इब्न बतूत या युगाचा प्रवासी

मित्रहो नमस्कार !
बर्‍याच दिवसानी आपली गाठ पडते आहे त्यामुळे मलाही आनंद झाला आहे. ( आपल्यालाही झाला असेल असे गृहीत धरले आहे 🙂 )

या वेळेस आपण जरा वेगळ्याच विषयावर वाचणार आहोत. हे या युगाच्या प्रवाशाचे प्रवास वर्णन आहे. त्याचे नाव इब्न बतूत. मला स्वत:ला प्रवास प्रिय असल्यामूळे आणि नवनवीन प्रांतातल्या माणसांना भेटायची कमालीची हौस असल्यामुळे इब्न बतूतचा प्रवास मलातरी स्वप्नवत वाटला. हा प्रवास करण्यामागे काय प्रेरणा असेल आणि एवढे धैर्य त्याने कोठून गोळा केले असेल ते त्यालाच माहीत. ही पूढील लेखमाला वाचताना जर आपण स्वत:ला त्याच्या जागी उभे केले तर….. काय होते त्याचा अनुभव मी स्वत: घेतला आहे. आपणही तो कुठलाही पूर्वग्रह मनात न आणता घ्यावा ही विनंती.

हे लिहिताना मधूराने व्याकरण तपासायची अवघड जबाबदारी पार पाडली त्यासाठी तिचेही आभार मानायला पाहिजेत. तरीपण जर काही चुका सापडल्या तर त्यात तिची काहीच चूक नाही कारण त्यांची संख्या प्रचंड होती आणि मी करत असलेली घाई हे ही एक कारण आहेच. हे लिखाण संपल्याशिवाय तिने दुसर्‍या कशालाही हात लाऊन दिला नाही हे ही नमूद करायला पाहिजे. त्याचे कारण अर्थातच मला नंतर कळाले. तिलाही हे काम करत असताना इब्न बतूतचा प्रवास आवडू लागला होता. हे लिखाण मी तिला अर्पण करू शकत नाही कारण ती माझाच एक भाग आहे. पण बाकिच्यांचे आभार मानायलाच पाहिजेत.

माझे मित्र सर्वश्री कर्नल सांवत, विलास राऊत, नंदू कोठारी, उपेंद्र माने, विनय थिटे, पराग पुरंदरे, यांच्या वेळोवेळी येणार्‍या प्रोत्साहन्पर येणार्‍या ई-मेल्स मुळेच मी हे लेखन करू शकलो याची मला जाणीव आहे म्ह्णून हे लिखाण त्यांना अर्पण. मी ज्यांच्यामुळे मराठीत लिहायला लागलो ते माझे मित्र श्री. संजय नाईक यांनाही हे लेख अर्पण.

पूढचा प्रवास मित्रहो, फार मोठा आहे. मोठा म्हणजे किती मोठा ? जवळ जवळ ७०,००० मैलांचा. कधी कधी आपल्याला कंटाळा येण्याची शक्यता आहे, पण इब्न बतूत ने हा प्रवास प्रत्यक्षात केला होता हे लक्षात घेतलेत की कदाचित आपण पुढचे वाचू लागाल.

हा लेख श्री डग्लस बूलीस यांच्या लेखावर आधारीत आहे. जवळ जवळ त्यांच्या लेखाचे भाषांतरच म्हणाना ! मी अर्थातच यात बरीच भर घातली आहे पण मूळ लेखाचा ढाचा तोच ठेवला आहे. त्यांचा हा लेख आर्मको वर्ल्डवर प्रसिध्द झाले आहे. त्यांनी ते भाषांतर करायला परवानगी दिली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.

आपला,
जयंत कुलकर्णी.

Advertisements

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in प्रवास वर्णने, लेख and tagged , , , . Bookmark the permalink.

One Response to इब्न बतूत या युगाचा प्रवासी

  1. Raghunath Gokhale म्हणतो आहे:

    Subject is very interesting. This is rare book especially for Indians.
    Thanks for your translation

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s