निशाचर !

निशाचर !
राकेशचा माझ्या सेलवर निरोप आला की रात्री ९.३० वाजता जंगलाच्या सफरीवर निघू. होकार कळवून आम्ही जेवायची गडबड उरकून तयार झालो. आम्ही चौघे माझ्या गाडीत आणि बाबा व त्याचा मित्र त्यांच्या मोटरसायकलवर असे निघालो. माझ्या शेजारी राकेश हातात मोठा टॉर्च घेऊन खिडकीतून बाहेर झाडांवर काही दिसते आहे का ते बारिक नजरेने बघत होता. चालत्या गाडीतून याला असे काय दिसणार असे म्हणून मी मनात हसलो आणि गाडीचा वेग खूपच कमी केला. पण बेट्याची नजर भलतीच तयार होती हे थोड्याच वेळात माझ्या लक्षात आले. थोड्याच वेळात राकेशने गाडी थांबावायला सांगितली आणि आम्ही खाली उतरलो. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाच्या फांदीला एक छोटासा हिरवा साप लटकत असलेला दिसला. चालती गाडी, टॉर्चचा प्रकाश, तोही हलणारा, आणि आजुबाजूला काळामिट्ट काळोख यात त्याला हा साप दिसला याचे आश्चर्य व्यक्त करून मी त्या सापाकडे निरखून बघितले. हिरव्या रंगाचा तो साप आपले मण्यासारखे डोळे चमकवत आमच्याकडे कुतुहलाने बघत होता. त्याची छोटीशी जीभ मधूनच बाहेर येत होती. राकेशने त्याला अलगद केव्हा हातावर घेतले हे बहूदा त्यालाही कळले नसावे. मग मात्र त्याचे सौंदर्य नजरेत भरले. त्याच्या खवल्यांचा रेशमी, तलम पैठणीसारखा रंग त्या तुटपुंज्या प्रकाशातही चमकत होता. सापाला हाताळायचीही एक पध्दत असते. तो आपला आपल्या हातावरून पुढे पुढे जात असतो. आपला हात संपला की तो हवेत उंच होतो आणि काही आधार मिळतो का हे बघतो. त्याच वेळी आपण आपला दुसरा हात त्याला द्यायचा म्हणजे तो परत त्या हातावर सरपटू लागतो. मला आपल्या ट्रेडमीलची आठवण झाली. अर्थात हे बर्‍याच वेळा झाले की त्याला राग येऊन तो त्याच्या खवल्याचे रंग बदलू लागतो. त्याला सोडायची वेळ झाली असे समजून त्याला मग आम्ही परत झाडावर सोडले. त्याचा थंडगार पण मऊ स्पर्श आमच्या सगळ्यांच्या अजूनही लक्षात आहे. तेवढ्यात बाबा व त्याचा मित्र येऊन पोहोचले. त्यांनी त्या सापाचे काही फोटो काढले.
बाबा म्हणाला “ काका मी मागे जरा अंतर ठेवून गाडी चालवतो. मला काही दिसले तर मी गाडीचे डिपर मारेन. तुम्ही लगेच थांबा. जर तुम्हाला काही दिसले तर तुम्ही गाडीचे ब्लिंकर द्या मग मी पण गाडी हळू चालवेन आणि जरा अगोदरच गाडी बंद करेन.”
यात काय एवढे असे समजून मी म्हणालो “ ठीक आहे. तसच करूया” पण त्या जंगलात गाडीच्या प्रकाशात खोलवर दृष्टी खुपसून बघत असताना मागे कुठले लक्ष जायला ? शेवटी व्हायचे ते झालेच. बाबाचा फोन आला” काका मी केव्हापासून डिपर मारतोय कुठे आहे तुमचे लक्ष ? आता गाडी थांबवून सगळे जण चालत मागे या. एक गंमत दाखवतो तुम्हाला.”
आम्ही लगेचच गाडी बंद करून, कॅमेरे तयार करून मागे निघालो. जे आम्ही बघितले ते केवळ अवर्णनीय आणि अविश्वसनीय!
माझे सुरवातीचे काही क्षण चुकले पण बहुतेक संपूर्ण प्रसंग मी कॅमेर्‍यात पकडण्यात यशस्वी झालो. वेळ :रात्रीचे साधरणत: ११-११.३० त्यामुळे फोटोचा दर्जा एवढा चांगला नाही पण मला खात्री आहे तुम्हाला ते निश्चितच आवडतील कारण हे बघायला मिळणे तसे दुर्मिळ आहे…
बाबाने दाखवलेल्या झाडापाशी आलो तर खालील दृष्य दिसले आणि क्षणात शांतता पसरली. एका छोट्या सापाने बहुदा तो कॅट स्नेक होता, त्याने एका झाडावर डुलकी काढत असलेल्या बुलबुलला मटकवण्याचा प्रयत्न चालवलेला होता. बाबाच्या म्हणण्यानुसार, तो बुलबुल झोपलेला असणार आणि त्या सापाने त्याच्या तोंडाकडून त्याच्यावर झडप घातली असणार. ते तर दिसतच होते. बुलबुल तसा आक्रमक पक्षी. तो बेसावध नसता तर त्याने निश्चितच त्या सापाशी मारामारी केली असती. पण आता तो काहीच करू शकत नव्हता. दृष्य मोठे केविलवाणे होते, पण जंगलात निसर्गाचेच नियम चालतात. क्षणभर आमच्यातील एकाला वाटले की त्या बुलबुलाला त्या सापाच्या तावडीतून सोडवावे पण मी त्याला त्यापासून परावृत्त केले. निसर्गाचे नियम, कायदेकानून बदलायच्या भानगडीत आपण का पडू नये हे त्याला मी थोडक्यात समजावून सांगितले आणि नशिबाने त्याला ते पटले. मग आम्ही त्या प्रसंगाच्या भोवती छानसा मुक्काम टाकला तो जवळ जवळ दीड-दोन तास.
Unlimited Free Image and File Hosting at MediaFire
झाडावरून खाली लोंबकाळत असलेला बुलबुल. सापाचा जबडा बघा केवढासा आहे. तो नंतर किती मोठा होणार आहे हे लवकरच दिसेल.
Unlimited Free Image and File Hosting at MediaFire
चोच सापाच्या तोंडात आणि ज्या पायाने फांदी घट्ट पकडायची ते लटकणारे हताश पाय.
Unlimited Free Image and File Hosting at MediaFire
चोच अडकल्यामुळे चिडलेला साप. साप चिडला की त्याच्या खवल्याचा रंग बदलतो. या वेळी आम्हाला वाटले की आता हा साप या पक्षाला गिळणे शक्य नाही. तो आता त्याला परत बाहेर टाकणार. पण गंमत म्हणजे त्याने तो थोडासा बाहेर काढला आणि ती चोच सरळ करून परत गिळायला चालू केले.
Unlimited Free Image and File Hosting at MediaFire
आपल्या आवाक्याबाहेरचे काम हाती घेतल्यावर बुबुळे बाहेर येणारच. पुढून काढलेला फोटो.
Unlimited Free Image and File Hosting at MediaFire
यावेळी तो पक्षी लटकत असल्यामुळे गिळायला अवघड होत होते. सापाने त्यावर जी युक्ती वापरली ती भन्नाट होती. गुरूत्वाकर्षणामुळे त्याला तो गिळताना त्रास होत असणार. त्याने सरळ त्याला आधार देऊन आडवा केला आणि आपले काम चालू केले. आम्ही आवाक होऊन बघतच राहिलो.
Unlimited Free Image and File Hosting at MediaFire
बघा त्याचा जबडा किती वासलेला आहे. विश्वास बसायला कठीण पण मी बघितले म्हणून विश्वास बसला.
Unlimited Free Image and File Hosting at MediaFire
समाप्त होत आलेले भोजन. हे सर्व होत असताना साप त्यात इतका गुंगून गेला होता की त्याला भवताली काय चालले आहे याची शुध्दच नव्हती. आम्ही मात्र भराभर फोटो काढत होतो. थोडासा आवाज होत होता पण त्याला त्याची फिकीरच नव्हती.
Unlimited Free Image and File Hosting at MediaFire
बुलबुल पोटात गेल्यावर शांतपणे त्या सापाने परत झाडावर सरपटायला चालू केले. जणू काही काही घडलेच नव्हते.

