पराभवाचे श्राद्ध भाग-६

मागील प्रकरणात लिहिलेल्या प्रकरणांमधे श्री. कृष्णमेनन यांचीच फक्त चूक होती का ? कारण तो माणूस उद्धट असेल, त्याची वागण्याची तर्हा विचित्र असेल पण तो दूधखूळा नव्हता. उलट ते संरक्षणमंत्री झाल्यावर सेनादलात उत्साहाचे वातावरण पसरले होते, हेही मी लिहीलेच होते. कर्नल आठवले ज्यांनी १९६२ सालच्या युद्धाचा अधिकृत सरकारी इतिहास लिहीला आहे ते काय म्हणतात ते बघू –
But the biggest ‘mystery’ of 1962 is the non-use of offensive air power by India. The whole conflict was run as a personal show by Kaul and there was very little co-ordination with the air force. At that time the Chinese had barely two airfields in Tibet and their fighter aircraft were decidedly inferior to India’s British-made Hunters.
The Indian Air Force was guaranteed virtual air superiority on the battlefield. With air power on its side, India could have overcome the tactical disadvantage of lack of artillery in Ladakh and could have intercepted the foot and mule columns of the Chinese in Tawang area (like it did during the Kargil conflict in 1999). But such was the irrational fear of Chinese retaliation against Indian cities that India did not use its air power.
This fear of danger to cities was a result of panic in Calcutta… The only long-range aircraft the Chinese had at that time was the Ilyushin 24, operating at extreme ranges. The Indian Air Force with its network of airfields in the East (thanks to World War II) was well capable of dealing with it.

Right till the end, Krishna Menon was in favour of use of air power, but was overruled by a leadership that had lost its nerve. Use of offensive air power could have tilted the balance on the ground and boosted the morale of our troops. The morale factor is of great importance as essentially even the Sela disaster was due to loss of morale.

स्व. यशवंतरावांचे आणि त्यांच्या निर्णयाचे महत्व आपणास आता कळले असावे.

१९६२ साली झालेल्या आपल्या सेनेच्या काही आघाडींवर झालेल्या पानिपतानंतर दोन चकमकींनी आपल्या सैन्याचा आत्मविश्वास अतोनात वाढवला आणि चिनी राज्यकर्त्यांना व सैनिकांना ज्या सैनिकांनी दोन महायुद्धात भाग घेतला होता त्यांची खरी ओळख झाली. या चकमकी जवळजवळ तुल्यबळ सैन्यामधे होत्या असे म्हणायला हरकत नाही. त्यातली पहिली चकमक किंवा लढाई होती “नथू” खिंडीत (नथू-ला) आणि दुसरी झाली “चो” खिंडीत (चो-ला). समोरा समोर झालेल्या या चकमकींमधे सैनिकांच्या शौर्याची खरी कसोटी लागते. अर्थात आपले सैनिक यात कधीच मागे पडले नाहीत. भाग घेतलेल्या माऊंटन डिव्हिजनचे प्रमूख होते मे. जनरल सगत सिंग, कोअर कंमांडर होते ले. जनरल अरोरा आणि पुर्व कमानचे प्रमूख होते ज. सॅम मानेकशॉ.

उंचीवर लढाईचे तंत्र वेगळे असल्यामुळे आता सर्व सैनिकांना व आधिकार्यां ना त्या वातावरणाची सवय पद्धतशीरपणे करून दिली जात होती. त्यांचा दमसासही उत्कृष्ट राहील याची काळजी घेतली गेली. त्यासाठी अनेक दिवसांचे प्रशिक्षण आखलेले होते आणि प्रत्येकाला त्यातून जाणे भाग होते. नथू-ला खिंडीच्या जवळ साधारणत: एक मैलांवर अजून एक खिंड आहे. या खिंडीच्या उंचीमुळे नथूलाचा सगळा परिसर येथून दृष्टीक्षेपात येतो. महत्वाचे म्हणजे चिनी सैन्याच्या हालचाली व पुर्वेकडे असलेल्या एका टेकाडावरचे चिनी ठाणे हे या साबू खिंडीतून स्पष्ट दिसते. या खिंडीत आपल्या सैन्याने दोन चौक्या उभ्या केल्या होत्या आणि त्यांच्याजवळ चांगली बिनतारी संदेश यंत्रणाही देण्यात आली होती. याहून महत्वाचे म्हणजे मागे असलेल्या तोफखान्याशी त्यांचा संपर्क टेलिफोनने जोडलेला होता. हा फार महत्वाचा असतो. थोडक्यात हे ठाणे त्या तोफखान्याचे “OP” म्हणून उत्कृष्ट काम करु शकत होते.

