आत्मे गहाण टाकलेत, बुद्धी टाकू नका !
सध्या आपल्या राज्यातील धार्मिक वातावरण परत एकदा ढवळून निघायची चिन्हे दिसू लागली आहेत. आपल्या राज्यातील भोळी भाबडी जनता खर्या अर्थाने केव्हा शहाणी होणार हे परमेश्वरच जाणो. सध्या राजकारणी आणि त्यांचे बागलबच्चे असलेले तथाकथित व्यावसायिक ह्यांनी नवीन प्रकारच्या धंद्यात लक्ष घातलेले आहे आणि ते म्हणजे देवळांचे मॉल बांधणे. पुण्यात आपण जे सध्या पाहतो ते ह्या मॉलची रंगीत तालीम आहे असे समजा ना ! आता ह्या छोट्या उपक्रमामधे अतोनात यश मिळालेले पाहून मोठे व्यावसायिक ह्या धंद्यात उतरले आहेत. सहकारनगर येथे आपण ह्या प्रकारचा छोटा मॉल पाहू शकतो. ह्या मॉलमधे तुम्ही गेलात तर त्याची उलाढाल किती असेल ह्याची कल्पना तुम्हाला सहज येऊ शकेल. ते पैसे कोणाच्या खिशत जातात हे सांगायची गरज नाही. पण ज्याप्रमाणे लाच घेणार्या इतका देणाराही दोषी असतो त्याच नियमाप्रमाणे त्या देवळात लाखो रुपये वाहणारे पण तेवढेच दोषी आहेत. जर आपल्या धर्मगुरुंनी असा आदेश काढला की देवळात पैसे टाकणे हे पाप आहे तर हा सगळा प्रश्न मिटून जाईल. पण तसे ते करणार नाहीत. कारण दुर्दैवाने आपल्या धर्मगुरुंना तुमच्या आमच्या आयुष्याशी काही देणे घेणे नसते नाहीतर त्यांनी मंगळामुळे होणारी हजारो स्त्रियांची परवड थांबविली असती. आता आपल्यातीलच काही शहाणे असे म्हणतील की माणसांना त्या मॉलची गरज आहे म्हनून ती जातात. पण हा दावा अत्यंत फोल आहे. कारण सामान्य जनतेला कुठल्या बाजूला झुकवायचे. त्यांना काय खरेदी करायला लावायचे, त्यांच्या मनावर एखादी गोष्ट कशी बिंबवायची ह्याचे आता एक पध्दतशीर शास्त्र तयार झालेले आहे. एखाद्या गोष्टीची नैसर्गिक गरज ही आता इतिहासात जमा झालेली गोष्ट आहे. ह्या गोरगरिबांना लुटायच्या नीच कारस्थानात आपले राजकारणी, आपली नोकरशाही कशी सामील आहे हे आपण नुकतेच एका देवळांच्या मॉलच्या उद्घाटनाच्या प्रसंगी बघितले. नशीब आपल्या संतपरंपरेच दबाव अजून ह्या निर्लज्ज लुटारुंवर आहे म्हणून विठोबा रखूमाईची तरी देवळे बांधण्यात आली नाहीतर ह्यांनी सत्यसाईबाबांचेच देऊळ बांधले असते. ह्यांना गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, विवेकानंद ह्यांची आठवण का होत नाही हे सांगायची गरज नाही. कारण ह्या संतांची ब्रॅंड इक्विटी आता घसरली आहे.
