्रयत्न केला पण मी त्याच्यावर असा डाफरलो की त्याने लगेचच शरणागती पत्करली.

मी सरळ नूतनच्या ड्रेसिंग रुममधे गेलो. ती आरशासमोर बसली होती. मला पाहताच ती दचकली. तोंडावर हात ठेवून, विस्फारलेल्या डोळ्यांनी ती दोन पावले मागे सरकली. पण ती उगीचच घाबरायला नको म्हणून मी कोण आहे हे तिला सांगितले नाही.

पण मी तिला सांगितले की जगातील सर्व सुखे तिची वाट पहात आहेत. इतकी की ती त्याची कल्पनाच करू शकणार नाही. आपल्या शत्रूंनी कितीही कट कारस्थाने केली तरीही आपले मिलन होणार आहे. एवढेच बोलून मी बाहेर पडलो. किती लबाड असतात या बायका.. आता मला बायका ही काय चीज असते हे चांगलेच कळून चुकले आहे. त्या खरे प्रेम कोणावर करतात हे कोणालाच कळत नाहीए म्हणे. चूक ! मला एकट्यालाच हे कळलं आहे. त्या सैतानावर प्रेम करतात. विनोद बाजूला ठेवला तरी ही ज्ञानी माणसे त्यांची वर्णनं करतात ना ती सगळी खोटी आहेत. तिचे खरे प्रेम हे सैतानावरच असतेअसते म्हणजे असते. संपलं. पुढच्या रांगेत बसलेली एखादी स्त्री मागे वळून एखाद्या पुरुषाकडे पहात असते तेव्हा तुम्हाला असे वाटण्याची शक्यता आहे की त्याच्या रांगड्या रूपाकडे पाहतेय. पण मुळीच नाही. त्या माणसा मागे दडलेल्या सैतानाकडे ती मोठ्या प्रेमाने पहात असते. त्याच्या आडून तो तिच्याकडेच पहात असतो. लक्षात घ्या. शेवटी ती त्याच्याशीच लग्न करते. खरंच त्याच्याशीच लग्न करते.

या सगळ्याच्या मुळाशी महत्त्वाकांक्षा आहे आणि त्याचे कारण आहे जिभेखाली असलेला एक फोड ज्याच्यात एक किडा लपलेला असतो. टाचणीच्या डोक्याच्या आकाराचा. आणि हे सर्व मोमीनपुर्‍यातील त्या न्हाव्याचे काम आहे. त्याच्या मधल्या बायकोबरोबर त्याला जगात इस्लाम धर्माचा प्रसार करायचा असतो. मी असे ऐकतो की माझ्या राज्यात आत्ताच बरीच जनता इस्लामी झाली आहे….

त्याला एकदा आमच्या आश्रमात सोडला पाहिजे. कशी धावपळ होईल आमच्या वडिलांच्या शिष्यगणाची.. विशेषतः भक्तिणींची.. आमच्या बाबांमुळेच इस्लामची स्थापना झाली आहेमाझी खात्री आहे.

आजची तारीख आठवत नाही. नाही तसे नाहीया दिवसाला तारीखच नाही.

आज मी खलिफासारखा वेष बदलून बाजारात फेरफटका मारायला गेलो. मी राजा असल्याचे एकही चिन्ह मी मागे ठेवले नव्हते कारण दरबार भरण्याआधीच जनतेने मला पहावे अशी माझी इच्छा नव्हती. अगोदर दरबारात दर्शन द्यावे आणि मग सामान्य जनतेला असेच मी ठरवले. सामान्य जनतेसमोर एकदम उभे रहायचे मला कमीपणाचे वाटले. काय माहीत जनता कशी प्रतिक्रिया देईल.. आणि शिवाय आत्ता या क्षणी माझ्याकडे होळकरी पगडीही नाही. मी एका नाटकाचे पोषाख पुरविणाऱ्या कंपनीला विचारुन पाहिले पण त्यांच्याकडे इंदूरच्या राजाचे कपडे नव्हते. गाढव लेकाचे..इंग्लडच्या राणीचे होतेकाय म्हणावे यालाअजूनही आमची गुलामी गेली नाहीअर्थात आश्रमातही सगळे परमेश्वराचे गुलाम त्याच्या एजंटच्या पायावर लोटांगण घालतातच की. काय होणार या गुलांमांचे कोणास ठाऊक. मला स्वत:ला या गुलामांचा मालक होण्यास फारच आवडेल. माझ्या भगव्या कपड्यातून मी इंदूरचे कपडे शिवून घेईन. नाहीतरी ते साधेच सुती कपडे आहेत. आश्रमात गादी मिळाल्यावर मखमली लागतील.. पण शिंप्याने ते बिघडवले तर? नको त्यापेक्षा मीच ते गुपचूप घरीच शिवीन. दारे खिडक्या लावून घेईन म्हणजे कोणी बघायला नको. बेतण्यासाठी मलाच कात्री चालवावी लागणार असे दिसते. काही हरकत नाही..

मला तारीख लक्षात नाही. सैतानाने ती नीट लक्षात ठेवली असणार. कपडे आता जवळजवळ तयार झाले आहेत. मी जेव्हा ते परिधान केले तेव्हा सावित्रीच्या तोंडातून एक अस्फुटशी किंकाळी बाहेर पडली. पण मी आत्ता लगेचच दरबारात दर्शन देणार नाही. दरबारी, मंत्री संत्री अजून आलेले नाहीत. एकट्याने दरबारात जाणे काही ठीक दिसणार नाही. माझे वैभव दिसणार नाही. प्रत्येक तासाला मी त्यांची उत्कंठेने वाट पहातोय.

आश्रमात केव्हा कळवायचे हाही एक प्रश्नच आहे. बाबांची तब्येतही आजकाल ठीक नसते. मधे त्यांची अँजियोग्राफी झाली असे सावित्री सांगत होती…. म्हातारा गचकतोय की काय.. आता इंदूरची गादी मिळाल्यामुळे आश्रमाची मला गरज नाही हे त्यांना सांगावे का? गप्प बस जराशहाणपणा नको

कारभार्‍यांना येण्यास एवढा का बरं उशीर झाला असेल? मला वाटते शिंद्यांनी त्यांना रस्त्यातच पकडले असेल. त्यांचा छळ केला असेल. मी कुठे आहे हे सांगण्यासाठी. आज मी पोस्ट ऑफिसमधे चौकशी करण्यासाठी जाऊन आलो. पण त्यांना कशाचीच कल्पना नव्हती. पोस्टमास्तर म्हणून एक ठोंब्या बसवलाय तिथे.