नथू-ला ही एक १४२०० फुटावर असलेली महत्वाची खिंड आहे आणि या रस्त्यावरून चीनच्या हद्दीतील जनतेशी स्थानिक जनता व्यापार करते. हाच तो प्रसिद्ध प्राचीन गंगटोक-याटूंग-ल्हासा व्यापाराचा रस्ता. १८९० साली झालेल्या चीनी-इंग्लंड करारानुसार खरे तर या दोन (सिक्कीम-चीन) देशांची सीमारेषा नीट आखून दोन्हीकडून मान्य करण्यात आली होती पण चीनला सिक्कीमची सीमा रेषा खूपत होती याचे अजून एक कारण होते ते म्हणजे सिक्कीम मधे करारानुसार असलेले भारतीय सैन्य. १९६५ साली झालेल्या पाकिस्तानच्या युद्धादरम्यान चीनने भारताला नथू-ला आणि जेलेप-ला या दोन खिंडी खाली करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला आणि न समजलेल्या कारणांसाठी जेलेप-ला ही खिंड खाली करण्यात आली.( या संधर्भातील कागद्पत्रे अजून उघड करण्यात आली नाहीत ती तातडीने करायला पाहिजे आहेत. ही खिंड अजूनही चिन्यांच्या ताब्यात आहे.) ज. सगत सिंग यांनी नथूला खाली करायला मात्र ठाम नकार दिला. भारत-चीन या दोन देशांच्या एकूण ४००० कि.मी. सीमारेषेवर याच ठिकाणी दोन्ही सैन्ये सगळ्यात जवळ उभी ठाकली आहेत. खिंडीचा पूर्व भाग हा चिनच्या ताब्यात आहे तर अलिकडचा आपल्या.

लाल रेषा सीमारेषा दर्शवते.

ही चकमक उडाली तेव्हा २-ग्रेनेडियर्स ही रेजिमेंट तेथे पहार्या वर होती. या बटालियनचे प्रमूख होते ले. कर्नल राय सिंग. दररोज चिनी सैनिक आणि भारतीय सैनिक या रस्त्यावर आपापल्या हद्दीपर्यंत गस्त घालतात, त्यामुळे रस्त्याच्यामधे जेथे सीमारेषा आहे तेथे ते एकामेकांपासून काहीच फूटांवर असतात. या गस्तीदरम्यान वादावादी, धुसमुसळेपणा हा नित्याचाच असतो. तसे झाल्यावर आधिकारी ती भांडणे समजूतीने मिटवतात व परत दैनंदिन कार्यक्रम चालू होतो. चिनी बाजूला इंग्रजी येणारा त्यांचा राजकीय अधिकारी असतो आणि तो ओळखता येतो तो त्याच्या टोपीवरच्या एका लाल तार्या ने. अशाच एका वादावादीचे पर्यावसान ६ सप्टेंबरला धक्काबूक्कीत झालेच. या प्रकरणात तो जो लाल तारेवाला राजकीय आधिकारी होता तो खाली पडला आणि त्याचा चष्मा तुटला. या प्रसंगामुळे निर्माण झालेला तणाव लक्षात घेता भारतीय आधिकार्यां नी त्या रस्त्यावर सीमारेषेवर तारेचे कूंपण घालायचे ठरवले.

हे काम देण्यात आली ७०-इंजिनियर्सना देण्यात आले व त्यांच्या संरक्षणासाठी १८-राजपूतची एक कंपनी. ११ सप्टेंबरला पहाटे हे काम चालू करायचे ठरले. ११ सप्टेंबरची पहाट स्वच्छ उगवली, नाहीतर इतरवेळी धूकेच धूकेच असते. इंजिनियर्सने खांब रोवायला सुरवात केली त्याबरोबर एक चीनी राजकीय आधिकारी सैनिकांची तुकडी घेऊन तेथे आला. तेथेच आपल्या हद्दीत ले. कर्नल राय सिंग आपल्या कमांडोच्या तुकडीबरोबर हजर होते. अपेक्षेप्रमाणे त्या चिनी आधिकार्यााने कर्नल राय सिंग यांना ते काम ताबडतोब थांबवायचा इशारा दिला. ब्रिगेड कमांडर आणि सेनादलाचा आदेश स्पष्ट होता. त्यांनी कुठल्याही परिस्थितीत असल्या धमक्यांना भीक घालायची नव्हती. वादावादीनंतर धक्काबूकी झाली व परत त्या बडबडणार्या उद्धट आधिकार्यालला मारहाण करण्यात आली. हा प्रसंग घडल्यावर चिनी सैनिक आपल्या बंकरमधे परत गेले आणि भारतीय सैनिकांनी कूंपण उभारायचे काम परत चालू केले.

