एकात्म – भाग ५ शेवटचा.

पूर्वीचे भाग वाचले नसतील तर खालील लिंक्स वर क्लिक करा
एकात्म भाग – १
एकात्म भाग – २
एकात्म भाग – ३
एकात्म भाग – ४

बाहेर पडलो आणि पावले आपोआप नदीकडे वळली. वाळूत बसलो आणि मागे वळून बघितले चंद्र चिंचांच्या मागून आकाशात आला होता. त्याच्या प्रकाशात पाणी चमचम करत होते.. त्या चंद्रप्रकाशात आमच्या वाड्याची काळी आकृती स्पष्ट दिसत होती. त्याच्या कडेची चिंचेची झाडे स्तब्ध उभी होती. मी पाण्याकडे पाठ करून वाड्याकडे नजर रोखली. तेवढ्यात चिंचावरून दोन तीन घारी पंख फडकवत उडाल्या. मी सिगरेट पेटवली आणि वाळूत रेघा मारत विचार करत होतो.
काय करावं………………………………..

विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली होती तेव्हा. तेथेच वाळूत कलंडलो. डोळे मिटले. उघडले तेव्हा चंद्र डोक्यावर आला होता. पंधरा वीस फुटावर एक मोठी घार वाळूत शांतपणे उभी राहून माझ्याच कडे बघत उभी होती. ती तेथे का उभी होती हे आता मला चांगलेच माहीत होते. काळजी करत बसण्यापेक्षा नातवावर नजर ठेवणे सोपे नाही का ?

आज चाळीस वर्षांनंतर मी त्याच वाळूत अशाच चंद्रप्रकाशात खुर्ची टाकून बसलो आहे.
अरे हो मधे काय काय झालं हे सांगायलाच पाहिजे !

आजी गेली. तिच्या अगोदर आई गेली. मी लष्करात कमिशन घेऊन वेगवेगळ्या गावी हिंडत होतो. अगदी कांगोमधेही गेलो. आता निवृत्त होऊन आजीच्या गावी बस्तान बसवले आहे. मामांनी गाव सोड्ले पण मी त्यांच्याकडून तुळशी वृंदावनापासून ते मागच्या दरवाजापर्यंत सर्व जागा विकत घेतली. डागडूजी केली. पण आहे तशीच ठेवली अगदी. त्या बाजे सकट, त्या खिडकीसकट. मागच्या दरवाजापासून नदीपर्यंत सगळी जमीन विकत घेऊन मी आता त्याच वाळूत खुर्चीवर आरामात माझ्या आवडत्या व्हिस्कीचे घोट घेत बसलो आहे. समोरच्या टेबलावर माझा लॅपटॉप आणि माझा पाईप. लॅप्टॉपवर माझ्या ब्लॉगचे पान उघडलेले आहे आणि माझे वाचक मित्र आणि मैत्रिणी मला आग्रह करताएत की अजून लिहा जरा सवीस्तर. पण आता याच्या पेक्षा सविस्तर लिहायचे म्हणजे मला ती पोथीच येथे लिहावी लागेल. ते कसे शक्य आहे ? या वरच समाधान मानून घ्या मित्रांनो !

थोड्याच अंतरावर माझा नोकर माझ्यासाठी बार्बीक्यूवर नदीतले मासे भाजतोय. माझ्या प्लेयरवर संध्याकाळचा अमीरखॉसाहेबांचा मारवा. थोड्याच वेळात माझा तिसरा पेग संपेल. त्याला माहीत आहे की त्या नंतर मला खायला लागते. बरोबर त्याच वेळी तो तो मासा माझ्या समोर टेबलावर आणून ठेवेल.

अरे हो सांगायचे राहिलेच ! मला मुलगी झाली. तिचे नाव साशेंका. लाडाने मी तिला म्हणतो साशा !. पुण्यात असते. नुकतीच तिलाही मुलगी झाली. मोठी गोड आहे माझी नात. तिचे नाव ठेवले आहे “अस्मि”. मधून मधून पुण्याला चक्कर असतेच.