अजून दिसलेला एक साप. हे सगळे साप झाडांवर लटकत होते. आणि बाबा व राकेश त्यांना आनंदाने त्यांना त्रास होणार नाही असे हाताळत होते.
Unlimited Free Image and File Hosting at MediaFire
आज आमचे नशिबच जोरावर होते. थोडे पुढे गेलो तर एक विस्मयकारक दृष्य दिसले. माझी समजूत अशी होती की गोगलगाय ही पूर्णत: शाकाहरी असते. पण येथे तर ही बया एका मेलेल्या पतंगाचे मास खाताना सापडली.
Unlimited Free Image and File Hosting at MediaFire
एका झुडपावर एक मॉथ दिसला. त्याचे डोळे कसे चमकताएत ते पहा. अर्थात हा तुम्ही अनेक वेळा पाहिला असेल.
Unlimited Free Image and File Hosting at MediaFire
त्या रात्री आम्हाला निसर्गाचे अजूनही चमत्कार बघायला मिळाले. सगळ्याबद्दल लिहीले तर अनेक पाने खर्ची पडतील. रात्रीचा निसर्ग किती वेगळा आणि भितीदायक असू शकतो हेही आम्ही अनुभवले. ती दुनीयाच वेगळी. एक झाडतर चिनी दिव्यांच्या माळा लावल्यासारखे चमकताना मी पाहिले. असंख्य काजव्यांचे ते जग त्या गडद रात्री प्रकाश टाकत होते. कोणासाठी कोणास ठावूक ! रात्रीचे दीड वाजत आले होते. उद्या परत पहाटे दुसर्‍या जंगलात जायचे असल्यामुळे परत फिरायचे ठरवले ते परत यायचे ते ठरवूनच !