नाही हो ! माझे डोके खाऊ नका. येथे इंदूरचे कोणीही आलेले नाही. तुम्हाला जर त्यांना तार पाठवायची असेल तर खाइडकी क्र.३ वर जा फॉर्म भरा.”

छे! मी कशाला तार करू ? तारा तर डॉक्टरांचा कंपाऊंडर पाठवतो

३० फेब्रुवारी. इंदूर.

चला ! एकदाचा इंदूरला पोहोचलो म्हणायचा मी. घटना कशा फटाफट घडत गेल्या. इंदूरचे काही कारभारी व आश्रमातील काही कारभारी मला न्यायला आले होते. मी अर्थातच आश्रमातील लोकांना परत पाठवून दिले. नंतर कळाले की ते मला बाबांच्या बाराव्याला न्यायला आले होते. गेले एकदाचे. वेडे कुठले. मला एकट्याला टाकून गेले. मला न्यायला त्यांनी भली मोठी गाडी पाठवली होती व पुढेमागे हत्यारी संरक्षक बसवले होते. हे नेमलेले मला आठवत नव्हते पण गर्दी झाली तर त्यांचा उपयोग होईल. म्हणून मी त्यांना परत पाठवले नाही. आजकाल सगळे रस्ते लोखंडाचे असल्यामुळे सगळीकडे फटकन पोहोचता येते. आम्ही इतक्या वेगाने गेलो की अर्ध्या तासात आम्ही इंदूरच्या वेशीवर पोहोचलो. रम्य आहे हा प्रदेश.

माझ्या किल्ल्याला भक्कम तटबंदी आहे. शिंद्यांपासून रक्षण करायचे म्हणजे ही असली तटबंदी पाहिजेच. मी आत पाऊल टाकल्याटाकल्या मला बरेच टक्कल केलेले लोक दिसले. मी लगेचच त्यांना ओळखले. सैनिक असणार ते. नाहीतर अधिकारीही असतील.

मला हाताला धरून घेऊन जाणार्‍या कारभार्‍याने एकदम भयंकर विचित्र गोष्ट केली. त्याने मला एका खोलीत ढकलले आणि म्हणाला, “ इथे गप्प पडून रहा. जर परत इंदूर हा शब्द तरी तोंडातून काढलास तर याद राख. इंदूरलाच पाठवीन तुला कायमचा.” पण मला माहीत आहे ही एक राजाची परीक्षाच असते. सामान्य माणसांची दु:खे राजाला कळावी म्हणून त्यांना तसे काही काळ वागविले जाते असे म्हणतात. मी परत इंदूरचे नाव काढल्यावर मात्र त्याने त्याच्या हातातील दांडुक्याने माझ्या पाठीवर सणसणीत दोन रट्टे हाणले. माझा जीव कळवळला. मला रडू फुटले पण मी ते मोठ्या प्रयासाने आवरले. राजाला असे रडणे शोभत नाही. कदाचित इंदूर मधे शौर्याची अशीच परीक्षा घेत असावेत. ते सगळे गेल्यावर मी माझ्या राज्याच्या कारभाराची माहिती घ्यायची ठरविली. आश्चर्य म्हणजे माझ्या लक्षात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आली. ती म्हणजे इंदूर आणि चीन हे एकच देश आहेत. ही मूर्ख अडाणी जनता त्यांना दोन देश समजते. मी प्रत्येकाला एका कागदावर इंदूर हा शब्द लिहायला सांगणार आहे. त्याला आढळेल की तो चीन असा लिहिला गेलाय.

या सगळ्या किरकोळ गोष्टी आहेत. मला खरी काळजी उद्याची आहे. उद्या सकाळी पृथ्वी चंद्रावर बसणार आहे आणि त्यावर बाबा. ते आत्तापर्यंत चंद्रावर पोहोचलेही असतील. त्यांना सूक्ष्मात जाऊन कुठल्याही ग्रहावर जाण्याची विद्या प्राप्त आहे नासध्या एका इंग्रजी शास्त्रज्ञाने हे पेपरात छापले आहे पण माझ्या बाबांनी मला केव्हाच सांगितले होते. सध्या इंदूरात लागलेले शोध स्वत:च्या नावावर खपवायचे हा परदेशी शास्त्रज्ञांचा उद्योगच झाला आहे म्हणापण एक सांगतो चंद्र इतका ठिसूळ आणि नाजूक आहे की मला त्याची काळजी वाटते. सध्या चंद्राची दुरुस्ती नेपाळमधे करतात त्यामुळे ती काही व्यवस्थित होत नाही. अत्यंत ढिसाळ काम. ते काम एक राय नावाचा नेपाळी माणूस करतो. हा तर इतका बथ्थड डोक्याचा आहे की बस. त्याने चंद्र दुरुस्त करताना ऑलिव्ह ऑईल आणि मेण वापरल्याने पृथ्वीवर सगळीकडे घाणेरडा वास पसरलाय. सगळ्यांना नाकावर रुमाल घेउन चालावं लागतंय. म्हणून आपल्याला आजकाल आपली नाकं दिसत नाहीत कारण ती सगळी चंद्रावर गेली आहेत

सगळं चित्र स्पष्ट आहे. पृथ्वी एवढी मोठी आहे की जेव्हा ती चंद्रावर बसेल तेव्हा सगळी नाकं चिरडली जातील. मी इतका अस्वस्थ झालो की मी लगेच बूट चढवले व बाहेर पोलिसांकडे धाव घेतली. त्यांना पृथ्वीला चंद्रावर बसण्यापासून परावृत्त करा हा आदेश द्यायचा होता मला.

