वॉल्डन

background-bloom-blossom-76997

…. मे महिन्याच्या सुरुवातीला ओक, हिकरी, मॅपल आणि इतर झाडे देवदाराच्या रानातून डोकावू लागली आणि त्यांच्या झळाळीने जंगलातील वातावरणात एकदम उजेड पडला. ते उजळून गेले. जणू काही एखाद्या ढगाळ दिवशी जंगलातील वृक्षातून सूर्याची किरणे फाकली आहेत. मे महिन्याच्या तीन तारखेला (किंवा चार तारीख असेल) मी तळ्यावर लून पक्षी पाहिला आणि पहिल्या आठवड्यात मी व्हिपुरविलची शीळ ऐकली. नंतर आले ब्राऊन थ्रॅशर, व्हिरी, वुड पेवी, च्युविंक आणि असे अनेक इतर पक्षी. त्यांचा किलबिलाट मी भान विसरुन ऐकत राहिलो. मी वुड थ्रशचा आवाज केव्हाच ऐकला होता. याला कसा विसरलो बरे मी ! माझे घर एखाद्या कपारीसारखे सुरक्षित आहे का हे पाहण्यासाठी फिबी पक्षाची मादी पंख फडफडवत, गाणे गुणगुणत माझ्या दरवाज्यात दुसर्‍यांदा डोकावून गेली. पिच देवदारांच्या गंधकासारख्या रंगाच्या परागकणांचा तळ्याच्या पाण्यावर, किनार्‍यावर, ओंडक्यांवर, आणि खडकांवर एक थर साठला. इतका दाट की तुम्ही ते कण पिंपात सहज भरू शकला असता. गंधकाची वृष्टी म्हणतात ती हीच असावी. कालिदासाच्या शाकुंतल नाटकातही त्याने ‘झरा, कमळांच्या परागकणांनी पिवळा धमक झाला’ अशी कल्पना वापरली आहे.

शेवटी ऋतूचक्र फिरले आणि जंगलात फेरफटका मारणारा माणूस जसा उंच गवतात लुप्त होतो तसा हिवाळा लुप्त होत होत वसंत ऋतू अवतरला…

जंगलातील माझे पहिले वर्ष हे असे संपले. दुसरे वर्षही मी असेच व्यतीत केले. अखेरीस जड अंत:करणाने मी सप्टेंबर ,६, १८४७ या दिवशी वॉल्डनचा निरोप घेतला…

….आज वॉल्डनचे भाषांतर संपवले. वॉल्डनने मला काय दिले हे विचारण्याऐवजी काय दिले नाही हे विचारणे जास्त संयुक्तिक होईल. वॉल्डनने मला दिला एक वेगळा विचार आणि आज शेतकर्‍यांची अशी अवस्था का आहे याचेही उत्तर दिले.. असो.

आता कोणी छापतंय का ते पहावे लागेल.. 

अर्थात प्रकाशक शोधताना थोरोचे हे वाक्य माझ्या लक्षात असेलच… 

…. मी बराच काळ एका जर्नल मधे वार्ताहर म्हणून काम करत होतो. या जर्नलचा खप विशेष नव्हता. या जर्नलच्या संपादकांना माझे लेख कोण वाचणार अशी शंका होती म्हणून संपादक ते छापत नव्हते. हा अनुभव बहुतेक लेखकांना कधी ना कधीतरी येतोच. किंबहुना हे जर्नल फक्त एकच वाचक वाचत असे. याचा संपादकही मीच होतो व तो एकमेव वाचकही मीच होतो….

जयंत कुलकर्णी.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in भाषांतर, लेख. Bookmark the permalink.

1 Response to वॉल्डन

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s