असो. परवा जे देवळांच्या मॉलचे उद्घाटन झाले त्यावेळीच्या गावकर्यांच्या ज्या मुलाखती दूरदर्शनवर दाखवल्या त्या पाहिल्यावर हसावे का रडावे हेच कळेना. त्यातल्या जवळजवळ सर्वजणांनी बाबा आले त्यामुळे आमच्या गावाचे रस्ते झाले ही बाबांचीच कृपा झाली असे सांगितले. ह्याऐवजी त्यांनी रस्ते न करणार्या नोकरशाहीला धारेवर धरले असते तरी चालले असते. बाबांच्या कार्यक्रमासाठी नोकरशाही राबली असेलच. पोलीस तर निश्चितच राबले असतील. याचा खर्च आपल्या खिशातून गेला आहे हे लक्षात घ्या. ह्या मॉलमुळे त्या गावाच्या जमिनीची किंमत आता गगनाला भिडेल. पण त्याचा तिथल्या गावकर्यांना काहीच उपयोग होणार नाही कारण त्या अगोदरच या लुटारुंच्या टोळीने त्या कवडीमोल भावाने आणि प्रसंगी दडपशाहीने विकत घेतल्या असणार. आता त्यांच्या नशीबी त्या देवळांच्यासमोर फुटाणे, हळद, कुंकू आणि बत्तासे विकण्याखेरीज दुसरा कुठलाही पर्याय नाही. आता तेथे बाबांचेपण काही दिवसांनी देऊळ होईल आणि पंचतारांकित पर्यटन व्यवसाय चालू होईल. असो. ज्या बाबांच्या हस्ते हे उद्घाटन झाले आणि ज्यांच्या नावावर हा व्यवसाय आता उभा राहणार आहे ते आहेत तरी कोण ? त्यांचा इतिहास कोणी तपासून बघितला आहे का ? महाराष्ट्राची जी संतपरंपरा आहे त्या परंपरेत त्यांना बसविण्याची त्यांची योग्यता आहे की नाही किंवा ज्या देवांच्या देवळांचे त्यांनी उद्घाटन केले त्या देवळाच्या दारात तरी उभे राहण्याची त्यांची लायकी आहे की नाही हे तपासून बघायला लागेल. आता काही लोक असेही म्हणतील की वाल्याचा नाही का वाल्मीकी झाला ? पण ते उदा. येथे गैरलागू आहे. बाबांनी त्यांच्या चुकांची शिक्षा भोगावी आणि मग खुशाल उद्घाटने करत फिरावे. आम्ही स्वत: त्यासाठी राबू.
सत्यसाईबाबा – “परत सांगितलीच पाहिजे अशी कहाणी” लेखक : बाबू गोगिनेनी . Former General Secretary of Rationalist Society of India.
अवतार :
ईश्वरम्माच्या शरीरात स्नानाच्यावेळी एक दिव्य प्रकाश शिरला, तेव्हा तिला आणि तिच्या अडाणी नवर्यातलाही ही कल्पना नव्हती की परमेश्वराने तिची मानवजातीत अवतार घेण्यासाठी निवड केली आहे. संस्थानाची अधिकृत कागदपत्रे आपल्याला सांगतात की “परमेश्वराच्या ह्या अवताराविषयी फार पूर्वी येशूने आणि महंमदाने सांगून ठेवले होते. ज्यांच्या कुराणामधे आणि बायबलमधे हा उल्लेख सापडत नाही. त्यांच्यासाठी स्वत: बाबांनीच सांगितले आहे की शिर्डीच्या साईबाबांनी १९१८ साली सांगूनच ठेवले होते की मी हे शरीर सोडल्यानंतर आठ वर्षांनी ते पुट्टपर्थी येथे सत्यसाईबाबा म्हणून जन्म घेतील. चंद्र जसा कलेकलेने वाढतो त्याप्रमाणे परमेश्वराचा अंश ईश्वरम्माच्या पोटात वाढत होता आणि २३ नोव्हेंबर १९२६ रोजी एका मुलाचा जन्म झाला. त्याचा जन्म झाल्यावर घरातली वाद्ये आपोआप झंकारायला लागली, एक मंद सुवास घरभर पसरला आणि एका नागाने जन्मलेल्या बाळावर आपला फणा धरला.