मी बाहेर हॉलमधे पाऊल टाकले आणि मला त्या टकल्या पोलिसांनी घेरले. ती खरंच फार बुद्धिमान माणसं होती. मी जेव्हा त्यांना समजाऊन सांगितले, “ लोक होऽऽ आपल्याला चंद्र वाचवायला पाहिजे कारण पृथ्वी त्यावर बसणार आहे.” ते ऐकल्यावर राजाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळे लगेच झटून कामाला लागले. काहीजण तर भिंतीवर चढून चंद्राला खाली घेण्याचा प्रयत्न करू लागले. तेवढ्यात इंदूरचा पंतप्रधान आला. तो आल्यावर सगळ्यांची पांगापांग झाली. पण राजा असल्यामुळे मला तेथून हलता येईना. आश्‍चर्य म्हणजे त्याने मला परत दांडुक्याने बडवले व परत खोलीत ढकलले. इंदूरच्या मध्ययुगीन प्रथा अजूनही भक्कम आहेत म्हणायच्या

आज मी गोंधळ घातला. माझी वही ते हिसकावून घेत होते. शेवटी पंतप्रधान म्हणाले, “त्या वहिने काय त्रास होतोय तुम्हाला? लिहितोय ना तो त्यात ? लिहू देत..

त्याच वर्षी जानेवारीत पण फेब्रुवारी नंतर येणारा.

हा इंदूर कुठल्या प्रकारचा देश आहे हेच कळत नाही. यांच्या व यांच्या दरबारी परंपरा फारच कर्मठ दिसतात. मला समजतच नाहीत त्या. आज माझ्या डोक्यावरचे सगळे केस काढण्यात आले. मी त्यांना ओरडून ओरडून सांगतोय की मला भिख्खू व्हायचे नाही. पण त्यांनी माझे ऐकलेच नाही. हे कमी होतं की काय म्हणून त्यांनी माझ्या डोक्यावर बर्फाळ पाण्याची धार धरली. मी आजवर असला अत्याचार सहन केला नव्हता. मला जवळजवळ वेड लागण्याची वेळ आली होती. पण ही परंपरा का पडली याचे उत्तर मला कोणी देऊ शकले नाही. फारच घाणेरडी परंपरा आहे.

मला आश्‍चर्य वाटते ते याचे की या आधीच्या राजांनी या परंपरेचे उच्चाटन कसे नाही केले त्याचे. मला तर असे वाटते आहे की मी एका धर्मवेड्या, अतिरेकी टोळक्यांच्या हातात सापडलो आहे की काय. का इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांच्या हातात सापडलोय ? पण मला हे समजत नाही की राजा या लोकांच्या हातात कसा सापडू शकतो. बहुधा हे सगळे कारस्थान ग्वाल्हेरचे असावे. त्यांना माझी हत्याच करायची आहे. पण शिंदे सरकार, मला माहीत आहे तुम्ही इंग्रजांचे हस्तक आहात. इंग्रज अत्यंत धूर्त आहेत याचा हा अजून एक पुरावासगळ्या जगाला माहिती आहे इंग्रजांनी तपकीर ओढली की ग्वाल्हेरमधे शिंका येतात

तारीख २५

आज पंतप्रधान माझ्या खोलीत आले. त्यांच्या पावलांचा आवाज ऐकल्यावर मी खुर्चीखाली लपलो. जेव्हा त्यांना मी दिसलो नाही तेव्हा त्यांनी मला हाका मारण्यास सुरुवात केली. “ कारकुंड्याऽऽ, महाराजऽऽऽ तुळोजी महाराज….. पण मी गप्प बसलो. शेवटच्या हाकेला मी ओ देणार होतो पण मी मनाशी म्हटले, ‘साहेब मला फसवू नका. मी आता तुम्हाला माझ्या डोक्यावर पाणी ओतू देणार नाही.”

पण त्यांनी मला पाहिले होते. हातातील काठीने ढोसून त्यांनी मला बाहेर काढले. तो दंडुका फार लागतो. पण त्याचवेळी लागलेल्या एका शोधाने मला फार वेदना झाल्या नाहीत. ‘प्रत्येक कोंबड्याच्या पंखाखाली त्याचे स्वत:चे एक इंदूर असते.’ तो रागारागाने निघून गेला. जाताना मला शिक्षा करणार अशी धमकी देऊन गेला. मला त्याच्या दुर्बळतेचे हसू आले. कारण मला माहीत आहे तो एक खेळणे आहे इंग्रजांच्या हातातील….

३४ मार्च फेब्रुवारी ३४९

आता हे सहन होत नाही. देवा रे ! माझं काय करणार आहेत ते? का माझ्यावर सारखं बर्फाचं पाणी टाकतात? इतर वेळी ते माझ्याकडे लक्षही देत नाहीत. त्यांना मी दिसत नाही ना माझा आक्रोश ऐकू येतो. ते का माझा छळ करताएत? माझ्या सारख्या अत्यंत फालतू माणसाकडून त्यांना काय पाहिजे आहे तरी काय ? माझ्याकडे तर देण्यासारखे काहीच नाही.. माझे डोके ठणकतेय. इतके की सगळे जग उलथेपालथे होतं आहे की काय असे वाटतंय. मला वाचवा ! मला वाचवा कोणीतरीइथून बाहेर काढा.. माझ्या रथाला घोडे जोडा.. घंटा बडवा, बिगूल वाजवाआणि येथून मला बाहेर काढा. इतक्या दूर दूर घेऊन जा की पुढचे काही दिसणारच नाही.

त्या वेगातही मला आकाशात दूरवर एक तारा चमचम करताना दिसतोय. चंद्रप्रकाशात काळसर झाडे मागे पळताएत. पायाशी निळसर धुके तरंगत वर वर येतंय.. ढगात संगीत ऐकू येतंय. एका बाजूला समुद्र आहे तर एका बाजूला रांगण्याचा किल्ला. त्याच्या पलीकडे मला माझं गाव दिसतंय. ते माझं गावातलं घर तर नाही ? माझी आई खिडकीशी माझी वाट पहात थांबली असेल.