हे झाल्यानंतर थोड्याच मिनिटात चीनी बाजूला एक शिट्टी ऐकू आली आणि त्या पाठोपाठ पुर्वेकडून मशीनगनचा भडिमार चालू झाला. त्या रस्त्यात कुठेही आडोसा नसल्यामुळे बरेच सैनिक ठार झाले आणि स्वत: कर्नल राय सिंग पोटात गोळ्या घुसल्यामुळे जखमी झाले. त्या अवस्थेतही त्यांनी जवानांना काय करायचे ते सांगितले आणि ते त्यांना प्रोत्साहन देत होते. उरलेल्या सैनिकांना घेऊन कॅ. डागर आणि मे. हरभजन सिंग यांनी त्या मशिनगनवर चाल केली पण ते दोघेही त्या मशीनगनच्या मार्यासत जागेवरच मृत्यूमूखी पडले. त्यांनाही मरणोत्तर वीर चक्र आणि महावीरचक्र प्रदान करण्यात आले. २-ग्रेनेडियर्सच्या जवानांनी त्या मशीनगनच्या दिशेने त्यांच्या बंदूकांनी गोळ्यांच्या फरी झाडल्या पण अर्थातच त्याचा उपयोग होत नव्हता. पहिल्या १० मिनिटात ७० सैनिक तेथे मरून पडले आणि किती जखमी झाले त्याची गणतीच नाही. अर्ध्या तासातच चीनी तोफखान्यानेही हल्ला चढवला. आता मात्र सेबू-ला वरच्या आधिकार्यां नी आपल्या तोफा वापरायची परवानगी मागितली. ती थोडी उशीरा आली पण आली. या ठिकाणाहून सर्व चीनी बंकर्स स्पष्ट दिसत असल्यामुळे, तोफखान्याच्या अचूक मार्या त ते सर्व नष्ट करण्यात आले. पहिल्या काही तासातच ४०० चिनी सैनिक ( त्यांच्या माहितीप्रमाणे-कदाचित जास्तच असतील. अनुभवाने संख्या ५०० च्या वर असावी) ठार झाले. हे तोफखान्यांचे युद्ध चार दिवस चालले. १४ सप्टेंबरला चिन्यांनी हवाईहल्ल्याची धमकी दिली पण त्याला भीक न घालता होणारा अचूक भडीमार चालूच राहिला. त्याव दिवशी चिन्यांनी प्रथमच भारतीय सेनेकडे युद्धबंदीची मागणी केली. चिन्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या मेलेल्या सैनिकांचे मृतदेह त्यांच्या हद्दीत नेऊन टाकले होते आणि युद्धबंदीची जी बैठक झाली त्यात नेहमीप्रमाणे त्या सैनिकांनी सीमारेषेचा भंग केला असा कांगावा केला. १५ सप्टेंबरला मृतदेहांची अदलाबदल करण्यात आली, त्यावेळेस स्वत: ज. मानेकशॉ, ज. अरोरा आणि जनरल सगत सिंग हजर होते.