सर्वज्ञानी असतानासुध्दा “सत्यनारायन राजू” (जे त्या मुलाचे नाव ठेवण्यात आले होते.) शाळेत जायला लागला. थोड्याच दिवसात त्याच्या अगाध लीलांचा अनुभव सर्वांना येऊ लागला. मुलांना तो त्याच्या जादूच्या शक्तीमुळे आवडू लागला तर शिक्षक त्याला घाबरु लागले. का ते माहीत नाही. १९४० साली तो जेव्हा १५ वर्षाचा झाला तेव्हा त्याच्या वेडावरच्या इलाजांना कंटाळून सत्यनारायण राजूने जगाला तो अवतार असल्याचे सांगितले आणि स्वत:ला सत्यसाईबाबा हे नाव घेतले. त्यांनी घोषणा केली “येशू, महंमद, बुध्द आणि इतर हे काही परमेश्वराचे अवतार नव्हते. त्यांच्याकडे फक्त काही दैवी शक्ती होत्या. मीच परमेश्वर आहे. माझी अगाध आहे आणि त्याला अंत नाही. ह्या पृथ्वीतलावर सत्य आणि प्रेमाने मानवता आणणे हे माझे काम आहे. २०२२ साली ह्या अवतारानंतर मी कर्नाटकमधील मंड्या जिल्ह्यात प्रेमसाई म्हणून जन्म घेणार आहे.” मला वाटते त्यांची जागा चुकलेली दिसते आहे. एवढ्या पैशाची गुंतवणूक केल्यावर त्यांची महाराष्ट्रातून सुटका होईल असे वाटत नाही.
बाबांचे चमत्कार :-
“चमत्कार ही माझी ओळख आहे” हे शिर्षक आहे हॅरॉल्डसन नावाच्या लेखकाने जे बाबांच्या चमत्कारांविषयी लिहिले आहे त्यातील एका प्रकरणाचे. बाबांनीच त्यांच्या एका मुलाखतीत हे वाक्य उच्चारले होते. थोड्याच दिवसात सत्यसाईबाबा त्यांच्या चमत्कारांमुळे जगभर प्रसिध्द झाले. त्या काळात मान्यता पावलेल्या एका मासिकात म्हणजे “रिडर्स डायजेस्ट” मधे त्याबद्दल लिहून आले होते. फक्त त्यात त्यांनी सत्यसाईबाबांना परमेश्वर म्हणायच्याऐवजी चुकून गुरु म्हटले होते. त्यांनी लिहिले होते “ते हवेतून सोन्याच्या अंगठ्या , नाणी काढतात. दगडाचे चॉकलेटमधे रुपांतर करतात. आजारी लोकांना विभूती देऊन बरे करतात. ही त्यांच्या हातात कुठून येते हे कोणालाही कळत नाही. सगळ्यात कहर झाला जेव्हा त्यांनी १९५० साली एका मुलाला ज्याचे शरीर कुजत चालले होते त्याला परत जिवंत केले तेव्हा. १९७१ साली डॉ. जॉन हिस्लॉप जो अमेरिकन साई फौंडेशनचा अध्यक्ष होता त्याने तर असे जाहीर केले की वॉल्टर कोवान – ज्याचा ह्रदय बंद पडून मृत्यू झाला होता, – त्याला बाबांनी परत जिवंत केले. कै. सुरी भगवंतम जे इंडियन इन्स्टीट्यूटचे प्रमुख होते आणि भारत सरकारचे विज्ञान सल्लागार होते त्यांनीपण एक चमत्कार सांगितला आहे की एक दिवस बाबांनी एकदम हवेतून भगवतगीता काढून दाखवली. ह्या माणसांनीच बाबांना पुढे आणले असणार ह्यात शंकाच नाही. पुढे काय घडले असणार हे सूज्ञास सांगणे नलगे. त्यांच्या ह्या चमत्कारांच्या मालिका तरी बघा – एकदा पाण्यात त्यांचे बोट बुचकळ्यावर त्याचे पेट्रोल झाले, चिंचेच्या झाडावरुन त्यांनी आंबे काढले, एवढेच काय चीनच्या हल्ल्यात त्यांनीच चीनच्या सैन्याला पिटाळून लावले असे अनेक चमत्कार त्यांच्या पदरी आहेत. ते स्वत: असा दावा करतात की ते कधीच झोपत नाहीत. गंमत म्हणजे डॉ. सॅम्युएल सॅंडवाईज ह्यांना बाबांनी सांगितले की मीच परमेश्वर आहे आणि मी सर्वशक्तिमान आहे आणि मी सर्व ठिकाणी असतो तेव्हा त्यांचा त्यांच्यावर विश्वास बसला. मग त्यांना हिस्लॉप विचारतात सर्व जगाचा कारभार चालवण्याचे काम असल्यामुळे बाबांना आपल्याशी बोलायला कसे परवडते ? बाबा त्यांना खात्री देतात की ते सर्वत्र असतात परमेश्वराला कसली सीमा ? हिस्लॉपचे ह्या उत्तराने म्हणे लागलीच समाधान झाले.