आई ! आईऽऽऽ माझ्यावर दया कर. तुझ्या या दुर्दैवी मुलाला वाचव. तुझा एक अश्रू माझ्या ठणकणार्‍या कपाळावर पडू देत. बघ त्यांनी माझी काय अवस्था करून ठेवली आहे ते.. या अनाथ मुलाला जरा तुझ्या उराशी धर. त्याला जायला दुसरी जागा नाही गं. ते त्याच्या मागे शिकारी कुत्र्यासारखे लागलेत.

आईऽऽऽ आई गंऽऽऽ तुझ्या या वेड्या मुलावर दया करपण तुला हे माहीत आहे का की तुर्कस्तानच्या राजाच्या उजव्या गालावर एक मोठा तीळ आहे….

४३ एप्रिल ३५०

आता मी मस्त आहे. आज आश्रमातील मंडळी मला सोडवायला आली होती. त्यांनी काय जादू केली कोणास ठाऊक. सगळेजण आज माझ्याशी नीट वागले.
आज कसलाही शॉक दिला नाही ना औषध.
मला घ्यायला साठे, जगताप आणि सचिन आणि बरेच लोक आले होते. न्यायला मोठी अलिशान गाडी आणली होती त्यांनी.

आश्रमात गेल्यागेल्या मी अंगावरील कपडे फाडून उघडा नागडा झालो. त्याबरोबर सगळे मला धरायला धावले. साठे सगळ्यांच्या पुढेत्याला पाहिल्या पाहिल्या माझ्या डोक्यात एक सणक उठली. या साठ्यामुळेच माझ्या आईने आत्महत्या केली.. मी मूठ आवळली आणि त्याच्या थोबाडात इतक्या जोरात हाणली की तो कोलमडत मागे जाऊन पडला. त्याच्या अंगावर मी धावून गेलो. आता त्याला लाथेने तुडवावा म्हणून मी पाय उचलला तेवढ्यात त्यांनी तो दोन्ही हाताने धरला व माझ्या पायावर लोटांगण घातले. इतरांना वाटले तो माझा आशीर्वाद मागतोय. मग मीही त्याला आशीर्वाद दिला….

बघा मी म्हणत नव्हतो आपल्या महाराजांचे त्याच्यात काहीतरी आले असणार म्हणून….” साठे म्हणत होतासगळ्यांनी एकच जयजयकार केलामीही त्याला प्रेमाने आलिंगन दिले….

मी आकाशाकडे पाहून वर हात फेकले आणि बाबांना साद घातली,

बाबा बघा झालो की नाही मी शहाणा….. ?”

गोगोल निकोलाय याच्या ‘‘Diaries of a Madman” या कथेवर आधारित.
लेखक : जयंत कुलकर्णी.

या भाषांतराचे सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन आहेत.

 

 

Posted in कथा | Leave a comment

पाण्याचे थेंब…

परवा फ्रेंच राज्यक्रांती लिहून लिहून कंटाळा आल्यावर थोडे छायाचित्रण केले… त्यातील काही छायचित्रे!

  • जयंत कुलकर्णी
Posted in छायाचित्रे, मी काढलेली छायचित्रे | 1 Comment

राणीचा (मारी ॲन्टोनेट) शिरच्छेद भाग – २

..लुईची रवानगी गिलोटीनच्या वधस्थळावर झाली आणि मारी ॲन्टोनेट घाबरली, पण तिला अजूनही आशा वाटत होती, की तिला फार तर देशाबाहेर हाकलतील, तिचा शिरच्छेद करणार नाहीत.

पुढे..

अर्थात असे काही झाले नाही, तिच्या लहान मुलाला तिच्यापासून हिरावून घेण्यात आले आणि शिक्षकांच्या स्वाधीन करण्यात आले. त्याला सुरुवातीस बरी वागणूक मिळाली, पण लुईच्या वधानंतर तो दुफां झाल्यामुळे क्रांतिकारकांना त्याचीही अडचण होऊ लागली. त्याच्या आजाराकडे जाणून बुजून दुर्लक्ष करण्यात आले आणि मारी ॲन्टोनेटच्या मृत्यूनंतर दोन वर्षाच्या आत आजारात त्याचा मृत्यूही झाला. म्हणजे अधिकृत सरकारी अहवालात असे लिहिले आहे म्हणून ते खरे मानायचे. काही लोकांनी त्याचा खून करण्यात आला अशी शंकाही व्यक्त केली आहे. मुलगा आजारी पडल्यावर ॲन्टोनेट दुःखाने वेडीपिशी झाली. तिला सोडवण्याचे प्रयत्न झाले, पण ते असफल झाले. दातोंने तर ऑस्ट्रियाशी बोलणी करताना तिला वाचवण्याचा प्रयत्नही करण्याचे ठरवले होते, पण दुर्दैवाने ऑस्ट्रियाने तिला दगा दिला, कारण या राज्यक्रांतीत तिचा बळी गेला असता, तर युरोपमध्ये फ्रान्सविरुद्ध वातावरण तापले असते जे ऑस्ट्रियाला पाहिजे होते. तिला नंतर कॉनसिएरजेरी नावाच्या तुरुंगात आणण्यात आले. तेथे तिची आणि मादाम एलिझाबेथ आणि तिच्या मुलीची ताटातूट करण्यात आली. तिच्यावर दिवसरात्र देखरेख ठेवण्यासाठी दोन पहारेकरी आणि एका मोलकरीणीची व्यवस्था करण्यात आली. ती या तुरुंगात सकाळी आपल्या कपड्यालत्त्यात वेळ काढायची आणि उरलेला दिवस आठणींवर काढायची. तिला भरपूर अन्न आणि कपडे पुरवण्यात येत होते. तिच्यावर सतत पहारा असे त्यामुळे ती चिडचिडी झाली. तिची तब्येत ढासळली. दिवसेंदिवस ती निराश दिसू लागली. ती कुठेतरी नजर लाऊन शांत बसत असे. पत्ते खेळणाऱ्या पहारेकऱ्यांकडे पाहताना बिचारीच्या शरिराला भीतीने कंप सुटत असे, किंवा क्वचित ती काहीतरी वाचत बसे. कधी कधी तिची पहारेकरीण तिच्या मुलाला घेऊन येई, तेव्हा मात्र ती निराशेतून थोडावेळा का होईना बाहेर पडत असे आणि त्या मुलाबरोबर खेळत बसे. त्या मुलाला पाहताच तिला दुफांची आठवण येत असे आणि मग ती त्याच्याबद्दल बोलत बसे. मुलाला घेऊन आल्यावर ॲन्टोनेटला दुःखच जास्त होत आहेत हे पाहिल्यावर मात्र तिने त्या मुलाला सोबत आणणे बंद केले.