चो-ला ची चकमक.
सिक्कीममधे १९६५ सालातील सप्टेंबर महिन्यात ७/११ ग्रेनेडियर्स (गुरखा रायफल्स) च्या बटालियनला हुश्शार राहण्याच्या सुचना देण्यात आल्या. कारण होते चिनी सैन्याने आपल्या काही भूभागावर हक्क सांगून तेथील चौक्या हटवायचा निर्वाणीचा इशारा दिला होता. ७/११ ग्रे. आणि १० जम्मू-काश्मिर रायफल्सच्या एका बटालियनने ४७२० मीटर उंचीवर मोर्चा संभाळला होता. दोन वर्षे असेच चालले होते. किरकोळ कुरबूरींशिवाय काही घडले नाही. अचानक ११ सप्टेंबर १९६७ रोजी नथूला खिंडीचे प्रकरण झाले, त्याबद्दलही आपण वर वाचले आहेच. गंगटोकच्या रस्त्यांचे संरक्षण करण्यासाठी ७/११ ने रातोरात योग्य जागा बघून आपल्या चौक्या उभ्या केल्या. नथूलाच्या चकमकी थांबल्या आणि ७/११ च्या वाढदिवसानिमीत्त त्यांची जागा १० जे-के रायफल्सला देण्याचे आदेश आले. २८ तारखेला आपली संदेशवहनाची सामूग्री, तोफा इ. घेऊन १०-जेके ने आपली जागा सोडली व आघाडीचा रस्ता पकडला. संदेशवहनाची यंत्रणा, चो खिंडीच्या पश्चिम-दक्षिण दिशेला दोन झोपड्या होत्या, त्या ठिकाणी उभी करायची योजना होती. चो खिंडीत एक तोफ, तर दोन पलटणींनी १५१८१नंची चौकी गाठायची आणि तेथील ११-ग्रेच्या सैनिकांना परत पाठवायचे असे ठरले होते. डी. कंपनीच्या दोन पलटणींनी १५४५० नं.ची चौकी जी पश्चिमेला होती तेथे संरक्षणाची जबाबदारी स्विकारली होती. उरलेल्या दोन पलटणींपैकी एक रायगाप येथे, तर एक ताम्झेच्या पिछाडीला अशी कामाची वाटणी झाली. या पलटणीबरोबर एक उखळी तोफांची तुकडी ठेवण्यात आली.

एक दिवस अगोदर १० जेकेच्या काही शिख जवानांची चिनी सैनिकांशी एका छोट्या जमिनीच्या तुकड्यावरून बाचाबाची झाली होती. किती मोठा तुकडा असेल हा ? फक्त अंदाजे ५ मीटर लांबीचा हा तुकडा होता. सिमेवर वातावरण हे असे असते आणि ते तसेच ठेवावे लागते. अरे ला कारे विचारल्याशिवाय शत्रूही आपला आब राखत नाही. ते जगच वेगळे असते. आपल्याला येथे वाचून त्याची खरीखुरी कल्पना यायची नाही. तर या तुकड्यावर एक खडक होता आणि त्यावरून त्यांची जुंपली होती. हा तुकडा ना त्यांच्या हद्दीत होता न आपल्या. या तुकड्याच्या मध्यभागी एक पांढरी रेषा अस्पष्टशी दिसत होती. या खडकाच्या दोन्ही बाजूला दोन्ही देशाचे तीन तीन सैनिक पहारा देत उभे रहात असत. या सैनिकांमधे साधारणत: दोन एक मिटर अंतर राखले जाते. कारण नुसता एकामेकांचा धक्का जरी चुकून लागला तरी १०-१५ जणांचे प्राण सहज जाऊ शकतात. विस्तवाशीच खेळ ! कारण बंदूकीच्या चापावर कायमच बोट आवळलेले असते. या भांडणात जी वादावादी झाली त्यात एका चिनी सैनिकाला मारण्यात आले आणि त्याच्या कोटाचे बटण तुटले. हे झाल्यावर ते चिनी सैनिक परत गेले आणि दैनंदिन कार्यक्रम परत चालू झाला. हे झाले पण याची खबरबात मे. जोशी जे या कंपनीचे प्रमूख होते त्यांना फार उशीरा कळवण्यात आली. ३० सप्टेंबरला त्या दोन झोपड्यांच्या तळावर पोहोचल्यावर मे. जोशींनी त्यांच्या दोन कंपन्यांनी आघाडीवर चौक्या प्रस्थापित केल्या आणि ते १५४५० कडे निघाले. ले. राठोड यांना त्यांनी तशी कल्पना दिली की ते साधारणत: दुसर्याण दिवशी म्हणजे १ ऑक्टोबरला सकाळी साडेनऊला तेथे पोहोचतील. मे. जोशी मधे वाटेत लागणार्या राईगापला पोहोचले. या येथून १५५४० ची चौकी दिसत होती. वरून त्या दिशेला पहात असताना त्यांना दिसले की चिनी सैनिकांच्य़ा एका तुकडीने त्या चौकीला घेरण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत आणि एक तुकडी डी कंपनी जेथे तैनात होती त्या दिशेला जाताना दिसली. मे. जोशींनी ले. राठोडयांना त्वरित त्यांनी जे बघितले त्याची माहिती दिली. ले. राठोड यांनी लगेचच त्या खडकावर चिनी अधिकारी हक्क सांगत आहेत व त्यांच्या बरोबर त्यांचा एक राजकीय अधिकारीही आला आहे ही माहीती दिली व काय झाले ते सांगितले.