माझी गाडी चौकात पोहोचली की साशा कडेवरच्या अस्मिला सांगत असणार “ रडू नकोस! आजोबा आले बघ चौकात. ! त्याच वेळी आकाशात एखादातरी काळा ठिपका असणार, हे आता मी तुम्हाला सांगायला नको.

मी सहज मागे वळून बघितले, चंद्र चिंचांच्या मागून आकाशात आला होता. त्याच्या प्रकाशात पाणी चमचम करत होते.. पेल्यातले पेय सोन्यासारखे चमकतय. त्या चंद्रप्रकाशात आमच्या वाड्याची काळी आकृती स्पष्ट दिसते आहे.  मस्त मंद वारा सुटलाय. वाड्याच्या कडेची चिंचेची झाडे मंदपणे डुलत आहेत. मी पाण्याकडे पाठ करून वाड्याकडे नजर रोखली. तेवढ्यात चिंचावरून दोन तीन घारी पंख फडकवत उडाल्या. मी पाईप पेटवला आणि पेल्यातल्या त्या सोनेरी पेयाचा आस्वाद घ्यायला सुरवात केली.
समाप्त.
जयंत कुलकर्णी.

सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. कोणालाही कसलेही कशाबरोबरही साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in कथा. Bookmark the permalink.

15 Responses to एकात्म – भाग ५ शेवटचा.

  1. Appu says:

    Ekatma katha phaarach lavkar sampavali , kahitari chuktay tumche , karan pustakache rahasya tumhi sangitlecha nahi amhala neet ulgada kela nahi , phaar gadbad karat ahat tumhi ..

  2. Kedar says:

    मस्त झाली आहे काका गोष्ट. जागच्या जागी खिळवून ठेवलं मला अगदी. मजा आली वाचून. पण मला अजून शेवट लांबलेला आवडला असता. कारण मुख्य पात्राला ती विद्या शेवटी मिळते का? का तो ती पोथी न वाचताच त्यच्या मुलीला देतो? ही विद्या पुढे हस्तांतरीत मात्र झाली हे नक्की. पण मजा आली वाचून. धन्यवाद.

  3. Nikhil says:

    one hell of a katha! loved it.

  4. Vijay Sawant says:

    A disappointing end to an otherwise gripping story.

  5. Nandakumar G. Patil says:

    उत्कंठा टिकवून ठेवणारी सुंदर कथा !

  6. अमोल देशपांडे says:

    अतिशय रोमांचित कथा आहे. कथा काल्पनिक आहे याचा अंदाज वाचण्यास सुरवात करताना आला असताना सुद्धा शेवट वाचून अंगावर काटा आला. आजच तुमचा blog वाचण्यास सुरवात केली आहे आणि या आधीच्या कथा वाचण्याची अतीव उत्कंठा आहे हे वेगळे सांगणे नको. All the Best!

    • जयंत says:

      Dear Amol,
      या अधिच्या कथा नाहीत पण लेख आहे. बघा आवडतात का !
      धन्यवाद !
      जयंत कुलकर्णी

  7. kalyani pathak says:

    katha ghaighaine sampavali, rahasyacha neet ulgada zalach nahi ase vatale.ajun ekhadya bhagat rahasya neet ulgadale asate.matra katha khoopach chhan ahe.mala avadali.ashach gudhkathanchya pratikshet …

    • जयंत says:

      कल्याणी,

      मराठीतून का लिहीत नाही ? त्या साठी काही मदत पाहिजे का ?
      असो. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

  8. Pingback: एकात्म – ४ | मराठीतील लेखन – जयंत कुलकर्णी.

  9. Surendra says:

    Jayanta,
    Tu katha aaikavali hotis, tari wachun kadali. Kupach sundar. Warchya kahi pratikriyashi mi sahamat aahe. (Shewat thoda vegala apeshit hota).
    Tuzi line chukali aahe. Tu survatipasun lihit aala astas tar…?
    Surendra

  10. Wow ….. khup chhan hoti story…. Aajji aani Natu…laybhari… khupch chhan watal….vachun….. !!!👌

Leave a reply to Surendra Cancel reply