जेव्हा उर्वरित युरोपच्या फौजा जवळ येऊ लागल्या तसे राणीच्या खटल्याची मागणी जोर धरू लागली. कैद झालेल्या फ्रान्सच्या दुतांना ऑस्ट्रियाने जी अमानुष वागणून दिली त्याला उत्तर म्हणून अशी मागणी केली गेली असावी असे मानण्यास जागा आहे. कॅपेटचा मृत्यू संसदेमुळे झाला आणि त्याच्या विधवेचा मृत्यू पॅरिस, न्यायालय आणि क्रांतिकारकांच्या सैन्यामुळे होऊ देत असे जनता म्हणू लागली. हेबरने जनतेला मारी ॲन्टोनेट जिवंत राहणार नाही असे वचन दिले होते आणि ते वचन पाळण्यास उशीर होत असेल तर तो स्वतः जाऊन तिला मृत्युदंड देईल असे त्याने जाहीरपणे सांगितले होते. याशिवाय सीमेवरील युद्धाच्या भयंकर बातम्या जशा फ्रान्समध्ये पोहोचू लागल्या तसे जनता राणीचा अधिकच द्वेष करू लागली. शेवटी ऑक्टोबर महिन्यात एके रात्री तिला कुठल्यातरी बोळातून एका मोठ्या दालनात नेण्यात आले. एवढ्या मोठ्या दालनात फक्त दोन मेणबत्त्या तेवत मंद प्रकाश फेकत होत्या. त्या भयाण वातावरणात तिची उलटतपासणी सुरू झाली. तिने सगळ्या आरोपांचा इन्कार केला आणि सांगितले, की तिने नेहमीच फ्रान्सचे हीत चिंतले आहे. पण तिच्या दुःखाने तिचे धैर्य झाकाळून टाकले होते हे स्पष्ट दिसत होते. तिने कागदपत्रांवर ‌‘‌‘विडो कॅपेट‌’‌’ (लुईची विधवा) अशी सही केली. त्याच वेळी, तिला पाहिजे असेल तर ती वकील देऊ शकते असे सांगण्यात आले. ते ऐकून ती परत तिच्या कोठडीत परतली.

जेव्हा बर्क (बर्क इंग्लंडच्या संसदेचा दीर्घकाळ सदस्य होता – १७६६ ते १७९४. तो संसदपटू होता, लेखक होता आणि तत्त्वज्ञानीही होता. त्याने ‌‘‌‘रिफ्लेक्शन्स ऑन द फ्रेंच रेव्होल्युशन‌’‌’ या नावाचा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला) काही वर्षापूर्वी व्हर्सायला गेला होता तेव्हा त्याने सजलेल्या धजलेल्या मारी ॲन्टोनेटला पाहिले होते. ‌‘‌‘तिच्या चित्तवृती प्रफुल्लीत होत्या..पहाटेच्या ताऱ्याप्रमाणे ती चमकत होती. रसरसलेली, सुंदर आणि आनंदी दिसणारी मारी ॲन्टोनेट मी विसरू शकत नाही.‌’‌’ फ्रान्स आता तिला विसरला होता. तिच्या जनतेला त्यांच्याच राणीवर आता खटला चालवायचा होता आणि तिला ठार मारायचे होते. दुःखाने वेडीपिशी झालेली ॲन्टोनेट आता मानसिक दृष्ट्या खचली. ती त्या तथाकथित खटल्याला निर्विकारपणे आणि त्रयस्थपणे सामोरी गेली. ही चौकशी सकाळी आठ वाजता सुरू व्हायची ते दुपारी चार पर्यंत चालायची. मग परत पाचला सुरू व्हायची ती पार मध्यरात्रीपर्यंत चालायची. या खटल्यादरम्यान ती तिच्या खुर्चीत बसून, न्यायाधिशांकडे पाहात, स्तब्ध बसत असे. तिच्यावर उधळपट्टी, (ज्याने फ्रान्सवर दिवाळखोरीची वेळ आणली), फ्रान्सविरुद्ध युद्ध लढण्यासाठी युरोपला पैसे पाठवणे, ऑस्ट्रियाबरोबर कट कारस्थाने करत तिच्या नवऱ्याला स्वतःच्या देशाविरुद्ध कारवाया करण्यास भाग पाडणे असे आरोप ठेवण्यात आले. दुर्दैवाने यातील बहुतेक आरोप खरे होते. राणीने अर्थातच हे सगळे आरोप तिला अमान्य आहेत हेच नम्रपणे सांगितले. सहानुभूती राणीच्या बाजूने वळते आहे असे दिसताच, त्या प्रसंगात हेबरने प्रवेश केला. त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ॲन्टोनेटच्या मुलाकडून दहशतीखाली काही वाट्टेल ते वदवून घेतले होते. त्याचा उपयोग करून त्याने ॲन्टोनेटवर स्वतःच्या मुलाशी लैंगिक चाळे केल्याचा आरोप केला. ते आरोप इतके बेशरमपणाचे होते, की एका न्यायाधिशाला ते ऐकवेनात. त्याने ते कागद पटपट वाचण्याची विनंती केली. एका ज्युरीने राणीने उत्तर द्यावे असा आग्रह धरला, पण तिने अशा बेशरम आरोपांना कुठलेही उत्तर देण्यास नकार दिला. जेव्हा तिला विचारण्यात आले, की ती गप्प का? तेव्हा तिने उत्तर दिले, ‌‘‌‘ मी यावर गप्प आहे कारण हे नैसर्गिक नाही आणि परमेश्वर या गोष्टीचा तिरस्कारच करतो.‌’‌’ त्याच वेळी ती उभी राहिली आणि तिने उपस्थित असलेल्या स्त्रियांना, मातांना हे काय चालले आहे अशी विचारणा केली. ती म्हणाली, ‌‘‌‘येथे जमलेल्या सर्व मातांना मी विचारते, कुठलीही आई असे वागू शकते का?‌’‌’ तेथे जमलेल्या सर्वच स्त्रियांना तिला मृत्यूदंड द्यायचा होता, त्यांच्यातही कुजबुज सुरू झाली. हेबरने हे जे घाणेरडे आरोप ठेवले ही काही त्याच्या एकट्याची कल्पना नव्हती. मारी ॲन्टोनेटचा एक मित्र होता ल मार्क नावाचा. त्याने असा दावा केलाय, की या बदनामीमागे दरबारातील तिच्या शत्रूंचा सहभाग होता. त्यांनी राणीची प्रतिमा खराब होईल, ती बदनाम होईल अशी मोहीमच चालवली होती. जनतेच्या मनात तिची प्रतिमा एक भयंकर स्त्री अशी करण्याची हेबर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी योजना आखली होती आणि त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली.

