नवशिक्यांसाठी सहसा न बिघडणार्‍या वाईनची कृती.

साहित्य:
१ कि. मनूका
२ कि. साखर
६ लिटर पाणी.
१ टीस्पून यीस्ट. बाजारात जे मिळते ते.
१ अंड्यातला पांढरा बलक.

कृती:
अगोदर ज्या ठिकाणी वाईन करायची आहे ते सर्व स्वच्छ धुवून घ्यावे. यासाठी पोटॅशियम-मेटॅ-बायसल्फाईट    चे द्रावण वापरावे. या साठी बाजारात कुठल्याही मेडिकल स्टोअर मधे याचा एक पुडा मिळतो तो आणावा. – २ व ते पुडे १ लि. पाण्यात घालावे व त्या द्रावणाने सगळी भांडी धुवून घ्यावीत व ते पाणी ओट्यावर किंवा जमिनीवर ओतून ती जागा स्वच्छ धुवून घ्यावी.
सर्व मनूका एका प्लॅस्टिकच्या टबमधे स्वच्छ धुवून घ्याव्यात. या धुतलेल्या मनूका लाकडाच्या चमच्याने किंवा रवीने चुराडाव्यात. हे करतान एक काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे मनूकांच्या बिया चुरडल्या जायला नकोत. नाहीतर वाईनची चव बिघडेल. या लगद्यात मग पाणी, यीस्ट, आणि अंड्याचा पांढरा बलक टाकावे. हा लगदा चांगला हलवून झाकुन ठेवावा. दररोज एकदा हा लगदा याच प्रमाणे हलवावा. असे १ आठवडा करावे. २/३ दिवसात हे मिश्रण फसफसायला सुरवात होईल. पुढच्या दिवसात हे फसफसणे बंद होईल आणि एक घट्ट थर वर जमलेला दिसेल. आता हा वरचा लगदा वगळून त्या खालची वाईन एका काचेच्या किंवा पेट्च्या बाटलीत ओतून घ्यायची आहे. त्या बाटलीचे झाकण घट्ट लावून एक महिना ठेऊन द्या. तुमची वाईन जवळ जवळ तयार झाली. एक महिन्यानंतर आपण घातलेल्या अंड्यामुळे यातील मेलेले यीस्ट खाली बसेल. त्याला धक्का न लावता काळजीपूर्वक वरची वाईन बाटल्यांनधे भरा. याच वेळी १/२ ग्लास चवीसाठी वापरली तरी चालेल.(पण तेवढीच !). या बाटल्या आता ८ महिने ठेवायच्या आहेत आणि या कालावधीत त्यातला खाली बसलेला गाळ वरील पध्दतीने ४ वेळा काढायचा आहे.

मग एखाद्या संध्याकाळी या ज़हर-ए-खूषची मज़ा आपल्या मित्रांबरोबर किंवा सखीबरोबर/सखयाबरोबर घ्या.    दुसर्‍या दिवशी मला ई-मेल करा. ! 🙂

जयंत कुलकर्णी.

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in रेसीपीज्‌. Bookmark the permalink.

2 Responses to नवशिक्यांसाठी सहसा न बिघडणार्‍या वाईनची कृती.

 1. अनिकेत वैद्य म्हणतो आहे:

  जयंत काका,
  क्रुती दिल्याबद्दल धन्यवाद.
  नक्की करून पाहतो.

  आणि हो, तुम्हाला बोलवीनच.

 2. अभिजीत म्हणतो आहे:

  त्रिवार धन्यवाद!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s