ज़हर-ए-खूष !

फार पूर्वीची गोष्ट आहे. पूर्वीची म्हणजे किती पूर्वीची ? म्हणजे बघा त्यावेळी युरोपमधे द्राक्ष माहीतही नव्हती. यावरून वाईनचा जन्म युरोपमधे झाला हा गैरसमज दूर व्हायला हरकत नाही. बरोबर ओळखलंत तुम्ही, ही वाईनच्या जन्माची गोष्ट आहे.

पर्शियामधे साधारणत: अंदाजे २००० वर्षापूर्वी, कदाचित त्याहूनही आधी एक राजा राज्य करत होता. त्याचे नाव होते ताहमूर. त्याने पर्शियावर जवळजवळ ३० वर्षे राज्य केले. त्यानंतर त्याचा पुतण्या प्रसिध्द जमशेद याने राज्य ताब्यात घेतले. याच्या शौर्याच्या कथांनी पर्शियाच्या इतिहासाची पाने भरलेली आहेत. त्याबद्दल मी पर्शियावर लिहीन तेव्हा सांगेन. पण याला द्राक्षांची आतोनात आवड. त्याची ही आवड विलक्षणच होती. दररोज वेगवेगळ्या प्रकारची उत्तमोत्तम द्राक्षे खाणे हा त्याचा एक छंदच होता म्हणाना ! (बहुतेक द्राक्ष खाऊन येणार्‍या गुंगीची त्याला चटक लागली असावी. पोटामधे आंबणारी वाईनच ती.) पण हे पीक पडले हंगामी. अफगाणिस्थानमधून काळी द्राक्षे (अंगूर) आणून पुढील १/२ महिने कसेबसे तो काढत असे. या पिकाची साठवण करायची त्याने ठरवले म्हणजे पुढच्या हंगामापर्यंत तरी ही द्राक्षे खाता येतील, असा त्याने विचार केला. मोठमोठ्या बरण्यांमधे त्याने ती द्राक्षे भरली व हंगाम संपल्यावर खायला चालू करता येतील म्हणून कपाटांमधे ठेवून दिली. हंगाम संपल्यावर चला आता काय ? काळजी नाही ही द्राक्षे आहेतच खायला, म्हणून त्याने आनंदाने त्या बरण्यातील एक बरणी उघडली तेव्हा त्याचा भलताच भ्रमनिरास झाला. त्या द्राक्षाचा भलताच घाणेरडा चोथा झाला होता आणि त्याला अत्यंत उग्र असा वास येत होता. हे काय भलतेच झाले ? बहुतेक याचे वीष झाले असे म्हणून त्याने त्या सगळ्या बरण्या ओतून द्यायला सांगितल्या. बरीच रात्र झाली होती. त्याच्या नोकराने त्या बरण्यांवर ज़हर असे लिहून त्या महालाच्या मागच्या भागात हलवल्या.

त्याच्या अनेक राण्यांपैकी एक जमशेदची अत्यंत आवडती होती. तिच्या प्रेमात तो वेडा होता. पण त्याला तिच्या संगतीचा विशेष लाभ होत नव्हता. याला कारण होते तिला जडलेली असाध्य डोकेदुखी. एकदा डोके दुखायला लागले की तिला जीव अगदी नकोसा व्हायचा. आत्महत्येसारखे भलतेसलते विचार तिच्या मनात येत. त्या रात्री तिचे डोके असेच दुखायला लागले. महालात सैरभैर होऊन ती खांबांवर डोकं आपटत महालाच्या मागच्या बाजूला पोहोचली. आज तर रात्री जमशेद तिच्या महालात मुक्कामाला येणार होता. काय उपयोग असल्या आयुष्याचा ? त्यापेक्षा मेलेले बरे असे म्हणून ती सज्जातून उडी मारणार तेवढ्यात तिला ती बरणी ज्यावर ज़हर असे लिहिले होते ती दिसली. उडी मारण्यापेक्षा हे मरण बरं म्हणून तिने ती बरणी तोंडाला लावली. वेडेवाकडे तोंड करत तिने ती बरणी जवळजवळ संपवली आणि शांतपणे जमिनीवर पडून मरणाची वाट पाहू लागली. पण झाले उलटेच. बाटलीतील आंबलेल्या वाईनमुळे तिला मस्त झोप लागली. जेव्हा ती उठली तेव्हा तिची डोकेदुखी कुठल्याकुठे पळाली होती आणि तिच्या चित्तवृत्ती उल्हसित झाल्या होत्या. खूष झाली ती. तिने दासींकडून त्या सर्व बरण्या तिच्या महालात हलवल्या. त्यानंतर तिची एकही रात्र जमशेदबरोबर चुकली नाही. राजालाही याचा फार आनंद झाला.

जेव्हा जमशेदने त्याच्या नोकराला त्या बरण्यांविषयी विचारले तेव्हा तो उत्तर द्यायचे टाळायला लागला. जेव्हा दरडावून विचारले, तेव्हा सत्य बाहेर आले.

जमशेदने मग त्या द्रवाचा आपल्या शास्त्रज्ञांबरोबर त्या वाईनचा अभ्यास केला. परत एकदा वाईन तयार करण्यात आली आणि दरबारात सादर करून त्याचा आस्वाद घेण्यात आला.

आजही इराणमधे काही भागात मद्याला ज़हर-ए-खूष याच नावाने ओळखतात.

मीही वाईनला ज़हर-ए-खूष याच नावाने ओळखतो आणि माझे मित्रही तिला त्याच नावाने ओळखतात.

जयंत कुलकर्णी.

उद्या एका वाईनची कृती अभिजीतसाठी.

Advertisements

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in लेख. Bookmark the permalink.

7 Responses to ज़हर-ए-खूष !

 1. nikhil bellarykar म्हणतो आहे:

  very nice!!!!!!

 2. अभिजीत म्हणतो आहे:

  वा! आम्हीही खूष झालो!

 3. शब्दांकित म्हणतो आहे:

  Khupch chhan mahiti diliy tumhi! very intresting!!

 4. सदानंद म्हणतो आहे:

  आमच्या कोकणातल्या राजाला(?) जांभूळ पाहून असं का सूचलं नाही!

 5. अभिजीत म्हणतो आहे:

  वाईनच्या कृतीच्या प्रतीक्षेत आहे.

 6. पिंगबॅक ज़हर-ए-खूष ! | indiarrs.net Featured blogs from INDIA.

 7. Prashant म्हणतो आहे:

  wine cha janm asa zala he mahitich navhate ….chaan lekh.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s