ह्या सगळ्या प्रकारात अडाणी माणसेच फसली जातात असे नाही. बाबांच्या शिष्यांमधे कोण नाही ? भारतातील प्रथम दर्जाचे राजकारणी, मंत्री, न्यायाधीश, श्रीलंका, नेपाळ, मालदीव, मॉरिशस ह्या देशांचे पंतप्रधान, ग्रीक देशाचे माजी पंतप्रधान, स्पॅनिश राजघराणे, वकील, डॉक्टर्स आणि सामान्य जनता हे सर्व त्यांचे अनुयायी आहेत. पापे करुन झाल्यानंतर अध्यात्माची कास धरावी लागते ह्यामुळेच की काय अनेक “तसले” लोकपण त्यांच्या कच्छपी लागलेले दिसतात. उदा. त्यांच्या जवळचे मानले जाणार्यांची ही यादी पहा – गुलिओ ऍड्रीओटी, इटलीचे पंतप्रधान ज्यांच्यावर एका वार्ताहराचा खून केल्याचा खटला चालवला गेला. बेटीनो क्रॅक्सी अजून एक पंतप्रधान ज्यांना ५ वर्षे भ्रष्टाचारासाठी शिक्षा झाली होती, राजकन्य़ा पोहलवी, इराणच्या राजाची बहीण, जिला हेरॉईनच्या व्यापारात शिक्षा झाली होती.
ह्या अशा वातावरणात श्री. अब्राहम कोवूर आणि श्री. डॉ. नरसिंहन ( बेंगलोर विद्यापीठाचे उपकुलगुरु ) ह्यांनी सत्यसाईबाबांच्या विरोधात त्यांचे पितळ उघडे पाडण्याची मोहीम मोठ्या धैर्याने चालवली. डॉ.कोवूर ह्यांनी त्यांनीच लिहिलेल्या “Begone Godmen” ह्या पुस्तकात डॉ. भगवंतम ह्यांनी वॄत्तपत्रात केलेल्या दाव्यासंदर्भात लिहिले आहे. हे भगवंतम बाबांच्या तेलगू ते इंग्रजीचे दुभाषी होते. त्यांनी एका वर्तमानपत्रात बाबांचा एक चमत्कार लिहिला. “जगप्रसिध्द सिको कंपनीचे प्रमुख पुट्टपर्थीला भेट द्यायला आले तेव्हा बाबांनी त्यांना एक घड्याळ हवेतून काढून त्याचा प्रसाद त्यांना दिला. ते घड्याळ बघितल्यावर त्यांनी लगेचच बाबांसमोर लोटांगण घातले आणि ते त्यांचे शिष्यत्व पत्करले. ते घड्याळ काही साधेसुधे नव्हते. ते एक असे घड्याळ होते की जे अजून बाजारात यायचे होते आणि ते त्यांनी त्यांच्या ऑफीसमधे कडीकुलपात ठेवले होते.“ भगवंतम ह्या घटनेबाबत जास्त काही सांगायला तयार नव्हते म्हणून डॉ. कोवूरांनी सिकोच्या प्रमुखांशी म्हणजे श्री. हातोरी ह्यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि त्यांना ह्या गोष्टीला दुजोरा द्यायला सांगितला. श्री. हातोरींनी जे उत्तर पाठवले ते असे – “आपल्या पत्रात ज्या माणसाबद्दल आपण लिहिले आहे त्या माणसाविषयी मला काहीच माहिती नाही. ह्या साईबाबा नावाच्या माणसाला ना मी ओळखत ना माझ्या कंपनीतील कोणी माणूस. ही बातमी अत्यंत खोटी आहे ह्याबद्दल आम्हाला खात्री आहे. हे उत्तर जेव्हा त्याच वर्तमानपत्रात प्रसिध्द झाले तेव्हा भगवंतमचे ताबूत थंडे झाले. ह्यावरुन ह्या बाबांनी आपला चमत्कार जनतेमधे पसरवण्यासाठी कोणाकोणाला हाताशी धरले होते आणि त्यासाठी कुठल्या मार्गाचा अवलंब केला होता हे समजून येईल.