उलटतपासणीच्या पहिल्या दिवशी मारी ॲन्टोनेट अगदी थकून गेली. इतकी की, तिला गाढ झोप लागली. त्याचाही फायदा तिच्या विरोधकांनी करून घेतला. दुसऱ्या दिवशी तिने नेकलेसच्या प्रकरणात तिचा कसलाही सहभाग नव्हता हे ठामपणे सांगितले. तणावामुळे तिला ग्लानी येऊ लागली.. तिला समोरचे दिसेनास झाले. शेवटी तिला धरून तिच्या कोठडीत परत नेण्यात आले. जेव्हा ती परत न्यायालयात आली तेव्हा तिला अजून काही सांगायचे आहे का असे रिवाजाप्रमाणे विचारण्यात आले. यावर ‌‘‌‘काही नाही!‌’‌’ असे सांगून तिने न्यायालय सोडले. कोठडीत परतल्यावर तिने तिच्या मेहुणीला पत्र लिहिले व तिला आपण निर्दोष असल्याची ग्वाही दिली. नंतर तिने जमिनीवर अंग टाकले आणि खिडकीकडे एकटक पहात राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. अखेरीस न्यायालयाचे सदस्य निकाल वाचण्यास तिच्या कोठडीत आल्यावर तिने अंग चोरून घेतले. त्यांनी तिची मनगटे बांधली आणि कापण्यासाठी तिचे केस पकडल्यावर मात्र ती दचकली. तिला वाटले की तो तिला मारणार. त्या विचाराने तिला रडू फुटले. एका खिळखिळ्या झालेल्या गाडीतून तिला वधस्थानी नेण्यात आले. गाडीत ती एका फळकुटावर बसली होती. तिचा चेहरा पांढराफटक पडला होता. तिचे डोळे लालबुंद झाले होते आणि तिच्या एका डोळ्याला दिसत नव्हते. हात बांधलेले होते आणि तिच्या लिननच्या मळकट टोपीतून तिचे कापलेले केस बाहेर डोकावत होते. तिचे ओठ अपमानाने थरथरत होते. डेव्हिड नावाचा चित्रकार तिचे चित्र रेखाटत होता. तिच्या बरोबर एक ज्युरी-पाद्री काहीतरी पुटपुटत चालत होता. तिच्या कानावर आता जमावाचा आरडाओरडा, जल्लोश पडत नव्हता ना त्या पाद्य्राचे प्रवचन. जमाव मात्र बेफाम होऊन तिची अवहेलना करत होता, तिला शिव्याशाप देत होता. गिलोटीन दिसल्यावर तिने परत एकदा आपले अंग आक्रसून घेतले. ती गाडीतनू खाली उतरली. तिच्या मागे गिलोटीन चालवणारा सांसो चालत होता. पायऱ्या चढण्यासाठी त्याने तिला मदतीचा हात पुढे केल्यावर तिने त्याला नकार दिला आणि ती स्वतःच पायऱ्या चढून गिलोटीनच्या चौथऱ्यावर गेली. तेथे तिला एका फळीवर आडवे बांधण्यात आले आणि ती फळी गिलोटीनखाली सरकवण्यात आली. सांसोने खटका ओढल्यावर ते पाते सर्रकन खाली आले आणि तिचे शीर धडावेगळे झाले. सांसोने ते उचलले आणि हातात धरून जमावाला उंच करून दाखवले. ते पाहताच जमावाने उन्मादात ‌‘‌‘प्रजासत्ताक चिरायू होवो‌’‌’अशा तारस्वरात घोषणा दिल्या. तिचे अवयव एका स्नाशभूमीत नेऊन टाकण्यात आले आणि कित्येक दिवस त्यांच्याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही.

शिरच्छेद झाल्यानंतर जवळ जवळ १५ दिवसांनी म्हणजे १ नोव्हेंबर १७९३ या दिवशी एका थडगी खोदणाऱ्या माणसाने लुईच्या थडग्याशेजारी एक खड्डा खोदला आणि तिचे अवशेष त्यात पुरून टाकले. नियमाप्रमाणे त्याने खर्चाचा अहवाल प्रशासनाला पाठवला : विधवा कॅपेटचे दफन: बीअर: ६ लिव्हा. खड्डा खोदणारे – १५ लिव्हा’’

मारी ॲन्टोनेटने जे शेवटचे पत्र तिच्या नणदेला लिहिले, त्याचा अनुवाद खाली दिला आहे. मला वाटते आयुष्याच्या शेवटच्या काही क्षणात तिला जीवन हा एक गंभीर प्रकार आहे हे कळले असावे असो.. हे पत्र तिने १६ ऑक्टोबरला पहाटे साडेचार वाजून तीस मिनिटांनी लिहिले. या पत्रात तिने कसलीही सूडाची भावना प्रदर्शित केलेली दिसत नाही, उलट ती शांत झालेली दिसते.