इकडे नायब सुभेदार ग्यान बहादूर लिंबू (गुरखा) हे चिनी सैनिकांशी वाद घालत होते आणि त्या वादावादीच्या दरम्यान त्या खडकावर त्यांनी आपला उजवा पाय ठेवला. त्याबरोबर एका चिनी सैनिकाने त्यांच्या पायाला लाथ मारली आणि तो त्या खडकावरून बाजूला सारला – आमच्या हद्दीत पाय ठेवायचा नाही इ. इ….सुभेदारांनी आपला तोच पाय परत त्याच तेथे ठेवला आणि त्या सैनिकांना आव्हान दिले. वातावरण फारच तापत चालले होते. हे होत असताना उरलेल्या चिनी सैनिकांनी पटापट त्यांच्या जागा घेतल्या आणि आपल्या बंदूका सरसावल्या. बहुदा हे प्रकरण चिघळवायचे हे त्यांचे अगोदरच ठरलेले असावे. इकडे त्या चिनी सैनिकाने आपली संगीन सुभेदारांवर चालवली. त्याचा घाव बसला त्यांच्या हातावर. पुढे काय झाले ते सिनेमातल्या सारखे होते. ज्या सैनिकांने हा हल्ला केला त्याचे दोन्ही हात कुकरीने धडावेगळे झालेले त्यालाच कळले नाही. हे बघताच जागा घेतलेल्या चिनी सैनिकांनी बंदूका चालवायला सुरवात केली. दोन्ही बाजूने गोळीबार चालू झाला आणि लान्स नाईक कृष्णा बहादूर यांनी आपले सैनिक घेऊन हल्ल्यासाठी एकत्रीत होणार्याे चिन्यांवर हल्ला चढवला. त्यांच्या मागेच “आयो गुरखाली” ही युद्ध गर्जना देत देवी प्रसाद हा जवान त्वेषाने चिन्यांवर तुटून पडला. पहिल्याच झटक्यात त्याने आपल्या कुकरीने पाच चिन्यांची डोकी उडवली.
सुभेदार लिंबू यांना छातीत लागलेल्या एका गोळीने वीरगती प्राप्त झाली. त्यांना, या दाखवलेल्या धैर्याबद्दल आणि पराक्रमाबद्दल मरणोत्तर वीरचक्र देण्यात आले. लान्स नाईक कृष्ण बहादूर यांचे शव नंतर चिनी सैनिकांनी लष्करी इतमामाने परत केले. ते परत करायला जो चिनी अधिकारी आला होता त्याला इंग्रजी येत होते आणि त्याने कबूली दिली की “ते वाघांसारखे लढले”.

कूकरीचे प्रात्याक्षिक – प्रशिक्षणाच्या काळात.

या घटनेचे महत्व १९६२ सालच्या युद्धात झालेल्या मानहानी नंतर प्रचंड होते. चिनी सैनिकांच्या मनातल्या भारतीय सैनिकांबद्दलच्या कल्पनांना जोरदार धक्का बसला.

इकडे नं १५४० वर ले. राठोड यांना गोळी लागून ते जखमी झाले. जखमी अवस्थेतही त्यांनी आपले कर्तव्य सोडले नाही जेव्हा त्यांना पोटात व छातीत गोळ्या लागल्या तेव्हा या वीराने त्या युद्धभूमीवर आपला प्राण सोडला. आपल्या पलटणीचे नेतृत्व ते मरेतोपर्यंत करत राहिले. हे बघताच मे. जोशींनी आपल्या तोफखान्याच्या अचूक मार्यायने चिनी सैनिकांचे आक्रमण बंद पाडले. आपल्या तोफखान्याला मार्गदर्शन करताना त्यांच्या नजरेस एक चिनी सैनिक कड्याच्या मागून येताना दिसला. एका सैनिकाची रायफल घेऊन मे. जोशींनी त्याला यमसदनास पाठवले.

