भोजनालय का ……………..

भोजनालय का…….

हंपीला दोन वर्षापूर्वी गेलो होतो. गाडी थांबवताच मन थक्क झाले. या भेटीदरम्यान बरेच म्हणजे खुपच फोटो काढले ते फोटो आणि इतिहास याची सांगड घालून एक भला मोठ्ठा (नेहमीप्रमाणे 🙂 ) लेख लिहायचे मनात आहेच पण त्या अगोदर एक लक्षात आलेली गोष्ट तुम्हाला सांगायचीय. जे मी लिहीणार आहे ते बरोबर आहे का हे ठरवायचे काम तज्ञांचे आहे. आपले मत मांडायला काय हरकत आहे ? या विचारातून धाडस करून हा उद्योग करत आहे.

आमच्या गाईडने आम्हाला हंपी मधे खूप फिरवले. जवळ जवळ चार दिवस आम्ही त्या भग्न शहरात हिंडत होतो. एका ठिकाणी तो आम्हाला “चला तुम्हाला सैनिक जेथे जेवण करायचे ते ठिकाण तुम्हाला दाखवतो” असे म्हणून घेऊन गेला.

गेल्यावर बघतो तो काय मधे एक छोटा कालवा काढला होता आणि त्याच्या दोन्ही बाजूला दगडात कोरलेले केळीची पाने, वाट्या व ताटे. गाईड म्हणाला “ या कालव्यातून त्या काळी पाणी वहात असे. जेवण झाले की त्या वहात्या पाण्यात हात धुवायचे, उरलेले अन्न त्यात टाकून दिले की झाली स्वच्छता. अजूनही काही पर्यटक, त्यात काही विदेशीही होते, आश्चर्यचकीत होऊन विस्फारलेल्या डोळ्याने ते भोजनालय पहात होते. आमचा गाईडही खूष.

मला शंका आली ज्या राजाच्या पदरी लाखो सैनिकांचे सैन्य होते, त्याच्या शरीररक्षकांसाठी तरी ही व्यवस्था कशी पुरेल ? मी ही शंका त्याला विचारल्यावर त्याने खास सरकारी उत्तर दिले “ मी सरकारी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे आणि त्यात आम्हाला हेच सांगण्यात आलेले आहे, तेच मी तुम्हाला सांगतोय”.

तेवढ्यात एका ठिकाणी माझे लक्ष गेले आणि मी मनात म्हटले अरेच्या या ताटाला उलट्या वाट्य़ा कशाला जोडल्यात ? मी त्याला पुढे जायला सांगितले आणि तेथे थोडा वेळ निरिक्षण केले. फौंड्रीत काम केले असल्यामुळे माझ्या लक्षात आले की ते सगळे Permanent Die Moulding चे साचे असावेत. ज्याप्रमाणे मोल्डींग बॉक्सचे दोन भाग असतात त्याप्रमाणे याचेही होते. जादा रस व हवा वाहून जाण्यासाठी खाचाही मारलेल्या होत्या. एवढेच नाही तर याच्यावर दोन्ही साचे एकामेकांवर बरोबर बसावेत म्हणून Dowels ही आहेत. बहुतेक याच्यात तांब्याची ताटे तयार करत असावेत व ते मोल्ड फोडल्यावर आतील ताट लगेच गार करण्यासाठी त्या वाहत्या पाण्यात टाकत असावेत….

खालील छायाचित्रे बघा आणि सांगा पटते आहे का मी काय म्हणतो आहे ते ……

यात एकही साच्याची जोडी दिसत नाही पण थोडी शोधली तर मला वाटते सापडेल. जरा उत्खनन करायला लागेल. खालच्या पेट्यांची रांग अगोदर टाकतात मग त्यावर वरची पेटी टाकतात व मातीने लिंपतात मग त्यात रस ओततात. थोडे गार झाल्यावर तो साचा परत फोडतात व आतील वस्तू लगेच पाण्यात टाकतात….

थोडक्यात हे भोजनालय नसून एक फौंड्री आहे…… हे पटले तर पुढच्या वेळेस तेथे जाल तेव्हा हेच सांगा….की ही १००० वर्षापूर्वीची Permanent Die फौंड्री आहे…

जयंत कुलकर्णी.

Advertisements

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in इतिहास. Bookmark the permalink.

3 Responses to भोजनालय का ……………..

  1. महेंद्र म्हणतो आहे:

    छान माहिती आहे.. इतका विचार इतर कोणी केला असेल की नाही याची शंकाच आहे. पोस्ट आवडली

  2. महेंद्र म्हणतो आहे:

    हे गाईड जे सांगतात, त्यातलं ७० टक्के कपोलकल्पित असतं, हे पुन्हा सिद्ध झालं यावरून.

  3. संजय नाईक म्हणतो आहे:

    यातील प्रत्येक साचा वेगळा आहे हे ही लक्षात घेतले पाहिजे. ही जागा सैनिकांना जेवण्यासाठी वापरत असते तर सर्व साचे समान करण्यास हवे होते. विजयनगर साम्राज्यात अशी असमानता नसावी..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s