जयंत कुलकर्णी.
जयंतजी,
लेख आवडला.
समान विचाराची,समान कृत्ये करणारी, समान पात्रता असणारी माणसे एकत्र गोळा होतात.
जसा बाबा तसे त्याचे भक्त.
म्हणुन बाबासोबत त्याच्या भक्तांनाही धारेवर धरायला हवे.
Khup chhan lekh hota satya saiche satya darshan darshan ghadvale baddal me apala khup abhari ahe
आज प्रथमच तुमचा ब्लॉग वाचला. आवडला.
CHAAN. KHUP WEGLYA WISHAYANWAR LIHITA TUMHI. AAWADAL.
Mothmothe vidwanch jar asha bhondunchya mage dhavtil tar sarvasamanyanche kay ?
जयंत काका….अप्रतिम लेख आहे.
Shri. Jayant Sir,
pottikidikine lihila ahe lekh. pan kharach he sagla vachun pan ani veloveli andhshradha nirmulan valyani saglya chamtkaranchi shastriya karan mimansa karun sudha jar lokanche dole ughadat nahit. tar tumhala asa watata ka ki asa ektyane vichar karun upyog hoil. aplyala ekach vicharanchi mansa jamavavi lagtil. ekacha awaz konala aikayala jat nai. pan jar saglyani milun awaz uthavala tar nakki farak padel. tyamule ha lekh khp jananparyant pohochavane avashyak ahe. mi te majhya parine karaycha prayatna karat ahe.
जयंतजी! १००% पटलं तुमचं! सत्य साईंच्या अत्यंदर्शनाला जाऊन आता आंतराष्ट्रीय खेळाडूही अश्रू ढाळत आहेत.त्यांचा आदर्श कौशल्य, मेहेनत, नम्रता यासाठी ठेवायचा की त्यांच्या अध्यात्म (?) प्रेमासाठी? संस्कारक्षम वयातल्या मुलांनी कुठले संकेत खरे मानायचे? यासगळ्या विरूद्ध तुम्ही लिहिलंय त्याच अनुषंगाने आपला सगळ्यांचा रेटा आता वाढायला हवाच! आभार!
मला छान वाटलं तुमचा लेख वाचून पण एक कळत नाही कि अगदी माउली नि सुधा चमत्कार केले होते. का सगळ्या धार्मिक पुस्तकांना मध्ये चमत्कार लेही लेले असतात . का सगळ्या संताना गरज आहे चमत्काराची… सगळे संत माउली,साईबाबा,गोरक्षनाथ.. आणि हे सगळं आपण वाचतो नाही अगदी पारायणं करतो गजानन महाराज पोथी,अकालकोt स्वामी….
pan chamtkar mhanje andha shradha ka…..?
mast lekh awadla…………… khara tar lokana samjawna mhanje chikhlat goda marnya sarkhe ahe…………………..
great…..