… मी माझे शेवटचे पत्र तुला लिहित आहे. आत्ताच त्यांनी मला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली.. माझा मृत्यू हा लाजिरवाणा नाही.. गुन्हेगारांचा मृत्यू शरमिंदा करणारा असतो, पण मी तुझ्या भावाकडे चालली आहे. मी ही त्याच्यासारखी निर्दोष आहे आणि तो ज्या धिरोदात्तपणे मृत्यूला सामोरा गेला, त्याप्रमाणे मलाही जाता येईल अशी आशा करते. माझ्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून सांगते, मी निर्दोष आहे. माझे मन आता शांत आहे. माझ्या मुलांना मागे सोडून जाताना मला मनस्वी दुःख होतंय. तुला माहीत आहे की मी केवळ त्यांच्यासाठीच जगत होते.

आमच्याबरोबर राहून तू मोठाच त्याग केला आहेस, पण त्यामुळे तू स्वतःला संकटात टाकले आहेस आणि मला तुझी काळजी वाटतेय! माझ्या खटल्यादरम्यान मला कळले, की त्यांनी माझ्या मुलीलाही तुझ्यापासून हिरावून घेतले आहे. दुर्दैवाने मी तिला पत्र लिहू शकत नाही कारण मला माहीत आहे, की ते तिला कदापी मिळणार नाही. हे पत्रही तुझ्यापर्यंत पोहोचेल की नाही याची मला शंकाच आहे. माझे आशिर्वाद माझ्या मुलांना देशील का? मला खात्री आहे, की एक दिवस, जेव्हा ती मोठी होतील तेव्हा त्यांची आणि तुझी गाठ पडेल. तु त्यांच्यावर त्यांच्या आईसारखीच माया करशील आणि त्यात कधीही खंड पडणार नाही याचीही मला खात्री आहे.

माझ्या मुलांनी मी जे त्यांच्यावर संस्कार केले आहेत त्याप्रमाणे वागावे. प्रामाणिकपणे आपली कर्तव्ये पार पाडत जगणे हाच चांगल्या आयुष्याचा पाया आहे. त्यांचे एकमेकांवरचे प्रेम आणि एकमेकांबद्दल वाटणारा विश्वास यावर त्यांचे सूख अवलंबून आहे,. माझ्या मुलीचे वय पाहता, तिने आपल्या भावाची काळजी घेतली पाहिजे, तिच्या अनुभवावर अवलंबून आणि विचार करून तिने त्याला योग्य सल्ले द्यावेत. त्याचप्रमाणे तिच्या भावाने तिच्यावर प्रेम करावे आणि तिची कायम काळजी घ्यावी. थोडक्यात, संकटात आणि सुखाच्या क्षणी त्यांनी एकत्र राहावे. त्यातच त्यांचे भले आहे. त्यांनी आमचे उदाहरण घेण्यास हरकत नाही. संकट समयी एकमेकांवरील प्रेमच आपल्याला तारून नेते हे त्यांना समजावून सांग. यशामध्ये मित्रमंडळींना सहभागी करण्याने आनंद द्विगुणीत होतो हेही त्या दोघांना समजावून सांग. सगळ्यात जवळचा मित्र आपल्याला आपल्या कुटुंबाशिवाय कुठे सापडणार? माझ्या मुलाला सांग त्याच्या वडिलांचे शेवटचे शब्द कधीही विसरू नकोस.

‌‘‌‘माझ्या मुलाने माझ्या मृत्यूचा सूड घेण्याचा विचारही करू नये!’’

माझ्या मुलामुळे तुला आजवर खूपच त्रास झालाय याची मला कल्पना आहे. शक्य झाल्यास त्याला क्षमा कर. तो वयाने लहान आहे, निरागस आहे, लोक बोलतात ते तो बोलतो. एक दिवस असा उजाडेल जेव्हा त्याला तुझ्या प्रेमाची किंमत कळेल. हे लिहिताना मला फार वेदना होत आहेत. मीच त्यांना पत्रातून हे समजावले असते, पण घटना इतक्या वेगाने घडत गेल्या की मला पत्र लिहिता आले नाही, शिवाय मला पत्रे लिहिण्याची तेव्हा परवानगी नव्हती.

मी माझ्या पूर्वजांप्रमाणे रोमन कॅथॉलिक म्हणून मरणार आहे. माझ्यावर याच धर्माचे संस्कार झाले आहेत आणि आजवर मी हाच धर्म पाळत आले आहे. दुर्दैवाने आजच्या परिस्थितीत माझ्या बरोबर कोणी कॅथॉलिक धर्मगुरू असण्याची शक्यता नाही आणि एखाद्या धर्मगुरूने माझी भेट घेण्याचा विचार केला तर त्याच्यासाठी ते फारच धोकादायक ठरेल.

मी माझ्या आयुष्यात आजवर केलेल्या चुकांसाठी इश्वराची क्षमा मागते. उदार अंतःकरणाने तो मला क्षमा करेल आणि माझी शेवटची प्रार्थना ऐकेल अशी मला आशा आहे. मी कोणाला आयुष्यात दुखावले असेल, तर मी त्यांचीही क्षमा मागते आणि विशेषतः तुझी. मी कळत नकळत जर कधी तुला दुखावले असेल तर माझा तुला दुखवण्याच कधीच हेतू नव्हता हे लक्षात घे आणि मला त्यासाठी क्षमा कर! माझ्या ज्या शत्रूंनी मला इजा केली आहे त्यांना मी क्षमा करत आहे. मी याच पत्रातून माझ्या सर्व बहीण भावांचा, आत्यांचा, मावशांचा निरोप घेते. मला अनेक मित्र, मैत्रिणी आहेत आणि त्यांना कायमचे सोडून जाण्याच्या कल्पनेने मला अत्यंत दुःख होत आहे. मी माझ्या शेवटच्या क्षणी त्यांचा विचार करत होते हे कृपया त्यांच्या कानावर घालशील का?

माझ्या लाडक्या प्रेमळ बहिणीचा आता मी निरोप घेते. हे पत्र तुला मिळो अशी मी इश्वराच्या चरणी ¬प्रार्थना करते. मला विसरू नकोस. आता मी या पत्रातूनच तुला आणि माझ्या बिचाऱ्या मुलांना अलिंगन देते. त्यांना कायमचे सोडून जाण्याच्या कल्पनेने माझ्या जिवाची घालमेल होतेय.. मी आता या जगाचा निरोप घेते! आता मी थोडेसे ध्यानचिंतन करते. ते बहुतेक माझ्याकडे धर्मगुरू पाठवणारच नाहीत, पण जरी पाठवला तरी मी त्याच्याशी काही बोलणार नाही.. आपण त्रयस्थाशी कधी बोलतो का?