१५४५० वर आता शांतता पसरली होती तरी ताम्झे आणि रायगाप वर आता रॉकेट आणि आर.सी एल तोफांचा मारा चालू झाला. यात ताम्झेवर जास्त कारण त्या ठाण्यामुळे चिन्यांची पिछाडी धोक्यात येऊ शकली असती. यातच जेके रायफल्सच्या एका बंकरवर एक गोळा पडल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. हेही ठाणे गुरख्यांनी अजून ताब्यात घ्यायचे होते. चिनी पद्धतीने होणार्याु (लाटे प्रमाणे) हल्ल्यांना परतवून लावण्यात येत होते.

शेवटी मेजर जोशी यांच्या तोफांनी चीनी तोफा बंद पाडल्या. चो खिंडीत ज्या आपल्या सैन्याच्य आर. सी. एल तोफा होत्या त्यांनी १५४५० जवळच्या चिनी सैनिकांच्या मशीनगनच्या तुकड्यांवर अचूक मारा करून पहिल्याच मार्याोत त्या बंद पाडल्या. या तोफखान्याच्या प्रमूखाने वरून अखंड बॉंबवर्षाव चालू असताना तोफगोळ्याचा अखंड मारा चालू ठेवला तो दारूगोळा संपल्यावर थांबला. त्यासाठी त्यांनाही वीरचक्र प्रदान करण्यात आले. दुर्दैवाने मला त्यांचे नाव सापडले नाही. चिनी तोफांचा मारा बघून सैनिकांना १५४५० वरून माघार घ्यायचा आदेश देण्यात आला. त्याच वेळी चीनी सैनिकांनी आकाशात हिरव्या रंगाचे प्लेअर उडवले जी युद्धबंदीची निशाणी होती. थोड्याच वेळात त्या युद्धभूमीला दाट धूक्याने वेढले आणि सगळीकडे शांतता पसरली. या धुक्याच्या आवरणात मे. जोशींनी त्या झोपड्यांच्या येथे आपले खंदक खणले. इकडे मे. नायर जे जेके रायफल्सचे होते त्यांनी ब्रिगेड कमांडला या सर्व घटनांची सविस्तर माहिती दिली होती. त्यावेळी त्या ब्रिगेडचे प्रमूख होते ब्रिगेडियर कुंदनसिंग. त्यांनी ताबडतोब युद्धभूमीवर जाऊन ७/११ च्या उरलेल्या गुरखा रेजिमेंटच्या कंपन्यांना ताम्झेकडे कूच करण्याची आज्ञा दिली. होणार्या/ हल्ल्यासाठी तोफाही तयार करण्यात आल्या. हालचाल दिसतात चिनी सैनिकांनी आकाशात प्रकाश फेकणारे फ्लेअर्स उडवले तेव्हा त्यांना उमगले की त्यांच्या तिन्ही बाजूला गुरखा सैनिक आहेत आणि पुढून हल्ला होणार आहे. त्यांनी एकही गोळी न उडवता सन्मानाने माघार घेतली.

त्याच संध्याकाळी ज्या खडकावरून हे सगळे घडले त्या खडकावर मे. जोशींनी परत आपला बूट ठेवला आणि त्यांना कोणीही हटकले नाही………….

वाचकहो, त्या निर्जन भागात त्या पाच मिटर जमिनीच्या तुकड्यावर असलेल्या त्या खडकाची किंमत काय, हे तहात जे हरतात, किंवा जे आपला भुभाग शत्रूला सहज देऊन टाकतात, त्यांना कशी कळावी ……………?

या आणि नथू खिंडीत झालेल्या चकमकींमुळे चिनी सैन्याचा जो दबदबा उगिचच आपल्या सामान्य सैनिकांमधे पसरला होता तो कायमचा नष्ट झाला………

जयंत कुलकर्णी.
यानंतर अमेरिका ज्यांनी आपल्याला विमाने भरून मदत पाठविली या युद्धाबद्दल काय म्हणते ते सांगायचा प्रयत्न करणार आहे.

Advertisements

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in इतिहास, लेख. Bookmark the permalink.

2 Responses to पराभवाचे श्राद्ध भाग-६

  1. Vikas म्हणतो आहे:

    पुढील लेख लवकर येउद्या … न पेक्षा आपले पुस्तक तरी सांगा … विकत घेउन वाचेन!

  2. JUNGI PALTAN म्हणतो आहे:

    but today our own GoM’s actions are giving pains to soldiers,alloting land and not issue policy could be only of our foolis GOVT.OF MAHARASHTRA,those soldiers are fighting for last 40 years for land,yester one of them has met CC MAHARASHTRA,SWADIN KSATRIYA,Why late YCC’s followers do not care for soldiers right?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s