इब्न बतूत भाग १२ – शेवटचा !

मागून पुढे चालू…………….

भाग १२ – शेवटचा !
रिहाला हे खरंतर एक हाज यात्रेचे वर्णन आहे. आपण मागे बघितलेच आहे की मदीना आणि मक्केचे वर्णन हे रिहालामधे इब्न जुब्यारच्या रिहालातून उचललेले आहे. या प्रकाराचे चौर्यकर्म त्या काळातील संस्कृतीत बसणारे नव्हते. पण ते तसे झाले होते हे इब्न बतूतला माहिती होते का नाही हे समजायला अवघड आहे. पण इब्न जुझ्झीने ते त्यात घातले असण्याची शक्यता जास्त वाटते कारण तो एक दरबारचा कवी होता आणि त्याला ते पुस्तक सुलतानासाठी लिहायचे होते आणि त्यात काय काय लिहायचे हे त्याला चांगलेच माहीत होते. आणि हे पुस्तक दुसरे कोणी वाचेल असे त्याला अजिबात वाटले असण्याची शक्यता नाही. थोडक्यात काय सुलतानाला या लिखाणाने माहिती मिळाली पाहिजे आणि तो खूषपण व्हायला पाहिजे या पध्दतीने हे लिखाण व्हायला पाहिजे याची पूर्ण जाणीव इब्न जुझ्झीला होती आणि त्याने त्याच प्रकारचे वर्णन लिहिले असणार.

हे सगळे लक्षात घेतले तरी दुर्दैव म्हणजे, इब्न बतूतला त्याच्या मृत्यूनंतरच जगात मान्यता मिळाली. मोरोक्कोमधील तथकथित विद्वानांना त्याच्या वर्णनांवर विश्र्वास ठेवणे शक्य झाले नाही. काहींनी तर त्याला ढोंगी आणि फायद्यासाठी काहीही लिहिणारा म्हणून त्याची हेटाळणी केली. त्यावेळचा राज्यशास्त्राचा थोर अभ्यासक इब्न खाल्दूनने तर त्याच्या विरुध्द फारच टीका केली. ग्रानाडाच्या अबू अल्‍ बरकत अल्‍ बलाफ्कीने तर त्याला अव्वल खोटारडा म्हटले.

१५व्या शतकात मात्र मुहम्मद इब्न मर्झुकने म्हटले आहे “मला तरी एवढे देश विदेश पाहिलेला माणूस माहीत नाही.” त्यानंतर रिहालाबद्दल फारच कमी ऐकू आले. पण माघरिबमधे त्याच्या बर्‍याच नकललेल्या प्रती वाचल्या जात होत्या. पण त्याला खरी प्रसिध्दी मिळाली ती सर हॅमिल्टन गिब यांनी त्याचे भाषांतर युरोपमधे प्रसिध्द केले तेव्हा ते १९५८ साल होते. इब्न बतूत १३६९ साली वयाच्या ६५ व्या वर्षी हे जग सोडून गेला. त्याचा मृत्यू रिहाला लिहिल्यानंतर ११/१२ वर्षाने झाला. इब्न जुझ्झी जेव्हा रिहाला पूर्ण झाले, त्याच वर्षी निवर्तला. इब्न बतूतच्या बाकी आयुष्याबद्दल आज जगाला काहीच माहीत नाही. त्याचे मोरोक्कोमधे कोणी वारसदार असल्याची नोंद नाही. रिहालाचे काम इतके मोठे आहे की प्रत्येकाला त्यात त्याच्या आवडीचा विषय सापडणारच ! उदा. त्याने वर्णन केलेल्या अनेक स्थनिक बाजारांची वर्णने ! त्या वर्णनांमधे काय नाही आहे ? रिहाला आपल्याला बॅकिंगपासून आत्ताच्या अनेक व्यवस्थांच्या मुळाशी घेऊन जाते.

काहीही असले तरी जगाला इब्न बतूतने “रिहाला” ही फारच सुंदर भेट दिली आहे, असेच म्हणावे लागेल !

मित्रहो, आपल्या मित्राचा या जगातला प्रवास आणि या पृथ्वीवरचा मुक्काम हा असा संपला आणि आपली त्याच्या बरोबरची ही सफरही !

ज्या वाचकांनी हे वाचले त्यांचे मी मनापासून आभार मानतो.

जयंत कुलकर्णी
लेखमाला समाप्त.

Advertisements

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in लेख. Bookmark the permalink.

One Response to इब्न बतूत भाग १२ – शेवटचा !

  1. Vikram Kulkarni म्हणतो आहे:

    Apratim, kharach Ibn Batut chya barobar jag firun aalyasarkhe vatale

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s