– मारी ॲन्टोनेट.

बहुधा शेवटी शेवटी या कॅथोलिक स्त्रिला परमेश्र्वरही परका वाटू लागला असावा…

-जयंत कुलकर्णी

खाली जे चित्र, गाडीत रेखाटले गेले होते ते दिले आहे. ‘‘डेव्हिड नावाचा चित्रकार तिचे चित्र रेखाटत होता.’’

May be an illustration

Posted in इतिहास, कथा | 1 Comment

‘‘हेन्री डेव्हिड थोरो – चरित्र व निबंध’’

नमस्कार!…

१२ जुलै १८१७ या दिवशी एका अत्यंत साध्यासुध्या, विचारवंताचा जन्म झाला. हेन्री डेविड थोरो ! म्हणजे बरोबर २०४ वर्षांपूर्वी. त्याच्या विचारांचा पगडा अनेक थोर माणसांच्या मनावर होता. मरावे कसे हे थोरो या माणसांकडून शिकावे. पण आपण खऱ्या अर्थाने जगत नाही मग आपण मरणार कसे? हा रास्त प्रश्न पडणारा माणूस थोरच म्हणायचा! थोरो थोर आहे. मला तर वाटते मराठीत थोर हा शब्द थोरो या शब्दांवरूनच तयार झाला असावा. (far stretched)

थोरोंच्या जन्मदिनानिमित्त त्याच्या चाहत्यांना एक खास भेट. एक नवीन पुस्तक ‘‘हेन्री डेव्हिड थोरो – चरित्र व निबंध’’लेखक/अनुवादक : जयंत कुलकर्णी.प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन

हे पुस्तक १२ जुलैला सर्वत्र उपलब्ध होईल. पुस्तकासाठी कृपया संपर्क साधावा.या पुस्तकात त्याचे चरित्र आणि निबंध आहेत…

मेमेंटो मोरी……

मृत्यू अटळ आहे. मला तर वाटते अमेरिकेत अजूनतरी एकही माणूस मृत्यू पावलेला नाही कारण मृत्यूसाठी अगोदर जगावे लागते. माझा शववाहिकांवर, कफनांवर आणि अंत्यविधींवर विश्वास बसणे कठीण आहे कारण ही माणसे खऱ्या अर्थाने जगलीच नाहीत. ही माणसे शेणाच्या खतासारखी या जगात हळूहळू कुजत गेली आहेत. यांच्या थडग्यासाठी मानाची जागाही नाही… कुठेतरी खड्डा खणलाय बस्स..! मी बऱ्याच जणांना ते मरणार आहेत असे ढोंग करताना पाहतो; किंवा ते मेले आहेत असेही ऐकतो. शक्यच नाही! मी त्यांना आव्हान देतो, त्यांनी मरून दाखवावे. मरायला ते जिवंतच नाहीत, तर मरणार कुठून? मी सांगतो हे असेच कुजत राहतील आणि आपल्याला त्यांच्या जागा साफ करण्याचे काम लावून जातील. माझ्या दृष्टीने जगाच्या प्रारंभापासून आत्तापर्यंत फक्त सहा-सात लोक मेले असतील. ‘मेमेंटो मोरी’ म्हणजे‘प्रत्येकाला मेलेच पाहिजे’ या अत्यंत महत्त्वाच्या वाक्याचा खरा अर्थ आपल्याला अजून कळलेलाच नाही…

महात्मा गांधी आणि थोरो…

महात्मा गांधींनी जेव्हा अमेरिकन जनतेला उद्देशून लेख लिहिला, त्यात ते म्हणाले, “माझ्या अमेरिकन मित्रांनो! अमेरिकेने मला थोरोंच्या रुपाने एक गुरू दिला आहे. मी जो लढा उभारला आहे त्याचे ठाम व वैचारिक पुष्टिकरण मला थोरो यांच्या “ड्युटी ऑफ सिव्हिल डिसओबिडिअन्स” या निबंधात मिळाले आणि मी दक्षिण आफ्रिकेत जे काही करत होते ते काही चुकीचे नव्हते याचा हा मोठा पुरावा आहे.”…

प्रेम…

मला तर असे वाटते की, तिला काहीही न सांगता सगळे समजले पाहिजे. मी माझ्या प्रेयसीपासून दूर झालो कारण मला तिला एक गोष्ट सांगावी लागली होती. त्यावर तिने मला प्रश्न विचारले. खरे तर तिला ते समजायला हवे होते. माझे तिच्यावर प्रेम आहे हे मला सांगावे लागले हाच आमच्यातील फरक होता. त्यालाच दुसऱ्या शब्दात म्हणतात ‘गैरसमज’.मला खात्री आहे हे पुस्तक आपल्याला आवडेल… माझे हे पुस्तक मधुश्रीेने प्रकाशित केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो.

बऱ्याच वाचकांनी हे पुस्तक माझ्याकडून मिळेळ का? अशी विचारणा केली. हे पुस्तक माझ्याकडे मिळू शकते.

किंमत : ३००
वजा सवलत @ 20 % : ६०
किंमत : २४०अधिक
पोस्टेज : ४०
पाठवण्याची रक्कम : रु २८०.००
कृपया पैसे भरल्यावर मला आपला पत्ता व पैसे भरल्याचा स्क्रीनशॉट पाठविण्यास विसरु नये. पूर्वी ज्यांनी विजयनगर घेतले आहे, त्यांनी पत्ता पाठवण्याची आवश्यकता नाही *अर्थात, वेगळा पत्ता नसेल तर.

गुगलपे jayantckulkarni@okaxis

किंवा Net Banking

Kulkarni Jayant A/c No. 15150100000481 Bank Of Baroda Gultekadi Branch. IFSC : BARB0GULTEK ( 5th character is zero)

– जयंत कुलकर्णी

Posted in प्रवर्ग नसलेले, मी लिहिलेल्या पुस्तकांबद्दल... | Leave a comment