पहाटे उठलो तोच मुळी पक्षांच्या किलबिलाटाने. तो ऐकताना रात्रीच्या बुलबुलची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही हे खरे. दु:खी झालो खरा…तेवढ्यात एका सुंदर फुलाचे दर्शन झाले आणि रात गयी बात गयी या न्यायाने परत जंगलात निघालो.
Unlimited Free Image and File Hosting at MediaFire
रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते आणि मी एकदम गाडी थांबवली. सायलीच्या हातात कॅमेरा. समोर एक शिल्प. गव्याचे. मी सायलीला म्हटले “अग ते तळजाईवर नाही का हत्तीचे फायबरचे शिल्प आहे तसे येथे करून ठेवलेले दिसते. हे बघून काय करायचे ? खरा गवा दिसायला पाहिजे. जाऊदेत !. पण चांगले केले आहे.”
अगदी हुबेहुबच केले होते त्या शिल्पकाराने. जणू जीवंत गवाच उभा आहे. त्याचे ते स्नायू बघून मी चक्रावून गेलो. पायात जणू पांढरे मोजे घातलेले ! असा तो पुतळा बघुन आम्ही निघणार तेवढ्यात सायली किंचाळली” बाबा तो शेपूट हलवतोय !”
बापरे ! आमची तर भितीने गाळणच उडाली. तो शांतपणे दहा फुटावरुन आमच्याकडे बघत उभा होता. सायलीच्या हातात कॅमेरा असून फोटो काढायचे ना तिला भान होते ना मला तिला सांगायचे. आम्ही नुसते एकामेकांकडे बघत होतो. तो बाहेर आम्ही गाडीत. शेवटी मी म्हणालो “ सायली फोटो !” तिने शटरचे बटन दाबले आणि हा फोटो आम्हाला मिळाला.
Unlimited Free Image and File Hosting at MediaFire
याचे अंदाजे वजन १५०० किलो असेल असे जाणकारांचे म्हणणे आहे.
हे बघितल्यावर खरे सांगायचे तर अजून काही बघायची इच्छा राहिली नव्हती.
ढगही दाटून आले होते आणि आम्ही यशस्वी माघार घ्यायची ठरवली आणि घेतली.
Unlimited Free Image and File Hosting at MediaFire

जयंत कुलकर्णी

Advertisements

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in प्रवास वर्णने. Bookmark the permalink.

5 Responses to निशाचर !

 1. संजय नाईक म्हणतो आहे:

  जयंत,
  अप्रतिम छायाचित्र मालिका आहे.
  ‘लहान तोंडी मोठा घास’ ही म्हण येथे सर्वार्थाने गैरलागू आहे !
  संजय

 2. सुदर्शन म्हणतो आहे:

  masta.
  photos chan capture kele ahet.

 3. mahesh sabne म्हणतो आहे:

  सुंदर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s