गोळाबेरीज

गोळाबेरीज

ज्या शुल्लक कारणांनी आयुष्यातून उठलो

त्यापेक्षाही विचीत्र कारणांनी

परत आलो.

आता त्याच जुन्या रस्त्यांच्या वळणावर

आणि त्याच ग्रीष्म ऋतूत, त्याच वेळी

मी इथे काय करतोय ?

तिच माणसे,

त्यांच्या काळज्या पण त्याच

आणि त्याच क्षितीजावरच्या आकाशाचा

तोच आगीचा लालभडक रंग,

न विझलेल्या ह्याच का त्या आगी ?

याच रस्त्यावर उगचंच फिरणार्‍या या बायका,

काय त्यांचा दोष ?

पण चढतील मनाविरुध्द सुळांवर

तापलेल्या खोलीत. अमर होतील का त्या ?

त्यातुनच ती माझ्या दिशेने येतीए,

माझ्या मनात कसलेच विचार नाहीत.

पण मी कारणे देऊ शकतो सगळ्याची

स्वत:लाच.

रस्त्यावर आता आम्ही दोघेच.

नको रडूस तू बाई आणि

ओठ दातांमधे चावू नकोस.

त्या मागच्या वेळी फुललेल्या कळ्या

कुस्करून जातील.

नको येऊस माझ्या जवळ,

ठिणग्यांचे रुपांतर नको करुस अग्नीत.

वर्षा मागून वर्षे जातील,

तुला कोणीतरी भेटेल, मग तू विसरशील या भेटी,

कारण देवानेच दिली आहे तुम्हाला

ही वेड लावायची शक्ती.

त्या शक्तीला,

त्या स्त्रित्वाला,

त्या गोंडस बाहूंना,

त्या सुंदर रुपाला,

त्या गौर खांद्यांना माझे मन मी

केव्हाच वाहिलेले आहे.

तरी सुध्दा या सगळ्यातून

सुटायची धडपड

का करते आहे माझे मन ?

का???


Advertisements

About जयंत

Author of many articles... and a published author.
This entry was posted in कविता. Bookmark the permalink.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / बदला )

Connecting to %s